भविष्यातल प्रेम.


आजकाल सगळ जग इंटरनेटवरचच आहे. खर अस सगळ संपत चाललय आणि त्या संपत चाललेल्या गोष्टींना वाचवण्यासाठी प्रयत्न न करता त्यावर फक्त खोट दुःख व्यक्त केल जात, ते हि इंटरनेटवरच. असच हरवत चाललेलं प्रेम खऱ्याने कुणाला करायचं नाही. पण खर मिळाव म्हणून दुःख व्यक्त करत बसायला आवडत. प्रेमाची गाणी ऐकायला आवडतात. तसली गाणी ऐकून रडू हि येत पण तिच व्यक्ती फेसबुक, इंस्टाग्राम, टिंडरवरच्या वेगवेगळ्या प्रेमात हरवलेली असते. प्रेमाचे चित्रपट बघून तसाच प्रेम करणारा प्रेमी मिळावा म्हणून देवाकडे प्रार्थना करणारे खऱ्या आयुष्यात हे खर प्रेम समजू शकत नाहीत. कित्येक खऱ्या गोष्टी खोट्या बनवत माणूस आज खोट्यात अगदी सहज वावरून जातो. स्वस्तातले कपडे घालून इंस्टाग्रामवरच्या फिल्टरने त्याचा रंग उजळणारे लोक वाढलेत. ते लोक आणि त्यांचा दिखावा दोन्ही खोटच. मुलीच्या सौंदर्याची तारीफ आधी खरी केली जायची. कारण ती साधेपणात हि खूप सुंदर दिसायची. सुंदरपेक्षा काहीच सुंदर नसत. पण आजकाल सुंदरतेपेक्षा पण  सुंदर काय असत हे दाखवण्यासाठी मेकअपचे थर चढवून पुन्हा वर फोटो काढताना त्यावर फिल्टरचे प्रयोग करून मग फोटो शेअर केले जातात. इतका खोटेपणा तर या जग निर्मितीत पण नाही. मला कुणी स्त्रीच्या सौंदर्याची तारीफ करायला सांगितली तर मी तिला लाईक आणि कमेंट करणार नाही, भर उन्हात तिला उभ करून तिच्या चेहऱ्याला बघेन. जिचा जितका चेहरा पंधरा फटाक दिसेल तिच्या खोट्या सौंदर्याला नजरेपासून दुर करेन. जिच्या चेहऱ्याच्या त्वचेवर ऊन एकरूप होऊन जाईल ते सौंदर्य खर मानून तिला लाईक आणि कमेंट करेन. खूप खोट खोट आणि पटपट होत जाणाऱ्या बऱ्याच गोष्टीत प्रेम हे एक आहे. आधी प्रेम व्हायला विशिष्ट वय लागायचं. मग ते प्रेम एकतर्फी करण. मग व्यक्त करण, त्या नंतर बऱ्याच भेटी मग कधी होणारे हलके स्पर्श आणि मग त्यातून कधीतरी पहिला किस. आणि सेक्स तो तर जवळ जवळ लग्नाआधी नाहीच आणि झाला तर नशीब म्हणायचं. अस सगळ असताना आजकाल, प्रेम होत अनोळखी लोकांसोबत. कारण हे खोट प्रेम संपल कि कुणी कुणाला ओळखत नसत. त्यामुळे केलेलं प्रेम हे लगेच विसरून जातात म्हणून. काल परवापासून बोलत असताना आज अचानक प्रेम होत. मग व्हिडीओ कॉल होतो. मग त्यावर एकमेकांना बघताना डोळे सोडून बाकीचच बघण्यात कधी आपले हात आपल्या अवयवांवर फिरतात कुणाला समजत नाही. सेक्सची भावना आपापल्या जागीच बसून अनुभवत घेत खोटा आनंद मिळत जातो. मग सतत सतत केलेल्या व्हिडीओ कॉलचा हि नंतर कंटाळा येतो. आणि मग प्रेम संपत. मग पुन्हा नवीन चेहरा आणि पुन्हा त्याच गोष्टी. पण आपले अवयव ? तेच राहतात. ते खरे आहेत. आणि या जगात खर हे सगळ कायम टिकत. आणि खोट संपून जात. कुणाला कळेल हे ? शेवटी काय तर प्रेम म्हणजे सेक्स हि भावना आता रूढ झाली आहे. आणि खऱ्या प्रेमाला लोकांनी या खोट बनवून टाकलच आहे. आणि आता पुढे होणार काय ? प्रेम, सेक्स, कामेच्छा या सगळ्या गोष्टी नाती इंटरनेटवरच मिळवून माणूस त्यात खोटा खोटा खुश राहील आणि खऱ्या गोष्टी हरवून बसून त्याबद्दल फक्त खोटा हळहळत राहील. आणि प्रेम........ते तर दुर्मिळच होऊन जाईल.

copyrighted@2020


0 टिप्पण्या