बायको.तुम्हाला एक खर सांगतो माझ लग्न झाल नाहीये. पण तरीही बायको म्हणजे काय हे मला माहित आहे. बायको म्हणजे ती, जी आपल्या आयुष्यात स्वताच आयुष्य मिसळून दुप्पट आयुष्य बनवते. आधी लहान मुलासारख ती मला जपते आणि नंतर आमच्या मुलांना. ती खूप सुंदर आहे. प्रत्येकाचीच बायको सुंदर असते. मुळात मुली या सुंदर असतात पण लग्नानंतर मात्र त्या सुरेख बनतात. तिची भरीव पाठ. कमनीय बांधा. ते रेखीव खांदे आणि त्याला साजेशे हात. डोळ्यात फक्त प्रेम दिसत. केस अशी कि सोडली तरी बांधली तरी निम्मी खाली निम्मि वर सोडली जरी दिसतात तिला शोभून. तिच्या स्पर्शान थकवा निघून जातो. तिच्या बोलण्यातून कायम आई सारखा आपले पणा भासतो.
ती भांडत नाही अस काही नाही. पण तिला माझ वागण पटत नाही म्हणूनच ती भांडते जेवण करते आणि मला जेवण आणून हि देते. आणि स्वत कमी जेवून स्वताला शिक्षा हि करून घेते. मी मुलांचा लाड केला तर मला आणि मुलांना एकसारखं ओरडते. म्हणूनच मग मुलांना आई चिडखोर आणि बाबा आपलेच आहेत अस वाटत. तरी कधी मुल झोपली कि तिच्याशी काही बोलताना ती प्रेमाच बोलत नाही. आई बाबा सासू सासरे सासर माहेर नणंद दीर यांचे टोमणे सांगत राहते. ती विसरून जाते मी तिचा नवरा आहे. मी विसरून जातो कि मी तिचा नवरा आहे. मित्रांसारख्या गप्पा संपवून कधी मी झोपून जातो. तिला कळाल कि  ती मला पांघरून घालून माझी कूस निट करून डोक उश्याशी निट टेकवते.
तरी पुन्हा तुम्हाला सांगतो माझ लग्न झाल नाहीये. पण तरीही बायको म्हणजे काय हे मला माहित आहे. दिवसभराच्या कामानंतर संध्याकळी घर प्रसन्न ठेवते. मुलांना नाष्टा देऊन क्लास ला नेऊन सोडते. मी यायच्या आधी अर्धा तास तरी घरात येऊन माझी वाट बघत बसते. दाराची कडी वाजली कि हातच काम टाकून धावत दाराशी येते. रोजच्या सारखा आज हि मी नेमका अचूक आठ वाजताच येतो तरी माझी बायको वेडी विचारते , “ आज काय जास्त काम होत का  ? उशिरा आलात ?”  आत कामची वेळच आठ पर्यंत आहेतर मला उशीर होईलच कसा पण ? तिच्या त्या वेड्या प्रश्नांना उत्तर न देता तिला जवळ घेऊन आत येत मी दार लावतो. आणि ती जाऊन पाणी आणते. घरात कोण नाही म्हणून प्रेम करायचा बहाणा शोधतो मी पण दोन मुलांचे पालक आहोत आपण अस म्हणून ती मला दूर करते. प्रेम करण माझा पुरुषार्थ आहे पण खर तिला प्रेम हव असत दोन शब्द प्रेमाचे बोलून.
ज्यात ऑफिसच काही नको असत. पैसे जमवण्याच टेन्शन नको असत. मुलांच्या भवितव्याचाही विचार नको असतो. बस तिला वाटत असत कि नवर्यान रोज तिला “खूप सुंदर दिसतीयस आज “ इतकच म्हणव आणि एका वर्षान मनान कमी व्हाव इतकच वाटत असत. अशी हि बायको....


लेखक : अजिंक्य भोसले.  

0 टिप्पण्या