तीन वजा एक
भाग ०१
सारिका : ‘अंधाराने अंधाराचा खून केला. ऐकलय का कधी ? नाही ना. त्याला हवा असतो “प्रकाश”. खूप नाही किंचितसा हि पुरे. अगदी चार भिंतीत गुदमरलेल्या अंधारात घट्ट बंदिस्त दरवाज्याला या कोंदट अंधाराने तड जावी आणि त्यातून किंचितसा प्रकशाचा कवडसा आत यावा आणि अंधाराशी लगट करून त्याने अंधाराला स्वतःच्या प्रेमात पाडाव हेच तर नाविन्य आहे प्रेमाच’.
अवधूत : पण प्रकाश अंधाराची लगट तू म्हणतेस ते प्रेम अस किती वेळ करणार ?
सारिका : जोवर जगात मुक्त-स्वतंत्र प्रकाश आहे आणि कुठेतरी असा कोंदट-गुदमरलेला अंधार आहे. तो पर्यंत हि “प्रेमकथा” चालणार...
अवधूत : मान्य.....मानल मी. पण ? प्रकाश पण रात्रीचा मावळतोच ना आणि तू जो प्रकाश म्हणतीयस तो प्रकाश अर्थातच नैसर्गिक आहे हो ना ?
सारिका : हो.
अवधूत : मग ?
सारिका : मग त्यात दुःख कसल ? खऱ्या आयुष्यातही कुठ कुणाला खर प्रेम, पहिल प्रेम मिळत ? फक्त कल्पना करायची. ती अनुभवायची. कुणाच्यातरी फसव्या वागण्याला प्रेम समजायचं. आणि ती व्यक्ती आपल्या नाशिबातच नव्हती असा विचार करून आपल्या आयुष्याला कोसत बसायचं. ‘हे म्हणजेच आजकालच प्रेम ना?’
अवधूत : चुकतेयस तू. खर प्रेम मिळतच नाही अस म्हणणारे खोट्या लोकांवर खर प्रेम करून बसलेले असतात. बेन्टेक्स वर सोन्याच पाणी चढवल तर तो दागिना चकाकेल. नंतर-नंतर ती चाकाकी उतरेल. त्यावर हिरवे थर चढतील. आणि त्वचेवर ? काळे डाग उटतील. जे सहसा जात नाहीत. असच आहे ते, खोट्या प्रेमाला खर मानून प्रेम केल तर त्याचा खोटेपणा नंतर उघडा पडतो आणि नंतर त्याची जखम खोलवर मनात उतरते.
सारिका : प्रेम करण आपला हक्क आहे ?
अवधूत : अर्थात... सर्वांचाच आहे.
सारिका : मी केलय.
अवधूत : अरे...वाह..!
सारिका : मग ते प्रेम मिळवण माझा हक्क आहे ?
अवधूत : हे विचारण झाल का ? तो तर जन्मजात हक्क आहे.     
सारिका : मग तो हक्क मला हवाय.
अवधूत : कसा ?
सारिका : मला तुझी साथ. तुझ प्रेम. आणि तू पाहिजेस.
अवधूत : तू समजतेस तसा मी नाही.
सारिका : समज आणि सत्य या पलीकडे प्रेमाचा विचार आहे. तो मी केलाय तुझ्याबाबतीत. तू म्हणालास ना. मग दे मला माझा हक्क.
अवधूत : मी जे सांगेन त्याने तुझ्या मनात माझ्याविषयी वेगळा अर्थ तयार होईल. माझ्याबद्दल आणि प्रेमाबद्दल पण. तुझ्यासोबत रहायला आवडेल मला. पण मित्र म्हणून. कारण तू खूप सुंदर आहेस तितका मी नाही. तू समंजस आहेस तितका मी नाही. तू...
सारिका : आणि तू  जसा आहेस तसा कुणीच नाही. संपली तुलना तुझ्या-माझ्यातली. उत्तर दे आता.
शांतात संपली. गोंधळ, सुरु झाला. सारिका आणि अवधूत दोघे बस मध्ये बसलेले होते. बस रस्त्याने चाललेली. या दोघांच्या बोलण्याने कुणाला फरक नव्हता पडत आणि या दोघांना दुनियेच्या आवाजाने काही फरक नव्हता पडत. कुणाच त्यांच्याकडे लक्ष नव्हत. पण या दोघांना मागच्या सीटवर बसलेला अजिंक्य मात्र बघत होता.  

भाग ०२
सारिका : मला तू सांगितल नाहीस तुझ्याबद्दल जास्त.
अवधूत : ए काहीही काय ? सांगितल तर आहे सगळच.
सारिका : तस नाही. तुझ्याबद्दल सांगितलस पण तुझ्या बायकोबद्दल सांगितल नाहीस.
अवधूत : भूतकाळात रमायला मला आवडत नाही.
सारिका : का ?
अवधूत : मन वर्तमानात रमत पण हल्ली भूतकाळात उदास-उदास वाटत.
सारिका : मी आहे ना सोबत. उदास मन तेव्हाच होत जेव्हा कुणी आपल्यासोबत नसत. आहे मी सोबत. सांग ना. जास्त नाही जरा पण चालेल.
अवधूत : ती.... माझी बायको. पण मी तिचा नवरा नाही.
सारिका : म्हणजे ?
अवधूत : मी तिचा नवरा व्हाव अस माझ्यात काही नव्हत आणि नाहीये. तुझ्याबाबतीत पण तेच होणार आहे. मी तिच्या गरजा भागवू शकलो नाही. तिला सुख देऊ शकलो नाही वस्तूंच्या सुखापासून शरीरसुखापर्यंत काही एक नीट तिला हव तस देऊ शकलो नाही. कुंडीतल झाड वाढत असत जोवर त्याला रोजच्या रोज पाणी मिळत असत. पण पाणी मिळायचं बंद झाल कि झाड सुकायला लागत. सुकलेल झाड पुन्हा हिरवगार होईल का ?
सारिका : कस बर होईल. मेलेलं असेल ना ते सुकून.
अवधूत : हम.. आमच नात असच सुकलेल. माझ्यामुळ. आणि मीच त्याला तजेलदार बनवायचा प्रयत्न करत होतो पण नाही जमल ते मला.
सारिका : मग ?
अवधूत : मग काही नाही. ते नात टिकवता आल असत तर आज मी असा एकटा तुझ्यासोबत बसलो नसतो.
सारिका : खूपच नालायक होती तुझी बायको. खूप राग आलाय मला तिचा.
अवधूत : ती खूप चांगली होती. मी नाहीये.
सारिका : ती सोडून गेली तुला तरी तू अजून तिचच कौतुक करतोयस. का ?
अवधूत : कुणाच्या माघारी त्याला बदनाम करण म्हणजे जगाचा हा नियमच आहे. पण ज्याच्या मागे आपण स्तुती, कौतुक करतो तिथ जगाचा नियम नाही आपल त्या व्यक्तीबद्दलच प्रेम असत. आणि मला वाटत प्रेम दोघांच्यातल संपत नाही कधी. ती आणि मी सोबत नसलो आत्ता तरी ती कुणावर प्रेम करतच असेल कि आणि...
सारिका : आणि तू ? कुणावर करतोयस ?
अवधूत : प्रेम संपत नाही नात हि संपत नाही. मुळात नात हे बनलेलं असत कधी न तुटण्यासाठी. तुटल तरी प्रेमळ शब्दाने, समंजस वागण्याने पुन्हा जोडलं जात ते.
सारिका : अगदी बरोबर. मग मला सांग तुझ लग्न झालय. घटस्फोट झालाय. मग नक्की तुझ वय किती आहे ?
अवधूत : एकतीस.
सारिका : वाटत नाही. तुझ अस हे बोलन ऐकून पन्नास, साठ वर्षाचा वाटतोस. आणि तु माझ्या जवळ बसलास कि आतून मला जाणवत तू वीस-बावीस वर्षाचा अल्लड नुकताच वयात आलेला मुलगा आहेस.
अवधूत : वाटण ही पण एक कल्पनाच आहे. मला हि वाटलेलं कि तुझ अफेअर सुरु असेल बाहेर. पण तू तर सिंगल आहेस.
सारिका : कोण बोलल मी सिंगल आहे ? माझ अफेअर नाही ? तुझ्यासोबत फिरतीय मी. तुझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करतीय. आता राहिलंय काय ?
अवधूत : काय ?
सारिका : तुझा होकार रे. मग हि सिंगल मिंगल होणार.
अवधूत : बर.
सारिका : तुझा आवडता रंग कोणता ?
अवधूत : आधी तुझा सांग.
सारिका : काळा.
अवधूत : अंधारररर.
सारिका : हो. एकदम गडद अंधार. तुझा ?
अवधूत : पांढरा.
सारिका : एकदम प्रकाशासारखा.
अवधूत : हो. आवड जुळली आपली. मगाशी बोललो त्यानुसार अंधार-प्रकाशची प्रेमकथा. हाहा...
सारिका : आपली पण शोभेल प्रेमकथा.
अवधूत : हम. तू तशी खूप मोठ मोठ बोलतेस. छान वाटत ऐकायला कधी कधी मीच शिकतो तुझ्याकडून बरच काही.
सारिका : अनुभव सोबतीला इतके आहेत कि. सुचत बोलायला. हा पण मी अस ठरवून बोलत नाही बर का. अपोआप येत तोंडात ते शब्द ती वाक्य.
अवधूत : मी अस कुठ म्हणालो का ?
सारिका : नाही पण तुला वाटायचं तस. मी तुझी कॉपी करतेय किंवा तुला इम्प्रेस करायला अस बोलतीय तर तस काही नाही.
अवधूत : नाही ग.    
दोघांजवळ कंडक्टर येतो. तिथल्या दांड्याला हातातल्या तिकिटाला कापणाऱ्या कटरने वाजवत बोलतो.
कंडक्टर : आला राजवाडा.
अवधूत आणि सारिका जागचे उठतात. मागे सीटवर टपून बसलेले तीन लोक त्यातले दोघच त्या दोघांच्या रिकाम्या सीटवर जाऊन बसले. तिसरा पुन्हा कुणीतरी उठण्याची वाट बघत बसतो. अवधूत सारिका सोबत अजून एकजण उतरतो. तो अजिंक्य असतो. आणि तिसरा उभा राहिलेला अजिंकुयाच्या रिकाम्या सीटवर जाऊन खुशीत बसला.
अवधूत : तू काही खाणार का ?
सारिका : खायची नाही बोलायची भूक लागलीय मला. अगदी खूप जास्त.
अवधूत : बोलण तर होतच राहणार आहे आपल. जोवर दोघ एकत्र आहोत.
सारिका : हो. पण आत्ता एकत्र असलेला वेळ हा असा कुठ खाण्यात किंवा फिरण्यात घालवण मला पटत नाहीये.
अवधूत : बर घरी जाऊ आपण माझ्या.
सारिका : चालेल.
तेवढ्यात शेजारून जाणारी रिक्षा दोघांशेजारी थांबते. रिक्षावाला विचारतो ‘कुठ जायचंय’. अवधूत ‘शनिवार पेठ’ सांगतो आणि दोघ रिक्षात बसले.
सारिका : आपल्याला आज भेटून किती दिवस झाले ?
अवधूत : सात दिवस.
सारिका : आणि त्यात मला तुझ्यावर प्रेम झाल. विश्वासच बसत नाहीये मला.

रिक्षा चालवणारा समोरच्या आरशातून मागे सारीकाकडे बघतो. 
भाग ०३
अवधूत आणि सारिका दोघे घरात आले. सारिकाला घर ओळखीच झालेलं. ती आत आल्यावर डावीकडे वळाली आणि चालायला लागली. सोबत असलेला एक जड श्वास लांब जाताना ओळखून अवधूत बोलला,
अवधूत : पाच नाही ग चार पावलं. ती खुर्ची चांगली आहे. पुढची मोडकळीला आलीय.
सारिका : मग अशा ठेवायच्याच कशाला ?
अवधूत : सगळच चांगल असल तर वाईटाची आठवण कशी बर राहील. वाईट पण समोर असेल तर चांगल्यात माज कमी येतो ना म्हणून.
सारिका : हम. लॉजिक चांगल आहे.
अवधूत : जेवणार ?
तेवढ्यात दार वाजलं.
अवधूत : तू बस मी बघतो.
अवधूत दाराजवळ गेला. दार उघडल. एक बाई आलेली तिच्याकडून डबा घेतला. ती बाई बाहेरून दार ओढून घेते. अवधूत आतून कडी लावतो.
अवधूत : डबा आलाय. खाणार का सोबत ?
सारिका : भूक नाहीये आत्ता.
अवधूत : बर मग मी पण.. नंतर खातो.
सारिका : चालेल.
अवधूत टेबलाजवळ जातो. त्यावर डबा व्यवस्थित ठेवतो. सारिका जवळ येऊन समोर तिच्या खुर्ची ठेवतो.
सारिका : अवधूत... तू गप्प का ?
अवधूत : तुझा हा सहवास  मी माझ्या या डोळ्याने अनुभवतोय. मी डोळे बंद करून तुला बघतोय. माझ्या या गंभीर ओठांना जरास ताणून स्मितस हसून तुला पाहतोय. तुझ्या या सेंटच्या वासाला माझ्या नाकाने सर्दी जशी वर-वर ताकदीने ओढावी तसा श्वास घेत मी या वासाला मी माझ्या नाकात साठवतोय. हाताची हि थरथर मनाला स्वस्थ बसू देईना मला. एक स्पर्श व्हावा तुझा मला हि अपेक्षा असेल या हाताची बहुतेक.
सारिका : आणि तुझ मन काय म्हणतय ?
अवधूत : तुला मिठीत घ्याव.
सारिका : मी तुझ्या मिठीत यायला आपल अस नात काहीच नाही.
अवधूत : हो.
सारिका : काय हो ?
अवधूत : नाही.
सारिका : काय नाही ?
अवधूत : अग म्हणजे आपल काही नात नाहीये.
सारिका : हो तेच म्हणतेय मी. तू माझा शिक्षक आणि मी तुझी विद्यार्थिनी आहे. लक्षात असु दे.
अवधूत : आहे म्हणूनच आपल्यात काही नात नाहीये. अजून तरी.
सारिका : बनवायचा काही विचार आहे ?
अवधूत : कळत नाहीये.
सारिका : एक सांगू ?
अवधूत : हो.
सारिका : प्रत्येकालाच आपण सुंदर वाटतो. पण मी मला कशी वाटते ? ऐक. विचार कर आणि मग ठरव. तुला मी हवी कि नको. बाबा म्हणतात, माझे डोळे खूप छान आहेत. फिकट पिवळसर. आई म्हणते, मी खूप गोरीपान आहे. म्हणजे माझे बाबा सावळे आहेत आणि आई गोरीपान. मग सगळे बोलतात मी आईवर गेलीय. माझी बहिण आहे प्रियाली, तिला माझे केस आवडतात. म्हणजे रविवारची मी कधी केस धुतली कि कायम बोलते, मी देवाकडे प्रे करत असते रोज कि माझी पण अशीच केस होऊ दे. ती कुणा-कुणाच ऐकून सतत शांम्पू लावत असते वेगवेगळे. मी आहे ५.६ फुट उंच. माझ्या हाताचा स्पर्श मला मऊ लागतो. मी जाड नाही, बारीक पण नाही. मी आहे ती ठीक आहे. माझी छाती भरलेली आहे. खांद्याचा उतार इतर मुलींसारखा आहे. म्हणजे मी आडव्या हाडाची नाही. माझ्या ओठांना बघून एका मुलाने मला तुला कीस करायचं आहे अस सरळ तोंडावर बोललेला. पण मी त्याला खूप सुनावलं. परत तो काही आला नाही समोर. हे झाल माझ पण तुला मी कशी वाटते ? दिसते ? मला ऐकायचं आहे.
शांतात.
सारिका : अवधूत ?
अवधूत : तू कशी आहेस या पेक्षा तू काय आहेस ? अनुभवातून मला जाणून घ्यायचं आहे.
सारिका : हो. चालेल.
मोबाईल वाजला तिचा. तिने कानाला मोबाईल लावला.
बाबा : बेटा किती वेळ लागणार आहे तुला ?
सारिका : हो सूटणार आहे एका तासात.
बाबा : मी कॉल करेन.
सारिका : चालेल.
अवधूत : आपण करतोय ते चूक आहे का ग ?
सारिका : केल काहीच नाहीये. म्हणजे अजून तरी.
अवधूत : तस नाही. म्हणजे मी एकतीसचा आणि तू बावीस. तू माझ्याकडे शिकायला येतेस. मी तुला शिकवतो. पण हे बरोबर वाटत नाही.
सारिका : मला तुमची गरज आहे. तुमच्या जगात तरी निदान मला जागा द्या.
अवधूत : हो सारिका... पण मित्र बनून पण जगता येईल ना ?
सारिका : मैत्री वर माझा विश्वास नाही.
अवधूत : का ?  
भाग ०४
सारिका : लहानपणापासून मी ज्याच्याशी पण मैत्री केली. तो माझ्यापासून लांब गेला. का ते माहित नाही पण. मी प्रत्येकावर जीव लावते. त्याला आपल मानते. पण मला कोण त्याच मानणार भेटलच नाही. प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली कि ती सहा महिन्याच्या आतच मला सोडून जाते. माहीत नाही का. आणि सहाच महिने का पण जातात लांब. इतके लांब कि समोर असतात. पण जवळ नसतात.
अवधूत : होत अस क्वचित. एकावरून सगळ्याची नाही तुलना होत.
सारिका : एक असत तर मानल असत. इथ एक नाही प्रत्येक जण आहे.
अवधूत : आपल्या ओळखीला सात दिवस होतील आज.
सारिका : हो. असेच रोज भेटत, बोलत राहिलो तर सात दिवसाचे सात महिने होतील आणि त्या वेळेस मी एकटी असेन. तू नसशील सोबत.
अवधूत : अस थोडीच आहे. आणि असच जर का असेल ना तर मी वचन देतो तुला मी तुझ्यासोबत हि मैत्री टिकवून दाखवतो. सहा महिन्यांपेक्षा जास्त.
सारिका : किती सात महिने का ?
अवधूत : नाही. आयुष्यभर.
सारिका : बर.
अवधूत : बर. तुझा एवढाच फक्त प्रोब्लेम आहे ना.
सारिका : हो. म्हणून मला माणसांशी सलगी, मैत्री करायला भीती वाटते. कारण प्रेम फक्त मीच करते. बदल्यात एकटेपणा त्रास दुःख मिळत ते मलाच.
अवधूत : तू म्हणतेस तुझ माझ्यावर प्रेम आहे.
सारिका : हो आहे.
अवधूत : मी पण तेच बोललो तर आपल लग्न होणार नाही. हे हि तूला माहित असेल.
सारिका : का आपल्या वयातल अंतर कि तुझ आधीच झाल लग्न आणि घटस्फोट ?
अवधूत : तिन्ही कारण. आणि चौथ आपली जात.
सारिका : मी इथेच राहीन. घरी जातच नाही.
अवधूत : अस म्हणायचं असत नुस्त. बघ आता तासाभरात तुझ्या बाबांचा कॉल येईल तुला.
सारिका : हो.
अवधूत खुर्ची पुढे सरकवतो. मांडीवर ठेवलेले हात तिचे आपल्या हातात घेतो. दोघांचे डोळे मिटलेले. दिवसा-ढवळ्या भर उन्हाच दुपारी अस अंधारून आलेल. त्याने तिला जवळ ओढण्याचा बहाणा केला. त्यासरशी सारिका उठून त्याच्या मांडीवर जाऊन बसली. डोळे अजून हि बंदच होते. दोघांचे श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर गरम हवा घेऊन फिरत होते. आणि त्या थंड खोलीत पंख्याखाली पण दोघे गरम अंगाचे झालेले. आणि त्याच गरम ओठांनी त्याच्या गरम ओठांना तिच्या त्याने अस अलगद पकडल. काय झाल ? माहित नाही. काय होतय ? कळत नाही. कळतय इतकच दोघांना कि आता आपल्या ताब्यात हे आपल शरीर नाही. खुर्ची जराशी कलायला लागली. तरी त्याने तिला सावरल. आणि तिला मिठीत पकडल. त्याचे ओठ तिच्या गळ्याला ओले करत होते. तिचे ओठ त्या स्पर्शाने अगदी कोरडे होत चाललेले. त्याने एका हाताने तिच्या पाठीवर घट्ट पकडून ठेवलेलं. दुसऱ्या हाताने तिची भरलेली छाती दाबायला सुरुवात केली. तिला आता राहवेना. काय बोलाव तर शब्द सुचेना. ताकदीनिशी तिने त्याच्या मनगटाला पकडून छातीवरून त्याचा हात बाजूला केला. तरीपण पुन्हा हात तो तिथेच गेला.
सारिका : अवधूत...
अवधूत तिच्या गळ्याला कीस करत खाली छातीपर्यंत येत,
अवधूत : हम ?
सारिका : आय लव्ह यु.
अवधूत : आय लव यु टू.

आता आठ दिवसांपूर्वीची गोष्ट.......
भाग ०५
सकाळी बरोबर नऊ वाजता स्वारगेटच्या गेट समोर जे ज्यूसच दुकान आहे तिथ सारिका आणि तिचे बाबा ज्यूस पीत उभे आहेत. एक माणूस रस्ता पार करण्याच्या लगबगीत अर्ध्या रस्त्यापर्यंत येतो तोच सिग्नल सुटला आणि पुन्हा ते मागे सरकले. लांबूनच त्यांनी हात वर केला. त्या सरशी इकडे सारिकाचे बाबा त्यांना बघून हात वर करतात. सिग्नल पुन्हा लागला आणि तो माणूस रस्त्याच्या इकडे आला.
सारिकाचे बाबा : काय इकड कसे काय तुम्ही ?
इनामदार : तुम्ही इकड काय करताय ?
सारिकाचे बाबा : आलेलो जरा इकड पाहुण्यांकडे. आता चाललो परत सातारऱ्याला.
इनामदार : सारिका आहे का बरी ?
सारिका : हो.. काका.
सारिकाचे बाबा : तुम्ही काय इकडच राहिलात का ?
इनामदार : हा येणार आहे शनिवारी तिकड.
सारिकाचे बाबा : चालतय. या..या..
इनामदार : बर ते सारिकाला गाईड करणारा हवा होता ना कोणीतरी ? मला आमच्या मिसेस बोलल्या.
सारिकाचे बाबा : हो. आहे का कुणी साताऱ्यात ? म्हणजे कस तिथल्या तिथ जमेल. सातारा पुणे नको वाटतो प्रवास.
इनामदार : शनिवार पेठेत आहे बघा एक. अवधूत काळे. खूप शिकलेले आहेत ते. त्यांची व्याख्यान होत असतात मुंबईत, पुण्याला, नाशिकला. आणि सारिका तिथ एक दोन-तीन दिवस त्यांच्याकडे गेली ना एकदम नीट होईल. तिच्या डोक्यातले सगळे निगेटिव्ह विचार हि जातील.
सारिकाचे बाबा : मला पत्ता सांगा पूर्ण. नंबर आहे का त्यांचा ?
इनामदार : नंबर आहे बघा. एक मिनिट हा.
इनामदार खिशातून बटणाचा मोबाईल काढून त्यातून एक नंबर शोधतात. आणि सारिकाच्या बाबांना नंबर सांगतात. सारिकाचे बाबा तो नंबर टाईप करून कॉल लावतात.
अवधूत : हेल्लो.
सारिकाचे बाबा : नमस्कार.. अवधूत सर बोलतायत का ?
अवधूत : हो आपण कोण ?
इनामदार सारिकाचे बाबांना खुणावतात. सारिकाचे बाबा त्यांना मोबाईल देतात.
इनामदार : हेल्लो. अवधूत सर. मी इनामदार बोलतोय. बँकेत कॅशियर आहे बघा. आठवल का.
अवधूत : अहो काका बोला. ना.
इनामदार : नंबर घेतला होता तुमचा तेव्हा. तो तसाच होता. आमचे एक मित्र आहेत त्यांच्या मुलीला डिप्रेशन आलंय. त्यातून ती सावरली नाहीये अजून म्हणावी तशी. तर म्हंटल तुमच्याकडे तिला पाठवाव. आहात का तुम्ही साताऱ्यात ?
अवधूत : आहे ना. इथेच आहे सध्या. नाव काय म्हणालात मुलीच ?
इनामदार : सारिका. बावीस-तेवीस वर्षाची आहे.
अवधूत : चालेल. तिच्या पालकांना तिला घेऊन उद्या पाठवा माझ्याकडे.
इनामदार मोबईलवर हात ठेवत सारिकाच्या बाबांना विचारतात,
इनामदार : ते उद्या बोलावतायत. तुम्ही साताऱ्याला कधी जाणारे ?
सारिकाचे बाबा : हे काय आत्ता.
इनामदार मग  : आज भेटताय का संध्याकाळी ? त्यांना परत वेळ असला नसला. आपल एकदा धडकून या त्यांना पटल तर बघा नाहीतर सोडा.
सारिकाचे बाबा : चालेल विचारा आज वेळ आहे का  त्यांना ?
इनामदार पुन्हा कानाला मोबाईल लावतात.
इनामदार : हा. ते म्हणतायत आज आहे का वेळ तुम्हाला ?
अवधूत : हो आहे मी घरी.
इनामदार बर त्यांना पाठवून देतो.
अवधूत : हो नक्की.
इनामदार : बाकी सगळ ठीक ना ?
अवधूत : हो अगदी..
इनामदार : बर ठेवू का ? येतील ते संध्याकाळी.
अवधूत : हो चालेल.
सारिकाचे बाबा : काय बोलले ?
इनामदार : या बोलले. या जाऊन तेवढ बघा काय म्हणतात.

थोडावेळ दोघे बोलत असतात. एक सातारा-पुणे-सातारा बस वरच्या रस्त्यावरून कात्रज मार्गे येते आणि बस स्थानकावर जाते. ते बघून सारिकाचे बाबा इनामदारला बोलतात  कि आतली बस सुटेल दहा मिनिटात. तिकीट काढून निघतो आम्ही. इनामदार हि घाईत असतात. ते रिक्षा करून निघून जातात. साताऱ्यात आल्यावर भेटण्याचं आश्वासन देऊन. सारिका आणि तिचे बाबा दोघे हि जाऊन तिकीट काढतात आणि बसमध्ये बसतात. आणि बस निघाली मोजून चौदा मिनिटांनी..
भाग ०६
सातारा जसा दिसायला लागला. तस सारिकाचे बाबा विचारात गढून गेले. काहीही करून सारिका बरी व्हावी हि एक बाप म्हणून त्यांची केवळ अपेक्षा होती. सारिका नुकतीच सावरत घेत होती स्वतःला. पण कितपत हे तीच तिलाच समजत नव्हत. मग तिच्या आई बाबांना काय कळणार ? तरी तिच्याकडे बघून ते स्वतःला सावरत होते. घरी आल्यावर आवरून लगेच बाप-लेक चप्पल घालून निघाले. आईने अडवलच त्यांना. “आत्ताच आलाय बसा. कुठ चाललात”. वैगरे असे प्रश्न झाले. आणि आलोच हे एका शब्दाच उत्तर सगळ्या प्रश्नांना देऊन ते दोघ घर मागे सोडून निघून गेले. अवधूतच्या घराजवळ गेल्यावर सारिकाचे बाबा त्यांना कॉल करतात.
सारिकाचे बाबा : हेल्लो, अवधूत सर आम्ही आलो होतो इथ शनिवार पेठेत.
अवधूत : कोण बोलतय ?
सारिकाचे बाबा : सकाळी कॉल केलेला बघा मी. सारिकाचे वडील.
अवधूत : हा.हा.. आठवल, आठवल. कुठ आहात नक्की ?
सारिकाचे बाबा : शनिवार पेठेत. ते इथ मोठ्या मेडिकलपाशी.
अवधूत : या ना आत. केशरी रंगाच घर आहे बघा समोर आत या. मी आहे आत.
सारिकाचे बाबा : आलोच.
सारिका आणि तिचे बाबा आत गेले. आत गेल्यावर आतल वातावरण अस वेगळच वाटल. सारिका आणि तिच्या बाबांना बघून त्यांनी बसण्यासाठी खुणावल. दोघे बसले.
अवधूत : काय झाल आहे हिला ?
सारिकाचे बाबा : तुम्हीच हिला विचारा.
अवधूत : हेल्लो... सारिका. काय म्हणतेस ? काय झाल तुला ?
सारिका : त्रास. झालाय.
अवधूत : कसला ?
सारिका : कसला नाही.
अवधूत : अस कस बर ? त्रास आहे पण कसलाच नाही. बाबा आहेत म्हणून नाही का सांगत मला ?
सारिका : अस काही नाही मला नाही सांगू वाटत.
अवधूत : बाबा आपण जरा बाहेर गेलात तर बर होईल.
सारिकाचे बाबा : हो आहे मी. तुम्ही बोलून घ्या.
ते निघून गेले.
अवधूत : आता बोल. सगळ बिनधास्त. तुझ्या वयाचा समज मला.
सारिका : मी कुणावर कधी विश्वास ठेवला नाही. एकावर ठेवला तर. त्याने विश्वासघात केला.
अवधूत : कोण होता तो ?
सारिका : अमोल.
अवधूत : कोण मित्र ?
सारिका : नाही त्याच्या पुढचा.
अवधूत : दोघांच्यात प्रेम होत ?
सारिका : माझ्यात होत त्याच्यात नाही.
अवधूत : अस का म्हणतेस.
सारिका : प्रेम असण आणि करण यात फरक आहे ना.
अवधूत : नक्की काय झालय ? सांगशील का मला ?
सारिका : सांगेन पण एक प्रॉमिस करा मला.
अवधूत : कसल ?
सारिका : मी सांगेन ते कुणाला सांगणार नाही.
अवधूत : दिल वचन.
सारिका : पण मी विश्वास ठेवत नाही कुणावर...... हल्ली.
अवधूत : मग आता ?
सारिका : बर माझ्या प्रश्नांची उत्तर द्या मला विश्वास बसला स्वताला तुमच्यावर तर मी सांगेन पुढच.
अवधूत : आणि नाही बसला तुझा माझ्यावर विश्वास तर ?
सारिका : पुढच पुढ बघू.
अवधूत : बर बोल.

सारिका : सगळ्या माणसांनी प्रेम करावच असा काही नियम आहे का ??
भाग ०७
अवधूत : अस काही नाही. नियम वैगरे अस काही नसत ग या जगात. बस एखादी गोष्ट अति प्रमाणात केली गेली किंवा चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या मार्गाने केली जात असेल तर त्याला समाजाकडून काही सीमा घातल्या जातात. त्याच सीमा नंतर नियम बनून जातात. किंवा आपण त्यांना नियम समजतो. प्रेमाच कस आहे ना ते करत नाही. कराव लागत नाही. ते होत. अगदी प्रत्येकाला. म्हणजे माणसापासून ते अगदी प्राण्यांपर्यंत.
सारिका : बर. मग प्रेम होत अस म्हणता तुम्ही.
अवधूत : मी काय बोललो. विसरलीस का ? तू मला तुझ्या वयाचा समजून अरे-तुरे कर.
सारिका : बर. तू म्हणतोस तस प्रेम होत. ठीक आहे. पण त्यात कुणीतरी अडकून रहायचं आणि कुणीतरी फसवून जायचं हा नियम आहे का ?
अवधूत : अजिबात नाही. प्रेम चूक किंवा वाईट नसत. वफा किंवा बे’वफा नसत. प्रेम प्रेमच असत. हा काही परिस्थिती,वस्तुस्थिती,भौतिकस्थिती आणि कोणता दबाव आला कि माणूस बदलतो. साहजिकच तस होण नैसर्गिक आहे. पण म्हणून त्याचा दोष माणसाला न देता सबंध प्रेमालाच बदनाम करण हे कितपत योग्य आहे ?
सारिका : हो, पण प्रत्येकाचच आहे हे गणित.
अवधूत : कोणत ?
सारिका : वफा-बे’वफाच.
अवधूत : अस तुला वाटत. कित्त्येक असे आहेत जे प्रेमात यशस्वी झालेले आहेत. फक्त समजूतदारपणा दाखवून आणि एकमेकांवर विश्वास ठेवून.
सारिका : त्याने माझ्यावर प्रेम केल. म्हणजे तो म्हणायचा तसा कि माझ तुझ्यावर प्रेम आहे.
अवधूत : बर. तुम्ही कसे भेटलात ?
सारिका : माझ्या बाबांचे मित्र आहेत, इनामदार म्हणून त्यांचा तो मुलगा अमोल. त्यांच्यामुळे हा आमच्या घरी यायचा. माझ्याहून तीन वर्षाने तो लहान आहे. त्यामुळे तो माझ्याशी बोलताना कधी जवळ वैगरे यायचा. पण मला काही अस वेगळ वाटायचं नाही. आम्ही बोलत बसायचो. त्याला खूप नाद फिल्मबद्दल बोलायचा. तो खूप फिल्म बघायचा. आणि त्याच ते त्या फिल्मची गोष्ट सांगण मला आवडायचं. मग आम्ही भेटलो कि असच बोलत बसायचो. बसायचो म्हणजे तो बोलायचा आणि मी ऐकायचे.
अवधूत : मग त्याने कधी सांगितल तुला कि त्याला तू आवडतेस ?
सारिका : आवडते वैगरे काहीच नाही. मला आठवतय शनिवार होता. तो आलेला घरी चितळेंची बाकरवडी घेऊन. त्यांचे पाहुणे पुण्यात आहेत. ते साताऱ्यात कमी आणि तिकडच जास्त असतात. माझ्या बाबांनी मागवलेली बाकरवडी त्यांना आवडते म्हणून. काका आले नाहीत पण त्यांनी पाठवलेली तेव्हा तो ती वडी घेऊन घरी आला. घरी कोणी नव्हत. म्हणजे बाबा बाहेर गेलेले आईला घेऊन शेजारीच जवळ क्लिनिक मध्ये. तीच बी.पी. लो झालेलं. तुम्हाला माहित असेल. बी.पी. हाय झाल तर कमी करता येत पण लो झालेलं हाय करता येत नाही. बाबांना त्याच खूप टेन्शन असत. ते सतत आईला सांगतात कि टेन्शन घेत जाऊ नको पण ती घेते आणि तिला चक्कर वैगरे येत असते. तेव्हा पण तसच झालेलं. मग आईला चक्कर आल्यावर बाबा तिला घेऊन गेले. क्लिनिक ज्याचं होत ते डॉक्टर बाबांचे मित्र लहानपणाचे. मी घरात एकटी. दार वाजलं. मी दारात जाऊन आतूनच विचारल कोण आहे. तर अमोल होता. मी दार उघडल. तो आत आला. आम्ही बसलो. त्याने सांगितल बाकरवडी आणली आहे वैगरे... तो निघणार होता. आणि मला एकट वाटत होत म्हणून मी त्याला थांबवल. माझी चूक मलाच नडली.
अवधूत : म्हणजे.
सारिका : मी त्याला फिल्मची एका गोष्ट सांगायला लावली. त्याने सांगितल त्याने एक तसली फिल्म बघितली म्हणून.
अवधूत : तसली ?
सारिका : हीच उत्सुकता मला पण होती. मी विचारलं तसली म्हणजे ? त्याने सांगायला सुरुवात केली ती गोष्ट. एक गरीब घरचा प्लंबर असतो. त्याला एका लेडीजचा कॉल येतो. तो तिथ प्लंबिंगच काम करायला जातो. आणि काम झाल्यावर तो तिला पैसे मागतो तर ती स्वतःचे कपडे काढते आणि छी.........! बोलायला पण मला लाज वाटते.
अवधूत : समजल. मग पुढे ?
सारिका : तो माझ्या जवळ सरकला. आणि माझा हात धरला. आणि पुढची गोष्ट सांगायला लागला. दोघांनी कस काय केल. मला समजत होत हे चुकीच आहे. पण सावरू शकत नव्हते स्वतःला. हे हि मला लक्षात नव्हत कि घरी कोण नाही आपल्या. आपल्यात आणि त्याच्यात ह्याच गोष्टीसारख काही घडल तर काय होईल ? बाबांना कळाल तर काय होईल आणि त्यातून पुढे काही झाल म्हणजे प्रेग्नन्सी वैगरे तर ? आणि तेव्हा याने हात वर केला तर मी काय करू ?
अवधूत : अगदी बरोबर विचार केलास.
सारिका : विचार बरोबर होता , पण ती वेळ नाही. त्याने ती गोष्ट सांगत सांगत मला जवळ ओढलं. आणि मला अस काही घेरल कि साप सापाला गुंडाळला जावा. त्या तावडीतून ना मला सुटू वाटत होत न त्याला मला सोडायचं होत. गुरफटलेल्या त्या शरीरावरच्या कपड्यांची चादर बाजूला झाली. बेडवरची चादर अंगावर आली. आणि त्याला आनंद आणि मला त्रास होत राहिला काहीवेळ. नंतर तो शांत झाला. त्याला त्रास होत होता. जाणवत होत मला. तो शेजारी झोपलेला. आणि मला हि त्रास होत होताच. तरी मी त्याला कुरवाळत होते माझा त्रास विसरून. आणि त्याने मला सरळ “आय लव्ह यु” अस बोलून मला त्याच बनवून टाकल. जे कि मला ते मान्य नव्हत. पण त्या क्षणाला का कुणास ठाऊक मला होकार देऊ वाटला. मी होकार दिला.

अवधूत : घाई झाली सगळ्याच गोष्टींना अस नाही का वाटत तुला ?
भाग : ०८   
सारिका : हो. घाई झाली. केली नाही.
अवधूत : तू ऐकल असशील, अति घाई संकटात नेई.
सारिका : वेगळ काय आहे आत्ता. संकट आलच कि.
अवधूत : पण मला एक उत्तर मिळालाच नाही.
सारिका : कसल ?
अवधूत : तुमच्यात इतक झाल सगळ तो बाहेर निघून गेला. तुझे आई बाबा आले. आई झोपली बाबा त्यांच्या जवळ बसले. तू हि तिथच होतीस. पुढे ?
सारिका : माझ्या मनात बरेच विचार होते. आईची काळजी. बाबांची काळजी. अमोलचा विचार. आम्ही केलेलं घरी कळेल याची भीती. आणि अमोलची आठवण आणि राग सुध्दा. सगळे विचार एकाच वेळी एकदम मनात येत होते. माझ आता डोक दुखायला लागलेलं. बाबांना मी सांगितल. त्यांनी मला बाम आणून दिला. मी लावला आणि मी झोपले. मी कधी उठले मला माहित नाही. पण तेव्हा घरात शांतता होती. मी आई बाबांना हाक मारली. आणि बदल्यात अमोलचा आवाज आला.
अवधूत : अस कस काय ? भास झाला का तुला ?
सारिका : मला हि तसच वाटल होत आधी. पण ते सत्य होत. तो माझ्या जवळ आला. एखादा विहिरीत पडलेला असावा त्याला वरून कुणी दोरी द्यावी आणि ती पकडून त्याला वर ओढाव त्यासाठी खाली पडलेल्या माणसाने अगदी घट्ट दोरी पकडावी अगदी तितक्याच ताकदीने मला त्याने जवळ घेतल. सारिका, जी कि मघापर्यंत विचार करून-करून थकून झोपून गेली तिला आता विचार यायचा बंद झाला होता. त्याच्या मिठीतून सुटाव हा विचार सुध्दा मला आला नाही. मी त्याला विचारल.
अवधूत : काय ?
सारिका : तू माझ्याशी लग्न करणार आहेस का ? अमोल. तो सरळ हो म्हणाव अस सहज बोलला “नाही”.
अवधूत : का ?
सारिका : मीपण तेच विचारल, का ? तो बोलला, तुझ्यासारख्या पोरीशी लग्न करायला मी काय वेडा आहे का ? जोवर मिळतय तोवर मी प्रेम करेन तू हि माझ्यावर कर. लग्न बिग्न तसले विचार करू नकोस. माझ्यासोबतच काय कुणासोबत नको करू. शक्य नाही ग ते तुझ्या या जन्मात.
अवधूत : अस का बर ?
सारिका : नशीबबब..... देवाने इतर मुलींसारख सौंदर्य, चांगल शरीर दिल पण...
अवधूत : पण काय ? आणि अमोलने पुढ काय केल का ? म्हणजे काय बोलला का ?
सारिका : त्याने माझ्या सोबत पुन्हा प्रणय केला. माझ्या मर्जीविना. आणि त्याला जगात बलात्कार म्हणतात. त्याच्यासाठी ते प्रेम असेल माझ, पण माझ्यासाठी त्याचा तो माझ्यावर केलेला बलात्कारच होता. आणि अस असताना मी चांगल कस काय राहू शकते ?
अवधूत : अस....स.... म्हणजे यामुळे तू डिप्रेशन मध्ये आहेस तर.
सारिका : हो, आणि हे मी घरी सांगू शकत नव्हते. आणि कुणाजवळ बोलू शकत नव्हते. पण मनात पण जास्त दिवस ठेवू शकत नव्हते.
अवधूत : बर ठीक आहे. नको काळजी करू. मी आहे ना. आपण काढू यातून मार्ग. हे लगेच तर विसरता येणार नाही तुला. पण मला तुझे सात दिवस दे मी तुझे काही सेशन घेईन त्यात तुझा अभ्यास करून मी तुला यातून बाहेर काढेन हा माझा शब्द.
सारिका : चालेल.
आत्ता,
खुर्चीवर अवधूत बसलेला आहे त्याच्या मांडीवर बसलेली सारिका, दोघांचा कीस सुरु असताना खुर्ची कलत होती. अवधूत पायाने खुर्चीचा पाय सावरत आणि सारिकाला पाठीला धरून हाताने आवरत होता.
सारिका : हे चूक आहे का बरोबर ?
अवधूत : दोघांची संमती असेल ती प्रत्येक गोष्ट बरोबरच असते. कुणा एकाच्या मर्जीने घडलेली गोष्ट जबरदस्ती असते.
सारिका : मला साथ देशील ?
अवधूत : किती ?
सारिका : कायम. आयुष्यभर.
अवधूत : गरज मलाच आहे. सोबतीची. माझी बायको नाही देऊ शकली. कारण हीच अपेक्षा तिची हि होती, “माझ्याकडून”. पण.
सारिका : पण काय ?
अवधूत : त्या लायक मी नाही.
सारिका त्याच्या मांडीवरून ताडकन उठते.
अवधूत : तू ज्या नशिबाच्या अंधारात वावरत आहेस तो अंधार मी पण जगतोय सतत.
सारिका : म्हणजे ?
अवधूत : अंधारातून अंधार पसरतो. प्रकाश नाही,

सारिका : हो मान्य. पण बायको का सोडून गेली तूला ?  


भाग ०९ 
अवधूत : माझी बायको प्रज्ञा. तिला अपंगत्व होत. तिला ऐकता येत नव्हत. तिला माझ्याकडे बघून माझ्या ओठांच्या हालचालींवरून नाहीतर माझ्या हालचालीवरून समजायचं मला काय सांगायचं आहे वैगरे.
सारिका : बर. मग तुला असली बायको करताना समजल नाही का. तू चांगली का बघितली नाही बायको ?
अवधूत : मला आई आहे ती गावाकडे असते. वडिलांना कॅन्सर झालेला. अगदी लास्ट स्टेज. त्यांच्या जाण्याच्या भीतीत आम्ही आणि त्यांना भीती वेगळीच होती.
सारिका : कसली ?
अवधूत : माझ लग्न त्यांना बघायला मिळेल कि नाही याची.
सारिका : मग ?
अवधूत : त्या गडबडीत त्यांनी माझ लग्न ठरवायला सांगितल माझ्या काकांना. त्यांना पण प्रज्ञा कुठून कशी मिळाली काय माहित. आमच दुसऱ्यादिवशीच लग्न केल. हॉस्पिटलमध्ये बाबांसमोर. एकमेकांना हार घालून. लग्न झाल तरी मी तिला बघितल नव्हत. तिने मला बघितल होत, तिला मी आवडलो होतो. पण नंतर नंतर तिची चीड चीड व्हायची. सतत मला टोमणे मारायची. भांडण करायची. मी काय बोललो याचा काहीच तिला फरक पडत नव्हता.
सारिका : का ?
अवधूत : तिला ऐकायला येत नव्हत ना. पण मला तर ऐकू यायचं ना. मला मात्र तिचा त्रास व्हायचा. त्यात मी परीक्षा देत राहिलो. घरी असल्या जाचात राहायला नको म्हणून. त्यात मधे बाबा बरे झाले. पण तरी आम्ही होप्स सोडून दिलेले आणि तसच झाल सहा महिन्यात ते गेले. मग आई हि आजारी पडायला लागली. तिला मग गावाला पाठवल. भावाकडे. तो नीट आहे. त्याची बायको पण नीट आहे प्रेमळ आहे. खूप काळजी घेते. आई आता तिकड नीट असते.
सारिका : इकड मग कोण असत तुझ्यासोबत ?
अवधूत : मी आणि लक्ष्मी.
सारिका : लक्ष्मी कोण ?
अवधूत : कामवाली आहे. पण माझी सगळी काम ती करून देते. मला मदत हि करते.
सारिका : तीच लग्न झालय का ?
अवधूत : अग चुकीच समजू नको. ती मला दरवर्षी राखी बांधते. मला बहिण नाहीये. एक भाऊ आहे फक्त.
सारिका : बर मग ठीक आहे.
अवधूत तिला तसाच जवळ ओढतो. आणि तिच्या चेहऱ्यावर कुठ हि हरवल्यासारख कीस करत राहतो.
सारिका : अस का करतोयस ?
अवधूत : अस म्हणजे ?
सारिका : नक्की कुठ करायचं आहे तुला कीस ?
अवधूत : ओठांना.
सारिका : मग कुठे हि काय ? आत्ता नाकाला ओठात पकडल असतस तू.
अवधूत : सॉरी.
सारिका : पण अस का करतोयस ? बर ते सोड. मला सांग बायको कशी होती काय होती समजल मग भांडण कधी झाल तुमच ?
अवधूत : कसल ?
सारिका : तुम्ही घटस्फोट होई पर्यंत पोचला म्हणजे भांडणच झाल असणार ना तुमच्यात ?
अवधूत : नाही. मलाच नाही पटल. आम्ही नऊ महीने एकत्र काढले पण सगळ माझ्याच मूळ होतय या विचाराने मीच स्वतः डिप्रेशन मध्ये गेलो. मीच माझ्या नजरेत उतरलो. आणि मग मी मनाशी ठरवून अगदी तिला बोलून गेलो कि तू जा मला सोडून. मी जगेन हा असा कसा तरी. तू मात्र नीट जग तुझ आयुष्य तू नको वाया घालवू माझ्यासाठी. आणि तिला ते अगदी झटक्यात पटल. आम्ही वकिलांकडे गेलो. सगळ त्यांना सांगितल आणि निकाल हि तीन महिन्यात लागला. आम्हाला काय सहा महिने अजून काय एकत्र राहायला वैगरे वकिलाने सांगितल नाही.
मग ती गेली घर सोडून. जाताना माझ्या काळजी पोटी. तिच्या मैत्रिणीच्या घरी काम करणारी ती लक्ष्मी माझ्या घरी कामाला लावली. म्हणून मी हा असा इथ स्वतःच ऑफिस काढून बसलोय. नाहीतर मी पण कधीच तुझ्यासारखा झालो असतो. जिद्द हवी बस. नाहीतर बिना जिद्दीचा माणूस. झाडांच्या वाळलेल्या पानासारखा असतो. वार आल तरच गळून खाली पडायचं नाहीतर तिथच कुडत जगत राहायचं.
अवधूत तिच्या छातीला धरून दाबत दाबत अंदाजाने कीस करायला लागतो. आणि चुकून नाकालाच होतो.
सारिका : काय होतय नक्की तुला ? असा का करतोयस ?
अवधूत : माझ्याशी लग्न करशील ?
सारिका : तू देणार का साथ मला मी तुला आयुष्यभर देईन..
अवधूत : हो.
सारिका : पण माझा एक प्रोब्लेम आहे तो तुला मान्य आहे का ?
अवधूत : कोणता ? हा डिप्रेशनचा ना. मान्य आहे. मी काढतो तुला त्यातून अग.
सारिका : तो नाही. अस का करतोयस. तू बघितल आहेस ना मला ?
अवधूत : हो.
सारिका : मग काहीहि न कळाल्यासारख का करत आहेस ?
अवधूत : सॉरी पण तुला नक्की काय म्हणायचं आहे ? कोणता असा प्रोब्लेम आहे तुझा ?
सारिका : तू माझी चेष्टा करतोयस का ?
अवधूत : नाही ग.
सारिका : मग ?
अवधूत : आय लव्ह यु सारिका.
सारिका : पण मला एक समजल नाही. बायको अपंग होती तुझी. तू तर चांगला होतास ना. मग का तीला समजून घेतल नाहीस. का तिला प्रेम दिल नाहीस ?
अवधूत : कारण...
सारिका : काय कारण.. कारण तुला द्यावच लागेल मला. कारण बायकोला इतक्यात मी तुझ्या आयुष्यातली विलन नाही मानू शकत.
अवधूत : कारण, तुला दिसल असेल मी तुझ्याकड बघतोय. पण मला दिसत नाही. काहीच नाही. नावाला डोळे आहेत. पण काम त्याचं काहीच नाही.
सारिका जागची उठते..
सारिका : का.......य ????
अवधूत तिला चाचपत शोधायला जागचा उठतो. आणि तिच्या खांद्याला त्याचा हात लागतो. ती त्याचा हात झिडकारते.
अवधूत : प्रेम अंधळ असत म्हणतात आणि तेच अंधळ प्रेम मिळाल तर बदल्यात हा तुसडेपणा ? का बर अस ?
सारिका : मग काय करायचं असत ?
अवधूत : आपलस कराव असल प्रेम.
सारिका : आणि काय करू ? ज्या प्रेमाला मी अनभवू शकते पण बघू शकत नाही. किंवा तू मला बघू शकत नाही.
अवधूत : हो पण....प्रेम होऊ शकत ना आपल्यात.
सारिका : हो पण उपयोग काय ?
अवधूत : एक मिनिट, काय म्हणालीस ? तू प्रेमाला अनभवू शकतेस पण बघू शकत नाहीस म्हणजे ?
सारिका : मला पण दिसत नाही काही. मी जन्मापासून आंधळी आहे. आणि काय देणार तू मला साथ. तुझ्या जीवावर विश्वास ठेवून मी तुझ्या जवळ आले आणि तू हि अंधारच निघालास. काय माझ नशीब. मी कायम माणसाच्या रुपात प्रकाश शोधत आले पण देवाने नशिबात अंधारच लिहून ठेवलाय वाटत. मी येते.
अवधूत : ऐक थांब ना.
कॉल आला.
सारिका : बोला बाबा.
सारिकाचे बाबा : येऊ का बाळ मी तुला न्यायला.
सारिका : हो लवकर या बाबा.
अवधूत तिला हाक मारत राहिला आणि सारिका अंदाज घेत दाराच्या बाहेर जाऊन थांबली हातात काठी घेऊन आणि तिचे बाबा जणू जवळच कुठे असल्यासारखे दोन मिनिटात तिच्या जवळ आले. आणि ते तिला रिक्षात बसवून घेऊन गेले. 
दोन व्यक्ती दोघांमधली एक सामायिक गोष्ट ती म्हणजे अंधत्व. या तीन मधून एक त्याचं प्रेम वजा झाल कि पुढे काय उरल ?


समाप्त.©लेखकाकडे या कथेचे सर्व हक्क आहेत.

सावधान....! या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.            

13 टिप्पण्या

  1. कथा 9 भागांनंतर संपली. आपलं प्रेम आशीर्वाद असुदे असाच कायम. नवीन कथा लवकरच सुरु.

    उत्तर द्याहटवा
  2. खर तर मला शूट मुळे जास्त ब्लॉग्स वाचयला वेळ मिळत नाही. रिकाम्या वेळेत तुझे ब्लॉग्स वाचायला खुप अडवतात... आजची स्टोरी खुप छान आहे...keept it up ajju😊😊

    उत्तर द्याहटवा