एक छोटासा विचारती अनुजा. दहा वर्षाची एक मुलगी. आता तिच्यात अस काय असणारे ना भरीव स्तन ना सुटलेला खूबा. बस फक्त एक नाजूक हाडाची काड असलेली ती मुलगी. तरी तिच्याकडे बघताना लोक मुलगी म्हणून नाही तर तिला स्त्री मानून बघतात. किती मोठा आदर आहे ना हा. उगीचच महिला म्हणतात कि पुरुष स्त्रीला आदर देत नाही. कोण देत नाही प्रत्येक जण देतो. मग ती शाळेत जाणारी मुलगी असो कॉलेज मध्ये शिकणारी मुलगी असो तरुण मुलगी असो वा लग्न झालेली किंवा विधवा असो स्त्री म्हणूनच प्रत्येक जण तिच्याकडे बघत असतो.
आणि कस आहे शेवटी निसर्गाचा नियम आहे सौंदर्यकडेच माणूस भुलतो. मग तो निसर्ग असो वस्तू असो किंवा स्त्री असो. त्यांचं भुलन हा निसर्ग नियम आहे आणि सुंदर असणं हा एक मोठा शाप आहे. स्त्रीला हवं असत हळुवार तिच्या शरीरावर स्पर्शाने आलेख काढलेले तेही पुरुषाने. तिला हि भाग ( अवयव ) आहेतच कि पुरुषासारखे काही कमी काही जास्त. तिला नाजूक ओठ आहेत पुरुषाला पण आहेत पण ओठांखाली दाढी वर मिशी आहे बस एवढाच फरक. तब्येत असेल पुरुषाला तर उभारलेली छाती आहे त्याला स्त्रीला हि स्तन आहेत फरक इतकाच कि त्याची छाती दगडागत कठीण आणि तिचे स्तन मऊशार आहेत.  दोघांना हि केस आहेत त्याची थोडी अगदी कानापर्यंत आणि तिचे तिथून खाली वाट्टेल तितके मोठे आहेत. तिला हि मांडया आहेत आणि पुरुषाला पण. पण मांड्यांच्या मधील लिंग फक्त भिन्न. तर अस जर बघितलं आपण तर वेगळेपणा जास्त नाही आपल्यात आणि स्त्री मध्ये तरीही चढाओढ असते पुरुषाची स्त्रीला मिळवण्याची. ती नाही भेटली तर तिच्यावर बलात्कार करायची.
स्त्रीला वाटत पुरुषाने तीच्या शरीरावर स्पर्शाचा आलेख काढावा हळूवार तिच्या शरीरावर ताबा मिळवावा प्रेम करावं पण पुरुषाला घाई असते तिच्या मांडीत घुसण्याचा. प्रेम बदनाम नव्हतंच कधी ते केलं गेलंय.
तर अनुजा जेव्हा दहा वर्षाची होती काहीच नव्हतं तिच्यात तरी मोठी लग्न झालेली माणस तिच्याकडं बघायची. जो तो आपल्या मानसिकतेने. मग ती पंधरा वर्षाची झाली. मासिक पाळी आली तिला पहिल्यांदाच. त्यात सुटलेले स्तन आणि आईच्या आग्रहास्तव घातलेले तिने पंजाबी ड्रेस यात कितीही छातीवर ओढणी घेतली तिने तरी स्तन लपतात का कुठे स्त्रीचे? आणि अगदी लपले तरी माणसाच्या कु-बुद्धीने दिसतातच त्याला. मग छातीवरची ओढणी सावरत, मागून वर उडणाऱ्या टॉपचा भाग सांभाळत रस्त्याने अंग चोरून चालणाऱ्या अनुजाला तिच्याकडे रोखून राहिलेले डोळे दिसत होते पण ती मात्र स्वतःची नजर चोरून रस्त्याने वावरत होती. इतके दिवसात तिला बघणारे खूप जण होते पण आज तिने पहिल्यांदाच  मेकअप केलेला, कार्यक्रमाला जायला. फौंडेशन चा थर चेहऱ्यावर मस्कारा डोळ्यांवर लाल लिपस्टिक ओठांवर गुलाबी अनारकली पायात खड्यांचे सॅंडल आणि गळ्यात दोन तीन गळ्यातली हातात बांगड्या आणि नाकात नथ हे सगळं घालून ती बाहेर आली आणि आज तिच्याकडे बघणारे पहिल्यांदा तिचा खूबा आणि छाती सोडून तिला बघत होते. आणि सगळ्यांची मानसिकता बदलली. आता रोज तिच्याकडे म्हणजे फक्त बाजूने छातीकडे बघणारे आता येता जात तिला संबंध वर खाली बघत होते.
मोठ्यांनी तिला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने बोलवलं बोलायला आणि जवळून तिला बघायला बहाणा केला. तिच्या वयाच्या मुलांनी गाड्या घेऊन तिच्या माग माग जाण सुरु ठेवलेलं. आणि यातून एक दिवस एकाने तिला विचारलं प्रेमाबद्दल ,नाहीतर मी जीव देईन असा दम दिला स्वतःची इज्जत त्याचा जीव अस दोन्ही वाचवायला तिने होकार दिला आणि मग रोज एक जण तिला हीच धमकी देऊन त्रास देऊ लागला. घराबाहेर पडणं तीच मुश्किल झालं तीच जेव्हा तिला तिच्या बापाच्या वयाच्या माणसाने प्रेमासाठी विचारलं. हि आहे आपली मानसिकता. कुणी सुटलं नाही यातून. प्रत्येकाला कुणी ना कुणी आवडते आजकाल त्याला क्रश अस म्हणतात पण असतो आपला क्रश कुणी ना कुणी लहान मुलगी मोठी मुलगी विधवा किंवा लग्न झालेली बाई. आणि या क्रश म्हणजे प्रेम मिळवायला आपण अपुरे पडलो किलो होतो चुकून बलात्कार चालत तेवढं होणं? कारण चोरी मारी दरोडा टाकला तर शिक्षा होते मारामारी झाली जातीवाचक शिव्या दिल्या तर ऍट्रॉसिटी लागते पण बलात्कार झाला तर फक्त दोन दिवस पेपर ला नाव आणि नन्तर महिनाभर जेल नन्तर दुसरा बलात्कार होतो आणि मग पहिला गुन्हेगार कधी जामिनावर सुटतो या कानाच त्या कानाला कळत नाही.

लेखक : अजिंक्य अरुण भोसले 

1 टिप्पण्या