ति दोघ.

ti dogh school love school boy and girl
( image by me )

01

सकाळी दहा वाजलेत. वातावरण अस ढगाळलेल झालय. ना गरम होतय ना थंडी वाजतीय. उगीचच दमट वातावरण झालय. दमट वातावरण तर मुंबईला असत इथ साताऱ्याला नाही. पण आज झालेलं तस वातावरण. रोहितला आईने गरम गरम चपाती आणि मेथीची भाजी बनवून दिलेली. डब्यात पण दोन चपाती मेथीची भाजी आणि कैरीच लोणच दिल. बाटली पाण्याने भरून डबा आणि बाटली त्याच्याकडे दिली. रोहित जेवला. रोज पोट भरायचं जेवून त्याच आज त्याला कसस होत होत. पोटात गोळा आलेला. सव्वा दहा वाजले तरी घरातून त्याचा पाय निघेना. वडिलांनी जस त्याच नाव घेतल तस रोहितच लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे गेल आणि मग त्याला दिसल दहा वाजून बावीस मिनिट झालेत. पंधराच मिनिट राहिलेत शाळा भरायला. तरी सुद्धा कपाटापाशी काहीतरी शोधायची नाटक करून टंगळ-मंगळ करत त्याने पावणे अकरा वाजवले. आणि मग तो घराबाहेर पडला. आणि थेट शाळा गाठली.आणि चालत चालत हळू हळू.
राष्ट्रगीत सुरु झाल. आणि शाळेच्या गेटपाशी उशिरा येणाऱ्या मुला-मुलींना उभ केल होत. त्यात आता रोहितची हि वाढ झाली. राष्ट्रगीत झाल. प्रार्थना झाली. आणि मग तास सुरु झाले. आणि उशिरा येणार्यांना दोन हातावर दोन दोन छड्या देत एक शिक्षक मुलांना ओरडत होते. साहजिकच आहे कारण आज १५ जून तारीख होती. शाळेचा पहिला दिवस. आणि पहिल्याच दिवशी उशीर केलेला मुलांनी हे बरोबर नव्हत ना.
रोहितचा नंबर आला आणि त्याला हि दोन छड्या मिळणार होत्या. उजव्या हातात ताकद जास्त असते. त्यामुळे त्यान त्यावर छडी खाल्ली. पण डाव्या हाताची छडी खाताना हात त्याने माग घेतला आणि छडी हुकली आणि म्हणून त्याला दोन ऐवजी तीन छड्या मिळाल्या. पहिल्याच दिवशी त्याच मार खाऊन शाळेत स्वागत झाल होत.
वर्गात आला तसा दारातच थांब अस वर्गशिक्षकांनी त्याला आदेश दिला आणि नको तेच झाल. अख्खा वर्ग त्याच्याकडे शाळेत उशिरा भूत आल्यासारखं बघत होत. मग नंतर दहा मिनिटांनी वर्गशिक्षकांनी त्याला वर्गात घेतल. जागा तर नव्हती बसायला. कारण अख्खा वर्ग भरलेला होता. पण मग शेवटी एका मुलाशेजारी जागा मोकळी होती ती त्याला दिसली. रोहित तिथ गेला आणि त्या मुलाने म्हणजे असिफने दप्तर बाजूला घेतल आणि रोहित तिथ बसला. रोहितला बसवत नव्हत तिथ. कारण मागच्यावर्षी याच मुलाशी त्याच भांडण झाल होत. हमरातुमरीवर अगदी पोचलेलं भांडण. एक वर्ष घेतलेली दुष्मनी आज संपली होती. मराठीचा तास सुरु होता. सगळ्याचं तिकड लक्ष होत. कारण, धडा नवीन होता म्हणून ? नाही. मग शिक्षक नवीन होते म्हणून ? नाही कारण शिक्षक कितीही नवीन असले तरी सगळे चिडकेच असतात. मग  ? नवीन वह्या नवीन पुस्तक. हे कारण होत. कस आहे कितीही पुढच्या वर्गात गेलो आपण तरी आपल्याला या नव्या वह्या पुस्तकांची आवड हि असतेच.
सगळ्यांच लक्ष होत फळ्याकडे. रोहित मात्र वही बाहेर काढत काढत मुलींच्या रांगेत बघत होता. आणि त्याला पूजा दिसली. केसांची हेअर स्टाईल पण तिने बदलली होती. आणि जरा पण गोरी दिसत होती आज ती. मागच्या वर्षी जरा सावळी होती. पूजा अचानक कशी गोरी झाली ह्या विचारात रोहित होता. आणि अख्खा वर्ग शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या विचारात होता कि, स्वामींची पिशवी कुत्र्याने का चोरली ?
तेवढ्यात शिक्षकाने रोहितला उठवून उत्तर विचारल आणि. रोहित उठला पण शांत उभा होता खाली तोंड करून बेंचवर बोट फिरवत. आणि शिक्षक बोलले बस खाली. आणि तो बसला. आणि तास सुरु राहिला पुढे.


( image by google )

02
रोज शाळेत जाण. वर्गात होणाऱ्या तासाकडे दुर्लक्ष करण. रोजचा उतारा कसाबसा करायचा का तर दुसऱ्या दिवशी वर्गात मार मिळतो. मार मिळायचं हि काही नाही. हात तर काय कोडगे झालेले मार खाऊन, आणि रोहित पण. पण शिक्षक मारताना मुली सगळ्या त्याच्याकडे तोंड करून बघायच्या आणि अजून त्याला लाजल्यासारख व्हायचं. अति लाजल्यासारख तर तेव्हा हि व्हायचं त्याला जेव्हा पूजा त्याच्याकडे बघायची. ती प्रेमाने बघत असती तर काही वाटल नसत रोहितला पण ती अस काही बघायची कि याला स्वतःचीच लाज वाटायची. म्हणून त्याने ठरवलेलं शिकायचं नाही जास्त. वर्गात लक्ष हि द्यायचं नाही जास्त. दंगा मस्ती करायची. पण ज्या ज्या गोष्टीनी त्याला मार मिळेल त्या गोष्टी टाळायच्या. आणि त्याचे तेच प्रयत्न असायचे.
आज वर्ग भरलेला. पण शांत होता. शिक्षक काही तरी कविता शिकवत होते. तास होता मराठीचा. पद्य विभाग शिकवायचं सुरु होत शिक्षकांचं. कविता अशी काही होती कि प्राणीमात्रांवर दया करा. प्रेम करा. प्रेम करा म्हणाल्यावर रोहितने कान टवकारले. जणू काय शिक्षक त्याला बोलले कि , रोहित ने पुजावर आणि पूजा ने फक्त रोहितवरच प्रेम करावे. पण जसे पाण्याचे थेंब एक-सलग अंगावर पडले आणि शर्टाची भाई भिजली त्या गारव्याने त्याला जाग आली. शिक्षक म्हणाले, “ती बंद कर खिडकी”. त्याने ती खिडकी लावली. त्या वेळात पण सगळा वर्ग त्याच्याकडे बघत होता. पूजाही.
काय असत आत्ता? म्हणजे ढगाळलेल वातावरण. रस्त्यावर पडणारा पाउस. आणि खिडकीतून अंगावर येणारा पाउस. वर्गात शांतता. सगळ्या मुलाचं लक्ष वहीत. शिक्षकांचं लक्ष त्यांच्या पुस्तकात. सगळी कशी मग्न असतील कवितेच्या अभ्यासात. मी आणि पूजा रमलो असू एकमेकांच्या डोळ्यातल्या प्रेमाच्या पुस्तकात. शिक्षकांनी दिलेल्या धड्या खालच्या स्वाध्यायची उत्तर लिहिण्यात सगळे किती कष्ट घेत आहेत. बघितला तर स्वाध्याय एका पानाचा. वेडे कुठले. मी आणि पूजा डोळ्यातल्या प्रेमाच्या पुस्तकाची कित्येक पान एका-एका सेकंदाला पलटत असू. असा सगळा विचार रोहित करत आहे. खर त्याच विचाराच विमान अस काही उडत होत, कि पावसाची हि तमा न करता ते उडत होत. उडता उडता ते विमान अचानक खाली कोसळलं. जेव्हा शिक्षकांनी रोहितला उठवून वर्गाबाहेर काढल.

वर्गाच्या बाहेर मान खाली घालून रोहित दाराच्या बाजूला भिंतीला टेकून उभा राहिला. आणि सहज म्हणून शेजारी बघितल तर पूजा. पूजाला शिक्षा का ? या विचारात त्याने तिच्याकडे बघितल आणि हसला. पूजा हि हसली. तास संपला. शिक्षकांनी जाताना दोघांना आत जायला लावल. तसा रोहित खुश झाला. तरी शिक्षक त्याला ओरडलेच, “लक्ष देत जा जरा नाहीतर उद्या घेणार नाही वर्गात.”

काय केल मी या विचारात रोहीत आत गेला. आत बेंचवर बसताना असिफ त्याला बोलला, “ कुठ बघत असतो रे तू ? यडा झालास का ?” त्यावर पुन्हा विचार करून रोहित म्हणाला “कुठ नाही. होत कि लक्ष, का बाहेर काढल मला काय माहित ? आणि पूजाला का बाहेर काढल ? काय माहित काय झालय सरांना.”
“तुझ्यामुळच काढल त्या पूजाला बाहेर. कशाला बघतो तिच्याकडे?” असिफ.
“मी कुठ बघितल. आणि मी बघितल तर काय झाल ? तिला कशाला बाहेर काढायचं ?” रोहित.
“अरे तू बघत होता ना तिच्याकडे म्हणून तिला बाहेर जायला लावल. तरी तू तिच्या शेजारी बसलेल्या त्या विभावरीकड बघत होता ना म्हणून मग तुला बाहेर पाठवल सरांनी.” असिफ.

दोघ गणिताची वही काढून बसले. आणि शिक्षक आले. गणिताचा तास सुरु झाला. आणि नेहमीसारखच आज हि झाल. सगळे तास अर्ध्या-अर्ध्या तासाचे असायचे पण ते कसे लवकर तरी संपायचे. पण गणितच असा होता विषय ज्याचा अर्धा तास पण दोन तासाचा वाटायचा. कसाबसा तास झाला. पाउस सुरूच होता. डबा खायची सुट्टी झाली. सगळे बाहेर पडले. रोहित आणि असिफ हि. कोण डबा हात न धुताच खाण्यात मग्न होते. कोण बाहेर जाऊन दुकानात काही बाही घेण्यात दंग होते. आणि काहींनी रांग लावलेली बाथरूमला जाण्यासाठी. रोहित आणि असिफ खास बाथरूम मधल्या आरशात बघून भांग पाडायला जात होते पण पाउस होता. आणि बाथरूम होत मैदानावर. जरास आडोशाला ते दोघ थांबले. डावीकडे असिफ थांबला. आणि उजवीकडे काही मुली.

 त्या पावसाला बघून त्याला आठवत होती फक्त पूजा आणि शेजारी बघितल त्याने आणि त्याला पूजा दिसली. झाल पुन्हा स्वप्न पडल त्याला. अस त्याला वाटल पण तस नव्हत ती खरीच होती त्याच्या शेजारी. आणि त्यालाच बघत होती. रोहित हसला. तीही हसली. “ ऐसे ना मुझे तुम देखो सिने से लागा लूँगा. तुमको में चुरा लूँगा तुमसे दिल में बसा लूँगा” हा हेच गाण लागलेलं सकाळी टीव्हीवर. त्याने येताना ऐकलेलं. आणि तेच गान त्याला तिच्याकडे बघताना आठवल. ती पुढे बघायला लागली. पाऊस कमी झाला ती आता जाणार इतक्यात तिने त्याच्याकडे एकदा बघितल आणि म्हणाली, “अस बघत जाऊ नको माझ्याकडे. मला नाही आवडत” आणि ती निघून गेली. आणि घाबरल्यासारख झालेलं जड हृदय घेऊन रोहित चालत गेला बाथरूम मध्ये. सोबत आधार द्यायला असिफ होताच. आत गेल्यावर असिफने खिशात ठेवलेला कंगवा काढला आणि भांग पडला. आणि रोहितला दिला. रोहितने कंगवा घेतला पण त्याची इच्छाच होईना. कशात काही नसताना त्याला प्रेम विरहाचा अनुभव आला. आणि तो तसाच असिफ सोबत वर्गात आला आणि डबा खायला लागला. पहिला घास तोंडात घातला तोच वर्गात विभावरी आणि पूजा आली. पुन्हा पूजा आणि रोहितची नजरा नजर झाली. आणि रोहीतनेच नजर खाली केली. आणि डबा खायला लागला. 


( image by google )
03


खंड पडलेला दोन दिवस. पुजला बघायचा. खरतर रहावत नव्हत रोहितला. म्हणजे एकाच वर्गात दोघ. इकड मुलांच्या रांगेत तो आणि तिकड ती मुलींच्या रांगेत बसलेली. काय करायचं होत नुस्त पलिकड तोंड फिरवल तरी ती दिसणार होती. पण नाही त्यान पूर्ण टाळलेल तिला बघायचं. शिक्षिका आल्या. विज्ञानचा तास होता. सलग दोन तास विज्ञानचेच होते. मग पहिला तास पुस्तकातला प्रयोग शिकवून दुसरऱ्या तासाला सगळ्या वर्गाला प्रयोग शाळेत नेण्यात आल. खाली सगळे फरशीवर बसले. शिक्षिकांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि मग दोन-दोन जोड्या बनवल्या आणि टेबलापाशी उभ राहायला सांगितल. प्रत्येकी दहा जोड्या मग त्याचं झाल्या कि पुढच्या दहा जोड्या. अशा पद्धतीने प्रयोग करून दाखवायचा होता. जोडी पण कशी तर एक मुलगा एक मुलगी. सगळ्यांना निट रांगेत बसायायला लावल. एक मुलगा एक मुलगी अस. आणि तसच उठून टेबलापाशी जायचं अस सत्र सूर झाल. पण रोहित सोबत ज्योती होती. आणि पूजा होती त्या विराज सोबत. रोहितला आवडल नव्हत ते. पण ठरवलेलंच त्याने कि, आता पूजाच्या नादाला लागायचं नाही. पूजा आणि विराज गेले त्यांनी प्रयोग करून दाखवला. आता नंबर आला रोहित आणि ज्योतीचा. सगळ तर ज्योतीच करत होती रोहित तिला फक्त हातात कधी चिमटा, कधी काचेची नळी, कोणत तरी द्रव्य देत होता. शिक्षका पण तिकड काहीतरी करत होत्या आणि रोहितच लक्ष पुजाकडे होत. आणि पूजा बोलत होती तिच्या माग बसलेल्या विभावरीशी बोलत. प्रयोग झाला. ज्योती आणि रोहित येऊन बसले जागेवर. तरी रोहितच लक्ष पूजाकडेच. सगळ्या वर्गाचे नाही झाले प्रयोग निम्म्यांचेच झाले. आणि तास संपला. सगळे वर्गात गेले. वर्गात जाताना एका ओळीत जायला सांगितल होत. पण मुल ऐकतात का कधी ? सगळे कसेपण गेले. आणि वर्गात जाऊन बसले.

शिक्षक अजून यायचे होते. त्यामुळे वर्गात गोंधळ सुरु होता. वर्गाचा मोनिटर उठून वर्ग शांत करण्याच्या प्रयत्नात होता, तोच कुटून तरी एका मुलाचा पेन हवेत उडाला. एका बेंच वरून दुसऱ्या बेंचवर अस करत सगळीकडे तो पेन फिरत होता. आणि त्या पेनाचा मालक पळत होता दे-दे करत. आणि पेन रोहितकडे आला आणि विराजने त्याला खुणावल दे टाकून पुढे आणि त्या घाईत पेन भिंतीला धडकून पूजाच्या पायाशी गेला. आता तो पेन तिथ जाऊन कोण आणणार या विचारत सगळे होते. ज्याचा पेन होता त्याने धमकावल रोहितला कि, पेन त्याने टाकला त्यानेच आणून द्यावा. रोहित उठला आणि पूजा जवळ गेला आणि खाली वाकला. पूजाने पाय बाजूला सरकवला. रोहितने पेन घेतला आणि तसाच माग टाकला. आणि उठताना तिच्या पायाला त्याचा हात लागला. पूजा रोहितकडेच बघत होती. शिक्षक आले. वर्ग पुन्हा शांत झाला. तीन तास झाल्यावर मग जेवणाची सुट्टी झाली. आणि सगळा वर्ग बाहेर गेला. मुली होत्या चार पाच वर्गात आणि मुलात फक्त असिफ आणि रोहित. तेवढ्यात वर्गात आवाज घुमला, पूजाने कोणत्या तरी मुलीला खोडरबर मागितलेला. त्या मुलीने दिला. पूजाने काहीतरी खोडल वहीतल. आणि त्या मुलीकडे फेकताना तो खोडरबर सरळ न जाता रोहितकडे गेला. ( कस काय अस ते तुम्हीच समजून जावा ). पूजा पटकन उठून डबा खात असलेल्या रोहितच्या बेंचपाशी गेली. आणि त्याच्या जवळ खाली पडलेला खोडरबर हाताने मुद्दाम त्याच्या पायाशी आत ढकलला. आणि त्याने पाय बाजूला केला आणि तिने खोडरबर उचलून त्याच्या पायाला स्पर्श केला. आणि हसली त्याच्याकडे बघून. बेंचवर जाऊन डबा खायला बाहेर काढला. विभावरी तिला घेऊन बाहेर काहीतरी खायला आणायाला घेऊन गेली. आणि जाताना दारात पूजाने रोहीतकडे बघितल. आणि रोहित तसाच जेवता जेवता हात खिशात घालून बाहेर गेला. आणि हात न धुता खिशातच पुसून टाकला हात. आणि तिच्या मागे गेला.  


( image by google )
 04

पूजा आणि विभावरीच्या मागे जाऊन रोहितने काय केल ? काहीच नाही. नुसता माग-माग गेला. दुकानातून दोन पुडे घेऊन त्या दोघी वर्गात आल्या आणि रोहित हि माग-माग आला वर्गात.  या वेळात पूजाने त्याच्याकडे एकदापण बघितल नाही. पण ठीक आहे. रोहितला काही वाटल नाही. खिशात घातलेला कोरडा हात बाहेर काढून त्याने दोन्ही तळहातांना चोळून जेवायला सुरुवात केली. डबा खाऊन झाला. थोड्यावेळाने सुट्टी संपली. घंटा वाजली. जे ते आपापल्या वर्गात जात होते. आत्तापर्यंत पूर्ण शाळेत दंगा माजलेला. आता हळू हळू कमी होत चाललेला. शिक्षक ही आपल्या-आपल्या वर्गात जाताना दिसत होते बाहेर. पण या वर्गात काही शिक्षक आलेच नाहीत पंधरा मिनिट झाले तरी. म्हणजे काय तर, तास होणार नव्हता आत्ताचा. वर्गाचा मोनिटर उठला आणि फळ्यांवर बोलणार्यांची नाव लिहित होता. दंगा वाढत चालेला. शेजारच्या वर्गातले शिक्षक एकदा ओरडून गेले. तात्पुरता वर्ग शांत झाला पण, पुन्हा जैसे थे.

शालाप्रमुख फेरी मारत असताना त्यांना या वर्गातून आवाज येत होता. त्यांनी वर्गात डोकावल कुणीच शिक्षक नव्हते. दरवाजाच्या जवळ असणाऱ्या बेंचवरच्या मुलीला विचारल, “तास कुणाचा आहे ?” तिने नाव सांगितल आणि त्यांनी सांगितल कि, “ ते सुट्टी वर आहेत.” त्यांनी वर्गात नजर टाकली आणि त्यांना रोहित असिफशी बोलताना दिसला. ते ओरडले जोरात तसा रोहित घाबरून उठला. असिफ हि उठला. शालाप्रमुखांनी पुढ उभा असलेल्या मोनिटरला जागेवर बसायला सांगितल आणि रोहितला लक्ष द्यायला लावल पुढ येऊन.  रोहित खुश झाला. पण आनंद मनात लपवून तो पुढ थांबला. “थोड्यावेळाने येणारे मी मला वर्ग शांत हवा” असा दम देऊन ते निघून गेले. वर्ग शांत झाला. आणि त्याने फळ्यावर कुणाकुणाची नाव लिहिलेली पुसली. आणि खडू घेऊन पहिलं नाव लिहील असिफ. असिफ ओरडला पण रोहितने दुर्लक्ष केल. आणि मुलींच्यात चुळबुळ सुरु झाली आणि काही विचार न करता रोहितने पूजाच नाव लिहील. तस पूजा त्याला ओरडली नाव पुसायला सांगितल पण त्याने पुसलं नाही. मग तीच उठली आणि तिने नाव पुसलं. आणि जागेवर जाऊन बसली. रोहितने पुन्हा नाव लिहील तीच. ती आली आणि तिने त्याच्या हातातला खडू घेतला आणि तिच्या शेजारी रोहितच पण नाव लिहील. आणि सांगितल, “ तुझ नाव पुसलं तर माझ पण पुसायचं”
ती जागेवर बसली. आणि रोहितने सगळ्यांची नाव पुसली आणि फक्त पूजा आणि रोहित हे नाव ठेवल. आणि तास संपला. घंटा वाजली. तो जागेवर येऊन बसला. पुढच्या तासाचे शिक्षक वर्गात आले. आणि त्यांनी विचारल कोणे रे हा रोहित पूजा लिहिणारा ? तेव्हा पोर काही ओरडली सर दंगा करत होते हे मगाशी. आणि शिक्षकांनी नाव पुसलं. आणि शिकवायला सुरुवात केली. पूजा रोहीतकडे बघून हसली. आणि रोहित हि.  


05
आज खास दिवस होता. नेहमीसारखी शाळा भरली. राष्ट्रगीत सुरु झाल. आणि रोहित आत गेटमधून येणार तोच शिक्षकांनी त्याच्याकडे बघितल रागाने. तसा तो जागेवरच सावधान झाला. राष्ट्रगीत, प्रार्थना झाली. सगळ्या उशिरा येणाऱ्या मुलांना छडी मारायचं सुरु होत. रोहितला दोन छड्या मारल्या. “शाळेचा ड्रेस कुठाय ?” अशा प्रश्नासोबत दोन छड्या अजून दिल्या. राष्ट्रगीत सुरु असताना पण चालत आत येऊन थांबला म्हणून अजून दोन छड्या. एकूण सहा छड्या खाऊन तो वर्गात निघून गेला. वर्गात येताना शिक्षकांना विचारल, “आत येऊ का ?”
आणि आतून शिक्षकाचा आवाज आला, “ नको बाहेरच थांब” नाईलाजाने रोहित बाहेर थांबला. पाच मिनिट झाले आणि असिफने शिक्षकांचं शिकवण सुरु असताना उठून सांगितल कि रोहितचा वाढदिवस आहे आज. शिक्षकांनी त्याला आत बोलावल. रोहित आत आला. त्याने शिक्षकांच्या पाया पडला. आणि जागेवर जाऊन बसला. एक नजर पूजाकडे टाकली. ती त्याला बघत होती. तास झाला. घंटा वाजली. तशी काही पोर त्याला येऊन शुभेच्छा देत होती. तो हि आनंदी होता. दुपारची सुट्टी झाली तशी दहा-पंधरा पोर त्याच्या मागे-मागे खाली गेली. आणि कुणी पेरू, कुणी बर्फाचा गोळा, कुणी तीन रुपयाचा गार वडापाव, अस काही काही खायला मागत होत. पार्टी म्हणून. रोहितने हि सगळ्यांना हव ते दिल. आणि स्वतः राजा सारखा बर्फाच्या गाड्यापाशी उभा राहिला.

स्वतःला गोळा बनवायला सांगितला तेवढ्यात त्याला पूजा आणि विभावरी दिसली त्या समोरच्या दुकानात. रोहितच हृदय धड-धड करत होत आणि पूजाने रोहितकडे बघितल. रोहितने आजूबाजूला बघितल खाणाऱ्यातल्या कुणाचच लक्ष रोहितकडे नव्हत. रोहितने तिला खुणावल, बर्फाचा गोळा खाण्यासाठी. तिने नकार खुणावलं. आणि निघून गेली. रोहितला कस तरी वाटल. त्याने गोळा खाल्ला. आणि मित्रांना सांगून तो वर्गाकडे निघाला. जाताना दुकानात गेला आणि मग वर्गात गेला. वर्गात कुणी नव्हत. फक्त मुली होत्या चार पाच. फिरती रांग असल्यामूळ आज पूजा पहिल्या बेंचवर होती दारापाशी. रोहित दारात उभा होता. त्याने बघितल निट कुणाच लक्ष आहे का माग मुलींचं. आणि तो पूजाच्या बेंच पाशी थांबून उगीचच कुणाची तरी वाट बघत असल्यासारखं बाहेर बघत होता. पूजा आणि विभावरी त्याला बघत होती. आणि रोहितने माग बघितल तर त्याला कसस झाल. पूजा त्यालाच बघत होती. त्याने खिशात हात घातला आणि बंद मुठ तशीच बेंचवर ठेवली आणि उघडली आणि बाहेर निघून गेला.
बेंचवर दोन कॅडबरी होत्या. विभावरी आणि पूजाने एक-एक उचलली आणि खाऊ लागल्या. थोड्यावेळाने असिफ आणि रोहित वर्गात आला. दारातून आत असिफ गेला. आणि रोहित जाणार तोच विभावरी त्याच्या पुढून दाराच्या बाजूला असलेल्या कचरापेटीत कॅडबरीचा कागद टाकायला गेली. आणि मग तिथून जागेवर गेली. मग रोहित जागेवर बसला. त्याच लक्ष पूजावर होत. तिने खाल्ली का नाही या विचारात तो होता. आणि एवढ्यात पूजाने कॅडबरीचा कागद हातात दिसेल असा धरला. आणि त्या कागदाची घडी घातली. आणि तो कागद ठेवला कंपासपेटीत. आणि रोहितकडे बघितल. रोहित गालात हसला. आणि पूजा हि. घंटा वाजली. सुट्टी संपली. तास सुरु होणार होता पण झाला नाही. कारण आज पण ते शिक्षक नव्हते. मग सगळ्यांच्या मतानुसार आज वाढदिवस असल्यामुळे आणि त्याने पार्टी दिलेल्या खुशीच्या बदल्यात सगळ्या मुलांनी रोहितला मोनिटर केल. तो उभा होता फळ्यापाशी.


मग पुढच्या तासाला शिक्षक आले. दिवस लवकर संपला. शाळा सुटली. सगळी घरी जायच्या घाईत होती. रोहित आणि असिफ रमत गमत चाललेली शाळेबाहेर. त्यांच्या शेजारून पूजा घाईत गेली. रोहितने दुर्लक्ष केल. असिफ त्याच्या रस्त्याने गेला. रोहित एकटा निघाला होता रमत-गमत आणि माघून त्याच्या खांद्यावर एक हात लागला. त्याला वाटल असिफ असेल म्हणून त्याने माग बघितल तर तो नव्हता. पूजा होती. रोहितला काही समजेना. त्याची हृदयाची धडधड वाढली. आणि काही बोलण्याआधी पूजाने त्याच्या पुढे पेनाचा बॉक्स पुढे धरला. ट्रायमक्सचा तो पेन होता. पाच रुपयाचा जेलचा पेन वापरणारा रोहित, आज त्याला पन्नास रुपयाचा पेन मिळाला तोही पूजाकडून. तो खुश झाला. ति काही बोलली नाही. जाताना फक्त बोलली, “आवडल का गिफ्ट ?” रोहितने होकारार्थी मान हलवली. ती निघून गेली. रोहित त्या पेनाच्या बॉक्सला बघत होता. आणि चालत होता. खूप खूप खुश होता तो. वाढदिवस होता म्हणून पण आणि त्याहून जास्त पूजाच्या गिफ्टमुळे. पण त्याला घरी अलायावर प्रश्न पडला कि तिने आपल्याला गिफ्ट का दिल ? याच उत्तर त्याला मिळाल नाही. आणि रोहितला गिफ्ट का दिल आपण इतक महागड याच उत्तर पूजाला हि मिळाल नाही. फक्त वेळ आली आणि देवाच्या मनात होत अस काहीस झाल. पण पूजाच्या या वागण्याला रोहित प्रेम समजून बसला. पूजाची भावना मला माहित नाही.   


( image by google )

06
शाळा सुरु होऊन महिना झालेला. रोज उठायचं शाळेत जायचं घरी यायचं कपडे बदलून काहीतरी खाऊन परत क्लासला जायचं. क्लास सुटायचा जेवायच्या वेळेला. मग तिथून आल कि जेवायच अभ्यास-उतारा करायचा आणि झोपायचं. ना टीव्ही बघयला वेळ ना काही कशाला, कुठ जायला वेळ. अस म्हणतात दहावी अवघड असते. त्याला बोर्ड असत. पण खरतर नववीच अवघड होती. अस रोहितला वाटत होत. किती काय काय होत. आठवी पर्यंत सगळी पुस्तकी छोटी-छोटी होती. भूगोलाच फक्त मोठ होत. आता तर गणित,विज्ञानाची पण पुस्तक मोठी झालेली. काही जमत नव्हत. काही येत नव्हत. शाळेत पाचवा धडा चालेला असताना क्लासला आठवा-नववा धडा सुरु. इकडच लक्षात ठेवायचं का तिकडच ? शाळेतली पद्धत क्लासच्या शिक्षकांना आवडत नाही. क्लासमधली पद्धत शाळेतल्या शिक्षकांना चालत नाही. करायचं काय मग. तरी यातुन कसाबसा उरला-सुरला वेळ पूजाच्या आठवणीत घालवायचा. असेच दिवस चाललेले रोहितचे.
पहिली चाचणी झाली तीस-तीस गुणांची. अभ्यास बदललेला, आणि विषय हि. अवघड जात होत मुलांना. त्यामुळे जास्त कुणाला जास्त असे गुण नव्हतेच. बरीच मुल नापास होती. दोन चार काही मुल हुशार होती. ती चांगले सत्तावीस-आठठावीस गुण मिळवून आनंदात बेंचवर बसलेले. ज्यांना कमी गुण मिळालेत त्यांना काही गणित शिक्षा म्हणून सोडवायला दिली होती. आता जो तो एकमेकांची वही घेऊन सोडवत बसलेला. रोहितला कुणी दिली नाही. तो बसलेला वहीत काहीतरी मागच्या पानावर चित्र काढत. पूजाने रवींद्रची वही घेतली मागून. त्याचा वर्गात दुसरा नंबर आलेला. तिने पटापटा गणिती उतरवून घेतली आणि त्याला वही दिली. आणि शिक्षकांनी बघितल बरीच मुल लिहून झाल्येल्या स्तिथीत बसलीयत. मग त्यांनी सांगितल, “आपल्या वह्या एकमेकांना द्या आणि तपासा. चुकेल तिथे गोल करा. बरोबर असेल तिथे बरोबर टिक करा. आणि जर कुणी खोट काहीही लिहील तर बघाच मी तपासणार आहे नंतर”.
शिक्षक तपासणार या भीतीने जो तो नीट तपासू लागला गणित. पुजाची वही विभावरीने घेतली आणि विभावरीची मेघनाने. असिफने शाबाजची घेतली. राहिला रोहित. पूजा इकडतिकड बघत असताना तिला रोहित तिच्याकडे बघत असताना दिसला. तिने त्याला वही मागितली. वहीत काहीच नव्हत. सगळ कोर. वही बंद करताना माग तिला काहीतरी लिहिलेलं दिसल. आणि तिने पटकन वहीच पान फाडून टाकल. आणि दप्तरात ठेवल. त्यात लिहिलेलं, “पूजा एल रोहित”.
पूजाने त्याला वही दिली. आणि त्याने ती वही उघडून बघितली. मगच्या पानावर लिहिलेलं, “असल काही लिहू नकोस परत. मला तू आवडत नाहीस, माझ तुझ्यावर प्रेम-बीम नाही. नाही ते लिहित जाऊ नको, नाहीतर मी माझ्या भावाला सांगेन.”
झाल आज दुसऱ्यांदा रोहित तिच्या बोलण्याने नाराज झाला आणि खूप जास्त घाबरला सुध्दा. त्याने सुद्धा पान फाडल आणि दप्तरात ठेवल आणि तिच्याकडे एकदा बघितल आणि हाताची घडी घालून बेंचवर डोक टेकवून डोळे मिटून झोपला. घंटा वाजली. तास संपला. शिक्षक निघून गेले. पूजा बाहेर गेली. रोहित ही असिफला काहीतरी सांगून गेला बाहेर. तिच्या मागेमागे. ती बाथरूम मध्ये गेली. तो बाहेर थांबला बाजूला. ती जाऊन आली आणि रोहितला बघून ती दचकली. मग जरा दुर्लक्ष करत ती निघाली. त्याने तिला हाक मारली. ती थांबली.
रोहित : मी नाही तुझ्या माग लागणार आता कधीच.
पूजा : होका ? मग हे सांगायला माग कशाला आलास ?
रोहित शांत झाला. उत्तर नव्हत त्याच्याकडे.
पूजा : तू अभ्यासात लक्ष दे. तुला गरज आहे. नापास झालायस तू भूमिती बीजगणितात. अजून कशात झालायस ?
रोहित : इतिहास आणि विज्ञान.
पूजा : मग हे असल का वागतोस ?
रोहित : मला तू आवडतीस.
पूजा : चल वर्गात.
रोहित : उत्तर देणा.
पूजा : कसल ?
रोहित : तू मला आवड्तीस.

पूजा : बर. चल. 


( image by google )
07
दोघ वर्गात आले. तास सुरु झाला होता. पहिल्यांदा पूजा वर्गात जायला निघाली शिक्षकांनी तिला बाहेरच थांबायला सांगितल. लागलीच रोहित हि आला तिथ त्याला हि बाहेर थांबवल. तास सुरूच होता. पूजा आणि रोहित दोघ लांब लांब उभे थांबलेले. खूप वेळ शांत बसून मग रोहित बोलू लागला,
रोहित : सांग ना मला.
पूजा : काय ?
रोहित : मगाशी बोललो त्याच उत्तर.
पूजा : सांगितलय मी तुला.
रोहित : काय ?
पूजा : हे बघ आत्ता अभ्यास महत्वाचा वाटतो मला.
रोहित : हो मला पण. मला बाबा खूप ओरडतात. पण मला जे वाटल ते मी बोललो.
पूजा : तू काहीही बोलशील.
रोहित : काहीही नाही. मनातल बोललोय.
पूजा : बर. मी जर का हो बोलले तर ?
रोहित : तर काय ?
पूजा : तर काय करणारेस ?
रोहित : माहित नाही.
पूजा : मग आधी माहित करून घे मग मला विचार. आमच्या घरात असल काही चालत नाही. आणि माझ स्वप्न आहे मी ज्याच्यावर प्रेम करेन त्याने फक्त माझ रहाव. माझ्यावर प्रेम कराव. आणि फक्त माझ्यासोबतच लग्न कराव. मला फसवा-फसवी आवडत नाही. आणि असही आईने सांगितलय असल प्रेम वैगरे काही करायचं नाही. पण तू तसा चांगला आहेस. मला त्रास दिला नाहीस. हा येतो मागमाग पण ठीके चालत तेवढ. वाढदिवसाला मला आणि विभाला कॅडबरी दिलीस. मला ते आवडल. तुझ्या मित्रांना तू पार्टी दिलीस त्यांनी मागितली म्हणून पण तू मला स्वतःहून कॅडबरी आणून दिलीस. मला तुझ ते वागण आवडल. तू दिसायला छान आहेस. बोलतोस छान. म्हणजे मला तुझा आवाज आवडतो नाजूक आहे. पण एक सांगू ?
रोहित : काय ?
पूजा : मी तुला हो बोलेन, पण तू चांगला अभ्यास कर. तू चांगले मार्क पडले तर मला तुझा विचार करायला काहीतरी कारण असेल.
रोहित : तू म्हणशील ते करीन. तू सांगशील तस वागीन मी.
पूजा : नक्की ?
रोहित : हो.
पूजा : बर हो.
रोहित : हो.
पूजा : काय हो ?
रोहित : तू हो बोलली म्हणून मी पण हो बोललो.
घंटा वाजली. तास संपला. शिक्षक फळा पुसत होते.
पूजा : मी ते वाल हो म्हणाली.
रोहित : ते वाल म्हणजे ?
पूजा : तू मला मगाशी बाथरूमपाशी येऊन काय बोललास ?
रोहित : मला तू आवडतीस.
शिक्षक बाहेर आले. तसा रोहित बिचकला. गप्प झाला. शिक्षकांनी दोघांना आत जायला लावल. दोघ आत गेले. शाळा सुटेपर्यंत रोहित आणि पूजाच एकमेकांकडे बघायचं सुरु होत. शाळा सुटली. आणि रोहित पटकन खाली गेला आणि पुजला विचारल,
रोहित : सांग ना.
पूजा : आता काय ?
रोहित : हो का बोललीस.
पूजा : तू जे मला सांगितल होतस त्यासाठी हो बोलले मी, समजल ?
रोहित हसला.
रोहित : हो.
आणि दोघ दोन्ही दिशेला गेले.
वेळ रात्रीची आकाराच्या दरम्यान, स्थळ- पांघरुणात.
त्याला कसस होत होत. आजकाल वाढलेल्या रस्त्याच्या खांबावरच्या लाईटीमूळ चांदण्या दिसत नाही.तारांगण दिसायला डोळ्याच्या पट्टीत अंधार हवा असतो. पण ते खांब चाळीस-चाळीस फुट उंच असतात. दिसला तर फक्त चंद्र दिसतो. पावसाळा सुरु आहे म्हणून पाउस हा पडणारच. पाउस कसा मध्यरात्री जास्त पडतो. गार वार सुटलेलं असत पण घरात थंडी वाजत नाही इतकी. सगळ्या निसर्गाची कृती नियमित आणि स्थिर अशी. पण रोहितसाठी निसर्गच काय त्याच मन सुद्धा अस्थिर झालेलं.
अस वाटत होत एक चंद्रच त्याला मिळालाय. कारण पूजा चंद्राहून सुंदर आहे अस त्याला तरी वाटत होत. चांदण्या काय चीज आहेत ? तिचे एक एक दात त्या चांदण्याहून लख्ख आहेत. पावसाच म्हणव तर तिच्या होकारानेच रोहितला इतक चिंब भिजल्यासारख वाटल होत. कि ते चिंब मन पांघरूणाच्या आत येणाऱ्या वाऱ्याला पण दाद लागू देत नव्हत. उजवीकडची कूस बदलून डावीकड केली. तरी झोप नाही पण पूजाचा विचार येत होता. मग जरास गरम व्हायला लागल. पाउस पडेलच आता इतक्यात. रोहितने डावा पाय पांघरूणाच्या बाहेर काढला थोडा आणि चेहरा पण बाहेर काढला आणि बाकीचा सगळा भाग पांघरुणात लपवून ठेवला. आणि निम्मी थंडी निम्मी गर्मी सोबत नुकताच बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज आणि पूजाचा विचार यात तो कधी झोपला त्याच त्याला कळाल नाही.
दुसऱ्या दिवशी.

शाळेत रोजच्यापेक्षा जास्त चांगल आवरून तो शाळेत गेला. वर्गात गेल्यावर पूजा त्याच्याकडे बघून हसत होती. याला हि चेव चढत होता. तोही गालात हस्त होता उगीचच. तास सुरु झाला. शिक्षक वर्गात आले. शिकवण सुरु होत आणि तेवढ्यात दारात एक जण उभ बघून शिक्षकांनी विचारल कोण पाहिजे. सगळा वर्ग त्यांच्याकडे बघत होता. आणि त्यांनी सांगितल पूजाचा मी भाऊ आहे. आणि पूजा घाबरली. तिने रोहितकडे बघितल. आणि वर्गाबाहेर गेली.


( image by google )
08
वर्गाच्या बाहेर जाऊन दारच्या शेजारी भिंतीपाशी थांबून,
पूजा : काय रे दादा ?
दादा : कोणे तो ?
पूजा : कोण तो ?
दादा : नाटक करू नकोस आता.
पूजा : मी नाटक नाही करत तू काय म्हणतोयस मला कळत नाहीये.
दादा : आता दिली ना एक कानाखाली कि कळेल सगळ. सांग पटकन. कोणे तो ? नाहीतर आत जाऊन कालवा करीन.
पूजा : रोहित.
दादा : आडनाव ?
पूजा : का ?
दादा : विचारल ते सांग फक्त.
पूजा : दादा मी काही नाही केल.
दादा : मी विचारल आहे का तुला काय ? आणि काय बोललोय का तुला ?
पूजा : नाही.
दादा : हा मग गप्प उभी राहा.
दादा दारात उभा राहून शिक्षकांना बोलतो,
दादा : सर, जरा बोलायचं होत.
शिक्षक : हा जरा दहा मिनिट थांबा. तास संपेलच आता. स्टाफरूम मध्ये जाऊन थांबा. कुणी विचारल तर देशमुख सरांनी थांबायला सांगितलय सांगा.
दादा : बर. पूजाला पण नेऊ का ?
शिक्षक : नाही नको. तिला बसू दे इथे. अभ्यास बुडेल.
दादा : बर.
 आणि पुन्हा बाजूला येत,
 दादा : जा तू वर्गात बस.मी बोलून घेतो सरांशी.

पूजा घाबरते. तिची घाबरलेली स्थिती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ती वर्गात येऊन बसली. विभावरी तिला विचारत होती काय झाल ? पण पुजाला काहीच सुचत नव्हत. आता काय होणार ? या विचारातच ती हरवून गेलेली. रोहितला पण थोडी थोडी भीती वाटत होती कि, दादाला जर कळाल पूजाच्या तर तो मारेल आपल्याला नाहीतर आई वडिलांना सांगेल. मला मारलं तर चालेल पण बाबांना कळाल तर माझ खर नाही.घरा बाहेरच काढतील मला. तो तर मनात देवाच नाव घेऊन नवस बोलू लागला, “देवा माझ आणि पूजाच दादाला कळू नको देऊ. मी तुझ्या मंदिरात येऊन तुला एक नारळ देईन.” आता एका नारळाने देव पावणार नव्हता कारण नवस करायला त्याने उशीर केला होता. घंटा वाजली. शिक्षक फळा न पुसता निघाले. जाताना रोहितला सांगितल, “फळा पूस आणि डस्टर स्टाफ रूममध्ये आणून दे”. शिक्षक निघून गेले.
रोहितने फळा पुसला. आणि स्टाफ रुममध्ये गेला. तिथ शिक्षक आणि पूजाचा दादा बसलेला. रोहितने डस्टर टेबलावर ठेवला आणि निघाला तोच शिक्षक म्हणले त्याला "थांब". तसा रोहित घाबरला. हाताची घडी करून मान खाली घालून थांबला.
दादा : पूजा तशी करते अभ्यास घरी. आणि घरच वातावरण हि आमच्या काही अस सैल नाही. बाबा आमचे कडक आहेत. आणि मला नाही वाटत ती अस काही वागेल.
शिक्षक : हा माझा हि विश्वास आहे तिच्यावर पण जिथ विश्वास असतो तिथच विश्वासघात असतो. आणि अस कुठून कानावर पडल असत तर मी सांगितलच नसत. ऐकून सोडून दिल असत. पण हे माझ्या देखत झालय.
दादा : कोणे तो ? अभ्यासात कसा आहे.
शिक्षक रोहितकडे बघतात आणि बोलतात ,
शिक्षक : सांग रे कसा आहे अभ्यासत ?
रोहित : कोण ?
शिक्षक : रोहित.
रोहित खूप घाबरतो पण जास्त काही न बोलता थोडच बोलतो. दादाकडे बघायची तर त्याची हिम्मत पण होत नाही. खाली मान घालूनच तो बोलू लागतो.
रोहित : आहे. चांगला.
शिक्षक : होका ? सांग बर बीजगणितात किती पडलेत तीस पैकी ?
रोहित  : तीन.
शिक्षक : भूमितीत ?
रोहीत : एक.
शिक्षक : आणि विज्ञान ?
रोहित : दहा.
दादा : असल्या बेकार मुलान विचारल का पूजाला ?
शिक्षक : असु दे मी आता स्वतः तिच्यावर लक्ष देतो. तुम्ही तिला काही बोलू नका. समज द्या एकदा आणि सांगू नका कि मी तिच्यावर लक्ष ठेवून आहे ते.
दादा : चालेल. लक्ष असुद्या.
शिक्षक : मी आहे आता तुम्ही निघू शकता. मला पुढचा तास आहे.
दादा उठून निघून जातो. शिक्षक उठतात आणि त्याचं नाव लिहिलेल्या कपाटाच्या कप्प्यातल एक पुस्तक काढून हातातल एक पुस्तक त्या कप्प्यात ठेवून रोहितला म्हणाले,
शिक्षक :  जा वर्गात. पुन्हा अस वागू नको. आत्ता वाचवल आहे मी. परत मीच मारीन तुला.

रोहित निघून जातो वर्गात. पूजा त्याला बघत होती. इतका उशीर का लागला त्याला तिला काहीच समजत नव्हत. तिने निट बघितल तो रडत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर काही खुणा नव्हत्या म्हणजे दादाने त्याला मारलं नाही. तिला बर वाटत होत. पण तीच घरी गेल्यावर काही खर नव्हत. आणि त्याच विचाराने तिच्या पोटात गोळा आलेला.  


( image by google )
09
आता बोलायचं कस रोहितशी पुजाला काही समजत नव्हत. तिला एक सुचल आणि तिने वहीच एक पान फाडून त्यावर लिहील, “ काय झाल ? दादा काय बोलला का तुला सांग. यावरच लिहून सांग”. आणि त्या कागदाचा तिने बोळा केला. तिने रोहितकडे बघितल त्याच लक्ष नव्हत पुजाकडे. अगदी जेवायच्या सुट्टीपर्यंत त्याने पुजाकडे बघितल नाही. आता मात्र पुजाची खात्री झाली कि, नक्कीच काहीतरी झालय रोहित सोबत स्टाफ रूममध्ये. पण काय ? हे मात्र कळायला काही मार्ग नव्हता. मुल डबा खात होती. मग एकेक पंधरा मिनिटांनी बाहेर जायला लागली. आणि मग रोहित पण उठला आणि बाहेर जायला निघाला तेवढ्यात पूजाने त्याला हाक मारली. रोहितने ऐकून न ऐकल्यासारख केल. आणि तो खाली मैदानाकडे निघाला. बाथरूममध्ये. पूजाने डबा खायचं सोडल आणि ती मैदानाकडे निघाली.
रोहित बाथरूममध्ये होता. भांग पाडत. असिफ सोबत नव्हता. रोहित बाहेर आला. बाहेर पूजा उभी होती. सगळी मुल तिच्याकडे बघत आत जात होती. पण तिला लाज वाटत नव्हती. कारण तीच रोहितकडे काम होत आणि ते पूर्ण करायचा पवित्रा तिने घेतलेला. रोहित दिसला तशी ती पायऱ्या चढणार तोच तो तिला “थांब” अस खुणवून तिच्या जवळ गेला.
रोहित : काय?
पूजा : काय झाल ?
रोहित : काही नाही.
पूजा : तिथ स्टाफ रूममध्ये काय झाल ?  
रोहित : काहीच नाही.
पूजा : नाही झालंय काहीतरी. तू सांगत नाहीयेस मला. दिसतय तुझ्या चेहऱ्यावर.
रोहित : खरच काही झाल नाहीये.
पूजा : तुला मारल का ?
रोहित : नाही तर.
रोहित : नक्की न ?
रोहित : होय. माझ्या घरी नाही ना जाणार तुझा दादा ?
पूजा : नाही मी करते काहीतरी. माफी मागेन. हवतर पाया पडेन पण नाही जाऊ देणार त्याला तुझ्या घरी. नको काळजी करू.
रोहित : मला भीती वाटतीय खूप.
पूजा : मी आहे ना. नको काळजी करू. सांग न मला काय झाल ?
रोहित : काही नाही तुझा दादा सांगत होता तू घरी अभ्यास करतेस खूप. तुमच्यात प्रेम वैगरे चालत नाही.
पूजा : हो.
रोहित : मग आपल लग्न कस होणार ? आणि लग्न होणार नसेल तर आपण प्रेम करून उपयोग काय ?
पूजा : मी येईन ना सोडून घर.
रोहित : ते फक्त पिच्चर मध्ये असत खर करताना काही जमत नाही.
पूजा : मी येईन खरच आणि मी तुला आणि आपल्या घराला सांभाळेन.
रोहित : अर्ची सारख का ? तू अर्ची मी परश्या. हम चालेल. तू तुझ्या दादा फक्त माझ्या घरी जाऊन देऊ नकोस.
पूजा : हा. मला पण खूप काळजी वाटतीय घरी गेल्यावर काय होणारे माझ मला नाही माहित.
रोहित : तुला तुझ्या घरचे मारतात का ?
पूजा : नाही. कधीच नाही. धाकटी आहे ना मी म्हणून लाडकी आहे. फक्त ओरडतात.
रोहित : खर का ? का माझ्यापुढ लायकी जाईल म्हणून म्हणतेस ?
पूजा : अरे खरच नाही मारत मला कोण. तुला मारतात का ?
रोहित : हो बाबा.
पूजा : का ?
रोहित : मार्क कमी पडले कि.
पूजा : मग करत जा ना रे तू अभ्यास. मी करेन तुला आता मदत. आता तू माझा झालायस. मी करेन जमेल तितकी मदत.
रोहित : चालेल. वर्गात जायचं का नाहीतर परत कोणतरी बघायचं आपल्याला आणि घोळ व्हायचा.
पूजा : तू जा. मी येते वर जाऊन बाथरूमला.
रोहित : डबा खाल्ला नाहीस ना पूर्ण ?
पूजा : भरल पोट तुझ्याशी बोलून. अस मला टाळू नको. मी किती वेळ तुला बघत होते. तू मात्र पुढ बघत होतास.
रोहित : हा बघेन आता.
पूजा : हो बघच आणि फक्त माझ्याकडच बघ. नाहीतर बघ.
रोहित : नाहीतर काय ?
पूजा : दादालाच पाठवेन घरी तुझ्या.
रोहित : ए गप ना का भीती घालतेस.
पूजा : मग बघणार का दुसऱ्या मुलींकड.
रोहित : नाही.
पूजा : आणि काय गरज नाही बाथरूममध्ये जाऊन भांग पडायची. आहे तसा राहा तसाच आवडतोस तू मला.
रोहित : बर.
आणि पूजा वर मुलींच्या बाथरूममध्ये निघून जाते. आणि रोहित वर्गात येऊन बसतो. थोड्यावेळाने तीही वर्गात येते. दोघ एकमेकांकडे बघून हसतात गालात. आणि याची हि काळजी घेतात कि त्यांना कोण बघत तर नाही ना. घंटा वाजते. सगळा रिकामा वर्ग पुन्हा भरतो. आणि तास सुरु होतो.
शाळा सुटल्यावर,

पूजा घरी जाते. दार वाजवते आणि दादा दार उघडतो. वडील आणि आई चिडलेल्या भावनेला चेहऱ्यावर ओढून बसलेले असतात सोफ्यावर. ती आत जाणार तोच तिला दादा हाक मारतो. आणि थांबायला सांगतो.


( image by google )
10
पूजा थांबते आणि वडिलांकडे बघते.
वडील : पूजा, कोण लागलंय माग तुझ्या ?
पूजा : कोण नाही.
वडील : मग दादा काय सांगतोय ? आणि मग कोण माग नाही लागल तर मग तो कशाला शाळेत आलेला तुझ्या आणि शिक्षक कशाला खोट बोलतील ?
पूजा : नाही.
वडील : खर सांग मला, मी रागावणार नाही. फक्त जे काय ते खर सांग. उद्या बाहेरून कळाल आम्हाला तर तुझ नाव खराब तर होईलच पण आमची पण जाईल. आणि असल करायला आपण शाळेत जात नाही होणा ? हे वय नाही तुझ. अजून शाळा झाल कि कॉलेज मग तुला सी.ए. करायचंय आणि मग ते झाल कि मग लग्न करायचं. यात प्रेम कुठ करायचं नाही. नाहीतर तुझा भविष्यकाळ सगळा अंधारमय होईल. आणि हे बघ एक सांगतो तुला, तू जरा का असल काही वेडवाकड पाउल उचलल ज्याने आमची मान खाली जाईल तर मी तुला माफ तर करणारच नाही पण या घराकडे पुन्हा बघायचं पण नाही तू आणि घराच्या आसपास पाचशे मीटर फिरायचं पण नाही. मी दादा पेक्षा तुझ्यावर प्रेम करतो मला तुझी काळजी आहे.
आई : हो. शेजारपाजारच्या बायका तोंडात शेण घालतील तू असल काय केल तर. आधीच त्यांची पोर अभ्यासात कमी आहेत म्हणून सारख तुला पाण्यात बघतात. या ना त्या कारणाने टोमणे मारत असतात मला. आणि अस तू वागलीस तर काय मग मी करायचं. माणसाच जग सगळ खर असाव पण आपलच नाण खोट निघाल तर ते आख्ख जग खोट ठरत. जरा विचार कर. परीक्षा झाली एक आता दुसरी येईल गणपतीत. अभ्यास कर. प्रेम बीम सगळ झूट आहे. आणि मी आधीच तुला सांगितल आहे, मुलांना त्या एका गोष्टीशी मतलब असतो. सगळ सोसायला, सहन करायला तर मुलीलाच लागत. मुलाचं काही जात नाही. जात आपल. इभ्रत, इज्जत, लाज. बघ आता काय करायचं ते. आम्ही सांगायचं काम करतोय.
वडील : हो आणि एवढ करून जर तुला ऐकायचं नसेल तर आत्ताच आमचा बोझ कमी कर आणि जा त्याच्याकडे रहायला.
पूजा : बाबा माझ्या माग कोण लागल नाही. मला कोण त्रास देत नाही.
दादा : मग शिक्षक बोलले ते काय खोट होत का ?
पूजा : काय ?
दादा : त्यांनी सांगितल मला, तो पोरगा तुला म्हणाला कि, मला तू आवडतीस.
पूजा : ते मला नाही. विभावरीसाठी होत.
आई : म्हणजे ?
पूजा : त्या रोहितला विभावरी आवडती. आणि ती माझी मैत्रीण आहे ना खास. माझ्यासोबत असते ती म्हणून तो मला म्हणाला कि तिला सांग, “मला तू खूप आवडतीस”
वडील : असली काम करायला जातीस का तू शाळेत ?
पूजा : नाही.
दादा : पुन्हा मला तक्रार नकोय. बाबा म्हणाले म्हणून शांततेत मिटवल. आणि तू म्हणतीयस तस असेल तर तुझी चूक नाही काही. पण शिक्षक तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत लक्षात असु देत.
पूजा : हो. मी चुकीच नाही काही वागणार बाबा.
वडील : हा जा आवर आणि खाऊन जा क्लासला.  
पूजा आत गेली. आवरून गेली क्लासला.
दुसऱ्या दिवशी,
सकाळी शाळा भरायच्या वेळेला पाउस पडतच होता. सगळीकड कीच-कीच झालेलं. कुणी रेनकोट, जर्किंग, छत्रीत चालत होत. मुलांच्या पायावर माग चिखलाचे शिंतोडे उडत होते. त्याची त्यांना तमा नव्हती. मुली आपल्या अबदार चालत होत्या. कस बस शाळेत पोचल्यावर अंग कसबस वळोस्तोवर दोन तास संपून गेले. मराठी आणि हिंदीचा तास. त्यात ही पूजा आणि रोहितच एकमेकांकडे बघायचं सुरु होत. पुजाला काल दिलेला समज बहुदा ती विसरली. म्हणून ती आज रोहितकडे बघत होती. दुपारच्या सुट्टीत डबा खाताना, तिला कळाल डब्यात तर आईने अळूची वडी दिलीय. तिने डब्याच्या झाकणात तीन वड्या काढल्या आणि रोहितच्या बेंचवर ते झाकण ठेवल. रोहितने पण त्या न लाजता वड्या पटकन खाल्ल्या. आणि तिच्याकडे बघून गालात हसला. आणि मग डबा खाऊन त्याने डबा दप्तरात ठेवला आणि तिच्या बेंचवर तीच झाकण ठेवल. आणि तो खाली गेला. तीही थोड्यावेळाने खाली मैदानावर गेली.
रोहित तिथ असाच फिरत बसलेला. तिथ फुटबॉल खेळायचं चाललेलं. ते बघत असताना पूजा त्याला हाक मारते. तो बघतो तिच्याकडे आणि तिच्या माग जातो. ती सायकलच्या पार्किंग शेड मध्ये जाते. आणि सायकलला हात लावत असते. जशी कि आपलीच ती सायकल आहे. रोहित हि एका सायकलवर बसतो.
पूजा : कशी होती वडी ?
रोहित : खूप मस्त.
पूजा : मला खूप आवडते.
रोहित : मलापण. पण मला जास्त मसालेभात आवडतो.
पूजा : खरच ? मला पण.
रोहित : मसालेभात, तूप, पापड, लोणच आणि भरलं वांग. बर मला सांग ना एक महत्वाच.
पूजा : काय ?
रोहित : काल तू बोलता-बोलता बोलून गेलीस कि, तू आता माझा आहेस. म्हणजे मला काही कळाल नाही.
पूजा : अरे म्हणजे तुला मी आवडते ना. मग मला पण तू आवडतो. म्हणून तस म्हणाले.
रोहित : म्हणजे तुझ पण माझ्यवर प्रेम आहे का ?
पूजा : नाही फक्त आवडतोस तू. प्रेम नाही.
रोहित : का ?
पूजा : मी बोलालीय तुला, आत्ता अभ्यास महत्वाचा आहे आपल्याला प्रेम नाही. आणि मला माहितीय प्रेम केल कि काय होत.
रोहित : काय होत ?
पूजा : तेच एकमेकांच्या जवळ यायचं. स्पर्श करायचा कुठ पण आणि मग त्याच-त्याच मुलीला हात लाऊन मुलांना कंटाळा येतो मग ते सोडून जातात आईने सांगितलय मला.
रोहित : मी तसला मुलगा नाही. मला तू खूप आवडतीस.
पूजा : मी ओळखते ना तुला. तू तसा नाहीस. खूप चांगला मुलगा आहेस. म्हणून तर मी तुझ्याशी बोलतेय.
रोहित : हा.
पूजा : पण नकोच ना प्रेम.
रोहित : एक सांगू ?
पूजा : काय ?
रोहित : सांगू म्हणजे एक हवय मला.
पूजा : तू माग ना हव ते देईन जर मला जमणार असेल तर.
रोहित : हो जमेल ना.
पूजा : मग सांग ना.
रोहित माग बघतो. आजूबाजूला कोण नसत. सगळी मुल लांब खेळत असतात. आणि पुन्हा पुढ बघतो.

पूजा : सांग. काय हवंय माझ्याकडून तुला ?


( image by google )
11
रोहित : मला तुला मिठी मारायचीय.
पूजा : काय ?
रोहित : हो. एकदाच.
पूजा : मला असल आवडत नाही.
रोहित : मला तरी कुठ आवडत. पण एकदाच ना.
पूजा : नको ना.
रोहित : अग एकदाच परत नाही मागणार.
पूजा : पण गरज आहे का ?
रोहित : हो त्याने आपल्यातल प्रेम वाढेल.
पूजा : हम.
रोहित : एकदाच ना परत नाही मागणार खरच.तुझी शप्पथ.
पूजा : बर.
रोहित : सांग ना.
पूजा : हो. पण एकदाच आणि फक्त मिठीच दुसर काही करणार नाही मी.
रोहित : हो फक्त मिठी.
पूजा : हा आणि जास्त काही मागायचं नाही.
रोहित : तू म्हणशील तर एका सेकंदाची पण चालेल, पण मिठी मारायचीय तुला.
पूजा : हो. पण एका सेकंदाची असते का कुठ मिठी ?
रोहित : म्हणायला एक सेकंद, मिठीत आल कि मिनिट होऊन जाईल.
पूजा : ईशश.. काहीही. बर बघू आपण तेव्हाच तेव्हा.
रोहित : हो बोलण्यापेक्षा करताना वेगळ असेल. पहिलाच अनुभव आहे माझा. माहिती नाही मला काही यातली.
पूजा : माझ पण तेच आहे. म्हणून भीती वाटतीय.
रोहित : तुझा आहे ना माझ्यावर विश्वास ?
पूजा : हो
रोहित : मग नको घाबरूस. मी आहे तुझ्यासोबत. मी नाही वाईट काही करणार फक्त मिठी मरेन.
पूजा : मी अस काही म्हणालेय का ?
रोहित : नाही.
पूजा : माझा विश्वास आहे तुझ्यावर तू मला कधी फसवणार नाही आणि कधीच माझ्याशी वाईट वागणार नाहीस होणा रोहित ?
रोहित : हो. कधीच नाही फसवणार तुला. माझ्या मनात हा विचार येणार पण नाही असला. आला तर फक्त तुझा विचार येईल तो पण चांगला वाला. आणि वाईट मला वागता येत नाही. आणि वागायला जरी लागल तरी मी तू सोडून सगळ्या जगाशी वाईट वागेन. तुला हसवायला मी कित्येक जणांना रडवेन पूजा. पण तुझ्या डोळ्यात पाणी आलेल मला कधी बघवणार नाही.
पूजा : खरच ?
रोहित : हो. तू फक्त एकच करायचं. हसायचं सतत. कायम. आणि नेहमी. बाकी मला काही नको.
पूजा : बरोबर.
रोहित : काय बरोबर ?
पूजा : मी केलेली निवड चुकीची नाही. खरच तू चांगला मुलगा आहेस. बाकीची मुल काय काय करतात मुलींना काहीपण सांगतात आणि खोट खोट भुलवून त्यांच्यासोबत काहीपण करतात तू तसा वागू नकोस. नाही न वागणार ?
रोहित : कधीच नाही. तू बोलशील तर तुझ्यासाठी जीव पण देईन मी.
पूजा : खर का ?
रोहित : हो.
पूजा : मग जीव नको मला तुझ खर प्रेम दे. जे फक्त माझ्यासाठी, माझ्यावर असेल. आणि माझ्यापुरतच. असेल आणि परीक्षेत चांगले मार्क.
रोहित : हो मी प्रयत्न करीन.
पूजा : अगदी चांगले मार्क नाही निदान पास तरी होशील सगळ्या विषयात इतके तरी.
रोहित : हा.... हे जमेल नक्कीच मला.
पूजा : हा मला माहितीय ना. तुझ्या मनातल.
रोहित : सगळ ?
पूजा : हो. सगळ.
रोहित : कस काय ?
पूजा : आता तू माझा झाला आहेस ना.
रोहित : हो. मी तुझाच आहे.
पूजा : पण तुला काहीच कळत नाही माझ्या मनातल.
रोहित : कोण म्हणाल अस तुला.
पूजा : मीच म्हणतीय.
रोहित : मला तुला मिठी मारायचीय. ती झाली कि कळेल मला.
पूजा : नक्की का ?
रोहित : हो.पण करायचं कधी ?
पूजा : काय ?
रोहित : मिठी कधी मारायची ? भेटायचं कधी.
पूजा : सांगते ना मी.
रोहित : कधी ?
पूजा : शाळा सुटली कि. चालेल ? चल घंटा वाजली. जाता वर्गात नाहीतर परत बाहेर थांबायला लागेल.
रोहित : हो.
पूजा : जा तू पुढ. मी येते मागून.
रोहित : का ?
पूजा : अरे कुणीतरी बघेल आणि शिक्षक आले तर ? नको तू जा आधी...... बर.
रोहित : नको तू जा आधी.
पूजा : का ?
रोहित : बाहेर काढल तर मला काढतील. तूला बाहेर उभ केलेलं मला नाही आवडणार.
पूजा : हो का ?
रोहित : हो. जा नको बोलत बसू. जा तू वर्गात मी येतो दोन मिनिटांनी मागून.
पूजा : जाऊ वाटत नाहीये मला तुला सोडून.
रोहित : पण जाव लागेल. जा उशीर होईल आणि परत बाहेर उभ राहून तुझे पाय दुखतील ना.
पूजा : बर जाते. तू लगेच ये पण.
पूजा गेली वर्गात आणि रोहित लगेच मागून गेला. पण तो वर्गापाशी पोचला आणि शिक्षक हि आले. आणि त्यांनी खुणावल जा आत बस. आणि तो खुश झाला आणि आत बसला. त्याला आनंद झालेला तेवढाच पुजाला पण झालेला. दोघांची नजरा नजर झाली. आणि पूजा गालात हसून पुढ बघू लागली. आणि रोहितने हि पुढ बघितल.( image by google )
12
शाळा सुटली. सगळ्या गर्दीतून चालताना पाठमोर असूनसुद्धा रोहितला पूजा मागून ओळखू आली. त्याने आपल्या चालण्याची गती वाढवली. आणि तिच्या शेजारून चालताना विचारलं,
रोहित : जायचं का ?
पूजा : कुठ ?
रोहित : आपल ते करायचं आहे ना ?
पूजा : आत्ता कुठ. ऐक ना.
रोहित : आता काय ? नकार देणारेस का ?
पूजा : नाही. आज करायचं नाहीये आपण.
रोहित : मग कधी ? तूच बोललीस ना.
पूजा : काय बोलले ?
रोहित : करू म्हणून.
पूजा : हो. पण कधी करायचं कुठ सांगितल ?
रोहित : हा. खरच कि.
पूजा : हा. आपण ना रविवारी करू.
रोहित : इतका वेळ ?
पूजा : हो. तेव्हा संध्याकाळी मला क्लास आहे.
रोहित : हा मग ?
पूजा : तेव्हा मला वेळ पण मिळेल आणि महत्वाच म्हणजे अंधार असेल ना आठ वाजता संध्याकाळी.
रोहित : चालेल.
पूजा निघून गेली. आणि रोहित पण.  मधल्या आठवड्याभरात काय एकमेकांकडे बघणं सुरु होत दोघांच. आणि गालात हासण. आणि ओढ लागून राहिलेली दोघांना त्या एका मिठीची. म्हणून मी पण मधल काही न लिहिता थेट पुढच्या आठवडयाच लिहितो.
संध्याकाळचे पावणे आठ वाजले होते. धडधड वाढत चालली होती पूजाच्या हृदयाची. आठला क्लास सुटणार होता. घरी जाईपर्यंत सव्वा आठ वाजणार. आता आज रोहितला भेटायचं म्हणजे वेळ लागेल. अगदी नाही म्हंटल तरी वाजतीलच साडे आठ. घरी उत्तर काय देऊ ? उशीर का झाला याच. तेवढ्यात शिक्षकांचा आवाज आला,
शिक्षक : आज दहावीचा ज्यादा तास आहे भूमितीचा, म्हणून आज लवकर जावा.
सगळी मुल दप्तर गोळा करून निघाली. पूजाला तर देवच पावला होता. कारण क्लास लवकर सुटला होता तोही पंधरा मिनिट आधी. आणि तिने ठरवलेलं कि दोन तीन मिनिट भेटून जायचं रोहितला पण नकळत का होईना तिला आता चांगले पंधरा मिनिट भेटणार होती भेटायला. काय-काय होऊ शकत त्यात ? म्हणटल तर मिनिटाची एक अशा पंधरा मिठ्या होतील. ती चालत होती. समोरून रोहित चालत येताना दिसला. पूजा हसली. तोही हसला.
पूजा : कधी आलास ?
रोहित : सव्वा सात.
पूजा : काय ?
रोहित : हो. चल ना तिकड त्या वडाच्या झाडापाशी.
पूजा : चल. पण तिथ कोण नसत ना ?
रोहित : नाही. तिथ मग मंदिर आहे माहितीया का तुला ?
पूजा : हो कसल तरी आहे मला माहिती नाही मी गेले नाही तिथ पण आहे छोटस. कशाच तरी मंदिर.
रोहित : महादेवाचं आहे. त्याच्या पुढ एक उंबराच झाड आहे. तिथ बसायला जागा पण आहे आणि पूर्ण अंधार आहे तिथ. कोण नाही येत तिथ. आणि त्या मंदिराला लाईट पण नाही. त्यामुळे सगळा अंधारा आहे.
पूजा : बर. तुझ्यावर विश्वास ठेवून येतीय. कोण आल आणि कुणी बघितल ना तर मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही.
रोहित : तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ?
पूजा : हो.
रोहित : ऐक माझ मग कोण नसत तिथ चल. फक्त माझ्या माग माग ये. एकदम नको जायला. कुणी बघितल तर शक येईल.
पूजा : नक्की तू पहिल्यांदा येतोयस ना इकड ?
रोहित : हो का ग ?
पूजा : अनुभवी असल्यासारखं काही काही बोलतोयस. त्यामुळे जरा मला वाटल तू आला आहेस कुणासोबत या आधी.
रोहित : नाही. महादेवाची शप्पथ. तूच पहिली आहेस. आणि बहुतेक शेवटची पण.
पूजा : हा.विश्वास तोडू नकोस कधी.
रोहित : बरोबर माझ्या पावलाकडे लक्ष दे आणि तशीच चाल.
पूजा : होय.


दोघ पोचली त्या उंबराच्या झाडापाशी. रोहितने तिचा हात धरला. दोघांना काही दिसत नव्हत ती दोघ पण एकमेकांना बघू शकत नव्हते. फक्त स्पर्शाने अनुभवू शकत होते. रोहित थंड झालेला पूर्ण आणि पूजा पूर्ण गरम. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला अंदाजाने आणि ते हात तसे घसरवत पाठीशी आणले पण दप्तर बोचत होत. ते समजल तस पूजाने ते दप्तर काढल मग खाली ठेवल आणि रोहितने तिला जवळ घेतल. मिठी सैल. हलकी. मोकळी वाटत होती. रोहितने जरास घट्ट धरल तस पुजाला काय झाल काय माहित तिने तर त्याला जवळ घट्ट ओढलं. तस रोहितने पण तिला जवळ ओढलं आणि त्याला काहीतरी होत होत. पण त्या भावनेला संभाळण त्याला अशक्य होत. पण आत्ता काय वागल चुकीच तर पहिली भेट आणि मिठी शेवटची होईल या भीतीने त्यान मनावर ताबा मिळवला. पण थोडाच वेळ. कारण पूजाने तिची ओढणी गळ्याला फास लागत होता म्हणून काढली. ते रोहितला जाणवल आणि त्याने तिच्या अंदाजानेच गालाला धरल उजव्या हाताने आणि त्याने तिच्या ओठांचा शोध घ्यायला सुरु केल. पण तिचे ओठ सापडत नव्हते. पहिलं नाक. मग गाल. आणि नंतर पापण्या अस करत असताना पुजला असह्य झाल आणि तिने त्याला मिठीत ओढलं. त्याने हि मिठी मारली पण त्याच लक्ष्य एकच होत. कि त्या काळ्यामिट्ट अंधारात पण तिचे ओठ शोधायचे आणि त्याने आपल्या ओठावरून जीभ फिरवून ओठांना ओल केल आणि त्याने चेहरा पुढ केला. आणि त्याच्या ओठांना तिचा वरचा ओठ जाणवला तितक्यात आवाज आला, “ कोणे रे तिकड ?” पूजा माग सरली. रोहित पण स्तब्ध झाला. रोहितने तिच्या हाताला धरल आणि जवळ घेतल तिला. माणसांचा बोलण्याचा आवाज येत होता.  


( image by google )

13
माणसांच्या बोलण्याचा आवाज लगेचच थांबला. तसा रोहित पूजाच्या हाताला अजून घट्ट पकडून बोलला,
रोहित : चल जाता.
पूजा : थांब आत्ताच आवाज थांबलाय. ती लोक तिथच असतील तर ?
रोहित : बर इथ थांब मी हळूच जाऊन बघून येतो.
पूजा : नाही. तू नाही जायचं.
रोहित : का ? बघून येतो न तुला परत घरी जायचं आहे. इथ अस किती वेळ थांबायचं. आणि ती लोक इथच थांबली तर नऊ-दहा पर्यंत तर काय करायचं आपण. मी सांगेन बाबांना काहीतरी कारण तुझ काय ?
पूजा : असल नको न बोलू.
रोहित : म्हणून तर म्हणतोय थांब इथ आलो मी बघून हळूच.
पूजा : मला भीती वाटतीय.
रोहित : मग चल तू पण सोबत.

दोघांच हे दबक्या आवाजात बोलन सुरु होत. पूजाने दप्तर घेतल पाठीवर. आणि ओढणी घेतली दोन्ही खांद्यावर.
रोहितने तिचा हात धरला आणि हळू हळू दबकत दोघ निघाली. देवळापाशी आले तर तिथ कोणी नव्हत. तिथुन वडाच्या झाडापाशी दोघ आली तरी तिथ कोणी नव्हत. मग पटकन पूजा बाहेर रस्त्यावर पडली. आणि मागून रोहित आला. आणि दोघांनी आपापला घरचा रस्ता धरला. घरी जाऊन पूजाने जेवण केल आणि अभ्यास करत करत रोहितचा विचार मनात आणला. म्हणजे तो आपोआप येत होता त्याचा विचार मनात. झालेलंच अस दोघांच्यात. मिठी, दोन शब्दांची रचना पण किती काय काय त्यात अनुभवल होत दोघांनी जे शब्दात सांगण्यासारखं नव्हत. इकड रोहित पण अभ्यास सोडून पूजाचा विचार करत होता. पण नंतर त्याला आठवल पुजाला आपल बनवायचं असेल तर अभ्यास करायला हवा. आणि त्याने उतारा करायला सुरुवात केली. अभ्यास झाला आणि तो झोपून गेला. खरतर प्रेमात असताना सर्वात जास्त प्रेम मुलगीच करते मुलापेक्षा. आणि त्याचप्रमाणे विचारातल प्रेम हि साहजिकच मुलीच जास्त असत. असच विचारात असताना पुजाला झोप लागली. आणि झोपेत कधी तीच पांघरून अंगावरून पायाशी गेल काय माहित. पंखा सुरु होता. थंडी वाजत होती. बाहेर पावसाची रिमझिम सुरु होती. आणि अचानक ऊब जाणवली. खरी खरी ? नाही स्वप्नात.
स्वप्न अस होत कि,

शांत भयाण रात्र आणि त्यात पडणारा जुलमी पाऊस. भयाण रात्र का तर ? तिला अंधाराची भीती वाटते. म्हणून ती रात्र भयाण वाटत होती तिला. आणि जुलमी पाउस का तर ? पावसामुळे अजूनच तिला भीत वाटत होती. ती अशी खिडकीला टेकून बाहेर बघत होती. सगळीकडे अंधार होता. काहीच दिसत नव्हत. माग आत घरात बघाव तर लाईट गेलेली आणि म्हणून घरात पण अंधार होता. त्या खोलीत जीव घुसमटत होता. म्हणून ती वार घ्यायला खिडकीशी उभी होती. पाउस अंगावर पडत होता. तो जाणवत होता तिला. थंडी वाढत होती. तोंडावर पाण्याची सर पडत होती. पण तिला का काय माहित बर वाटत होत. आणि अचानक मागून दोन हात आले. जे दिसत नव्हते पण जाणवत होते. ती घाबरली. ते हात पोटावरून छातीशी येऊन थांबले. तिची आत्तापर्यंतची थंडी क्षणात विजली. आणि ती आता भीतीने थरथर कापत होती. तिने हात बाजूला काढण्याचा प्रयत्न केला पण त्या हातात ताकद होती. तरी कस तरी तिने त्या हाताला जोरात चिमटा काढला आणि नखं घुसवली त्यात. आणि “ आई...ग” असा आवाज आला आणि तिने माग वळून बघितल. कुणीच नव्हत. होत तस पण अंधारामुळ दिसत नव्हत कोण आहे ते. तिने अंदाजाने माग उभ्या असलेल्या मानवी आकृतीला धक्का दिला आणि त्या मानवी आकृतीने तिला जवळ मिठीत ओढलं आणि विचारलं, “ मला नाही ओळ्खल ?” आणि हा  ओळखीचा आवाज ऐकून तिने त्याला मिठी मारली. आणि त्यान हि तिला मिठीत घेतल तो रोहित होता. खास इतक्या मधल्या घरांना सोडून रात्रीचा इतक्या पावसात भिजत तिला भेटायला आलेला ते ही तिच्या स्वप्नात. आणि तिने त्याला मिठी मारली तशी तिला ऊब लागली. रोहित तिला बेडवर झोपुवून तिच्या अंगावर पांघरून टाकतो आणि तिच्या पांघरुणात शिरून झोपतो तिच्या जवळ.  स्वप्न संपल.
सकाळी पूजा उठली. तिने बघितल पांघरुणात बाजूला. काही जाणवल नाही. अंधार होता पांघरुणात. तिने पांघरून काढल. पण रोहित कुठच नव्हता. मग पायाच पांघरून अंगावर आल कस या विचारात ती बेडवरच बसली.

थोड्यावेळाने आवरून शाळेत गेली.    


( image by google )
14
दिवस जात होते. रोहित पूजा यांच्यातल प्रेम वाढत चाललेलं. त्या मारलेल्या मिठीनंतर दोघांच्यात जवळ येण्याची वेळ पुन्हा आली नाही. दोघांच्या मनात ती उत्कट इच्छा होती. काही क्षण एकत्र राहण्याची. घट्ट एकमेकांना मिठीत घेण्याची. थोडक्यासाठी राहिलेल्या ओठांच्या स्पर्शाची हाव रोहितला झालेली. अशात पुजाला घराबाहेर पडण्याची संधीही मिळत नव्हती. क्लास घर, घर शाळा आणि पुन्हा घर अशा रोजी मध्ये दुसरी चाचणी परीक्षा झाली. आणि पूजाने सांगितल्या प्रमाणे रोहितने पास होऊन दाखवल सगळ्या विषयात अगदी भूमिती मध्ये सुद्धा.
आज शाळेत सकाळपासूनच गोंधळ सुरु होता. असिफ आणि रोहित तास होणार नाही म्हणून बाहेर फिरत होते. बाहेर गेटपाशी असलेल्या काळ्या फळ्यावर चित्रकलेचे शिक्षक माळी हे काहि तरी चित्र काढत होते. अशी मुल हातात हात घालून चालत आहेत. डोंगरावर झाडी आहेत. पक्षी आहेत. सूर्य आहे आणि मुख्य म्हणजे सूर्याला नाक, तोंड, डोळे पण आहेत. असिफ बघत बसलेला ते चित्र रोहितने त्याला ओढत दुसरीकडे नेल. दोघ बाथरूममध्ये जाऊन भांग पाडत बसले. असिफने खिशातून एका कागदाच्या पुडीतून पावडर आणलेली. ती दोघांनी थोडी थोडी रुमालाच्या चौकोनी घडीवर घेऊन रुमाल तोंडावरून फिरवला. आणि दोघ गोरी दिसयला लागली. मग घंटा वाजली. दोघ वर्गात गेली. वर्गात गेल्यावर थोड्यावेळाने विज्ञानाचे शिक्षक आले आणि सगळ्यांना घेऊन प्रयोगशाळेत गेले. तिथ आज नवीन प्रयोग शिकवला गेला. आणि नेहमीसारख दोन-दोन जोड्या बनवल्या होत्या. आणि मुल मुली जागा बदलून बसायला लागले. रोहित शेजारी पूजा नव्हती. ती दुसऱ्याच्याच शेजारी होती. तिने माग बघितल. आणि रोहित केविलवाणा नजरेने तिच्याकडे बघत होता. रोहितचा नंबर आला. नयना उठली. ती उठून वाट काढत होती मुलांच्या मधून पुढे जायला तोच पूजा उठली आणि पटकन रोहित शेजारी उभी राहिली. नयना खाली बसली चिडून. शिक्षकांनी त्यांना प्रयोग करून दाखवायला सांगितला. दोघांनी प्रयोग केला. असिफ तर दोघांना निट निरखून बघत होता. प्रयोग झाला दोघ जागेवर जाऊन बसली.

दुपारी जेवणाची सुट्टी झाली. डबे खाऊन सगळे मैदानावर गेले. वर्गात नयना, विभावरी आणि पूजा उरलेले. सगळ्या शाळेत दंगा सुरु होता. नुस्त शांत बसल तरी मन काय डोक पण शांत होणार नाही इतका गोंधळ सुरु होता आणि अशात रोहित खालून गरम-गरम शेंगदाणे खाऊन आला. तो आणि असिफ दोघ वर्गात आले. वर्गात पाउल टाकल आणि आत भांडण सुरु होत पूजा आणि नयनाच. कशावर चालल आहे दोघांना काहीच कळाल नाही. तरीहि दोघ बेंचवर बसले. आणि त्यांच्याकडे बघत बसले. पूजाने रोहितला हाक मारली. रोहित बिचकला तिच्याकडे गेला.
पूजा : तुला मी आवडते ना ?
रोहित : नाही.
पूजा : खर खर सांग.
रोहित : काय सांगू खर ?
पूजा : आपल प्रेम आहे न एकमेकांवर.
रोहित : आं. हां. ना,
पूजा : हा ना काय लावलय ? सांग तिला कस बोलती मला बघ ना.
रोहित : काय झाल ?
पूजा : तिला तू आवडतो म्हणते मला. तिला मी सांगितल मला तू आवडतोस. तर मला मारायची धमकी देते. सांग तिला.
रोहित : नयना नको न बोलू तिला.
नयना : ए बुळग्या तू नको मध्ये बोलू.
रोहित : नीट बोल तू.
नयना : जा नाही बोलणार मी नीट. काय करणारेस ?
रोहित : काही नाही.
नयना : हा मग जा तुझ्या जाग्यावर.
रोहित : हा हा तू नको सांगू मी काय करायचं ते.
पूजा : तू त्याला काही बोलायचं नाही.
नयना : का ?
पूजा : नाही बोलायचं.
नयना : हम. आला का पुळका. मी बघ तू अस वागलीस ना माझ्याशी. तुला आता बघते मी.
पूजा : काय केल मी ?
नयना : काय केलस मला विचारतेस का ? मैत्रीण म्हणतेस मला तुझी आणि माझ्यापासून लपवून ठेवलस. मला तो आवडलेला. आणि तू मधी आलीस. मी आता बघ नाव सांगणारे.
पूजा : कुणाला ?
नयना : मी का सांगू ? मी सांगते सांगयचं त्याला. तू नको काळजी करू.
रोहित : कुणाला सांगू नको.
नयना : तू तर गप्प बस रे. मी तर तुझ नाव तिच्या भावाला सांगणारे. माझ्या भावाचा मित्र आहे तो. बघ कि तुझी कशी वाट लावते.
पूजा : तुला काय हवय ?
नयना : आता काही नको.
रोहित : मी तुझ ऐकेन तू सांगशील ते. पण घरी नको सांगू तिच्या.
नयना : खर का ?
रोहित : हो
पूजा : नाही. काहीही नको तिला वचन देऊ.
रोहित : नाही. गप. मला भीती वाटते.
पूजा : मी आहे न सोबत तुझ्या ?
रोहित : हो पण घरातल्यांपुढे माझ काय तुझ पण काय चालणार नाही. आणि मी काय मुलगा आहे मला मारतील तुझ्या घरचे, माझ्या घरचे, शिक्षक. पण तू मुलगी आहेस माझ्यामुळे तुझ नाव खराब व्हायला नको.
पूजा : होऊ दे. तू देनारेस ना मला साथ ?
रोहित : हो.
पूजा : हा मग मला कुणाची भीती नाही.
नयना : द्या साथ द्या. प्रेम करा बघते  मी. मला नाही न मिळाल माझ प्रेम मी तुला पण नाही मिळू देणार. मी तुला त्रास देणारे ?
पूजा : मैत्रीण आहेस का कोण आहेस ?
नयना : तू नको सांगू मी कोणे ते. आणि मी तर आता तुझी कोण नाही आणि तू पण कोण नाही माझी.
पूजा : मी शेवटच सांगते कुणाला काही बोलू नकोस.
नयना : मी सांगणार. तुझ कोण ऐकतय ?


पूजा चिडली आणि आणि तिने नयनाच्या गालावर जोरात लगावली. इतकी जोरात कि तिच्या कानातून सनननन...! आवाज यायला लागला. 


slap kick father son
( image by google )
15
नयनाला काही सुचत नव्हत. तिने गालावर हात धरलेला होता. आणि तिने चिडून कंपास पेटीतल करकटक काढल आणि त्याची दोन्ही टोक फाकवून पूजाच्या दिशेने जोरात पुढ केली. रोहितने काही कळण्याआत ते करकटक हातात घट्ट पकडल. त्याच्या तळहाताला ते टोचल. त्याने, “आई...ग” असा आवाज केला. पुजाला रडायला यायला लागल. तिने रोहितकडे बघितल. रोहितला पण कस तरी वाटायला लागला. आणि तेवढ्यात एक जोरात तोंडावर थप्पड दिली नयनाने पूजाच्या. तसा पूजाचा तोल गेला आणि ती कलंडली. रोहित चिडला आणि त्याने नयनाला ढकलून दिल भिंतीवर. नयना परत चिडली आणि ति रोहित जवळ आली. रोहित मार खायला तयार होता. पण तिने फक्त त्याला ढकललं. आणि पुजाच्या अंगावरची ओढणी ओढली. आणि तिच्या छातीवर बुक्की मारली. पूजा कळवळत होती. आणि त्याच वेळेस नयनाने तीच दप्तर ओढून खाली सगळ त्यातल समान ओतल. आणि रोहितने नयनाचा हात ओढला आणि तिच्या कानाखाली दिली. विभावरी आणि असिफ बाहेर निघून गेले शिक्षकांना बोलावून घ्यायला. पूजा रडत होती. रोहित तीच दप्तर उचलून त्यात समान भरत होता. नयना दप्तर घेऊन निघून गेली घरी.

शिक्षक आले. त्यांनी दोघांना काय झाल विचारल. पण दोघांनी काही सांगितल नाही म्हणून दोघांना घरी पाठवल. आणि “उद्या येताना वडिलांना घेऊन या तरच वर्गात या” अस त्यांनी बजावलं त्यांना. दोघ घरी गेली. दोघांच्या मनात भीती होती. तरी पूजाने मनाची तयारी करून आईला सांगितल, कि नयनाची आणि तिची भांडण झाली आहेत जेवणावरून आणि त्यासाठी शिक्षकांनी बोलवल आहे बाबांना पण ते नाहीत अस सांग आणि तू ये. अस सांगून ती खोलीत गेली तिच्या. इकडे रोहितने वडिलांना सांगितल कि मुलींच्या भांडणात त्याच नाव घेतल नयना नावाच्या मुलीने म्हणून शिक्षकांनी तुम्हाला उद्या बोलवल आहे. आणि तो निघालाच होता आतल्या खोलीत तोच वडिलांनी त्याला जोरात कानाखाली वाजवली. तो आत गेला आणि घाबरून बसला.

दुसऱ्यादिवशी...
शाळेत पूजा, रोहित आलेले. पूजा सोबत तिचे वडील आलेले. रोहित सोबत त्याचे वडील. शिक्षकांनी त्यांना स्टाफरूममध्ये नेल. आणि सांगितल कि पूजा आणि रोहित याचं काहीतरी भांडण झाल. त्यात पूजाला नयनाने मारल आणि पूजाने पण तिला मारल आणि त्यांचे वाद सुरु असताना हा मध्ये गेला आणि नयना वर हात उचलला. झा......ल मुलीवर हात उगारला ऐकूनच बाबांनी रोहितवर हात उचलला. खूप मारल त्याला. शिक्षक आडवत होते त्यांना. पण ते ऐकत नव्हते. पूजाचे वडील मध्ये पडले. पण नाहीच. मग थोड्यावेळाने त्याला मारल्यावर रोहितच्या वडिलांनी पुजाला रोहितच्या कानाखाली मारायला सांगितल. पुजाला नको वाटत होत पण त्यांच्या भीतीने त्याला हळू मारल. पण रोहितचे वडील ओरडले तस तिने त्याला जोरात कानाखाली मारली. आणि अशा वीस थपडा मारायला लावल्या तिला. पूजा रडत मारत होती त्याला. आणि रोहित मान खाली घालून मार खात होता.
जिच्यामुळे हे सगळ झाल ती नयना मात्र आज शाळेत आली नव्हती. तिच्या वाट बघण्यात पहिला तास संपून गेला. तिच्या घरी कॉल लावला पण ती आजारी असल्याच कळाल. मग पूजाच्या वडिलांनी पूजाला धमकी देऊन ते निघून गेले. पूजा वर्गात गेली. रोहितला परत त्याच्या वडिलांनी मारलं. आणि अजून शिक्षा म्हणून त्याला आज शाळा सुटेपर्यंत बाहेरच उभा करा अस त्यांनी शिक्षकांना संगीतल. शिक्षकांनी त्याचं ऐकल.
रोहितचे वडील गेले. रोहितला वर्गाबाहेर उभा राहायला सांगितल शिक्षकांनी. रोहित डोळे पुसत होता. मधेच विस्कटलेले केस नीट करत होता. आणि त्याचा गालावर हात गेला तेव्हा त्याला काहितरी जाणवल. व्रण जाणवत होते त्याला. बहुतेक लाल झाले असणार आपले गाल अस तोच त्याचा विचार करत होता. आणि इतक्यात पूजा खिडकीपाशी आली तिने रोहितकडे बघितल. रोहित मान खाली घालून उभा होता. तिला रडायला यायला लागल. आपल्यामुळे त्याला सहन कराव लागल या विचाराने तिला खूप कस तरी वाटत होत. शिक्षक आले पुढच्या तासाचे आणि पूजा जागेवर जाऊन बसली. तास सुरु झाला. आणि इतक्यात शिपाई एक नोटीस घेऊन आला. त्यात अस लिहिलेलं कि, “परवा त्यांची म्हणजे संपूर्ण नववीची पावसाळी सहल जाणार आहे एका डोंगरावर. तिथे जाऊन मौज मजा करायची आहेच सोबत दुर्ग संवर्धन म्हणून किल्ल्याची सफाई करायची आहे आणि प्रत्येकाने यायचं आहे. बुडवणाऱ्याला शंभर रुपये दंड आहे. आणि दंड न भरणाऱ्याला पाचशे रुपये दंड होता. त्यामुळे प्रत्येकाने यायचं होत”.
सगळी मुल आनंदात होती. पण पुजाला माहित होत तिला वडील सोडणार नाहीत. पण आईशी बोलून काय होत का हे बघायला हव आणि आईशी काय बोलायचं या विचारात ती होती. रोहितच पण तेच कारण होत कि वडील दंड भरतील पण मला सोडणार नाही. आणि त्याने सहलीचा विचार सोडून दिला.
संध्याकाळी पाचला शाळा सुटली.  पूजा आईला संध्याकाळी सांगते कि आमची सहल जाणार आहे. आई नकार देत असताना पण ती काही काही सांगते आणि तिला परवानगी मिळते. पण रोहितला मिळत नाही. वडील त्याला शंभर रुपये देऊन ठेवतात दंड भरायला.

दुसऱ्यादिवशी.
आई आजारी असल्यामुळे आईने पूजाला घरीच थांबायला लावल. तिने शाळा बुडवली आणि घरातली सगळी काम केली. रोहितला पण करमत नव्हत म्हणून तो पहिल्या सुट्टीत पळून जाऊन जवळच्या राम मंदिरात जाऊन बसला. आणि दुपारी सगळ आवरून पूजा थकली आणि पांघरून घेऊन झोपली. आणि दार वाजलं. आईने दार उघडल आणि दारात नयना होती.


girl sexy girl sleep
( image by google )

१६
आई : कोण हवंय ?
नयना : अहो मी नयना ओळखल नाही का ?
आई : हा. तीच का तू जिच्यामुळ भांडण झाली शाळेत ?
नयना : माझ्यामुळे नाही रोहितमुळे.
आई : रोहित ? आता हा कोण ?
नयना : तुम्हाला नाही का माहित तो ?
आई : नाही ग. तिने काही सांगितल नाही मला. आणि त्याने काय केल तुला ? मारलं वाटत ना ?
नयना : हो.
आई : कशाला ऐकून घेतलस तू ? द्यायची ना वाजवून एक त्याला. अस दुसऱ्याच्या सोन्यासारख्या पोरीला मारत का कोण ? आणि असा कुणाचा पण मार खायला आम्ही पालक मुलींना शाळेत पाठवतो का ? तू ये आत बस.
नयना आत येऊन बसली.
आई : पाणी देऊ का ?
नयना : नाही नको. मी सांगायला आलेली फक्त. म्हणजे आईनी मला पाठवल. मला म्हणाली, कि पूजाच्या आईला सांगून ये खर काय झाल ते. तीच म्हणन असत कि आपल काही चुकल नसेल तर बोलायचं. बोलल्याशिवाय पुढच्याला त्याची चूक कळत नाही आणि आपण बरोबर आहे ते हि समजत नाही. पूजा माझी खूप चांगली मैत्रीण आहे म्हणून मी भांडले तिच्या बाजूने. पण तिने मला मारल.
आई : नक्की काय झाल ?
नयना : तुम्ही बसा ना. पूजा कुठ आहे ?
आई : आहे कि आत झोपलीय.
नयना : बर मग मी नंतर येते.
आई : का काय झाल ?
नयना : ती बाहेर येईल आणि परत उलट सुलट बोलेल आणि मला काय सांगायचं ते राहून जाईल आणि तुम्हाला पण वाटेल कि मीच चुकीची आहे. पुजाला मी बोलले, मारलं म्हणून.
आई : थांब हा, बघते काय करतीय ती.
आई आतल्या खोलीत जाऊन बघते. एव्हाना पुजाला झोप लागलेली असते. आई बाहेर येऊन मधल्या दाराला कडी लावते आणि नयना जवळ येऊन बसते.
नयना : काल आम्ही तिघी जेवत होतो. मी विभावरी आणि पूजा. जेवताना रोहित तिथ आला आणि.
आई : आणि काय बोलला का तुम्हाला ?
नयना : आम्हाला नाही पूजाला म्हणाला.
आई : काय ?
नयना : आय लव्ह यु.
आई : काय ?
नयना : हो. म्हणून मी त्याच्या अंगावर धावून गेली तर पुजा न मला आडवंल. तरी त्यातून मी तिची बाजू घेत त्याच्याशी भांडले त्याला ओरडले. त्याच्या कानाखाली वाजवली. तर त्याने मला मारलं. म्हणून मी पूजाला ओरडले कि मीच भांडतेय. ते पण तुझ्यासाठी आणि तू का बोलत नाहीस काहीच. तर मलाच ती ओरडली. आणि रोहितचा हात धरून तिने सांगितल कि मला तो आवडतो.
आई : काय ? पूजा अस कशी वागू शकते.
नयना : पुढच ऐका, अजून एक कळाल आहे मला कि त्या दोघांनी परवा किस पण केलाय. क्लासवरून घरी येताना.
आई : नाही ग.
नयना : परवा ती कितीला आली घरी ?
आई : नेहमीसारखी सव्वा आठला.
नयना : परवां क्लास पावणे आठला सुटला आहे.
आई : खर का ?
नयना : आणि अस परवा नाही सारखा आमचा क्लास लवकर सोडतात. कारण मुल जास्त आहेत दहावीची आणि म्हणून त्यांना आमच्या वर्गात बसवतात आणि आम्हाला लवकर सोडतात.
आई : म्हणजे मला कानावर घालायला हवच आता तिच्या वडिलांच्या. खूप फसवलय तिने आम्हाला. खरच नाही आता माफ करू शकत मी तिला. बर झाल बाळा तू आलीस आणि सांगितलस खर काय ते नाहीतर आम्ही तुलाच दोष देत बसलो असतो. आणि ते क्लासच पण बघते ना क्लासच बंद करते तिचा.
नयना : मी जाते. आज शाळेत गेली नाही मी. आजारी आहे दोन दिवस. पूजा अस माझ्याशी वागल्यापासून.
आई : मी पण तिला आज जाऊ दिल नाही मला पण बर वाटत नाहीये. ती असली कि सगळी काम करती. पण आता काम मरू दे. मनातून उतरलीय पूजा माझ्या.
नयना : मी जाते.
आई : हा आणि काय कळाल तर सांगत जा मला. मी नाही तुझ नाव पुढ घेणार.
नयना : हो चालेल. मला पण तिची काळजी वाटते.
आई : हा परत ये बर का नक्की.
नयना : हो येते.
आई दार लावून घेते, आणि रडत बसते. संध्याकाळी अंदाजे सात वाजले असतील. घरात गडप अंधार आहे. आत पूजा गाढ झोपून गेलीय. बाहेर आई रडून रडून गाढ झोपून गेलीय. दार वाजत. आईला जाग येते. आई दार उघडते.
वडील : काय बर नाही का ? अंधार केलाय घरात सगळा ? आणि पूजा कुठाय ? आज घरीच होती ना ती ?
आई : आहे कि आत झोपलीय.
वडील : झोपा काढायला बसवलय का घरी ?
आई : असुदे खूप काम केलय तिने.
वडील : बर मी जातोय लगेच बाहेर. मला चहा दे. मी हातपाय धुवून आलोच.
आई : बर.
आई चहा बनवून देते. वडील आतून येतात. चहा पितात आणि निघून जातात. आईला बोलायचं असत त्यांच्याशी पण जाताना कस अडवायचं म्हणून शांत राहते. दादाला सांगितल तर तो मारेल म्हणून त्या ठरवतात एकदा तिच्याशी आपणच बोलायचं. आणि त्या आत जातात तर ती झोपलेली असते. आणि तिला खूप ताप आलेला असतो. त्या तिला उठवतात आणि चहा देतात. दोघी थोड्यावेळाने दवाखान्यात जातात. आणि पूजा पुन्हा झोपून जाते. मग संध्याकाळी आई तिला वरण भात तूप आणि लिंबाच गोड लोणच देतात. तोंडाला चव यावी म्हणून. आणि ती ते जरास खाते बाकीच तसच राहून देते आणि झोपते. आणि सकाळी शाळेत जाते. आई नको म्हणत असताना पण ती जाते आणि तिला कळत आज शाळा नाही सहल आहे. आणि तसाच अंगावर ताप घेऊन ती सहलीला निघते.


( image by google )
१७
पावसाळी वातावरण झालेल आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी सगळे थांबलेले असतात. शिक्षक मुलांना माहिती देत असतात किल्ल्यांची. नववी तुकडी “अ” ते “ह” सगळ्या तुकड्यांची मुल-मुली आणि प्रत्येक वर्गासाठी दोन शिक्षक अशी सगळेजण तिथ असतात. आता किल्ला चढून वर जायचं होत. पायऱ्या घसरड्या झालेल्या. त्यामुळे सगळे कस पण वर न जाता दोघ दोघ जायचं ठरल. मग दोन मुल आणि दोन मुली अशा क्रमात एकामाग एक सगळी वर गेली.
वर किल्ल्याची माहिती असलेल्या एका माणसाला आधीच सांगून ठेवलेलं. त्याप्रमाणे तो आला वेळेत आणि सगळी मुल उभीच होती. पावसामुळ सगळ ओल झालेलं. खाली पायथ्याला पाऊस नव्हता. पण वर किल्ल्यावर पडून गेलेला. त्यामुळे सगळी उभीच होती. त्या माणसाने किल्ल्याची माहिती सांगितली. आणि आता सगळ्यांना किल्यावरचा कचरा गोळा करून तिथ ठेवलेल्या मोकळ्या पोत्यात भरायचा होता. सगळे कचरा उचलत होते. अगदी शिक्षक सुद्धा. आणि कचरा उचलत असताना पुजाला रोहित दिसतो. ती त्याच्या जवळ जाते. रोहित बाजूला निघून जातो. ती पुन्हा त्याच्या मागे जाते. आणि दोघ एका झुडुपाच्या बाजूला थांबतात. शिक्षकांना दिसणार नाहीत अस.
पूजा : काय झाल तुला ?
रोहित : काही नाही. भीती वाटतीय मला.  उगीच प्रेम केल अस वाटतय.
पूजा : अस का बोलतोयस ?
रोहित : काल नयना आलेली घरी.
पूजा : काय ?
रोहित : मी सांगितल कोण नाही घरी म्हणून परत गेली. पण तिने सांगितल ती तुझ्या घरी जाऊन आलीय.
पूजा : हो. तिने सांगितल सगळ.
रोहित : काय सगळ ?
पूजा : जे आपल्यात घडल नाहीये ते सगळ.
रोहित : मग तू आज सहलीला कशी काय आलीस ?
पूजा : आईला सांगितल फक्त तिने आणि मला ते ऐकून भीतीने ताप आलाय. मी आजारी आहे अजून.
रोहित तिच्या गळ्याला उलटा तळहात लाऊन बघतो. तिला ताप आलेला असतो.
पूजा : मला काय करू समजत नाहीये.
रोहित : ती यायची थांबणार नाही. आणि वडिलांना कळाल ना कि माझ काही खर नाही. एकतर मला कायमच घराबाहेर काढतील नाहीतर जीव घेतील.
पूजा : मला पण वडिलांची भीती वाटतेय. आई वाचवेल मला पण. दादा आणि बाबांपुढ माझ काय आईच पण काही चालत नाही.
रोहित : ऐक ना एक काम करता.
पूजा : काय ?
रोहित : सोप्प आहे आपण प्रेम संपवता.
पूजा : इतक सोप्प आहे का  ?
रोहित : नाही पण पर्याय नाही.
पूजा : मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय.
रोहित : हो पण आपण या प्रेमाच्या नादात मरू त्याच काय ?
पूजा : काय नाही होत. एक करू आपण. काहीदिवस बोलन बंद करू.
रोहित : बोलन बंद करून फायदा काहीच नाहीये. नयना माझ्या घरी यायची थांबणार नाही. आणि नयना आज सहलीला नाहीये इथ. लक्षात आलाय का तुझ्या ?
पूजा : हो रे मला पण दिसली नाही. आणि मला सर्दी आणि तापान इतक नको झालय काही सुचत नाहीये. आज वडील घरी येणारेत लवकर म्हणून मी जबरदस्ती आलीय. इथ.
रोहित : ( खिशातून शंभर रुपयाची नोट काढून ) हे बघ बाबांनी मला दंडाचे पैसे दिलेत. पण मी खोट सांगितल आईला कि जे सहलीला जाणार नाहीत त्यांना शाळा आहे. आणि इथ आलोय. मला परत घरी नाही जायचं. माझी वाट लागणारे. पूजा. मी काय करू ?
पूजा : मला पण नाही जायचं. काय करायचं ? एक तर प्रेम संपवावं लागेल आपल्याला.
रोहित : आणि दुसर ?
पूजा : नाही माहित.
रोहित : मला माहित आहे.
पूजा : काय ?
रोहित  : आपण प्रेम नको आपल्यालाच संपवता.
पूजा : काही काय बोलतोयस.
रोहित : का भीती वाटतीय का ?
पूजा : नाही तुझ्यासोबत मी कुठ पण येईन पण.
रोहित : पण काय ? तू आत्ताचा नको पुढच विचार कर. तुझ्या घरी कस वातावरण असेल. माझ्या घरी माझे हाल होतील. आणि तेव्हा आपण वेगळे झालो तर किती त्रास होईल. म्हणजे मार खायचा टोमणे ऐकायचे आणि एवढ करून घरात कुत्र्याएवढी पण किंमत राहणार नाही. आणि आपल प्रेम असच आहे का ? लगेच विसरण्यासारख.
पूजा : नाही. माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. माझ्या पेक्षा पण जास्त.
रोहित तिचा हात धरतो. आणि तिला घेऊन किल्ल्याच्या कठड्यापाशी जातो. आणि खाली वाकून बघतो. खाली खोल दरी असते. पूजा त्याच्या हाताला घट्ट धरून असते.
पूजा : वाकून नको न बघू.
रोहित : का ?
पूजा : भीती वाटतीय मला.
रोहित : आणि मी गेलो तर तू नाही का येणार सोबत.
पूजा : येईन पण ऐक ना आपण काही दिवस सहन करू त्रास आणि नंतर हव तर लग्न करू कुठ तरी जाऊन देवळात ?
रोहित : इतक सोप्प वाटतय का ? आणि तुला तुझ्या घरचे या शाळेत काय गावात तरी ठेवतील अस वाटतय का ?
पूजा : नाही.
रोहित : मग ? मी कुठ यायचं शोधत तुला.
पूजा : हो. पण नको चल तू वरच्या बाजूला मला भीती वाटतीय दरी बघून आपण जाता. तू ऐक माझ आपण ठरवता काहीतरी.
रोहत : दुसरा पर्याय नाहीये.
पूजा : माझ्यावर आहे न विश्वास ?
रोहित : हो.
पूजा : चल वर मी सांगते.
रोहित : तुला एक सांगायचं राहीलय.
पूजा : काय ?
रोहित : मला तू खूप आवडतीस. आणि जगात कुणी करत नाही इतक सार तुझ्यावर मी प्रेम करतो. खूप म्हणजे खूप.
पूजा : माझ पण प्रेम आहे तुझ्यावर म्हणून म्हणते चल वर.
रोहित : तू पुढ चाल.
पूजा माघारी फिरली आणि वर चालायला लागली.
पूजा : मी सांगते तस वाग मी नाही कुणाशी परत प्रेम करणार तुझ्यावरच करणार. चालेल न ?
रोहित : हम....
पूजा पुढ जराशी गेली आणि परत बोलली.
पूजा : चल लवकर. रोहित.
पूजा : रोहित ?..... रोहित ?
तिने माग बघितल रोहित का उत्तर देत नाहीतर रोहित नव्हता. तिने आजूबाजूला बघितल. ते मगाशी जिथ उभे होते तिथ रोहितची एक स्लीपर उलटी पडलेली होती. आणि रोहित ?समाप्त.

    


लेखक : अजिंक्य अरुण भोसले.


सावधान....! या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.                

1 टिप्पण्या