in a relationship with RADHIKA

( image by google ) अजिंक्य आणि राधिका फेसबुकवर आज पहिल्यांदाच बोलत असतात. पहिल्या संभाषणात ती तरी काय बोलणार होती अनोळखी मुलाशी. आणि अजिंक्यला तरी कुठ काही बोलायला जमत होत जास्त. दोघांच्या साध्या-सुध्या बोलण्याला पूर्णविराम लागला, जेव्हा राधिका म्हणाली,

राधिका : मी जाते जेवायला आई बोलवतीय.
अजिंक्य : कधी ऑनलाईन येणार ?
राधिका : दहा मिनिटात. मला जास्त वेळ लागत नाही जेवायला.
अजिंक्य : मग माझ्याशी बोलत बोलत जेव ना.
राधिका : नाही अरे आईला नाही आवडत जेवताना मोबाईल जवळ घेऊन बसलेल.
अजिंक्य : हम...
राधिका : काय झाल ?
अजिंक्य : काही नाही.
राधिका : सांग कि.
अजिंक्य : काही नाही जा तू जेवून घे.
राधिका : नाही. आधी सांग काय झाल तुला ? नाराज झालास का ?
अजिंक्य : नाही अस काही नाही. जेवून घे आई ओरडतील. मला नाही आवडणार तुला कुणी ओरडलेल.
राधिका : का ?
अजिंक्य : असच.
राधिका : पहिल्याच बोलण्यात माझ्याबद्दल इतकी काळजी ? जरा अति नाही का वाटत ?
अजिंक्य : होका ? म्हणजे नको का करू मी तुझी काळजी ?
राधिका : अस नाही रे. आणि मी अस बोलले का कि माझी काळजी करू नकोस. पण आत्ताच आपल्याला बोलायला लागून अर्धा तास झालाय फक्त. या आधी मी तुझ्याशी बोलले नाही, तुला बघितल नाही. तू म्हणतोस आपण एकाच शाळेत होतो पण मला तर आठवत नाही. आणि अस असताना आपल्यात इतका परकेपणा असताना तुला माझी काळजी वाटते म्हणून जरा प्रश्न पडला पण एक सांगू ?
अजिंक्य : बोल.
राधिका : करू शकतोस तू माझी काळजी असा फक्त चिडू नको. थांब आई ओरडतिय आता प्लीज सॉरी. आलेच थांब.
अजिंक्य : हो.
राधिका : तू जेवलास का ?
अजिंक्य : नाही.
राधिका : मग तुही जेवून घे मग बोलू आपण.
अजिंक्य : बर.
राधिका : आलेच.
अजिंक्य : हा टाटा.
राधिका : टाटा काय बोलायचंय परत. आलेच.

राधिका जेवण करत होती. अजिंक्य तिची वाट बघत बसलेला. दोघांच हे पहिलच बोलन होत. झाल अस कि, अजिंक्य फेसबुकवर ऑनलाईन होता. स्टेट्स, पोस्ट बघत असताना त्याला “पिपल यु मी नो” मध्ये काही लोकांची नाव आणि फोटो दिसत होते. त्या चौकटी बाजूला स्लाईड करत असताना त्याला राधिकाच नाव दिसल. आणि त्यावर तिचाच फोटो होता. त्याने सहज तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आणि पुढे मग तो जिमला गेला. आणि तिथून तासाभराच्या वेळाने जाऊन आल्यावर त्याने थोड पाणी प्यायल. आणि अंडी खाऊन त्याने आपल बस्तान बेडवर मांडल. आणि फेसबुक सुरु केल. कुणाचा तरी मेसेज आलेला. तो बघून त्याला प्रतिउत्तर दिल आणि. “नोटिफिकेशन” बघत असताना त्याला दिसल मगाशी ज्या तीन-चार जणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली त्यातली “राधिका” त्याला add झाली होती.

मग अजिंक्यने तिच्या प्रोफाईलला उघडल आणि पहिलं तीच वय बघितल. ती एकवीस वर्षाची होती. आणि अजिंक्य बावीस वर्षाचा. वयात बसते असा विचार करून त्याने मग तिचे फोटो बघायला सुरुवात केली. आणि ती ओळखीची वाटायला लागली. कुठ-कुठ-कुठ बघितल आहे हिला ? असा विचार करत असताना त्याने पहिलं तिला मेसेज पाठवला होता “हाय”. आणि ती जणू ऑनलाईनच होती म्हणून तिने त्याला लगेच प्रतिउत्तर दिल. “ हाय”
आणि तिथून पुढे त्याचं बोलन सुरु झाल. हाय, हेल्लो, काय करतेस ?, काय करतोस ? जेवलास का ? जेवलीस का ? तू कुठली ? तू कुठला ? आणि मग बोलन सुरूच राहील. आणि मग बोलता बोलता तिने त्याला सांगिलत कि ती कोणत्या शाळेत आहे. आणि मग त्याला आठवल कि राधिकाला कुठ बघितल आहे. त्याने तिला शाळेतच बघितल होत. आणि चार पाच वेळा मित्रासोबत तो तिच्या मागे मागे पण गेला होता. दुपारच्या सुट्टीत.

मेसेज आला.
राधिका : जेवण तुझ झाल का ?
अजिंक्य कामात होता.
राधिका : आहेस का ? कि जाऊ मी ऑफलाईन ?
राधिका : बर गुड नाईट
अजिंक्य : हाय. कामात होतो.
राधिका : हा नशीब आलास मी जाणार होते.
अजिंक्य : अस कस जातीस मी आहे कि. अजून बोलायचं आहे आपल्याला.
राधिका : जेवलास का ?
अजिंक्य : नाही अजून
राधिका : का बर ?
अजिंक्य : भूक नाही नंतर खाईन
राधिका : नक्की ना ?
अजिंक्य : हो. माझी शप्पथ.
राधिका : तुझी नको. तू तुझी खोटी घेशील माझी घे.
अजिंक्य : बर बाबा तुझी शप्पथ जेवेन नंतर मी.
राधिका : मोडू नकोस. नाहीतर मी बोलणार नाही.
अजिंक्य : नाही मोडणारा.

दोघांच बोलन सुरु झाल. आणि मग अजिंक्य जेवला. दोघ पुन्हा नंतर बोलले आणि मग झोपून गेले. 


( image by google )

02

अजिंक्य : गुड मॉर्निंग डीअर.
( थोड्या वेळाने )
राधिका : गुड मॉर्निंग.
अजिंक्य : कशी आहेस ?
राधिका : ठीक आणि तू ?
अजिंक्य : ठीक ? फक्त ठीक का ? मस्त, चांगली का नाहीस ? काय झाल ?
राधिका : काही नाही.
अजिंक्य : सांग कि.
राधिका : काही नाही रे झोप नाही झाली. डोक दुखतंय. रात्री जाग आली पाउस आला आणि लाईट पण गेलेली ना मग म्हणून जाग आली. मग जागीच होती खूप वेळ. आणि आत्ता उठली म्हणून डोक दुखतय, म्हणून म्हणाली ठीक.
अजिंक्य : काय अग तू मला मेसेज करायचा ना. मी होतो कि बोललो असतो तुझ्याशी.
राधिका : कशाला उगीच तूला त्रास.
अजिंक्य : त्रास कसला माझ इंटरनेट सुरूच असत. तुझ्या मेसेजने मोबाईल वाजला असता मी बघितल असत ना. काय तू केल एकट जागून ?
राधिका : काही नाही रे विचार.
अजिंक्य : कसला विचार ?
राधिका : कसला नाही रे असच जरा.
अजिंक्य : सांगायचं नाही का मला ?
राधिका : अस नाही काही. बट आत्ताच झालीय न आपली ओळख ?
अजिंक्य : हो मग ?
राधिका : मला तुझ्यावर विश्वास तरी बसू देत. मला नाही विश्वास बसत कुणावर लगेच.
अजिंक्य : का तुला हि लोक भेटलीयत वाटत ? फसवणारी.
राधिका : हो. एक दोन नाहीत खूप आहेत.
अजिंक्य : माझ पण तसच आहे. म्हणून तर मी जास्त कुणाशी बोलत नाही. कामपूरत लोक जवळ येतात आपल्या आणि काम झाल कि जातात निघून. खूप त्रास होतो मग.
राधिका : हो ना. त्यांना काहीच फरक पडत नाही. आपण जीव लावतो एखाद्यावर आणि सगळ सगळ जमेल ते करतो त्याच्यासाठी. आणि ती व्यक्ती काय करते तर आपल्याला सोडून जाते. सो मला न हल्ली नाही कुणावर पटकन विश्वास बसत. कुणी कितीही गोड बोलल तरी मला काही वाटत नाही आणि कुणी अगदी ढसाढसा रडून दाखवल तरी काय फरक पडत नाही.
अजिंक्य : बरोबर बोललीस. हेच बोलणार होतो मी पण. एक विचारू ?
राधिका : हा ?
अजिंक्य : तुला बॉयफ्रेंडने फसवल का ?
राधिका : हम.
अजिंक्य : मग बॉयफ्रेंड आत्ता नक्की आहे का नाही ?
राधिका :  नाहीये आमच्यात काही आता.
अजिंक्य : हम. कोण होता ?
राधिका : होता आमच्याच वर्गातला.
अजिंक्य : म्हणजे आपल्या शाळेतला ?
राधिका : हो.
अजिंक्य : कोण ?
राधिका : होता राहुल म्हणून.
अजिंक्य : होका. काय माहित बघितल्यावर समजेल.
राधिका : हम.
अजिंक्य : मग त्याच काय ?
राधिका : काय नाही. मला तो आवडायचा.
अजिंक्य : मग ?
राधिका : त्याने मला विचारलं होत. प्रेमाबद्दल सांगितल होत.
अजिंक्य : तू काय बोललीस ?
राधिका : हो. मग आमच बोलन सुरु झाल. भेटन सुरु झाल. कधी कधी एकत्र कॅफेत भेटन, कधी कॉलेजच्या आसपास भेटन चालू झाल. तो मला खूप आवडायचा. माझी खूप काळजी घ्यायचा. मला हव नेमक तसच तो वागायचा. आणि म्हणून मला तो आवडायचा. नवरा कसा असावा माझा तर राहुल सारखाच असावा अस मला वाटत राहायचं. उठता बसता. रात्री कायम त्याचा विचार यायचा डोक्यात. तो सतत भेटून माझा होत राहिला. आणि मला तो फक्त माझाच वाटत राहायचा. खूप काळजीने माझी तो विचारपूस करायचा. झोपताना गुड नाईट आणि स्वीट ड्रीम पेक्षा टेक केअर हा मेसेज त्याचा मला स्वीट वाटायचा. आमच्यात खूप काही बोलन झाल. खूप वेळ आम्ही एकत्र घालवलाय. खूप क्षण एकत्र जगलो आम्ही. पण....
अजिंक्य : एक विचारू ?
राधिका : हा ?
अजिंक्य : तुमच्यात तस काही झालय का ?   
राधिका : तस म्हणजे ?
अजिंक्य : ते सगळ झालय का तुमच्यात ?
राधिका : नाही.
अजिंक्य : मग ठीक आहे.
राधिका : अस का विचारलस ?
अजिंक्य : असच. अग
राधिका : हा काय करतोस ?
अजिंक्य : बोलतोय एका सुंदर मुलीशी.
राधिका : हो का ?
अजिंक्य : हो. खूप सुंदर आहे ती.
राधिका : कोणे ती सांग कि मला पण.
अजिंक्य : आहे राधिका नावाची एक मुलगी. छान आहे ती.
राधिका : होका. बर बर. बस बोलत मग तिच्याशीच मी जाते.
अजिंक्य : कुठ ?
राधिका : अंघोळ करायला पाणी गरम झालय. जाते.आई बोलवतीय. बोलू मग. तुही आवर.
अजिंक्य : बर. काळजी घे. टाटा.
राधिका : तू हि काळजी घे. आलेच.


आणि राधिका ऑफलाईन गेली आणि अजिंक्य सुद्धा. नंतर दोघांच बोलन झाल दिवसभर. आज तर रात्री दोघ साडे दहा पर्यंत बोलत होते एकमेकांशी. 


( image by google )
03

दिवस तिसरा.
राधिका : आज सकाळी उशिरा उठलास का ?
अजिंक्य : नाही ग उठ्लेलो लवकर पण लाईट नव्हती आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हत. मग मगाशी लाईट आली मग चार्जिंग पूर्ण केल आणि आत्ता ऑनलाईन आलो. सॉरी.
राधिका : सॉरी का रे ?
अजिंक्य : असच तू माझी वाट बघत असशील ना. आणि मी तुला मेसेज केला नाही म्हणून.
राधिका : मला दुसरे पण फ्रेंड आहेत.
अजिंक्य : हो का बर बर. मग माझी गरज काय ?
राधिका : म्हणजे ? अस का बोलतोस.
अजिंक्य : मला वाटल तू माझी वाट बघत असशील. पण बर सांगितल तुला पण आहेत दुसरे फ्रेंड आणि आपण तर परवा झालोय फ्रेंड ते पण फेसबुक फ्रेंड. तुझे बाकीचे फ्रेंड तर रिअल आहेत. कॉलेज, क्लास मधले.
राधिका : अस काही नाही. पण नको रे चिडू. मी मज्जा केली तुझी.
अजिंक्य : खर का ?
राधिका : हो मग. दुसरे फ्रेंड मला महत्वाचे असते तर दोन दिवस तुझ्याशी इतक बोलले असते का ?
अजिंक्य : हा ते पण आहे.
राधिका : हा, तू चांगला वाटलास पहिल्या बोलण्यात म्हणून तुझ्याशी बोलते. माझ्याबद्दल सांगते तुला मी. विश्वास तोडू नकोस.
अजिंक्य : कधीच नाही. तू म्हणालीस तुला खूप जणांनी फसवल आहे. पण एकदाच फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी कधीच तुझा विश्वास तोडणार नाही.
राधिका : गुड.
अजिंक्य : काय करतेस ?
राधिका : बोलते एका मुलाशी.
अजिंक्य : माझ्याशी ना ?
राधिका : नाही रे आहे एक ओळखीचा.
अजिंक्य : बर तुझ झाल कि सांग मग बोलू आपण. उगीच माझा त्रास नको तुम्हाला.
राधिका : अरे हो-हो तूच आहेस तू. तुला रिप्लाय लेट देतीय का मी ?
अजिंक्य : नाही.
राधिका : म्हणजे तुझ्याशीच बोलतेय ना मी बाळा.
अजिंक्य : हा. वॉव.
राधिका : काय झाल ?
अजिंक्य : तू बाळा म्हणालीस.
राधिका : असच म्हंटल. म्हणतात न फ्रेंड अस.
अजिंक्य : हो. पण मला तिची आठवण झाली.
राधिका : गर्लफ्रेंड ?
अजिंक्य : हो.
राधिका : कसला आहेस तीन दिवस माझ्याशी बोलतोयस आणि अजून सांगितल नाही मला तुला गर्लफ्रेंड आहे ते. तिला माहित आहे का आपण बोलतो ते. बघ बाबा नाही तर तुझ तुटेल माझ्यामुळे.
अजिंक्य : अग ऐकणार आहेस का ?
राधिका : काय ?
अजिंक्य : होती. आत्ता नाहीये. सहा महिने झाल आमच ब्रेकअप होऊन.
राधिका : होका. ओह. शीट. नाव काय होत तीच.
अजिंक्य : अपेक्षा.
राधिका : हम. मग तिच्याशी बोलतोस का आता कि नाही ?
अजिंक्य : नाही. तिने ब्लॉक केलय मला. सगळीकडे.
राधिका : होका ?
अजिंक्य : हो. सो नाही बोलन होत आता आमच. आणि ती पुण्याला मी सातारला. नाही होत आमच भेटण पण.
राधिका : बर झाल.
अजिंक्य : काय बर झाल ?
राधिका : काही नाही असच. बर एकच गर्लफ्रेंड का ?
अजिंक्य : नाही. अजून एक होती.
राधिका : खर ?
अजिंक्य : हो.
राधिका : तीच नाव काय ?
अजिंक्य : सायली.
राधिका : तीच काय झाल ?
अजिंक्य : आम्ही दोघ एकत्र होतो एक वर्ष. पण तीच लग्न ठरल. दहावी झाल्यावर अकरावीत. आणि ना माझ्याकड पूर्ण शिक्षण होत ना मी नोकरी करत होतो. घरी परिस्थिती तशी नव्हती. त्यामुळे तिला घरी आणू शकत नव्हतो. दुसरीकडे कुठ जाणार तिला घेऊन हा पण प्रश्न होता. तिला मी खूप आवडायचो. मला पण ती आवडायची. पण पर्याय हा शब्द माझ्यासाठी तेव्हा उपलब्धच नव्हता. काय करणार मी ?
राधिका : मग काय झाल ?
अजिंक्य : काय तिचा साखरपुडा झाला. मी अकरावीत असताना. मी एका कॉलेजला ती दुसऱ्याच. त्यामुळे भेटन बोलन बंद झाल. मग एकदा मला भेटली तर मला तेव्हा सांगितल होत तिने. साखरपुडा झाला म्हणून आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी फक्त एक स्माईल दिली आणि निघून गेलो. काही बोलायची हिम्मत झाली नाही. तोंडावर आलेल माझ्या माझ्याशी लग्न करशील का दोन वर्षांनी. दोन वर्षात काहीतरी काम करून साठवले असते पैसे मी. माझ सोड पण तीच तरी पोट भरेल, हौस भागेल एवढ तरी कमावल असत. आणि केल असत लग्न. पण तिचा आनंद मला माझा कमीपणा दाखवत होता. अस वाटल इतका आनंद बहुतेक ती माझ्यासोबत असताना नसता झाला तिला.
राधिका : होका ? मग?
अजिंक्य : काही नाही.ती गर्लफ्रेंड साधी फ्रेंड पण नाही राहिली.
राधिका : ओह. नको नाराज होऊ. आता मी आहे ना.
अजिंक्य : म्हणजे ?
राधिका : म्हणजे बोलायला रे. आहे न आता मी तुझ्याशी तुझी फ्रेंड.
अजिंक्य : हम.
राधिका : एक विचारू ?
अजिंक्य : विचार कि. परमिशन काय काढतेस.
राधिका : तुमच्यात काही झालेलं ?
अजिंक्य : नाही.
राधिका : दोघींसोबत पण नाही का ?
अजिंक्य : झाल होत अपेक्षा सोबत. सायली सोबत नाही.
राधिका : हम. बर.
अजिंक्य आणि राधिकाच बोलन असच सुरु राहील. रात्री सव्वा अकरा पर्यंत. कळत होत दोघांना कि दोघांना एकमेकांबद्दल काहीतरी वाटतय. पण ते प्रेम नाही अस हि वाटत होत. आणि जे काही वाटत होत ते प्रेमापेक्षा वेगळहि अस काही नव्हत. दोघांनी एकमेकांना बघितल नाही. अजिंक्यने राधिकाला बघितल आहे. पण राधिकाने अजून अजिंक्यला फोटोसोडून कुठच बघितल नाही. मग ? पण तरीही दोघ बोलण्यात विसरत होते सगळ जग. आणि दोघांनी दोन दिवसातच आपला भूतकाळ एकमेकांसोबत सांगायला सुरुवात केली. फक्त विश्वासाच्या जोरावर. अजून काय काय भूतकाळ समोर येईल समोर याचा दोघांना हि अंदाज नव्हता.
राधिका : झोपायचं का ?
अजिंक्य : हो माझ्या पण डोळ्यातून पाणी येतंय. झोपतो.
राधिका : गुड नाईट. स्वीट ड्रीम. काळजी घे.
अजिंक्य : गुड नाईट. स्वीट ड्रीम. तू पण काळजी घे. मिस यु. उद्या सकाळ पर्यंत.
राधिका : होका ?
अजिंक्य : हो ना.
राधिका : बर झोप आता चल.
अजिंक्य : ..........
राधिका : काय झाल आता ?
अजिंक्य : मी काही तरी बोललोय तुला.
राधिका : काय ?
अजिंक्य : वाच कि मेसेज.
राधिका : हम. मिस यु टू. बस का ?
अजिंक्य : हा आता कस. झोपतो.
राधिका : हा. काळजी घे.

अजिंक्य : तू पण.


( image by google )
04

दिवस चौथा.

अजिंक्य : काय करतीस ? उठलीस का ?
राधिका : हो. आत्ताच. ऐक ना.
अजिंक्य : बोल ना.
राधिका : काही नाही. आवरल का ?
अजिंक्य : हो. काय विचारणार होतीस सांग न ?
राधिका : काही नाही रे. असच. काहीतरी विचारणार होते. पण विसरले.
अजिंक्य : इतक्या लगेच विसरलीस का ?
राधिका : हो.
अजिंक्य : ऐक ना.
राधिका : काय ?
अजिंक्य : जाऊदे.
राधिका : काय जाऊदे सांग ना.
अजिंक्य : नको.
राधिका : सांगतोस कि नाही आता.
अजिंक्य : तुझा नंबर देतीस का ?
राधिका : कशाला ?
अजिंक्य : असच.
राधिका : असच कशाला ?
अजिंक्य : असच. मी त्रास नाही देणार तुला किंवा कुणला देणार नाही तुझा नंबर. पण माझी मैत्रीण झालीस न तू, मग तुझा नंबर नको का माझ्याकडे ? म्हणून दे ना.
राधिका : फक्त असावा म्हणून हवाय का नंबर. जा मी नाही देणार.
अजिंक्य : का दे ना.
राधिका : हम. देते. कुणाला सांगू नको. धर. xxxxxxxx
अजिंक्य : हा. माझा घे. xxxxxxxxx
राधिका : खुश का ?
अजिंक्य : खूप खूप खुश.
राधिका : बर तुला वेळ कधी आहे.
अजिंक्य : आहे कि.
राधिका : आई बाहेर गेली कि तुला कॉल लावते.
अजिंक्य : होका ?
थोड्यावेळाने,
राधिका : हेल्लो.
अजिंक्य : हा ?
राधिका : हा काय हा ? नंबर सेव्ह नाही का केला ?
अजिंक्य : केला कि.
राधिका : काय करतोस ?
अजिंक्य : आत्तापर्यंत तर तुझ्याशीच बोलत होतो. तुझा कॉल आला म्हणून टेरेसवर आलो. तू काय करतेस ?
राधिका : मीपण टेरेसवर आले असच. फिरतेय.
अजिंक्य : हा.
राधिका : ऐक ना. तुझ्यात आणि अपेक्षात काय झालेलं ?
अजिंक्य : सगळ झाला. आणि माझ्या चुकीमुळ तिला दिवस गेले होते.
राधिका : मग ?
अजिंक्य : तिने काय काय गोळ्या खाऊन पाडल.
राधिका : त्रास नाही झाल एका तिला ?
अजिंक्य  : झाला वाटत. म्हणजे तिने सांगितल फक्त तिच्या पोटात दुखल खूप पण नंतर थांबल.
राधिका : करताना अक्कल नव्हती का तुला ?
अजिंक्य : माझ्या अकलेचा काय संबंध. हे बघ आम्ही भेटणार होतो. पण तेव्हा काय तरी कोण तरी तिच्या घरी आल. ती म्हणाली नको भेटायला. मी मग घरीच होतो माझ्या तिचा मेसेज आला अचानक. त्या पाहुण्यांसोबत आई गेली बाहेर येणारे चारला.
राधिका : हा मग ? गेला असशील न तिच्या घरी ?
अजिंक्य : हो मग तिने बोलवल तर जायला नको का ? मग मी तिच्या घरी गेलो. आम्ही दोघ बोलत बसलो तिने मला सरबत बनवून दिल. पण आम्ही दोघांनी एकच ग्लास दोघात प्यायला. मग नंतर ती माझ्या जवळ आली आणि झाल. सगळच.
राधिका : कितवी वेळ होती ?
अजिंक्य : पाचवी.
राधिका : मग कळाल नाही का तुला ?
अजिंक्य : आधी घेत होतो काळजी पण तेव्हा काय झाल काय माहित नाही रहावल. तिला पण आणि मला पण. आणि नंतर पण ती ठीक होती. म्हणजे काय त्रास झाला किंवा पोटात दुखल अस काही नाही. नंतर तिला जाणवलं. मग तिने ते प्रेग्नन्सी टेस्ट किट आणल. आणि मग तिला कळाल कि अस अस झालाय ते. मग तिने मला न सांगताच गोळ्या खाल्या. पण त्याचा काय उपयोग झाला नाही. आणि घरी कोण नव्हत तिच्या तेव्हा सिलेंडर आला तर तो घेतला तिने. आणि दार लाऊन ओढत आतल्या खोलीत आणला. आणि मधल्या उंबऱ्यावरून सिलेंडर उचलताना तिला पोटात कळ आली आणि ते बाळ पडल.
राधिका : शी.....
अजिंक्य : तयार नव्हत. अंगठ्या एवढ साईजला होत वाटत अस ती बोलली. आणि मग तिने ते संडासात टाकल आणि पाणी ओतून दिल. घाबरलेली ती खूप. नंतर तिने दोन दिवसांनी मला हे सांगितल. बर काय करतेस बोल कि. मीच एकटा बोलतोय.
राधिका : काय बोलू मी मलाच समजेना.
अजिंक्य : अस कस बोल काहीही.
राधिका  : ऐक न
अजिंक्य : काय ?
राधिका : आई आली. मी जाते. खाली. आई ओरडेल परत.
अजिंक्य : बर . कधी बोलायचं परत कॉलवर.
राधिका : बघू. काहीपण सांगतोस तू. इच्छा तरी होईल का. तरी बघू आई बाहेर गेली कि मी मिसकॉल देईन.
अजिंक्य : ऑनलाईन तरी येणारेस न ?
राधिका : हो


तिने कॉल कट केला. आणि खाली गेली. अजिंक्य हि घरात आला.


( image by google )


05

दिवस पाचवा.
सकाळी सकाळी अजिंक्याच्या मोबाईलच चार्जिंग संपलेलं. त्यात मंगळववार त्यामुळे तर लाईट हि जाणारच होती. म्हणून त्याने पहिला मोबाईल चार्जिंगला लावला. आणि तो त्याच आवरायला लागला. आवरून झाल त्याच आणि त्याने बघितल ३५% चार्जिंग झालेलं. अजून करायचं होत. पण राहवत नव्हत त्याला. त्याने इंटरनेट सुरु केल. राधिकाला मेसेज करायला तेवढ्यात, मोबाईलची रिंग वाजली.
अजिंक्य : हेल्लो.
राधिका : झोपलायस का अजून ?
अजिंक्य : नाही .
राधिका : मग मेसेज कोण करणार ?
अजिंक्य : अग चार्जिंग नाही. म्हणून लावलं होत. लाईट जाईल थोड्यावेळाने.
राधिका : हम. मग रात्री लाऊन ठेवायचा न चार्जिंगला मोबाईल.
अजिंक्य : विसरलो.
राधिका : हम वेडा. काय करतोस रे वेड्या ?
अजिंक्य : काही नाही. आत्ताच जस्ट इंटरनेट सुरु केल तुला मेसेज करायला. तेवढ्यात तुझाच कॉल आला.
राधिका : हम काय करणार ? तुम्ही मेसेज करत नाही. म्हंटल बघाव काय करतोय.
अजिंक्य : घरी कोण नाही का ?
राधिका : नाही आई मावशीकडे गेलीय सकाळीच. ते मावशीच्या घरच कोण तरी वारल आहे म्हणून.
अजिंक्य : मग तू नाही गेलीस ?
राधिका : मला भीती वाटते.
अजिंक्य : कसली ?
राधिका : ते सगळे तिथ रडत असतात आणि ते प्रेत वैगरे सगळ बघून मला भीती वाटते.
अजिंक्य : हा नको जाऊ. काळजी घे. घरातच बस. काय खाल्ल का ?
राधिका : हो चहा खारी खाल्ली.
अजिंक्य : मस्त.
राधिका : काय मस्त ?
अजिंक्य : मला पण चहा खरी आवडते.
राधिका : होका. तू खाल्ल का काय ?
अजिंक्य : हो चहा खारी.
राधिका : एsहे सेम सेम.
अजिंक्य : हम.
राधिका : बोलत का नाहीस. इतका कॉल केलाय मी तर.
अजिंक्य : काही नाही ग असच. भारी वाटतय तुझा आवाज ऐकायला.
राधिका : एवढा पण खास नाही माझा आवाज.
अजिंक्य : कोण म्हणाल अस तुला ? खूप भारी आहे तुझा आवाज.
राधिका : होका. बर. मला नाही आवडत पण माझा आवाज.
अजिंक्य : मला आवडतोय. ऐक ना. एक विचारू राग येणार नसेल तर ?
राधिका : जास्त राग येणार असेल तर नको विचारू.
अजिंक्य : म्हणजे ?
राधिका : काही नाही बोल.
अजिंक्य : आपण तीन चार दिवस बोलतोय एकमेकांशी. दिवस दिवस. म्हणून मला तुला फक्त एकदा बघायचं होत.
राधिका : मलापण. तू खूप चांगला आहेस. मला समजून घेतो. तुला माहितीय का ? मी कुणाला रिप्लाय देत नाही. कारण पोर कशी फोटो बघून रिक़्वेस्ट पाठवतात आणि मेसेज करतात. पण काय झाल मला काय माहित. तुझ्याशी थोडावेळ बोलले आणि काय झाल मला मी सगळ तुला सांगत बसले. तुझ्यावर माझा विश्वास बसलाय. फक्त आता तो तोडू नको.
अजिंक्य : नाही तोडणार कधीच.
राधिका : हा.
अजिंक्य : विषय नको न बदलू यार.
राधिका : कुठ बदलला. सांगितल जस्ट फक्त तुला.
अजिंक्य : मला बघायचं आहे तुला.
राधिका : कस ?
अजिंक्य : व्हिडीओ कॉलवर.
राधिका : नको.
अजिंक्य : का ?
राधिका : असच.
अजिंक्य : काय ग अस. आत्ता म्हणालीस न तुझ्यावर विश्वास आहे. मग ?
राधिका : हो पण मी तुला अजून प्रत्यक्ष बघितल नाहीये.
अजिंक्य : हा. पण एकदाच. हव तर एक मिनिट फक्त.
राधिका : बर ऐक मी दुपारी एकला लावेन.
अजिंक्य : आत्ता का नाही ?
राधिका : काम आहेत रे.
अजिंक्य : एकच मिनिट ना फक्त.
राधिका : बर. थांब.
अजिंक्य : हा.
राधिका : लाव. व्हिडीओ कॉल.
अजिंक्य आणि राधिका एकमेकांना पहिल्यांदा व्हिडीओ कॉलवर बघत होते. दोघ काहीच बोलले नाहीत. फक्त एकमेकांना बघत होते. दोन मिनिटांनी व्हिडीओ कॉल कट केला. आणि मग पुन्हा राधिकाने अजिंक्यला कॉल लावला.
अजिंक्य : खूप सुंदर दिसतेस तू.
राधिका : तू पण छान दिसतोस. हैंडसम. ती केसं जरा नीट कर वाकडी-तिकडी कशी झालीयत.
अजिंक्य : अग ती अशीच झालीत करतो मी नीट.
राधिका : हा कर.  
अजिंक्य : हा. आता परत कधी ?
राधिका : काय ? व्हिडीओ कॉल ?
अजिंक्य : हा ?
राधिका : बघू आता. सारख सारख नाही. आणि असहि बोलतोय न आपण साध्या कॉलवर.
अजिंक्य : हो.
राधिका : बर चल मी आवरते. घरी खूप आवरायचं आहे. आईला फोन आला. आई सगळ टाकून तशीच गेली. बोलू आपण नंतर.
अजिंक्य : हो. काळजी घे.
राधिका : हा तूपण घे. मिस यु.
अजिंक्य : खरच ?
राधिका : हो बाय.
अजिंक्य : मिस यु टू. टाटा.

आणि दोघांच संभाषण थांबल. नंतर सुरु झाल ते आज रात्री एक पर्यंत सुरु होत. बहुतेक एकमेकांना प्रत्यक्ष नाही पण व्हिडीओ कॉल मध्ये बघितल्यामुळ एकमेकांबद्दल विश्वास वाढला असावा. चार्जिंग दोघांची रात्री संपली. लाईट गेली होती. पाउस रात्रीचा पडत होता. ती अजिंक्यला आठवत होती. आणि अजिंक्य गाढ झोपून गेला होता.
  
06
दिवस सहावा.
अजिंक्य : काय करतेस ?
राधिका : काही नाही अरे. जरा आवरत आहे.
अजिंक्य : काय घर का तुझ ?
राधिका : माझ.
अजिंक्य : का कुठ बाहेर चाललीस का ?
राधिका : हो कॉलेजला चाललीय. चौकशी करायला.
अजिंक्य : मग आज काय जास्त बोलन होणार नाहीतर आपण. होणा ?
राधिका : मी काय तिथ दिवसभर बसणार आहे का ? काहीही काय ? तासाभरात येणारे.
अजिंक्य : बर. काळजी घे. काही खाल्लयस का ?
राधिका : नाही. आल्यावर खाईन.
अजिंक्य : आल्यावर नाही. आधी खा आणि मग जा.
राधिका : नाही नको.
अजिंक्य : खा म्हंटल ना मी.
राधिका : अरे जबरदस्ती नको करू. खरच नाहीये मला भूक.
अजिंक्य : माझी शप्पथ आहे तुला.
राधिका : शप्पथ नको घालू.
अजिंक्य : घालणार मी, त्या शिवाय तू खाणार नाहीस.
राधिका : बर खाते मी पण.
अजिंक्य : पण काय ?
राधिका : तू मला तुझी शप्पथ का घालतोयस ? आणि मी तुझी शप्पथ का पाळायची ?
अजिंक्य : का आपण मित्र नाही का ?
राधिका : हो आहे पण.
अजिंक्य : पण काय ? फेसबुक फ्रेंड आहे फक्त हेच न ?
राधिका : तस नाही पण. हि जबरदस्ती झाली का हक्क ?
अजिंक्य : कसली ?
राधिका : शप्पथ घातलीस ती तू.
अजिंक्य : जबरदस्ती तर अजिबातच नाहीये.
राधिका : मग हक्क आहे का ?
अजिंक्य : हक्क गर्लफ्रेंड वर आणि बायकोवर असतो. फेसबुक फ्रेंड वर नाही.
राधिका : बर असुदे हे. मी चहा पिते.
अजिंक्य : नाही नुसता चहा नको पित्त होईल. ऐक बिस्कीट खा किंवा मग खारी आहे का ?
राधिका : खारी नाहीये मारी आहे. ते खाते. आणि निघते.
अजिंक्य : चालेल. जाऊन ये मी वाट बघत आहे.
राधिका : चालेल काळजी घे मी मेसेज करेन.
अजिंक्य : तुही काळजी घे.
राधिका : ऐक ना.
अजिंक्य : ऐक ना.
राधिका : अरे दोघ एकदम बोललो. बर बोल तू पहिला.
अजिंक्य : नको तू बोल.
राधिका : नाही तू बोल.
अजिंक्य : लेडीज फर्स्ट.
राधिका : मी संध्याकाळी मावशीकडे जाणार आहे.
अजिंक्य : हा मग ?
राधिका : तुमच्या इथून जाणार आहे मी.
अजिंक्य : हा मग ?
राधिका : हा मग ? काय तुला बघायचं आहे.
अजिंक्य : अग तुला कस कळाल माझ्या मनातल ?
राधिका : काय ?
अजिंक्य : मीच तुला म्हणणर होतो आत्ता आपण भेटायचं का ? मला तुला बघायचं आहे.
राधिका : हा. चालेल कि.
अजिंक्य : पण अस नको.
राधिका : म्हणजे ?
अजिंक्य : लांबून एकमेकांना बघायचं. असल नको. आपण भेटायचं का खास ?
राधिका : अरे मला नाही घराबाहेर पडता येत अस विनाकारण.
अजिंक्य : प्लीज बघ ना काहीतरी कारण काढून ये.
राधिका : नाहीरे कारण काही.
अजिंक्य : बर ठीके.
राधिका : काय ठीक आहे ?
अजिंक्य : काही नाही.
राधिका : काय झाल ? चिडायला.
अजिंक्य : नाही भेटायचं तर कशाला सांगायचं ?
राधिका : मला पण भेटायचं आहे तुला.
अजिंक्य : हम.
राधिका : बर ऐक.
अजिंक्य : काय ?
राधिका : मी जाऊन येते संध्याकाळी मावशीकडे. तिथून लवकर निघेन पण आपण कुठ भेटायचं ?
अजिंक्य : बागेत ?
राधिका : नाही नको. तिथ लोक असतात ओळखीचे.
अजिक्य : नाही. उलट तिथे सेफ आहे. रस्त्यवर कुठ भेटणार आणि काय बोलणार आपण ?
राधिका : बर चालेल. मी चहा पिते.
अजिंक्य : बिस्कीट खा. माझी शप्पथ आहे तुला.
राधिका : हो बाबा.
अजिंक्य : माझा अजून लग्न नाही झाल.
राधिका : हो माहित आहे मला मग ?
अजिंक्य : मग बाबा कशाला बोलतीस मला. लग्न नाही मुल नाही आणि बाबा कशाला अजिंक्य नाव आहे तेच म्हण ना. तू अजिंक्य म्हणालीस कि खूप आवडत मला.
राधिका : बर अजिंक्य. मी खाते चहा बिस्कीट. शप्पथ माघारी घे. संध्याकाळी भेटू आपण बागेत. साडे सहाला. जरा अंधार पडला कि. मी मेसेज करेन.
अजिंक्य : दिवस भर बोलणार नाहीयेस का ?
राधिका : बोलणार कि तासाभरानी.
अजिंक्य : मग अस का शेवटच बोलल्यासारख बोलतेस.
राधिका : बर आई बोलवतीय.
अजिंक्य : टाटा काळजी घे.

राधिका : टाटा. काळजी घे.


( image by google )

07
सात वाजत आलेले. अंधार पडत चालेला. अजिंक्यच्या मनात धागधुग होत होती. राधिका अजून ही ऑनलाईन आली नव्हती. तो तिचीच वाट बघत होता. शेवटी मोबाईलच चार्जिंग संपत आल. त्याने मोबाईल चार्जिंगला लावला. आणि आत गेला तेवढ्यात मोबाईल वाजला. नक्कीच राधिकाचा मेसेज असेल या विचाराने तो पटकन मोबाईल जवळ गेला. फेसबुक सुरु करून बघितल. तिचाच मेसेज होता.
राधिका : काय करतोस ?
अजिंक्य : तू कुठ आहेस ?
राधिका : घरी.
अजिंक्य : मी तुझीच वाट बघतोय.
राधिका : का ?
अजिंक्य : का म्हणजे भेटायचं आहे न आपण.
राधिका : अरे हो. खरच कि विसरले मी. आत्ताच घरी आली. समान आणायला गेलेले.
अजिंक्य : बर मग आज भेटणारेस का नाही ?
राधिका : भेटू ना. मी विचार करतीय.
अजिंक्य : कसला ?
राधिका : आता अंधार पडलाय आणि आई नाही बाहेर पाठवणार.
अजिंक्य : बघ न काहीतरी करून. तूच बोलली होतीस आज भेटू आपण. मी नव्हतो माग लागलो.
राधिका : हो माहितीय मीच बोलले होते. पण मलाच एकटीला ब्लेम करू नको. तुला पण भेटायचं आहे मला.
अजिंक्य : हो.
राधिका : मग ?
अजिंक्य : मग काय मग ?
राधिका : बर ऐक दहा मिनिटानी मी ऑनलाईन येते. तू नेट सुरु ठेव. मी काय होत ते सांगते तुला.
अजिंक्य : बर.

पाच मिनिटांनी,
राधिका : ऐक ना.
अजिंक्य : बोल ना.
राधिका : प्लीज चिडू नको.
अजिंक्य : बोल तर काय झाल ?
राधिका : तू काय करतोयस ?
अजिंक्य : काही नाही बसलोय. आवरून तू सांग ना पाहिलं. मी वाट बघतोय.
राधिका : मी आईला खोट सांगितल कि मला पावभाजी खाऊ वाटतीय.
अजिंक्य : मग ?
राधिका : आई म्हणाली घेऊन ये पार्सल.
अजिंक्य : मग ?
राधिका : आई म्हणाली एकटी नको तिथ खात बसू. घेऊन ये घरी.
अजिंक्य : हा मग ?
राधिका : हा मग- हा मग काय लावलंयस. मी येणार आहे आता बाहेर.
अजिंक्य : ओकेच. मीपण येतो.
राधिका : ऐकून तर घे.
अजिंक्य : आता काय ?
राधिका : चिडू नकोस.पण माझ्यासोबत आई पण आहे.
अजिंक्य : काय ग हे.
राधिका : आता मी काय करू. मला वाटल मला एकट्याला सोडेल आई पण मला म्हणाली मी पण येते.
अजिंक्य : बर. एन्जॉय.
राधिका : काय झाल ?
अजिंक्य : हम.
राधिका : मी विचारलं काय झाल ?
अजिंक्य : काय नाही.
राधिका : सांगणार आहेस का नाही ?
अजिंक्य : काही नाही झाल. तू ये जाऊन मग मेसेज कर. मी चार्जिंगला लावतो मोबाईल.
राधिका : नको जवळ ठेव मोबाईल. मी कॉल लावेन.
अजिंक्य : कशाला. आई असतील ना सोबत. तू ये जाऊन मग बोलू. काळजी घे.
राधिका : बर.
अजिंक्य : हम.
थोड्यावेळाने, कॉल येतो.

अजिंक्य : हेल्लो...!
राधिका : कुठ आहेस ?
अजिंक्य : टेरेसवर.
राधिका : होका. मग खाली बघ कि वाकून. मला तर तू दिसेना वर.
अजिंक्य : थांब.
पुढे जाऊन अजिंक्य खाली बघतो. राधिका त्याच्याकडे बघते.
अजिंक्य : आई कुठ आहेत ?
राधिका : घरी.
अजिंक्य : मग मला का सांगितल नाही.
राधिका : असच मज्जा.
अजिंक्य : होका बर.
राधिका : हा.
अजिंक्य : बाकी काय मग ?
राधिका : आला लगेच राग.
अजिंक्य : नाही आला.
राधिका : मग विषय का बदललास ?
अजिंक्य : काही नाही. कुठ बदलला ?
राधिका : चल लवकर ये खाली. तुमच्या त्या पेठेतल हॉटेल आहे तिथ ये. मी जाऊन थांबते.
अजिंक्य : आलोच.
राधिका : लगेच नको येऊ माग कळेल अस लोकांना. सावकाश ये.
अजिंक्य : राहवत नाहीये ना पण.
राधिका : बर ये. बर ऐक ना. कुठ जायचं ?
अजिंक्य : कशाला ?
राधिका : बोलायचं आहे ना आपण ?
अजिंक्य : हो.
राधिका : मग काय हॉटेलात बसायच का ?
अजिंक्य : नाही. बागेत जायचं का ?
राधिका : असेल का उघडी ?
अजिंक्य : हा अजून अर्धा-पाउण तास असेल उघडी.
राधिका : चालेल जाऊ.

कॉल कट होतो. राधिकाच्या मागे मागे जात अजिंक्य हॉटेल मध्ये जातो. तिथ ते पावभाजीची ऑर्डर देतात. आणि पंधरा मिनिट वेळ लागेल अस सांगतो तिथला वेटर. तिथून मग दोघ बागेत जातात. दोघांच्यात शांतता. असते. आणि दोघ अंधाऱ्या बाजूला जाऊन एका बाकावर बसतात. राधिका मोबाईल वाजतो म्हणून पर्समधून मोबाईल बाहेर काढते. आणि अजिंक्य बोलतो,
अजिंक्य : मी सोबत असताना पण कशाला लागतोय तुला मोबाईल ठेव आत.

आणि तो तिचा मोबाईल ओढून घेऊन पर्समध्ये आत ठेवतो. आणि नकळत तिच्या हाताला धरतो. आणि ती त्याच्याकडे बघते. आणि दोघ शांत होतात. मग अजिंक्य बोलतो.

( image by google )
08
पाच मिनिट शांत नुस्त बसून दोघांना हि करमत नव्हत. अजिंक्यला काय बोलाव सुचत नव्हत तो तर तिला बघत होता फक्त. आणि राधिका बघत होती इकड तिकड. पहिल्यांदाच बागेत आल्यासारखं.
राधिका : बोलणारेस का ?
अजिंक्य : तू बोल कि ?
राधिका : काय बोलू ?
अजिंक्य : मेसेजवर मीच बोलत असतो ना. मग आता प्रत्यक्ष्यात तरी तू बोल.
राधिका : काही नाही अरे. कस तरी सांगून आले घरातून. वेळ जास्त नाही आपल्याकडे बोल पटपट.
अजिंक्य : अजून येऊन दहा मिनिट झाले नाही कि जायचा विषय काढलास. नको ना.
राधिका : का काय झाल ?
अजिंक्य : तुला मेहसूस करतोय. खूप छान आणि सुंदर दिसतीयस तू.
राधिका : होका ?
अजिंक्य : हो.
राधिका : किती ?
अजिंक्य : खूप सुंदर. एक मिनिट हा ? अंम....अम्म्म....ते बघ गुलमोहराच झाड दिसतय का ?
राधिका : हो.
अजिंक्य : त्याची फुल किती मस्त असतात ना ?
राधिका : हो मला त्या फुलांचा कलर आवडतो. मस्त असतो फ्रेश.
अजिंक्य : होणा ? ते तुझ्यापुढ काहीच नाही.
राधिका : म्हणजे ?
अजिंक्य : ते गवत बघ किती मस्त आहे ना ? एकसारखं हिरवगार.
राधिका : हो सकाळी सकाळी त्यावर दवबिंदू साचलेले असतात आणि त्यावर चालल ना कि इतक भारी वाटत ना मी खूपदा चाललेय अशा गवतावर.
अजिंक्य : होणा ? ते भारी गवत पण तुझ्यापुढ काही नाही.
राधिका : होका ? अजून काय राहिलंय का ?
अजिंक्य : हो खूप.
राधिका : बस....इतक.
अजिंक्य : नाही ऐक कि. तो बघ वर चंद्र. अरे कुठ गेला ?

ढगाळलेले वातावरण आणि त्यात लपणारा चंद्र तो क्षण सामान्य आहे पण तेव्हा तोच क्षण गजब वाटत होता. आणि त्याच लपलेल्या चंद्राला बघून अजिंक्य म्हणाला,
अजिंक्य : तुला माझ्या जवळ बसलेल बघून तो हि लाजला आणि बघ ढगांमागे लपून बसला.
राधिका : अस काही नाही. मी काय फक्त तुझ्यासोबत बसते अस नाही काही.
अजिंक्य : असुदे कि तू कुणासोबत हि बसली असशील. पण तेव्हा तुला आणि त्याला चंद्र दिसला असेल. पण आत्ता तू आणि मी इथ आणि अस जवळ बसलोय दिसतोय का चंद्र तुला ?
राधिका : नाही. पण पाऊस पडणारे म्हणून तो दिसत नाहीये.
अजिंक्य : दोषच काढायचा म्हंटला तर बराच काढता येईल तुला आणि मला पण.
राधिका : उदाहरणार्थ ?
अजिंक्य : हम... बघू इकड निट, बघ चेहऱ्यावर तुझ्या एक हि डाग नाही. आणि बघ वर, आत्ता नाही ग चंद्र आला कि, त्याच आख्ख तोंड भरलंय.
राधिका : हा. आहेच मी सुंदर.
अजिंक्य : हो. खूप, खूप, खूप सुंदर आहेस तू. इतकी सुंदर आहेस कि, तुझ्यापुढ गुलाब, चंद्र, सूर्य, निसर्ग, सगळे फालतू आहेत. कुठलीच मुलगी इतकी सुंदर नाही इतकी तू सुंदर आहेस. राधिका नावाच्या खूप मुली असतील जगात पण तुझ्या इतक्या त्या सुंदर नसतील खात्री आहे मला. तू एकमेव आहेस जगात. जरा चुकलच खर पण.
राधिका : काय ?
अजिंक्य : देवाने सूर्य बनवला ठीक आहे. पण चंद्राची काय गरज होती ? तू असताना ?
राधिका : काहीही हा. आता अति होतय.
अजिंक्य : हो तुला कस कळाल.
राधिका : काय ?
अजिंक्य : तू म्हणालीस ना आत्ता अति होतंय.
राधिका : हो मग अति होतीय तुझी तारीफ.
अजिंक्य : तारीफ वे. तारीफ नाही माझ्या मनात तुझ्याबद्दलच प्रेम अति होतय आत्ता.
राधिका : कंट्रोल कर त्याला.
अजिंक्य : का ?
राधिका : जागा ठीक नाही. आणि मला जाणवतय तुला काय होतय.
अजिंक्य : काय जाणवतय ?
राधिका : माहितीय तुला. मी नाही बोलणार.
अजिंक्य : नाही माहित मला काही. सांग ना.
राधिका : आआ...ना..
अजिंक्य : काय तू. बर ऐक.
राधिका : काय ?
अजिंक्य : जगात कुणी, कस, कधी, कुणावर प्रेम केल मला माहित नाही. त्याचं प्रेम मला जाणून घेण महत्वाच वाटत नाही. तरी जगात फेमस असलेल प्रेम रोमिओ, ज्यूलीयेटच त्या पेक्षा जास्त माझ तुझ्यावर प्रेम आहे. खूप सार आणि कधी न संपणार. दुसऱ्यांच प्रेम दिवसेंदिवस कमी कमी होत जात माझ वाढत जाईल. एकट कधी तुला सोडणार नाही. तुला त्रास होईल अस मी कधी वागणार नाही. तुझी काळजी घेईन. रोज प्रत्येक क्षणाला आणि तुला महिन्याला येनाऱ्या त्या दिवसांत सुद्धा. तुझ माझ प्रेम आहे जगाला सांगायची मला गरज नाही. तू सोबत असावी अस वाटतय. असच शेजारी. जवळ. आणि आत्ता या काही वेळात तुझ्यामुळे मी इतका धुंद झालोय कि मनात माझ्या आत्ता तुझी शप्पथ एक हि विचार नाहीये. पूर्ण रिकामा झालोय विचारांनी. जर का तू आयुष्यात माझ्या आलीस तर मला कधीच कुठलाच त्रास होणार नाही. आणि तू माझ्यासाठी इतक केलस तरी किंवा नाही केलस जरी मी तुझ्यावर आत्ता करतो त्याहून जास्त प्रेम करत राहीन. कारण माझ तुझ्यावरच प्रेम कायम वाढत राहील कमी होणार नाही. मित्र म्हणून तुझ सगळ ऐकून घेईन. बॉयफ्रेंड म्हणून तुझी जी ती काळजी घेईन. आणि नवरा बनताना एक आदर्श नवरा बनेन. फक्त आणि फक्त तुझा असेन. लोकांनी जळाव तुझ्यावर इतक मी तुझ्यावर प्रेम करेन. जे कोणीच कुणावर करत नाही. शेवटच्या क्षणी पण मी थांबेन. तुझ्यासाठी. पण तुला एकट सोडणार नाही मी. आपल्या बाळाची मी खूप काळजी घेईन. सगळे नवरे पोर झाली कि, बायकोच्या हवाली करतात. मी उलट करीन. मी आपल बाळ सांभाळेन मोठ करेन तू नको काळजी करू. सगळ सगळ करेन तुझ्यासाठी मी घरातली काम पण निम्म्याच्यावर करेन. नोकरी पण करेन. तुला आवडती न बुलेट माझ्या पैशाने विकत घेईन. एक सांगू, मला तू खूप आवडतीस. आता इतक सगळ ऐकून पण जर का मी कुठ कमी वाटलो तर सांग मला.
राधिका डोळ्यातल्या पाण्याला पुसते. आणि उठते. अजिंक्य हि लागलीच उठतो. बहुतेक तिला राग तरी आलाय किंवा मग घरी जायचं आहे या विचारात अजिंक्य उभा होतो. तोच राधिका त्याच्या मिठीत शिरली. आणि अजिंक्य हि मग तिच्या केसांना घट्ट पकडून दुसऱ्या हाताने पाठीला घट्ट पकडून तिला स्वतःत ओढून घेऊ लागला. राधिकाने एकदा मान वर करून बघितल आणि अजिंक्यने डोळे मिटून घेतले. आणि राधिकाने आपले ओठ त्याच्या स्वाधीन केले.

समाप्त.    लेखक  : अजिंक्य अरुण भोसले.

आवडल्यास खाली लाईक आणि वर बाजूला उजवीकडे फॉलो करा  )

3 टिप्पण्या