राधिका

( image by google )

मिणमिणत्या दिव्याकडे बघून माझ्या डोळ्याची पापणी फडफडते. त्या दिव्याच्या ज्योतीला सांभाळू दोन्ही हाताने, कि त्याच दोन्ही हाताने डोळ्यांवर हात ठेवून सगळा अंधार करून टाकु ? काहीच समजत नाहीये. अंधार तर असाही होणार आणि तसाही. पण अनपेक्षित असा अंधार केव्हाही बरा. पण उगीच केलेला अंधार मनातल भय दूर करतो. कारण माहित असत मनाला अंधार आपणच केला आहे. आणि आपण एकट नाही इथे, सोबत अंधार हि आहे. पण अनपेक्षित झालेला अंधार काही विचार करण्याआधीच सगळ हिरावून घेतो. आणि तेव्हा खरा एकटेपणा जाणवतो.
त्या मिणमिणत्या दिव्याकडे बघून मला राधिका तू आठवलीस. अशाच कमी प्रकाशात आपली पहिली भेट झालेली. पाऊस पडत होता. सगळीकडे लाईट गेलेली. आणि थोडासा प्रकाश होता. आणि त्या प्रकाशात चमकणारा तुझा चेहरा विजेपेक्षा प्रखर दिसत होता. तेव्हाहि प्रश्न पडलेला मला. कि तुला बघत राहू कि त्या चिंब पावसात तुला मिठीत घेऊ ? पण पुन्हा अस वाटल मी घेईन लाख तुला मिठीत पण तूच अनपेक्षितपणे आलीस स्वतःहून तर ? मला बर वाटेल. मी नाही घेतल तुला जवळ आणि तू हि नाही आलीस. पण मग अस वाटल अनपेक्षित नकोच आता मुद्दामच तुला जवळ घ्याव. आणि मी तुला घेतल जवळ. घट्ट. श्वास फुलत होते तुझे आणि माझे. आणि पावसाचा जोर हि वाढत होता. आत्ता त्याची आठवण येतीय.
त्या दिव्यातल्या वातीची काजळी बघून मला तुझ्या डोळ्यातल्या काजळाची आठवण झाली. का कुणास ठाऊक ? तू कायम डोळ्यांना काजळ लावायचीस. लांबून पण तुझ्या डोळ्यांची आकृती मला स्पष्ट दिसायची. त्या काजळाच नशीब किती जो तुझ्या डोळ्यात बसून आहे अस सुरुवातीला मला वाटायचं पण खरा नशीबवान मीच होतो. कारण काजळ तू फक्त डोळ्यांना लावायची. आणि माझ्यावर प्रेम करून तू मला तुझ्या मनात ठेवलस (कायमच).
त्या दिव्याच्या प्रकाशात सगळ दिसत आहे. पण दिव्याचा तळ दिसत नाही. तिथ अंधार होता. अंधार तर माझ्या मनात पण आहे. मग ? पण मी दिवा नाही. पण तरी मी काहीसा तसा आहे. माझ्याकडे वात नाही पण मन आहे. वातीवर जाळणारी ज्योत अगदी तसच माझ्या मनात तुझ्यासाठी जळणार प्रेम आहे. नंतर काजळी पकडते ती वात. माझ तस नाही आणि हो त्या दिव्याखाली अंधार आहे आणि माझ्या आयुष्यात तर प्रकाशच नाही
शेवटी,
तो दिवा मिणमिणतो का ते समजल. त्यातल तेल संपत आल आहे. आणि मी इतका आतून आक्रोशत का आहे हे पण समजल. कारण मी हि संपत आलोय. तुझी वाट बघून. पण तू माझ्या आयुष्यात परत येणार नाहीस. आणि म्हणून आता अंधार झाला तरी मला फिकीर नाही. कारण मीही आता त्या दिव्यात पुन्हा तेल घालणार नाही. विझू देत दिवा. आणि माझ प्रेम हि. काय फरक पडतो ?
तुझी आठवण येतीय राधिका.... कळतंय का तुला.......
( इन अ रिलेशनशिप विथ राधिका. एक नवीन प्रेम कथा लवकरच आपल्या भेटीला. )

0 टिप्पण्या