एक सांगायचं होत तुला.सांगण्यासारख बरच काही होत. तरी एक महत्वाच सांगायचं होत तुला. माझ तुझ्यावर खूप प्रेम होत. आणि अजून आहे. तू आपल्यातल सगळ झालेलं विसरून गेलीस. तो तुझा स्वभाव आहे. माझा तसा नाही. मी लक्षात ठेवून आहे सगळ. तू जरी म्हणत असलीस, दाखवत असलीस तरी विसरून जाण अशक्य आहे. आठवणी आहेत त्या. त्या फक्त साठवू शकतो आपण विसरू मात्र शकत नाही. तरी तुझ वागण सगळ काही विसरल्यासारख आहे. तुला तुझ्या आयुष्यात कुणी मिळाल असेल, नसेल माहित नाही मला. मला मात्र तुझ्या आठवणी मिळाल्या आहेत. आयुष्यभर पुरतील इतक्या. तुला कुणाची साथ मिळाली तरी ती किती असणार आहे ? आज असेल उद्या असेल जास्तित जास्त परवा पर्यंतच, त्या हि नंतर हि माझ्याकडे तुझ्या आठवणी असतील. आणि नुसती तुझी आठवण आहे म्हणून मी खुश नाही. त्या आठवणीत मी सुध्दा आहे. तुला माहित आहे मी तुझ्यावर प्रेम किती केल आहे. बहुतेक त्यामुळे तू लांब झालीस. कारण इतक प्रेम तुला झेपलच नाही. मी तुला माझी म्हणत मी माझ्यातून निघून गेलो. तुला माझा मानत गेलो. एक दिवस असा आला कि मला कळाल तू माझी राहिली नाहीस. आणि मी मला पुन्हा सापडलो नाही. मग तुझ्या आठवणीत जगत मी आजवर इतके दिवस जगत आहे. तू तुझ्या आयुष्यात खुश आहेस. माझ म्हणन त्यावर काहीच नाही. तुझ सुख यातच मला आनंद आहे. पण कधी तरी तू म्हणाली होतीस तुला कधी दुःखी मी बघू शकणार नाही. आज माझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळ आली आहेत. गालावर बिना-थंडीचे पांढरे रडून डाग पडले आहेत. काळ्या बुबुळाबाजूचा डोळा कायम लाल-पिवळसर असतो. अन्नाची चव कळत नाही. गोड पदार्थ कधी खाताना तिखट खाल्ल्यासारख डोळ्यातून पाणी यायला लागत. किती वाजले किती वेळ गेला आजची तारीख काय ? वार कोणता काहीच भान नसत मला. मी विचार का करतो कळत नाही मला. मी तुझा विचार करतो एवढच माहित असत मला. तरी तुला काही फरक पडत नाही. असो, एक सांगायचं होत तुला, कि मी खुश नाही. पण तुझ्या विचारात राहतो. पण तरी वाटत तू जवळ असाव. माझ्याशी कॉलवर सतत तू बोलाव. अचानक कधी एक मेसेज करून मला काय करतोयस अस विचाराव. धडधडणार ते हृद्याच स्टीकर पाठवून खाली आय लव्ह यु लिहून पाठवाव. पण नाही. अस काही होत नाही. होणार हि नाही. पण वाट बघायला काय हरकत आहे. पैसे थोडीच लागतात त्याला ? फक्त वेळ खर्ची घालावा लागतो त्याला बस. हे आख्ख आयुष्य तुझ्यासाठी वाया घालवण्याचा विचार आहे. तू तुझ्या आयुष्यात बरच काही करशील. पण खर प्रेम मिळवू शकणार नाहीस हा माझा तुला आशिर्वाद आहे. पण मी तुझ प्रेम आणि आठवणी मिळवू शकलो यातच मी खुश आहे. बाकी कधी लागली गरज माझी सांग मी आहेच मूर्ख तुझी गरज भागवायला. आणि एक सांगायचं होत तुला. खूप आठवण येते तुझी. रोज येते. सारखी येते. पण...


0 टिप्पण्या