अजिके

 man read a book
( image by google )

ढगाळलेल वातावरण. निर्जण वस्ती. गरम होत होत खूप तिथ. हैद्राबादच्या तीन मजली चाळीत बिपीन आणि त्याची सहकारी अलिशा प्रवेश करतात. तिला कॉल येतो ती बाहेरच गेटपाशी थांबून मोबाईलवर बोलत असते. बिपीन तिची वाट बघतो. तिला ते जाणवतच आणि ती बिपिनला खुणावते तू पुढ जा. आणि बिपिन आत जातो. अलिशा मोबाईलवर बोलत तशीच बाजूला जाते. थोड्याच वेळात पाऊस सुरु होतो. म्हणून ती भिजत करत चाळीत चालत जाण्यापेक्षा गाडीमध्ये जाऊन बसते. इकड बिपीन चाळीच्या इमारतीजवळ जातो. त्याला सांगितलेलं असत कि, तिथ एक भाडेकरू राहत होत जो त्या पूर्ण चाळीची देखरेख करत आहे. ते हि तब्बल आठ वर्षे. रमणलाल शेठ नावाच्या एका व्यापाऱ्याची ती वडिलोपर्जित मिळालेली चाळ होती. रमणलालच्या बोलक्या स्वभावामुळे आणि तो दाखवत असलेल्या माणुसकीमुळे एकाला लागून एक अशा सगळ्या खोल्या भाड्याने दिल्या गेल्या. तिथ राहणार कोण टेलर होत, कोण धोबी होत, कोण चांगल्या कामावर होत. तर कोण टांगेवाला पण होत.
पण राहताना सगळे गुण्यागोविंदाने रहात होते. या चाळीत खालच्या मजल्यावर वेगवेगळ्या चार खोल्या होत्या. अशा मिळून पूर्ण तिन्ही मजल्यावर बारा खोल्यांची हि एक चाळ होती. इथल्या भाडेकरूंना इथ चाळीत राहून निदान पाच-सात वर्ष झाले असतील आणि अशा सवय लागलेल्या चाळीतून निघून जायला कुणाच्या मनात नव्हत. प्रत्येकाला सवय झालेली इथल्या वातावरणाची.
अशा सगळ्या वातावरणात आपल पोट आणि भाड भरण्याइतपत पैसे कमावण्यात जो तो व्यस्त असायचा. कारण सगळ्यांची हातावरची पोट होती. त्या चाळीत तिसऱ्या मजल्यावर चौथ्या खोलीत एक माणूस रहात होता. परिस्थितीने श्रीमंत होता. कायतर म्हणे शायर होता. त्याच बोलण कमी असायचं. तो कित्त्येक दिवस खाली काय खोली बाहेर पण यायचा नाही. कुणाला तो वर राहतो कि नाही हे कळायचं पण नाही. एवढच काय तर त्याच दार कायम बंद असायचं. त्यामुळे कधी कधी खालची लोक दारातून कानोसा घ्यायचे का तर तो माणूस जिवंत आहे कि नाही समजण्यासाठी. म्हणजे इतकी शांतात त्याच्या खोलीत असायची. कारण तो स्वतः शांत होता. कधीतरी एक-दीड वाजता रात्री शांत गाण्यांचा आवाज त्याच्या खोलीतून यायचा. त्या शायरची एक हि शायरी मात्र तिथल्या कुणीच वाचली नाही. त्या शायरच नाव होत. “अजिके भोस्वाड”.
बिपीन त्या खोलीच्या दरवाजा जवळ गेला. शांतात होती आणि अचानक त्याला माग कुणी तरी असल्याचा भास झाला. त्यान माग बघितल कोणी नव्हत. मग पुढे त्याने दारावर हात ठेवला दार आतून बंद असेल अस त्याला वाटल. त्याने दारावर ठोठावल प्रतिउत्तर काहीच नाही. मग त्याला आठवल कि, तिथ चाळीत सध्या कुणीच राहत नाही. एक माणूस फक्त राहतो त्या चाळीची राखण करायला. पण त्याच हि नाव त्याला माहित नव्हत. बिपीनने पुन्हा दरवाजा वाजवला. दार उघडल गेल किंचितस. हा हेच ते घर जिथे तो भाडेकरू राहत असणार अस बिपीनला वाटल आणि तो आत गेला. बाहेरच्या खोलीत अंधार होता. सकाळ असली तरी बाहेरच्या ढगाळ वातावरणामुळे आधीच बाहेर अंधारलेल सगळ आणि त्यात घर हे वर आणि बाजूला अडगळीला होत. त्यामुळे अंधार होणारच होता. त्यात खिडक्या बंद. घरात पंखा होता जो एका टेबलावर ठेवलेला. पण सजवून. म्हणजे त्यातली पाती काढून त्यात शोभेची फुल लावलेली. बिनपातीचा पंखा होता तो. घरात माणसाचा वावर होता त्यामुळे घर स्वच्छ होत. घरात कसला तो कुबट्ट वास नव्हता. बाहेर पूर्ण चाळीत कसलासा वास येत होता. पण या खोलीत मात्र कसलाच वास नव्हता. बिपीनने कानोसा घेतला आणि हाक मारली, “कुणी आहे का ?”.
प्रतिउत्तर काहीच नाही.  त्याने जरा दम धरला आणि थोड्यावेळातच पुन्हा हाक दिली. कुणीच नव्हत. बिपिनला तिथ थांबू वाटत नव्हत आता. घरात कोण नसताना इतक समान-सुमान असताना अस थांबण त्याला आवडल नाही. तो माघारी फिरला आणि काहीतरी पडल्याचा आवाज आला. बिपीन दचकला आणि मनाची तयारी करून तो आत गेला. आत तर बाहेरच्या खोलीपेक्षा अंधार होता. इंग्लिश भुतांच्या चित्रपटात जश्या अंधाऱ्या खोल्या असतात अगदी तशी ती खोली दिसत होती. बिपीन पुढे गेला त्याला दिसल एक पुस्तक कपाटावरून खाली पडल आहे. त्याने नजर टाकली पुढे, कपाटाच दार बंद होत. उजव्या बाजूला एक हार्मोनियम पेटी, आणि गिटार होती. डावीकड एक टेबल होता पण तो जरा कपाटापासून लांब होता. कपाटासमोर समोरासमोर ठेवलेल्या दोन खुर्च्या होत्या. मग हे पुस्तक कशावर होत ? आणि होत तर पडल कस ? खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यानं पडण्यासारख ते पुस्तक इतक हलकं, कमी वजनाच आणि कमी पानाच नव्हत. मुळात वार यायला त्या खोलीत खिडकीच नव्हती. कपाटावर सगळ मोकळ होत आधीच काहीच सामान नव्हत. त्यामुळे ते  कपाटावर होत पुस्तक आणि अचानक पडल अस होण शक्य नव्हत. टेबल तर लांब होता त्यामुळे त्याचा ही प्रश्न नव्हता. बिपीन त्या विचारात असताना त्याने त्या पुस्तकावरच नाव वाचल. “आज हि के दिन प्यार है |”
बिपीनने ते पुस्तक खुर्चीवर ठेवल. आणि माघारी वळताना अचानक त्याच्या डोळ्यासमोर काहीतरी आल. त्याला काहीतरी आठवल. आणि त्याने पुन्हा पुस्तकाकडे नजर टाकली. त्यावर लेखक म्हणून नाव होत, “ अजिके भोस्वाड”.
आणि त्याने पुस्तक हातात घेतल. तो खुर्चीवर बसला आणि त्याने पुस्तक वाचायला सुरुवात केली. पहिल्या पानावर प्रस्तावना होती ती वाचेपर्यंत मोबाईलची रिंग वाजली. बिपीन दचकला, अलिशाचा कॉल होता. तिला परत माघारी जायचं होत. ती पुन्हा एका तासाने येणार होती. आणि अजून एक निरोप सांगता सांगता तिचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. ती निघून गेली. बिपीन पुढे पुस्तक वाचू लागला.    


indian poor people shayari hindi
( image by google )
पुस्तकाची प्रस्तावना वाचून बिपीनला वाटल होत आत काही कथा वैगरे असेल. नाव तर अगदी चांगल होत. वेगळ अस. “ आज हि के दिन प्यार है” प्रस्तावना वाचून झाली आणि बिपीनने मागच पान उलटल आणि त्यावर लिहिलेलं. “ ये किताब नही मेरे लब्ज है, और ये लब्ज मेरे है मगर हक उसपर उनका है”. बिपिनला काहीतरी भारी अस वाटत होत. वाचायची इच्छा वाढत चाललेली त्याची. त्याने पटकन पुढच पान उलटल. आणि सुरुवात झाली एका कथेला.

सन १९४२. बॉम्बे.
एका टांगेवाल्याकडे घोडा साफ करायला म्हणजे त्या घोड्याला अंघोळ घालायला, त्याची काळजी घेणारा गडी म्हणून कामाला असलेला अजिके नशिबाला कोसत रोजचा वेळ, रोजचा दिवस कसबसा घालवत होता. शिक्षण लिहिण्या वाचण्यापुरत झालेलं. जगाच ज्ञान खूप पण ते अंमल करताना विसरल जायचं. आणि याच भोळेपणाचा फायदा घेऊन लोक त्याच्याकडून हव ते काम करून घ्यायचे. आईच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी सत्तेचाळीसाव्या वर्षी दुसर लग्न केल एका तीस वर्षाच्या बाईशी. तीची ही आधी लग्न झालेली दोन. आत्ताच झालेलं तिसर होत. तिला गुप्तांगाचा संसर्गजन्य रोग झालेला. त्याच निदान आणि त्याच औषध कुठच नव्हत. शोध लागलेला नव्हता त्या रोगासाठीच्या कोणत्या औषधाचा. वडिलांचा आणि तिचा शारीरिक संबंध झाला आणि त्यांना ही त्या रोगाची लागण झाली. त्या बाईला हे माहित नव्हत तिला असलेल्या रोगाबद्दल पण तिला हे माहित होत कि या आधीचे दोन्ही नवरे आपल्याशी शारीरिक संबंध ठेवतातच सहा महिन्यात मरून गेलेत. पण आपल्याला हव्या असणाऱ्या आधारासाठी अजिकेचा वडील तयार आहे बघून तिने यातल काहीच त्यांना सांगितल नाही. आणि पुन्हा तेच झाल. तीन एक महिन्यात अजीकेच्या वडिलांना काय होत होत काही कळत नव्हत. एकसारखी ती जागा दुखत होती. खाण-पिण सगळ कमी झालेलं आणि अशाच इकडच्या तिकडच्या दवाखान्यातून काहीतरी तात्पुरत्या गोळ्या औषध आणून त्यांच्यावर इलाज सुरु होते.
अजिके नोकरी करत होता एका कोर्टाबाहेर चहा विकायचचा. विकलेल्या चहाच्या एक टक्का पैशावर. पाच महिन्यात त्याचे वडील वारले. आई तर नव्हती. भाऊ नव्हता. बहिण होती तिच्यावर बलात्कार झालेला त्यात ती मेली होती. त्याच माग अस उरलेलं कोण तर त्याची ती सावत्र आई आणि त्या बाईला पण कळून चुकलेल कि तिचे पण दिवस जास्त राहिले नाहीत. आणि म्हणून तिने पापाच प्रायश्चित्त म्हणून अजिकेला सांभाळायच ठरवल.
तिने आई सारख प्रेम करायला सुरुवात केलीच होती. अगदी दोन दिवसच झाले असतील आणि एकेएकी रात्री ती जोरात ओरडायला लागली त्या आवाजाने अजिके उठला. तिने पाणी मागितल. पाणी आणायला म्हणून तो गेला आणि तेवढ्यात तिचा आवाज थांबला. तो बाहेर पाणी घेऊन आला. तिच तोंड उघड होत. डोळे उघडे होते. पण हालचाल बंद. त्याने तिच्या तोंडात थोडीशी पाण्याची धार सोडली. पाणी तोंडात जाऊन पुन्हा बाहेर आल. त्याने तिचे डोळे बंद केले. आणि सकाळी उजेड झाल्यावर सव्वा सहाला तिला अग्नी दिली.  
तिथून तो तसाच घरी आला. मुंडवलेला चेहरा घेऊन तो कामावर गेला. तिथ नव्या कोऱ्या सायकलवर एक मुलगा चहा विकत उभा होता. मालकाने येऊन अजिकेला सांगिलत कि, त्याच काम आजवरच होत. त्याचा स्वताचा मुलगा आता हा धंदा चालवणार आहे. अजिके काही न बोलता निघाला. घरी आला एका पत्र्याच्या पेटीत त्याला वडीलांचं सामान सापडलं. ज्यात बऱ्याच चिटोऱ्या, कागदाच्या तुकड्यांशिवाय काही नव्हत. त्यात एक कागद सापडला ज्यात एका राजाराम नावाच्या माणसाकडून जमिनीचे पैसे येण आहे अस लिहिलेलं होत. अजिके ती चिट्ठी घेऊन तिथे गेला. पण त्या माणसाने पैसे द्यायला नकार दिला उलट त्यांचच कर्ज आपल्याकडे शिल्लक आहे अस सांगून अजिकेला त्याने कामाला ठेवल. आणि पुन्हा त्याचा कोर्टाशी संबंध आला. कोर्टा बाहेर बसणारे टाईप राईटर त्यांच्यातला एक होता हा राजाराम. बाहेरच्या बाहेर बक्कळ पैसा कामावणारा राजाराम अजिकेला हाताखाली ठेवून त्याला ते टायपिंगच मशीन शिकवतो. आणि काही दिवसात अजिके त्या जागेवर बसतो. आणि राजाराम निवांत घरी.


जेव्हा लोक असत तेव्हा काम आणि उरलेल्या वेळात काय करायचं म्हणून अजिके स्वतःची एक रोजनिशी लिहू लागला. आणि त्यात हव ते मनात येईल ते लिहू लागला. आणि त्याचा आज महिना भरलेला त्याला पगार मिळणार होता. तो गेला पगार घ्यायला तर कळाल कि कोकणात कामानिमित्त जाताना लाकडी बसचा अपघात झाला आणि त्यात राजाराम मृत झाले. आणि इकडच सगळ सोडून त्यांचे नातेवाईक आणि घरातले कोकणात स्थाईक होणार आहेत. आणि जाताना त्यांनी हे घर अजिकेला द्यायचं एका चिठ्ठीत लिहून ठेवलेलं. पण खाली सही राहिलेली. त्यामुळे घर त्याला द्याव कि नको या वादात राजारामची बायको तात्पुरत लक्ष राहील म्हणून अजिकेला त्या घरात राहायला सांगते.


ajike ajinkya arun bhosale love horro
( image by google )
०३

अजिके त्या घरात राहायला लागला. घराची सोय झाली. पण पैशाची नाही. त्या घरच्या मागच्या बाजूला एक बोळकांड होत आणि तिथ खूप छोट्या छोट्या खोल्या होत्या. इतक्या छोट्या कि त्यात फक्त एक गादी बसेल. गादी ? हो गादी बाकीच काही नाही. खोलीबाहेर नाव लिहिलेली असायची. आवडत्या नावाच्या खोलीत जाऊन झोपायचं. माणसांनी म्हणजे फक्त पुरुषांनी आत जायचं. गादीवर झोपायचं. थोड्यावेळात बाहेर लिहिलेल्या नावाची तरूण मुलगी यायची आणि शरीरसुख द्यायची. काम झाल कि बोळकांड्याच्या बाहेर एक बाई उभी असायची पस्तीशीतली. तिला पैसे द्यायचे आणि निघून जायचं आपल्या वाटेला. अजिकेला हे दोन दिवसांनी कळाल जेव्हा त्याने मागच दार उघडल होत.
संध्याकाळची वेळ होती. दहा वाजले होते. अजिके रेडिओवर लागलेल्या बंगाली गाण्यावर गुणगुणत आतल्या खोलीत जातो. आणि त्याला मागच्या खिडकीतून दिसत काही कालवा सुरु आहे माग. त्या बोळकांड्यात. तो खिडकी लाऊन घेतो आणि जराशी फट ठेवून त्यातून बघतो. काही माणस पळून जात असतात काही तरुण मुलींना पोलीस घेऊन जात असतात. आणि पाच एक मिनिट सुरु असलेला हा सावळा गोंधळ विरला. आणि अचानक बाहेर कसलासा आवाज आला. कुणीतरी आल होत. पण पुढच तर दार बंद होत. मग येणार कोण ? मांजर असेल किंवा कबुतर या विचाराने अजिके आतल्या खोलीतल काम उरकून बाहेर आला. आणि रेडीओ बंद करतो. आणि खुर्चीवर येऊन बसतो. टेबलावरच पुस्तक हातात घेतो. डावा पाय उजव्या मांडीवर रेलून ठेवून पुस्तक वाचू लागतो. आणि मागच्या दरवाजाच्या इथून आवाज येतो बांगड्या वाजल्याचा. आता अजिकेला भीती वाटायला लागली.
तो पुस्तक ठेवतो खुर्चीवर आणि हळू दबक्या आवाजात मागच्या दरवाजापाशी जातो. आणि बघतो तर हिरवी साडी नेसलेली. बाई दारात अंधारात उभी होती. आणि त्या बाईने त्याच्याकडे नजर टाकली. घाऱ्या पिवळ्या डोळ्यांनी अजिकेला बघतील तस अजिके घाबरला आणि माग सरला. माग ठेवलेल्या पितळेच्या कळश्या पडल्या. तरी त्या बाईच्या तोंडावरची रेष हलली नाही. अजिके घाबरला. ती बाई त्याच्या जवळ यायला एक पाऊल टाकते आणि लाईट जाते.
सगळी शांतता. आवाज फक्त श्वासांचा. एकट्याच्या ? नाही दोन श्वासांचा. आणि पुन्हा बांगड्या आणि पैंजण असा दोन्हीचा आवाज येत राहतो. आवाज वाढत राहतो. आणि अजिकेपाशी येऊन थांबतो. श्वासाचा आवाज आता येतो. आणि बहुतेक ती बाई हात उचलते तिचा म्हणून बांगड्या माग सरकताना पुन्हा आवाज करतात आणि अजिके घाबरतो. अचानक लाईट येते. आणि त्या घाऱ्या डोळ्याच्या गोऱ्यापान बाईला जवळ इतक बघून अजिके भोवर आल्यासारखं जागेवरच डुलतो. ती बाई त्याला पकडते. पण अजिके तिने धरलेल्या  हाताकडे बघतो आणि ती त्याला धरलेला हात सोडते. अजिकेची खात्री पटते ती बाई भूत नाही खरोखर बाई आहे. तो आत जाऊन पाणी पितो आणि दुसऱ्या ग्लासात तिला पाणी देतो. ती बाई पाणी पिते.
अजिके : आपण कोण ?
मिष्टी : मला ओळखल नाहीस ? खोट बोलू नकोस.
अजिके : माग बघितलय तुम्हाला पण नाव कुठ माहित आहे मला.
मिष्टी : मिष्टी.
अजिके : बर इथ काय करताय माझ्या घरात ?
मिष्टी : तुझ ? आणि हे घर ?
अजिके : हो. माझ्या मालकाच घर आहे ते गेले माझ्या नावावर केल घर.
मिष्टी : बर झाल. अस ही त्याची बायको होतीच बावळट. म्हणून तर यायचा माग अधून मधून तुझा मालक बाजारात.
अजिके : बर.
मिष्टी : वय किती तुझ ?
अजिके : चोवीस.
मिष्टी : वाह. कोवळा आहेस. चांगला दिसतोयस. व्यसन असेलच ?
अजिके : हो. वाचनाच.
मिष्टी : मी पोरीच म्हणतेय.
अजिके : नाही. तसले शौक नाहीत.
मिष्टी : “शौक किसको किसका होता है ? फिर भी हर एक इन्सान जिने का शौक राखता है”
अजिके : वाह... तुम्ही आणि शायरी ?
मिष्टी : प्रेम भंग झाला ना कि सुचते शायरी.
अजिके : आणि माझ्यासारखं बिना प्रेमच कोण असेल तर ?
मिष्टी : नाही जमत.
अजिके : मला शिकायची आहे.
मिष्टी : प्रेम कर.
अजिके : नाही जमत.
मिष्टी : “औरत के बाहो में सो कर किसे प्यार नही होता ?”
अजिके : मला कोण आवडत नाही.
मिष्टी :  का ?
अजिके : कधी आई सोडून कोणत्या मुलीच्या काय बाई पाशी पण गेलो नाही. पण तुम्ही आता काय करणार ?
मिष्टी : कशाच ?
अजिके : त्या मुलींना पोलिसांनी नेल ना. मग काय करणार त्याचं ते.
मिष्टी : त्यांना मुंबईतून आणलेलं विकत. तिकड सोडतील. आणि मला काय तीन गेल्या पाच मिळतील नवीन.
अजिके : तुम्ही यात कशा काय आला ?
मिष्टी : तू विचारू नये आणि मी सांगू नये.
अजिके : बर.
मिष्टी : मी इथ राहू शकते आजची रात्र ?
अजिके : हो. पण सकाळी लवकर जाव लागेल तुम्हाला. कुणाला कळणार नाही म्हणजे.
मिष्टी : हो.
अजिके : जेवणार ?
मिष्टी : नाही. झोपायचं आहे.
अजिके : आतल्या खोलीत झोपा. मी झोपतो दुसऱ्या खोलीत. माझ्या खोलीत इतकी थंडी वाजत नाही.
अजिके तिला खोली दाखवतो आणि सगळ्या खिडक्या, दरवाजे लाऊन तो जाऊन झोपतो. अकरा वाजले असती. अजिके गाढ झोपलेला. लाईट गेलेली. एका मेणबत्तीच्या प्रकाशात मिष्टी त्याच्या खोलीत जाते. तिच्या खाटेपाशीच मेणबत्ती काडेपेटी ठेवलेली तिने झोपताना बघितलेली असते. त्याचा उपयोग आता तिला होतो. ती बघते अजिके गाढ झोपलाय. तिला त्याच नाव माहित नसत. त्यान तिला विचारलेल नाव पण तिने त्याला नाही. ती जाते आणि त्याच्या पायाशी बसते. आणि मेणबत्ती विजवते. आणि अजिकेला झोपेत जाणवत त्याच्या अंगावर कोणत तरी एक ओझ आलंय. त्याने डोळे उघडले. सगळा अंधार. त्याने हात फिरवला. आणि त्याला जाणवली मिष्टी. आणि त्याने काही बोलण्या आधी आणि हलण्याआधी तिने त्याच्या दोन्ही हाताना आपल्या दोन्ही हातांच्या मुठीत पकडल. आणि त्याच्या छातीवर डोक ठेवून त्या अंधारात पण अजून गडप होण्यासाठी तिने डोळे गच्च मिटले.   


( image by google )
०४

बिपीन पुस्तक वाचण्यात गुंग होता. त्याने पुस्तकातल शेजारच पान वाचायला सुरुवात केली. पण संदर्भ लागत नव्हता. मग त्याने खाली पानाचा आकडा बघितला. “अठरा” आणि पुढच पान “एकवीस”. म्हणजे एकोणवीस आणि वीस अस पाठपोठ एक पान त्यात नाहीये. म्हणजे आत्ताच कुठ रस आलेला वाचायला आणि सगळ विरल. त्याने पुस्तकाची पान चाळून बघितली. पुस्तक खुर्चीवर ठेवून कपाटापाशी बघितल. कपाटाच्या वर हात फिरवून बघितला. फरशीवर गुडघे टेकवून टेबलाखाली वाकून बघितल पण ते पान कुठ दिसल नाही. तो पुन्हा खुर्ची पाशी आला. त्याने पुस्तक हातात घेतल. आणि तसाच खुर्चीवर टेकून डोळे मिटून बसला. अजिकेबद्दल जे वाचलेलं ते डोळ्यांसमोर आणत.
आणि त्याला कसली तरी चाहूल लागते. तो अर्धवट डोळे उघडून बघतो. तर एक माणूस कपाटापाशी जातो. कपाट उघडतो. आणि त्यातल एक पुस्तक काढतो. आणि त्या पुस्तकात घडी करून ठेवलेलं एका पुस्तकाच पान बिपीन समोर धरतो. बिपीन ते पान घेतो. तो माणूस म्हणजे त्या चाळीवर लक्ष ठेवणारा माणूस असेल अस त्याला वाटल. म्हणून तो बोलला.
बिपीन : तुम्हाला कस माहित मला हेच पान हव होत.
माणूस : मगापासून बघतोय मी. मन लाऊन वाचताय पुस्तक. अचानक उठलात शोधाशोध करायला लागलात. मग कळाल मला तुमच तेच पान हरवलंय.
बिपीन : हो मस्त आहे पुस्तक हे. उठू वाटत नाही जागच.
माणूस : माझ आख्ख पुस्तक पाठ आहे.
बिपीन : काय सांगता.
माणूस : मी अनुभवलय हे पुस्तक. त्यामुळ अजिके मीच आहे अस समजून मी सांगू शकतो तुम्हाला सगळी गोष्ट. आणि अस हि ती मुलगी येईलच ना तुमच्या सोबत उतरली होती मगाशी गाडीतून ती.
बिपीन : हो. तुम्ही बघितल का आम्हाला ? मग मी हाका मारल्या खूप पण आला नाहीत.
माणूस : काम असतात मला.
बिपीन : माफ करा. बर तुमच नाव काय ?
माणूस : कथा ऐकायचीय ना ?
बिपीन : हो.
माणूस : मग माझ नाव अजिके आहे समजा.
बिपीन : बर. मी बिपीन.
माणूस : तर. मला आता अजिके म्हणा.
बिपीन : चालेल. शायर अजिके.
अजिके : तर कुठवर आलीय कथा तुमची ?
बिपीन : ती मिष्टी अजिकेच्या अंगावर झोपली आहे. गर्द अंधारात. पुढे ?
अजिके : त्या अंधारात दोघांच मिलन होत. बाहेर अंधार. घरात अंधार. एकमेकांच्या डोळ्यासमोर आणि मनात हि अंधार. प्रेमात सुद्धा अंधार. वयाची काही सीमा राहिली नव्हती. तो चोवीस. ती पस्तीस. शरीरसुख देण आणि घेण या क्रियेत वयाच भान हरवलेलं. अंधारलेल. तिचे मोकळे केस. तिचे घारे डोळे. गोरा तेजस्वी रंग. भरून आलेले खांदे. उभारलेली छाती. आणि ?
बिपीन : आणि ?
अजिके : आणि हे सगळ असून पण दिसत नाही. त्यामुळे तिच्या सौंदर्याचा शृंगाराचा काही उपयोग झाला नाही. कारण या सगळ्यावर अंधाराच राज्य होत.
बिपीन : मिलन झाल ?
अजिके : हो झाल.
बिपीन : मग पुढे काय झाल ?
अजिके : लाईट आली. एकमेकांवरची ओझी हलकी झाली. श्वास वाढलेले धिमे झाले. अंगातली ताकद कमी झाली. चेहऱ्यावरच तेज उतरून गेल. जीवापाड मनातल प्रेम शरीराच्या स्पर्शात वाहून गेल आणि अजिकेला प्रेम झाल.
बिपीन : अशा बाईसोबत ?
अजिके : का प्रेम फक्त चांगल्या बाई सोबतच होत ?
बिपीन : नाही. तस नव्हत म्हणायचं मला. माफ करा. तुम्ही बोला.
अजिके : त्या रात्री ती त्याच्या मिठीत झोपली. सकाळी चार वाजता ती त्याला न उठवता. आणि न सांगता तिच्या घरी निघून गेली. आणि सकाळी जेव्हा अजिकेला जाग आली तेव्हा त्याला ती दिसली नाही. त्याने शोधलं तिला घरात ती नव्हती. मागच दार उघड होत. त्याला समजून गेल ती निघून गेली. घरातून तरी. आणि मनातून ?
बिपीन : मनातूनच्या पुढे काय ?
अजिके : मनातून पण गेली अस त्याला वाटलच होत तितक्यात ओली केस पुसत ती तिच्या दारात उभी होती. आणि अजिके जेव्हा आतली खिडकी उघडतो तेव्हा त्याला ती दिसली. तीच लक्ष खिडकीकडे गेल. आणि अजिके हसला. बावचळला. बिथरला. सगळ्या भावनांना चेहऱ्यावर आणून त्याने खिडकी लाऊन घेतली. आणि आत जाऊन बसला. त्याच खाटेवर जिथ काल दोघांनी एकमेकांना आपल सर्वस्व दिल होत. आज आत्ता ती खाट रिकामी होती. तो तिथेच झोपला. आणि गादीला येणारा मिष्टीचा वास घेत झोपून गेला.
दुपार झाली असेल अंदाजे एक वाजता. बोळाच्या बाहेर मिष्टी उभी होती रोजच्यासारखी. आणि तिच्या मागून एक हात तिच्या तोंडासमोर येतो आणि हातात पैसे असतात. मिष्टी माग बघते.
आणि माग अजिके होता.

बिपीन : पुढ ?


ajinkya arun bhosale. love sex rape breaking news hot
( images by google )

०५
अजिके : पुढ काहीच नाही.
बिपीन : अस कस ? आत्ता तुम्हीच म्हणालात ना ? कि तो पैसे देतो त्या बाईला.
अजिके : मिष्टी म्हण.
बिपीन : हा माफ करा मिष्टी.
अजिके : मिष्टी पैसे घेत नाही आणि अजिकेला आत सोडत हि नाही.
बिपीन : का ?
अजिके : आतल्या त्या तरुण मुली दुसऱ्यांसाठी होत्या. मिष्टी आत्तापर्यंत फक्त दोन लोकांसोबत झोपली होती. एक तिचा बाप आणि तिचा नवरा. आणि तिसरा अजिके. ती कुणासाठी नव्हती. आणि अजिके तिच्या सोबत शरीरसुख घ्यायचं म्हणून तिकड गेलेला. काल रात्री दोघांच्यात जे काही झाल. ते ठरवून झालेलं नव्हत. जे झाल ते अजिकेच्या मर्जीने नव्हत झाल. जे झाल ते अजिकेसाठी नवीन आणि पहिल्यांदाच होत. सगळ काही घडल त्यात पडती बाजू अजिकेची होती. मिष्टी ही तृप्त झाली कालच्या मिलनाने. तीही इतक्या दिवसांनी म्हणा किंवा वर्षांनी आपल शरीर कुणाला तरी देत होती. तिला काही वाटल नाही. अजिकेला सुख द्याव आणि त्याने आपल्याला तितकच शारीरिक सुख द्याव या इच्छेपोटी दोघांच्यात शर्यत सुरु होती. बर झाल ते झाल. मिष्टी विसरून गेली. कारण तिने फक्त धंदा करावा प्रेम नाही. असा तिचा अजेंडा होता. आणि प्रेम सगळ व्यर्थ आहे. अर्थहीन आहे असा समज अजिकेचा होता.
बिपीन : असSस. मग ?
अजिके : मग काय तिने त्याला सुनावलं. बरच काही. आणि दोघांच्यात थोड बोलन झाल.
मिष्टी : तुला काय वाटल काल मी तुझ्यासोबत खाटेवर होते. जवळ होते म्हणजे रोज असेन किंवा हवी. तेपण फुकट नाहीतर हे–हे असे पैसे देऊन. अस वाटल का तुला ? आणि वाटल असेल तर ऐक मी गुलाम नाही. मी बाई आहे तुझी इच्छा नाही. कि ती ( इच्छा ) कधी हि यावी आणि मी उपलब्ध असाव.
अजिके : नाही मी असा विचार केला नाही.
मिष्टी : मग कसा विचार केलास ? आणि मुळात काल झाल ते झाल. तुझ्या डोळ्यात गरज दिसली. आणि मला हि गरज होती. रात्र संपली आणि बघ आता दुपार आहे. विसर मग तूपण ते सगळ.
अजिके : हो. पण. काल ते आपण केल ते.
मिष्टी : काय केल आपण ? हा ? काय केल सांग. तू मला स्पर्श केला मी तुला केला. बघू हात बघू शर्ट काढून छाती कुठ तो स्पर्श आहे का अजून तिथ ?
अजिके : नाहीये. पण मनात आहे.
मिष्टी : दिसणाऱ्या शरीरावरचा स्पर्श दिसत नाही मग अशा काल्पनिक मनातल काय टिकणार ?  
अजिके : प्रेम.
मिष्टी : कुणाला ? कुणाच ? कसल ?
अजिके : मला. तुझ्यावर आणि काल रात्रीपासून.
मिष्टी : मैने पहले हि कहा था, “औरत के जिस्म पर सोकर किसे प्यार नही होता?” तुम भी वैसे हि निकले. जिस्मानी चाहत के इन्सान.
अजिके : नाही मी असा नाही. मी शरीराने किंवा त्या सेक्समूळ नाही बोलत.
मिष्टी : बर ठीके. आत्ता आपण अस समजू कि काल आपल्यात काहीच झाल नाही. मग नुस्त बघून तू माझ्या प्रेमात पडलास का ? आणि तू म्हणालास काल कि मला तू बघितल आहेस या आधी इथ. मग तेव्हा जाणवल होत का तुला ? हे प्रेम.
अजिके : नाही.
मिष्टी : परत भेटला नाहीस तरी चालेल. जाऊ शकतोस.
अजिके : इथून जाऊ शकतो पण.
मिष्टी : पण तुझ्या मनातून नाही. हेच बोलणारेस ना ?
अजिके : तुम्हाला कस कळाल.
मिष्टी : एक रात्र झालीय तुला प्रेम होऊन माझ्या शेकडो रात्री होऊन गेल्यात.
अजिके : मला तुम्ही आवडता.
मिष्टी : मग मी काय करू ?
अजिके : माझ्याशी लग्न कराल ?
मिष्टी : तुझ ते मालकाच घर तुझ आहे का ?
अजिके : हो.
मिष्टी : कर माझ्या नावावर.
अजिके : पण ते माझ्या नावावर आहे. पण मालकांची बायको नाही देत. तात्पुर्त रहा अस म्हणाल्या त्या मला.
मिष्टी : राहील कशात आहे ?
अजिके : माझी मृत्युपत्रावर जो आलेख आहे त्याच्या बाजूला सही हवीय. आणि ते मृत्युपत्र आणि दुसरा सरकारी कागद त्या मालकांच्या बायकोकडे आहे.
मिष्टी : आणि बायको ?
अजिके : कोकण.
मिष्टी : घर तुझ्या नावाववर करायचं काम माझ. मग ते माझ्या नावावर करायचं.
अजिके : हो दुसऱ्याच क्षणाला. पण लग्नाच काय ?
मिष्टी : लग्नाचं काय बंधन घालतोस. तुला मी हवी ना. रोज रात्री मी तुझीच.
अजिके : आणि प्रेम पण हवय मला.
मिष्टी : ‘जहा हो जिस्म वही प्यार है, क्या पता हर एक का दिल कहा पर है’.

अजिके निघून गेला. घरात येऊन त्याने टेबलावरचा एक कागद आणि पेन घेतला. आणि तो खुर्चीवर येऊन बसला. 

xxx.com rape sex marathi article ajinkya arun bhosale writholic blog
( image by google )
०६

अजिके : काही लिहायला सुचत नव्हत. काही वेगळ अस आठवत नव्हत. आठवत होते तिचे डोळे. जे त्याच्या डोळ्यांसमोर आलेले. आठवत होते ओठ जे त्याच्या ओठात मिसळले गेले होते. आठवत तिचे केस सुद्धा होते. जे उगाचच त्याच्या चेहऱ्यावर येऊन खुशाल वावरत होते. आठवत होता तिचा स्पर्श. प्रत्येक स्पर्शामागे जो अंगावर काटा येत होता तोच भास आत्ता झाला. ती रात्र. तो क्षण. तो प्रसंग. या व्यतिरिक्त काही त्याला आठवत नव्हत. आणि या आठवणींमुळे त्याला आत्ता काही सुचत नव्हत. मग लिहिणार काय ? शेरो-शायरी, कविता कि प्यार का नगमा. आणि लिहायला तो लेखक नाही. वाचक आहे. दुसर्यांची लिहिलेली पुस्तक वाचणारा हा अजिके, हा काय लिहिणार होता ?
तो कधीच झोपून गेला होता. अस म्हणतात जास्त झोपणारे आळशी नाही आतून एकटे पडलेले असतात. आणि अजिके या एवढ्या मोठ्या घरात एकटा होता. तीन दिवस अजिकेने दम काढला. आणि मनाची तयारी करून त्याने वेगळे कपडे घातले. मालकाच्या कपाटात त्यांचे कपडे होते दोन तीन त्यातला एक घालून तो माग गेला. तोंडावर कापड गुंडाळलेल. आणि डोक्यावर सुद्धा.
आणि तो एका खोलीत गेला. थोड्यावेळात एक मुलगी आली. साधारण एकोणवीस वर्षाची. आणि तिने त्याचे कपडे काढले. ते करत असताना अजिके शांत बसून होता. शर्ट काढत असताना तिचा स्पर्श त्याला होत होता. पण तेव्हासारख त्याला काही जाणवत नव्हत. काही होत नव्हत. किंवा अंगावर काटा काय एक केस उभा राहिला नाही. मिष्टी म्हणाली कि मी अंगावर प्रेम करतो. मनावर नाही. आमच्यात सेक्स झाला म्हणून मला प्रेम झाल. पण अस असत तर आत्ता हि मी तीच गोष्ट करणार आहे. फक्त समोरची व्यक्ती दुसरी आहे. पण तरी माझ्या शरीरावर काही परिणाम नाही. मग हे काय आहे ?
पंधरा मिनिट झाले. वेळ संपला. अजिकेची शारीरिक अवस्था बघून त्या मुलीला समजल अजिकेला काही करायचं नाही. तिने त्याला शर्ट दिला आणि सांगितल बाहेर पैसे दे.
अजिके पुन्हा पहिल्या पोशाखात मिष्टी जवळ गेला आणि तिला पैसे दिले. अंधारामुळे तिला स्पष्ट तो दिसत नव्हता. तिने पैसे घेतले. आणि उरलेले पैसे त्याला दिले. ते घेत असताना तिला दिसल अजिकेचा हात थर-थर कापतोय. तिने त्याच्या डोळ्यात निट बघितल आणि ते डोळे तिला ओळखले गेले. तिने त्याच्या तोंडावरच कापड काढल अगदी ओढूनच. आणि अजिके होता.
बिपीन : बापरे... मग पुन्हा तिने हाकलून दिल त्याला ?
अजिके : नाही ऐक, अजिके खाली मान घालून उभा होता. मिष्टी पैसे ब्लाऊजच्या आत ठेवते आणि बोलायला तोंड उघडते. अजिके त्या अंधारात पण तिचा अंदाज घेऊ तिच्या दोन्ही हातांना आपल्या दोन मुठीत घट्ट पकडून भिंतीपाशी सरतो. आणि तिच्या ओठात स्वताचे ओठ गुंतवण्याचा प्रयत्न करतो. पण उपयोग होत नाही. मिष्टी हालचाल करत असते त्याच्या तावडीतून सुटायचा. वयाने ती मोठी असली तरी अंगातली रग अजिकेत जास्त होती. अजिके तिच्या कानापाशी आपले ओठ नेतो आणि म्हणतो, “आमी तोमाके आनेक भालो पाशे” आणि तिच्या कानावर जीभ फिरवत त्याने तिला घट्ट जवळ मिठीत घेतल. तीही हारली त्याच्या पुढ. त्याने तिच्या पाठीवर एका हाताने घट्ट धरून दुसरा हात केसात फिरवत होता. इतक्यात मिष्टीने मनाची तयारी करून त्याच्या पाठीवर दोन्ही हात अलगद ठेवले. तसे अजिकेने तिच्या केसांना आपल्या एका हाताने घट्ट धरल. “ च्च...आ..ह.” तिला दुखल ती जरा ओरडली. आणि त्या सरशी अजिकेने तिला जवळ घेतल घट्ट आणि मिष्टीने पण त्याला जवळ घेतल.
बिपीन : मला तर ते चित्र डोळ्यांसमोर दिसायला लागलय.
अजिके : फिर वहा से अजिके निकल गया.
बिपीन : किधर ?
अजिके : उसके घर.
बिपीन : अस कस. आत्ता दोघांच्यात प्रेम होणार होत आणि अचानक तो घरी गेला ? आणि तो स्पर्श ती मिठी त्याला हवी होती नाहि कि मिष्टीला मग असा कसा गेला तो ?
अजिके : तो घरी गेला. त्याने मागच दार नुस्त ढकलून बंद केल. त्याच्या खोलीतल्या खाटेवर तो बसला. थोड्याच वेळात बाहेरच्या कुंडयामधली गुलाबांची फुल तोडली. पाकळ्या काढून त्यांना खाटेवर पसरवल. मालकाच्या खोलीत असलेली एक अत्तराची कुबी काढून त्यातल थोड अत्तर स्वताच्या गळ्याला, मानेला आणि कानाच्या पाळेला लावल. आणि तो बसला वाट बघत ती येण्याची.
बिपीन : ओह... म्हणजे अस होत तर पुढे. तरीच म्हंटल अस कस प्रेम अर्धवट राहील. मग ती आली ?
अजिके : हो. दाराचा आवाज झाला. अजिके उठला जागचा. ती आत आली. त्याच्या जवळ आली. आणि त्याने तिला मिठी मारली. तिने अंग सैल सोडल. आणि त्याने तिला मिठीत धरूनच खाटेपाशी नेल. आणि तिला घेऊन झोपणारच, तेवढ्यात तिने डोळे मिटले.
बिपीन : काय झाल तुमच्या डोळ्यात पाणी ? काय गेल का डोळ्यात ?
अजिके : नाही. या पुस्तकातला महत्वाचा प्रसंग आहे. आठवला म्हणून जरास भरून आल.
बिपीन : का काय झाल अस ?

अजिके : मिष्टीने डोळे मिटले. अजिके तिच्यावर स्वार झाला आणि अगणित चुंबन करू लागला. पण प्रतिउत्तर नाही. कारण तिने जेव्हा डोळे मिटले तेव्हा ते कधी न उघडण्यासाठी मिटले होते.   


died accident murder blog marathi story love story
( image by google )
 ०७


बिपीन : काय ?
अजिके : मिष्टी गेली.
बिपीन : पण अशी कशी. आत्ता थोड्यावेळापूर्वी ठीक होती. आणि ?
अजिके : आणि ऐक, एक दिवस आधी कोकणातल्या त्या मालकाच्या घरी, सगळे जमलेले. मालकाला अग्नी दिली आणि सगळे तिथेच राहिले होते. अचानक अस काय काम होत कि ते इकड कोकणच्या घरी आलेले याच गूढ बायकोला समजल नव्हत. तिने तिथल्या नोकराला गण्बाला  विचारल इथल्या घरी काय मालकाने ठेवलंय का ? तेव्हा त्याने तिला एक लिफाफा दिला. तो उघडून तिने त्यातला एक कागद काढला आणि त्यात एक पत्र होत. ते पत्र स्वतःच्या हाताने लिहिलेलं मालकाने. मायना असा होता कि,
“ माझ्या माघारी कोकणात माझी दोन घर आणि चाळीस गुंठे जागा यात दोन विभागणी करावी. एक वरच्या रस्त्याच घर आणि वीस गुंठे जागा हि माझ्या सख्ख्या बायकोच्या नावाने करावी, तसेच खालच्या आळीतल घर आणि उरली वीस गुंठे जागा हि मिष्टीच्या नावाने करावी. आणि कधी तीच लग्न झाल तर तिच्या मृत्यूनंतरच ती जागा तिच्या नवऱ्याच्या नावे होईल. ती हयात असताना बळजबरी, करून तिच्या नवऱ्याला हि जागा आणि घर मिळणार नाही. तरी वरील मुद्दे माझ्या मर्जीने आणि पूर्ण शुध्दीत लिहिले गेले आहेत.”
बिपिन : नक्की मिष्टी कुणाची होती, मालकाची का अजिकेची ?
अजिके : अजीकेची.
बिपीन : मग मिष्टीच्या नावावर इतक सगळ करायचा संबंध काय कळाला नाही मला.
अजिके : अजीकेच्या मालकाच्या बायकोला मुल होणार नव्हत. आणि हे फक्त त्यालाच माहित होत म्हणून त्याने मिष्टीकडे असलेल्या एका “मोना” नावाच्या मुलीशी मिलन करून एक मुलगा वाढवला. आणि दत्तक घेतला. बायकोपासून लपवून त्याने ते बाळ मिष्टीकडे सांभाळायला ठेवल आणि ते बाळ म्हणजे तो मुलगा तीन वर्षाचा झाल्यावर दत्तक घेतला आहे मुल अस सांगून त्या मुलाला घरी आणल. पहिल्यांदा त्याच्यावर डोळा ठेवून असलेली बायको नंतर त्याच्यावर प्रेम करायला लागली. आणि एक मुलगा असताना पुन्हा कशाला विचार करायचा म्हणून त्यांनी स्वतःच मुल जन्माला घातल नाही. आणि त्या उपकाराची फेड म्हणून मालकाने मिष्टीला स्वतःच निम्म धन देऊ केल. शेवटी जे एक आई करू शकते ते सगळ मिष्टीने केल. आणि त्या बाळाला तीन वर्ष संभाळल वाढवल. आणि नंतर त्याच्या बायकोने. पण शेवटी जेव्हा कळत नव्हत ते बाळ हाताएवढ होत तेव्हा सांभाळण महत्वाच होत. म्हणून मालकाला मिष्टी महत्वाची वाटली. म्हणून त्याने तिला हे सगळ देऊ केल.
बिपीन : पण ते घर जमीन तिला मिळाली नाही, होणा ?
अजिके : तुला का अस वाटतय ?
बिपीन : कारण तिला घर मिळाल असत तर ती त्या माग बोळात राहिलीच नसती. आणि एवढ असताना ती कशाला धंदा करत बसली असती. म्हणून एक अंदाज लावला.
अजिके : बरोबर. तिला माहित नव्हत. हे. पण बायकोला आत्ता हे कळाल होत.
बिपीन : मग ?
अजिके : तर मग झाल अस कि ते मृत्युपत्र वाचून तिच्या भावाने तिला सांगितल कि तू दोन्ही वाटे स्वतःच्या नावावर करून घे. वकील बोलावला गेला. पण त्याने सांगितल कि अस होऊ शकतच नाही. मिष्टीवर जबरदस्ती करून तिचा नवरा घेऊ शकत नाही मग तुमचा तर कुठेच संबंध नाही. मग आता काय करायचं म्हणून गण्बा सांगतो कि, त्याच्या ओळखीचा एक गुंड आहे. त्याला सुपारी देऊन मिष्टीला मारून टाकू. आणि तीच संपली तर तिच लग्न होणार नाही आणि नवऱ्याचा पण संबंध नाही. कोण आडव येणारे ? आणि आपण हे पत्र जाळून टाकू. आणि अस ही मालकाची बायको एकच आहे आणि त्या म्हणजे तुम्ही. कशाला कोण विचारायला येईल ?
बिपीन : म्हणजे मिष्टीला मालकाच्या बायकोने मारल ?
अजिके : हो. तिकडून गुंड यायला निघाला हैद्राबादला. तो आला. आणि मिष्टी समजून त्याने मोनाला मारून टाकल. आणि जेव्हा पोलीस स्टेशनला त्याने कबुली दिली तेव्हा मिष्टीला सगळा घोळ कळाला आणि तिने एक दलाल होता त्याला सांगून ज्यादाचे पैसे देऊन मालकाच्या बायकोला मारून टाकायची सुपारी दिली.
बिपीन : मग ती मेली ?
अजिके : मिष्टी वाचली पण मालकाची बायको नाही. मारणारा हि फरार झाला आणि बातमी दोन दिवसाच्या वर टिकली नाही. आणि कोकणातली सगळी जमीन मिष्टीने तिच्या नावावर करून घेतली.
बिपीन : मालकिणीच्या पण वाट्याची का ?
अजिके : हो.
बिपीन : मालकिणीला जमल नाही आणि हिला कस जमल ?
अजिके : ओळख आणि पैसा. आपली ओळख असेल ना तर पैसा दाखवल त्याच्याकडे आपला कायदा बघतो. त्यामुळे तिला काय अवघड गेल नाही.
बिपीन : आणि मग पुढे ?
अजिके : मिष्टीला भेटायला म्हणून आलेल्या मालकिणीच्या भावाने आपल नाव बदलून तिला भेटला आणि एका त्याच धंद्यातल्या एका मुलीकरवी तिला पाण्यात विष घालून दिल. आणि म्हणून जेव्हा अजिके घरी आला. तेव्हा गरोदर न होण्याची मिष्टी गोळी खाऊन सोबत पाणी पिते. तेव्हाच तिला अजिकेकडे येताना चक्कर येत होती. पण तरी दम काढून ती त्याच्या जवळ गेली. त्याला बघितल आणि तिने जीव सोडला.
बिपीन : मग ?
अजिके : तिला अजिकेने रात्री माग अंगणात अग्नी दिली. आणि त्या आधी त्याने तिच्याशी लग्न केल.
बिपीन : मेलेल्या बाईशी ?
अजिके : हो. आणि....  


blog blogging hot news news india sex rape police case
( image by google )
०८

अजिके : आणि तिच्याजवळ झोपून त्याने तिला किस केल. तिच्या हाताला स्वतःच्या चेहऱ्यावर फिरवून तिचा स्पर्श साठवून घ्यायचा प्रयत्न तो करत होता. पण फक्त स्पर्श होत होता अजिकेला. जिवंत स्पर्श नाही. त्या स्पर्शात आपलेपणा नव्हता. अस वाटत होत आपणच आपल्याला स्पर्श करतोय. पण तरीही तिच्याकडे एकटक अजिके बघतो. ती शांत गाढ डोळे मिटून झोपलेली असते. तो तिच्या कपाळावरून, नाकावरून, ओठांवरून बोट फिरवतो. ओठांच्या आकारानुसार तो गोलाकार बोट फिरवतो. आणि जरासा पुढ सरकून तिला घट्ट जवळ घेतो आणि ओठांना किस करतो. तो जरासा थांबतो. त्याला वाटत आत्ता घेईल मग घेईल. पण ती त्याला जवळ घेत नाही. मग तसाच तो तिच्या शेजारी झोपून राहतो. म्हणायला फक्त ती जवळ होती. पण ना छातीची धडधड वाजत होती ना गरम श्वासाचा अनुभव मिळत होता. जणू एखादी गादी गुंडाळून त्याला जवळ घेऊन झोपावं तशीच अगदी निपचित पडलेली मिष्टी.
बिपीन : मग पुढे काय झाल ?
अजिके : त्याच्या प्रेमाला तिचा न मिळणारा प्रतिसाद पाहून शेवटी अजिके सकाळी कोणाला दिसायच्या आत एक त्रिकोणी मोठी होळी मांडतो. आणि त्यात मिष्टीला झोपवतो. आणि काही कार्य न करता. डोळ्यातल पाणी अडवून डोळ्यात पाणी आणू न देता तेलात भरलेल्या लाकडाला आग लावतो. सकाळी अकरा वाजता उन पडल आहे. आणि हा असा भर उन्हात शेकोटी जवळ का बसला आहे ?  असा प्रश्न मागच्या बोळकांड्यातल्या काही तीन चार लोकांना पडला. पण उत्तर मिळाल नाही. संध्याकाळी सातला मिष्टीची राख घेऊन तो तिथल्या एका नदीपाशी गेला. त्या भांड्यातली निम्मी राख पाण्यात ओतून निम्मी घराच्या मागच्या अंगणात त्याने पुरून टाकली. संपल.
बिपिन : कथा संपली का ?
अजिके : नाही. सगळ संपल. आता काय उरलेलं ? अजिकेच्या आयुष्यात. एकटेपणा. प्रेमभंग. प्रेमाचा विरह आणि ? तो स्वतः एकटा. दुसऱ्यादिवशी त्याने मिष्टी मेल्याची बातमी माग कोठ्यात जाऊन सांगितली. आणि तिथल्या मुलिंना जायला सांगितल आपापल्या घरी. पण ज्यांना आई-बाप आपले कोण हेच माहित नाही तर त्यांना त्याचं घर काय त्याचं जन्मगाव तरी कस माहित असणार ? त्या तिथच थांबल्या. एकोणचाळीस मुली होत्या सगळ्या मिळून. मिष्टी बोलली नाही पण मनातल तिच्या हेरून घ्यायचं अजीकेला अगदी पक्क जमल. आणि त्याने तेच केल.
बिपीन : काय ?
अजिके : एकोणचाळीस मुलींची जबाबदारी अजिकेन उचलली. त्या मुलींना घरात रहायला जागा दिली. आणि आणि “राजाराम निवास” आता “अजिके कोठा” झाला. आधी पेक्षा जास्त गर्दी व्हायला लागली. आलेला पैसा सगळा मुलींना देऊन त्यातला थोडासा पुरेसा पैसा त्या मुली अजिकेला जबरदस्ती द्यायच्या. अस सगळ चालू असताना एक महिन्यांनी कोकणातून एक वकील आणि दोन माणस आली. त्यांनी घराची हालत बघितली. मिष्टीची विचारपूस करताना त्यांना समजल कि ती जिवंत नाही आणि अजिके तिचा नवरा आहे. आणि म्हणून अजिकेच हे घर आणि मिष्टीच्या नावावरच कोकणातल घर आणि वीस गुंठे जागा अजिकेच्या नावावर झाली. त्या काळात इतकी जागा आणि घर म्हणजे करोडपतीची लक्षण. घोड्याला साफ करणारा एकेकाळचा अजिके आता धनवान झाला. पण त्याच त्याला सोयरसुतक नाही. मिष्टीच लागलेलं सुतक सुटण्याआधीच त्याला हे इनाम मिळाल होत. जमीन घर सगळ नावावर झाल. ती लोक निघून गेली. रोजचा कोठा सांभाळत असताना, अजिकेला दारूची नशा लागली. एकदाची गोष्ट आहे, मला चांगल आठवतय रात्री आठ-नऊ वाजता अजिके दारू पिऊन घरी जाताना तो वाटेत पडला. दारू अति झालेली म्हणून.
वाटेत एक घर होत. त्या घरात कबिता नावाची एक मुलगी राहत होती. ती घरी जाताना तिला अजिके दिसला. चेहऱ्यावरून तर श्रीमंत पण मनातून तुटून गेल्याचा भाव अजिकेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तिने दोन माणसाना बोलावून अजिकेला तिच्या घरी नेल. अजिकेला जाग आली तेव्हा त्याला कबिता दिसली. घारे डोळे पण निळ्या रंगाचे. मोठी केस. बंगाली पद्धतीची साडी नेसलेली. उंची अजिके इतकीच.
बिपीन : मिष्टीच वर्णन...आहे हे.
अजिके : दुसरी मिष्टीच. तिला काढव आणि हिला जोडाव अशीच. अजिके तसाच कशाचा ना कशाचा आधार घेत तिच्या जवळ गेला आणि तिला मिठी मारली. नशेत अस हि करू शकतो माणूस हे कबिताला माहित नव्हत. तिने अजिकेला सावरत केल. पण तो ऐकायला तयार नाही. नशेत असताना धड उभ राहायची ताकद नसताना सुद्धा कबिताला मिठी मात्र त्याने घट्ट मारली. आणि तिला हि त्या स्पर्शात नकळत प्रेम जाग झाल. तिने हि त्याला दुजोरा देत त्याला मिठीत घेतल. आणि इतक्यात.
बिपीन : इतक्यात ?
अजिके : मी पाणी पिऊन आलो.
बिपीन : सांगून जावा ना किंवा मला सांगा कुठ आहे पाणी मी आणतो.
अजिके : इथ पाणी नाही भरलेलं. मी पिऊन येतो.
बिपीन : पण सांगा न पुढे काय झाल ?
अजिके : बर, दार उघडून आत तिचा नवरा आला. आणि त्याने काही न विचारता काही जाणून न घेता तिला मारायला सुरुवात केली. या सगळ्यात अजिके तिथून कधी निघून गेला त्यांना कळाल नाही.
बिपीन : कबिताच काय झाल ?
अजिके : तिचा नवरा तिला घटस्फोट न देता आणि माहेरी तिला तीच कोणी नव्हत. दिसण्यावर खपलेली कबिता आता नवऱ्यासोबत एका ठिकाणी आली. आणि मार खाऊन काळीनिळी पडलेली कबिता एका खाटेवर झोपते तिला एक मुलगी इंजेक्शन देते कबिता झोपून जाते. नवरा एका माणसासमोर येऊन झालेले पैसे देतो. बदल्यात दुप्पट पैसे घेतो. आणि निघून जातो.
बिपीन : म्हणजे ?
अजिके : तो माणूस कबिताला दवाखान्यात नाही एका घरी आणतो. इंजेक्शन औषधाच नाही झोपेच दिलेलं असत. तो माणूस पैसे देतो ते काय बंदे पैसे घेऊन सुट्टे करून देत नाही तर कबिताला विकत घ्यायचे देतो. आणि ते घर-घर नाही अजीकेचा कोठा असतो आणि तो माणूस, दुसरा कुणी नसून स्वतः अजिके असतो.
बिपीन : काय ?

अजिके : हो. कारण तो माणूस या आधी अजिकेच्या कोठ्यावर दोन-तीनदा झोपून गेलेला असल्यामूळ त्याला माहित होत अजिके कोण आहे. आणि अशा माणसासोबत कबिताचे संबंध आहेत. तेही शारीरिक आणि तेही स्वतःच्याच घरात बनलेलं. हे बघून त्याने सरळ तिला अजिकेला विकून टाकल. आणि अजिकेन हि तिला विकत घेतल. आणि तिला कोठ्याची मालकीण बनवल.   


( image by google )
  
०९

बिपीन : मग पुढे काय झाल ?
अजिके : दोघांना प्रेम झाल.
बिपीन : वाह... लग्न केल का त्यांनी ?
अजिके : नाही.
बिपीन : का ?
अजिके : एक महिना व्हायला तीन दिवस उरलेले म्हणजे सत्तावीस दिवस झाले. कबिताचा नवरा कोठ्यावर आला. तेव्हा स्वतःच्याच बायकोला बघून त्याला रहावल नाही. आणि त्याने कबिताला परत घरी नेल.
बिपीन :  ती गेली ?
अजिके : जात नव्हती. पण अडवायला अजिके पण तिथ नव्हता. मग ती गेली. न सांगता.
बिपीन : मग ?
अजिके : “काश के खुदा दिल ना बना देता, प्यार कि बाते ना होती ना कोई बेवफा होता”. गेली ती पुन्हा एकट करून अजिकेला. आता मिष्टीच्या आठवणीत झुरायचं, रडायचं का कबिताच्या आठवणीत बसायचं काही काही कळत नव्हत. त्याने कोठा सोडून दिला. आणि त्याने कोकण गाठलं. मराठी भाषा येत नव्हती तिथ जाऊन शिकला. तिकडच्या घरी राहून त्याने बऱ्याच तोडक्या मोडक्या भाषेत मराठी कविता, हिंदी-उर्दू शायऱ्या लिहिल्या. कशा ते माहित नाही. पण सुचत गेल त्याला लिहित गेला तो. एक एक म्हणताना आठ पुस्तक शायरीची लिहिली अजिकेनी.
बिपीन :  शायरी... ऐकवा कि माहित असेल तुम्हाला तर.
अजिके : “ए बेवफा क्यू प्यार किया हमसे ? अकेले हि प्यार कर गये, अकेले हि चल बसे”.
बिपीन : वाह.. दर्द आहे.
अजिके : अजून खूप आहेत...
बिपीन : ऐकायला आवडतील.
अजिके : “चार दिन कि जिंदगी उसमे इक दिन किस्मत का वा हो जाना, तीन दिन तक प्यार करके फिर मेरा तबाह हो जाना”
“हर किसी के जिंदगी में प्यार होता है, मेरे जिंदगी में बस वो है प्यार नही.”
“जुर्माना है मुझे भरणा प्यार करने के बदले, जिसे देना है वही आशिक है पहले से”.
“दर्द में कहा मै जाऊं दुनिया में सब है, लेकिन मिष्टी तुम नही”.
“अक्सर बारिश में भीग जाते थे तुम वो भी अकेले, क्या पता था तुम्हे के अश्कों में भीगे हम भी थे.
“ए मेरे अश्क कभी बहना नही, टुटा दिल अक्सर बिखरता है, बहता नही”.
“के मेरे अश्क बिक गये वक्त के बाजार में, जो बाजार भर गया था औरोंके ख़ुशी से”.
बिपीन : स्पीचलेस.
अजिके : “लब्ज नही काफी इश्क बयान करने को, याद में उनकी आँख भर भी आयी, तो काफी है”.
बिपीन ; पुढे काय झाल ?
अजिके : माहित नाही. कोकणातून तीन महिन्यातच तो परत हैद्राबादला आला. कोठा तसाच सुरु होता. मग त्याने या चाळीत वरची खोली घेतली आणि तिथच रहायला लागला.
बिपीन : कोणती खोली ?
अजिके : जिथ आपण बसलोय.
बिपीन : अरे हा.. विसरलोच हि कथा ऐकता ऐकता. मग अजिकेन काय केल इथ ?
अजिके : फक्त एकांतवास, एकाकीपणा, एकटेपणा, अकेलापन बस एवढच अनुभवल.
बिपीन : मग या कथेला शेवट आहे का नाही ?
अजिके : कथेचा शेवट असो वा नसो. पण कथा हि कायम जिवंतच असते. प्रत्येक वाचनाऱ्यासाठी. आणि म्हणून या कथेचा शेवट पण मी जरी सांगितला तुला तरी तुझ्या डोक्यात आता मिष्टी, कबिता, अजिके असे शिरलेत जणू तुझ्या आयुष्यातली हि खरी पात्र आहेत. होणा ? मी बरोबर बोलतोय ना ?
बिपीन : हो. पण तरी याचा शेवट जाणून घ्यायची मला खूप इच्छा आहे.
अजिके : मिळतय म्हणून मुळांपासून खोडापर्यंत आणि तिथून अगदी फांद्यांसकट मिळवायची इच्छा तशी वाईटच. काही गोष्टीना आणि कथांना शेवट असू नये. आणि असला किंवा सापडला तर तो आपण शोधलेला आपल्याला सापडलेला हवा तर खरी मजा आहे.
बिपीन : म्हणजे ?
अजिके : शेवट याचा तूच शोध. अजिके तुझ्यासमोर आहे. बाकी तुझ्या विचारांच्या पातळीवर अवलंबून आहे कि नक्की अजिके तुला कसा कळाला आहे.
बिपीन : मग तुम्ही इतके वर्ष इथ चाळ सांभाळताय तुम्हाला माहिती नाही अजिके कुठ आहेत आत्ता ?
अजिके : शेवटच बघितलेलं एकदा. कधी ते आठवत नाही. आणि मी त्याला कुठ चालला हे विचारायची तसदी पण घेतली नाही. पण तो जिथ असेल तिथ आनंदी असेल.
बिपीन : त्यांची काय खुण, किंवा वर्ण, किंवा त्याचं वर्णन सांगता का मी शोधतो त्यांना. माझ्या कलीगला सांगून अजून माणस बोलावतो इथ आणि शोधतो इथ. त्यांना.
अजिके : शोधायला अजिके काय हरवला नाही.
बिपीन : हो मान्य आहे पण त्यांचा पत्ता, ठिकाण पण माहित नाही ना.
अजिके : शोध घे. मी निघतो. मला काम आहेत.
अजिके उठतो आणि निघतो. बिपीन त्यांच्या मागे जातो तोच,
अजिके : मागे येण्याची गरज नाही.
बिपीन : मला ते पुस्तक हव होत.
अजिके : कोणत ?
बिपीन : तुमच्या हातातल.
अजिके : कशाला ?
बिपीन : मला ते लोकांच्यात प्रसिध्द करायचं आहे.
अजिके : या पुस्तकाला शेवट नाही. आणि आपल्या भेटीला सुद्धा. घाई काय आहे.
अजिके निघून गेला ते पुस्तक घेऊन, “आज हि के दिन प्यार है”. बिपीन खुर्चीवर येऊन बसला. 


( image by google )
 १०

कलम से छुटी शायरी, कदम भर भी ना चल सके,
तेरी उफ़, तेरी आह पे युही ना सुलज़ सके,
ये तेरे प्यार के काबिल बना हु खुद, किसी और का साथ नही,
जिंदा हु मतलब खुश हु, ऐसी भी बात नही,
वही सुबह, वही रात है, मौसम बदले, वही अंदाज है,
रोज याद आए वो अपनी रात-ए-इश्क, तूने कहा था तब बस, “आज ही के दिन प्यार है...आज ही के दिन प्यार है’ |

बिपीन अजिकेच्या “आज हि के दिन प्यार है” पुस्तकाच्या मागच्या शेवटच्या पानांवरची शायरी आठवते. इतक्यात त्याला कॉल येतो.
बिपीन : बोल अलिशा ?
अलिशा : सर, मी इथ खाली चाळीपाशी आलीय. एकजण मला भेटले आहेत जे इथ चाळीची देखरेख करतात. त्यांना घेऊन आम्ही आपल्या कल्पना सांगितल्या. चाळीच्या ठिकाणी आपण कशी इमारत बांधणार आहे त्याची कॅड वर्जन फुटेज दाखवली आहे. त्याना ती आवडली.  बदल्यात त्याना एक वन.आर.के. द्यायचं ठरलेलं पण कपूर सरांनी वन.बी.एच.के. द्यायला सांगितल आहे. मग ते हि सगळ झाल. आता त्यांच्या फक्त सह्या राहिल्या आहेत. तुम्ही कुठ आहात ? तुमचा दीड तास झाला फोन लागत नव्हता. आत्ता प्रयत्न केला आणि लागला.
बिपीन : मी वर आहे. इथ अजिकेच्या रूममध्ये.
अलिशा : ती कुठ आहे ? एक मिनिट हा ह्यांना विचारते...
अलिशा : काका अजिकेची रूम कुठ आहे ?
चाळीचा रखवालदार : का ? ती कशाला हवीय खोली?
अलिशा : आमचे सर तिथ आहेत.
चाळीचा रखवालदार, अलिशा वर जातात. दार बंद असत. तो माणूस खिशातून चावी काढतो. आणि कुलूप उघडतो. आणि अलिशाला सांगतो हि अजिकेची खोली आहे. अलिशा बाल्कनीतून बघते इकड-तिकड पण बिपीन कुठ दिसत नाही. चाळीचा रखवालदार आत जातो सहज म्हणून तर आत बिपीन बसलेला दिसतो खुर्चीवर पुस्तक वाचत. बिपिनला कळत माग कुणीतरी आहे. तो उठतो आणि माग बघतो.
बिपीन : कोण पाहिजे ?
चाळीचा रखवालदार : तुम्हाला कोण पाहिजे इथ ?
बिपीन : मी बिल्डर आहे. इथ मोठी इमारत बांधायची आहे. मला अजिकेबद्दल कळाल म्हणून इथ आलो. इथ चाळीवर लक्ष ठेवणारे एक काका भेटले त्यांनी मला अजिकेबद्दल गोष्ट सांगितली तीच ऐकत बसलेलो. आत्ताच गेले ते पाच मिनिट झाली असतील. पण तुम्ही कोण सांगितल नाही.
चाळीचा रखवालदार : मीच तो चाळीवर लक्ष ठेवणारा.
बिपीन : काहीही काय.
चाळीचा रखवालदार : इथ.....एकच चाळ आहे आणि त्याचा मी एकमेव रखवालदार आहे.
बिपीन : मग मी कुणाला भेटलो ? आणि इतका वेळ कुणाशी बोललो.
अलिशा तितक्यात आत येते,
अलिशा : सर इथ काय करताय तुम्ही ?
बिपीन : मग तो दाढी वाढवलेला गोरापान माणूस कोण होता ? आणि माझ्याशी का बोलत बसला इतका वेळ ?  आणि इथून मागच्या बाजूने खाली जायला दरवाजा आहे का ?
चाळीचा रखवालदार : दरवाजा बाहेर जायला एकच आहे. जिथून आम्ही आत आलो. पण तुम्ही आंत कसे आला ?
बिपीन : का ?

चाळीचा रखवालदार : या खोलीची चावी माझ्याकडे होती. आणि आत्ता आम्ही ते कुलूप उघडून आत आलोय....

समाप्त.
या कथेतील सर्व कविता, शेरो-शायरी मी बनवलेली असून कुणीही ती आपल्या नावाने वापरू नये किंवा इतरत्र शेअर करू नये

5 टिप्पण्या