पत्र एक तिच्यासाठी...


प्रिय,
असावरी.
तुझा मेसेज आला. खूप दिवसांनी. कारण तस काही खास नाही. पण आला. तुला माझी आठवण आली. मला तुझी रोजच येते. दोघांकडे आपल्या आपले नंबर आहेत. पण तरी बोलायच होत नाही. तुला माझी आठवण येते. मला तुझी आठवण येते. तुला माझी मला तुझी सवय झालीय. तरी सुद्धा आपण बोलत नाही बोललो नाही. तरी आपल्यात प्रेम आहे. ते तुला कळत ते मला कळत. पण उघडपणे मिळत नाही. प्रेम केलं तर ते मिळायला हवं. नुसतं प्रेम केलं नंतर मेल. असो नको. याच प्रेमाच्या हट्टापायी मला असे विचार येतात कि आपलं लग्न व्हावं. 
तुझा आवाज तुझं अस सुंदर दिसण तुझ काळजी घेणं कधी माझ्यावर हक्काने चिडण सगळं मला मान्य आहे. मी तुझ्यासारखा नाही तू माझ्यासारखी नाही. तू तुझी वेडी अल्लड मला चालशील आणि मी तुझ्यासाठी स्वतःत खूप बदल करून घेईन. तुला जपून ठेवेन या मनात माझ्या. तुझी काळजी घेईन दिवसरात्र. तुला प्रेम देईन कधी न संपणार. तुझा एक स्त्री म्हणून आदर करेन कायमच. तुझ्याआवडीला माझी आवड बनवेन. तुझ्या नावडत्या गोष्टींना दृष्टीआड करेन. तुझा प्रत्येक शब्द हुकूम समजून प्रयत्न करून काहीही करून पूर्ण करेन.तुझ्यावर मनापासून खूप प्रेम करेन. तुझ्या सोबत असेन मी. दिवस दुपार संध्याकाळ रात्र आणि पुन्हा पहाट. कधी तुझी साथ सोडणार नाही. अस म्हणतात प्रेम केलं कि लग्न करायचं आणि त्या प्रेमाला पूर्णत्व द्यायचं. आणि लग्न झालं कि सात जन्मासाठी आपण एकमेकांचे साथी होतो. मी तुझ्यासाठी एक करेन असावरी बघ तुला पटत का ? मी तुझ्यावर प्रेम करतो अजून करत राहीन. तू साथ देणार असशील तर तुझ्याशी लग्न हि करीन आणि लग्नात सप्तपदीच्या फेरीत सात जन्म एकत्र राहण्याचं वचन पूर्ण करेन. तू म्हणशील यात वेगळं अस काय ? तर ऐक, हे सप्तपदीतल वचन मी प्रत्येक जन्मात तुझ्यासोबत तुला देईन. बाकीचे असतील जे सात जन्माच वचन देऊन एकाच जन्मात कंटाळत असतील आपल्या साथीदाराला. पण मी सात-सात जन्म करत प्रत्येक जन्मात तुझ्यासोबत राहण्यासाठी अशी कित्येक जन्म देवाला उधार मागीन. फक्त तुझ्यासाठी. त्यासाठी मी काहीही करेन. देवाला मनवेन. यमराजला थांबवेन. ब्रम्हदेवाला नशीब बदलायला लावेन. पण प्रेम फक्त तुझ्यावरच करेन. आणि तुझ्यासोबत जगणं आणि मरण याचा विचार करेन. आपलं मरण पण असेल असावरी. तुला दुःख नको म्हणुन मी माझा जीव तुझ्यात अडकवून कसा बसा जगेन आणि मगच मरेन. कारण मला आत्ता पासून शेवटच्या क्षणापर्यंत कधीच तुला दुखी बघायचं नाहीये. 
असावरी सरते शेवटी एक सांगतो. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर अगदी जीवापाड. बस एकदा माझा विचार कर. माझी तू राधा आहेस. मी तुझा कृष्ण. राधिके शिवाय कृष्ण कोण विचार करेल का त्याचा ? आणि मला सांग कृष्णच नसेल राधिके जवळ तर तिला प्रेम देईल का कोणी ? मला तू हवीस. आयुष्यभर. एकदा विचार कर. पत्र वाचून मला कॉल कर. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि कायम राहील. बाकी तुझ्या उत्तरात मी समाधानी असेल.
तुझाच

लेखक अजिंक्य अरुण भोसले. ( लेख स्वतःच्या नावाने वापरू नये )

0 टिप्पण्या