शिवाजी महाराज.

( image by me )सर्वात मोठा महायोद्धा. पन्नास वर्षाच्या नाही नाही पस्तीस वर्षाच्या आयुत या महान राजाने तीनशेहून अधिक किल्ले जिंकले. आणि इतकी संपत्ती कमवून, बनवून ती जपली कुणासाठी ? महाराष्ट्रातल्या रयतेसाठी. रयत-जनता-आणि त्यांचा हा जाणता राजा. ज्याने संपत्ती कमावली जनतेसाठी.रयतेसाठी. ज्या रयतेत मराठा, महार , मांग ,चांग, चांभार, ब्राम्हण, मुस्लीम येतात. पण लाज नसल्यासारखं आम्ही सांगतो काय त्या किल्ल्यांकडे बोट दाखवून कि, तो किल्ला ना आमच्या महाराजांचा आहे. अशा महाराजांचा ज्या महाराजांची संपत्ती सर्वांसाठी असताना देखील आम्ही मराठे म्हणवून घेणारे ती आमची समजून त्यावर पार्ट्या करतो, कचरा करतो, जगापासून लपून किल्ल्यांवर मुलींना घेऊन जातो. मराठे ? हि जात नाही. हा धर्म आहे. ज्याला ज्याला मराठी भाषा बोलता येते किंवा समजते असा प्रत्येक माणूस हा मराठाच आहे. पण तरीही. या जातीच्या विळख्यात आम्ही वाटून घेतलेले महाराज विळख्यातून कधीच सुटून गेलेत. त्या तिथ वर आकाशात एक तारा बनून बघत आहेत आमच्याकडे. पण खरच का बघत असतील का ते आपल्याकडे ? अस म्हणतात दर तीन महिन्याला तारे आपली दिशा बदलतात आणि कित्येक हजारो ताऱ्यांची दशा बदलते. पण मग अशी दिशा बदलताना आपल्या महाराजांच्या नावचा तारा इथेच महाराष्ट्राच्या वर असेल का ? कि पोचला असेल व्हिएतनामला जिथ महाराजांना मानतात. पूजतात आणि त्यांना आदराने शिकून घेतात अशा देशाच्या जमिनीवर एका तारेची सीमा आहे आणि वर आकाशात महाराजांची नजर असेल का ?
महाराजांनी खूप काही केल आपल्या आयुष्यात. पण त्यांनी कुणाला काहीच शिकवलं नाही. किंवा माझ अनुकरण करा किंवा मी काही भारी बोलतो आणि त्याच अनुकरण पुढच्या पिढ्यांनी कराव अस महाराजांचं म्हणन नव्हत. उगाच आपल्या मनातले डायलॉग शिवाजी महाराजांच्या नावे खपवून मोठे होणारे लेखक बरेच काही लिहून गेलेत. इतिहास कुणाला माहित असतो ? कुणालाच नाही. संदर्भ हजारो मिळोत पण तो संदर्भ पुरेपूर खरा इतिहास सांगत नाही. कोड्यासारखा असतो तो. ज्याने त्याने समजायचा असतो आणि लिहायचा असतो. आणि यातच महाराजांचं  विकृतीकरण झाल. म्हणजे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचे राजे पण त्यांच्या विचारांची कादंबरी लिहिताना त्याचं नाव किंवा त्यांची पदवी नाहीतर भोसले हे आडनाव आणि भोसले घराण मोठ केल गेल. का ? माहित नाही.
तेव्हा पटला हा राजा सर्वाना पण आता ? शिवराय फक्त भोसलेंपुरतेच राहिले. त्यांचे विचार ? कोण गेलय तिथ बघायला. साध आपण दहा मिनिट कुणाशी फेसबुकवर बोलत बसलो आणि दहा मिनिटांनी एखादा मेसेज बघायला गेल तर सापडता सापडता मुश्कील होते. मग विचार करा तेव्हा महाराज काय प्रत्येक शब्द न शब्द लिहून ठेवणार होते का ? त्यांच्या विचारांना ते अस लिहून ठेवतील काय ? मग महाराजांनी त्याला हे सांगितल, त्याला दे सांगितल अस ठोसपणे लिहतात कस हे लेखक ? माहितीय भरकटतोय मी विषयापासून पण मला सांगा ? आपण हि नाही का भरकटलो ?
आधी इतिहास वाचून ज्याने त्याने आपल्या परीने इतिहास समजून घेतला आणि मग जातीला मध्ये आणून महापुरुष आपण वाटून घेतले आणि मग इतिहासाचा विसर पडून चालू ठेवला आपला अट्टाहास कि आमचा महारापुरुष मोठा कि तुमचा. आणि मग खचला एक एक माणूस त्या त्या जातीतला. प्रत्येक जातीने आपल्या महापुरुषाच्या पुतळ्यानपुढे रचला एक एक पाया आणि सजवली आसपासची जागा. त्या शिवरायांनी तेवढी जागा दिली सर्व महापुरुषांच्या आसपासची जागा सजवायला आपल्याला राहायला. पण आपण इतके गरीब आहोत. कि आपल्या मनात जर का आंबेडकर असतील , तर ते शिवरायांना मनात जागा देऊ शकत नाही. ज्यांच्या मनात शिवराय असतील ते फुलेना मनात जागा देऊ शकत नाही. आणि...... आणि काय बोलणार. जमिनीवरून तर घरातल्या घरात खून होतात. इथ तर मनात जागा द्यायचीय. आपल्या दुष्मनी जातीच्या महापुरुषाला. मग हे असच होणार. ज्याला त्याला आपला महापुरुष मोठाच वाटणार.
आणि या जातीच्या वादळात प्रत्येक जण राजकारण्यांच्या गमतीत अडकून भगवे फेटे घालणारे कधी पैशाने निळे फेटे तर कधी पिवळे फेटे घालून रस्त्यावर दंगल करताना दिसतात. चेहरे आणि कपडे तेच फक्त फेट्याचे रंग बदलत राहतात. आणि यात जो तो विसरून जातो. कि हे जग राजांमुळे संघटीत राहील आहे. हजारो वर्षांपासून. कित्येक करोडो राजे जन्मले इथे पृथ्वीवर. त्यातल्या हजारो राजांनी आपले प्रदेश मिळवले. ( आयते-तयार ) कित्येक शेकडो राजांनी आपल नाव इतिहासाच्या पानांवर कोरल आहे. ( स्वताहून- म्हणजे स्वतहून लिहून घेतला स्वतःचाच इतिहास. )  पण आपल्याला गर्व हवा कि आपल्या शिवाजी महाराजांनी कुणाकडून इतिहास लिहून घेतला नाही. आणि एक वितभर जमीन सुद्धा आयती मिळवली उलट एक एक पाउल कमावली. आणि नवीन बनवली. आणि म्हणूनच जगाच्या पाठीवर स्वतःच राज्य नाही राष्ट्र अर्थात महाराष्ट्र बनवणारा एकमेव राजा हा आपला शिवाजी राजा आहे. हे कौतुक हा अभिमान राहिला बाजूलाच. पण आपण काय करतोय ? मराठे म्हणतात शिवाजी राजा आमचा. आणि बाकीचे म्हणतात हो हो शिवाजी राजा तुमचाच..
विचार करा....


लेखक : अजिंक्य अरुण भोसले.   

0 टिप्पण्या