नाटकाच नाव प्रेम.तुटक्या हृदयाला सांभाळत जगणारे अपंग नसतात पण हिणवणारे त्यांना त्याची जाणीव करून देत असतात. त्या जाणिवेच्या यातनेत हृदयाची दशा दिवसेंदिवस खराब होत जाते. श्वास घेताना सुध्दा तुटक्या हृदयातून कळ येत राहते. मी कोण ? माझी लायकी काय ? मी चूक केली ? मी चूक केली का ? या अशा प्रश्नांची उत्तर शोधत तो त्याच त्याच्या एका जागेवर बसून शोधत राहतो. मला सांगा जग एका जागेवर बसून बघता येत का ? न मिळालेली उत्तर आणि अजून वाढवून ठेवलेले प्रश्न घेऊन डोक्यावर त्याचा भार घेऊन वार गेलेल्या पायाने तुटकं हृद्य घेऊन जगणारे तसे बरेच आहे इथे. माणूस म्हंटल कि वासना आली. ती पुरी करायची म्हंटली कि त्यासाठी प्रेमाचा घाट घालावा लागतोच. ज्याने त्याने आपल्या कुवतीने हा घाट घालून प्रेमात आपल्या कुणाला पाडायचं म्हणजे देवाने माणूस बनवून त्याच्याकडून आपली निस्वार्थ सेवा करून घेण्यासारखं आहे. निस्वार्थ भक्त कधी असतात का ? मिळवलेल्या प्रेमाला जपत करत कायम न पुरवू शकणाऱ्या गोष्टींची सवय लावत माणूस वहावत जातो त्या प्रेमाच्या व्यक्तीच उघड शरीर बघण्यासाठी. जे कि त्याला हल्ली लगेच मिळत पण बंदिस्त डोक्याला उघड्या शरीराची असलेली हि आवड मला तर न पटणारी वाटते. जे माहित आहे तेच बघण्यात रस घेऊन त्यालाच मिळवण्याच्या कष्टाला प्रेम म्हणून या प्रेमात सर्व त्यागणारे लोक मला त्यागी नाही भिकारी वाटतात.

ज्या गोष्टींची सवय दुसऱ्याला लावण्याचे नवे नवे पर्याय शोधत अमलात आणत असतात त्या गोष्टींची लत स्वतःलाच लावून एकटे राहण्यासाठी तयार न राहता तो प्रसंग जगायला सुरुवात हि करतात. लेखकाची वाक्य हि आवाजाचे भुकेले असतात. त्या वाक्यांना जे बोलतील ते त्यांचे होऊन जातात. लेखकाला विसरून अस मत माझ. प्रेम हि तसच आहे ना. जो मनापासून करेल त्यापेक्षा जो करून दाखवेल त्याच ते होऊन जात. खर-खोट याची परीक्षा न देता न घेता. प्रेम करायचं असत. ते होत नाही. ते होणार नाही. ते झालेलं हि नसत. आणि ते सोबत हि नसत. कोणतीच गोष्ट आयुष्यात कायम नसते. तरी सुध्दा देव-काळापासून आयुष्य सोडून प्रेम हीच गोष्ट महत्तम असते. मी माणूस म्हणून काय करायचं ? जन्माला यायचं. मोठ् व्हायचं. अवयव जाणून घेऊन त्याचा उपयोग करत संभोग करण्यासाठी तरसत रहायचं. प्रेमाची नाटक रचून त्यात मुख्य स्वतः पात्र राहून दुसऱ्या पात्राला घेऊन त्यासोबत तालीम करून हे नाटक चालू ठेवायचं. जोपर्यंत दोहो बाजूनी या नाटकाला प्रतिसाद मिळतो तोपर्यंत ते चालवायच. नाटकाचा प्रतिसाद घसरला कि नाटक थेट-थेटरवरून उतरवून टाकायचं. मग मुख्य पात्र आपण, आपल्याला कोणी ओळखत नाही. त्या सह-पात्राला अजून दुसऱ्या नाटकात काम मिळत आणि ते नाटक लग्न होऊन पण चालू राहत. यात आपल नाटक कमी दर्जाच कि त्याचा अभिनय उत्तम म्हणून विचार करत हृद्य तोडत जगत करत यालाच खर प्रेम म्हणत त्याला दोष देत त्याला खोट सिध्द करत मिळत काय ?    

 copyrighted@2020

0 टिप्पण्या