ती आणि मी पुन्हा भेटणार नव्हतो. तरी काय झाल पुन्हा पुन्हा तिला माझी मला तिची आठवण येणार होती. भेटून सुरु झालेल्या प्रेमाला भेटूनच संपवायचं अस तीन ठरवल होत. ती म्हणेल तस वागायचं मी पहिल्या दिवसापासूनच स्वतःशी ठरवलेलं होत. तसच झाल. ती मला भेटायला येणार होती. आणि नंतर तीच अस ठरल कि मी तिला भेटायला जायचं. ठीक आहे. मी गेलो तिला भेटलो. दोघे हि शांत. माझ्या डोळ्यातल्या पाण्याने मला अस्पष्ट दिसत होत सगळ. पुढून निघालेल्या गाड्या डोळ्यातल्या पाण्यात तरंगताना दिसत होत्या मला. ऊन होत पण अंगावर काटा आलेला. तिच्याकडे मी वळून बघितल ती मोबाईलमध्ये बघत होती.
मी : गरजेच आहे का लांब होण ?
ती : हो. सतत सतत तू मला समजून घेतोस. मला तुला वेळ देता नाही आला तर समजून घेतोस पण तुला राग येतो. तू बोलून दाखवत नाही मला पण नकोच. मला नाही आवडत. मला वाटत तू माझ्यावर प्रेम करावस. माझा राग राग नाही.
मी : प्रेम आहे माझ म्हणूनच राग येतो. पण येतो तसा जातो. तू नुसता हाय, मेसेज केलास कि.
ती : राग येतो न. का येतो. नकोच नां. कशाला. तुला मिळेल माझ्यापेक्षा चांगली मुलगी जी तुला दिवसरात्र वेळ देईल. आणि जिचा तुला कधी राग येणार नाही.
मी : त्याचा काय उपयोग असणार आहे ?
ती : खूप असेल. पण आता मी नको. बस. आज हि शेवटची भेट. पुन्हा चुकूनहि कधी मला दिसू नकोस.
मी : माझी आठवण पण येणार नाही का तुला ?
ती : मी काढणारच नाही आठवण तुझी. जे आपल्यात झाल ते विसरून जा. अस जवळ येण साहजिक आहे पण बंधनकारक नाही. जे झाल ते तुला हव होत मला हव होत. आता मला नको आहे. आणि तुही तुझ्या मनाला समज घाल.
मी : एक शेवटची मिठी मारू ?
ती : तस बघायला गेल तर आत्ता इथ मी पुढचा एक सेकंद बसण पण चुकीच आहे. संपल आहे सगळ. सांगितल न मी तूला. मग संपल.
मी : इतक्या सहज संपत का नात ?
ती : हो. त्याला काय झाल ? मेसेजवरचा पहिला हाय, आय लव्ह यु इतक्या लवकर होऊ शकतो तर मग नात संपायला वेळ का लागेल.
मी : त्रास होतोय आणि पुढे होईल त्याच काय ?
ती : वेळ. सगळ्याच औषध आहे. मिळेल तुला दुसरी विसरशील मला. तिच्यासोबत हि तेच सगळ करशील. नैसर्गिक आहे हे सगळ. गरज भागली म्हणजे झाल. बाकी प्रेम वैगरे काहीच खर नसत. अनुभव आहेत बाबा मला.
मी : मी खर प्रेम करतो तुझ्यावर. इतरांसारखा मी नाही.
ती : पण मी आहे इतरांसारखी. कारण मला या जगात जगायचं आहे. तुझ्यासारखं रडत बसून मला माझ आयुष्य कमी करायचं नाहीये.
मी : .............
ती : आणि माझ लग्न होईल आता पुढच्या पाच महिन्यांनी. मी येते.
मी : बर. या नाही निदान पुढच्या जन्मी ये नशिबात माझ्या.
ती : बघू. आत्ता जाते.
मी : हम.
आणि ती निघून गेली.
0 टिप्पण्या