'रुसवा, : प्रेमाची शप्पथ आहे तुला : पर्व ४थे.


भाग ०१
अंजली आरशासमोर बसलीय. मागे बेडवर ओमकार बसलाय. खोलीत खूप कमी प्रकाश आहे. ड्रेसिंग टेबलच्या काचेवर असलेला बल्ब फक्त सूरु आहे. त्यात अंजलीचा आरशात स्पष्ट चेहरा दिसतोय. ओमकार थोडा काळा दिसतोय. बाकीच हि काहीच इतक स्पष्ट दिसत नाहीये खोलीत. पूर्ण शांतात खोलीत पसरलेली आहे. जशी कि थंडी. ती शांतता तशीच होती बोचरी. बोचत होती अंगाला नाही मनाला. त्या शांततेला तोडण ओमकारला जमत नव्हत. आणि अंजलीला हि समजत नव्हत कि काय बोलाव आणि ह्या पसरलेल्या शांततेला शब्दांनी ऊब द्यावी. ओमकार उठला. अंजली आरशातून त्याला बघत असते. ती तिची केस एका बाजूला डावीकडे करते. तिच्या ब्लाउजमुळे तिची गोरीपान पाठ दिसते. ओमकार तिच्या मागे उभा राहतो. दोघ आरशातूनच एकमेकांना बघतात.
ओमकार : तुला जायचंच आहे का तिकड ?
अंजली : हो.
ओमकार : पण का ? सगळ असून पण काहीच नसल्यासारख तुझ का चाललय मला काही समजत नाहीये.
अंजली : सगळ असून उपयोग काय ? प्रेम आहे आपल्यात ?
ओमकार : आहे. माझ्यात आहे. तुझ्यातल माहित नाही मला.
अंजली : माझ्यात पण आहे प्रेम. खूप सार.
ओमकार : माझ्यासाठी नाहीये ना पण ते.
अंजली : मी सगळ करू शकले पण त्याच्या प्रेमातून बाहेर नाही पडू शकत.
ओमकार : मी तेच म्हणतोय. मी तुला त्यातून बाहेर काढतो. माझ प्रेम तुला देऊन.
अंजली : आणि काय करू मी ? त्याला विसरून जाऊ ?
ओमकार : हो. तू लक्षात ठेवून उपयोग काय ? उचक्या त्याला लागत असतील. तुला लागलीय का उचकी या एका वर्षात ?
अंजली : उचकी हा एवढा एकच पुरावा असतो का प्रेमाचा, प्रेमाच्या आठवणीचा ?
ओमकार : अस काही नाही. पण सांगितल मी.
अंजली : मनातली ओढ चेहऱ्यावरच्या हास्याने स्पष्ट होते. आणि मनातली ओढ प्रेमामुळेच तयार होते ना. उगीचच नाही करत आपण कुणाचा विचार सतत. उगीचच कुणाची आठवण नाही काढत आपण आणि त्या आठवणीने उगीचच मनात कसस ही नाही होत. सगळ्याला कारण असत. तेच प्रेम असत.
ओमकार : म्हणजे साथ देण, समजून घेण, पाठींबा देण, काळजी घेण आणि व्यक्त होण म्हणजे काहीच नाही. हो ना ? आणि ज्यात साथ नाही काळजी नाही ते प्रेम. बरोबर ना ?
अंजली : काय बोलतोयस तू ?
ओमकार : बरोबरच बोलतोय. तो जवळ नाही त्याला तुझ काय चाललय याच देणघेण नाही. तुझी काळजी नाही. पण त्याने तुझ्या एका मेसेजला रिप्लाय दिला तर ते त्याच खर प्रेम. काय हा फालतूपणा आहे.
अंजली : एक मिनिट. बाकीच्यांची प्रेम फालतू असतील. त्याच नाही. त्याच्या आयुष्यात कोणी का असेना आत्ता पण खर प्रेम त्याच माझ्यावरच आहे.
ओमकार : खर प्रेम असत तर त्याने लग्न केल नसत.
अंजली : लग्न मी पण केलच कि तुझ्याशी. मग म्हणून मी काय खोट प्रेम करते का त्याच्यावर ? अस म्हणायचं आहे का तुला कि त्याच आणि माझ दोघांच आमच प्रेम खोट आहे म्हणून.
ओमकार : मी सांगतोय. खरी परिस्थिती दाखवतोय तुला. तू आत्ता प्रेमात आहेस. ताप आल्यावर आळस, कंटाळा, अशक्तपणा येतो. खायची प्यायची इच्छा मरते. पण तेच ताप गेला कि, दिवस दिवस काम करून रात्रीच जागरण पण सहज होत. पोट भरून ढेकर आली तरी अजून काहीतरी खाण्याची इच्छा राहते. तू प्रेमात आहेस. पण त्यातून हि तू बाहेर येशील तेव्हा मी असेन नसेन माहित नाही तुझ्यासोबत. तेव्हा ना तो असेल ना मी.
अंजली : मी प्रेम त्याच्यावर करत असले तरी तुझ्यावर हि प्रेम आहेच माझ. तू माझा नवरा आहेस.
ओमकार : जगाला दाखवायला प्रेम कशाला करायचं. प्रेम एकवेळीस एकावरच कराव. नाहीतर प्रेमाला आयुष्यभर मुकाव लागत. किंमती असत हे प्रेम आणि त्याची जर का हि अशी किंमत केली तर त्याची कवडीमोल हि किंमत राहत नाही.
अंजली : मी आता काय बोलू, कळत नाहीये मलाच.
ओमकार : तोडून टाक त्याच्याशी नात. काय हरकत आहे तुला ?
अंजली : त्याच्याशी नात तोडून मी माझ्या आयुष्याशी नात तोडल्यासारख होईल.
ओमकार : हा वेडेपणा आहे तुझा.
अंजली : माझ प्रेम पण असच आहे. वेड. आणि त्यानेच शिकवलंय मला, प्रेम केल तर वेड्यासारखं कराव. कुणाचा हि विचार न करता कुणाच हि न ऐकता.
ओमकार : मग कुणाच हि न ऐकता, आपण प्रेम करत रहाव. कुणाच ऐकून कुणासाठी तरी आपण आपल प्रेम सोडू नये हे इतक गणित नाही का कळाल त्या प्रेम मास्तराला ?
अंजली : परिस्थिती तशी होती. त्याचे हात दगडाखाली अडकलेले म्हणून.
ओमकार : हो, काही का असेना. हात दगडाखाली असुदे नाहीतर आख्खा दगड अंगावर असुदे. दिलेलं वचन आणि शब्द बदलला जातो तिथ प्रेम खरच असत का ?   
अंजली : तुला काय वाटत ? तुझ आहे माझ्यावर खर प्रेम ?
ओमकार : हो.
अंजली : बोलून दाखवत नाहीस कधी. का ?
ओमकार : जे आहे ते सांगून बोलून उपयोग काय ? ते समजून घेण्यात खरी मजा आहे.
अंजली : तेच.
ओमकार : काय ?
अंजली : तसच तो पण माझ्यावर प्रेम करत आहे. बोलत नसला तरी कळत मला.
ओमकार : अस तुला वाटत. पण वाटण आणि तस असण खूप मोठा फरक आहे त्यात. जस कि एखादी झोप आणि झोपेतल स्वप्न. यात झोप खरी असते. पण स्वप्न खोट-काल्पनिक असत. तुला वाटत कि त्याच तुझ्यावर प्रेम आहे हे तुला वाटत ते खोट-काल्पनिक आहे. पण तस काहीच नाहीये हे झाल खर.
अंजली : ओमकार.. माझ त्याच्यावर खूप आहे.
ओमकार : पण पुढ काय ? असल प्रेम करत तू माझ्याजवळ राहून तुला काय मिळणारे ? आणि माझ काय ? यात तो तिकड सुखात. तू त्याच्या प्रेमात माझ काय पण ?
अंजली : आज जाऊ दे मला, प्लीज अजिंक्यकडे. 
( images by Unplash.com )
भाग ०२
ओमकार : बंधन तुला नाहीयेच कसलच. आणि म्हणून बहुतेक हि अशी अवस्था आहे. प्रेमात बंधन नसाव म्हणतात. मी पण तेच केल. सुट दिली तुला आणि तू प्रेम केलस दुसऱ्यावर. प्रेमातल्या जेवढ्या काही माहितीतल्या व्याख्या आहेत न सगळ्या पुसून टाकल्यात तू. अंजली, प्रेम खर खोट आपल परक काय आणि कस असत मला माहित नाही पण.... पण नेमक प्रेम म्हणजे काय हे तुला हि कळाल नाहीये. प्रेमात हरवून असाव कि, पण इतक हि नाही कि जग दुनिया विसरली जावी. तुझा तो अजिंक्य, काय जादू केली त्याने तुझ्यावर कि, तू इतकी त्याच्यावर फिदा झालीस आणि माझ्यात काय कमी आहे कि, लग्न झाल्यापासुन मी सोडल तर तू स्वतःहून मला कधी जवळ घेतल नाही. कीस केल नाही. आणि सेक्स. हाहा.ss सेक्स म्हणजे माझ्यासाठी एक कल्पनाच आहे. अशी कल्पना जी कि मी करतो, तुझ माझ्यावर प्रेम आहे. लग्न माझ्याशी. राहण खाण पिण माझ्यासोबत. आणि प्रेम त्या लेखकावर ? त्याचा पगार तरी आहे का ? आल काम तर पैसा नाहीतर कोण कुत्र विचारत ग लेखकांना ?? विक्षिप्त लोक. उद्या तुझ्याहून सुंदर कोण मिळाली त्याला तर कोण अंजली म्हणून विचारेल. तुला... तेपण तुझ्याच तोंडावर. तेव्हा ? काय करणार ? मी तुमच आणि स्पेशली तुझ सगळ वागण विसरून जाईन. तुला नव्याने मी सामावून घेतो माझ्या या आयुष्यात. अस हि हे आयुष्य आपलच तर आहे.
अंजली : जाशील सगळ विसरून तू ? इतक्या सहज करशील मला जवळ ?
ओमकार : हो. करेन.
अंजली : हा प्रस्ताव समजू कि,
ओमकार : प्रेम. माझ तुझ्यावरच प्रेम. अस म्हणतात आपण कुणावर प्रेम करतो त्यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करत त्याच्यावरच आपण हि प्रेम करून त्याला परिपूर्ण कराव.
अंजली : अजिंक्यच ही माझ्यावर प्रेम आहे.
ओमकार : त्याच प्रतीक्षावर पण प्रेम आहे. मग ?
अंजली : हहं, प्रतीक्षा, असावरी, ज्योती, प्रियांका या मुलींवर पण त्याच तितकच प्रेम आहे.
ओमकार : प्रेम आहे का वस्तू ? एकसारखी वाटत सुटायला ?
अंजली : तूच म्हणालास न लेखक विक्षिप्त असतो. आहे तो. अगदी तसाच. विक्षिप्ता सारखा प्रेम करतो तो प्रत्येकीवर. आणि करून विसरत नाही. जपतो. प्रियांकाच लग्न झाल का नाही मला माहित नाही. असावरीच लग्नाच सुरु आहे. ज्योतीची माहिती नाही मला. आणि मी लग्न केलेलं आहे. प्रतीक्षाच झालेलं आहे. आणि दुसरी प्रतीक्षा.. तीच पण झालय.
ओमकार : वाह. तुला सगळ्यांची माहिती आहे. मग तुझी पण असेल त्यांना माहिती ?
अंजली : सगळ्यांचे नंबर माझ्याकडे आणि माझे सगळ्यांकडे आहेत.
ओमकार : काय आहे हे. मला तर समजत नाहीये. सगळ त्याच माहित असून पण तुम्हाला तोच का हवाय ? तो लग्न करून तिकड मजा मारतोय आणि तुम्ही तुमच आयुष्य वाया घालवत बसलाय त्याची वाट बघत. आणि मी म्हणतो जरी तो आला तुमच्याकडे तरी तो एकीकडेच येणारे.
अंजली : माहितीय.
ओमकार : मग माहित असून पण हे अर्धवटपणाच वागण वागवून का जगतेस ?
अंजली : उत्तर नाही माझ्याकडे पण एक वचन देते. तीन महिन्यानंतर मी तुझीच असेन. आयुष्यभरासाठी.
ओमकार : माझी असून काय करू मी ? जी गोष्ट एक नवरा बायकोत हवी, ती गोष्ट तू त्याच्यासोबत करून त्याच्या नावच मुल पोटात वाढवून त्याच नाव पण अजिंक्य ठेवायचं म्हणतेस. आता फक्त आडनाव त्याला भोसले लाव म्हणजे झाल. बापच नाव पण लाव त्यालाच.
अंजली : कस वाटेल ते ? अजिंक्य अजिंक्य भोसले ?
ओमकार : वाह. म्हणजे इच्छा आहे तर तुझी भोसले नाव लाऊन घ्यायला ?
अंजली : नाही रे, मी मज्जा केली. किती चिडतोस. मला नाही आवडत तू असा.
अंजलीच्या पोटाला बघत ओमकार बोलतो.
ओमकार : आणि हा पराक्रम कधी केलास ?
अंजली : सहा महिने झाले.
ओमकार : तो महितीय. हे, म्हणतोय मी. व्रण कसेल हे ? आणि कधी केलेस ?
अंजली : रात्री बिना धारेच्या सुरीने ओढले वार. पोटावर नको म्हणून बाजूला ओढले जरा. म्हणजे कस त्याला भेटले कि, साडीच्या पदरामुळे कंबरेवरचे हे व्रण दिसतील न माझ्या अजिंक्यला. मग माझी जरा काळजी घेईल तो. 
ओमकार : तुला काय वाटत का ? वार खोल गेला असता. काय झाल असत तर ?
अंजली : तू होतास कि. तू असतान मी का काय वाटून घेऊ.
ओमकार : माझी सीमा संपत चाललीय अंजली.
अंजली : अजून काही दिवस सहन कर,
ओमकार : होईल अस वाटत नाही.
अंजली : बर मला सांग हे वार कसे झाले काय सांगू माझ्या आजुडीला ?
ओमकार : तूच ठरव. मी जातो.
तो बाहेर हॉलमध्ये निघून गेला.
अंजली : ( स्वतःशीच ) नवऱ्याने आपल्या बाळाला मारून टाकायचा प्रयत्न केला. म्हणून हे वार झाले अजिंक्य.  
( image by Unplash.com )

भाग ०३
ओमकार : हे बघून तो काय करणारे ?
अंजली : माहित नाही. पण काळजी वाटेल त्याला माझी.
ओमकार : तुझा हा समज गैरसमज आहे. त्याला वाटेल काळजी मी मान्य करतो. पण तुझी नाही त्या बाळाची. जे त्याच आहे.
अंजली : मी हि त्याचीच आहे. आणि हो ते बाळ माझ्या पोटात आहे.
ओमकार : सामान कुणाकडे जरी असल तरी सांभाळणाऱ्याला महत्व नसतच कधी. ना त्याचा तो मालक असतो. त्या बाळाचा मालक तो आहे आणि तुझा वापर त्याला नऊ महिने सांभाळण्यासाठी आहे. बस इतकच गणित आहे हे. गुणिले आणि भागिले या कोड्यांपेक्षा सोप्प. अंजली, तू म्हणत असशील तर मी हे तुमच बाळ पण मी माझ म्हणून सांभाळेन. त्याला चांगल भविष्य देईन. पण तू माझी बनून रहा ना.
अंजली : अरे मी तुझीच आहे.
ओमकार : आणि त्याची पण. आणि तू फक्त माझी व्हावस अस मला वाटत.
अंजली : तुलाच त्रास होतोय यात फक्त असा तू आव आणू नकोस, ओमकार. यात त्रास मला हि होतोय. त्याला हि होतोय. आणि तुलासुध्दा. आम्हाला या नात्यातून वेगळ व्हाव अस वाटत नाहीये. मग का आम्ही वेगळ होऊ ?
ओमकार : आयुष्यभर तो ठेवेल तुझ्याशी नात मग काय असच राहणार का त्याच्या प्रेमात तू ? तुला माझा, माझ्या आई-बाबांचा विचार येतच नाही का ? उद्या कळाल त्यांना तर मी हि काही करू शकणार नाही ? तुला जाव लागेल.
अंजली : कुठ ?
ओमकार : घर सोडून. तुला वाटेल तिथ. तेव्हा तुला तुझ आयुष्य मोकळ असेल काहीही करायला.
अंजली : मी कुठ जाणार ? माझे आई बाबा मला नाही घरी घेणार.
ओमकार : तो तुझा प्रश्न असेल माझा नाही. आणि मी साहजिकच तेव्हा मझ्या आई बाबांना दुखावणार नाही. प्लीज. त्यांना बाळ हव होत. ते होतय. किती खुश आहेत ते. पण त्यांना कळाल कि हे बाळ आपल नाही तर ? आणि मी म्हणतो. जर आपण राहिलोच एकत्र. अगदी बाळ मोठ होईपर्यंत तर,
अंजली : तर काय ?
ओमकार : त्या बाळाची गुण, वागण बघून आई-बाबांना कळेलच ना कि बाळ वेगळ वागतय म्हणून. आणि मी कितीही उदारपणा दाखवला तरी मला त्या बाळाला जवळ घेताना अजिंक्यच समोर येईल. आणि मी नाही करू शकणार इतक प्रेम जितक अजिंक्य करू शकेल त्या बाळावर आणि तुझ्यावर पण.
अंजली : म्हणजे हे ठरल तर, मी इथे रहायच्या लायकीची नाही. माझ बाळ आणि मी इथून निघून जाव. बरोबर ?
ओमकार : मी अस म्हंटल नाहीये. आणि म्हणायचं असत तर केव्हाच जेव्हा तू लग्नाच्या रात्री सांगितलस तेव्हाच तुझ्यासून लांब झालो असतो. पण मी समजून घेतल तुला.
अंजली : पण म्हणून तू माझा लगेच मसिहा नाही झालास. तुझ ते प्रेम आहे माझ्यावरच. आणि त्याच प्रेमाखातर मला एकदा संधी दे. एकदाच मला त्याला भेटायला जाऊ दे.
ओमकार : नक्की ? परत नाही भेटणार ना त्याला ?
अंजली : हो. नाही भेटणार.
ओमकार : जा. पण मला एक सांग.
अंजली : काय ?
ओमकार : या बळाच काय करायचं आपण ?
अंजली : तू लावणार आहेस का या बाळाला तुझ नाव ?
ओमकार : नाव लावून तो माझ्यासारखा तर वागणार नाही. ना. तो भोसलेच शोभेल.
अंजली : पण त्याला अजिंक्यच नाव लावून मी इथ कस काय ठेवू शकते. आई-बाबा नाही मला इथ राहू देणार. आणि तू म्हणतोस कि मी आई-बाबांचं ऐकेन. म्हणजे मग मी जाऊ कुठ ?
ओमकार : हा विचार आधी करायचा होता अंजली.
अंजली : सॉरी. हि गोष्ट अजिंक्य बोलला होता मला पण. त्याच्या दूर जाण्याला घाबरून मी जबरदस्ती त्याच्यासोबत नात बनवल आणि बाळ व्हाव म्हणून प्रयत्न केले.
ओमकार : बर.
अंजली ओमकार जवळ गेली. त्याला घट्ट मिठीत घेतल. रडायला लागली.
अंजली : मी, अजिंक्यशिवाय राहू शकत नसेल तरी लांब राहतेच त्याच्यापासून. पण तुझ्यापासून नाही राहू शकत. तुझी सवय लागलीय मला. माझ तुझ्यावर हि प्रेम आहे. खूप. प्लीज, एकदा मला समजून घे मी पाया पडते.
ती खाली वाकायला जाते. ओमकार तिला खांद्यांना धरून वर करतो आणि तिच्याकडे एकटक बघतो.
ओमकार : हि शेवटची माफी. पुन्हा जमेल न जमेल माहित नाही. पण माझ्यातला हा समजूतदार ओमकार नाही राहणार.
अंजली : तुझ्यातला समजूतदारपणा आणि तुझ्यातल प्रेम. मी जपेन. आणि वाचन देते तुला. मी तुझीच बनून कायम राहीन.
ओमकार : बर.
अंजली : फक्त तू, हे सगळ विसरून जा. मी पण मग नंतर अजिंक्यला विसरून जाण्याचा प्रयत्न करेन.
ओमकार : विसरण्यासाठी सगळ बोलून मोकळ व्हाव लागत. तू मला जितक सांगितल आहेस त्यात अजिंक्य मला विलन वाटतो. तू आता सगळ सांग मला पण बघू दे, तुला त्याच्यात अस काय दिसलय कि तुला लग्न होऊन पण कशाची तमा नाही. का त्याच्यावरच तुझ प्रेम कमी होईना ?
अंजली त्याच्या शेजारी सोफ्यावर बसली. ओमकारचा हातात हात घेऊन त्याच्या खांद्यावर डोक ठेवून ती बोलायला लागली.
भाग ०४
अंजली : काही गोष्टी बोलण्यापेक्षा त्या गुपितच बऱ्या. अस हि अजिंक्य आणि अंजली वेगळे होणारच आहेत. आणि ते जेव्हा वेगळे होतील तेव्हा तू मला नाही आपलस करून घेणार. आणि मला ते नकोय. हा माझा स्वार्थ समज. पण माझ प्रेम स्वार्थी नाही.
ओमकार : पण मी तुझा भूतकाळ विसरून जाणार हा ऑप्शन तुला दिला आहेच कि.
अंजली : हो मग म्हणून मी माहित नसलेला भूतकाळ पण तुला का सांगावा. नंतर तुझा भूतकाळ विसरून जायचा विचार बदलला तर ?
ओमकार : मी माझ्या शब्दावर ठाम आहे. आणि असेन.
अंजली : माझ्या पहिल्या भेटीत त्याने मला कीस केला.
ओमकार : बर.
अंजली : अस मी सांगितल असत पण तस नाहीये मी शांत होते. हे प्रेम वैगरे माझ्या स्वप्नापलीकडच जग होत. मुलांशी बोलन असायचं माझ. पण दोन तीन. आणि चौथा असेल अजिंक्य. का कुणास ठाऊक पण त्याची बोलण्याची पद्धत. तो चित्रकार. लेखक. कवी. त्याच्या अवती भवती मुलींचा गराडा असायचा. त्यात त्याच प्रतीक्षाच प्रकरण. अगदी प्रत्येक मुलीच्या तोंडी होत. अजिंक्य आणि प्रतीक्षा एकत्र नाही हि गोष्ट हि तितकीच जगजाहीर होती आणि त्याचाच फायदा घेऊन कित्येक मुली त्याच्या मागे हात धुवून मागे लागेलेल्या. पण कुणाच्याच हाताला अजिंक्य लागत नव्हता. अशात ३० जूनला अजिंक्य मला रस्त्यावर एका बाकावर बसून चित्र काढत असताना दिसला. मी विचार केला. पण विचार न करता त्याच्याजवळ गेले. मी ठरवल होत त्याच जे नाव लोकांच्यात तरूण मुलांच्यात आणि स्पेशली मुलींच्यात नाव आहे तोच विषय घेऊन त्याच्याशी बोलायला सुरुवात करावी अस ठरवून मी रस्ता पार करून त्याच्या शेजारी अंतर ठेवून बाकावर बसले. रस्ता सामसूम होता. पण मन माझ कित्येक प्रशांनी भरून गेलेलं. चक्का जाम.
ओमकार : मग ?
अंजली : मी त्याच्याकडे बघितल आणि नेमक त्याच क्षणाला त्याने माझ्याकडे बघितल. मी बोलणार तोच तो बोलला.
अजिंक्य : अंजली ? इकड कुठ ?
अंजली : मी दचकले. ज्या मुलाच नाव मी ऐकून होते. ज्याच्या अवती भवती इतक्या मुली होत्या. मी तर आसपास काय कोसो दूर पण त्याच्या जवळ नव्हते आणि त्याला माझ नाव कस माहित या विचाराने मी त्याला एक विचारल.
ओमकार : काय ?
अंजली : तुला माझ नाव कस माहित ?
अजिंक्य : तू तुझ्या सुंदर अक्षरात लिहून दिलेल्या पाच कविता माझ्याकडे आहेत. ज्या तू असावरीला लिहून दिल्या होत्या.  
अंजली : असावरी, तिला कस ओळखतो तू ?
अजिंक्य : ओळखतो. ती माझ्याकडून कविता बनवायला शिकते.
अंजली : मग माझ्या अक्षरावरून तू मला कस ओळखलस ?
अजिंक्य : काही प्रश्नांची उत्तर शोधावीत. आयती उत्तर त्यातला रस घालवून टाकतात.
तू अंजली आहेस. हे खर आहे. मी तुला ओळखतो हे हि खर आहे. आणि तू मला ओळखतेस हे हि खर आहे. हो ना ?
अंजली : हा ?
अजिंक्य : ओळखतेस ना मला ? म्हणून तर इथे मला बघून येऊन बसलीस.
अंजली : हा.
अजिंक्य : काय बोलायचं आहे का ?
अंजली : लेखक, कवी न बोलता पण खूप बोलतात अस ऐकून आहे.
अजिंक्य : प्रत्यक्ष पण असच असत. खर आहे हे. आपल बोलन सुरु होण्याआधी पासून मी अगदी तू रस्ता पार करून इकडे येण्याआधी पासून मी तुझ्याशी बोलायला सुरुवात केलीय. कळाली का तुला ?
अंजली : नाही.
अजिंक्य : मग ह्या ऐकू येणाऱ्या बोलण्याचा उपयोग काय ?
अंजली : अस का ?
अजिंक्य : माहित नसलेल्या गोष्टी जेव्हा समोर पेश होतात. तेव्हा त्या सहज समजून जाव्यात ते हि पहिल्याच भेटीत. मग उपयोग काय ?
अंजली : सगळच तू अस कायम कोड्यात बोलतोस का ?
अजिंक्य : कोड सोडवायला लोक असतात समोर. मग अशी हि शब्दांची कोडी बनवायला मला हि आवडतात. 
भाग ०५
अंजली : सगळ्यांनाच कोडी सोडवता येत नाहीत.
अजिंक्य : कोडी सोडवायची कि तशीच सोडायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पेपरमध्ये येणारी कोडी प्रत्येक पेपर वाचणारा सोडवतो का कधी ?
अंजली : नाही.
अजिंक्य : हा, काही सोडवतात काही निम्मी सोडवतात. काहीना तर कोडी सोडवता येतच नाही म्हणून ते तो भाग सोडून अख्खा पेपर वाचून काढतात. पण म्हणून कोड सोडवता न येणाऱ्या लोकांसाठी पेपरचा संपादक पेपरमध्ये कोड छापायच बंद करत नाही.
अंजली : पेपरच माहित नाही पण शब्दांची आणि वाक्यांची हि तुझी कोडी सोडवायला मला आवडतील. ए, तुला मी अरे वैगरे म्हणाले तर चालेल ना. म्हणजे आपण एकाच वयाचे आहोत पण तुझ खूप नाव आहे पण तुझी प्रसिध्दी असली तरी तू तसा वाटत नाहीस मोठा.
अजिंक्य : काही हरकत नाही. काही काम होत का ?
अंजली : नाही. काम असेल तरच माझ्याशी बोला असा काही तुझा कायदा किंवा एखादा नियम आहे का ?
अजिंक्य : ( चित्र काढत ) नाही.
अंजली : वॉव..! बघू चित्र. किती सुंदर काढलयस. हुबेहूब एकदम.
अजिंक्य : हम.
अंजली त्याच्या हातात तो चित्राचा कागद देत, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत बोलू लागते. तिच्या नजरेत अजिंक्य हरवत चाललेला हे तिला कळत होत, पण त्याच्या बोलण्यात सोबत नजरेत ती त्याच्या कधीच हरवून गेलीय याची भणक हि तिला लागली नव्हती.
अंजली : काल तुझा वाढदिवस होता ना ?
अजिंक्य : हा प्रश्न आहे का उत्तर ?
अंजली : ( गालात लाजत ) दोन्ही हि.
अजिंक्य : हम.
अंजली : प्रियांकाने सांगितल मला. तिने तुला गिफ्ट दिल. तुझ्यासाठी केक आणला. तिच्या मैत्रिणींसोबत तुझा वाढदिवस साजरा केला. मला पण बोलावलेल तिने.
अजिंक्य : हम.
अंजली : काय गिफ्ट दिल तिने तुला ? आणि खूप आली असतील न तुला गिफ्ट्स.
अजिंक्य : हम.
अंजली : मला यायचं होत तुझ्या वाढदिवसाला पण कस येऊ या विचारात मी आले नाही. मला आधी माहित असत कि तू मला ओळखतोस तर मी हक्काने आले असते. पण शीटट..! वेळ निघून गेली. कालचा दिवस मग खूप चांगला साजरा झाला असेल तुझा.
अजिंक्य : हो.
अंजली : म...ग...किती प्रपोज आले काल ?
अजिंक्य : नाही काहीच.
अंजली : सांगू शकतोस तू मला. मी नाही सांगणार कुणाला. प्रियांकाला पण नाही.
अजिंक्य : तिचा काय संबंध ?
अंजली : तुमच सुरु आहे ना ?
अजिंक्य : संपल.
अंजली : मग कालचा तिचा तो वाढदिवस साजरा करण्यामागचा हेतू ?
अजिंक्य : विषय खूप आहेत ना ? जगात बोलण्यासारखे ?
अंजली : हो.
अजिंक्य : त्यातला एखादा घेऊन बोलू. नाहीतर मी आहेच इथ चित्र काढत.
अंजली : एक विचारू ?
अजिंक्य : हम ?
अंजली : मी ऐकलय मुलींकडून.
अजिंक्य : काय ?
अंजली : कि तुझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत जवळच्या, त्यातल्या तुला आवडणाऱ्या मुलींना तू किस केलायस. आणि कोण आवडल तुला तर तू करतोस.
अजिंक्य : कोण म्हंटल ?
अंजली : आहेत बऱ्याच एक अस कोण नाही.
अजिंक्य : बर सांग बऱ्याच जणींची नाव.
अंजली : तू उत्तर सांग ना.
अजिंक्य : माहित नाही.
अंजली : अस कस माहित नाही ?
अजिंक्य : मी उत्तर द्याव कि कबूल व्हाव काय वाटतय नक्की तुला ? जे माझ आहे त्याबद्दल मी उत्तर देणार नाही आणि जो गुन्हाच नाही त्याबद्दल मी कबूल होणार नाही. बस विषय संपला.
अंजली : सॉरी.. राग आला न तुला. मी आत्ता काय आणल पण नाही तुला द्यायला. गिफ्ट वैगरे. आज करायचा आपण तुझा वाढदिवस ?
अजिंक्य : का ?
अंजली : असच माझी इच्छा आहे. प्लीज. काल झाला तुझा वाढदिवस मला जमल नाही यायला. पण आज पण करू शकतोच ना आपण.
अजिंक्य : आजच आहे.
अंजली : काय ?
अजिंक्य : माझा वाढदिवस.
अंजली : मग काल काय होत ?
अजिंक्य : मला नाही माहित.
अंजली : तुला काय करायला आवडेल माझ्यासोबत ?
अजिंक्य तिच्याकडे एक नजर बघतो. आपण चुकीच वाक्य बोललो गेलोय हे लक्षात आल्यावर अंजली पटकन बोलली,
अंजली : म्हणजे जेवायला, कुठे फिरायला किंवा गप्पा मारायला.
अजिंक्य : मला कसलाच मूड नाही. मी जातोय. हिरापूरला.
अंजली : ते कुठ आहे ?
अजिंक्य : कोंडव्यात.
अंजली : म्हणजे साताऱ्यातल कोंडवे का ?
अजिंक्य : हो.
अंजली : पण तिथ काय आहे ?
अजिंक्य : नदी आणि शांतता.
अंजली : मी येऊ ? तुझ्यासोबत ?
अजिंक्य : हम. 
  
भाग ०६
अंजली : तो होकार देईल अर्थातच मला वाटलेलं. पण तो नाही म्हणाला.
अंजली : का ? कोण दुसर भेटणारे का तुला ?
अजिंक्य : नाही. पण एकांतात एकटेपणा असेल तरच त्याला अर्थ आणि त्या शब्दाला हि अर्थ मिळतो.
अंजली : एक बोलू ?
अजिंक्य : काय ?
अंजली : एकांत जरी असला तरी तो सोबत असतो. आपला नसतो. आणि एकांतात असे बरेच विचार सोबत असतात कि तू म्हणतो तसा त्याला काही अर्थ उरत नाही. माणूस जितका एकटा तितके विचार जास्त येतात त्याला. पण माणूस कुणासोबत असेल तर त्याचे विचार काही थोडके किंवा काही क्षुल्लक असतात आणि मला वाटत माणसाच्या आयुष्यातला तो खरा एकांत कि जेव्हा तो कुणासोबत असतो.
अजिंक्य तिला बघत असतो.
अंजली : असा का बघतोयस ? खूप जास्त बोलले ना मी ? तुझ्याशी बोलता बोलता मी पण लेखकासारख बोलायला लागले. भारी ना ?
अजिंक्य : तेच बघतोय. चल.
अंजली : आ ?
अजिंक्य : चल सोबत.
अंजली : चल.
अजिंक्य उठून गाडीजवळ गेला. मागून अंजली त्याच्या शेजारी उभी राहिली थोड अंतर ठेवून. अजिंक्यने गाडी सुरु केली. आणि त्याने तिला खुणावल. ती तशी गाडीवर बसली. गाडी निघाली वाऱ्याला मागे टाकत. वाऱ्याची मिजास घालवत. गाडी हिरापूरच्या रस्त्यावरून चालत होती. हिरवगार उसाच शेत. पुढे मोकळ सोडलेलं कॅनॉलच पाणी. आधी-मधी बैल गाड्या आणि धडकी भरतील अशी त्या जोडलेल्या बैलांच्या जवळून जेव्हा यांची गाडी जात होती तेव्हा अंजली गच्च डोळे मिटून तोंड विरुध्द दिशेला करून घोट्यापासून पाय जरासा उचलून अकडून अजिंक्याच्या खांद्याला घट्ट पकडत होती. माझ्या त्या स्पर्शात काहीच नव्हत आणि अजिंक्यला हि काही वाटत नव्हत.
ओमकार : तुझा स्पर्श कसा होता हे तुला माहित होत. मान्य, पण त्याला काही वाटल नाही हे तुला कुणी सांगितल ? मुल अशी नसतात जस तू समजतेस. मुल असतात त्याच्या विरुध्द असतात.
अंजली : तू माझ्यावर प्रेम करतोस ना ? मग त्याच्या विरुध्द ?
ओमकार : शब्दात पकडू नकोस आणि पकडायचंच असेल तर, अजिंक्य तुझ्यावर प्रेम करतो अस तुला वाटत पण तस नाहीये. आणि राहिला माझा विचार तर मी तुझा नवरा आहे.
अंजली : मग एकच उपमा सर्वांना सारखी नसते. जशी हि तुझी ओळ तुझ्यावरच लागू होत नाही तशी त्याच्यावर पण होत नाही. तू आधी सगळ ऐकून घे आणि मग ठरव.
ओमकार : बोल.
अंजली : आम्ही नदीपाशी आलो. मोठी उंच झाडी. निदान चाळीस पन्नास फुट उंच. चिंचाची. नदीच्या बाजूला मोठाली दगड होती आणि माणूस तिथ एक हि नाही. मी सुरुवातीला घाबरून होते. पण का कुणास ठाऊक मला त्याला पाठमोर बघून त्याच्याबद्दल विश्वास वाटत होता. मी त्याच्या मागे चालायला लागेल. मला अंदाज होता तो मला झाडाझुडूपाच्या बाजूला नेईल. जेणे करून आम्ही कुणाला दिसणार नाही. पण तो तर मोकळ्या जागेत दगडावर बसला पाण्यात पाय सोडून. मी बाजूला त्याच्या बसले. दोघांच्या मध्ये त्याची ती डायरी होती ज्यात तो चित्र काढत होता.
अजिंक्य : हम, बोल आता काय बोलायचं होत तुला ?
अंजली : आ ?
अजिंक्य : बोलायचं होत न तुला काहीतरी माझ्याशी ?
अंजली : अस काही नाही.
अजिंक्य : मग सरळ रस्त्याने चालत जाणारी मुलगी रस्ता पार करून माझ्याजवळ येऊन बसते. आणि आत्ता पहिल्या भेटीत माझ्यासोबत अशा सुनसान ठिकाणी येते. म्हणजे काहीतरी बोलायचं असणारच ना ?
अंजली : बोलायचं अस काही खास नव्हत. म्हणजे विषय नाही माझ्यापाशी. मी काय ठरवून आले नव्हते ना.
अजिंक्य : पण रस्तापार करून माझ्याकडे येताना काहीतरी विचार आलाच असेल ना तुझ्या मनात ?
अंजली : तुझ्याशी बोलू वाटल काहीही. तुझी तारीफ तुझ्याबद्दल खूप ऐकल. त्यामुळे इच्छा होती कि तुला भेटाव. तुझ्या कविता. तुझे लेख. तुझी प्रतीक्षाला लिहिलेली प्रेम पत्र अशी मुलींच्या तोंडावर पाठ आहेत. पण ते लिहिणारा नक्की तसाच आहे का हे बघायचं होत जवळून.
अजिंक्य ती दोघांच्या मधली डायरी उचलून तिच्याकडे बघतो.
अजिंक्य : जवळून ? ह ?
अंजली : अ, हा. आजकाल कोण खर नसत ना. आणि तुझ लिखाण खर वाटल मला. पण प्रश्न पडला कि त्यामागचा तू कसा आहेस.
अजिंक्य : काय वाचलयस तू ?
अंजली : मी तुलाच वाचलंय.
अजिंक्य : का ?
अंजली : नकळत गेले वाचत. मी शब्द वाचत होते. वाक्य तुझ होत गेल. आणि मी तुला समजत, ओळखत गेले.
अजिंक्य : आरसा आणि अजिंक्य सेम आहेत. जे आहेत ते तसेच आहेत. आणि तसच दाखवतात. वेगळ काही जाणवल तर तो वेगळेपणा तुमचा. त्यात आम्ही सामील नाही.
अंजली : मी बरोबर होते.
अजिंक्य : कशात.
अंजली : तू खरा आहेस. तुझ्या लिखाणासारखा.
अंजली : आम्ही शांत झालो आणि त्याने मला ‘रुसवा, दिली.

भाग : ०७
ओमकार : रुसवा ?
अंजली : मी त्याला भेटेन. तो माझ्याशी बोलेल. त्याच्या खऱ्या वाढदिवसाची तारीख आजची असेल काहीच माहित नव्हत ना मला. त्यामुळे त्याच गिफ्ट पण मी आणल नव्हत सोबत. तुला वाटतो तसा नाहीये तो. तेव्हा पोरी वेड्या होत्या त्याच्यासाठी. आणि माझ्याशी हि त्याने बोलाव अस मला एक दोनदा वाटलेलं. अचानक भेटण, बोलण, त्यात फिरायला जायचं ठरल. मी त्याला गिफ्ट द्यायचं तर त्याने मलाच गिफ्ट दिल. रुसवा. त्याने हातातल्या डायरीच पान फाडून मला दिल. मी कविता वाचली. आणि माझ्या छातीत धडधड व्हायला लागली. डोळ्यात पाणी साचल. आयुष्यात माझ्यासाठी कुणीतरी कविता बनवलेली. आणि याहून जास्त आनंद झाला यामुळे कि त्याच्या मागे किती मुली होत्या आणि त्याने त्यांना सोडून माझ्यासाठी कविता बनवलेली.
ओमकार : आहे का ती कविता अजून तुझ्याजवळ ?
अंजली : नाही.
ओमकार : का कुठ गेली ?
अंजली : घरी सापडली आईला. जाळून टाकली तिने. पण कविता माझ्या लक्षात राहिली. मोठी होती पण मी दोनशे, अडीचशे वेळा तरी वाचली असेन ती कविता. पाठ झाली. हा, आता या इतक्या वर्षात गेली डोक्यातून थोडीफार.... पण आहे जरा लक्षात.
नाव रुसवा,
तू जवळचा बनवून मला सोडून लांब निघून गेलीस तेव्हा,
रुसवा, रुसवा मी.
ना माझ्या शब्दात तू आलीस.
ना आठवणीत.
क्षण काहीच फक्त जगलीस
बाकी क्षण उरलेच तरी.
रुसवा, रुसवा मी
तू परत आली नाहीस.
मला समजवायला, मला मनवायला.
जवळ घ्यायला, प्रेम द्यायला.
विचारात पुन्हा यायला किंवा विचार नवे द्यायला.
रुसवा, रुसवा मी
तुझ्यासाठी लिहितो.
कोणी वाचत त्याला, कोणी लिहून दिली मला.
त्या अक्षराचा चाहता मी, कोण आहे ती ?
जिची अक्षरे लकब अशी
कि कवितेत हि अदा बदल आहे.
रुसवा, रुसवा मी
तू नाही, कविता तरी हसरी आहे
ती हि होती रुसवा कधी, अक्षराने प्रेम दिले आहे.
रुसवा, रुसवा होतो मी
कविता लिहिणारी कोण आहे ती ?   
पुढच आठवत नाही. माझीच तारीफ होती त्यात पण लक्षात नाही. मी रडले. मला अगदी भरून आलेल बघून त्याने फक्त माझ्या हातावर हात ठेवला. आणि मी पटकन त्याच्या मिठीत शिरले. त्याचे हात मात्र त्याच्याच मांडीवर होते. मी त्याच्याकडे बघितल. डोळ्यात साचलेल्या पाण्याने तो अस्पष्ट दिसत होता मला. पापणी बंद करून उघडी केली आणि डोळ्यातल पाणी ओघळ बनून गालावर निघून गेल. आणि मी माझा चेहरा त्याच्या जवळ नेला. त्याच्या हातावर हात ठेवला. त्याला अंगावर काटा आलेला. जाणवला मला. तरी मी पुढे सरले. त्याच्या खालच्या ओठापाशी किस केला आणि सावरलेला अजिंक्य विस्कटला. त्याने माझ्या ओठांना त्याच्या ओठात पकडल. पण नुसत पडकल. मी मग त्याच्या ओठांना चावल्यासारख चाऊ लागले.
ओमकार : किती जणांना या आधी किस केलेलास ?
अंजली : अजिंक्यच पहिला.
ओमकार : मग किस कसा केला तू ?
अंजली : किस काय फक्त मुलांनाच जमतो किंवा त्यांनीच करावा असा कुठ नियम आहे ? उलट तेव्हा मला तो मुलगी आणि मी मुलगा वाटत होते. मी त्याला किस केला. पुढे दहा मिनिट आम्ही दोघ शांतच होतो. मी त्याच्या प्रेमात आणि तो माझ्या विचारात होता. नंतर तो बोलला.
ओमकार : आय लव्ह यु ?
अंजली : चल जाता. उशीर होईल.
मी उठेल त्याच्यासोबत निघाले. काहीच बोललो नाही आम्ही.
कॉलेज मध्ये दुसऱ्या दिवशी मी अजिंक्यला प्रियांका सोबत बघितल. ती त्याच्या शेजारी बसलेली. मला नाही आवडल. तो निघून गेला आणि मी तिला भेटले. तेव्हा समजल तीच नाव प्रियांका. तिच्याशी बोलल्यावर समजल तीच त्याच्यावर प्रेम आहे.
माझ पण होत. पण मी तिला तिथ काहीच बोलले नाही. पण अजिंक्यला माझ बनवायचं हा मात्र विचार पक्का केला मी. तिच्याशी मैत्री करून मी अजिंक्यबद्दल सगळ जाणून घेतल.
ओमकार : मग ?
अंजली : अजिंक्य प्रियांका नंतर जोडला गेला अंजली सोबत. किती भारी नाव वाटत अजिंक्य अंजली. ते प्रियांका आणि प्रतीक्षा काय वाटत नाव. जुळत का तरी ? अ कुठ प्र कुठ ? आमच दोघांच कस सेम अक्षर आहे नावाच. दोघ वेगळे झाले. आणि मी त्याला माझ बनवल. वेडा आहे तो. प्रेम करत सुटतो सगळ्यांवर. एकसारखं. मला प्रियांका नाही प्रतीक्षापेक्षा जास्त त्याच प्रेम मिळवायचं होत. प्रतीक्षा आणि अजिंक्य एकत्र होते पण अजिंक्यने तिला कधी किस केला नव्हता आणि सेक्स तर लांबचीच गोष्ट. जेव्हा प्रियांका मला रडत सांगत होती कि दोघांच ब्रेकअप झालय तेव्हा ती बोलता बोलता बोलून गेली कि त्या दोघांच्यात दोन तीनदा सेक्स झालाय. दोन आणि तिनच्यापेक्षा जास्त सेक्स अजिंक्यशी करून मला त्याला माझ बनवायचं होत. मी घरी आई बाबा नव्हते तेव्हा त्याला मी आजारी आहे सांगून बोलवल. त्याने मला खायला बनवल. माझी काळजी घेतली. अगदी मला धरून जागच उठवण्यापासून अगदी हातात भरल ताट आणून दिल. पाणी दिल. ताटात हात धुतला स्वतःच्या हाताने माझा हात. नंतर मला गोळ्या देऊन माझा पाय दुखतो म्हणून दाबून दिला. इतक सगळ त्याने केल. मी आजारी नसताना. मग मी खरीच आजारी असेन तर काय करेल हा ? आणि आयुष्यभर माझ्यासोबत अजिंक्य असेल तर माझ्यासारखी नशीबवान मीच होते. आणि मी त्यावेळेस त्याला माझ्याच घरी राहू दिल. तो हि राहिला. रात्री तो एक गोष्ट लिहित होता. ‘प्रेमाची शप्पथ आहे तुला’ प्रतीक्षा आणि अजिंक्यच्या प्रेमावरची. तेव्हा मी त्याला जवळ ओढून अगदी वेड केल आणि प्रतीक्षाच प्रेम विसरून तो माझ्यासोबत बेडवर आला. आणि माझा झाला. तेव्हा जो झाला तो सलग दोन वर्ष माझाच राहीला.
शरीरावर प्रेम केल मी आणि जास्त मनावर. मी पुन्हा प्रेम करू शकत नाहीये कारण, त्याने माझ्या वाट्याच प्रेम अजून त्याच्याच मनात जपून ठेवलय.
ओमकार : ३० जून उद्या आहे. मग आज कुठ चाललीयस त्याच्याकडे ?
अंजली : प्रतीक्षा आज नाहीये साताऱ्यात. पुण्यात आहे. आणि  ती उद्या दुपारी येणारे.
ओमकार : कोण म्हणाल तुला.
अंजली : माझ प्रेम. त्याला भेटेन मी आज.
ओमकार : शेवटच.
अंजली : हो.
ओमकार : मग प्रियांका कुठ आहे सध्या ?
अंजली : तिच्या घरी अजिंक्यला आठवत. तीच आणि अजिंक्यच नात आयुष्यभरासाठी संपलय तेही एकमेकांना कधीही एकत्र न येण्याच वचन देऊन. दोघांनी एकमेकांना वचन हि दिल. दोघ लांब हि झाली. माझ्यामुळे.

ओमकार : तुझ्यामुळे ?

भाग ०८
अंजली : “आजपासून, आत्तापासून मी तुझ्यावर प्रेम करतोय. फक्त तुझ्यावर. त्यात कोणी नाही येणार आणि आल तरी मी त्यात नसेन. आय लव्ह यु अंजली” हे अस लिहून घेतल मी अजिंक्यकडून. जेव्हा आम्ही बेडवर होतो. मी आनंदाने थकलेले तो शरीराने थकला होता. तीच संधी, फायदा म्हणून वापरली मी. त्याच्याकडून त्याच्याच डायरीत मी अस लिहून घेतल. त्याखाली त्याची माझी दोघांची सही केली. तो कागद फाडून मी माझ्याकडे ठेवला.
ओमकार : अजून आहे तो कागद तुझ्याकडे ?
अंजली : नाही. आणि ते त्याच्या लक्षात पण नाहीये. धुंदीत होता तो माझ्या. लक्षातून गेल त्याच्या कि त्याने असल काही मला लिहून दिलय. पण.
ओमकार : पण काय ?
अंजली : तुला म्हणाले तस जेव्हा मला प्रियांका अजिंक्यसोबत दिसली. मी तिच्याशी मैत्री केली. पण ती अजिंक्य आणि तिच्या नात्याबद्दल बरच बोलायची. मला राग यायचा. तिचा जीव घ्यावा वाटायचा. पण तिच्यामुळे अजिंक्यच वागण बोलण राहणीमान मला समजत होत. ती तासभर बोलली तर दोन एक मिनिट एवढच फक्त अजिंक्यबद्दल असायचं. पण त्यावरून मला समजत गेल कि अजिंक्यच्या मनात कस घर करायचं. सात आठ दिवस झाले असतील प्रियांका आणि माझ्या मैत्रीला. ती मला त्या दिवशी भेटली आणि अजिक्य किती माझ्यावर प्रेम करतो आणि बरच सांगायला लागली तेव्हा मी ऐकून घेतल तीच. अगदी सगळ. आणि जेव्हा ती दम खाऊन थांबली. तेव्हा मी ते डायरीच पान तिच्यापुढे केल. तिने ते वाचल. मला पुन्हा ते पान देऊन ती गपचूप निघून गेली. ती गेली ते मला आठवडाभर काय दिसली नाही. कॉलेजमध्ये पण नाही. आणि अजिंक्य जवळ पण नाही. रविवार होता मला ती फुटका तलाव मंदिरात दिसली. तेव्हा मीच गेले बोलायला तिच्याशी. तेव्हा ती म्हणाली कि अजिंक्य आणि प्रियांकाच तुटल आहे. आणि मी तिची बडबड ऐकत बसले. पण आतून मी खुश होते. तिथून मी तीच सगळ ऐकून निघून गेले. अजिंक्यला भेटले. त्याने हि तेच सांगितल रडगाण. प्रियांकानंतर आता मी त्याच्या आयुष्यात गेले.
इतक्या बोलण्यात तीनवेळा ओमकारचा मोबाईल वाजून शांत झाला होता. आता पुन्हा वाजला. त्याने खिशातून मोबाईल काढून बघितल.
अंजली : कोण आहे ?
ओमकार : सरांचा फोन आहे. काहीतरी महत्वाच असेल. थांब हा बघतो.
ओमकार कॉल उचलून आतल्या खोलीत गेला. अंजली तो पर्यंत अजिंक्यला कॉल लावते. रिंग वाजत असते. आणि त्या वेळामध्ये अंजली आरशात बघून केसाची बट सावरत असते. कॉल उचलला गेला.
अजिंक्य : हा बोल ?
अंजली : कुठ आहेस ?
अजिंक्य : घरी.
अंजली : प्रतीक्षा नक्की ना आज येणार नाही ?
अजिंक्य : नाही.
अंजली : कॉल रेकॉर्डिंग सुरु आहे का तुझ ?
अजिंक्य : नाही. मोबाईलची मेमरी भरलीय.
अंजली : मी येते भेटायला तुला. आत्ता निघतीय.
अजिंक्य : नवरा ?
अंजली : त्याला काय सांगायचय ? आणि सांगायला आहे का तो घरात. पीत बसला असेल कुठ तरी.
अजिंक्य : जमत असेल तर ये.
अंजली : का तुला नाही का भेटायचं मला ?
अजिंक्य : अस कुठ म्हणालो मी.
ओमकार येताना दिसला, तशी अंजली पटकन बोलायला लागली.
अंजली : बर चल ठेवते. मी हे आलेत वाटत. मी निघाले कि मेसेज करेन. बाय.
अजिंक्य : बाय.
ओमकार तिच्या जवळ येऊन मोबाईल खिशात ठेवतो. आणि तिचा मोबाईल तिच्या हातातून स्वतःच्या हातात घेतो.
ओमकार : कुणाचा फोन आलेला ?
अंजली : अजिंक्यला केलेला.
ओमकार : काय म्हणतोय ?
अंजली : काही नाही.
ओमकार : मी चाललोय कराडला. काम आहे. आज तिकडच राहीन. उद्या परत पुण्याला येणारे.
अंजली : होका. मग मी उद्या तुझ्यासोबत येईन ना. चालेल ?
ओमकार : आत्ता पण सोडतो.
दोघ निघाले. गाडीत,
ओमकार : असला नवरा पहिलाच असेल जो आपल्या बायकोला त्याच्या प्रियकराकडे सोडत असेल.
अंजली : अशी उदाहरण बरीच आहेत.
ओमकार : जगाशी माझ देणघेण नाही.
अंजली : पण मी हे शेवटचच भेटणार आहे ना.
ओमकार : शेवटच ? पुन्हा कधी तो समोर आला किंवा दिसला चुकून तर ? तू थांबवू शकणारे का स्वतःला ?
अंजली : माहित नाही.
ओमकार : हेच उत्तर मनात आल माझ्या. यातच तुझ उत्तर आहे.
अंजली : काय ?
ओमकार : तू भेटशील त्याला पुन्हा. हे सिलसिले असेच राहतील तुमचे आणि मला ते नकोय.
अंजली : मग मी काय करू ?
ओमकार : त्याला भेटू नकोस.
अंजली : पण मला तो दिसला तर मी भेटेनच.
ओमकार : आणि आज तो भेटलाच नाही तर ?
अंजली : मग नाही भेटणार. आणि परत मग कधीच नाही. कारण आज शेवटची भेट करणारे मी. आणि त्यात हि तो भेटला नाही तर सगळच संपल.
ओमकार : मला एक सांग तुला मी हवाय का अजिंक्य ?
अंजली : मला कळाल आहे मगाशी. मला माझा संसार महत्वाचा आहे.
ओमकार : आणि तो ?
अंजली : बहुतेक हो पण नाही पण.
ओमकार : होकार नकार अस कोड्यात नको. एकतर हो एकतर नाही. मी एक सांगतो ते माझ ऐकशील ?
अंजली : काय ?
भाग ०९
इकडे अजिंक्य कानात हेडफोन घालून गाणी ऐकायला लागतो. त्या शांत गाण्याच्या आवाजात तो गाण गुणगुणत होता. अर्थातच ते गाण त्याच्या आवडत होत. पाठ होत.
आणि अचानक गाण्याचे बोल अजिंक्य विसरला. काहीतरी लिहिण्याचा मूड आला. आणि त्याच मूड मध्ये त्याने कि-बोर्ड वर बोट ठेवल. कॉम्प्युटरची स्क्रीन सुरु झाली. त्यावर अर्धवट लिहिलेली एक स्क्रिप्ट दिसत होती. ती स्क्रिप्ट पुढे लिहायला त्याने सुरुवात केलीच होती तेवढ्यात गाण बंद झाल आणि अजिंक्यला डोक्यात तिडीक गेली. त्याला कॉल आल्यामुळे त्याच डोक फिरलं पण कॉल आलेल्याच नाव बघून तो क्षणात शांत झाल. “प्रतीक्षा”.
अजिंक्य : बोल.
प्रतीक्षा : काय करतोयस ?
अजिंक्य : बसलेलो. स्क्रिप्ट लिहित.
प्रतीक्षा : कधीपासून ?
अजिंक्य : आत्ताच जस्ट एक मिनिट झाल सुरुवात केली.
प्रतीक्षा : मग आधी काय करत होतास ?
अजिंक्य : बसलेलो.
प्रतीक्षा : काय करत ?
अजिंक्य : नुस्त बसायचंच नसत का कधी ?
प्रतीक्षा : अरे मी असच विचारल. का चिडतो लगेच.
अजिंक्य : सॉरी. मूड आलेला लिहायचा. त्यात तुझा कॉल आला म्हणून जरा डोक फिरलंय.
प्रतीक्षा : ठेवू का फोन ?
अजिंक्य : हम. मी करतो माझ झाल कि.
प्रतीक्षा : बर.
अजिंक्य : काय काम होत का तुझ ?
प्रतीक्षा : काहीच नाही. सहजच म्हंटल जेवलास का काय करतोयस ते विचाराव.
अजिंक्य : जेवलो नाहीये. पण जेवेन नंतर. बघू. बर तू उद्या कितीला येणारेस ?
प्रतीक्षा : संध्याकाळी. सात-आठपर्यंत.
अजिंक्य : बर लवकर ये.
प्रतीक्षा : आत्ता निघू का ?
अजिंक्य : ये.
प्रतीक्षा : कसा रे असा तू. जरा राहत नाहीस लांब. मला खूप आठवण येतीय आत्ता तुझी.
अजिंक्य : मला पण. सारा काय करतीय ?
प्रतीक्षा : बसलीय आईसोबत बोलत.
अजिंक्य : उद्या वाढदिवस आहे माझा. काहीही करून ये च उद्या.  
प्रतीक्षा : हो. नक्की. उद्या तुझा वाढदिवस आणि आपण एकत्र असू. बर तू काम कर.
अजिंक्य : हम. बाय.
प्रतीक्षा : हं,बाय. लव्ह यु.
अजिंक्य : लव्ह यु टू.
पुन्हा थांबलेलं गाण सरू झाल. अजिंक्य लिहायला लागला. एक दीड मिनिट लिखाण सुरु झाल असेल आणि पुन्हा गाण थांबल. पुन्हा डोक्यात राग आला.
जागचा रागाने उठून खुर्चीला बाजूला करत अजिंक्य खिडकीजवळ गेला.
अजिंक्य : बोल.
अंजली : काय करतोय ?
अजिंक्य : काम करतोय. का ?
अंजली : काम कसल करतो ? मी निघालेय. माझी वाट नाही का बघणार ?
अजिंक्य : दोन तास तुझी वाट बघून काय करू मी ? तेवढ्यात माझ खूप लिहून होईल.
अंजली : ओह. आता काही वाटत नाही का माझ्याबद्दल तुला ?
अजिंक्य : अस काही बोललोय का मी ?
अंजली : बोलला नाहीस तरी जाणवत मला.
अजिंक्य : ये तू. आहे मी. कशी येतीयस ?
अंजली : गाडी.
अजिंक्य : गाडी ?
अंजली : बस..गाडी.
अजिंक्य : किती वेळाने येणारेस ?
अंजली : येईन दीड तासात. प्रतीक्षा ?
अजिंक्य : तीच काय ?
अंजली : ती नाही न येणार ?
अजिंक्य : नाही. उद्या संध्याकाळी येणारे. पण तू प्लीज दुपारी किंवा सकाळी जा. प्लीज.
अंजली : तुझी रात्र मिळाली तरी बस मला. त्या रात्रीला मी दिवस आणि दिवसें-दिवस आठवत राहीन.
अजिंक्य : बर ये.
अंजली : ती येणार नाही न नक्की. नाही तर बघ होईल काही तरी.
अजिंक्य : नाही येणार.
अंजली : बर चल ठेवते फोन.
कॉल कट झाला. गाण सुरु झाल आणि अजिंक्य पुन्हा स्क्रीप्ट लिहायला लागला.
इकडे गाडीमध्ये....
अंजली : प्रतीक्षा नाहीये.
ओमकार : पण काही करायचं नाहीस तू.
अंजली : पोटात असताना एक अजून दुसर कुठ साठवू ?
ओमकार : काय बोलतीयस ? जरा ला..ज.
अंजली : मज्जा रे.
ओमकार : पण मी मज्जेत नाही. त्याला हात लावायचा नाही. किस करायचा नाही. आणि पुढच तर काहीच नको.
अंजली : मग काय करायचं ?
ओमकार : मी तुला सांगितल ते तुला करायचं नाही. तर मग भेटीत हे असल काही करायचं नाही तू.
अंजली : मग नकोच का भेटू मी त्याला.
ओमकार : हम.
अंजली : पण तो भेटणारच ना मला.
ओमकार : नाही भेटणार. तो तुला.
अंजली : बर.
ओमकार : आय लव्ह यु अंजली.
अंजली : आय लव्ह यु टू.
ओमकार : माझ नाव ?
अंजली : ओमकार.
ओमकार : पूर्ण.
अंजली : आय लव्ह यु टू ओमकार. हा प्रवास तुझ्यासोबत अजिंक्य अंजलीच्या भेटीसाठी आहे.
ओमकार : पण न भेटण्यासाठी.
ओमकार तिला बघतो. ती हि त्याच्याकडेच बघत असते.
अंजली : होईल न सगळ ठीक ??
ओमकार : तुझ्याबाबतीत होईल. त्याच माहित नाही.
ओमकार गालात हसला. आणि अंजली बाजूच्या आरशात बघते. आरशावर पावसाचे बारीक थेंब पडायला लागले.
इकडे अजिंक्य एका पुस्तकात पान लक्षात रहाव म्हणून आणि प्रतीक्षाला कळू नये म्हणून ( लपवून ) ठेवलेली एक सिगरेट काढतो. देवापुढची काडेपेटी घेऊन सिगरेट पेटवतो आणि खिडकी जवळ जातो. पाऊस आता वाढत चाललेला. बाहेर वाढणार धुक त्यात हरवणार जग आणि इथ सिगरेटच्या धुरात हरवणारे अजिंक्यचे विचार दोन्ही घटना सारख्याच घडत होत्या.

भाग १०
अजिंक्य खिडकीतून पुन्हा खुर्चीवर येऊन बसला. हातातली सिगरेट संपत आली. उरलेली सिगरेट ओढत असताना तो नवीन दुसरी शोधायला लागला. डायरी, पुस्तक, चित्र अगदी कॉम्प्युटरची स्क्रीन पण बाजूला करून शोधायला लागला. पण मिळालीच नाही. प्रतीक्षापासून लपवलेली हि एक सिगरेट मिळाली तेच एक नशीब. त्याने हातात कुलूप, चावी घेतली. चप्पलच्या कपाटाजवळ जाऊन त्याने आतून छत्री घेतली. बूट घातले. बाहेर येऊन कुलूप लावून तो रस्त्यावरच्या पाण्यात बूट भिजवत कडेने निघाला. एकदा पाऊस पुढून येत होता एकदा बाजूने. छत्री असूनही अजिंक्य भिजलाच.
मनात प्रतीक्षा आणि अंजली येत जात होते. त्या पावसासारखेच. एकदा पुढून येणारा प्रतीक्षाचा विचार आणि अचानक तो विचार बाजूला सरकत बाजूने अंजलीचा विचार येत होता. अंजली आणि प्रतीक्षा दोघी एकसारख्या. दोघींवर प्रेम एक सारख पण... जर का झालच काही वाईट तर अर्थातच प्रतीक्षासाठी प्रेम जास्त मनात भरून येईल. सगळ्या विचारांच्या चिखलात भिजत पावसाच्या पाण्यात बूट भिजवत अजिंक्य रस्त्याच्याकडेने चालत होता. कित्येक मुली आलेल्या अजिंक्यच्या आयुष्यात. मोजता येईल इतक्या तर नक्कीच नाही. कुणाशी काही न काही कारणाने संबंध जोडून अजिंक्य प्रत्येकीत अडकत राहिला. पण प्रियांका अंजली आणि प्रतीक्षातून तो काही सुटू शकला नव्हता. या सगळ्यात आयुष्य किती पुढ गेल होत आणि किती काही या दरम्यान घडून गेल याचा विचार केला तर एखादा माणूस विचारांनी रिकामा होऊन जाईल.
इतक पण अस कुणाच आयुष्य असत का कुठ ? माणुस- पैसा, संपत्ती, प्रेम या गोष्टीच्या मागे इतका पळतो कि शेवटी ते काही न मिळवताच ( मनासारखं ) मरून जातो. अजिंक्यला सगळ मिळत होत. पण ते वापरण, वापरून घेण जमत नव्हत. आणि त्यातच गफलत करत-करत तो इतका वेळेचा फितूर झाला कि वेळ त्याला वापरून घ्यायला लागली. गरज प्रतीक्षाला असताना वेळेने अजिंक्यला अंजलीच्यात अडकवून ठेवल. अंजली तरसत असताना प्रतीक्षाच्या प्रेमातून बाजूला होण शक्य त्याला नव्हत. एक प्रेम एकसारखं एकाच वेळेस वापरण अजिंक्यला जमत नव्हत. उरला फक्त त्याचा एकाकीपणा. आणि उरला मनस्ताप.
दुकान आल. अजिंक्यने खिशातून दोनशेची नोट काढली. एकदा त्या नोटेला बघितल. आणि पुढे माणसाला दिली. त्याने हसून डोळ्याने खुणावल. अजिंक्यने बोटाने खुणावल. त्याने जाऊन एक काचेची दारूची बाटली अजिंक्यसमोर ठेवली. उरलेले पैसे त्याला दिले. अजिंक्य बाटली खिशात ठेवून पैसे घेऊन एका टपरीजवळ गेला. एक सिगरेटच पाकीट घेऊन तो घराकडे निघाला. तो चालत थांबत पुन्हा चालत असला तरी विचार एकसारखे डोक्यात वावरतच होते. घरी येऊन त्याने छत्री उघडून वाळवत ठेवली फरशीवर. बूट चपलांच्या कपाटाच्या बाहेर तसेच ठेवले. भिजलेली थोडी केस त्यात ओला हात फिरवून त्याने कॉम्प्युटरच्या टेबलावर दारूची बाटली, सिगरेटच पाकीट ठेवून आत जाऊन त्याने मोकळा ग्लास आणि फ्रीजमधली बाटली आणली. सिगरेट पेटवून तोंडात तशीच सिगरेट ठेवून दारू ग्लासात ओतली. फ्रीजमधल्या बाटलीतल गार पाणी त्यात मिसळल. एका घोटात अख्खा ग्लास रिकामा करून सिगरेट ओढायला लागला. शेजारी त्याच्या मोबाईलवर लाईट लागली. त्याने बघितल. पाच मेसेज आलेले. मोबाईल मगाशी घरीच विसरलेला.
अंजलीचे मेसेज आलेले होते. ती साताऱ्याजवळ आलेली. पण तिला अजून एक तास लागणार होता. बस जेवायला थांबली होती. मिस यु असे मेसेज आलेले. अजिंक्य ओके असा एक फक्त मेसेज पाठवतो आणि मोबाईल स्क्रीन बंद करून पुन्हा दुसरा ग्लास भरून दारू प्यायला लागतो. पंधरा मिनिटात थंड पाण्याची बाटली. दारूची बाटली आणि चार सिगरेट संपलेल्या. अजून चार उरलेल्या. पाचवी सिगरेट काढून ती पेटवली. आणि तो उठला. त्याचा तोल गेला आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर तो पडला. स्क्रीन त्याच्या धक्क्याने खाली पडली. अजिंक्य खुर्चीच्या पलीकडे पडला. सिगरेट डाव्या हातात होती त्याच हाताच्या बोटाला सिगरेट भाजली आणि त्याच्या बोटाची त्वचा जळली. तसाच व्हिवळत तो उठला. कसा बसा. कॉम्प्युटरची स्क्रीन नशेतच त्याने  पायाने बाजूला करून खुर्चीवर बसला आणि खाली सिगरेट कुठ दिसते का बघायला लागला. सिगरेट खुर्चीखाली होती. त्याला दिसली नाही म्हणून त्याने नवी सिगरेट काढून पेटवली. आणि धूर घेत हळू हळू तो डोळे मिटायला लागला.      
तो टेबलाला धरून उठला. अर्धवट जळणारी सिगरेट तशीच खाली टाकून तो पुन्हा बाहेर गेला. कुलूप आणि चावी घेतली. बूट घालायला गेला पण ते घालायचे त्राण शिल्लक नव्हत. चप्पल घालून तो बाहेर आला. कुलूप लावून तो पुन्हा रस्त्याने निघाला. त्याच्या डोळ्यासमोर खूप काही येत होत. सगळे विचार येत होते पण रस्ता नाही. दुकानाचा रस्ता सातारा ते पुणे इतका आहे अस वाटत होत. शेवटी कसा बसा पंधरा मिनिट चालत नुस्त राहून दुकान आल. अजून एक दारूची बाटली घेऊन अजिंक्य घरी आला. आतून एक नवीन थंड पाण्याची बाटली आणून त्याने नवा पेग बनवून तो खालीच बसून प्यायला लागला. त्याच्या डोळ्यात इतक पाणी साचलेल कि पुढच सगळ त्याला डोळ्यांच्या बुबुळात तरंगताना दिसत होत. एक ग्लास पिऊन झाला आणि अंजलीचा कॉल आला. त्याने कसा तरी जीवावर आल्यासारखं मोबाईलला घेऊन कॉल उचलला.
अंजली : अजिंक्य, मी आलेय.
अजिंक्य : कुठ ?
अंजली : इथ दारूच दुकान आहे पुढ. तिथ आहे.
अजिंक्य : घरी ये कि.
अंजली : अरे इथ अंधार आहे. पाउस आहे आणि त्यात छत्री नाही माझ्याकडे. भिजतेय रे मी. ये ना मला न्यायला लवकर.
अजिंक्य : आलोच.
उरलेली दारू थंड पाण्याच्या बाटलीत सगळी ओतून तो दारू पीत-पीत भिजत रस्त्याने चालू लागला. दाराला कुलूप लावायचा विसरला नाही. पण छत्री घ्यायचा विसरला. रस्त्याने चालता-चालता त्याचा चप्पलमुळे पाय घसरला आणि तो पडणार तोच त्याने स्वतःला कसतरी सावरल. समोर त्याला अंजली दिसत होती. पण अंजलीला तो अंधारात दिसला नाही. आणि तेवढ्यात अजिंक्यच्या डोक्यात मागून जोरात काहीतरी लाकडी वस्तू जोरात लागली. आणि अजिंक्य खाली पडला.
भाग ११
ओमकार दोघांवर छत्री धरून गाडीला टेकून राहिला. अंजली अजिंक्यला कॉल करत होती. ओमकार तिच्या मोबाईलमध्ये वाकून बघतो.
ओमकार : काय झाल कॉल उचलत नाही का तो ?
अंजली : नाही ना.
ओमकार : मी निघू ?
अंजली : कुठ ?
ओमकार : कराडला.
अंजली : नव्हत न काम ?
ओमकार : तुला इथवर आणायचा हेतू होता माझा. पुढच पुढ तू बघ.
अंजली : आणि आपल ठरलेलं ?
ओमकार : काय ?
अंजली : तू आणि मी पुन्हा कायमच एकत्र यायचं. त्याच काय ?
ओमकार : ते तुझ्यावर आहे. मी तुला पर्याय दिला आणि चान्ससुध्दा.
अंजली : मला पर्याय नको. चान्स हवाय.
ओमकार : अजिंक्यला भेट शेवटच आणि उद्या मला घरी भेट. उद्याचा दिवस तुझा आणि माझा लग्नानंतरचा पहिला दिवस आहे असा समजूनच सुरु होईल. कळाल ?
अंजली : हो. पण मी आत्ता येऊ का तुझ्यासोबत ?
ओमकार : नको.
अंजली : का ?
ओमकार : अजिंक्य येईल इतक्यात. जातो मी.
अंजली : काळजी घे.
ओमकार गाडीत बसला. गाडी निघुन गेली. अंजली मोबाईलमध्ये बघते. आणि पाऊस पडत असल्यामुळे ती पूर्ण भिजलेली असते. तोंडावरच पाणी पुसण्यासाठी ती कपाळावरून, डोळ्यारून तिचा ओला हात फिरवते. डोळ्यापुढ अंधार झाला आणि पुन्हा उजेड झाला. अजिंक्यने डोळे उघडले. तो एका दवाखान्यातल्या खाट वर झोपून होता. एक नर्स तिथ बाजूला बास्केटमध्ये त्याच्या दिवसभरातली सगळी औषध काढून ठेवत असते. अजिंक्य तिला बघतो. ती त्याला बारीक डोळे करून बघते आणि गळ्याचा मास्क नाकावर ओढून घेते.
नर्स : किती पिता. झेपत नाही तर.
अजिंक्य : पिऊन इथ आलो नाही मी.
अजिंक्यच्या डाव्या हाताला सलाईन लावलेलं असत. तो उजव्या हाताने चेहऱ्यावर हात फिरवतो आणि हात पुन्हा गादीवर ठेवायला जातो तर त्याचा हात दुसऱ्या एका हाताला लागतो. अजिंक्य उजवीकडे बघतो. अंजली त्याच्याकडे बघत त्याच्याशेजारी बसलेली असते.
अजिंक्य : तू ?
अंजली : तू इथ कसा ?
अजिंक्य : माहित नाही.
अंजली : माहित नाही न ? मी आणल तुला. रस्त्यावर पडलेला तू. किती रक्त येत होत तुझ्या डोक्यातून. डोक्यातून का मानेतून काय माहित पण रक्त येत होत. मी तुझी त्या दारूच्या दुकानापाशी वाट बघत बसलेली आणि तू.... इकडे दारू पिऊन पडलेलास ?
अजिंक्य : दारू पिऊन पडायला, ( अजिंक्य नर्सकडे बघतो. ) झाल का तुमच ?
नर्स : हो. का ? काय पाहिजे का ?
अजिंक्य : जरा बोलायचं होत हिच्याशी.
नर्स : जास्त बोलायचं आणि हलायचं नाहीये. डॉक्टर तस सांगून गेलेत. डोक्याला मार लागलाय तुमच्या.
अजिंक्य : दोन मिनिट बोलणार आहे. तुम्ही घड्याळाचे काटे मोजा. एकशे वीस सेकंद झाले कि न विचारता आत या.
नर्स : बर. एकशे वीस सेकंद.
अजिंक्य : हम, हो.
अंजलीकडे बघत,
अजिंक्य : हिरोला डोक्याला मारल कि हिरो दोन एक महिने झोपून असतो. मग त्याला जाग आली कि त्याला काहीच झालेलं आठवत नाही. तो सगळ्यांना विसरलेला असतो. हे असल फक्त मालिकेत होत. आणि असल्या मालिका मी लिहितो अंजली. पण हि मालिका नाही खर आहे. मला डोक्याला लागल हे खर आहे पण मी काही विसरलो नाहीये. आणि त्या हिरो सारखा दोन तीन महिन्यांनी जागा नाही झालो. रात्री लागल सकाळी जागा पण झालो. दारू पिऊन पडायला मी बेवडा नाही. लेखक आहे मी. कुणीतरी माझ्या मागून काहीतरी मारल. शुध्दीत असतो तर बघितल असत त्याला.
अंजली : पण एवढ प्यायचंच कशाला ? मी येणार होते माहित होत ना तुला ?
अजिंक्य : हो. पण तरी असच. आला मूड म्हणून पिलो.
अंजली : हो पण त्याचा फायदा घेतला न कुणीतरी. तुला काय झाल असत तर ? तू नुसता पडलास. तुला लागल. तुझ रक्त वाया गेल. जीव गेला असता तर ? आयुष्य तूझ वाया गेल असत ना. कळत कस नाही तुला ? आणि तू पीत नाहीस कधीच. मग काल का पिलास ? बोल ना ?
अजिंक्य : कुणी आणि का फायदा घेतला या पेक्षा कुणासाठी घेतला गेला हे महत्वाच आहे. ठरवल तर आत्ता मी शोधून काढेन त्याला. पण नको.
अंजली : का ?
अजिंक्य : मी वाचलो. त्यातच तो हरला. त्याचा हरलेला क्षण मला त्याच्या माणसाला नाही द्यायचा.
अंजली : म्हणजे ?
अजिंक्य : तो जो कोणी आहे त्याने कुणासाठी तरी माझ्यावर वार केला. जर का मी त्याला पकडल, शोधलं तर ती व्यक्ती दुखी होईल. आणि मला ते नकोय.
अंजली : म्हणजे तुला त्रास होतोय त्याच तुला काही नाही. पण ज्याने तुला हा त्रास दिला त्याचा आणि त्याच्या साथीदाराचा तुला एवढा विचार का ? अजिंक्य तू वेडा आहेस का ? तू बदला घ्यायचास, मला काही माहित नाहीये.
नर्स : एकशे वीस सेकंद. चला. शांत पडून रहा आता.
अजिंक्य : बर.
अंजली : झोप आता तू. मी आहे इथच. नको काळजी करू.
अजिंक्य : काळजी नको करू ?
अंजली : नको करू. मी आहे ना.
अजिंक्य : काल मग का नाही घेतली काळजी. जोरात लागल असत मला आणि मी मेलो असतो तर ?
अंजली : शु..! नाही रे.. अस कस मी तुला मरू देईन ?
अजिंक्य : केल तर तसच ना ? मी खाली पडलो. मी तुला बघितल. आणि तू माझ्या जवळ आलीस. आणि.


भाग १२
नर्स अजिंक्यच्या जवळ उभी राहिली. अजिंक्य बोलण सोडून तिच्याकडे बघतो. अंजलीपण तिलाच बघते. नर्स त्या दोघांकडे न बघता सलाईनच्या बटणाला फिरवते आणि सलाईनच्या पाण्याचा वेग वाढवते. अजिंक्य ओरडायला लागतो.
अंजली : त्याला दुखतय... कमी करा ना.
नर्स : बोलून सगळ औषधाच पाणी होतय. आत्ता त्यांना पाण्याची नाही औषधाची गरज आहे. पण त्यांना हे गरजेच वाटेना. दुखायला लागल कि निदान बोलणार तरी नाहीत. तुम्ही झोपा. डॉक्टर येतील आता. आणि तुमच्यामुळ मला ओरडतील तुम्हाला अस बोलताना बघितल तर.
अंजली : हो मीच नाही बोलणार पण कमी करा ना ते सलाईन.
नर्स : दुसर लावायचं आहे. त्यामुळे हे संपवायचं आहे.
अजिंक्य हात दुखत असल्यामुळे डोळे गच्च मिटून पडून राहिला. आणि कधी झोपला त्यालाच कळाल नाही. डोळे उघडले त्याने तासाभराने. डावा हात दुखायचा थांबलेला. नवीन सलाईन लावलेलं तिथ. त्याचा वेग कमी होता. त्याला एक जांभई आली. ती संपली. आणि उजवीकडून हि जांभईचा आवाज आला. त्याने उजवीकडे न बघताच उजवा हात उजवीकडे सरकवला.
अजिंक्य : अंजली...
प्रतीक्षा : अंजली ?
अजिंक्य दचकून उजवीकडे बघतो.
अजिंक्य : प्रतीक्षा...?
प्रतीक्षा : हो. पण अंजली ? इथ कुठ आली ? आलेली का ती इथ ?
अजिंक्य : नाही. ती कशाला येईल इकड ?
प्रतीक्षा : मग डोळे उघडल्यावर तीच नाव कस घेतलस ?
अजिंक्य : ते त्या नर्सच नाव पण अंजली आहे.
प्रतीक्षा : पण...? बर. म्हणजे अंजली कोण हे तुला लगेच लक्षात पण आल का ?
अजिंक्य : तू भांडणार आहेस का ? काय हालत आहे माझी. आणि वाढदिवस आहे माझा त्या दिवशी मी हा असा आणि तू काय जुन आठवून बोलतीयस. ती कशाला इकड येईल.
प्रतीक्षा : तुला कुणी आणल इकड ?
अजिंक्य : माहित नाही. कोण तरी आलेल घेऊन इथ.
प्रतीक्षा : बर. वाटतय का बर तुला ?
अजिंक्य : हो.
प्रतीक्षा : लव्ह यु.
अजिंक्य : लव्ह यू.
प्रतीक्षा उठून त्याच्या कपाळावरून हात फिरवते. नर्स येते.
नर्स : ऐका. ना. नवीन गोळ्या दयायच्यात यांना. डॉक्टर जाणार आहेत परत दुसऱ्या हॉस्पिटलला. येऊन घेऊन जाता का ? पैसे पण लागणार आहेत त्याला.
प्रतीक्षा : आलेच. चला.
दोघी बाहेर गेल्या,
प्रतीक्षा : कधी सोडतील त्यांना ?
नर्स : आठवडा तरी इथच ठेवाव लागेल. अधूनमधून रक्त येतय त्यांच्या मानेतून.
प्रतीक्षा : तुम्ही काळजी घेतलीत खूप त्यांची. अजिंक्य सांगत होता. अंजली नावाच्या नर्स आहेत त्यांनी खूप जपलं म्हणून. नाव काय तुमच,
नर्स : वंदना.
प्रतीक्षा : मग अंजली कोण आहे का दुसरी ?
नर्स : अ... ह.. हा आहे. माझीच मैत्रीण आहे. घरी गेली आत्ताच शिफ्ट संपली तिची.
प्रतीक्षा : कुणी आणल इथ त्यांना ?
वंदना : एक कोण तरी आलेल्या... त्यांनी आणल. आत्ताच गेल्या त्या तास झाला.
प्रतीक्षा : बर. नाव नाही का विचारल तुम्ही.
वंदना : नाही. पण फॉर्म वर आहे त्याचं नाव.
प्रतीक्षा आणि वंदना आत गेल्या. डॉक्टरला भेटून प्रतीक्षाने गोळ्या घेतल्या. पैसे दिले. बाहेर आल्यावर वंदना दिसली.
प्रतीक्षा : एक मिनिट, तो फॉर्म बघायला मिळेल का मला.
वंदना : मिळेल ना, तिथ कॉम्प्युटरपाशी जावा. स्नेहल आहे तिला सांगा वंदनाने पाठवलय. आणि फॉर्म बघायचाय सांगा. ती दाखवेल.
प्रतीक्षा : thank you.
दोघी विरुद्ध दिशेने निघाल्या.
वंदना अजिंक्यच्या खोलीत आली. प्रतीक्षा तिकडे फॉर्म बघायला गेली.
अजिंक्यला मनगटात इंजेक्शन देताना ती बोलते.
वंदना : त्या मिसेस आहेत का तुमच्या ?
अजिंक्य : हो.
वंदना : प्रतीक्षा का ?
अजिंक्य : हो.
वंदना : मी तुमच पुस्तक वाचलय. “प्रेमाची शप्पथ आहे तुला”. त्यातल तुमच आणि प्रतीक्षाच प्रेम मला खूप आवडत. म्हणजे ती स्टोरी खरी आहे का ?
अजिंक्य : नाही काल्पनिक आहे. नाव खरी आहेत.
वंदना : मला तुमची स्टोरी आवडते आणि तुम्ही पण.
अजिंक्य : बर.
वंदना : म्हणून एक सांगू तुम्हाला ?
अजिंक्य : काय ?
वंदना : त्या विचारत होत्या तुम्हाला इथ कुणी आणल. त्यांना तुमच्यावर शक आलाय. आणि तुमच्या फॉर्मवर अंजली अस एक नाव आहे.
अजिंक्य डोक्याला बुक्की मारून घेतो. वंदना खाली वाकून अजिंक्यच्या कानाजवळ येते.
वंदना : पण मी त्या तिकडे फॉर्म बघायला जायच्या आधी स्नेहलला तिथ माझी बहिण असावरी तीच नाव टाकायला लावल.
अजिंक्य तिच्याकडे बघतो. अजिंक्य डोक्याला हात मारून घेतो. दोघ एकमेकांत हरवतात दोन तीन सेकंद. ती अजिंक्याच्या छातीवर हात ठेवते. अजिंक्य हाताकडे बघतो. ती त्याचा शर्ट नीट करायचं नाटक करते. तो तिच्या हातावर हात ठेवतो. THANK YOU अस म्हणणार त्या आधी ती त्याच्या गालावर तिचे ओठ टेकवते. आणि पटकन बाहेर निघून जाते. प्रतीक्षा आत येते. 
 भाग १३
प्रतीक्षा डॉक्टरने दिलेल्या गोळ्या टेबलावर ठेवून आत्ता द्यायची गोळी काढत-काढत बोलायला लागते.
प्रतीक्षा : अजून किती मुली माझ्या समोर यायच्या बाकी आहेत ?
अजिंक्य तिच्याकडे बघतो.
प्रतीक्षा : फॉर्मवर नाव असावरीच आहे. ती आलेली इकड ?
अजिंक्य : नाही.
प्रतीक्षा : होका ? पण तुला तर काही आठवत नाहीये ना. मग तुला कस माहित ती नव्हती इकड.
अजिंक्य : म्हणजे मी जागा झालो तेव्हा तर ती दिसली नाही.
प्रतीक्षा : हे घे, दोन आत्ता गोळ्या आहेत. तासाभराने अजून आहेत दोन.
अजिंक्य तोंडाचा ‘आ’ करतो. ती दोन्ही गोळ्या घशात सोडते आणि ओठापाशी त्याच्या ग्लास नेते. अजिंक्य पाणी पितो. आणि डोळे मिटतो. प्रतीक्षा ग्लास ठेवून कुठल्यातरी विचारात हरवल्यासारखी त्या खोलीच्या खिडकीतून बाहेर बघत असते.
बाहेर बघतच.
प्रतीक्षा : अजिंक्य, तू काल दारू पिलास. का ?
अजिंक्य : हो.
प्रतीक्षा : पिलास का नाही का पिलास ?
अजिंक्य : असच.
प्रतीक्षा : असच ? मग दारू पिऊन बाहेर काय करायला गेलेलास ?
अजिंक्य : सिगरेट आणायला गेलेलो.
प्रतीक्षा : मग एवढा पिलेलास का ? कि तुला चालता येत नव्हत नीट. पाय घसरून पडलास ते पण इतक्या जोरात ?
अजिंक्य : हो. मला आठवत नाहीये. जास्त पण, पडलो मी घसरून आणि डोक्याला लागल काहीतरी जोरात.
प्रतीक्षा : बर.
अजिंक्य : हम ?
प्रतीक्षा : प्रेमाची शप्पथ आहे तुला, पुस्तक झाल का लिहून ?
अजिंक्य : नाही अजून. लिहितोय. का ?
प्रतीक्षा : या जन्मात होणारे लिहून ?
अजिंक्य : अस का बोलतीयस ?
प्रतीक्षा : जे नाही ते लिहून जे आहे ते लपवून उपयोग काय ? बोल न खर खर. मी बायको आहे अजिंक्य तुझी. विसरून का जातो.
अजिंक्य : काय लपवल मी ?
प्रतीक्षा : अंजलीला काल भेटणार होतास ना आपल्या घरी ?
अजिंक्य तिलाच बघत असतो.
प्रतीक्षा : तुझा मोबाईल मला मिळाला.
अजिंक्य : तू मेसेज वाचलेस का ?
प्रतीक्षा : तुझा मी माझा तू आपण कधीच एकमेकांचे मोबाईल तपासत नाही. माहितीय ना तुला. मग ?
अजिंक्य : मग हे कस बोलततीयस तू ?
प्रतीक्षा अजिंक्यकडे बघून हसायला लागते.
अजिंक्य : काय झाल ?
प्रतीक्षा : किती खर वाटाव अस घडतय खोट हे सगळ. फॉर्मवर नाव असावरीच. ती वंदना ( नर्स ) तिच्या बहिणीच नाव पण असावरी. तुझा मोबाईल मला एक जण आणून देते. जिच नाव अंजली. मला बघून मोबाईल देऊन निघून गेली फक्त. तिला माझ्याशी बोलू वाटल नाही.
अजिंक्य : अंजली इथ होती ?
प्रतीक्षा : हो. होती न इथच, अगदी तुझा हातात हात घेऊन बसलेली. इथ. शेजारी तुझ्या. मी आले कि मग उठून निघून गेली.
अजिंक्य : मला काही माहित नाहीये.
प्रतीक्षा : हो अस हि तुला काय माहित असत ? माझ तुझ्यावर किती प्रेम आहे कुठ तुला माहित आहे ? तू तुझ्या जगात अगदी प्रेम वाटत फिरतोयस सगळ्यांना. मला सोडून.
अजिंक्य : कुणाला काही मी दिल नाहीये प्रेम. लग्न झाल कि सगळ बंद केलंय.
प्रतीक्षा : मग त्या तुझ्या आसपास अजून का आहेत ?
अजिंक्य :  मला नाही माहित.
प्रतीक्षा : प्रेम ताज ठेवायला कुणीतरी प्रेम कराव लागत कुणीतरी ते आठवणीत ठेवाव लागत. त्या आठवणीत ठेवतायत आणि तू प्रेम करतोयस त्यांच्यावर.....
अजिंक्य : नाही.
प्रतीक्षा : खर ?
अजिंक्य : हो.
प्रतीक्षा त्याच्या जवळ जाऊन त्याच्याकडे बघते.
प्रतीक्षा : मग माझ्यावरच प्रेम कमी कस झाल तुझ ? कधी न संपणार प्रेम करत होतास ना माझ्यावर मग ते संपलच कस ?
अजिंक्य : अजिबात संपल नाहीये.
वंदना आत येते. प्रतीक्षा तिच्याकडे दुर्लक्ष करत अजिंक्यचा उजवा हात हातात पकडते. वंदना सलाईनमध्ये एक इंजेक्शन सोडते आणि निघून जाते.
प्रतीक्षा : अमित नंतर वाटल होत, तू मला शेवटपर्यंत प्रेम देऊन हे विधवा झालेलं आयुष्य पूर्ण करशील. मला साथ देशील माझ कोण नसल तरी या जगात तू माझा असशील. अमितपेक्षा पण चांगला नवरा बनून तू मला तुझी बायको म्हणून मिरवशील पण... हम. पण....
अजिंक्य : पण ? काय ?
प्रतीक्षा : मला डिवोर्स हवाय अजिंक्य.
अजिंक्य : आणि ?
प्रतीक्षा : आणि काही नाही. मी आणि सारा वेगळ राहतो. नाहीतर मी आईकडे जाते. पण आता मला माझ्या या संसारात अजून चार बायका नकोयत. तू त्यात खुश आहेस राहशील. पण मी नाही सहन करू शकत कुणाला. मला नाही जमणार. तू बरा झाला कि, आपण जाऊ वकिलांकडे. आणि डिवोर्स घेऊ. सहा-आठ महिने काढीन कसेतरी तुझ्यासोबत. नंतर एकदा कोर्टाने डिवोर्स मंजूर केला कि वेगळ होऊ.
अजिंक्य : काय बोलतीयस तू कळतय का तुला प्रतीक्षा ?
प्रतीक्षा : हो. मला माझ्या मुलांच बघितल पाहिजे. सारा लहान आहे. उद्या अजून एक बाळ येईल. दोघ तुझ नाव लावतील. मी पण लावते. पण उद्या शाळेत मित्रांमध्ये मुल सांगतील आमचा बाबा अजिंक्य अरुण भोसले आहे. मोठा लेखक आहे. पण मी सांगू शकणार नाही चार चौघीत कि माझा नवरा अजिंक्य आहे. कारण कुणाला सांगेन त्यातली एक तरी तुझी कोण तरी असेल. इतक्या जणींना तू माहित आहेस. आणि हे मला नकोय. मी एकटी जगेन नाहीतर मरेन. माझ मी बघेन. मुलांना मी सांभाळेन. तू फक्त तुझी काळजी घे. लवकर बरा हो. आणि  ती नवीन मालिका मिळालीय ती लिहायला सुरुवात कर. तू त्या लिखाणात आणि बाहेरच्या मुलींत खुश आहे अस वाटतय मला. सो माझा त्रास नको तुला.
अजिंक्य तिच्या हाताना बोटांनी दाबत डोळ्यात पाणी आणतो. प्रतीक्षा पण तिच्या डोळ्यातल पाणी डोळ्यात साठवून ठेवते. आणि आता पाणी डोळ्यातून सुटणार आहे कळाल कि उठून ती बाहेर निघून गेली. अजिंक्य रडायला लागला. 
 भाग १४
अजिंक्यचा डावा हात रात्रभर एकाजागी ठेवून ठणकायला लागलेला. डोळ्यातल पाणी मागे कानापाशी घसरत चाललेलं. कानाच्या पाळीला टेकत होत. तरी मजबूरीमुळे तो तसाच पडून राहिला.
इकडे, अंजली कराडला पोचली. ओमकार आणि अंजली आता पुण्याला निघाले. दोघ गाडीत होते. ओमकार शांतच होता. अंजलीपण काही बोलायला तयार नव्हती.
ओमकार : झाली भेट अजिंक्यशी ?
अंजली : हम.
ओमकार : काय म्हणाला मग ?
अंजली : काहीच नाही.
ओमकार : का बर अस ?
अंजली : बेशुद्ध होता.
ओमकार : का काय झाल ? जास्त दारू पिली वाटत त्याने ? आ.. ? झेपत नाही तर कशाला प्यायची इतकी. पडला ना घसरून. बिचारा.
ओमकार अंजलीकडे बघतो.
अंजली : खूप लागल त्याला. तरी सकाळी शुध्दीत होता.
ओमकार : काय सांगतीस ?
अंजली : हो. मला म्हणाला मी तुला बघितल आहे. माझ्या लक्षात आहे ती तूच होतीस आणि काय काय.
ओमकार : मग सांगितल का त्याला खर काय ते. ओमकारने मारल तुला. आणि तस करायला मीच सांगितल होत त्याला म्हणून.
अंजली : नाही सांगू शकले त्याला तस बघून. पण येताना मी सगळ ठरलेलं तसच करून आले.
ओमकार : होका ? मग झाल का ठरवल तस ?
अंजली : माहित नाही. पेटती काडी मुठभर गवत सुरुवातीला जाळत आणि नंतर नुसता वाणवाच. अजिंक्य काल दारू पिला. पाय घसरून पडला त्याला डोक्याला लागल. त्याला इथ आणल असावरीने. त्याला भेटायला मी आले. आणि त्याचा मोबाईल मी स्वतः प्रतीक्षाला दिला. तिने घेतला. मी त्या मोबाईलच लॉक काढलेलं. आणि आमचे मेसेजेस सुरु करून ठेवलेले. मी गेले आणि ती ते वाचायला लागली. अजिंक्य संपला आता.
ओमकार : हम. बर झाल. तो संपला म्हणून तू मला मिळालीस. आता माझ्यासोबत थांब. हा शेवटचा चान्स आहे तुला.
अंजली : हो. ओमकार...
अंजली : सॉरी... मी खूप चुकले. परत नाही होणार अशी चूक.
ओमकार : हम. ( अंजलीच्या पोटाकडे बघत ) पुन्हा नाही करणार तू चूक पण तुझी हि चूक आयुष्यभर सांभाळावी लागणारे त्याच काय ?
अंजली : पाडू का बाळ ?
ओमकार : त्याच पाप मला लागेल. नको. असुदे पण माझ पण हवय मला बाळ.
अंजली : चालेल. पण तू या बाळाला देशील न प्रेम ?
ओमकार : हो.
इकडे, अजिंक्यचे डोळे लाल व्हायला लागले. हात दुखत होता आणि प्रतीक्षाच ते बोलण हि मनाला लागल होत. मन दुखत होत. त्याने डाव्या हाताला घट्ट पकडल. आणि ओठ दातात दाबून हातातली सलाईनची सुई काढली. तो जागचा उठला. त्याला अस चक्कर आल्यासारखं होत होत. तरी खाली बघत बघत फरशीच्या चौकोनी आकारांवरून अंदाजाने पाय ठेवत तो बाहेर आला. खोलीच्या बाहेर बाकावर भिंतीला टेकून प्रतीक्षा बसलेली. अजिंक्यला बघून ती पटकन उठली आणि त्याच्या जवळ जाऊन तिने त्याला खांद्याला धरल. तो तसाच तिच्या हातावर हात ठेवून बाकाजवळ आला आणि त्यावर बसला.
प्रतीक्षा : चल आत. तू का काढल सलाईन. अजिंक्य तुला बर नाहीये. आणि मला तू लवकर बरा झालेला हवायस.
अजिंक्य : लवकर वेगळा होता येईल तुला म्हणून ना.
वंदना तिकडून आली. आणि पळत जाऊन अजिंक्याच्या हाताला धरल.
वंदना : अहो. तुम्ही इथ कसे ? चला आत. तुम्हाला काही कळत का ? सलाईन काढून बाहेर आलाय. सोडलय का तुम्हाला अजून ? चला आत. इन्फेक्शन होईल तुम्हाला. चला. ( प्रतीक्षाकडे बघत ) तुम्ही नाही का नेल आत ?
प्रतीक्षा : तेच सांगतीय ऐकत नाहीये.
अजिंक्य : एक मिनिट मला सोडणार कधीय ?
वंदना : अजून आठवडाभर तरी नाही.
अजिंक्य : पैसे सगळे भरतो मी. मी चाललो. जगून हि असा आता काय उपयोग आहे ? हो ना प्रतीक्षा. कुणीतरी नव्यान जगण सुरु करत असताना मी हा असा स्वार्थी नाही बघवणार मला ते. त्यापेक्षा मी मेलो तर बर होईल.
प्रतीक्षा रडायला लागली. वंदनाचे हि डोळे पाणावले.
अजिंक्य उठून खिशात हात घालून ए.टी.एम. कार्ड शोधायला लागला. सापडलं. त्याने वंदनाला दिल.
अजिंक्य : तीस शून्य सहा पासवर्ड. जी फी आहे घ्या. मी निघालो. मला काम आहेत.
वंदना : अस जाता येणार नाही तुम्हाला. सांगा ना तुम्ही यांना.
प्रतीक्षा : अजिंक्य तू. चल पहिला आत नाटक करू नकोस इथ. आणि मी गेलेली नाहीये अजून कुठच.
अजिंक्य : जाशील ना पण. जायची घाई झालीय तुला. आणि मला उशीर नाही होऊ द्यायचा.
अजिंक्य आत येऊन मोबाईल शोधायला लागतो. प्रतीक्षा आत येऊन त्याचा मोबाईल त्याच्यासमोर धरते. अजिंक्य मोबाईल खिशात ठेवून बाहेर येतो. प्रतीक्षा हि त्याच सगळ वागण बघत त्याच्यामागे चालत असते. बाहेर वंदना दारातच उभी असते कार्ड घेऊन.
अजिंक्य : गेला नाही का अजून ? द्या इकड मीच करतो.
कार्ड घेऊन अजिंक्य गेला. कार्डने पैसे भरून तो सलाईनच्या हाताला स्वतःच पट्टी लावून निघून बाहेर जातो. तो पैसे भरत असताना प्रतीक्षा बाहेर जाते. अजिंक्य पायऱ्या उतरून चालायला लागतो. गाडी आणलेली का नाही आठवत होता तो. खिशात हात घालून तो चावी बघायला लागला पण नव्हती. तेवढ्यात बुलेटचा आवाज आला. मानेला लागलेलं तिथ घट्ट डाव्या हाताने धरत तो मागे बघतो. प्रतीक्षा बुलेट त्याच्यापाशी थांबवते.
अजिंक्य : माझी गाडी इकड कशी ?
प्रतीक्षा : बस माग.
अजिंक्य बसला. आणि दोघ घरी निघाले.
 भाग १५
ओमकार : कॉल कर एक.
अंजली : कुणाला ?
ओमकार : अजिंक्यला.
अंजली : कशाला ? आणि त्याचा मोबाईल प्रतीक्षाकडे आहे. ती उचलेल.
ओमकार : उचलू दे. तिला सांग अजिंक्यला दे म्हणून मोबाईल.
अंजली : आणि काय बोलू त्याच्याशी ?
ओमकार : हम. तेपण आहे. काय बोलशील ? एक काम कर.
अंजली : थांब मी बोलते.
अंजली अजिंक्यला कॉल लावते. अजिंक्य कॉल उचलतो.
अजिंक्य : हेलो ?
प्रतीक्षा : कुणाचा आहे ?
अजिंक्य : बोल..
अंजली : काय करतोयस ?
अजिंक्य : घरी चाललोय.
अंजली : कस काय ? आठवडाभर तिथच ठेवणार होते ना तुला.
अजिंक्य : जाग आली ना मला. मग कशाला तिथ बसून बिल वाढवत बसू. निघालो आता.
प्रतीक्षा : कुणाशी बोलतोयस अजिंक्य ?
प्रतीक्षा बुलेट रस्त्याच्या बाजूला घेते आणि अजिंक्यच्या कानाचा मोबाईल स्वतः घेऊन बोलायला लागते...
प्रतीक्षा : अंजली, अजून नाही का राहवत कॉल केल्याशिवाय ?
अंजली मोबाईल पुढे धरून ओमकारकडे बघते आणि मोबाईल स्पीकरवर टाकते.
अंजली : नाही ना. अजिंक्य आहे तो. विसरता येईल का त्याला. तू तर विसरशील का ?
प्रतीक्षा : जगात अवघड अस काय आहे ? जाईन कि विसरून त्याला अशीच.
अंजली : हो का ? तू विसर त्याला. पण मी नाही विसरू शकत त्याला. कसा आहे तो विचारायला त्याला कॉल केला तर हा घरी चाललाय. तु असलीस आसपास कि ओके असतो एकदम.
प्रतीक्षा : हम. काम काय होत तुझ ? झाल असेल बोलून तर ठेवू फोन ?
अंजली : कॉल स्पीकरवर टाक.
प्रतीक्षा कॉल स्पीकरवर टाकते.
अंजली : अजिंक्य.... येतोय का आवाज.
अजिंक्य : हम. हो.
अंजली : तू कुठ ही असलास, कसा हि असलास आणि  कुणाही सोबत असलास तरी आय लव्ह यु. बाय. प्रतीक्षा काळजी घे ग त्याची.
प्रतीक्षा अजिंक्यकडे आरशातून रागाने बघते. आणि मोबाईल स्वीच ऑफ करून पर्समध्ये ठेवते.
बुलेट सुरु झाली. गाडीचा वेग तसा वाढत होता जसा जसा प्रतीक्षाचा राग वाढत होता. अजिंक्याचा हात दुखत होता. मान तर प्रचंडच दुखत होती. त्यात या गाडीच्या वेगाने लागणार वार अजूनच ते दुखण वाढवत होत.
अजिंक्य : गाडी हळू चालव.
काहीच प्रतिक्रिया येत नाही.
अजिंक्य : मी तुझाशी बोलतोय. गाडी हळू चालव.
प्रतीक्षा : हे तू मला सांगतोय ? स्वतः चालवतोस ना जोरात. मी म्हणत नाही हळू चालव तेव्हा.
आणि तिने नंतर तेवढीच जोरात गाडी चालवण सुरु ठेवल. अजिंक्य आरशातून तिला बघत असतो. प्रतीक्षाच लक्ष आरशात गेल. आणि तिने आरसा वरच्या बाजूला फिरवला. आता त्यात तिला आकाश दिसत होत. अजिंक्य नाही. आणि अजिंक्यला हि आकाश दिसायला लागल प्रतीक्षाच तोंड नाही. दोघ घरी आले. अजिंक्य उतरून दाराच्या पायरीवर बसला. प्रतीक्षा बुलेट लावून त्या गाडीच्या चावीला असलेल्या घराच्या कुलुपाच्या चावीने कुलूप उघडून दार उघडते. अजिंक्य उठून आत जातो. बूट काढून तसाच आत जाऊन बेडवर झोपतो. प्रतीक्षा दार लावून आत बेडरूममध्ये येते. अजिंक्य मानेला धरून झोपलेला असतो. डोळ्यातून पाणी घरंगळत असत.
प्रतीक्षा : पाणी आणू ?   
अजिंक्य : नको... तुझ प्रेम आण. पुन्हा.
प्रतीक्षा : कशाला. गरज नसताना कोणत्या गोष्टीची मागणी बरोबर नाही. ज्याची गरज नाही. त्याचा त्याग करावा. तो खरा मोठेपणा. तुझ्यात तो मोठेपणा नाही अजिंक्य. माझ प्रेम मिळत असताना पण दुसऱ्यांच प्रेम तुला हव होत. तू नाही त्याग केलास. माझ्यासाठी. पण मी करणार. आता मला गरज नाही तुझ्या प्रेमाची. मी आहे जशी तशी ठीक आहे. तूला गरज आहे. आणि तुझी गरज भागवणारे खूप आहेत. बर जरा उजवीकडे बघ.
अजिंक्य बघतो. कॉम्प्युटर सगळा खाली पडलेला असतो. त्याची स्क्रीन फुटलेली असते. माउसचे दोन तुकडे झालेले असतात. सी.पी.यु. पडलेला असतो. खुर्ची उलटी पडलेली असते. तिथच दोन पाण्याच्या बाटल्या, रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि एक खुर्ची खाली सिगरेट पडलेली असते. अजिंक्य उठून पटकन कॉम्प्युटर कसा तरी मेहनत घेऊन इतक डोक मान दुखत असताना पण सगळ लावून-जोडून कॉम्प्युटर सुरु करतो पण सुरूच होत नाही. परत प्रयत्न करतो पण नाहीच. प्रतीक्षा त्याला बघत असते. अजिंक्य उठून तिला वळून बघतो. ती काहीच करत नाही मदत बघून त्याला राग आला. शेवटी एकदा सी.पी.यु. च्या वायरी नीट लावून चालू करतो. पण कॉम्प्युटर सुरूच होत नाही.
अजिंक्यला प्रतीक्षाचा राग आला पण तिच्यावरच प्रेम मनात आल्यावर त्याने तो राग कॉम्प्युटरवर काढला. कॉम्प्युटरला दोन्ही हाताने धरून उचलून जोरात खाली आपटला. सी.पी.यु. ला लाथ मारली. कि-बोर्ड बेडपाशी फेकून दिला. प्रतीक्षा उठून त्याच्या पाशी गेली. अजिंक्याच्या डाव्या हातातून जोरात न सहन होणारी कळ आली. तसा तो हात घट्ट पकडून खाली बसायला गेला. आणि तोल जाऊन त्याला जिथ पट्टी केलेली डोक्याला आणि मानेला नेमक तिथच कॉम्प्युटरच्या टेबलाच डोक जोरात लागल. आणि अजिंक्यने डोळे मिटले.
प्रतीक्षा पळत त्याच्या जवळ गेली. त्याला उठवू लागली पण अजिंक्य डोळे उघडतच नव्हता.
इकडे,
ओमकार : चल कर नंबर त्याचा डिलीट.
अंजली अजिंक्यचा नंबर डिलीट करते. अंजली आणि ओमकार पुण्याला गेले त्यांचा नवा संसार सुरु करण्याच्या हेतूने.


भाग १६
अजिंक्य शांत पडून होता. त्याला शुध्द नव्हती. प्रतीक्षा त्याच्या खाटेला टेकून स्टुलावर बसलेली. डोळे उघडे होते पण तिला शुध्द हि नव्हती. ती विचारात हरवून गेलेली. अशा विचारात जिथे विचारांचा विषय आणि हेतू काहीच अस नव्हत. तरी त्या माहित नसलेल्या आणि अस्तित्वात नसलेल्या विचारात ती इतकी हरवली कि तिला कॉल आलेला आणि आधी मिसकॉल येऊन गेलेलं समजलच नाही. डॉक्टर आले. सोबत वंदना हि होती. डॉक्टर अजिंक्यचा हात हातात धरून नाडी तपासतात. त्याचा डोळा उघडा करून बघतात. नंतर वंदना अजिंक्याची फाईल उघडून डॉक्टरांना काहीतरी सांगत असते. पण प्रतीक्षा, तीच तिकड लक्षच नव्हत. डॉक्टर प्रतीक्षाशी बोलायला लागले. प्रतीक्षा त्यांच्याकडे फक्त बघत असते. पण काय बोलतायत काहीच कळत नव्हत. जसा कि साताऱ्यात कोणी अमेरिकन माणूस यावा आणि साताऱ्याच्या माणसाने मराठीत त्याच्याशी बोलाव आणि त्या बिचाऱ्या अमेरिकन माणसाने काहीच न कळल्यासारख बघाव. तोच नेमका तसा चेहरा प्रतीक्षाचा झालेला. या सगळ्या बोलण्यात एक वाक्य तिला फक्त ऐकू आल. शुद्धीवर लवकर आला पेशंट तर ठीक आहे. नाहीतर, आय.सी.यु. मध्ये ठेवाव लागेल.
प्रतीक्षाच्या डोळ्यातून पाणी आल. तिने अजिंक्यकडे बघितल. आणि डोळ्यातल्या पाण्यात एक लाईट चमकायला लागली. तिने पापण्या मिटल्या. डोळ्यातल सगळ पाणी गालावर उतरलं. तिने खाली बघितल. खाटेवर तिचा मोबाईल होता. त्याची स्क्रीन सुरु झालेली. तिला कॉल आलेला.
प्रतीक्षा : हेल्लो.
पूजा : अग घरी येऊन जातेस का ? सारा खूप रडतीय. आईकडे जायचं म्हणून.
प्रतीक्षा : येते मी.
प्रतीक्षाने कॉल कट केला आणि बाहेर निघून गेली. बाहेर जाताना तिला वंदना दिसली. तिच्याजवळ जाऊन प्रतीक्षा बोलायला लागली.
प्रतीक्षा : अजिंक्यला जाग आली तर कॉल कर मला. हे घे, हा माझा नंबर आहे. कागद जपून ठेव. नंबर सेव्ह कर. मी जाते.
वंदना : परत कधी येणार ?
प्रतीक्षा : माहित नाही. पण बिल मी भरेन. कॉल कर फक्त. काही लागल तर बघ तेवढ.
वंदना : पण तुम्ही थांबला तर बर होईल.
प्रतीक्षा : माझी मुलगी एकटी आहे. दुसऱ्याकडे ठेवलय मी तिला. दोसरा काढलाय माझा तिने. जितका अजिंक्य मला तितकीच माझी सारा. आणि अस हि अजिंक्य काय आता शुध्दीत नाही. पण ती आहे. तीच खाण-पिण बघाव तर लागेल ना मला. तिला इकड आणू शकत नाही मी. आणि मी इथ नुसती दिवसरात्र बसून काय करू ? म्हणून जाते मी. वाटल तर पैसे देते एक्स्ट्रा तुला. पण काळजी घे त्याची. जाऊ मी ?
वंदना : हो. मी घेते काळजी. काय वाटल तर कॉल करून कळवेन.
प्रतीक्षा : चालेल. खरच खूप मोठी मदत असेल हि तुझी माझ्यासाठी.
वंदना : मदत कसली. अजिंक्यना मी ओळखते. तीन वर्ष झाले. त्यांची पुस्तक. त्यांच्या मालिका बघून. एवढ्या मोठ्या व्यक्तीच करायला भेटन पण माझ नशीब आहे हे. तेपण चांगल नशीब. तुम्ही जावा.
प्रतीक्षा : हो. येते.
प्रतीक्षा निघून गेली. इकडे वंदना अजिंक्यच्या खोलीजवळ येऊन आत वाकून बघते. तो गाढ झोपेत असतो.
दोन दिवस अजिंक्य शुध्दीवर येत नाही. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटाला त्याचे डोळे उघडले. पण दोन मिनिट आधी त्याने कळते श्वास घ्यायला सुरुवात केलेली. नंतर डोळे उघडलेले. त्याने डोळे उघडले. खोलीत कुणीच नव्हत. इकड तिकड बघायची त्याच्यात ताकद नव्हती. हलक्या आवाजात तो बोलला, “प्रतीक्षा”.
पुन्हा शांत पडून राहिला. पाच एक मिनिटाने त्याने पुन्हा “प्रतीक्षा” अशी हाक मारली. पण प्रतिउत्तर आलच नाही. अंगात जी काही ताकद उरली होती त्या ताकदीने तो जागचा उठला अस मी लिहिणार नाही. त्याच्या मानसिकतेमध्ये जी काही ताकद उरलेली. त्या ताकदीने प्रतीक्षाला बघण्याच्या इच्छेने तो जागचा जरासा उठला आणि मागे टेकून बसला. उजव्या हाताला काहीतरी रुतत होत. त्याने डाव्या सलाईन लावलेल्या हातांने एक दीड मिनिट प्रयत्न करून हळू हळू उजव्या हातावरच पांघरून जरास बाजूला केल. त्याला दिसल उजव्या हाताखाली आलेल प्रतीक्षाच मंगळसूत्र.
अजिंक्यने ते हातात घेतल आणि ताकद नसताना हि कसली ताकद लावली काय माहित पण ते मंगळसूत्र मुठीत पकडल. आणि त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागल. उजवीकडे बघून त्याने खिडकीकडे बघितल. या आधी कधी काय माहित पण जेव्हा आधी इथ होतो तेव्हा याच त्या खिडकीसमोर प्रतीक्षा उभी राहिलेली. ती बाहेर जरी बघत असली तरी तीच एक प्रतिबिंब त्याच्याकडे बघताना त्याला फिकट अस दिसत होत. आणि आता. ती काच स्वच्छ होती. तिथ प्रतिबिंब नव्हत. तिथ कुणाचा अंधार पडला नव्हता. अजिंक्य तसाच खिडकीकडे बघत होता. वंदना आली. आणि ती पटकन अजिंक्यजवळ जाऊन त्याला झोपवायला त्याचा गुढग्यातून वाकलेले पाय सरळ करते. आणि त्याचा उजवा हात धरते. तिला त्याच्या हातात मंगळसूत्र दिसत. ती ते घ्यायला जाते. आणि अजिंक्य तिला धक्का देतो. वंदनाच्या ओठाला हात लागतो. ती ओठ घट्ट दातात चावून व्हिवळत बाजूला होते. अजिंक्य मंगळसूत्र डोळ्यांसमोर धरून बघायला लागतो. वंदना अजिंक्यशेजारी येऊन बसते. त्याला एकटक बघत असताना अजिंक्य वंदनाकडे बघतो. त्याच्या डोळ्यातल पाणी आता गालावरून वाहणार अस बघून वंदना त्याच्या उजव्या हातावर हात ठेवते. आणि अजिंक्यच्या डोळ्यातल पाणी शेवटी गालावरून गळ्यापर्यंत वहायला लागलच.
वंदना : तुम्हाला गरज असताना त्या सोडून गेल्या. हे चूक आहे.
अजिंक्य : गरज मला आहे, तिची संपली. कुठ गेली ती ? सांगून गेली का ?
वंदना : सारा आहे न तुमची तिच्याकडे गेल्या आहेत. मला म्हणाल्या मी पैसे देते ज्यादा तुला. तू काळजी घे अजिंक्यची.
अजिंक्य : घेतलेस का मग पैसे ?
वंदना : नाही.
अजिंक्य : का ?
वंदना : नाही घेऊ वाटले. तुम्ही झोपा. गरज आहे तुम्हाला. बर वाटल ना कि जावा त्यांना भेटायला. मी सांगते त्यांना तुम्हाला शुद्ध आलीय.
अजिंक्य : नको.
वंदना : का ?
अजिंक्य : असच, तिला नको सांगू.
वंदना : बर. झोपा तर तुम्ही. नाही सांगत मी.
अजिंक्य मंगळसूत्र हातात पकडून झोपून गेला. त्या लहान मुलासारख्या अंग टाकून झोपलेल्या अजिंक्यला बघून वंदना बाहेर आली. आणि तिने कॉल लावला.
वंदना : हेल्लो, प्रतीक्षा ?

 भाग १७
प्रतीक्षा : हेल्लो.. कोण ?
वंदना : अजिंक्यना शुध्द आलीय. वंदना मी.
प्रतीक्षा : ओके. येईन मी, उद्या सकाळी.
वंदना : उद्या ?
प्रतीक्षा : हो. कामात आहे मी. नंतर बोलते. कॉल लावते नंतर. चालेल न ?
वंदना : बर.
वंदना तिथून निघून गेली. अजिंक्य दिवसभर झोपूनच होता. दुपारी जेवण आलेल पण अजिंक्य जेवला नाही. उपाशी राहून तशाच औषधाच्या गोळ्या खाल्ल्या. आणि त्याचा असर संध्याकाळी झाला. पाच संध्याकाळी चार वाजता त्याला झोपेतच उंचावरून जोरात खाली पडल्याचा भास झाला. आणि जोरात दुखल हि सत्यात. त्या भासात त्याने डावा हात घट्ट मुठ पकडून पोटाशी ओढला त्यात सलाईनची बाटली खाली जमिनीवर पडली. हातातली सुई शिरेतून बाहेर आली आणि मुठीतून हि. शिरेतून रक्त यायला लागल. अजिंक्यला जाग आली. तो घाबरून उठतो. हात दुखत होता पण उपाशी पोटी खालेल्ल्या औषधामुळे त्याची नशा त्याच्या डोक्यात होती. तो निम्मा झोपेतच होता. त्याने हाताला बघितल. हातातून येणार रक्त आधी त्याने बेडशीटला पुसलं. तरी रक्त येत होत म्हणून पांघरूणाने हाताच्या पंज्याला घट्ट पकडल. थोडसच अगदी बर वाटल्यावर खाली पडलेली सलाईनची बाटली बसल्या जागेवरूनच खाली वाकून उचलायला गेला आणि तोल जाऊन तोच खाली पडला.
इकडे प्रतीक्षा घरी येऊन सारासोबत बोलून-खेळून नंतर बेडरूममध्ये येते. कपाटात पुस्तक असतात बरीच. त्या पुस्तकांच्या ओळीत तीन डायऱ्या असतात, ज्यात फक्त प्रतीक्षासाठी अजिंक्यने बनवलेल्या कविता आणि शायऱ्या असतात. कोणतीही डायरी उघडावी, पहिल्या पानापासून शेवटच्या पानाच्या ओळीपर्यंत फक्त प्रतीक्षासाठी लिहिलेलं. जिथ जागा मोकळी आहे तिथे तिची चित्र काढलेली होती. प्रतीक्षा त्या तिन्ही डायऱ्या घेऊन बाल्कनीत येते. तीन डायऱ्या एकमेकांवर ठेवून त्या पेटवून टाकते.
त्या पेटत्या डायऱ्या बघून मनातल्या पेटत्या रागाला ती शांत करत होती. आग शांत पेटत होती. वारा अजिबातच नव्हता पण तरी अधून मधून आग भडका घेत होती. बहुतेक त्या कविता, शायरी, चित्र जे काही त्यात असेल ते तरफडत असेल.
प्रतीक्षा राख व्हायची वाट बघत असते. ती अक्षर प्रतीक्षाने हि आग विजवावी या प्रतीक्षेत होती. डायरीची राख झाली. प्रतीक्षा त्या झाडूने ते गोळा करायला गेली आणि वार आल. वार पण निष्ठुर झालेलं. सगळ झाल्यावर डायरीला प्रेम दाखवायला आल. पण उशीर झालेला. तरी प्रतीक्षा त्यात ती राख भरून बाल्कनीतून खाली रस्त्यावर टाकून देते आणि आरशासमोर जाऊन खुर्चीवर बसते. एकटक आरशात बघते. ओला किच्च झालेला तिचा चेहरा डोळ्यातल्या पाण्याने. आणि अगदी कोरड तिच मन झालेलं त्रासाने.
इकडे अजिंक्यला तसा खाली पडलेलं बघून वंदना घाबरते. मग डॉक्टर वैगरे बोलावून. त्याला खाटेवर झोपवून पुन्हा सलाईन लावून इंजेक्शन देऊन ते निघून जातात. वंदना तिथेच थांबते. ती मोबाईलमध्ये अजिंक्यचा ब्लॉग वाचत बसलेली असते.
आणि आत एक अजिंक्यच्याच वयाचा एकजण येतो. वंदना उठून विचारते,
वंदना : कोण पाहिजे तुम्हाला ?
चंद्रकांत : हा. अजिंक्य भोसले ना ?
वंदना : हो. तुम्ही कोण ?
चंद्रकांत : त्याचा भाऊ.
वंदना : आत्ताच झोपवलय त्यांना. खाली पडलेले. झोपू दे त्यांना. नंतर येऊन भेटा.
चंद्रकांत : अहो आत्ताच भेटायच आहे मला त्याला. एक मिनिट उठवा न त्याला. दोन मिनिट बोलेन मी. आणि चौथ्या मिनिटाला तो झोपला पण असेल.
वंदना : नाही. डॉक्टर आत्ताच सांगून गेलेत झोपू दे त्यांना. इंजेक्शन दिलय त्यांना झोपेच झोप यावी म्हणून.
अजिंक्यला यांच्या आवाजाने जाग आली. त्याने डोळे उघडून डावीकडे बघितल. त्या सरशी चंद्रकांत अजिंक्यच्या डाव्या हाताला टेकूनच पटकन बसला. आणि अजिंक्यचा उजवा हात पोटावर होता त्या हाताच्या पंजाला घट्ट पकडून तो बोलला,
चंद्रकांत : कसा आहेस, अजिंक्य ?
अजिंक्य : तू कोण ?
चंद्रकांत : चंद्रकांत भोसले.
अजिंक्य : कोण भोसले ?
चंद्रकांत : चंद्रकांत अरुण भोसले.
अजिंक्य : नाही माहित मला.
चंद्रकांत : मी तुझा भाऊ.
अजिंक्य : सावत्र भाऊ.
चंद्रकांत : हो, जगासाठी पण तू माझ्यासाठी सख्खा भाऊ आहेस. यार.
अजिंक्य : इतक्या वर्षात पहिल्यांदा भेटतोयस. कशाला ?
चंद्रकांत : तू माहित नव्हतास. आईच बोलन चाललेलं आत्यासोबत तेव्हा मला समजल सख्ख्या भावासोबत मला एक सावत्र भाऊ पण आहे ज्याच्यासोबत मी लहानपणी खेळलोय. आणि तुला कुठ कुठ शोधत मी इथ आलो आत्ता.
अजिंक्य : बर केल. कोण माझ नाही अस वाटलेलं मला. तू आलास. माझा तो विचार भ्रम झाला.
दोघांच बोलन सुरु होत. वंदना दारात डॉक्टर येत नाही ना हे बघत होती. अजिंक्य रडकुंडीला आलेला. चंद्रकांत हि रडवेला झालेला. पहिल्यांदाच दोघ एकमेकांना बघत होते. एकमेकांशी बोलत होते. मग जे काही त्यांना त्यांच्या घरी लहानपणापासून सांगितलेलं त्या वरून दोघ काही नाती, नाव, ठिकाण सांगून काहीतरी बोलत होते. बोलन झाल आणि अजिंक्य झोपून गेला. चंद्रकांत घरी निघून गेला.
अंजली ओमकारच्या मिठीत होती. ओमकार कधी नव्हत त्याच्या जवळ आलेली अंजली बघून तिच्या ओठांना किस करत तिच्या छातीला दाबत तिच्या प्रेमात वाहवत जात चाललेला. उतावळेपणा दोघांचा वाढला. ओमकार आता स्वतःला थांवू शकत नव्हता आणि अंजलीसुध्दा. पण जेव्हा ओमकाराचा हात छातीवरून पोटाकडे गेला तेव्हा तो आहे तसा एका जागी शांत झाला. त्याचा हात पोटावर तसाच अडकला. अंजली डोळे उघडून त्याच्याकडे बघते. आणि स्वतःच्या वाढलेल्या पोटाकडे बघून झालेल्या इच्छेला न मारता पुन्हा ओमकारकडे बघते आणि स्वतःहून त्याला कीस करू लागते. आणि त्याचा हात आपल्या छातीवरून फिरवायला लागते.

भाग १८
ओमकार : या छातीवरून फिरलेत का कधी हात, त्या अजिंक्यचे ?
अंजली : हो.
ओमकार : ओठांवर तर ताबाच असेल. नाही म्हणजे सारख त्याच नाव ओठांवर असत ना.
अंजली : आपल प्रेम सुरु असताना त्याची आठवण का ?
ओमकार : का ? काय त्रास होतोय का तुला ?
अंजली : नाही. पण झाल ते विसरायचं तूच म्हणालास ना ? मग या शरीरावर जिथे जिथे त्याने स्पर्श केला तो वेळेसोबत जाणवायचा बंद झाला. तू नव्याने कर स्पर्श मला आणि तुझ्या नवीन स्पर्शाची जाणीव दे मला. सोड त्याचा विषय.
अंजली ओमकारला बेडजवळ सरकवते. ओमकार तिला मिठीत घेऊन बेडवर झोपतो.
ओमकार : काय मजा आहे ना ?
अंजली : कसली ?
ओमकार : प्रेम करायचं. जीवाची सगळी ताकद लाऊन. पण ती ताकद तुझ्यात उतरणारच नाही. ना मी तुला घट्ट जवळ घेऊ शकतोय. ना तू मला तुझ्यात ओढून घेऊ शकतेस. साधी सोप्पी गोष्ट सेक्स. आज करायची वेळ आली लग्नानंतर पहिल्यांदा, पण जाऊदे....
अंजली : पण काय ?
ओमकार : लोकांच्या सेक्स करायच्या वेळेस लाज मधे येते. कुणाच्या जुन्या आठवणी येतात. कुणाच्यात नाविन्य असत. अगदी इच्छा नसताना वापरायला लागणार प्रोटेक्शन मधे येत. पण आपल्या मध्ये हे तुझ वाढलेलं पोट येतय.
अंजली : आता कमी पण करू शकत नाही ना.
ओमकार : हम. काय बोलायचं..
अंजली : बघ ना जमेल तुला. कर ना तसच.
ओमकार : चालेल तुला ?
अंजली : हो. मी तुझीय ना आता. कर.
ओमकार : साडीला मोकळ कर.
अंजली : तू तुझ्या प्रेमाला जे इतक दिवस मनात साठवून ठेवलेलं सगळ माझ्याकडे मोकळ कर.
इकडे अजिंक्य बेडवर बसलेला. विचार आणि विचार फक्त. काय कराव पेक्षा काय झाल हा प्रश्न त्याला पडत होता. पण यातून निघणारा मार्ग एक हि त्याला दिसत नव्हता. विचार जास्त केला कि त्याच डोक दुखायचं. मेंदूतून चमका यायच्या. अजिंक्य डोक्याला उजवा हात लावून बसलेला. डाव्या हातात सलाईनच औषध जात होत.
वंदना आली.
वंदना : अहो. झोपा तुम्ही. चला बर पटकन.
ती अजिंक्याच्या खांद्यांना धरून झोपवायला लागते.
अजिंक्य : शु.... बस तिथ स्टूल घेऊन. मला एक सांग.
वंदना जाऊन स्टूल आणते आणि बसते.
अजिंक्य : अंजली इथ आलेली कुणी सांगितल प्रतीक्षाला ?
वंदना : ते बाहेर त्यांनी तुम्हाला इथ ठेवताना त्यांची माहिती दिलेली सगळी.
अजिंक्य : हम. तुझ्या घरी कोण असत ग ?
वंदना : काय मी माझा भाऊ आणि आई बाबा.
अजिंक्य : हम. तू कधी पासून करतेस इथ काम ?
वंदना : दोन वर्ष झाल.
अजिंक्य : कस काय तुला सहन होतो ग इथला स्पिरीटचा वास, रक्त वैगरे बघून चक्कर नाही येत ? मला तर जोरात चक्कर येते रक्ताच्या वासाने.
वंदना : कॉलेजला शिकताना भीती वाटायची पण नंतर गेली भीती. आता ऑपरेशन थेटरमध्ये असते मी कधी कधी सरांसोबत. आता सवय झालीय.
अजिंक्य : ग्रेट.
वंदना : मी खूप लोकांना संभाळल या दोन वर्षात. नुसता फ्लू झालेल्यांपासून अगदी शेवटचे श्वास मोजणारे. जन्माला आलेली बाळ आणि मेलेली बाळ. खूप वाईट वाटायचं. खूप काळजी वाटायची आणि कधीतरी भ्यायची पण मी. पण सगळ्याचं मन लावून करायचे. आनंद वाटतो मला माझ्या कामात. पण एक सांगू ? आत्ता मी गेले तीन चार दिवस खूप आनंदी आहे.
अजिंक्य : का ?
वंदना : तुम्ही इथ आहात.
अजिंक्य : माझ काय ?
वंदना : मी तुमची मालिका बघते. तुमची पुस्तक, ब्लॉग काहीच वाचायचं राहील नाहीये सगळ वाचून काढलय. खरच एकेक गोष्ट वाचताना मी तुम्हाला फील करत होते. अनुभव आणि त्याचा प्रत्यय वाचून पण मिळतो माहित नव्हत. पण तुम्ही मला वेड लावलत. मला तुम्ही आवडता.
अजिंक्य : होका. म्हणजे तो गालावरचा किस प्रेमापोटी होता का ?
वंदना : हो.
अजिंक्य : पण तुला माहित नाही का ?
वंदना : काय ?
अजिंक्य : प्रेमापोटी केलेला किस गालावर असतो. तो कुणीही देऊ शकत. मित्र, मैत्रीण, आई, बाबा, काका, काकू सगळेच.
वंदना : होका.. पण मी यातली एक पण नाही.
अजिंक्य : तेच म्हणतोय. प्रेमापोटी केलेला किस गालावर असतो. आणि प्रेमाचा किस ओठांवर असतो. आता तू ठरव तुझा तो किस प्रेमाचा होता का प्रेमापोटी केलेला होता.
वंदना : ( जागची उभी राहून ) प्रेमाचा.
अजिंक्य : हम.
वंदना : मग परत करू का.
अजिंक्य : करायचा आहे का ?
वंदना : हो.
अजिंक्य तिला खुणावतो. ती जाऊन खोलीच दार लावून पटकन अजिंक्यच्या शेजारी येऊन बसते.
अजिंक्य : या आधी केलाय ?
वंदना : पहिलाच असेल हा.
अजिंक्य : हम. ये इकड.
ती अजिंक्याच्या ओठांजवळ ओठ नेते आणि डोळे गच्च मिटून घेते.
अजिंक्य तीच्याकडेच बघत असतो. काहीच होत नाही म्हणून वंदना डोळे उघडून बघते. अजिंक्य तिला बघत असतो. तिला लाजल्यासारख होत. ती पटकन मागे वळून बघते. आणि जागच्या जागी बसूनच फिरते. अजिंक्य तिचा हात धरतो. तिची धडधड वाढते. आता त्याने तिला घेतलच जवळ तर काहीही करायला तयार होईल वंदना अशी तिची गत झालेली.
अजिंक्य : असावरी कोण आहे ?
वंदना शांतपणे धडधड छातीची शांत करत होती. तिला काही ऐकूच आल नाही.
अजिंक्य : भावाच नाव तुझ्या असावरी आहे का ?
वंदना : नाही. शुभम.
अजिंक्य : मग असावरी नाव कुणी सांगायला लावल ?
वंदना : अंजली.
अजिंक्य : अंदाज होताच. बर ऐक मला सिगरेट ओढायचीय. सर तुझे आत्ता नाही न येणार ?
वंदना : काय ? अहो तुम्हाला सलाईन लावलय. मरता-मरता वाचलाय तुम्ही आणि सिगरेट काय ? आणि इथ ओढायची नसते.
अजिंक्य : मला ओढायची आहे. बाकी तू करणार असशील मदत तर थांब इथ नाहीतर जाउ शकतेस. जबरदस्ती नाही.
वंदना : अस नका ना बोलू.
अजिंक्य : मला सिगरेट हवीय.
वंदना : बर. मी देते आणून पण ओढणार कुठ ?
अजिंक्य : इथच. एक मिनिट हा पैसे. माझे कुठ गेलेत बर,
वंदना : आणते मी. कोणती मागू ?
अजिंक्य : गोल्डफ्लेक. दोन आण. मोठ्या.
वंदन निघून दारापाशी गेली. दाराची कडी उघडताना तिला काय वाटल काय माहित ती अजिंक्यकडे बघते. आणि कडी उघडून बाहेर निघून जाते. अजिंक्य डोळे मिटून बसून असतो.


भाग १९
अजिंक्यचे विचार,
कित्येक लोकांना, अ...म कित्येक नाही प्रत्येक लोकांना प्रेम हव असत. स्त्री असेल तर तिला पुरुषाचा सहवास आणि पुरुष असेल तर त्याला स्त्रीचा सहवास हवा असतो. स्पर्श हवा असतो आणि त्यासाठी प्रेम नावच एक लेबल हव असत. ते प्रेम नावाच लेबल लावून घेतल तरी जग बदनाम करतच, त्याला. पण तरी मनाची चाड असते म्हणून कि काय लोक प्रेम हे लेबल लावून सगळ्या गोष्टींच्या शोधात राहत असतात. ते मिळाल कि परत परत आणि पुन्हा पुन्हा तेच मिळत राहत आणि मग हव असलेल्या त्या प्रेमातल्या गोष्टीचा शेवट होतो त्यातल आकर्षण संपून आणि उरते जबाबदारी. मनाविरुद्ध ते नात सांभाळण्याची. पण मी असा नाही. माझ प्रेम संपत नाही. मला न कधी प्रतीक्षाचा कंटाळा आला ना अंजलीचा ना प्रियांकाचा. एका प्रेमाच्या शोधात मी किती प्रेमं मिळवली. क्षणभराचा सहवास मिळावा म्हणून कित्येक क्षण असेच एकट्याने घालवले. आणि आता एकटा राहू शकत नाही इतकी मनाची घालमेल. जवळ कुणी नसल तरी त्यांचे विचार त्यांची आठवण येतच आहे. स्पर्श तर काय अगदी किस......स..स.स...पासून त्याच स चा सेक्स कधी आणि कितीदा झाला सांगू शकत नाही.
प्रेम नुस्त वाटत फिरलो मी. पण देणाऱ्याने घ्यायची पण भावना ठेवावी विसरूनच गेलो मी. तो देव पण सगळ देतो पण त्यामागे पण त्याची इच्छा असते कि माणसाने त्याची सेवा करावी. तो देव आहे आणि मी तर माणूस आहे माझ्यात तर लाख पटीने जास्त स्वार्थ हवा होता. पण मी स्वार्थ न बघून चूक केलीय....
वंदना आली. तिने सिगरेट आणून त्याच्या समोर धरल्या. अजिंक्यने त्या हातात धरल्या. तो सिगरेट बघत तीच नजर तिच्याकडे करतो. दोन सिगरेटचे फिल्टर डाव्या हाताच्या पंजाच्या वरच्या बाजूला सुईच्या शेजारी हलक्या हाताने थोपटतो. वंदना तिच्या कोटाच्या खिशातून काडेपेटी काढून त्याला देते. परत एक चिंगम काढून देते. दोन्ही हात कोटाच्या खिशात घालून पोटाशी हाताना टेकवते. आणि अजिंक्यला बघायला लागते. अजिंक्य दोन्ही सिगरेट ओठात पकडून त्यांना पेटवतो. एक मोठा झुरका घेऊन तो सगळा धूर वर सोडतो. वंदना जाऊन पंखा लावते. खिडकी उघडीच असते. धूर बाहेर जायला लागतो. अजिंक्याच्या डोक्यातून कळ येते. तो दोन्ही हाताने डोक्याला धरतो. तरी परत दोन्ही सिगरेट ओठात पकडून झुरका घेतो. आणि सिगरेटच्या या दोन झुरक्यात सिगरेटची राख पुढे साठून राहिलेली. ती पडणार होती. अजिंक्यची नजर काहीतरी शोधत होती. वंदना अहम... ठसका आल्यासारखं करते. उगीचच. अजिंक्य तिच्याकडे बघतो. ती तिचा उजवा हात त्याच्या पुढे करते. आणि अजिंक्य तिच्या हातात त्या दोन सिगरेटची राख तिच्या अंगठ्यावर थोपटून पाडतो. आणि पुन्हा पुढचा झुरका त्याने सुरु केला. पुन्हा तीन झुरक्यानंतर तिच्या हातात तो ती राख झाडतो. सिगरेट संपत फिल्टरजवळ आली. वंदना त्या सिगरेट घेऊन खिडकीतून बाहेर टाकते. हातातली राख हि बाहेर टाकते. त्याच्याजवळ येवून त्याला ग्लासभर पाणी देते. पाणी पिऊन झाल. अजिंक्य झोपतो. वंदना बाहेर निघून जाते.
अर्ध्या तासाने, चंद्रकात घरून जेवणाचा चार कप्प्यांचा डबा घेऊन येतो. अजिंक्यला उठवून तो त्याला खायला देतो. अजिंक्य जेवतो आणि त्याच्याशी बोलत बसतो.
चंद्रकांत : वाहिनी कुठ असतात ? बाहेर कुठ असतात का ? नाही म्हणजे एकटाच असतोस इथ. मागच्या वेळेस पण एकटा होतास. आत्ता पण एकटा. मला वाटल जेवायचा नाहीस जास्त. तर सगळा डबा खाल्लास. काय झालय का अजिंक्य ?
अजिंक्य : काही नाही.
चंद्रकांत : मग वाहिनी कुठ असतात ?
अजिंक्य : असते इथ. मुलगी लहान आहे मग तिच्या जवळ असते. म्हणजे मीच सांगितल तिला. तिला नको इथ आणू तिला घेऊन घरी बस.
चंद्रकांत : हा बरोबर आहे. लहानामुलांना भीती वाटते दवाखान्याची. आणि त्यात तिला इन्फेक्शन व्हायचं. नकोच. इथ. बरोबर आहे तुझ.
अजिंक्य : तुझी बायको ?
चंद्रकांत : व्हायचंय अजून. एक होती. ती आणि मी पळून गेलेलो लग्न करायला. पण माझ्या  भावाने म्हणजे आपल्या भावाने खूप गोंधळ घातला. ती घाबरून गेली घरी. परत भेटलीच नाही. आता बघू नोकरी करतो आहे. नशिबात असेल तेव्हा मिळेल कुणीतरी.
अजिंक्य : हम. मिळेल ‘कुणीतरी’...
चंद्रकांत : मला तर विश्वासच बसत नाही. मी तुला भेटतोय ते. ज्याला इतके लोक ओळखतात तो माझा भाऊ. आहे.
अजिंक्य : सावत्र.
चंद्रकांत : असुदे. ते विसर. आपण सख्खे आहे. नात सावत्र असल तरी बाप आपला एकच होता. मग आपण सख्खेच.
अजिंक्य : हम.
चंद्रकांत : बहुतेक तुला झोप आलीय. तू झोप मी आहे. थांबतो इथ.
अजिंक्य : इथ नाही थांबायचं. जायचय बाहेर.
चंद्रकांत  : कुठ ?
अजिंक्य : आपण दोघ जायचय. बाहेर लक्ष ठेव.
चंद्रकांत : अरे पण कुठ जायचं ?
अजिंक्य : सांगतो ते कर.
चंद्रकांत : हो.
तो जाऊन बाहेर दारात थांबला. अजिंक्यने बुलेटची चावी घेतली. पाकीट घेतल. काडेपेटी घेतली. चिंगम खाल्ल. दोघ निघून दवाखाण्याबाहेर गेले. जाताना अजिंक्य खोलीच दार लावून घेतो.
दोघ बाहेर आले. चंद्रकांत अजिंक्यच्या सोबत होता. त्याच्या हातात त्याने आणलेला रिकामा डबा होता. अजिंक्य पायाखालचा रस्ता अंदाज घेत चालत होता. बुलेट जवळ जाऊन अजिंक्य त्यावर बसला आणि गाडी सुरु केली. गाडीचा मोठा आवाज सुरु झाला.
चंद्रकांत : यार तुझी आहे ? भारी रे.... मला पण आवडती बुलेट.
अजिंक्य : आवड मनात ठेवायची नाही कधी. ( गाडीच्या टाकीवर हात ठेवत ) ती अशी जवळ ठेवायची असते. बस.
चंद्रकांत त्याच्या मागे बसला. अजिंक्यने चंद्रकांतला त्याच्या पेठेत सोडल. चंद्रकांत त्याला घरी चल म्हणून खूप म्हणत होता पण अजिंक्य गेला नाही. अजिंक्य तिथून स्वतःच्या घरी गेला. दारात स्विफ्ट होती. त्याने बुलेट लावली आणि दाराजवळ गेला. बेल वाजवली.
प्रतीक्षाने दार उघडल. अजिंक्य आत जाऊन मटकन सोफ्यावर बसला. बहुतेक चक्कर आल्यागत झाल त्याला. त्याने पाणी मागितल तिला. प्रतीक्षा जाऊन पाणी आणते आणि त्याच्या पुढे ग्लास ठेवते. आणि आत निघून जाते. 
        
भाग २०
अजिंक्य प्रतीक्षाला खालच्या आवाजात हाक मारतो. ‘प्रतीक्षा’.
प्रतीक्षा मागे वळून बघते.
प्रतीक्षा : काय ?
अजिंक्य : काय झाल तुला ?
प्रतीक्षा : काही नाही. बर झाला लवकर आलास. मी जाणारच होते आत्ता. शेजारी चावी ठेवून. त्या नर्सने सांगितल मला. तू दवाखान्यात नाहीस. म्हणून थांबले.
अजिंक्य : कुठ चाललीस ?
प्रतीक्षा : पुण्याला.
अजिंक्य : कुठ ?
प्रतीक्षा : घरी.
अजिंक्य : कशाला ?
प्रतीक्षा : कायमची.
प्रतीक्षा तिच्या हातातला मोबाईल त्याला देते.
प्रतीक्षा : हा तू मला दिलेला मोबाईल. हे सिमकार्ड. तुझ्या गोष्टी नकोत मला आणि हे बाळ. आधी कळाल असत तर वाढवल नसत. असो. नाव तर लावेल तुझ तू नसला सोबत तरी.
अजिंक्य : ते मंगळसूत्र ?
प्रतीक्षा : ते पण पाहिजे का तुला आता ? घे.
अजिंक्य : नकोय मला. पण हे तुझ्याकड आहे तर मग ( खिशातून एक मंगळसूत्र काढत ) हे कुणी ठेवल तिथ दवाखान्यात उशीपाशी ?
प्रतीक्षा : तुला काय वाटल मी काढून गेले ?
अजिंक्य : हो.
प्रतीक्षा : जगातली सर्वात सुंदर मुलगी तू आहेस प्रतीक्षा म्हणायचास ना ? मग या जगात दुसरी कोण सुंदर प्रतीक्षा आली अजिंक्य ? जिच्यासाठी तू हे मंगळसूत्र घेऊन ठेवलस ?
अजिंक्य : अ ?
प्रतीक्षा : असावरी, अंजली का प्रियांका ?
अजिंक्य : तुला कुणी नाव सांगितल हे ?
प्रतीक्षा : तुझ्या अंजलीने. दवाखान्यात भेटली होती मला. तिने तुला दवाखान्यात नेण्याआधी कॉल करून सांगितलेलं कि तुला लागलय. आणि ती तुला भेटायला आलेली. छान वाटल. तुला मी सोडून अजून जगातल्या सुंदर मुली भेटल्या आहेत ते ऐकून. तिने सांगितल सगळ.
अजिंक्य : आणि तिला तुझा नंबर कुणी दिला ?
प्रतीक्षा : तिला तुझ्या मोबाईलचा पासवर्ड माहित आहे. तिला तुझ्याबद्दल सगळ माहित आहे. तुझ्या-माझ्यातल सगळ माहित आहे. आणि तुझ्या आयुष्यात असलेली अंजली मला माहित नाही. म्हणून मी ठरवल तुला सोडून जायचं कायमच. आपल्या प्रेमाचा शेवट एकमेकांच्या मिठीत एकाच बेडवर एकाच वेळी व्हावा अस वाटत होत. वाटल नव्हत शेवट हा असा होईल. तू इथ आजारी आणि मी तुला गरज असताना सोडून जातीय कायमच सोडून. पण पर्याय नाही. तुला अजून एक संधी दिली तर तू तसाच वागशील. आणि मला तुला संधी द्यायची नाही. तू माझ्या प्रेमाचा अपमान केलायस. मी येते.
प्रतीक्षा साराला घेऊन समान घेऊन निघून गेली. अजिंक्य रडत फक्त सोफ्यावर बसलेला. अजिंक्य उठून आत जातो. बेडवर झोपतो. आणि अंजलीचा कॉल येतो.
अजिंक्य मोबाईल कानाला लावतो.
अंजली : कसा आहेस. माहितीय वाईटच असणार. आणि तू हि कुठ चांगला आहेस. वाईटच आहेस. मला प्रेम दिल नाहीस. आता तू प्रेमाला तरस. आणि मग मला सांग कसा आणि किती त्रास होतो.
अजिंक्य : काय मिळाल तुला अस करून ?
अंजली : आनंद. तुझ माझ्यावर प्रेम होत. माझ तुझ्यावर तितकच होत. पण त्रास मी सहन केला. तू मजा घेतलीस. आता मजा मी घेणार आणि तू फक्त त्रास सहन करायचा.
अजिंक्य : वेळ प्रत्येकाचा असतो. माझा गेला तुझा आला. आणि तुझा जाईल तेव्हा..
अंजली : तुझा आता कधीच येणार नाही. आता तू फक्त तुझा गेलेला वेळ शोधत राहा अजिंक्य. तू आता संपलास....
प्रतीक्षा आत आली स्विफ्टची चावी घ्यायला. आणि अजिंक्य बोलत असल्याचा आवाज येऊ लागला. ती आत गेली. अजिंक्य दचकून मोबाईल बाजूला ठेवतो. प्रतीक्षा जवळ जाऊन मोबाईलवरच नाव बघते. आणि अजिंक्यच्या कानाखाली देते. आणि निघून जाते. अजिंक्य तिच्या मागे जातो. अंजली हेलो हेलो करत असते. प्रतीक्षा गाडी सुरु करून निघून जाते. आणि अजिंक्य दारात बसून रडत राहतो.
समाप्त.      

                   
    

   


( या कथेला समजून घेण्यासाठी प्रेमाची शप्पथ आहे तुला , प्रेमाची शप्पथ आहे तुला पर्व 1/2/3रे/ , खोट्या प्रेमाची शप्पथ आहे तुला , कुणीतरी आणि कुणीतरी २ या कथा वाचाव्यात )
( कथेतील कोणता हि भाग परवानगी शिवाय शेअर करू नये.. कायदेशीर गुन्हा होईल.)


सावधान....! या कथेला ऑनलाइन रजिस्टर केले आहे. त्यामुळे या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.            
7 टिप्पण्या

 1. प्रत्युत्तरे
  1. Khup chhan lihita sr tumhi ,ase vatatay ki hi katha sampavavich nahi,mi purn bhag vachle ahet ajun lihnar ahat ka

   हटवा
  2. प्रेमाची शप्पथ आहे तुला पर्व 5वे सुरू झाले आहे . अजिंक्य या नावाने ही कथा इथेच ब्लॉगवर सुरू आहे . नक्की वाचा आणि प्रतिक्रिया द्या
   आपण वेळ काढून कथा वाचता त्याबद्दल धन्यवाद..

   हटवा