अजिंक्य : प्रेमाची शप्पथ आहे तुला

( image by pexels.com )

पर्व 5वे.......

भाग ०१
नर्स एका खोलीत पर्समधून एक सिगरेटच पाकीट तिच्या कोटाच्या खिशात ठेवते. लायटर हातात घेऊन तिने ते हि खिशात ठेवल. केस नीट बांधून ती कोटाच्या दोन्ही खिशात हात ठेवून ती चालायला लागली. बाहेर येऊन दुसऱ्या खोलीत ती गेली. डॉक्टर आत होते. त्यांच्याशी बोलण झाल. तिने इंजेक्शन मध्ये औषध भरल. डॉक्टर बाहेर आले.
कसा आहे तो ?
डॉक्टर : ऑक्सिजन मशीन शिवाय श्वास सुरु आहेत. नशीब आहे त्यांच.
जगायचे चान्सेस आहेत का ?
डॉक्टर : नाही. पण मरायची लक्षण हि दिसत नाहीत.
ठीके, मी भेटू शकतो ना ?
डॉक्टर : हो, पण आपण कोण  ?
 आमच नात शब्दात सांगेन अस नात आमच्यात अजून तरी नाही झाल. मानल तर नात असत नाही मानल तर कुणाचा कुणाशी संबंध असतो इथे ?
डॉक्टर : हो पण काही नियम आहेत हॉस्पिटलचे.
नात बनेल ना तुम्ही आत सोडल मला तर.
डॉक्टर : बर , पण जास्त वेळ घेऊ नका.
इच्छा हि नाही.
डॉक्टर : आणि हो, कुणी त्यांच असेल आणि तुम्ही त्यांना ओळखत असाल तर कळवा त्यांना. कारण ते स्वतः इथ आलेत.
हो आहे ओळखीचे. बोलावून घेतो त्यांना.
डॉक्टर निघून गेले. तो माणूस आत गेला.
आत खोलीत सिगरेटचा धूर हवेत फिरत होता. सिगरेटचा वास उग्र येत होता. तो अचानक आत आल्यामुळे नर्स सिगरेटच पाकीट पटकन तिच्या कोटाच्या खिशात लपवते. त्याला ते दिसत. ती बाहेर निघून जाते. तो माणूस आत येतो.
....अजिंक्य ?
अजिंक्य : (सिगरेटचा एक कश आत घेऊन श्वासासोबत तो धूर सोडत ) हम. तू ?
सांगेन..पण नंतर, इतकी घाई नको. मी कोण हे महत्वाच नाही मी का आलो ते महत्वाच आहे. डॉक्टर सांगत होते. लास्ट स्टेज सुरु आहे तुझी. आणि हि सिगरेट ? ते पण हॉस्पिटल मधे ? ती नर्स तुझी काळजी घेतेय का मारतीय ?
अजिंक्य : प्रेमात मरून इतकी सवय झालीय कि असा लवकर मरणार नाही. आणि ह्या अशा आजारांनी तर मरणारच नाही मी. मेलो तर प्रेमातच मरेन.
हि तुझी हालत कशी काय झाली ?
अजिंक्य : कारण द्यायला मी बांधील नाही.
 मुक्त आहेस तू. माहितीय मला.
अजिंक्य : माहिती असून पण असल बोलण नाही आवडत मला.
तुझी आवड निवड सगळी माहितीय मला. म्हणून तर आलोय मी पुण्यातून इथ.
अजिंक्य सलाईन लावलेला हात मांडीवर घेतो. सिगरेटचा एक कश घेऊन त्याचा धूर त्या सलाईनच्या हातावर सोडतो. आणि तशीच नजर हातावर ठेवून तो गप्प राहतो. ( डोळ्यात असेल तेवढी जागा पाण्याने घेतली ).
काय झाल ?
अजिंक्य : काही नाही.
नर्स आत येते आणि त्याला चिंगम देते.
अजिंक्य : अजून एक.
ती देते आणि पुन्हा नजर चोरून बाहेर निघून जाते. ती दाराजवळ असताना अजिंक्य तिला पंखा सुरु करायला लावतो. ती सुरु करून बाहेर जाते. अजिंक्य चिंगम चावतो आणि शेवटचा सिगरेटचा कश घेऊन सिगरेट बाजूला उलटीसाठी ठेवलेल्या स्वच्छ भांड्यात विजवतो. दुसर चिंगम त्याला देतो.
चिंगमचा कागद काढताना,
ती नर्स कोण आहे....(मध्येच थांबत )  ‘तुझी’.
अजिंक्य : गर्लफ्रेंड. कालच बनवली पुन्हा. खूप वेळा इथ आलोय मी. प्रत्येक वेळीस तिच्यावर, तिच्यासोबत प्रेम केल. इथून जाताना तिला आणि आमच्या आठवणींना इथच सोडून दिल. आठवणी विसरता येत नाहीत. कुठे बाजूला आपल्यापासून करता येत नाहीत. बहुतेक मी आठवणी इथे ठेवल्या त्या परत घ्यायला इथ यायला लागल. मध्ये खूप वेळ गेला. पण शेवटी वेळ आलीच. काल इथ आलो मी.

काल नाही. तीन दिवस झालेत तुला इथे येऊन.
अजिंक्य : शुध्द काल आलीय. तर ‘ति’ दिसली. पुन्हा प्रेम पुन्हा त्या गोष्टी.
खर प्रेम ?
अजिंक्य : खर काय असत या जगात ? सगळ खोट खोट आहे. खोट्याचा समज जेव्हा पक्का होतो. तेव्हा ते ‘खर’ झालेलं असत. एक खोट हेच एक सत्य आहे. ‘प्रेम सुध्दा’. राग येतो मला या सगळ्याचा.
ती इतकी काळजी घेतेय तुझी. तुला हि सिगरेट आणून देतेय. लायटर, चिंगम आणून देतेय तुझ्यासाठी. ते पण इथ हॉस्पिटलमध्ये. इतकी रिस्क घेऊन. फक्त तुझ्यासाठी.  आणि..
अजिंक्य : काही नाही. प्रेम असत तर तिने सिगरेट नाही तीच हृदय दिल असत. नाही जमल तिला. नुसत शरीर दिल तिने मला.
म्हणजे तू... इथे सेक्स केला ?
अजिंक्य : हो. काल रात्री. ( हाताने पांघरून बाजूला करून बेडशीटकडे बघत ) काल थोड स्पर्म इथ सांडल. त्याचा डाग. हा पुरावा. खूप त्रास झाला. पण केला आम्ही.
आजारी असताना कोण करत सेक्स ?
अजिंक्य : गरज नसताना तरी कोण प्रेम करत ?
कुणीच नाही.
अजिंक्य : मी करतो.
का ?
अजिंक्य : आवड आहे. सहसा लोकांना त्यांची आवड जोपासता येत नाही. मी कायम पोसतो.
तू इथे एकटा आलास.
अजिंक्य : हम.
आणि प्रतीक्षा ?

भाग ०२
अजिंक्य : माहित नाही.
माहित नाही ?
पुणे.....
प्रतीक्षाची आई : तुला महिती झाली ना मग जा, जाऊन ये. त्याला तुझी गरज आहे. नवरा बायकोमध्ये असे समज-गैरसमज होत असतात. पण गरज असताना ते हि माहित असताना जाणूनबुजून तू गेली नाहीस तर काय अर्थ आहे त्या नात्याला ?
प्रतीक्षा : असा हि काय अर्थ नाहीये आमच्या नात्याला. जे नात मी इतके वर्ष जपलं त्या नात्याला अजून कित्येक नाती जोडली गेलेली आहेत. आणि अशा माणसासाठी मला किव यावी इतका तो कोणी माझा नाहीये. सध्यातरी.
प्रतीक्षाची आई : हे बघ जे झाल ते तात्पुरत विसर. त्याला बर वाटल कि ये हव तर परत माघारी. पण आत्ता तू जावस इतकच मला वाटत.
प्रतीक्षा : मी जाऊन काय होणार आहे ? प्रेम ?
प्रतीक्षाची आई : सोबत.
सातारा......
अंजली कोण आहे ?
अजिंक्य : दुसर प्रेम.
प्रतीक्षा : पहिलं प्रेम.
असावरी ?
तिसर.
प्रियांका ?
चौथ.
या प्रेमांना कुठे पूर्णविराम आहे ?
का ?
अजिंक्य : माहित नाही. माझ्या खाजगी गोष्टींना विचारून माझ्यावर पुस्तक लिहायचा विचार आहे का ? कि मला मारायचा ?
पुस्तक मी वाचत नाही. त्यामुळे लिहायची गोष्टच येत नाही. मारायचा विचार होता. प्रयत्न केला. आणि फसला. पुन्हा मारायचा विचार होता पण म्हंटल शारीरिक इजा करून तुला मारल तर नंतर माझ्या जीवाशी येईल. तुला तुझ्याच भूतकाळाने मारायचा विचार आहे.
अजिंक्य : तुला वाटत मी इतक्या सहज मरेन ?
इतक्या सहज मी तुझी पाठ हि सोडणार नाहीये.
अजिंक्य : अंजली अजून आठवण काढते ना माझी ?
नाही.
अजिंक्य : तुझ्या डोळ्यात मग हि भीती कसली ? मला तर तू भीत नाहीस. आणि इतका भयानक मी तर नाहीये. आत्ता आठवल. त्या दारूच्या दुकानापाशी, भर पावसात पूर्ण अंधारात माझ्या डोक्यात काहीतरी मारल होत तू. तू ओंकार. बरोबर ?
हा प्रश्न आहे कि खात्री ?
अजिंक्य : खात्री. प्रश्न तुला पडलेत सध्या. मी खात्रीने बसलोय इथे.
तुला तुझ बाळ बघायचं असेल ना जे अंजलीच्या पोटात आहे ?
अजिंक्य : हो.
मिळणार नाही. तू ज्या खात्रीने बसलायस इथे त्या खात्रीने मी तुला सांगतो, तुझ बाळ तुला बघायला मिळणार नाही. तुझी प्रतीक्षा तुझ्यापर्यंत पोचणार नाही. आणि तिच बाळ.... ते तुला कधी त्याचा बाप मानणार नाही. तू आता प्रेमाचा शोध घे. सापडलं तर तुझ नशीब. आणि नाही सापडलं तर तडपत रहा
अजिंक्य : काय वाटत तुला ? मी तडपेन ?
हो.
अजिंक्य : अंजलीला बाळ झाल्यावर तुम्ही दोघ त्याला किती हि पोसा. कितीही तुझ्या खांदानाचे विचार त्यावर बिंबवा. माझ्यातल्या काही गोष्टी तो दाखवेल तुम्हाला. आणि त्याला तुम्ही नकार नाही देऊ शकणार. भले मी खोटारडा असेन. पण मी प्रत्येकीवर खर प्रेम केलय.
अजून किती खर खोट करणार ?
अजिंक्य : माहित नाही.
अस वाटत आत्ता तुझा गळा दाबून इथे मारून टाकाव तुला.

अजिंक्य : ये. फक्त एक काम कर तो टेबलावर मोबाईल आहे त्याचा कॅमेरा बंद कर. 

भाग 03
इतका नालायक माणूस मी अख्या आयुष्यात कधी बघितला नव्हता.
अजिंक्य : का तू तुझ्या बायकोच प्रेम मिळवू शकत नाही म्हणून मी नालायक आहे का ? मिळव तीच प्रेम तू. तू पण हो नालायक.
मला नालायक नाही व्हायचं.
अजिंक्य : देवाने राक्षसाला मारलं. कितीतरी पुराणात लिहून ठेवलेलं आहे. ती सगळी युद्ध देवीसाठी झाली. देवीचं प्रेम देवावर होत आणि राक्षसांना देवी हवी होती. मग युद्ध करून देवांना हरवून देवीला मिळवण्याचा प्रयत्न ते राक्षस करायचे. देवीच्या प्रेमाने कायम देव जिंकत आलेत. म्हणून कधी अस कुठं लिहिलेलं नाही की देवाने देवाला मारलं. देवाने फक्त राक्षसाला मारलं. पण यात एक छोटासा बदल हवा होता. जर का राक्षस देव बनले असते तर देवी त्यांची ही झाली असती. प्रतिस्पर्ध्याला मारून स्पर्धा संपवायची नसते. स्पर्धा खेळायची असते. म्हणून म्हणतो, तू पण हो नालायक.मिळेल तुझी तुला अंजली.
ती तर होईल माझी पण तुला तुझं कोणी मिळवून द्यायचं नाहीये. तुला तडपताना बघायचय.
अजिंक्य : आणि काय करणार ? त्रास मला होईल तुला काय होणारे ? नाही ती स्वप्न नको बघू तू अंजली मिळव.
पण तू तडपताना बघायचंय मला.
अजिंक्य :आता ही तडपत आहेच. कोणी सोबत नाहीये माझ्या.
काय झालं म्हणून तू इथे आलास ? कोणता रोग झालाय तुला ?
अजिंक्य : छातीवर वार करून घेतले. मरायचं नव्हतं आणि जगायच पण नव्हतं. मधला त्रास जगायचा होता. प्रतीक्षा निघून गेली. म्हणून मग वार करून घेतले बुलेटवर बसलो आणि दवाखान्यात आलो. पुढचं काय आठवत नाही.
प्रेमाची शप्पथ आहे तुला पर्व २रे | वाचण्यासाठी क्लिक करा 
भेटू पुन्हा लवकरच...
अजिंक्य : अंजली सोबत ये.
तिला तर तुझं तोंड पण बघायचं नाहीये.
अजिंक्य : मग मला भेटायला कशाला आलास ?
भेटायला तू काय कोण मोठा माणूस आहेस का ?  तू मेलास का हे बघायला आलो मी पण निराश केलंस. पुन्हा अस निराश करू नकोस.
अजिंक्य : अंजलीला सांग माझे कान मोठे आहेत. कानाची पाळी मोकळी आहे. उजव्या हातावरची जीवन रेषा मोठी आहे. पत्रिकेत जीवन योग जास्त आहे. इतक्यात मी मरणार नाही. जमलं तर माझं प्रेम संपव. कारण मीच आता सगळ्यांपासून लांब जाणारे.
व्वा...! साधूच्या तोंडात चोराची भाषा. नाही शोभत असली वाक्य तुला.तू तर नालायक आहेस. आणि हेच खर आहे. अंजली पासून तू लांब झालास तरी अजून कितीतरी आहेत. त्यातून सुटता सुटता तू कायमचा प्रतीक्षापासून लांब होणारेस. आणि मला तेच हवंय. बाकी तुझ बरबादी... "गॉड ब्लेस यु".
तो खोलीतून बाहेर जाताना टेबलावरचा मोबाईल बघतो. बंद असतो. तो मागे वळून बघतो. अजिंक्य त्याच्या बाजूच्या टेबलावरचा मोबाईल घेऊन त्याला दाखवून व्हिडीओ रेकॉर्डिंग बंद करतो. तो निघून गेला. अजिंक्य हाताच्या सलाईनची सुई काढतो.

भाग ०४
अजिंक्य उठून बाहेर जायला निघाला तेवढ्यात नर्स आली.
नर्स : कुठे चालला ?
अजिंक्य : कंटाळा आला. जातो घरी.
नर्स : मागच्यावेळी पण असाच मधून गेला होतात. मला डॉक्टर ओरडले. तेवढ सलाईन संपू दे. मग जावा प्लीज.
अजिंक्य : अजून खूप आहे. तीनशे मिली राहीलय. ते संपायला दोन तीन तास.
नर्स : हो ते झाल कि परत नाही लावणार बहुतेक, एवढ पूर्ण संपू दे.
अजिंक्य : संपवायचंच आहे न. थांब. 
अजिंक्य सलाईनची बाटली घरून बेसिनजवळ जातो. सलाईनला जोडलेलं रिकाम इंजेक्शन हातात घेऊन टायने बाटलीला तीन चार भोक पडतो. आणि सलाईन सगळ बेसिनमध्ये रिकाम करून. इंजेक्शन पुन्हा त्यात टोचून बाटली जागेवर लावतो.
अजिंक्य : संपल. जाऊ ?
अजिंक्य : बिल करायला सांग माझ. आलो मी.
नर्सने अजिंक्यला बघतील. त्याच्या केसातून हात फिरवला. आणि त्याला मिठी मारली आणि बाहेर निघून गेली.
अजिंक्य खिशात हात घालून बघतो. बेडपाशी जाऊन त्याने बुलेटची चावी घेतली आणि तो बाहेर गेला. बिल भरल. बुलेट वर बसला. गाडी सुरु केली. नर्स तिथे आली. तिने लायटर त्यला दिल. आणि एक उरलेली सिगरेट. अजिंक्य ती पेटवतो. आणि गाडी घेऊन निघून जाते. नर्स हि दवाखान्यात जाते. निम्म्या रस्त्यात होता अजिंक्य. त्याला कॉल आला.
अजिंक्य : हेल्लो ?
अदिती : नमस्कार सर, मी मिस, अदिती. आपण टोयोटा सातारा मधून इन्होव्हा बुक केली होती. ती साताऱ्यात आली आहे. आपल्याला उद्या डिलिव्हरी हवीय कि आज ?
अजिंक्य : मी हॉस्पिटलमधून घरी चाललोय. तुमचा कोणी माणूस पाठवेल का गाडी घरी ?
अदिती : हो. सर. नक्की. तुमचा पत्ता आहे. आपण पूर्ण पैसे पे केले आहेत. दीड तासात तुमच्या दारात तुमची गाडी पोचत केली जाईल. टोयोटा सातारामध्ये बुकिंग केल्याबद्दल धन्यवाद.
अजिंक्य घरी गेला. दार उघडल आणि आत जाऊन तो सोफ्यावर बसला. मोबाईलमध्ये काहीतरी बघत असताना प्रतीक्षाचा कॉल आला.
प्रतीक्षा : अजिंक्य. कसा आहेस ?
अजिंक्य : ठीक.
प्रतीक्षा : फक्त ठीक ?? चांगला का नाहीस ?
अजिंक्य : माहित नाही, आत्ता आलोय घरी.
प्रतीक्षा : मी येतेय साताऱ्यात.
अजिंक्य : कशाला ?
प्रतीक्षा : तुला भेटायला.
अजिंक्य : भेटायला फक्त ? राहायला ?
प्रतीक्षा : इतक्यात नाही.
अजिंक्य : का ?
प्रतीक्षा : नको, अजिंक्य तो विषय.
अजिंक्य : सारा कुठय ?
प्रतीक्षा : आहे सोबत.
अजिंक्य : तिचा वाढदिवस आहे ना उद्या म्हणून तिच्यासाठी गिफ्ट घेतलय मी.
प्रतीक्षा : काय ?

भाग ०५
अजिंक्य : बार्बी डॉल. आणि तुझ्यासाठी पण एक घेतलय.
प्रतीक्षा : काय ?
अजिंक्य : इन्होव्हा.
प्रतीक्षा : का ?
अजिंक्य : बुक आधीच केलेली पण आज मिळणारे.
प्रतीक्षा : बर वाटतय का नक्की ?
अजिंक्य : येतीयस ना माझ्याकडे येऊन बघ. वाट बघतोय.
प्रतीक्षा : हो आलेच.
अजिंक्य : हळू चालव गाडी. आणि काळजी घे.
प्रतीक्षा : हो तू पण घे. काय आणू का तूला खायला ?
अजिंक्य : बिर्याणी आण.
प्रतीक्षा : चालेल. आणते.
अजिंक्यने घर थोडफार आवरल. मग थोडी दारू घेऊन टीव्ही लावून पीत बसला. टीव्ही बघता बघता त्याला काहीतरी सुचायला लागल. त्याने कागद कागदावर कविता लिहायला सुरुवात केली. कविता लिहून झाली. एकदा त्याने वाचून बघितली. आणि उरलेला ग्लास पूर्ण पिऊन सिगरेट पेटवली. सिगरेटचा झुरका घेत त्याने  मोबाईल मधून सगळे नंबर डिलीट करून टाकले. सिगरेट ओढत तसाच तो बाल्कनीत जाऊन उभा राहिला. बाल्कनीतून खाली रस्त्याकडे बघत तो विचारात हरवून गेला. थोड्या वेळाने खाली इव्होव्हा आली. अजिंक्य खाली गेला. गाडीची चावी घेऊन तो गाडीत बसतो. पुन्हा बाहेर येऊन गाडीला बंद करून घरात येऊन बसतो.
तो अंघोळ करतो. मग इंग्लिश गाणी लावून ती ऐकत शणात सोफ्यावर पडून राहतो.
दाराची बेल वाजते. अजिंक्य जाऊन दार उघडतो. दारात प्रतीक्षा आणि सारा.
तिघे आत येतात. अजिंक्य प्रतीक्षाला नवीन बिसलेरी आणून देतो.
प्रतीक्षा : काय झाल अचानक तुला.
अजिंक्य छातीवरचे वार पट्टी काढून दाखवतो.
प्रतीक्षा : का केलस अस ?
अजिंक्य : असच. मरायचा विचार होता. पण तू आली असती तर मला समजल नसत. म्हणून छोटस केल हे काहीतरी. मला माहित होत तू येशील. आता जाऊ नकोस परत.  
प्रतीक्षा : भूतकाळ आणि आठवणी माणसासोबत आणि माणसानंतरपण तशाच राहतात. मी सगळ विसरले किंवा विसरव अस वटता असेल तुला तर प्लीज, अस काही वाटून घेऊ नकोस. मला विसरायचं नाहीये. आणि लक्षात हि ठेवायचं नाहीये. तुझ्यावर जेवढ माझ प्रेम आहे तितका आता तुझ्याबद्दल मनात राग आहे. पोटातल बाळ, फक्त त्याच्यासाठी मी सगळ शांत मनात ठेवून आहे. आणि तुझ्याशी नात ठेवून आहे. बाळ झाल कि तुझ्यापासून लांब होणार आहे. मला नाही जमणार तुझ्यासोबत राहण. आणि हो. मी आजची रात्र फक्त इथे राहीन. उद्या जाईन. आईने जबरदस्ती इथ पाठवलय मला म्हणून मी आले. प्रतीक्षा आत जाऊन बिर्याणी काढून त्याला आणून देते. एवढ्या वेळात सारा अजिंक्यसोबत बोलत नाही. अजिंक्य तिला जवळ घेतो तर ती प्रतीक्षाजवळ जाऊन बसते.
प्रतीक्षा : आम्ही खाऊन आलोय.
अजिंक्य बिर्याणी खातो. प्रतीक्षा आतल्या खोलीत जाऊन साराला झोपवते. बेडवर इन्होव्हाची चावी असते. आणि एक कागद. त्यावर लिहिलेलं असत. ‘तुझ्यासाठी’. प्रतीक्षा बाहेर येऊन अजिंक्यला चावी देऊन टाकते. आणि सारासाठी आणलेली बार्बी पण त्याला देऊन टाकते.
अजिंक्य हात धुवून ती बाल्कनीत उभी असते तिथे जातो. ती तिथून निघून दुसऱ्या खोलीत जाते. अजिंक्य तिथे जातो.
प्रतीक्षा : मला कपडे बदलायचे आहेत. बाहेर जा.
अजिंक्य : का ?
प्रतीक्षा : मला तू माझा वाटत नाहीस. तू जा बाहेर प्लीज. नाहीतर मी जाते. बाहेर.

प्रतीक्षा दार लावते त्यात अजिंक्याची बोट सापडतात. तो बोट धरून बाजूला येतो ती दर उघडून बघते तर अजिंक्यला लागलेलं बघून ती त्याच्याजवळ जाऊन बसते. आणि त्याच्या हाताला धरून बोट घट्ट पकडून धरते. बाजूला बिसलेरी असते त्यातल पाणी त्याच्या बोटांवर थोड ओतून ती तशीच त्याची बोट धरून त्यावर फुंकर मारायला लागते.
भाग ०६
अजिंक्य तिच्याकडे बघतो. प्रतीक्षा त्याच्याकडे बघते. अजिंक्य त्याचा हात तिच्या हातातून सोडवून तिच्या हाताला धरतो.
प्रतीक्षा : प्लीज अजिंक्य तुला वाटत असेल मी इथ थांबावं आजची रात्र तर नको अस काही करू. माझा मूड नाहीये. आणि तुझ्यासोबत हे काही करायला तर अजिबात मूड नाहीये. तू हे अधिकार सगळे संपवून बसलायस. मला नाही काय संबंध ठेवायचा. प्लिज.
अजिंक्य : मी दवाखान्यात आहे. तुला कुणी सांगितल ?
प्रतीक्षा : नेहमीची ती नर्स.
अजिंक्य : आणि अंजलीचा नवरा आलेला. दवाखान्यात.
प्रतीक्षा : अंजली ?
अजिंक्य : नाही.
प्रतीक्षा : मी सांगितल तिला. तू दवाखान्यात आहेस. वाटल होत ती येईल तुझी काळजी घ्यायला. नवरा आला. चांगल आहे. प्रेम संपल तर तीच...... तुझ्यावरच.
अजिंक्य : कायमस्वरूपी आठवणी असतात. प्रेम नाही. आधी मी होतो. आता तीचा नवरा आहे.
प्रतीक्षा : तीच तू पाहिलं प्रेम होतास. तुझी बरीच प्रेम आहेत. तू तर कुठ एकावर थांबला. मी नव्हते तर अंजली, असावरी, प्रियांकाचा आधार घेऊन तू जगलास. इतक दुबळ प्रेम होत का तुझ माझ्यावर कि, मी निघून गेले तर तुला ते पोसता हि आल नाही ? आणि हि मला माहित असलेली नाव आहेत. माहित नसलेले अजून त्याचं काय आहे काय माहित. अजिंक्य, तू खूप चांगला आहेस. असा माझा समज होता. पण तसा तू नाहीयेस. माझ एक लग्न झालेलं असताना सारा असताना पण तू माझा साराचा स्वीकार केलास. मला वाटल तू खरच खूप प्रेम करतोस माझ्यावर. पण तू माझा फक्त आधार घेतलास आणि माझ्या वाटणीच प्रेम तू अंजलीला वाटत राहिलास. तू मला फसवलस अजिंक्य.
अजिंक्य : प्रेम तू पण केलच होतस ना अमितवर. मी असताना. प्रेम माझ्यासोबत करून लग्न त्याच्याशी केलस. हि फसवणूक नाही का ? मला माहित पण नव्हत तुझ लग्न झालेल. तुझ्या कुठल्या गोष्टी मला माहित नव्हत्या ? तुझे प्रत्येक श्वास मी त्यांचा दर-मिनिटांचा दर जाणून होतो. पण तुझ लग्न. कधी होत मला माहित नाही.
प्रतीक्षा : नकोच जुने विषय. याने फक्त त्रास होईल. पुन्हा प्रेम नाही.
अजिंक्य : मी सगळ सोडून दिल आहे. उरलेलं सोडून द्यायला तयार आहे. फक्त माझ्या सोबत रहा.
खोट्या प्रेमाची शप्पथ आहे तुला | वाचण्यासाठी क्लिक करा 
प्रतीक्षा : तू सगळ सोडून दिल तरी मी विसरू नाही शकत. आणि ज्यांच्यासोबत तुझ नात होत. त्या हि तुझ्या आयुष्यातून नाही जाऊ शकत. अजिंक्य. तुझ्या चुका न सुधारणाऱ्या आहेत. तू सुधारू नकोस.
अजिंक्य : मी वाईट नाहीये. मी कधीच वाईट नव्हतो.
प्रतीक्षा : जाऊदे. तू झोपून घे. मला वाटत आपण इथेच थांबलेलं बर. आपल शरीर सोडून काहीच एकत्र येणार नाही. आणि मला नको आहेत आता कुठलेच स्पर्श. तू लवकर बरा हो. म्हणजे मला काळजी सोडायला बरी.
अजिंक्य : म्हणजे माझी काळजी वाटते ?
प्रतीक्षा : नाही.
अजिंक्य : अजून काही खर बोलायचं आहे ?
प्रतीक्षा : शब्दात गुंतवून मी फसेन पण तू फसवंलेला इतिहास नाही विसरला जाणार. अजिंक्य, मी तुझी बायको आहे म्हणून खूप खुश होते. खूप लोक तुला आज मोठा लेखक म्हणून ओळखतात. तू लिहिलेल्या मालिका टीव्हीवर बघतात. अशा मोठ्या लेखकाची बायको म्हणून घेताना कोणत्या मुलीला आवडणार नाही. पण, असो. मी झोपते. तू हि झोप.
प्रतीक्षा आत निघून गेली. अजिंक्य बाल्कनीत सिगरेट ओढून सोफ्यावर झोपतो. तासाभरात बिर्याणीचा सोफ्यावर राहिलेला चमचा अजिंक्याच्या छातीत घुसला. आणि जखम पुन्हा वहायला लागली. अजिंक्यचा शर्ट रक्ताने भरला. प्रतीक्षा अशीच बाहेर आली अजिंक्यला बघायला. तिने ते सगळ बघितल आणि झोपलेल्या अजिंक्यला उठवल. रक्त बघून तिला रडायला यायला लागल. तिने अजिंक्यचा शर्ट काढला. 
भाग ०७
प्रतीक्षाने आतल्या खोलीतून मलम आणि पट्ट्या आणल्या. कापसाने रक्त पुसून त्यावर मलम ( क्रीम ) लावून त्यावर पट्ट्या लावून ते समान सगळ बाजूला ठेवून तिने अजिंक्यला दंडाला धरून आत बेडपर्यंत घेऊन गेली. अजिंक्यच डोक उशीवर टेकवून तिने त्याच्या अंगावर पांघरून टाकल. अजिंक्यने तिचा हात धरला. अजिंक्यच्या डोळ्यात पाणी होत. प्रतीक्षा त्याच्या शेजारी झोपली. त्याने तिच्या पण अंगावर पांघरून घातल. प्रतीक्षा अजिंक्यला जवळ घेते. त्याचे थंड श्वास तिला कपाळाला लागत होते. अजिंक्य तिला अजून जवळ ओढून घेतो. मिठी घट्ट होते. पण त्याला पट्टी केलेला भाग दुखायला लागतो तशी त्याची मिठी सैल होते. दोघांच्या अंगावर पांघरून होत. पण चेहरे बाहेर होते. प्रतीक्षाचे ते बांधून पण काहीसे सुटलेले केस अजिंक्यने त्याच्या बोटाने तिच्या कानामागे घेतले. गालावरून तिच्या हलकी बोट फिरवून तो तिला बघायला लागला. प्रतीक्षाने डोळे मिटलेले आता उघडले आणि त्याला बघितल.
प्रतीक्षा : अजिंक्य, नको.
अजिंक्य तिच्या जवळ सरकतो. प्रतीक्षा त्याच्या दंडाला घट्ट धरते. अजिंक्य तिच्या ओठांना पकडण्यासाठी आपले ओठ उघडतो. आणि प्रतीक्षा डोळे मिटून घेते. अजिंक्यच्या आधी प्रतीक्षाच त्याचे ओठ स्वतःच्या ओठात पकडून  त्याला जवळ  ओढते. त्याला छातीला दुखायला लागत. पण तरी तिच्या मिठीतून त्याला सुटू वाटत नव्हत. त्याने तिच्या ओठांना ओठात पकडूनच तिला बाजूला केला. आणि तो तिच्यावर येऊन तिच्या कपाळावरून ओठ टेकवत कपाळ, भुवई, पापण्या, आणि मग नाकावरून पुन्हा बराच वेळ ओठांवर रेंगाळत तो गळ्यापासून खांद्यापर्यंत आणि मग खाली सरकत तिला ओठांनी ओलसर करत गेला. जिथे जिथे त्याने ओठांनी तिला ओल केल तिथे एक फुंकर मारत होता. त्याने ओठ टेकवले कि तिचे डोळे गच्च व्हायचे आणि त्याने फुंकर मारली कि गालात एक हास्य. अजिंक्य छातीच्या टोकापर्यंतच थांबला आणि पुन्हा बाजूला झोपला.
प्रतीक्षा : काय झाल ?
अजिंक्य : तुला नको आहे ना ? बस इतकच.
प्रतीक्षा : आपल्या दोघातल अंतर कमी व्हायला भावनांचा शब्दांचा वापर व्हावा अस मला वाटत.


अजिंक्याने डोळे मिटले. प्रतीक्षा हि झोपली. रात्री झोपेत सवयीसारख तिच्या अंगावर हात टाकून तो झोपला.
सकाळी......
दहा वाजता प्रतीक्षा अजिंक्यशी बोलते,
प्रतीक्षा : दवाखान्यात जाऊ. चल.
अजिंक्य : नको आहे मी ठीक.
प्रतीक्षा : नको आज पण निघाली जखम तर ? चल तू ऐकत जा. तू लवकर बरा झालास तर मला लवकर जाता येईल. चल.
अजिंक्य : त्या दवाखान्यात नको.
प्रतीक्षा : हो दुसऱ्या जाऊ.
अजिंक्य तिला इन्होव्हाची चावी देतो.
प्रतीक्षा : नको. नवीन गाडी आहे तिला घेऊन दवाखाना नको. स्विफ्टने जाऊ.
ती अजिंक्य आणि सारा तिघे दवाखान्यात गेले. अजिंक्यला तपासून  झाल.
गाडीत,
प्रतीक्षा : बाहेर जेवायचं ?
अजिंक्य : हो.
प्रतीक्षा : जेवून दुपारी झोप.
अजिंक्य : हो.
हॉटेलपाशी पोचल्यावर. प्रतीक्षा आत जायला सांगून अजिंक्य गाडी पार्क करायला जातो. आत जाताना प्रतीक्षाला आईचा कॉल येतो.
प्रतीक्षाची आई : आहे का बर ?
प्रतीक्षा : हो. मी आज येणार होते पण त्याला इतक बर नाही. जखम जास्त आहे. मी थांबते त्याला बर वाटत नाही तो पर्यंत.
प्रतीक्षाची आई : मी तर म्हणते तिथेच रहा.
प्रतीक्षा : आई, जबरदस्ती नको. आत्ता मी त्याला बर वाटाव म्हणून चांगल वागतेय. म्हणजे मी विसरलेय किंवा विसरेन अस नाही. तो बरा झाला कि मी पुण्याला येणार आहे. यावर पुन्हा विषय नको. आम्ही आलोय हॉटेलमध्ये. तो आलाय-ठेवते.
अजिंक्य : कोण होत ?
प्रतीक्षा : आई.. तू कसा आहेस विचारत होती. काल तिला मी पोचले नीट ते सांगायचं राहील.
अजिंक्य : बर.
दोघे आत जाऊन जेवले. आणि घरी आले. घरी आल्यावर तिने त्याला औषधी गोळ्या दिल्या. गोळ्या खाऊन अजिंक्य शर्ट बदलून कॉम्प्युटर समोर खुर्चीवर बसला. कॉम्प्यूटर सुरु होईपर्यंत तो एक सिगरेट पेटवतो. अजिंक्य त्याला मागे बेडवर बसून बघत असते. 
भाग ०८
प्रतीक्षा उठून अजिंक्याच्या मागे उभी राहते.
प्रतीक्षा : सिगरेट पण सोड. प्लीज.
अजिंक्य उठून सिगरेट बाल्कनीतून खाली टाकून देतो. आत पुन्हा येऊन प्रतीक्षा समोर उभा राहतो. प्रतीक्षा अजिंक्यच्या गालावरून हात फिरवते. कॉम्प्यूटरच्या टेबलावर असलेल्या दारूच्या दोन बाटल्या अजिंक्यच्या हातात देते. अजिंक्य त्या बेसिनमध्ये रिकाम्या करून बाटल्या केरात टाकून देतो. आत पुन्हा येतो तर प्रतीक्षा टेबलावर असलेल अजिंक्यने लिहिलेलं ‘कुणीतरी’ पुस्तक हातात घेऊन त्यावरच त्याच नाव बघत असते. अजिंक्य मागून तिला पोटाला धरून मिठी मारतो. ती डोळे मिटून घेते. हातातल पुस्तक टेबलावर ठेवते. आणि डाव्या हाताने अजिंक्यचे केस कुरवाळू लागते. उजव्या हाताने अजिंक्यचा उजवा हात धरून तिच्या छातीवर आणते. बांधेलेले केस अजिंक्य दाताने क्लचर काढून मोकळे करतो. छातीवरचा हात क्षणभर काढून उजव्या हाताने तिचे सगळे केस डावीकडे करून पुन्हा पोटाचा हात घट्ट करून छातीला गच्च पकडून त्याने कानाच्या बाजूला आपले ओठ टेकवून तिला जवळ ओढत राहण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. प्रतीक्षा वळून अजिंक्यकडे बघते. अजिंक्य तिच्या ओठांना ओठात पकडतो. तसच थोड चालत चालत अंदाजाने दोघ बेडजवळ पोचतात. अजिंक्य तिला बेडवर बसवतो. ती तिचे केस नीट एका बाजूला करते. तिला केस सावरताना बघून अजिंक्य तिला मिठीत ओढून घेऊन तसाच बेडवर तिच्यासोबत झोपतो. दोघे हि पूर्ण गरम झालेले. आणि अचानक जोरात वार आत येत. प्रतीक्षा घट्ट अजिंक्यच्या दंडाला धरते. बाल्कनीच दार उघड असत. वर पंखा सुरु असतो. प्रतीक्षा बेडच्या बाजूला असलेली एक सिगरेट त्याला पेटवून देते. अजिंक्य एक झुरका घेऊन तिच्या चेहऱ्यावर धूर सोडतो. प्रतीक्षा त्याचा शर्ट हाताने पकडून त्याला अजून जरा जवळ ओढते. अजिंक्य ती सिगरेट प्रतीक्षाच्या ओठांवर टेकवतो. ती झुरका घेऊन अजिंक्यच्या तोंडावर धूर सोडते. सिगरेट तशीच बाजूच्या एका स्टीलच्या पट्टीवर ठेवून अजिंक्य प्रतीक्षाजवळ जातो. दोघ एकमेकांना कीस करत असतात.... न थांबता. प्रतीक्षा त्याला डोक्याला मागून धरून जवळ ओढते आणि अजिंक्यचा ओठ जोरात चावते. अजिंक्य सोडवण्याचा प्रयत्न करतो. पण ती अजून जोरात चावत त्याला कीस करू लागते. अजिंक्यच्या ओठातून कळ यायला लागते. अजिंक्यला जाग आली. त्याच्या हातातली पेटलेली सिगरेट त्याच्या बोटाला टेकली होती. तिथली त्वचा जळली गेली. त्याने सिगरेट पटकन खाली टाकली. पायानेच ती विजवली. पायाला हि भाजल. त्याने मागे वळून बघितल प्रतीक्षा नव्हती. बेडवरच बेडशीट एकसारखं होत. कॉम्प्युटर सुरु होता. ‘कुणीतरी’ पुस्तक टेबलावर नीट ठेवलेलं होत. अजिंक्य बोटावर फुंकर मारत दुसऱ्या खोलीत गेला. प्रतीक्षा साराजवळ झोपलेली. अजिंक्य तिला बघत उभा होता. तिथल्या एका खुर्चीवर बसून त्याने हातात एक डायरी आणि एक पेन घेतला. प्रतीक्षाला बघून काही लिहायला सुचत का म्हणून तो अडीच तास तो तसाच एकटक तिला बघत बसला. काहीच सुचत नाही म्हणून त्याने तीच चित्र काढायला घेतल. पावणेचार वाजता प्रतीक्षाची दोन चित्र काढून अजिंक्य दोन्ही चित्रांवर खाली त्याची सही करतो. “प्रतीक्षा”.
अजून एक चित्र कराव म्हणून तो तिला बघत-बघत झोपून गेला. सकाळी सातला प्रतीक्षाला जाग आली. तिने अजिंक्यला खुर्चीवर झोपलेलं बघितल. त्याच्या हातातली उघडी डायरी तिने बघितली. त्यावर तिची दोन चित्र होती. तिने अजिंक्यला चहा बनवला. आणि त्याला उठवल.
भाग ०९
प्रतीक्षा दुसऱ्या खोलीत निघून गेली. अजिंक्य तिला हाक मारतो. पण तिला ऐकू येत नाही. त्याच्या चहाचा पहिला घोट तिने पिल्याशिवाय अजिंक्य चहा प्यायचा नाही. अजिंक्य चहाचा कप तसाच टेबलावर ठेवतो. तेवढ्यात त्याला कॉल येतो.
अजिंक्य : हेल्लो,
प्रोड्युसर : हेल्लो, सर. आज आपली मिटिंग होती नऊ वाजता. आम्ही पुण्यातून यायला निघालो आहे. आनेवाडी टोल नाक्याजवळ पोचलो आहे. तुम्ही साताऱ्यात आहात ना ?
अजिंक्य : अ....हम. या तुम्ही. मी तुम्हाला पत्ता पाठवतो तिथे भेटू.
प्रोड्युसर  : ओहके सर. भेटू.
अजिंक्य उठून आवरायला जातो. तासाभराने आवरून तो बाहेरच्या खोलीत येतो. प्रतीक्षा सोफ्यावर शांत बसलेली असते. तिच्या पाठमोरी उभा राहून अजिंक्य बोलतो,
अजिंक्य : मी मिटिंगला चाललोय. येईन तासाभरात. जेवण नको बनवू. मी आणतो काहीतरी. काळजी घे. आलोच.
अजिंक्य बाहेर आला. त्याने दारातून आत नजर टाकली. प्रतीक्षा बसलेली तशीच बसलेली. बुलेट सुरु झाली. एका टपरीजवळ बुलेट थांबवून त्याने माणसाला बोटाने खुणावल. त्याने अजिंक्यकला सिगरेटच पाकीट दिल. अजिंक्यने पैसे देऊन एक सिगरेट पेटवली. बुलेट सुरूच होती. सिगरेट ओढत गाडी त्याची रस्त्यावरून जात होती. एका हॉटेलमध्ये  अजिंक्य जाऊन बसला. त्याने तिथला पत्ता प्रोड्युसरला पाठवला. ते दोघ प्रोड्युसर तिथे आले.
‘कुणीतरी’ या अजिंक्यच्या पुस्तकावर एक मालिका त्यांना बनवायची होती. त्यासाठी त्यांना त्या कथेचे कॉपीराईट हवे होते आणि त्याचे सगळे भाग अजिंक्यनेच लिहावेत म्हणून त्यांची मिटिंग होती. बोलणी झाली. सगळ ठरल. कथेचे पैसे अजिंक्यला चेकने त्या प्रोड्युसरने जागेवर दिले. सहाशे भागांचे पैसे तीन टप्प्यात द्यायचं कबूल झाल. सहाशे भाग तीन महिन्यात अजिंक्यला त्यांना द्यायचे होते. प्रोड्युसर निघून गेले. अजिंक्य घरी निघाला. घरी येताना त्याने प्रतीक्षाला आवडत म्हणून रसमलाई, पनीर मसाला, रोट्या, जीरा राईस आणि तीच आवडत आईस्क्रीम घेतल. तो खुश होता. पहिल्या मालिकेनंतर वर्षाच्या आत त्याला दुसरी मालिका मिळालेली. तो घराजवळ पोचला. बुलेट लावून खिशात चावी घेऊन तो सगळ्या पार्सलसोबत दारात आला. दाराला कुलूप होत. त्याने मागे नजर टाकली. बुलेट होती. activa होती. इन्होव्हा होती. पण स्विफ्ट नव्हती. त्याने कुलूप उघडल. आत जाऊन त्याने मोबाईल बघितला. प्रतीक्षाचा मेसेज होता. ‘मी जातेय पुण्याला. काळजी घे. तुझ्या सोबत राहून पुन्हा मी तुझ्या प्रेमात पडेन.’ अजिंक्यने तिला कॉल लावला. पण तिने उचलला नाही. ती गाडी चालवत असेल म्हणून त्याने पुन्हा कॉल केला नाही. पार्सलची पिशवी उचलून त्याने कचरा पेटीत टाकून दिली. आणि तो रडायला लागला. सोफ्यावर त्याची डायरी पडलेली. त्याने ती घेतली. रडत रडत ती डायरी उघडली. त्याने काढलेली तिची दोन्ही चित्र त्यात नव्हती. तो अजून रडायला लागला. त्याने बाजूला डायरी ठेवली. त्याला अस्वस्थ वाटायला लागल. घर खायला उठल. तो उठला आणि घरात प्रत्येक खोलीतून नुसता फिरायला लागला. काय कराव त्याला सुचत नव्हत. त्याने खिशातल सिगरेटच पाकीट काढल. दोन सिगरेट एकदम पेटवून त्याने अर्ध्या तासात सगळ पाकीट संपवलं. त्याला खोकला यायला लागला. तो तसाच खोकत आत गेला फ्रीजमधल पाणी पिऊन पुन्हा बाहेर गेला. खोकला थांबत नव्हता. बुलेट सुरु केली. तीन सिगरेटची पाकीट विकत घेऊन तो पुन्हा घरी आला. संध्याकाळपर्यंत त्याने अजून दोन पाकीट संपवून उरलेलं एक पाकीट उघडून ठेवल. पण खोकल्यामुळे तो बाल्कनीत झोपाळ्यात वार घेत बसला. त्याने प्रतीक्षाला कॉल लावला. पण तिने कट केला. तीन वेळा लावला. तिन्ही वेळा कट. त्याचा मोबाईल कमी चार्गिंगमुळे बंद पडला. अजिंक्य उठून आत बेडवर जाऊन झोपला. पुन्हा त्याचे डोळे पाण्याने भरले. त्याने त्या पाकिटातून सिगरेट काढून पेटवली. एक झुरका घेतला आणि त्याला खोकल्याची ढास लागली. तरी त्याने सिगरेट ओढन सुरु ठेवल.
भाग १०
खोकत खोकत त्याने सिगरेट ओढली. सिगरेट संपली तसा तो उठून आत गेला. पाणी पिल. आणि मागे फिरला. मागे फिरला तस त्याच्या डोळ्यासमोर सगळ फिरलं. सगळ पाणी पोटातून पुन्हा बाहेर पडल. त्याचे डोळे पटकन मिटले गेले त्याने टेबलाला धरल. धूसर धूसर दिसत असताना त्याने गच्च डोळे मिटले. त्याला उलटी झाली आणि उलटीतून फक्त पाणी आणि थोड रक्त सांडल. त्या उलटीला सिगरेटचा वास येत होता. अजिंक्य तोंडावरून हात फिरवून तोंड पुसतो. बाहेरच्या खोलत येताना त्याच्या पोटात जोरात दुखायला लागत. मेंदूत जोरात चमक येते आणि अजिंक्य बेशुध्द पडतो.
दोन दिवसांनी.....(सकाळी)
अजिंक्य बाहेरच्या खोलीत जमिनीवर पडलेला असतो. तोंडातून दोन दिवस सलग थोड थोड पाणी सांडत असत. आत्ताही त्याच तोंड ओलसर होत. डोक त्याच पाण्यात भिजलेल. तो स्वतःला सावरत कसातरी उठतो. तीन तास हळू हळू सगळ घर साफ करून अंघोळ करून तो बाहेर आला. बुलेटवर बसून टायने बुलेट सुरु केली. पण त्याला बुलेटच वजन आवरेनास झाल. आणि त्यानेगडी सोडून दिली. बुलेट बाजूला पडली. ती उचलायला पण त्याला ताकद पुरेना. त्याने गाडीची चावी काढली. तो आत येऊन शांत सोफ्यावर बसला. बाहेर बुलेट तशीच खाली पडलेली. अजिंक्यने ऑनलाईन खायला मागवल. तासाभराने पुलाव आला. अजिंक्यला  ते जात नव्हत पण पण कस बस त्याने त्यातल थोड खाल्ल. मग पुढे तासभर मोबाईल चार्ज करून त्याने मोबाईल सुरु केला. मिसकॉल आलेले बरेच त्यात तो प्रतीक्षाला शोधत होता. पण ती सोडून बाकीचे होते.
तीन वाजलेल. दार वाजलं. अजिंक्यने दार उघडल. दारात अजिंक्याच्या वयाचा दिसणारा पण अजिंक्यापेक्षा दोन चार वर्षाने लहान एक मुलगा उभा होता.
अजिंक्य : हम ?
मुलगा : मी निखील. लेखक आहे.
अजिंक्य : मग ?
मुलगा : कुणीतरी.... ती कुणीतरी लिहिण्यासाठी सह-लेखक हवा होता ना. तर त्यांनी माझ नाव सुचवलं. तुम्हाला मी आणि प्रोड्युसर खूप कॉल करत होतो काळ अख्खा दिवस. पण तुम्ही कॉल उचलला नाहीत म्हणून मग मी पत्ता विचारून आज इकडे आलो.
अजिंक्य : ये आत.
अजिंक्यच बाहेर लक्ष गेल. बुलेट उभी केलेली होती. दोघे आत आले.
अजिंक्य : नाव काय ?
मुलगा : निखील. लेखक आहे मी.
अजिंक्य : या आधी काय लिहील आहे का ?
निखील : तीन मालिका आणि एका मराठी फिल्मसाठी लिखाण केलंय. आता हि चौथी मालिका. मी तुमची पुस्तक वाचली आहेत. लाजवाब आहेत.
अजिंक्य : खर ?
निखील : हो. खूप मनाला भावत. तुमच पुस्तक वाचताना अस वाटत ते मी वाचत नाही समोर बघतोय. इतक ते वास्तविक असत.
अजिंक्य : कलाकाराने दुसर्या कलाकाराला फक्त नाव ठेवावीत. कारण तेच फक्त खर असत. बाकी स्तुती... एकदम खोटी. आणि खोटी स्तुती मला नाही आवडत.
निखील : नाही पण मी खरच बोलतोय. आणि मी तुमच्या इतका मोठा नाही.
अजिंक्य : बर. साताऱ्याचा आहेस ?
निखील : नाही दादर, मुंबई.
अजिंक्य : मग इकडे ?
निखील : खास तुमच्यासोबत लिखाण करायचं म्हणून सातार्यात आलोय. इकडे माझी आत्या राहते. मंगळवारतळे आहे तिथे. पन्नास भाग झाले तुमच्यासोबत लिहून कि मग जाणार परत दादरला. जर प्रोड्युसरना आणि तुम्हाला आवडल लिखाण तर मग सातारा लवकर नाही सोडत तीन चार महिने.
अजिंक्य : चार प्रोमो, एक टीझर्, आणि सहाशे भाग. एवढ लिहायचं आहे. कुणीतरी वाचली माझी ?
निखील : हो दोन वेळा पूर्ण पुस्तक वाचल त्यातले काही प्रसंग लिहून काढले. त्याचा अभ्यास केला. त्यातल्या अभिजित आणि शिवानीचे काही संवाद अजून वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला. काही प्रसंग नव्याने लिहिले. डायरी आणलीय मी सोबत. आणि काही प्रश्न आहेत ते हि लिहून आणलेत.
अजिंक्य : चालेल. लिहायला आपण उद्या पासून सुरु करु.
निखील : चालेल.
अजिंक्य : आज सोबत थांब. मनात काही असेल तर विचारात काही येत नाही. आणि लिहिता पण काही येत नाही. आपल्यातला अनोळखीपना आज संपवून टाकू म्हणजे तुझ्या मनातल तू मला सहज सांगशील.
निखील : चालेल.
अजिंक्य : आणि इथे राहायला आलास तरी चालेल. कारण मी दिवसा सहसा लिहित नाही जास्त. रात्रीच लिहितो. दिवसा तुझ्यासोबत लिहीन आणि रात्री मी माझा एकटा लिहीन.
निखील : चालेल.
अजिंक्य : मला जाऊन समान आणव लागेल.
अजिंक्य : चल.
दोघ बाहेर आले. अजिंक्याने इन्होव्हा सुरु केली. निखील गाडीत येऊन बसला. दोघे मंगळवार तळे रस्त्याला निघाले.

भाग ११
घरासमोर गाडी थांबली. निखिल काही बोलण्याआधीच अजिंक्य आत यायला नकार देतो. निखील आत सामान आणायला जातो. अजिंक्यला त्याच्या सावत्र भावाचा कॉल येतो.
चंद्रकांत : हेल्लो, अजिंक्य कसा आहेस ? कुठ आहेस ? तू आजारी आहेस कळाल आत्ता ? मी येऊ का बघायला तुला ? कुठ आहेस ?
अजिंक्य : पुन्हा पुन्हा कशाला ओळख वाढवून नात बनवतोयस ? या आधी इतके वर्ष तुला माहित तरी होतो का मी ? मग आता अस काय होणारे ?
चंद्रकांत : अस का रे बोलतो ? जगासाठी आपण सावत्र भाऊ असलो तरी मी तुला मोठा भाऊ मानतो. नको ना असा बोलू. मला कळाल तुला बर नाही. मी लगेच कॉल केला तुला.
अजिंक्य : आहे मी नीट. साताऱ्यातच आहे.
चंद्रकांत : मी येऊ का बघायला ?
अजिंक्य : सध्या वेळ नाही मला. वेळ मिळाला कि सांगेन.
चंद्रकांत : हो सांग.
अजिंक्य : दारू पितोस का ?
चंद्रकांत : नाही.
अजिंक्य : बर. सांगेन वेळ असला कि. बाय.
चंद्रकांत : बाय.
तिकडून निखील सामान घेऊन आला. गाडीत बसला. इन्होव्हा पुन्हा अजिंक्यच्या घराकडे निघाली. राजवाड्याच्या इथून जाताना निखीलने अजिंक्यला गाडी थांबवायला सांगितली.
निखील : सिगरेट घेता ?
अजिंक्य : हो.
निखील : कोणता ब्रान्ड ?
अजिंक्य : आत्ता नको मला.
निखील : बर. मी घेतली तर चालेल ?
अजिंक्य : हो बिन्दास्त. नशा पाहिजेच.
निखील जाऊन सिगरेटच पाकीट आणतो. गाडी पुन्हा अजिंक्यच्या घराकडे निघाली.
अजिंक्य : गर्लफ्रेंड आहे ?
निखील : हो.
अजिंक्य : किती ?
निखील : एकच.
अजिंक्य : बर. खर प्रेम करतोस ?
निखील : हो. एक वर्ष झाले आमच्या प्रेमाला आत्ता मागच्या रविवारी.
अजिंक्य : बर.
निखील : तुमच लग्न झालय ना ?
अजिंक्य : हो.
निखील : तुमच्या हि आसपास असतील ना खूप मुली ?
अजिंक्य : हम. प्रेम वैगरे द्यायची गोष्ट आहे. करायला तस जमत नाही.
निखील : म्हणजे ?
अजिंक्य : आजूबाजूला असणारे माझ्या लिखाणावर प्रेम करतात माझ्यावर नाही. आणि हे माझ नाही सगळ्या कलाकारांच दुःख आहे.
निखील : हो. पण ते प्रेम खर असत. याचा आनंद वाटतो.
अजिंक्य : खर काहीच नसत. जो पर्यंत दोघांना हि एकमेकांवर प्रेम होत नाही. तोपर्यंत त्यांच्यात असलेल प्रेम हे फक्त खरच... असत. जेव्हा दोघांना हि एकमेकांवर प्रेम होत. त्यातला खरेपणा संपतो. तयार होते एक नवीन जिद्द. एकमेकांची शरीरं मिळवण्यासाठी. जिद्दीला प्रयत्न असतात. प्रयत्न पुन्हा पुन्हा होतात. त्यात यश मिळत. यश पुन्हा पुन्हा वाट्याला येत. त्या यशाचा आनंद काही काळापुरताच. मग सवय होऊन जाते. आणि सवय हि आयुष्यातली सर्वात वाईट गोष्ट मी मानतो. सवयीला न मोडण्याची जिद्द मनात ठेवून ती जिद्द टिकवून ठेवण्यासाठी त्या दोघांच्यात प्रेम सोडून फक्त शरीरसुखाने संवाद होतो. त्या अशा अबोल नात्यात दोघांचे प्रयत्न तरी हि सुरूच असतात खोट्या या प्रेमाला खर खर दाखवण्यासाठी. जरी दोघांना माहित असत कुठेतरी प्रेम अपूर आहे. प्रेम म्हंटल कि त्याच्या आजूबाजूला मन हे आलच. पण दोघांना हि प्रेम झाल कि ते मन संभाळण आणि समजून कुणाला जमत ? मग त्या दोघांत एकाने मन जपायचं एकाने मन सांभाळायच याचे प्रयत्न सुरु राहतात. मग कधीतरी या सगळ्या गोष्टी करून करून त्या दोघात कुणी एक थकून जातो. आणि मग विरह. काही दिवसांच्या आठवणी, गोष्टी मनात घोळवत जगत असताना पुन्हा कुणी खर प्रेम घेऊन येतो. आणि पुन्हा नवीन प्रेम होत. मला अस वाटत ज्यांना प्रेम मिळाल आहे त्यांनी त्या प्रेमाला जगजाहीर करूच नये. ज्याचं प्रेम सोबत नाही त्यांनी प्रेमाला लपवू नये. खर प्रेम म्हणजे काय ? खूप जणांनी लिहून ,बोलून ठेवलय. त्यात प्रत्येकाचे अनुभव, विचार वेगवेगळे आहेत. पण प्रेम हे एकच आहे. सारख आहे. बस व्यक्ती आणि त्याचा स्वभाव हा वेगळा. पण एक नक्की, जो पर्यंत दोघांना एकमेकांवर प्रेम होत नाही तो पर्यंतच प्रेम हे खर असत. बाकी खर तर आपल आयुष्य पण नाही. आज आहे आपण उद्या नाही. जगायची खात्री नाही. आणि ज्या गोष्टीत खात्री नाही त्या गोष्टी कोणत्या तोंडाने आपण खऱ्या मानायच्या ?
निखील : बरोबर.
अजिंक्य : खोट्याला खरेपणाने पटवून दिल कि हे बरोबर उत्तर मिळत. प्रेम एक असाव अस नाही. खूप असावीत. पण त्यात दुतर्फी प्रेम नसावीत. एकतर्फी कितीही प्रेम असावीत त्यात काही गैर नाही.
निखील : तुमची आहेत अशी प्रेम ?
अजिंक्य : हो.
निखील हात हळू हळू चोळायला लागतो.
अजिंक्य : पेटव सिगरेट. मला हि.
निखीलने सिगरेट काढली. एक स्वतःला आणि एक अजिंक्यला पेटवून देऊन दोघे अजिंक्यच्या घराकडे निघाले.   


 भाग १२
घरी जाईपर्यंत दोघांच प्रेमावर बोलण सुरूच होत. घरी येऊन हि दोघ बाल्कनीत होते. अजिंक्य झोपाळ्यात बसलेला. निखील खुर्चीवर बसलेला.
निखील : किती काही झाल तरी प्रेम शेवटी एकच. कारण प्रेम म्हटल कि ती एक भावना झाली. आणि भवना हि प्रत्येकाची सारखीच असते. ती कायम तशीच असते.
अजिंक्य : भावना सारखी असली तरी कायमस्वरूपी नसते. प्रेमाला कसल बंधन नसत हे जरी खर असल तरी प्रेमाला कालावधी असतो. जो पर्यंत मनातल्या वासनेला मोकळा होण्याचा मार्ग मिळत नाही तोपर्यंत प्रेमाच्या मागे माणूस असतो. वासना मिटली किंवा मिटवली गेली कि प्रेम हि भावना कमी होत जाते. सेक्स झाल्यावर किती पुरुष असतात ? जे सेक्स झाल्यांनतर हि एक तास अंमम, एक नको अर्धा तास आपल्या पार्टनरसोबत प्रेम करत राहतात ? नाही होत अस. नाही जमत. स्त्रीच नाही पण ज्या पुरुषाला स्त्रीचा प्रत्येक भाग हवा हवासा वाटत असतो. सेक्स करताना तो सगळ्या अवयवांवर तुटून पडतो आणि सगळ झाल कि त्याला त्याच स्त्रीची किळस येते. काही मिनिटांपर्यंत. हेच खर आहे. तूमच्यात झालाय ?
निखील : अ.. हो.
अजिंक्य : कितीदा ?
निखील : मोजल नाही कधी पण बऱ्याच वेळा.
अजिंक्य : मग मी बोलतोय ते पटतय ?
निखील : हो.
अजिंक्य : प्रत्येक गोष्टीचा कालावधी हा असतोच. लोक हा समाज आणि आधीच्या काही परंपरा सांगून जातात कि प्रेमाला कालावधी नाही. पण हे चूक आहे. प्रेम दुर्मिळ होत चाललय. हे लोकांना जाणवतय पण तरीही मानत नाही. पोटचा पोरगा चुकत असताना हि आई त्यच्या चुकांना चूक म्हणतच नाही. तसच लोक प्रेम खोट आणि संपत जात असताना हि ते आहेच या मतावर ठाम आहेत. इच्छा, वासना, आवड या तीन गोष्टी कमी झाल्या कि प्रेम कमी होत जात. आणि या तिन्हीतली एक हि गोष्ट जागृत झाली कि तात्पुर्त प्रेम पुन्हा जाग होत. तू काय खाणार ? मागवतो पार्सल.
निखील : काहीही चालेल.
see our graphic advertise work click
अजिंक्य आणि निखील बाहेरच एका हॉटेलमध्ये जेवायला जातात. रात्री अकरा वाजता येऊन दोघ दोन वाजेपर्यंत एक स्क्रिप्ट लिहून बसतात. निखील झोपतो. अजिंक्य प्रतीक्षाच्या खोलीत येऊन झोपतो. त्याला प्रतीक्षाची आठवण येते. तो डोळे मिटून घेतो. पण त्याला झोप येत नाही. बाहेरच्या खोलीत येऊन तो सोफ्यावर बसतो. अस्वस्थ वाटत असत त्याला. तो आत जाऊन पुन्हा पुढच्या स्क्रिप्ट लिहायला लागतो. सकाळी आठ वाजता निखील उठून बाहेरच्या खोलीत येतो. अजिंक्य स्क्रिप्ट लिहिताना त्याला दिसतो.
निखिल : कधी उठला तुम्ही ?
अजिंक्य : झोपायचंय मला. सहा परत लिहून झाले.
निखील : आय एम सॉरी.
अजिंक्य : असू दे. तू आवरून घे. आपण नाष्टा करून येऊ मग तू या झालेल्या स्क्रिप्टच एडिटिंग कर. क्रॉस चेक कर.
निखील : चालेल. अजिंक्य त्याला सगळ्या गोष्टी दाखवून त्याला आवरायला जायला सांगतो.
अजिंक्यचा अजिंक्यचा मोबाईल त्याने बंदच ठेवलेला असतो. त्यामुळे त्याच लक्ष पूर्ण लिखाणात होत.
निखिलच आवरून झाल. नंतर अजिंक्य आवरून दोघे बाहेर नाष्टा करायला जातात. एके ठिकाणी बुलेट थांबते. दोघ उपीट खातात. चहा पितात. आणि अजिंक्य सिगरेट ओढत असताना त्याला खूप खोकला यायला लागतो. निखिल जरा घाबरून जातो. पण अजिंक्य त्याला काही हालचाल करू देत नाही. अजिंक्य ग्लासभर पाणी पितो. अजिंक्य बुलेट सुरु करतो. निखील मागे बसतो. अजिंक्य एक सिगरेट पेटवून ती ओढत गाडी चालवत असतो. एका बार पाशी थांबून त्याने दारूच्या बाटल्यांचा एक बॉक्स विकत घेतला. निखील तो बॉक्स धरून मागे बसला. दोघे घरी आले.
निखील अजिंक्यने लिहिलेल्या स्क्रिप्ट क्रॉस चेक करून त्याच एडिटिंग करायला लागला. काही मुद्दे लिहिलेले त्यावर पुढची स्क्रिप्ट त्याला लिहायची होती. अजिंक्य प्रतीक्षाच्या खोलीत बसून दारू पिऊन झोपला.
भाग १३
दीड महिना आणि दररोज स्क्रिप्ट, सिगरेट, दारू आणि अर्धवट झोप असच सुरु होत अजिंक्यच. निखील स्क्रिप्ट लिहून सिगरेट ओढून वेळ मिळाला कि गर्लफ्रेंडशी बोलून झोपायचा. दीड महिना हेच सुरु होत.
इकडे पुण्यात,
प्रतीक्षा : दीड महिन्यांनी कटी वेगळ असेल न सगळ आई.
आई : मला वाटत या महिन्यात तू अजिंक्यला इकडे बोलावून घे. तुला  गरज आहे त्याची. आणि तुला नको असेल सोबत पण त्याच्या बाळाला त्याची गरज आहे. तुझ्यासाठी त्याला त्रास देऊ नकोस.
प्रतीक्षा : कशाला उगीच बाळाला बापाची सवय लावायची ? तो माझ्यासोबत राहू शकत नाही बाळासोबत काय राहणार आहे ? आणि या बाळाला त्याच नाव लागेल तेव्हा पुढे जाऊन त्याला हे पण कळेल कि सारा आणि तो सोडून अजून हि एक असेल मुल ज्याला हेच नाव असेल.
आई : ह्या पुढच्या गोष्टी आहेत सगळ्या आत्ता याचा विचार फक्त त्रास देतील तुला. पण तू आत्ताचा विचार कर. साराकडे बघ अजिंक्य नसता तर अमितच्या नावाने ती मोठी झाली असती का ? जग काही म्हणो पण काही वेळा विचार केला तर कळत समाजाचे काही नियम खरच बरोबर असतात. आणि समाजाचा हा नियम समजून तू अजिंक्यला इकडे बोलावून घे.
प्रतीक्षा : त्याला मी मेसेज केला होता.
आई : कधी ?
प्रतीक्षा : झाले वीस पंचवीस दिवस.
आई : आत्ता पुन्हा कर.
प्रतीक्षा : त्याचा मोबाईल महिना झाल बंद लागतोय. त्याने नंबर बदललाय.
आई : असा कसा बदलेल. दुसऱ्या कुणाशी तरी बोलून बघ त्याचा पत्ता लागतोय का बघ.
प्रतीक्षा : त्याच नशीब आणि तो. आई मला नको जबरदस्ती करू. उगीच माझी मानसिकता अजिंक्यच नाव ऐकून बदलते. त्याचा परिणाम बाळावर होतोय. आणि मला हि त्रास होतो. येईल तो. त्याच्या लक्षात राहिले असेन मी तर.
आई : मी आता थकत चाललेय प्रतीक्षा, तुमच्या दोघांच्या या अशा नात्यात माझा जीव जायचा. जगात सर्वात वाईट दोनच गोष्टी असतात ग, एक म्हणजे मुलांनी आपल्या आईला मेलेलं बघण, आणि आईने आपल्या मुलाचं वाईट झालेलं बघण. मी दुसरी गोष्ट जगतेय. आणि हे असच सुरु राहील तर तुला पहिली गोष्ट बघावी लागेल. प्रतीक्षा : आई.....!
आई : खर ते बोलतेय.
प्रतीक्षा : काही नाही होत तुला. इ केला न मेसेज त्याला त्याचा मोबाईल बंद आहे त्याला मी काय करू ?
आई : करून नाही न काही झाल मग अजून काहीतरी कर.
प्रतीक्षा : मी जाऊ का तिकडे ?
आई : दीड महिन्यात बाळ होईल. आणि अशी जाणारेस का ?
प्रतीक्षा : मग काय करू मी. माझी चीड चीड होतेय.
आई : बर बस शांत मी जाते बाहेर.
आई निघून गेली. प्रतीक्षा बेडवर बसून समोरच्या आरशात तिलाच बघत बसली.
इकडे साताऱ्यात,
स्क्रिप्ट लिहून रात्री निखील व्हिडीओ कॉलवर गर्लफ्रेंडशी बोलत होता. अजिंक्य बाल्कनीत सिगरेट ओढत होता. त्याच झाल आणि तो आत आला. निखिलच अजिंक्यकडे लक्ष नव्हत. अजिंक्यच लक्ष त्याच्या हातातल्या मोबाईलकडे लक्ष गेल. अजिंक्य परत फिरून बाल्कनीत गेला. सिगरेट पेटवली. वार्याने दार बंद झाल. त्या आवाजाने निखील कॉल कट करून अजिंक्यजवळ गेला.
अजिंक्य : इकडे काय करतोयस ?
निखील : दार वाजलं म्हणून आलो इकडे,
अजिंक्य : तुला नक्की इथे कुणी पाठवलय ?
निखील : म्हणजे ?
अजिंक्य : को-रायटर म्हणून तुला माझ्यासोबत प्रोड्युसरला कुणी नाव सुचवलं तुझ ?
निखील : प्रोड्युसर सरांसाठी माझ्या गर्लफ्रेंडने एक वेब-सिरीज लिहिलेली. तीच येणार होती इथे पण तिला एक फिल्म मिळाली म्हणून तिने माझ नाव पुढे केल.
अजिंक्य : असावरी.....तुझी गर्लफ्रेंड.
निखील : तुम्ही ओळखता तिला ? ती पण ओळखते तुम्हाला. खूप तुमच्या शायरी-कविता पाठ आहेत तिच्या. तिला बोललो होतो मी मी आहे इकडे तोपर्यंत ये भेटायला तुम्हाला. पण तिला वेळ नाही.
अजिंक्य : वेळ नाही, तोंड नाही.
निखील : म्हणजे ?
अजिंक्य : असावरीच्या आयुष्यात आधी कोण होत का ?
निखील : नाही.
अजिंक्य : खोट किती साध असत. लगेच विश्वास बसतो आपला त्यावर. 
निखील : तुम्ही तिला ओळखता ?
अजिंक्य : माझी एक्स गर्लफ्रेंड आहे ती.
अजिंक्यने खिशातून मोबाईल काढून सुरु केला. पण मोबाईल इतके दिवस बंद असल्यामुळे चार्जिंग लगेच संपल. अजिंक्य आत आला. त्याने मोबाईल चार्जिंगला लावला.
                    
भाग १४
मोबाईल सुरु झाला. आणि बरेच मेसेज मिसकॉल दिसताना मोबाईल थोडावेळ चालायचा बंद झाला. थोड्यावेळाने,
निखील : काय आहे मोबाईलमध्ये ?
अजिंक्यने मोबाईलमध्ये बरच शोधलं पण त्याला हवा असलेला फोटो मिळत नव्हता.
अजिंक्य मोबाईल घेऊन सोफ्यावर बसला. सिगरेट पेटवून खोकत खोकत सिगरेट ओढत मोबाईलमध्ये काही तरी शोधत बसला. निखील बाल्कनीत जाऊन असावरीला कॉल लावतो. दोघांच्यात भांडण होत. शपथावैगरे होतात. आणि निखिलला असावरी सगळ सांगते. इकडे अजिंक्यला सिगरेट जास्त झाल्यामुळे चक्कर आली. तो सोफ्यावर बेशुद्ध पडला. सोफ्यावरच्या स्क्रिप्टची पान खाली पडली. हातातली सिगरेट त्यावर पडली. स्क्रिप्ट जळल्या. निखील आत येईपर्यंत पूर्ण कागद गायब झाला. निखिल रागात सगळे कपडे घेऊन अजिंक्यकडे न बघता बाहेर निघून गेला. रात्री उशिरा अजिंक्यला शुध्द आली. अजिंक्य उठला आणि परत तोल जाऊन सोफ्यावर पटकन बसला. थोडावेळ तिथच बसून त्याने निखिलला हाक मारली. उत्तर मिळाल नाही. त्याच लक्ष मागे गेल. दार उघडच होत. अजिंक्य मोबाईल घेऊन दारात गेला. त्या गार वाऱ्यात उभ राहून त्याला बर वाटत होत. त्याने मोबाईल पुन्हा बघितला. प्रतीक्षाचा मेसेज होता. त्याला महिनाभरासाठी पुण्याला बोलावलेल. त्याने मेसेज लिहिला.
‘अजून दीड महिना मला जमणार नाही, माझ मालिका लिहायचं काम सुरु आहे.’ अजिंक्यने दाराला कुलूप लावल. रस्त्याने चालताना निखिलला अजिंक्यने पाच-सहा कॉल केले आणि तेवढ्याच घाईत ते निखिलने कट केले. लांब एका आडबाजूला एक बार सुरु होता. तिथ आत जाऊन त्याने दारू पिली. दारू पीत असताना त्याला प्रतीक्षाचा कॉल आला. ‘डीलीव्हरी पण दीड महिन्यानेच आहे. बघ जमल तर ये’. अजिंक्य तिला कॉल लावतो.
प्रतीक्षा : हेल्लो,
अजिंक्य : काय करतेस ?
प्रतीक्षा : झोपलेय.
अजिंक्य : खोट नाही बोलता येत तुला. जागत जाऊ नकोस इतक. बाळाला त्रास होईल.
प्रतीक्षा : ते माझ मी बघेन. तू का झोपला नाहीयेस ? कुठ आहेस ?
अजिंक्य : हॉटेलमध्ये,
प्रतीक्षा : सगळीच खोटी तुला बरोबर नाही बोलता येत. विचार करून बोलाव लागतय तुला. जीभ जड झालीय तुझी. तू दारू पिलायस का ?
अजिंक्य : तू गेल्यापासून तेच करतोय.
प्रतीक्षा : का ?
अजिंक्य : तुझी आठवण येते रोज.
प्रतीक्षा : का ? आहे न तुला अंजली, असावरी, प्रियांका. त्यांची नाही का येत आठवण तुला ?
अजिंक्य : ठेवतो कॉल.
प्रतीक्षा : का ?
अजिंक्य : भूतकाळानेच जर का मला सतत हलाल करणार असशील तर इ तुझ्या जवळ आणि तुझ माझ्यावर प्रेम यातल काहीच होणार नाही. कधीच नाही.
प्रतीक्षा : हे तुला कळायला हव होत.
अजिंक्य : प्रतीक्षा...
प्रतीक्षा : मी झोपते. तूपण जा घरी लवकर जिथ असशील तिथून.
अजिंक्य : ऐक कि..
प्रतीक्षाने कॉल कट केला. अजिंक्य जड पायाने अंदाजाने रस्त्याने चालत होता. मागून दोन माणस त्याच्याजवळ आली. एकाने अजिंक्यला सिगरेट पेटवायला लायटर मागितल. अजिंक्यने दिल. सिगरेट पेटवून त्या माणसाने लायटर अजिंक्यला देताना पैसे मागितले. अजिंक्यने खिशात हात घातला पण त्याला पैसे नाही सापडले. अजिंक्यने नाही सांगितल आणि तो पुढे निघाला. त्यातल्या एका माणसाने अजिंक्यला मागून घट्ट धरल. दुसऱ्याने अजिंक्यला पोटात जोरात बुक्क्या मारायला सुरुवात केली. अजिंक्याच्या ओठातून रक्त यायला लागल. पोटात लाथा वैगरे मारून त्या माणसाने अजिंक्यला जोरात जमिनीवर ढकलून दिल. आणि मागे उभ्या असल्येल्या माणसाने अजिंक्याच्या पाठीवर जोरात लाथा मारून ते दोघ एक सिगरेट दोघात ओढत निघून गेली. अजिंक्य उठायचा प्रयत्न करत होता. 
 भाग १५    
अजिंक्यच्या खालच्या ओठापासून सगळ रक्ताने भरलेलं. शर्ट विस्कटलेला. अजिंक्य उठला आणि खिशातून रुमाल काढून त्याने तोंड पुसलं. तोंड स्वच्छ झाल आणि पुन्हा रक्त यायला लागल. अजिंक्य तसाच पुढे चालत गेला. घराजवळ यायला त्याला अडीच तास लागले. जाताना अर्धा तास लागलेला. घराजवळ आल्यावर  त्याला चक्कर यायला लागली. पोटात जोरात कळ आली आणि अजीक्यला उलटी झाली. पूर्ण त्यात रक्तच होत. आणि त्याच्या तोंडावर प्रकाश पडला. अजिंक्य तोंड पुसत बाजूला बघतो. गाडीवर एक अजिंक्यपेक्षा चारपाच वर्षाने मोठी मुलगी होती. ती पटकन गाडी लावून घाईत अजिंक्य जवळ गेली.
काय झाल तुम्हाला ? बर वाटतय का ? काही त्रास होतोय का तुम्हाला ?
अजिंक्य : आहे मी नीट.
नक्की ना ?
अजिंक्य : हो.
तुम्ही इथलेच आहात का ? मला एक पत्ता माहित करून घ्यायचा होता ?
अजिंक्य : कोणता ?
तिने पत्ता सांगितला.
अजिंक्य : हाच आहे पत्ता. कोण पाहिजे पण ?
अजिंक्य.
अजिंक्य : मीच.
काय ?
अजिंक्य : हा. पण इतक्या रात्री ? आणि तुम्ही कोण ?
मी आम्रपाली. मी निखीलच्या जागी आलेय. मालिका लिहायला. प्रोड्युसर बोलले दिवसा तुम्ही जागे नसता. म्हणून मला बोलले रात्री जावा. मग म्हणून आले. माझी एक मैत्रीण येणार होती सोबत पण तिचा नवरा आला म्हणून ती आली नाही. मग माझी मीच आली.
अजिंक्य : इतकी कारण सांगायची गरज नाही. मी विचारल नाही. आणि काळजी करू करू नका. या कि आत.
तुमच्या तोंडातून अजून रक्त येतय.
अजिंक्य : असू दे. थांबेल.
आपण दवाखान्यात जायचं का ?
अजिंक्य : नाही नको. मला आता स्क्रिप्ट लिहायचीय. सो बघू नाही थांबल तर उद्या जाईन. चला आत.
कुठे आहे घर.
अजिंक्य : आहे इथेच.
गाडीला जागा आहे का ?
अजिंक्य : पार्किंग आहे मोठ.
बसा गाडीवर.
अजिंक्य : नाही नको. तुम्ही या सोबत. मी जरा चालतो.
अजिंक्यपुढे चालत होता. हळू हळू मागे ती गाडी चालवत दोघे गेटजवळ आले. अजिंक्यने गेट उघडल. तिने आत बुलेट शेजारी तिची गाडी लावली. अजिंक्य कुलूप उघडतो. आत जाऊन फ्रीजमधून पाण्याची बाटली आणून तिला देतो. ती सोफ्यावर बसलेली असते. पाणी पिऊन ती इकडे तिकडे बघत बसते. अजिंक्य आत जाऊन तोंड धुवून येतो. शर्ट बदलून बाहेर येतो. तिच्यासमोर खुर्चीवर बसून तो बोलायला लागतो.
अजिंक्य : नाव काय ?
आम्रपाली : आम्रपाली. मी पण साताऱ्याची आहे.
अजिंक्य : या आधी काय लिहील आहे का ?
आम्रपाली : हो व्यावसायिक नाटक लिहिली आहेत. त्यांना पुरस्कार वैगरे मिळाले आहेत. आणि तीन वेब सिरीजपण लिहिल्या आहेत मी.
अजिंक्य : गुड. किती स्क्रिप्टचा करार केलाय प्रोड्युसरसोबत ?
आम्रपाली : सगळ्याच.
अजिंक्य : बर. मग रोज येऊन जाऊन करणार का इथे ?
आम्रपाली : हो. अहो ते रक्त येतय अजून आपण जाऊन यायचं का दवाखान्यात ?
अजिंक्य उठून आत गेला. फ्रीजमधून बिअरची काढली आणि हातावर बिअर घेऊन त्याने तोंड धूतल. मग तोंड पुसून तो बाहेर आला.
अजिंक्य : कधीपासून सुरुवात करायची आहे आपण ? म्हणजे माझ तर सुरूच आहे काम.
आम्रपाली : मी आत्ताही लिहू शकते. अजिंक्य : चालेल मग या आत. पी.सी. आहे.
दोघ आतल्या खोलीत गेले. अजिंक्यने तिला सगळी गोष्ट समजावून सांगितली. एक स्क्रिप्ट वाचायला दिली. आम्रपाली स्क्रिप्ट लिहायला बसते. अजिंक्य बाहेर बाल्कनीत सिगरेट ओढत होता. 
भाग १६
बाहेर गार वार सुटलेलं. अजिंक्य झोपाळ्यात बसून सिगरेट ओढत त्या वाऱ्यात सिगरेटचा धूर एकसलग सोडत होता. आत आम्रपाली स्क्रिप्ट लिहित बसलेली. अभिजित आणि शिवानीच्या त्या रात्रीची काल्पनिक गोष्ट अजिंक्यने लिहून ठेवलेली. त्यात अभिजीतचे डायलॉग लिहिलेले. आम्रपाली शिवानीचे डायलॉग लिहित होती. अजिंक्यची सिगरेट संपली तो आत येऊन आम्रपाली जवळ जातो. ती त्याच्याकडे बघते. तो तिच्याकडे बघतो. अजिंक्य सिगरेटच्या नशेत होता. आम्रपाली शिवानीच्या धुंदीत होती. अजिंक्यपुढे सरकला. आम्रपाली हात खुर्चीवर घट्ट धरते. सहज येणारा श्वास ती जड घेते. अजिंक्य कॉम्प्युटर मागून सिगरेटच एक पाकीट घेतो आणि बाहेर निघून जातो. आम्रपाली त्याला जाताना बघते. श्वास सैल झाला. पण हृदयाची धडधड वाढली. तिने पुन्हा स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली.
अजिंक्य प्रतीक्षाला मेसेज करतो, ‘मी आपल बाळ व्हायच्या आधी दहा बारा दिवस तिहे असेन. मी माझ्या स्क्रिप्ट लवकर संपवतो. आणि येतो. काळजी घे. लव्ह यु’.
सिगरेट पेटवून अजिंक्य आता खुर्चीवर बसला. तोंडाचा जबडा दुखत होता. त्या माणसांनी मारलेल्या बुक्क्यांमुळे छातीत दुखत होत. सिग्र्त नुसती पेटून संपत चाललेली. अजिंक्यचे विचार सुरु होते. अजिंक्य हि  त्या विचारात नुसताच खोलवर जात होता. वाया जात होता. तो स्वतः आणि सध्याचा त्याचा वेळसुध्दा. विचारांच्या तंद्रीत त्याने सिगरेट ओठांना लावली. मोठा तोंडानी श्वास घेतला आणि ठसका लागला. आम्रपाली तिच्या इथली पाण्याची बाटली घेऊन बाल्कनीत आली. अजिंक्य खोकत होता. आम्रपाली त्याच्या समोर आली. वार अडलं. खोकला थांबला. अजिंक्याने पुढे बघितल.
अजिंक्य : अ ?
आम्रपाली : पाणी..?
अजिंक्य : नाही. ठीक आहे. तुझ झाल लिहून ?
आम्रपाली : नाही. ( तिने हात पुढे केला )
अजिंक्य : स्मोक करतेस ?
आम्रपाली : नाही. पण सिगरेटचा वास आवडतो. खूप आवडतो.
अजिंक्य : ओल्या मातीचा वास कि सिगरेटचा वास ?
आम्रपाली : सिगरेटचा वास.
अजिंक्य : ओढयचीस ना मग. अन तू तर लेखक आहेस. नशा हवी.
आम्रपाली : नाही इतकी मोठी लेखिका नाही अजून मी. बाकी तुम्ही म्हणजे खूप ग्रेट आहात.
अजिंक्य : कोणताही माणूस ग्रेट कधीच नसतो. देव पण नव्हता. पण आपण आपल्याला ग्रेट मानलं तर जग झक मारत आपल्याला ग्रेट म्हणत. 

आम्रपाली : अस कस काय ?
अजिंक्य : कोणतीही गोष्ट तिला नाव असत. आकार असतो. रंग असतो. गंध असतो. पण ते त्याच स्वतःच अस्तित्व असत. आणि ते अस्तित्व जसच्या तस घेऊन ती गोष्ट समाजापुढे पेश असते. आरशाने सुंदर व्यक्तीला कुरूप दाखवल म्हणून त्याचा वापर कोण करायचा बंद करणार नाही. उलट पांढऱ्या रंगवलेल्या तोंडाला अजून फिकट पांढरा थर लावला जाईल. गोष्ट तीच आणि ती माणसाला सुध्दा लागू होते. आपण जे आहोत जसे आहोत हे आपणच मान्य केल नाही तर जग काय मान्य करेल ? स्वतःला ग्रेट म्हणून घेतल म्हणून माणसाचा देव झाला. आणि देवाची इतकी मंदिर जगात आहेत. हा त्याच कार्य भलेही मोठ आहे. पण शेवटी तो माणूसच होता. हे खर. आपल्याला देव नाही व्हायचं पण ग्रेट व्हायचय या एका विचाराने आपली सुरुवात होऊ शकते. वाटण आणि वाटल या दोन शब्दांना बोलून माणूस इतक काही करायचं सोडून देतो कि प्र्त्यकाष्ट त्याच काहीच अस नसत. ग्रेट कोणीच नसत.
आम्रपालीच्या हातातून सिगरेट घेऊन अजिंक्यने झुरका घेतला.
आम्रपाली : माझ्या चेहऱ्यावर सोडा ना तो धूर.
अजिंक्यने तसच केल. 
भाग १७ ( प्रेमाची शप्पथ आहे तुला चा १०० वा भाग )
आम्रपाली मागे सरकली. बाल्कनीची काचेची भिंत दोन्ही हाताने धरून तिने डोळे उघडले. अजिंक्य पुढे सरकला. सिगरेट संपलेली. शेवटचा झुरका घेऊन त्याने तिच्याकडे बघितल. तिच्या डोळ्यात होकार जाणवला. त्याने पुन्हा धूर तिच्या चेहऱ्यावर सोडला. तिच्या अजून जवळ सरकून त्याने बाजूने सिगरेट खाली टाकून दिली. त्याने एक पाऊल मागे घेतल मागे वळायला आणि तिचा श्वास त्याच्या दंडाला जाणवला. अजिंक्य तिला बघतो. ती त्याच्याकडे.
आम्रपाली : सॉरी.
अजिंक्य : सहवास कारण आहे याला. आणि हे चूकिच नाही.
आम्रपाली : मी तुमच्यापेक्षा मोठी आहे.
अजिंक्य : मग ?
अम्रापली : मग ?
अजिंक्य : मग मला अजिंक्य म्हण.
आम्रपाली : नको.
अजिंक्य : का ?
आम्रपाली : सगळीच कारण उत्तरात पूर्ण केली तर प्रश्नाच अस्तित्व उरणार नाही. कधीच.
अजिंक्य : कारण आणि प्रश्न भ्रम आहे. सगळी उत्तर हि अस्तित्वात असतात. पण माणसाला सरळ काही मिळाल तर त्यात त्याला रस नसतो. मग उत्तरांना दुर्लक्षित केल जात एक तर किंवा मग त्याचे प्रश्न आणि कारण बनवली जातात. पण असुदे. माणसाकडूनच चुका होतात.
अजिंक्य मागे वळून झोपाळ्यात बसला डोळे मिटून. आम्रपाली त्याच्या समोर उभी राहिली.
आम्रपाली : काय झाल ?
अजिंक्य : विचार.
आम्रपाली : करू नका.
अजिंक्य : येतात ते, तस बघायला गेल तर विचार करायला मला वेळ नाही पण. येतो विचार.
आम्रपाली : मग येतात तर येऊ दे. मला सांगा तो घालवता कसा ?
अजिंक्य : माहित नाही. कारण लगतात काहीतरी ज्याने हे विचार जातील.
आम्रपाली : जसे कि ?
अजिंक्य : सध्या हि सिगरेट आणि दारू.
आम्रपाली : आणि किती वेळ जातात हे विचार ?
अजिंक्य : जोपर्यंत डोक जड असत. ते हलक झाल कि विचारांनी पुन्हा जड होत.
आम्रपाली : स्क्रिप्ट झाली माझी लिहून चेक करता ?
अजिंक्य : चल.
दोघे आत जाऊन बसले. आम्रपाली कॉम्प्युटर मध्ये बघून त्याला वाचून दाखवत असते. अजिंक्य तिच्या मागे बेडवर बसलेला असतो. आम्रापालीच वाचून झाल. तिने मागे वळून बघितल. अजिंक्य झोपलेला. आम्रपाली उठून अजिंक्यच्या जवळ जाते. अजिंक्यला एक हाक मारते. त्याचा प्रतिसाद नाही बघून बेडवरच पांघरून त्याच्या अंगावर टाकते. खोलीत त्या अजिंक्यने लिहिलेली पुस्तक. स्क्रिप्ट्स. त्याला मिळालेले पुरस्कार ठेवेलेले असतात ते ती बघते. थोड्यावेळाने ती बाल्कनीत जाते. पाळण्यात जाऊन बसते. गार वाऱ्यात ती विचारात हरवून गेली. तिने आलेल्या मेसेजला एक मेसेज केला, “तुझ माझ्यावर प्रेम असत तर तू तिच्या नादाला लागला नसताच. तू माझ्या भावनांशी खेळलास. तुझ्या इतक्या क्षुल्लक भावना नाहीत माझ्या. लेखिका आहे मी. मोजता येणार नाहीत इतक्या भावना तर मी फक्त लिहू शकते. विचार कर तू माझ्यापुढे काहीच नाहीस. पण त्या इतक्या किमती भावना, आणि तू त्यांची कदर नाही केलीस. पण मी आता एक ठरवलय. मी हि भावना खेळून बघेन. आणि जेव्हा मला ते जमेल. तुझी माझी पुन्हा ओळख होईल. लक्षात ठेव तो पर्यंत मला भेटू नकोस. कधीच. कुठेच.”
मेसेज तिकडे पोचला. आम्रपालीच्या डोळ्यात गारवा टोचायला लागला. डोळ्यातल पाणी त्यात वार शिरत होत. तिने गच्च डोळे मिटून हाताची घडी घालून स्वतःलाच मिठीत घेतल. मागे अजिंक्य होता.
अजिंक्य : इतकी शांतता ? वाऱ्याचा पण आवाज नाहीये.
आम्रापली झोपाळ्यातून उठायला लागली.
अजिंक्य : बस.बस.
अजिंक्य तिच्यासमोर उभा झाला. ती झोपाळ्यात बसून त्याला बघत होती.
अजिंक्य : काय झाल ?
आम्रपाली त्याला बघत राहिली. अजिंक्यने हात पुढे केला. तिने त्याच्या हातात दोन्ही हात दिले. अजिंक्यने तिला घट्ट धरल. ती जागेवरून उठली. अजिंक्य तिला बघायला लागला. आम्रपालीने डोळे मिटले.   
भाग १८
मोबाईल वाजला.
अजिंक्य : हेल्लो.
प्रोड्युसर : सर, स्क्रिप्ट कधी मिळेल ?
अजिंक्य : थोड्यावेळात. तुम्ही पण जागायला लागला ?
प्रोड्युसर : शूट आहे सुरु परवापासुन सर, लक्षात आहे ना ?
अजिंक्य : परवा आहे का ?
प्रोड्युसर : अहो सर तुम्हीच करणार आहात प्रोमोच डीरेक्शन. विसरला का ?
अजिंक्य : लक्षात आहे पण परवा आहे ते विसरलो. बर लिहील आहे तस प्लेस मिळाल का ?
प्रोड्युसर : एकदम सेम. पण पुण्यात सापडलं.
अजिंक्य : चालेल. उद्या मी असेन पुण्यात संध्याकाळी. भेटू आपण.
प्रोड्युसर : हो. मी वाट बघतो मेलची.
अजिंक्य : हो स्क्रिप्ट मेल करतो.
प्रोड्युसर : बाय सर.
अजिंक्य : बाय.
अजिंक्यने खिशात मोबाईल ठेवला. आणि त्याला जाणवल त्याला आम्रपालीने घट्ट मिठीत घेतेलेल. अजिंक्य मिठीतून निघून आत गेला. स्क्रिप्टची मेल प्रोड्युसरला पाठवून अजिंक्य बेडवर झोपला. आम्रपाली त्याच्या जवळ बसली.
अजिंक्य : तूपण जाऊन झोप पलिकडच्या रुममध्ये. उद्या सकाळी जाऊ पुण्याला.
आम्रपाली : झोप नाही येत.
अजिंक्य : अति विचार आणि रिकाम डोक याशिवाय माणसाला झोप न येण्याची दुसरी कारण नसतात.
आम्रपाली : माझी यातली दोन्ही पण कारण नाहीत.
अजिंक्य : मग त्या कारणाला विसर आणि झोप. कारण झोपेची गरज आहे तुला. आणि मलापण.
आम्रपाली : मला आपण लिहितोय ती स्क्रिप्ट वाचून अभिजित शिवानीच जग डोळ्यासमोर येतय. स्पष्ट. आणि त्याचा शेवट... मला त्रास देतोय.
अजिंक्य : लेखकाला लिहायचा हक्क तेव्हाच आहे जेव्हा त्याने स्वतः जगलेल काही लिहित असेल किंवा कल्पनेला सत्यात जगून लिहित असेल तरच त्याला लेखक म्हणायचं. तू लेखक आहेस.
आम्रपाली : अभिजित शिवानी कल्पना आहे ?
अजिंक्य : नाही. खर आहे ते. ते बघ. ती फ्रेम. ते आहेत अभिजित शिवानी.
आम्रपाली त्या फ्रेमकडे बघत बसते. तिच्या डोळ्यातून पाणी येत असत. अजिंक्य झोपून जातो. आम्रपाली त्याच्या जवळ झोपते. अजिंक्य झोपेत प्रतीक्षा समजून तिला जवळ घेतो.
सकाळी,
दोघे दहा वाजता पुण्याला जायला निघाले. अजिंक्यने इन्होव्हा आज पहिल्यांदा बाहेर काढली होती. दोघे गाडीत शांत होते. गाडी एका टपरीपाशी थांबली. अजिंक्यने सिगरेटच पाकीट घेतल. त्याला प्रतीक्षाची आठवण झाली. त्याने ते पाकीट परत देऊन टाकल. आणि गाडीत येऊन बसला. प्रतीक्षाला मेसेज पाठवला “आज मी तुला भेटायला येतोय दुपारी”. आणि गाडी पुन्हा पुढे निघाली. आम्रपाली शांतच बसून होती. गाडी रस्त्याच्या कडेने जाताना त्याच लक्ष आरशात गेल. त्याने गाडीचा वेग कमी केला. बाजूने फुटपाथ वरून चालणाऱ्या दोन माणसांना त्याने हात दाखवून अडवल आणि गाडीतूनच लायटर आहे का विचारल. आम्रपाली अजिंक्यकडे बघते. अजिंक्य बाहेरच्या माणसांकडे बघत असतो. त्यातला एक खिशातून लायटर काढून अजिंक्यला देतो. अजिंक्य सीटबेल्ट काढून दार उघडतो आणि ज्याने लायटर दिल त्याच्या तोंडावर पूर्ण ताकदीने बुक्क्या मारायला सुरुवात करतो. दुसरा अजिंक्यला धरायचा प्रयत्न करतो अजिंक्य त्याला ढकलून देतो. आणि पुन्हा मारायला सुरु करतो. अजिंक्य हातातल लायटर मारलेल्या माणसाच्या हातात देतो.
अजिंक्य : आठवलो का मी ?
माणूस : माफ करा साहेब.
अजिंक्य गाडीत बसला. सीटबेल्ट लावून गाडी पुढे नेली. आम्रपाली अजिंक्यला बघत असते.
अजिंक्य तिच्याकडे बघत,
अजिंक्य : काय झाल ?
आम्रपाली : अ.ह.
ती त्याचा शर्ट विस्कटलेला नीट करायला लागते.
भाग १९
आम्रपाली : तुम्ही असे असाल वाटल नव्हत.
अजिंक्य : असे ?
आम्रपाली : एवढे रागीट आणि राउडी.
अजिंक्य : शांत वाऱ्याने एकतर थंड असाव किंव गरम. या दोन्हीतल काहीच नसलेलं वार जगात कुठे क्षणभरापेक्षा जास्त टिकू शकत नाही. बदल हवा. नाहीतर आपल्याला बदलणारे जगात सातशे करोड लोक आहेत.
आम्रपाली : एक बोलायचं होत.
अजिंक्य : काय ?
आम्रपाली : पण तुम्ही शांतच खूप छान वाटता.
अजिंक्य : अजिंक्य असाच आहे.
आम्रपाली : सॉरी.
अजिंक्य : कशासाठी ?
आम्रपाली : कालच्यासाठी.
अजिंक्य : मिठी गरज असते स्वार्थ नाही. स्वार्थाला सॉरी म्हणतात. गरजेला आभार मानतात.
आम्रपाली : पण तरीपण.
अजिंक्य : असुदे.
आम्रपाली : पण काल मला तुमची गरज वाटली.
अजिंक्य : माझ लग्न झालंय.
आम्रपाली : हो माहित आहे.
अजिंक्य : मग बरोबर नाही ना हे ?
आम्रपाली : पण मी तुम्हाला तीन वर्ष झाले ओळखते. स्वप्नात वाटल नव्हत. कधी तुम्हाला भेटेन तुमच्यासोबत मालिका लिहीन. आणि अस रात्रभर तुमच्या मिठीत झोपेन.
अजिंक्य : रात्रभर ?
आम्रपाली : हो तुमीच जवळ घेतलेलं मला.
अजिंक्य : सॉरी, बायकोच्या आठवणीत चुकून घेतल असेल जवळ तुला. माफ कर.
आम्रपाली : मला आवडल.
अजिंक्य : आवड संपेल. ती संपली कि विसरून जाशील.
आम्रपालीने त्याच्या हाताला धरल. गेअर कमी झाला. गाडी हायवेच्या बाजूंला गेली. अजिंक्य तिला बघतो.
आम्रपाली त्याच्या जवळ सरकते.
आम्रपाली : परत कधी भेटू आपण माहित नाही मला. पण.
अजिंक्य : मला नाही इच्छा.
आम्रपाली : तुमची बायको असती तर ?
अजिंक्य : माहिती नाही.
आम्रपाली : बर. राहूदे.
अजिंक्यने गाडी सुरु केली. आम्रपाली बाहेर बघत होती.
अजिंक्य : काय झाल ?
आम्रपाली : काही नाही.
अजिंक्य : नाराज होऊ नको. पण नाही आत्ता इच्छा.
आम्रपाली : असु दे.
अजिंक्य तिच्याकडेच बघत असतो. आम्रपाली त्याच्याकडे बघते. अजिंक्य तिच्या खांद्यावर हात ठेवतो. आम्रपाली डोळे मिटते. अजिंक्य तिच्या खांद्यावरून तिच्या गळ्यावरून कानामागून हात फिरवत पुन्हा कानापुढे आणि गालावरून खाली गळ्यापासून छातीपर्यंत येतो.
 भाग २० ( शेवटचा भाग )
आम्रपालीचा मोबाईल वाजला.
आम्रपाली : हेल्लो,
प्रोड्युसर : कुठे पोचला ? अजिंक्य सरांचा कॉल लागत नाहीये.
आम्रपाली : आम्हाला वेळ आहे अजून एक तास तरी.
आम्रपाली अजिंक्यकडे बघते. अजिंक्य होकारार्थी खुणावतो.
प्रोड्युसर : चालेल. नीट या. बाय.
आम्रपाली : बाय.
अजिंक्य : कोण प्रोड्युसर होता का ?
आम्रपाली : हो.
आम्रपाली गाडीचा स्पीकर सुरु करते. गाणी सुरु होतात. ती गाणी ऐकत काचेतून बाहेर बघत राहते. गाडी पुण्याला पोचते. जिथे शूट असत तिथे पोचल्यावर अजिंक्य आणि आम्रपाली प्रोड्युसर आणि बाकी सगळ्या कास्टसोबत भेटून ते सगळे एक मिटिंग करतात. मिटिंग चार तास चालते. पाच वाजायला आलेले. सगळे चहा घेऊन आपापल्या कामाला लागतात. अजिंक्य आम्रपालीला भेटून तिला स्क्रिप्ट देतो. अजिंक्य सेटच्या बाहेर येऊन सिगरेट पेटवून गाडीकडे जातो. वाटेत प्रोड्युसर भेटतो.
प्रोड्युसर : उद्या कितीला याल इकडे ?
अजिंक्य : सहाला सुरु करू शूट. बरोबर संध्याकाळी पाचला संपवू. त्यात तीन प्रोमो शूट करू.
प्रोड्युसर : एवढे होतील ?
अजिंक्य : मी आहे ना ? करतो. तुमचे पैसे वाचवतोय. आणि तुम्ही फुटेज बघा झाल्यावर आणि मग मला सांगा.
प्रोड्युसर : तुमच्यावर विश्वास आहे.
अजिंक्य : मग तो कधी तुटणार नाही. भेटू उद्या सकाळी. बेस्ट लक.
प्रोड्युसर : तुम्हाला हि.
तो गाडीत बसला. गाडी सुरु केली. आम्रपाली तिथे आली. गाडीची काच खाली झाली.
अजिंक्य : काय झाल ?
आम्रपाली : माझा मोबाईल. गाडीतच आहे. चार्जिंगला लावलेला.
ती आत गाडीत बसली. मोबाईल घेतला.
आम्रपाली : तुम्ही येणारे कधी संध्याकाळी ?
अजिंक्य : सकाळी येईन पाचला.
आम्रपाली : इकडे सेटवर नाही का थांबणार ?
अजिंक्य : नाही.
आम्रपाली : मग कुठे जाणार ?
अजिंक्य : घरी.
आम्रपाली : कोणत्या साताऱ्याच्या ?
अजिंक्य : बायकोकडे चाललोय.
आम्रपाली अजिंक्यचा हात हातात धरते आणि त्याच्याकडे बघते.
अजिंक्य : सगळ आत्ता बघून ठेव. कास्टला डायलॉग समजून सांग.
आम्रपाली : हो. काय गरज लागली तर..
अजिंक्य : मोबाईल बंद असेल माझा.
आम्रपाली : मग ?
अजिंक्य : तू करशील सगळ हो न ?
आम्रपाली : बर. पण..
अजिंक्य तिच्या हाताला अजून घट्ट धरतो.
आम्रपाली त्याच्या जवळ सरकते. आणि त्याच्या गालावर ओठ टेकवून पुन्हा मागे सरकून गाडीतून निघून जाते. अजिंक्य हातातली सिगरेट ओठात एका बाजूत पडकून दुसऱ्या बाजूने धूर सोडत गाडी पुढे नेतो.
वाटेत एक दुकान दिसत त्याच्या बाहेर एक टेडी बिअर लावलेला असतो. अजिंक्य तो विकत घेतो. पुन्हा पुढे जाताना एका हलवाईच्या दुकानातून बर्फी, अजून तिखट गोड पदार्थ घेऊन एका घरासमोर गाडी लावतो. गाडीतून सगळ सामान घेऊन तो गाडी लॉक करून दारासमोर थांबतो. बेल वाजवतो. बेल वाजते. दार उघडल जात. दारात प्रतीक्षा वाढलेल्या पोटामुळे दमलेली दिसत होती. अजिंक्य तिला बघून गालात हसतो. ती माघारी फिरते. अजिंक्य आत येऊन दार लावतो. हातातल सामान. टेबलावर ठेवून तिचा हात हातात धरून तिला विचारतो,
अजिंक्य : प्रतीक्षा.... कशी आहेस ?  
समाप्त.            

प्रेमाची शप्पथ आहे तुला पर्व ६वे जून २०२० मध्ये सुरु होईल. आपण या कथेला देत असलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. मनापासून त्याबद्दल आभारी.        

सावधान....! या कथेला ऑनलाइन रजिस्टर केले आहे. त्यामुळे या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.            13 टिप्पण्या

  1. खूप छान लिहतात सर तुम्ही , तुमच्या आयुष्यातली खरी कथा तर नाही ना ही , अप्रतिम लवकर पुडील पर्व सुरू करा , पुडील लिखाणासाठी शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. जून महिना चालू झाला कथा कधी चालू करण्यात येणार आहे

    उत्तर द्याहटवा
  3. आज 30 जून आहे कधी चालू होणार पर्व

    उत्तर द्याहटवा