खास पत्र....


प्रिय,
सावरी....
आजकाल पत्र लिहित नाही ग कोणी कुणाला. आणि त्यात हे अस प्रेम पत्र ? मुळीच नाही. खाकी वर्दीतल्या पोस्टमनची जागा कुरियअरच्या रंगीत कपडे घातलेल्या माणसाने घेतली. आणि विचार कर ना. कुणी कुणाला पत्र लिहिलच ते हि अस प्रेम पत्र. आणि मिळाल आई किंवा वडिलांना किंवा भावाला. काय होईल ? पण तरी प्रेम पत्रात जी भावना व्यक्त होते ती लिहिताना आणि वाचताना अनुभवता येते. मोबाईलमध्ये काही नसत ग. सगळ्या मूक निर्जीव भावना वाटतात त्या मला.
बर आता मूळ विषयाकडे येतो. प्रेम पत्र हे लिहिण्याचे कारण म्हणजे माझ तुझ्यावर प्रेम आहे. ते काही वेगळ सांगायला नको. तुला बघितल आणि मी प्रेमात पडलो अस नाही बर का... खूप कारण आहेत त्याला. म्हणजे तुझा स्वभाव, तुझा आवाज, तुझ सौंदर्य, तुझ मन. आणि या सगळ्यांना पाहून-पडताळून माझा तुझ्यावर विश्वास बसला. आपलेपणाची जाणीव झाली. आणि त्यातच प्रेम कधी झाल अजून काही मला कळाल नाही. माझ्या मनाला झालेलं हे प्रेम म्हणजे एखाद्या फिल्ममधल्या व्हिलनप्रमाणे आहे. म्हणजे तो का येतो ? कसा येतो ? कुठून येतो ? काहीच माहित नसत. तसच मला प्रेम झाल कस ? का झाल ? आणि तुझ्यावरच का झाल ? सगळी प्रश्न अनुत्तरीत आहेत बघ. पण हे नक्की की, मला तुझ्यावर प्रेम झाल आहे. माझ तुझ्यावर प्रेम आहे. प्रेम पत्रात अस काय लिहितात मला माहित नाही. म्हणजे हे पहिलच लिखाण आहे ना माझ प्रेम पत्राच.. म्हणजे मी काय लेखक थोडीच आहे की, माझ्या अशा भारदस्त शब्दात तुझ्या सौंदर्याची मी तारीफ वैगरे करीन. पण जे लिहितोय ते मनापासून आहे. आता तुझ्याबद्दल जरास... परत म्हणशील माझ्याबद्दल काहीच लिहील नाही ह्याने.. खूप सुंदर आहेस तू. जगातली सर्वात सुंदर मुलगी. म्हणजे कुणी हि तुला बघाव आणि तुझ्या प्रेमात पडाव. पडत हि असतील काही. काही काय बरेच पडत असतील. हात-पाय मोडून हि घेत असतील. पण मी तस नाही केल. मी आधी तुला जाणून घेतल. आणि मगच तुझ्या प्रेमात पडलो आणि तू हि पडलीस माझ्या प्रेमात आणि मी पूर्ण तयारीनिशी तुला सावरल त्यामुळे तुला हि लागल नाही. मज्जा केली बर का... तर अशी तू इतकी सुंदर. खूप सुंदर आहेस तू. आता म्हणशील एकच वाक्य बदलून बदलून लिहितोयस. पण काय करणार तू खूप सुंदर दिसतेस याला दुसर अस वाक्य काय आहे मला माहित नाही. आणि असल तरी आणि ते मी लिहील तरी तुझ्या सौंदर्याची सर कशाला येणार नाही. लाखो स्त्रियांच्या कलाकृती बनवून देवाला जेव्हा समजल असेल कि सौंदर्य म्हणजे काय ? तेव्हा त्याने तुला बनवल असाव. आणि त्यात तो पास झाला. माझ्याकडून देवाला शंभर पैकी... एक आणि अगणित शून्य मार्क. म्हणजे एक तर आकडा फिक्सच पण तू म्हणशील तितके शून्य पुढ लाव तेवढे मार्क देवाला. असो, तुझ्या बोलण्यात मला मी विसरून जातो. तुझ्या आवाजात मला दुसरे कोणतेच तेव्हा आवाज ऐकू येत नाही. कस काय हे हि मला अजून एक गणित कळाल नाही. तू माझी काळजी करतेस. मला अस वाटत बस हेच आयुष्य हव पुन्हा-पुन्हा. ते हि फक्त तुझ्यासोबत. तू चिडतेस हि कधी कधी. पण मला तुझा राग येतच नाही. येत ते फक्त तुझ्यावर प्रेम. आणि याच प्रेमाच्या रोगात हा तुझा प्रियकर शेवटच्या स्टेजला जाऊन पोचला आहे. बाकी तुझी मर्जी. मला असच प्रेम देत फक्त आजारी ठेवायचं कि माझ्याशी लग्न करून मला कायमच बर करायचं... बाकी अजून काय बोलू ? लिहायला बसलो तर खूप लिहित बसेन. पण तुला वाचायला जास्त आवडत नाही. म्हणून इतकच बस. हे आवडल पत्र तर सांग तेव्हा तेव्हा अजून लिहीनच.. तूर्तास एवढच बस. पत्र वाचून एक कॉल कर आणि काही नको बोलू हेल्लो सुध्दा नको म्हणू फक्त आय लव्ह यु म्हण. बाकी... ? बाकी माझ्या आयुष्यात अधिक वजा गुणिले भागिले आणि या सगळ्यानंतरची बाकी... फक्त तूच आहेस...
तुझाच,

0 टिप्पण्या