कुणीतरी : ०२

०१
दोन वर्षापूर्वी......
खराडी, आय.टी पार्क.
संध्याकाळचे साडे सहा वाजलेले. अभिजित आणि त्याचा मित्र जॉबवरून सुटलेले. जाता जाता राज अभिजीतला थांबवतो.
राज : सिगरेट घेणार ?
अभिजित : घे.
राज चहाच्या गाड्यापाशी जाऊन, पाकिटातून शंभर रुपयाची नोट काढून.
राज : आण्णा, दोन कटिंग, आणि अभि.. कोणती घेणार ?
अभिजित : छोटी गोल्डफ्लेक. घे दोन.
राज : मी गरम घेतोय. घेतो का गरम ? म्हणजे दोघांची एकदम संपल.
अभिजित : नको, छोटी गोल्डफ्लेक मस्तय.. किक बसती त्यान. एक काम कर तू एक गरम घे मला दोन छोट्या गोल्डफ्लेक घे.
राज : आण्णा, दोन छोटी गोल्डफ्लेक, एक गरम आणि दोन कटिंग.
अभिजित : राज मला नको चहा.
राज : का ?
अभिजित : अरे छातीत जळजळतय.
राज : अरे, नुस्ती ओढणार का ?
अभिजित : छोट कोल्ड्रिंक आहे का विचार. ते घे.
राज : आण्णा, ती स्लाईस एक द्या. किती झाले सांगा.
आण्णा : पंचेचाळीस.
राज पैसे देतो. उरलेले घेतो. लागलीच अभिजित त्याच्या जवळ जाऊन कोल्ड्रिंक घेतो आणि दोन सिगरेट घेतो. माग एक तुटका कट्टा होता तिथ अभिजित जाऊन बसला. राज गाड्यापाशी जाऊन तिथ दोरीला अडकवून ठेवलेल्या लायटरने सिगारेट पेटवतो. अभिजितजवळ येऊन राज बसतो. अभिजित त्याची सिगरेट मागून घेतो आणि स्वतःची सिगरेट तोंडात ठेवून त्याच्या टोकाला राजची पेटलेली सिगारेट टेकवून आत श्वास घेतो. आणि अभिजितची सिगारेट पेटते. अभिजित त्याची त्याला सिगरेट देतो. दोघ झुरके घेत असतात.
तिथे भरपूर खाण्याचे गाडे होते. तिथ उत्ताप्याच्या गाड्याजवळ एक मुलगी आली. खूप दिसायला सुंदर. गोरीपान. मोकळी सोडलेली सिल्की केसं. ओठांना फिकट गुलाबी लावलेली लिपस्टिक. आणि असा लुक असताना देखील कपडे मात्र होते साधे. पंजाबी ड्रेस. मेकअप म्हणजे फक्त ती लावलेली फिकट लिपस्टिक बाकी अस काही दिसत नव्हत तिच्या चेहऱ्यावर. म्हणजे मुलींचा मेकअप अगदी स्पष्ट दिसतो. उजडात उभ्या राहिल्या तर आख्खा मेकअप चेहऱ्यावर चिटकवल्यासारख दिसतो. आत्ता, हि मुलगी उजेडातच होती. उत्ताप्याचा गाडा खाण्याने कमी लाईटीनेच भरलेला. पण तरीसुध्दा तिचा चेहरा सुंदर दिसत होता.
अभिजित तिच्याकडे बघत,
अभिजित : हि कोणे माहितीय का रे ?
राज : आपल्याच कंपनीत आहे.
अभिजित : मला दिसली नाही कधी.
राज : आपण डे-शिफ्टला असतो ती नाईटला असते.
अभिजित : नवीन आलीय का ?
राज : नाही आपल्या आधीपासून आहे. तीच काम बघितलय मी. एकदम कडक करती. असला भारी रोटो काढती ना भावा. नाद नाय.
अभिजित : कुणाच्या टीममध्ये आहे हि ?
राज : राकेशच्या टीममध्ये आहे.
अभिजित : मग काय लाईन मारत असणार तो हिच्यावर.
राज : ते काय त्याच ठरलेलं आहे. म्हणून तर सगळ्या पोरी टीम बदलतात. आता हि किती दिवस राहती काय माहित. आधी त्या सी.व्ही.सुंदर च्या टीममध्ये होती. ते गेले दुसऱ्या कंपनीत गोव्याला. मग हिने टीम चेंज केली आणि राकेशच्या टीममध्ये आली. दे विषय सोडून. चल झाल का तुझ ?
अभिजित : एक आहे कि अजून.
राज : शेअर कर मला.
अभिजित : घे पेटव तूच.
एका हातात उत्तापा असलेली डिश, एका हातात पर्स आणि मोबाईल घेऊन ती मुलगी बसायला जागा शोधते. अभिजित बाजूला बघतो एक स्टूल रिकामा असतो. हळूच पायाने स्वतःसमोर ओढतो. ती मुलगी त्याला बघते तोच अभिजित राजचा हात धरतो आणि उठतो. ती मुलगी लगेच चालत जाऊन अभिजितच्या जागेवर जाऊन बसते. आणि उत्ताप्याची दिश स्टुलावर ठेवते.
राज : बसलेलो ना चांगल आपण. नडल होत का काय.
अभिजित : असुदे रे. झालंय ना आपल. घरी जाऊन झोपायचंय. खूप कंटाळा आलाय राव.
राज : धर.. ( सिगरेट देत )
अभिजित : ओढ तू.. नको बस झाल मला.
राज : नव्हती ओढायची तर कशाला सांगायची पेटवायला. रूमवर पेटवली असती ना.
आणि दोघ बोलत बोलत रूमवर निघून गेले.   
इकडे ती मुलगी खाते आणि आत कंपनीत जाते.
अभिजित रूमवर येऊन झोपून जातो. ते डायरेक्ट काही न खाता पिता रात्री तीनला उठतो. अंघोळ करतो. राजला उठवतो. आणि तो हि आवरून मग दोघ जॉबवर जायला निघतात.


02
दोन दिवसांनी.
राज आणि अभिजित दोघ कॉम्प्युटरसमोर बसलेत. राजच्या उजव्या हाताला अभिजित बसला आहे. दोघांच अगदी शांततेत काम सुरु आहे. राज जराशी खुर्ची मागे घेऊन,
राज : अभि.. ऐक कि..
अभिजित : काय ? ( कॉम्प्युटरकडेच बघत )
राज : सिगरेट मारायला जायचं का ?
अभिजित : आत्ता नको. जरा उशिरान जाता.
राज : अरे आत्ता अडीच वाजलेत. अजून वेळ आहे सुटायला.
अभिजित : बर. थांब दहा मिनिट. लास्ट फ्रेम करतो कम्प्लीट आणि मग जाऊ.
राज : कर लवकर.
दहा मिनिटांनी....
दोघ कॉम्प्युटर स्लीप मोडला टाकून वरच्या मजल्यावर कॅफेटेरीया मध्ये आले.
दोघ मशीनचा चहा घेतात. आणि बाजूला स्मोकिंग झोनमध्ये सिगरेट ओढत बसतात.
राज : बोर झालय खूप.
अभिजित : का रे ?
राज : रोज जॉब.. दुसरा काय टाईमपास नाही. घरी जायला सुट्टीपण मिळत नाही. नुस्त कुतवून घेतीय कंपनी. त्यात गर्लफ्रेंड पण नाही.
अभिजित : हम. मग मला काय चार पाच आहेत का ? माझ पण तसच चालूय सगळ. “कुणीतरी” हव आता. अस जॉब वरून सुटल कि कॉलवर बोलायला. कधी काय झाल तर काळजी घ्यायला. पाहिजे यार “कुणीतरी”.
राज : ती प्रेरणा होती ना तुझ्या माग ?
अभिजित : नाय रे बाबा, कोण बोलल तुला ?
राज : कोण बोलल नाही. अंदाज रे. ती बघ कि कशी तुझ्याकडे बघते, तुला सारखा हात लावते.
अभिजित : मी लावत नाही का तुला हात. काय बोलतो तू ? मैत्रीत चालत कि तेवढ.
राज : मैत्रीत चालत असेल. पण तो टच तुला पण चालतो ना ?
अभिजित : गप जरा. टच म्हणजे प्रेम असत का ? आणि ते तसल प्रेम काय कामाच ? एकत्र येऊन नात बनवायचं. फिरयला जायचं. टच करायचा मग किस आणि डायरेक्ट सेक्स. आणि मग एकमेकांत आधीच मानसिक अडकलेलो असतो मग शरीरान अडकून राहायचं अर्थ आहे का काय त्याला ? प्रेम कस स्वतंत्र हव. आहे म्हणून कस तरी करायचं प्रेम मनाविरुद्ध कशाला तिला आणि मला त्रास. अस “कुणीतरी” हव जे आपल्यावर सेक्ससाठी नाही. मानसिक आधारासाठी प्रेम करेल. गाडीवर मग बसून फिरण्यासाठी नाही आयुष्य सोबत घालवण्यासाठी करेल. आणि जगात असे खूप कमी आहेत.
राज : तुला तर आई वडील नाही. मला ना बेकार वाटत कधी कधी.
अभिजित : ते तर आहेच. म्हणून तर वाटत त्यांच नाही निदान कुणाच तरी मला प्रेम भेटाव. या असल्या खोट्या-खोट्या प्रेमात मला नाही अडकून राहायचं. पण आधी “कुणीतरी” भेटायला हवी.
राज : भेटेल भावा. पण एक करायचं भावा तू..
अभिजित : काय ?
राज : पोरगी अशी बघ जिला अजून एक बहिण असेल. म्हणजे कस दोघांच जुळेल आपल.
अभिजित : बर..बर. चल जाता खूप राहिलंय माझ काम. तुझी झाली का फुटेज ?
राज : झाल कि.
अभिजित : माझ राहिलंय. मी पण उरकतो लवकर.
दोघ उठून निघतात. दोघ बोलत जात असताना कालचीच मुलगी मागून येते आणि अभिजित शेजारून निघून जाते. अभिजितच लक्ष जात. ती मुलगी पाठमोरी असते. पण तिचे ते मोकळे सोडलेले सिल्की केस. अभिजीतला समजल ती कालचीच मुलगी आहे.
अभिजित : राज अरे हि कालची आहे ना रे ? मी बसायला जागा दिली ती ?
राज : काय माहित. तोंड कुठ बघितलय मी.
अभिजित : अरे केस बघ कि.
राज : आता प्रत्येकाची केस काय वेगळी असतात का ? असली केस किती पोरींची आहेत. चल तू.
अभिजित : अरे पण तिची नाईट आहे ना ? मग हि दुपारच काय करती इथ ?
राज : चल तू. तुझी “कुणीतरी” नाही हि. राकेशची आहे. सोडून दे विचार.
दोघ निघून जातात आणि आपापली काम करू लागतात.
थोड्यावेळाने राकेश आणि ती मुलगी दोघ अभिजितच्या पलीकडच्या ओळीत बसलेल्या लोकांच्या एका मोकळ्या कॉम्प्युटर जवळ बसतात ती मुलगी खुर्चीवर बसते. राकेश उभाच असतो.
अभिजितचा टी.एल. राकेशशी बोलत असतो. आणि मग राकेश निघून जातो. मुलगी तिथच बसून काम करते. संध्याकाळी अभिजित जाताना त्यांचा टी.एल. येतो आणि अभिजितने केलेलं फुटेज चेक करतो.
टी.एल : अभिजित, आप कि कल से नाईटशिफ्ट है.
अभिजित : हा.
टी.एल : आज दो लोग हमारे टीम मै जॉईन हुये है. वो राईट को बैठा है वो भूपेश कुमार. और वो आगे देखो वो बैठी ही ना वो.
इतक्यात एक माणूस टी.एल.ला मिटिंगसाठी बोलवायला येतो. अभिजित त्या मुलीकडेच बघत असतो. इतक्यात ती मुलगी कॉम्प्युटर मध्ये बघत असताना सहज तिची नजर समोरच्या स्क्रीन वरून समोर उभ्या असलेल्या अभिजितवर जाते. दोघांची नजरानजर होते.
टी.एल : ठीके तो फिर मिलते है कल.

टी.एल. निघून गेला. अभिजित आणि राज हि खाली जायला म्हणजे घरी जायला निघाले. जाता जाता काचेच्या दारातून अभिजित हळूच तिला बघतो. ती मुलगी काम करत बसलेली असते. अभिजित राजच्या मागे लिफ्टमध्ये शिरतो.


 03     
आज सुट्टी होती. पण फक्त राजला. त्याने त्याच काम सगळ उरकलेल आणि अभिजितच थोड उरलेलं. त्यात त्याला या महिन्यात जरा जास्त पैसे लागणार होते मग म्हणून त्याने आज ज्यादा काम करून इंसेंटीव्ह घ्यायचं ठरवल. मग काय सकाळी उठला आणि आवरून निघाला. रोज त्याच्या रूमपासून त्याला शेअर रिक्षाने जाव लागत. मोजून तीन ते चार मिनिट लागत पण सकाळ-सकाळी चालत जायचं ते पण इतक्या थंडीच म्हणून तो आणि राज जायचे रिक्षानेच. आज तो नव्हता म्हणून अभिजीतला करमत नव्हत. पण ठीके. तो आला. रिक्षात एक जण बाई बसलेली. अजून तीन लोक भरायचे होते. अभिजित पण बसला. आता दोघ राहिलेले. मग एक मुलगा आला. जरासा साधा भादा होता. काहीतरी गुटखा का काहीतरी खात होता. उजव्या बाजूला तो मुलगा. त्याच्या बाजूला एक बाई त्या बाईच्या शेजारी अभिजित. आता अजून एक सीट राहिलेली भरायची. तस बघायला गेल तर रिक्षा भरली होती. पण...तेवढ्यात रिक्षाच्या मागून आवाज आला. “किती रुपये ?” आणि रिक्षावाल्याचा आवाज आला. “दहा. बसा कि.”
आणि तेवढ्यात रिक्षाच्या उजव्या बाजूने एक मुलगी आली. अभिजितच लक्ष नव्हत. ती बघते तर तो एक मुलगा गुटखा खात तिच्याकडे बघत असतो. ती मुलगी रिक्षावाल्याकडे बघते. रिक्षावाला त्या मुलाला बाजूला सारकायला लावतो. तो मुलगा लगेच सरतो. पण शेजारची बाई हलत नाही जागची. तेवढ्यात ती मुलगी निघते पुढे. रिक्षावाला तिला हाक मारून गोड बोलून परत आणतो. मग ती मुलगी रिक्षाच्या डाव्याबाजुने येते आणि अभिजित बाजूला सरतो. त्याच्या शेजारी ती मुलगी येऊन बसते. रिक्षा सुरु झाली. आणि निघाली.
क्षणात थंडी वाढली. रस्त्याची वर्दळ मिटली. लोक रस्त्यावरचे गायब झाले. रस्त्यावरचेच कशाला रिक्षातली ती दोघ आणि स्वतः रिक्षावाला पण गायब झाला. उरल कोण होत ? फक्त अभिजित आणि ती मुलगी. ती त्याला आणि तो तिला बघत होते. रिक्षा अपोआप चालत होती. समोर कंपनी दिसत होती. पण रिक्षा काय तिथपर्यंत पोचतच नव्हती. काय होत होत हे समजत काही नव्हत. पण काहीतरी होत होत. अभिजितच्या मनात.विचारात. जोरात एक पाठीला दणका बसला. रिक्षा खड्डयातून गेली. स्वप्नातला अभिजित सत्यात आला. पुन्हा वर्दळ, लोक, रिक्षातली ती दोघ आणि रिक्षावाला दिसायला लागले. आणि हळूच डोळे तिरके करून अभिजितने बघितल तर ती मुलगी बाहेर बघत होती. कंपनी आली. दोघ उतरले. ती बाई आणि मुलगा कोणत राज्य जिंकल्यासारख पटकन मोकळ्या सीटवर पसरले.
ती मुलगी कंपनीत जात असते. अभिजित ही तिच्यामागेच असतो. दोघ पोचतात एकाच ठिकाणी. अभिजितच्या शेजारी राजचा कॉम्प्युटर मोकळा असतो. अभिजित कामाला सुरुवात करतो. पाच मिनिट नाही झाले तोच ती मुलगी उठून पुन्हा बाहेर गेली. आणि अभिजितच्या टी.एल.सोबत आली. टी.एल.तिला काही गोष्टी सांगतो. अभिजित त्यांच्याकडेच बघत असतो. तेवढ्यात टी.एल. अभिजीतकडे बघून,
टी.एल. : अभिजित, कोई क्युरीज हो इसे तो बताना. और कुछ प्रॉब्लेम आये तो बुलालेना. ठीक है ?
अभिजित : हा ?
टी.एल. : तो हा, शिवानी, पांचसौ फ्रेम की फुटेज है करलो फिर.
शिवानी : हा. सर.
टी.एल. : चलो चलता हुं, अभिजित चलता हुं..
अभिजित : जी..गुड डे...
तो टी.एल. निघून गेला. शिवानी कशीबशी जरा स्वतःला सावरत, अंगाला चोरत अभिजित शेजारी बसली. काम सुरु केल. आणि पंधरा मिनिटांनी तिला एक काही जमत नव्हत. काय कराव आता ? टी.एल.ला बोलवावं कि या मुलाला विचारव तिला समजत नव्हत. शेवटी तिने मनाची तयारी करून नुस्त बाजूला बघितल. आणि अभिजितला ते जाणवत. तिच्याकडे बघत,
अभिजित : कुछ प्रॉब्लेम है ?
शिवानी : हा. यहाँ पर ट्रैकर नही लग रह... क्या करु ?
अभिजित तिच्याकडे खुर्ची सकट सरकतो. आणि बघतो. पण त्याला हि होत नसत.
अभिजित : (स्वतःशीच) आयला, आता काय करू .....
शिवानी : मराठी येते तुला ?
अभिजित : मराठीच आहे मी. तुला येते का ?
शिवानी : हो. म्हणजे इथ आहे ना दोन वर्ष झाल, मग येते. पण मी बंगाली आहे.
अभिजित : हा. मग तुला तर खूप जमत मग ? मला का विचारते ?
शिवानी : इथ कोण बसत ? त्याची फुटेज आहे ती मला पूर्ण करायची आहे. ती पाठवायची आहे आज. आणि त्याने काही तरी चुकवल आहे.
अभिजित : राज म्हणून आहे त्याची आहे.
शिवानी : ठीके मी बघते. तू कर तुझ...

 अभिजित बाजूला गेला. परत दोघ कामात व्यस्त. दुपारचे एक वाजले असतील. अभिजित उठला आणि चहा प्यायला कॅफेटेरीयात गेला. तिथ जाऊन मशीनमधला चहा घेतला आणि बसून प्यायला लागला. तेवढ्यात शिवानी पण तिथ आलेली बघून तीच लक्ष नाही तो पर्यंत अभिजितने एकच घोट पिलेला चहाचा, सगळा चहा फेकून दिला. आणि चहा प्यायला आलोय असा बहाणा करून मशीन जवळ गेला चहा घेतला. तोपर्यंत शिवानी बाजूला असलेल्या मोठ्या काचांतून खाली बघत बसलेली असते. आणि अभिजित तिच्या बाजूला जाऊन उभा राहतो खूप अंतरावर. त्या काचेतून खूप लांबपर्यंतच दिसत असत. दोघ बघत असतात. अभिजित बाजूला बघतो. शिवानी तिथे नसते. तो माग वळून बघतो तर ती दार उघडून जात असते. अभिजित हा पण उरलेला चहा टाकून निघून जातो. 


 04     
दोघे पुन्हा कामाला लागले. अधूनमधून अभिजित शिवानीला बघत होता. कुणालाच ते कळत नव्हत. अगदी तिला सुध्दा... अस अभिजितला वाटत होत पण तस नव्हत. शिवानीला समजत होत. पण ती दुर्लक्ष करत होती. संध्याकाळचे चार वाजले. अभिजित जागचा उठला. शिवानीशी बोलाव कि नाही या विचारात तो जरा शांतच उभा राहतो. मनाची तयारी झाली आणि तो बोलला.
अभिजित : झाल तुझ ?
शिवानी : हो.
अभिजित : येणारेस खाली. म्हणजे सोबत गेलो असतो.
शिवानी : नाही... जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. मी जरा चहा पिणार आहे. माझ डोक दुखतय. मला वेळ लागेल.
अभिजित : मला पण चहाच प्यायचा आहे. माझ पण डोक दुखतय. मग येतेस ?
शिवानी : हा, एक मिनिट.
ती तीच काम उरकून निघते. दोघ बाहेर येतात. लॉकर मधून आपापले मोबईल घेतात. आणि कॅफेटेरिया मध्ये जातात आणि दोघ चहा घेतात. दोघ चहा पिऊ लागतात. पण दोघांच्यात बोलण काही होईना.
शिवानी : तू कधीपासून करतो इथ जॉब ?
अभिजित : वर्ष झाल. म्हणजे होईल आता.
शिवानी : मग इथ कोण कोण असत तुझ ?
अभिजित : मी.
शिवानी : तू आणि ?
अभिजित : मी आणि मीच. म्हणजे मी एकटा आहे.
शिवानी : म्हणजे रूम घेऊन राहतोस का ? मग आई बाबा कुठे असतात ?
अभिजित : ते ना दोघ मनात राहतात माझ्या.
शिवानी : मनात ?
अभिजित : ते नाहीत जिवंत.
शिवानी : सॉर....सॉरी.. कधी गेले आई बाबा ?
अभिजित : झाले खूप वर्ष. असो. चहा आज जरा ठीक वाटत नाहीये.
शिवानी : हो ना.
अभिजित : राहू दे हा. आपण खाली जाऊन पिता बाहेर. चालेल ?
शिवानी : हो. पण मी देईन.
अभिजित : नको. नंतर कधी चालेल. आज आपली ओळख झाली ना मग मी देईन.
दोघे खाली गेले. कंपनी बाहेर आले. दोघे चहाच्या गाड्यापाशी गेले. अभिजितने दोन चहा घेतले.
अभिजित : काही खाणार का ?
शिवानी : क्रीमरोल घ्यायचा ?
अभिजित : हो. चालेल कि.
मग दोघ चहात क्रीमरोल बुडवून खात होते.
शिवानी : तुला आवडत नाही का आई बाबांचा विषय काढलेला.
अभिजित : जुन्या गोष्टींनी त्रास होतो ना ग.. म्हणून मला नाही आवडत. मला गरज होती आईची पण आई थांबली नाही सोबत. बाबांचं कधी प्रेम नीट मिळाल नाहीच. मग नंतर समज आल्यापासून मी प्रत्येक मित्रात प्रेम शोधायला लागलो. कोण मुलगी तर मिळाली नाहीच. मग माझ्याकडे एक मांजर होत. ते पण गाडीखाली सापडून मेल.  मग परत मांजर बिंजर संभाळलच नाही. नंतर शिकत-शिकत जॉबला लागलो. तिथली कंपनी सोडून इथ आलो. माझ-माझ आयुष्य चालल आहे.
शिवानी : म्हणून तू सुट्टीला पण येतोस का ऑफिसमध्ये ?
अभिजित : नाही. म्हणजे मला जरा सध्या पैसे लागणार आहेत जरा जास्त. म्हणून जरा जुळवा-जुळव करतोय.
शिवानी : का रे ?
अभिजित : मी आत्ता राज सोबत राहतो पण तो कंपनी बदलणार आहे दोन महिन्यात. तो जाणारे गोव्याच्या कंपनीत. मी परत एकटा पडेन. मग मला आत्ता एक टू-बी.एच.के. मिळतोय. स्वस्तात भाड्याने. परत दोन महिन्याने मिळेलच अस नाही. म्हणून आत्ताच घेऊन ठेवतो. माझ सामान पण खूप आहे. घर अस नाही माझ. मग जे काय ते सामान मला रूम बदलेल तस घेऊन फिराव लागत.
शिवानी : मी करू काही मदत ?
अभिजित : नाही. बोललीस तेच खूप आहे. आजच आपली ओळख झालीय. पण तरी तू बोलून दाखवलस बर वाटल. बर अजून काय हव तुला ?
शिवानी : नाही बस.
दोघ तिथून निघून गेले. जाताना दोघांना एकच रिक्षा हवी होती. एक रिक्षा आली दोघांसमोर ती थांबली. पण त्यात तीन लोक बसलेले. त्यामुळे एकच हव होत ‘कुणीतरी’. ती रिक्षा जाऊन दिली त्यांनी. पुढे दोन रिक्षा आल्या पण त्यात हि एकच जण हव होत. शेवटी अभिजित तिला जायला लावतो पुढे. शिवानी निघून जाते. जाताना आठवणीने “बाय” म्हणते. अभिजित नंतर थोड्यावेळाने रिक्षाने निघून जातो रूमवर.
 05  
अभिजित रूमवर आला. दार वाजवतोय-वाजवतोय पण राज काय दार उघडायला तयार नाही. इतका तो गाढ झोपलेला. अभिजित त्याला कॉल लावतोय तरी त्याला काही जाग येईना. मग अभिजित अपार्टमेंटमधून बाहेर येतो आणि तिथे खाली येऊन वीस रुपयाची एक प्लेट इडली सांबर खातो. तेव्हा त्याला सहज शिवानीची आठवण येते. सवय म्हणावी तशी लागली नव्हतीच तिची. म्हणजे सवय काय एका दिवसात थोडीच लागते ? पण ति जाताना बाय म्हणाली त्या बायला अभिजित बाय सुध्दा म्हणाला नव्हता. त्याला नको वाटत होत ते बाय म्हणायला. पुन्हा तो वर आला. दार वाजवल पुन्हा. राज तोंडात ब्रश ठेवून बारीक डोळे करून दार उघडतो.
अभिजित : ( आत जात ) अजून झोपलायस वे. आता थोड्यावेळाने रात्र होईल कि.
राज : अरे खूप झोप आलेली.
अभिजित : किती दार वाजवायच ?
राज : अरे..... अभि... हे काय झाल ?
अभिजित : काय झाल ?
राज : एक्स्ट्रा वर्क करून आला कि तू असा अंगातून जीव गेल्यासारखा असतो. विकनेस आलेला असतो तुला. डोळे दारू पिलेल्या माणसासारखे झालेले असतात. बोलायला ताकद नसते तूला आणि आज चक्क तू फ्रेश आहेस ? कस काय ?
अभिजित : असच..
राज : असच नाही... हसतोय आणि गालात सारखा... “कुणीतरी” भेटलेल दिसतय.
अभिजित : कशाला कोण भेटेल.
राज : मग तू गालातल्या गालात का हसतोय. का मला अस चड्डीवर बघून हसू येतंय...तुला ?
अभिजित : येडायस का तू ? रोज बघतो कि तुला.
राज : मग हसतो का सांग मला लवकर..
अभिजित : अरे... ती भेटली मला आज.
राज : कोण ? प्रेरणा ?
अभिजित : नाही रे.....
राज : मग कोण आता ?
अभिजित : शिवानी...
राज : कोण शिवानी ?
अभिजित : आपल्या टीममध्ये आलेलेली नवीन मुलगी.
राज : काय सांगतो ?
अभिजित : नुसती भेटली नाही. दिवसभर बोलत होती माझ्याशी. सुटलो तेव्हा माझ्यासोबत चहा क्रीमरोल खाल्ला. आणि बोलली पण.
राज : मग आता पुढे ?
अभिजित : काय ? बोलणार आता रोज. बर झाल पण तू आज आला नाहीस. तुझ्याच कॉम्प्युटरवर बसलेली. तू असता तर ती दुसरीकडे बसली असती आणि आमच बोलन झाल नसत. या सगळ्यात तुझ जास्त श्रेय आहे.
राज : बस का भावा. मला तुझी काळजी वाटली म्हणून मी आलो नाही आज. म्हंटल आपल्या भावाला करू दे एकट्याला काम.
अभिजित : ओ.. काहीही. झोपायचं होत सांग कि.. हरभराच्या झाडावर चढवल कि लगेच टॉपला नाही जायचं. खालीच रहायचं.
राज : असुदे.. काही का असेना..पण मी नव्हतो म्हणून जुळल तुझ. लक्षात असुदे.
अभिजित : चल मी झोपतो.
राज : हो. मीपण आवरतो. पण अभि... “कुणीतरी” भेटल तुझ तुला आज.
अभिजित : माहीत नाही रे. तिला बॉयफ्रेंड असेल अस वाटतय रे. आणि हि नसली तरी दुसरी “कुणीतरी” असेलच माझ्या आयुष्यात नक्की... माहित आहे मला.
राज : दुसरी नाही. हीच असणार. मला तर वाटतय आतून. आणि नसली तरी तू हिलाच पटव.
अभिजित : कुणावर आपली जबरदस्ती नाही. पण बघू उद्यापासून कस काय बोलन होत आमच्यात मग सांगेन.
राज : पॉझीटीव्ह रहायचं कायम. नशिबात नसलेलं पण मिळत आपल्याला. निगेटीव्ह राहून असलेल पण हातच जात.
अभिजित : ते हि आहेच. बघू. झोपतो मी.
अभिजित जाऊन गादिवर झोपला. राज आत अंघोळ करायला गेला.
अभिजित पालथा झोपला होता. डोळे मिटलेले. पण झोप येत नव्हती. शिवानी आठवत होती. तिच्या सोबत काय बोललेला तो.... साधच बोललेला पण काही काही त्याला जे बोलाल नाही ते पण ऐकू येत होत. तिचा चेहरा आठवत होता त्याला. सगळ वेगळच तंत्र चाललेल डोक्यात त्याच्या. ताळतंत्र सुटलेलं थोडक्यात त्याच. आणि त्याच सगळ्या विचारात अभिजित झोपून गेला.
दुसऱ्या दिवशी....
आज काय कामाला जायला खूप उत्साहात निघालेला अभिजित राज सोबत. राज रमत-गमत पावलं टाकत होता. अभिजित मात्र जमेल तितका पटापट पावलं टाकत चालत होता. राज मागे राहीला. अभिजितच त्याकडे लक्षच नाही गेल. स्वतःचा स्वतः लिफ्ट मधून वर गेला. राज खालीच अभिजितला शोधत बसला. इकडे अभिजित वर पोचला. लिफ्टच दार उघडल गेल. आणि समोर शिवानी. ती हसते त्याला बघून. आणि अभिजित पण हसतो.
शिवानी : आत्ता आलास का ?
अभिजित : हो.
शिवानी : चहा प्यायला येतो खाली ?
अभिजित : चालेल.
परत लिफ्ट मध्ये जात अभिजित शिवानी खाली आले. लिफ्टच दार उघडल गेल. आणि समोर राज. शिवानी सारखा तो मात्र हसला नाही. अभिजितने त्याला डोळ्याने खुणावल. राज गप्प लिफ्ट मधून वर गेला. शिवानी अभिजित चहा प्यायला गेले. तिथून वर पुन्हा वर आले. आणि दोघांनी लॉकरमध्ये मोबाईल ठेवले. मग कामाला लागले. 


06
संध्याकाळी जॉब सुटला. खरतर सहा वाजायला आले तस अभिजितला कसस वाटत होत. म्हणजे आज राज आहे आणि शिवानीसुध्दा. राज सोबत रोज मी खाली जाऊन चहा पीतो. सिगरेट ओढतो. रूमवर जातो. पण कालपासून आज सकाळपर्यंत शिवानीसोबत फिरण्याची, चहा पिण्याची सवय लागलेली. राजला दुखवू शकत नव्हता अभिजित. आणि शिवानी काय ? ती तर स्वप्नातली होती त्याच्या एक मुलगी. करायचं काय या विचारात. सहा वाजलेच. राज उठून बाहेर गेला. याला काय झाल या विचारात अभिजित होता. ( स्वतःशीच ) जाऊदे बर झाल. हा गेला म्हणजे आता शिवानीसोबत मला खाली चहा प्यायचा चान्स मिळेल. तेवढ्यात मागून शिवानीचा आवाज आला.
शिवानी : झाल ?
अभिजित : हो. निघायचं ?
शिवानी : तेच विचारायला आलेले.
अभिजित : हा. चल-चल. चहा घेणार ?
शिवानी : हो. खूप गरज आहे.
दोघ बाहेर आले. लिफ्टमध्ये शिरले.
शिवानी : इतक डोक दुखतय ना काय सांगू तुला.
अभिजित : गोळी वैगरे जवळ ठेवत जा. म्हणजे कस काय झाल कि लगेच खायचं. अंगावर काढत जाऊ नकोस.
शिवानी : हा. अरे लक्षातून जात. बघू ना जाता-जाता घेते गोळी.
 लिफ्टच दार उघडल. दोघ शांतच बाहेर आले. समोर गाडे दिसत होते.
अभिजित : नुसता चहा घेणार कि अजून काय खाणार ? भूक लागलीय का ?
शिवानी : काय करू ? म्हणजे समजत नाहीये मला. एक मन म्हणतय चहा प्यावा. एक मन म्हणतय उत्तापा खावा.
अभिजित : मी सांगू ?
शिवानी : हा सांग ना.
अभिजित : चहा प्यायला सांगणार मन आहे ना ते डोके दुखीला तुझ्या कंटाळल आहे. म्हणून ना शॉर्टकट म्हणून नुसता चहा पी अस ते म्हणतय.
शिवानी : अच्छा होका ?
अभिजित : हो.
शिवानी : मग उत्तापा खा म्हणतय त्या मनाच काय ?
अभिजित : त्या मनाला माझ्यासोबत रहायचंय म्हणून ते म्हणतय उत्तापा खा.
शिवानी : ओह... आय सी. अस आहे तर. सगळ. हे झाल माझ मग तुझ्या मनाच काय ?
अभिजित : माझ्या मनाच काय मधेच ?
शिवानी : तुला तुझ मन नाही का काही सांगत ?
अभिजित : सांगतय तस माझ मन मला काहीतरी. पण जाऊदे.
शिवानी : अस कस जाऊदे... बोल काय म्हणतय तुझ मन मला तरी ऐकू दे...
अभिजित : माझ मन म्हणतय. जरा थंडी वाजतीय आत्ता समोर वडापावचा गाडा आहे.
शिवानी : हम्म ?
अभिजित : त्यात गरमागरम वडापाव आहेत.
शिवानी : बरर ? ते खायचेत का ?
अभिजित : नाही. नाही. तिथ वडापाव आहे पण तिथ कांदा भजी नाहीत. सो. माझ मन म्हणतय. कि दोन प्लेट कांदा भजी सांगावी त्यांना. म्हणजे कांदा चिरलेला असेल तर ठीक नसेल तर मस्तच. आणि मग ते ओल पीठ बनवून त्याच्या भजी पाडे पर्यंत दहा एक मिनिट वेळ लागेलच. म्हणजे वाढेल.
शिवानी : हा मग ?
अभिजित : मग तो वेळ भेटेल ना मला तुझ्यासोबत थांबायला.
शिवानी : अरे देवा. आत्ता कळाला तुझा प्लान. किती रे आगाऊ आहेस. मी चांगल बोलले तर लगेच आगावूपणे वागायला लागलास.
अभिजित : सॉरी..
शिवानी : का ?
अभिजित : राग आला असेल ना तुला माझा. म्हणून. सॉरी.. मनापासून सॉरी.
शिवानी : नाहीरे. चालत तेवढ.
अभिजित : नशीब.... मला वाटल आजचा उत्तापा, चहा लास्ट बनतो कि काय.
शिवानी : आणि कांदा भजी ?
अभिजित : काय कांदा भजी ?
शिवानी : खायचीय ना तुला ?
अभिजित : हो. पण ठीके मी चहा पिण.
शिवानी : बघ हा. माझी थांबायची तयारी आहे. तुझी भजी बनवून होईपर्यंत. आणि तुझ्यात शेअर पण करेन.
अभिजित : मग चालले. आलोच थांब ऑर्डर देऊन.
अभिजित जाऊन उत्तापा सांगतो. त्याचे पैसे देतो. चहाचे पण पैसे देतो. मग बाजूला जाऊन कांदा भजी सांगतो. पैसे देऊन शिवानीकडे येतो.
अभिजित : शिवानी...
शिवानी : हम.. बोल ?
अभिजित : किती दिवस अस भेटणार आपण ?
शिवानी : अस का विचारल ?
अभिजित : असच.. सांग कि..
शिवानी : माहित नाही. जोवर आपण इथ जॉबला आहोत एकत्र तोवर.
अभिजित : हम.
शिवानी : कारे काय झाल ? चेहरा का उतरला तुझा. एकदम मूड ऑफ ?
अभिजित : सवय लाऊन जातात ग लोक. सवयीच पण काय नाही. पण आठवणींच नंतर काय करायचं समजत नाही. आई, बाबा, मित्र, मांजर सगळे सवय लावून गेले. पण....
शिवानी : पण ?

अभिजित : ज्याच्या-त्याच्या आठवणी कोण सोबत घेऊन गेलच नाही ग.....!  


07 
शिवानी : अस का बोलतोस ?
अभिजित : असच. कोणी हि आपल्या आयुष्यात कायमच येत नाही. नशिबात असल तरी कुणालाच कुणासोबत कायमच रहावस वाटत नाही. अस का होत असेल ? म्हणजे सकाळी उघडलेली भाजी मंडई दिवसभर सुरु असते. लोकांची त्यात ये-जा वर्दळ सुरु असते. संध्याकाळ झाली कि ? सकाळच्या मंडईची जागा पूर्ण रिकामी झालेली असते. आयुष्यात पण आपल्या काय अस वेगळ होत ? नवनवीन लोक येतात सोबत राहतात आणि वेळ आली कि निघून जातात. मित्र असो मैत्रीण असो किंवा आपली आईसुध्दा.
शिवानी : अरे इतका नाराज का होतोस. जस नशिबात असत तसच होत ना. आपण काय करणार सांग ना ? आणि अशा गोष्टींकडे आपण निगेटिव्ह का बघायचं ? त्रास आपल्यालाच होतो ना.
अभिजित : नशिबात काहीच नसत ग.... त्या व्यक्तींचा सहवास. त्या व्यक्तींचं सोबत असण. किंवा त्यांच निघून जाणं. ती व्यक्ती स्वतःच्या मर्जीने जाते. नशिबाच काय ? आणि नशिबात लिहिलेलं घडल असत तर मला सांग आपल नशीब काय असच काही दिवसांनी सोडून जात का आपल्याला ? नशीब आपण जन्माला आल्यावर आपण मेल्यावरच संपत. मला नाही पटत हे. नशिबात नसत लिहिलेलं हे असल काहीच.
शिवानी : तुझी भजी झालीय मी आणू ?
अभिजित : नको मी आणतो. तू उत्तापा खायला घे.
दोघ खात असतात. शिवानी अभिजितची एक भजी घेते. अभिजित खात असतो इकडे तिकडे बघत. शिवानी हि तिचा आवडता उत्तापा खात असते. अस एक घास तोडत असताना सहज डिशकडून समोर लक्ष जात तीच. आणि तिला अभिजितच्या डोळ्यात काहीस पाणी दिसत.
शिवानी : अभिजित..
अभिजित : हा बोल ? काय हवय चटणी वैगरे ?
शिवानी : नाही. काय झाल तुला ?
अभिजित : नाही का ग ?
शिवानी : नाही असच.
अभिजित : काय लागल तर सांग.
शिवानी : तू सुध्दा..
अभिजित : नाही बस मला आता फक्त चहा प्यायचा.
शिवानी : खायचं सोडून पण काय लागल काही बोलू वाटल तर बोल माझ्याशी. तुलाच बर वाटेल.
अभिजित : मी आहे ठीक. बर दे डिश तुझी ठेवून येतो मी.
शिवानी : अरे राहूदे मी ठेवते. तू चहा घे.
अभिजित जाऊन भजीची डिश ठेवतो शेजारून चहा आणतो. शिवानी तोपर्यंत येते. तिला चहाचा कप देत अभिजित तिच्या बाजूला बसतो. चुकून अभिजितच्या हाताची शेवटची दोन तीन बोट तिच्या हाताला स्पर्श करतात. अभिजितला ते जाणवत नाही. तो त्याच्याच विचारात असतो. शिवानी त्याच्याकडे बघते. अभिजित ही मग तिच्याकडे बघतो.
अभिजित : काय झाल ?
शिवानी : काही नाही.
अभिजित : हा कसला नियम आहे न देवाचा.
शिवानी : कसला ?
अभिजित : एकट जन्माला यायचं एकटच मरायचं.
शिवानी : हम.
अभिजित : मग जगताना सोबत का लागते कुणाची ? हे तर चुकीच आहे ना. दोन मोठ्या कृती मरायच्या आणि जगायच्या आपण एकट्याने सोसतो मग जगताना का कुणाचा दिलासा, आधार, प्रेम का हव असत ? जगू शकतोच कि आपण आपल एकट ?
शिवानी : तस नाही रे जगता येत. आणि एकट जगता आल असत माणसाला तर आपण तरी आत्ता दोघ इथे बसलेलो असतो का ? एकमेकांसोबत...
अभिजित : “कुणीतरी” का लागत आपल्याला हे समजत नाही मला.
शिवानी : तू चहा पी. थंड होईल. जास्त विचार नको करू अभि. ए तुला अभिजित म्हंटल तर चालेल ना ?
अभिजित : सगळे तेच बोलतात.
शिवानी : मग नको. सगळे म्हणतात तेच मी का बोलू तुला ? अभिजित कोण म्हणत का तुला ?
अभिजित : नाही. नाव मोठ आहे ना.
शिवानी : मग मी अभिजितच म्हणत जाईन.
अभिजित : आई पण अभिजितच म्हणायची.
शिवानी : ठीके ना. आता मी म्हणेन ना. खुश हो बर. चल लवकर.
अभिजित तिच्याकडे बघतो त्याच्या डोळ्यात जरासच पाणी आलेल असत.
शिवानी : आर यु क्राइंग ?
अभिजित : नाही. आईची जरा आठवण आली..
शिवानी : जराच ?
अभिजित : ती पण माझ्या आयुष्यात जराच वेळ होती. निघायचं ? तुझ डोक दुखतय ना.
शिवानी : अरे हो विसरलेच कि. थांबल पण दुखायचं.
दोघ चालत असतात. रिक्षा थांबतात तिथ दोघे येऊन रिक्षाची वाट बघत असतात. इतक्यात अभिजित तिथून कधी निघून जातो शिवानीला समजत नाही. ती बाजूला बघते अभिजित नसतो. ती इकडे तिकडे बघते. तिला कळत नाही आत्ता तर इथ होता हा कुठ गेला. ती काय कराव या विचारात असताना एक रिक्षा तिच्या जवळ येते. ”येताय का ?” रिक्षावाला म्हणतो. ती नकार देते तेवढ्यात अभिजित म्हणतो “हो”. आणि शिवानीचा हात धरून तो आत बसतो.
शिवानी : कुठ गेलेलास मधेच ?
अभिजित : हे घे. सेरेडॉन. घरी गेलीस कि खा एक. आणि सोबत ठेव आता या गोळ्या. आख्खी स्ट्रीपच आणली. लक्षात रहायचं नाही तुझ्या म्हणून.
शिवानी : अरे कशाला मी घेतल असत ना. कशाला तुला त्रास.
अभिजित : असुदे ग. त्रास कसला.

रिक्षा रस्त्याने चालतच असते..... 


08
रिक्षात आत्ता दोघेच असतात. रिक्षावाला लवकर घरी जाण्याच्या बेतात असावा म्हणून त्याने जाता-जाता या दोघांनाच घेतल होत. त्यामुळे अभिजित शिवानी ऐसपैस बसलेले.
अभिजित : छान वाटल आज मला. तुझ्यासोबत.
शिवानी : मला पण. रोज अरे खूप एकट बोरिंग वाटायचं. म्हणजे इतक हे काम करायचं. दिवसभर कॉम्प्युटर समोर बसून डोळे घाईला येतात. आणि मग बाहेर आल कि असा फ्रेश वैगरे वाटावं अस वाटत. पण काय उपयोग नाही. एकट्यानेच चहा प्यायचा काहीतरी खायचं. एकट्यानेच जायचं. ना कोण बोलायला असत ना कोण सोबत असत.
अभिजित : आहे कि मी आत्ता.. तुझ्यासोबत.
शिवानी : म्हणून तर मी खुश आहे ना. बघ कि.
अभिजित : चला काही नाही तर या कमी तरी उपयोगी आलो तुझ्या.
शिवानी : हम. मित्र झालास म्हटल्यावर कामी तर यायला हवच.
अभिजित : मग बाकी उद्याचा काय प्लान ?
शिवानी : काम एक्के काम. आता आठवडाभर काय सुट्टी नाही बघ.
दोघ पुन्हा शांत झाले. शिवानी पहिली उतरली. तिथून पुढे रिक्षा गेली आणि बऱ्याच वेळानंतर अभिजित उतरला.
आजचा दिवस अभिजितसाठी आठवणीतला होता. म्हणजे आज शिवानी त्याच्यासोबत होती. खूप आवडलेली त्याला तिची सोबत. वर दाराजवळ आल्यावर अभिजितने दार वाजवल. दार उघडल गेल.
राज : आलास. मला वाटल आज काय येत नाही तू. म्हणून माझ मीच खाऊन आलो इडली सांबर.
अभिजित : अरे खाल्ल मी शिवानी सोबत.
राज : चांगलय.
अभिजित : हे तू समान भरून कुठ चालला घरी का ?
राज : नाही. गोव्याला. परवा इंटरव्हिव आहे. उद्या निघतोय इथून.
अभिजित : काय यार बरा नेमका उद्याच आहे.
राज : अरे यार बघ ना मला थांबायचं होत उद्या तुझ्यापाशी पण.
अभिजित : बेस्ट लक. एकदम भारी दे फुटेज बनवून. आणि काय होत पहिला कॉल करून सांग मला
राज : हो. मी झोपतो.
अभिजित : हो मी पण आवरून झोपतो.
दुसऱ्या दिवशी......सकाळी
राज गोव्याला जायला निघाला. अभिजित कंपनीच्या बाहेरच्या गाड्यापाशी उभा राहून सिगरेट ओढत होता. तिकडून शिवानी जात होती. तिला अभिजित दिसला. ती खूप लांब होती त्याच्यापासून. पण तरी तिला या एवढ्या लोकांच्यात अभिजितच दिसला तोही बरोबर कस काय ना ? ती निघाली त्याच्याकडे जायला. तेवढ्यात एक मुलगा येऊन अभिजीतला मिठी मारतो आणि त्याच्याशी काहीतरी बोलू लागतो आणि निघून जातो. अभिजित त्याला बाय करत असतो. शिवानी त्याच्यासमोर येते.
शिवानी : कितवी चाललीय ?
अभिजित : काय ?
शिवानी : हीच कि तुझी सिगरेट.
अभिजित : पहिलीच.
शिवानी : नक्की ??
अभिजित : होय.
शिवानी : दे ती टाकून आपण मस्त चहा पिता.
अभिजित सिगरेट टाकून देतो. आणि दोन चहा घेतो. यावेळेस मात्र पैसे शिवानी देते. दोघ चहा पितात आणि कंपनीत जातात. शिवानी अभिजितला आधी आत जायला सांगते. अभिजित जातो. शिवानी बाथरूममध्ये जाऊन थोडी केस वैगरे नीट आहे का बघुन येते. अभिजित बसलेला असतो. एकजण येऊन त्याचा हातात हात घेतो. त्याला उठवतो आणि मिठी मारतो. शिवानीने त्या मुलाला दोन तीन वेळा बघितलेलं असत पण आज अचानक हा मुलगा अभिजितला खूप वर्षांनी भेटल्यासारख का वागत आहे तिला काहीच कळत नाही. ती तिच्या डेस्कवर जाऊन बसते. दिवस असाच जातो. आज ती चहा प्यायला दुपारी कॅफेटेरियात जात नाही. आणि अभिजितला पण खूप काम असत त्यामुळे तो हि वेळेकड लक्ष देत नाही. संध्याकाळी अभिजित शिवानी जवळ जातो. पण तीच काम राहिलेलं असत आणि तिला एक दीड तास लागणार आहे अस ती त्याला सांगते. अभिजित तिच्यासाठी थांबावं म्हणून तयारीत असतो पण तीच त्याला जायला लावते. मग अभिजित निघून जातो. थोड्यावेळाने त्यांचा टी.एल. येतो.
टी.एल. : रश्मी... अभिजित को देखा ?
रश्मी : उसका हो गया काम तो, आय थिंक घर चला गया होगा. कॉल करके देखिये.
टी.एल. : अरे यार... पिछली बार भी उसने ऐसा हि किया था. ठीके उसे कल देखता हुं.
रश्मी : मैने भी प्लान किया था लेकीन वो रुका नही.
शिवानी गुपचूप काम करत असली तरी तीच सगळ लक्ष दोघांच्या बोलण्याकडे होत.
टी.एल. : कोई बात नही कल सेलिब्रेट करेंगे बर्थ-डे, अभिजित का.
शिवानी : ( स्वतःशीच ) काय ? अभिजितचा बर्थ-डे आणि मला सांगितल नाही त्याने कसला आहे हा.
तिने पटपट जमल तितक फास्ट काम केल आणि ती निघाली. रश्मी खाली सिगरेट ओढत होती विवेक सोबत. तिच्याजवळ जावून,
शिवानी : हे हाय,, रश्मी. अंमम...अभिजित का नंबर है तुम्हारे पास ?
रश्मी : हा है. चाहिये क्या ?
शिवानी : हा. मतलब वो उसके घर का पता चाहिये था.
रश्मी : तुम्हारा नंबर बताओ मै टेक्स्ट करती हु उसका पता और नंबर दोनो.
शिवानी तिला नंबर देते. रश्मी तिला अभिजितचा नंबर आणि पत्ता देते. शिवानी तिथून निघते. एका बेकरी मध्ये जाते. तिथून एक मस्त केक घेते. आता त्याला कोणता आवडतो केक तिला माहित नव्हत म्हणून तिने स्वतःच्याच आवडता केक घेतला. त्यावर अभिजित नाव टाकल. आणि कॅडबरी घेतली एक मोठी आणि तिथून ती निघाली. एका घड्याळाच्या दुकानातून तिने एक मस्त सोनेरी अस खूप सुंदर घड्याळ घेतल. केक, कॅडबरी, घड्याळ अस सगळ घेऊन ती खास रिक्षा करून अभिजितच्या दारात आली. तिने त्याला कॉल केला. आत अभिजित आईच्या फोटोसमोरून पटकन बाहेरच्या खोलीत येतो. गादिवरचा मोबाईल उचलतो. पण कॉल कट होतो. तेवढ्यात दाराची कडी वाजते. 


 09  
अभिजित दार उघडतो.
अभिजित : तू ? इथ ?
शिवानी : हो.. का नको यायला पाहिजे का ? का कुणी आत आहे..?
अभिजित : नाही. कशाला कोण येईल माझ्याकडे. एकटाच आहे मी. पण तू अशी इथ. आणि पत्ता कुणी दिला तुला माझा.
शिवानी : आले मी शोधत.
अभिजित : हा केक आणि हे काय ?
शिवानी : हो. हो सगळ देणार बर्थ-डे बॉयला आधी आत तर येउदे.
अभिजित बाजूला सरकतो. शिवानी आत जाते. अभिजित दार लावून घेतो. शिवानी गादीवर बसते. अभिजित आत जाऊन पाणी आणतो. तिला पाणी देऊन तिच्या समोर बसतो. शिवानी केकचा बॉक्स उघडते. एक छोटीशी गुलाबी मेणबत्ती केकमध्ये खोचते.
शिवानी : काडेपेटी आहे का ?
अभिजित : नाही लायटर आहे.
शिवानी हासत त्याच्याकडून ते लायटर घेते आणि मेणबत्ती पेटवते.
अभिजित : लगेच कापायचा का ?
शिवानी : मग काय उद्या कापायचाय का तुला ?
अभिजित : नाही म्हणजे केक कापला कि संपलच ना सगळ. मग पुढे काय करणार ? म्हणून म्हंटल बोलत बसलो असतो आणि मग कापला असता केक.
शिवानी : काही हरकत नाही. पण आता हि मेणबत्ती पेटवली कि.
अभिजित : मग काय झाल ? फुकतो. नंतर परत पेटवून केक कापू.
शिवानी : बर.
शिवानी मेणबत्ती हाताने वारा घालून विजवते आणि केक बाजूला ठेवते बॉक्समध्ये झाकून. तेवढ्यात अभिजित उठून आत जातो आणि शर्ट बदलून येतो. खिशात हात घालून तो दारापाशी जातो.
शिवानी : कुठ चालला ?
अभिजित : दुध नाहीये.
शिवानी : कशाला ?
अभिजित : जरा चहा पिता-पिता बोलता.
शिवानी : अरे...कित्ती पिशील चहा. काळा होशील.
अभिजित : नाही होत. तुला नाही का प्यायचा माझ्या हातचा चहा ?
शिवानी : अस काय म्हंटलय का मी ?
अभिजित : मग ? बस आलोच मी दोन मिनिटात.
शिवानी भिंतीला टेकून बसली. अभिजित निघून गेला. जाताना दार ओढून घेतल बाहेरून. शिवानी लागलीच उठून आत गेली. आत सगळा पसारा होता. साहजिकच जसा मुलांच्या रूममध्ये असतो तसा. किचन कट्ट्यावर मात्र शिवानीला एक फोटो दिसला. त्यापुढे एक चालू दिवा होता. तो फोटो देवाचा नसून अभिजितच्या आईचा होता. शिवानी पटकन बाहेर निघून आली. आणि होती तिथेच बसून राहिली. थोड्यावेळाने अभिजित आला. आत जाऊन त्याने दुध तापवत ठेवल. शिवानी आत गेली त्याच्या पासून लांबच उभी होती. अभिजित चहा कसा बनवतो ते बघत. अभिजित एकीकडे पाणी उकळत ठेवतो त्यात साखर दोन वेलदोडे आणि थोड आल टाकतो. त्या नंतर ते पाणी उकळायला लागल कि चहा पावडर टाकली आणि तिच्याशी बोलायला लागला.
अभिजित : गाड्यापेक्षा मी चांगला बनवतो बर का.
शिवानी : बघू कि कसा लागतो. वास तर येतोय मस्त.
थोड्यावेळाने....
अभिजित आणि शिवानी दोघे भरलेले कप घेऊन बाहेर गादीवर येऊन बसले.
शिवानी : आईची आठवण येतीय का ?
अभिजित : नाही ग... का?
शिवानी : मग आत कट्ट्यावर आईंचाच फोटो आहे न ?
अभिजित : हो. कोण नसत ना बर्थ-डेला माझ्या. प्रत्येकाला काम असतात. मग मी आईसोबतच करतो. बर्थ-डे माझा.
शिवानी : म्हणूनच मी आले. अरे वाह.. मस्त चहा झालाय. मी काय म्हणते अभिजित. व्ही.एफ.एक्स.चा जॉब सोड आणि चहा बनवत बस. म्हणजे मी रोज चहा प्यायला येईन तुझ्याकडे.
अभिजित : हो दिवसातून एकदाच घरी जाताना ते पण पाच मिनिट. आणि मी बाकीचा वेळ काय करू ?
शिवानी : काय म्हणजे काम करायचं तुझ तुझ. किती गिऱ्हाईक येईल तुला माहितीय का. मज्जा करतीय बर का..
अभिजित : हम. पण माझ आवडत गिऱ्हाईक पाच मिनिटासाठीच येणार ना. नको मला तसला धंदा.
शिवानी : आवडत गिऱ्हाईक ? कोण रे ?
अभिजित : तू.
शिवानी : बर..हा बर्थ-डे नसता ना तर तुला बघितलच असत. वाचलास.
अभिजित : होका ?
आणि अभिजित तिचा हातात हात घेतो. शिवानी त्याच्याकडे बघते. अभिजित दुसऱ्या हातातला कप खाली ठेवतो. आणि पुढे सरकतो. शिवानी गालात हासते.
शिवानी : चहा राहिलंय अभिजित.
अभिजित : हम.
शिवानी : हम. काय पी लवकर.
अभिजित तिच्याकडे बघतच बाजूचा कप हातात घेतो. आणि तेवढ्यात दार वाजत.
अभिजित उठणार तोच शिवानी उठली. आणि दार उघडल.
अभिजित : कोणे ग ?
शिवानी बाहेर उभ्या एका मुलाला आणि मुलीला बघून तोच प्रश्न विचारणार तोच.
मुलगा : मी अजिंक्य आणि हि असावरी.
अभिजित पटकन उठला आणि दाराजवळ गेला.


10
अभिजित : अजिंक्य तू इकड ? कसा काय ?
अजिंक्य आणि असावरी पुढे आले. शिवानी अभिजित बाजूला सरकले. शिवानी दार लावून घेते. चौघ गादीवर बसतात. अजिंक्य स्वतः जवळच एक गिफ्ट पुढे धरतो. अभिजित ते घेतो. आणि उघडून बघतो. त्याच्या आई बाबांचा एक जुना फोटो होता. तो हि black & white तो त्याने एका स्टुडीयोतून फोटोशॉपमधून रंगीत फोटो बनवून घेतला. आणि त्याची प्रिंट काढून आणून त्याला फ्रेम बनवली होती. अभिजित ती फ्रेम बघून आता रडणारच होता. तेवढ्यात असावरी त्याच्या पुढे डेरीमिल्कची कॅडबरी धरते. अभिजित ते घेतो. पण या सगळ्यात तो दोघांचे आभार मानायचे राहून जातो. एवढ्यात शिवानी बोलते,
शिवानी : आम्ही अजून केक कापला नाही. चल अभिजित घे कापून हे आहेत तोपर्यंत. मला पण जायचय परत.
अभिजित होकार देतो. शिवानी बॉक्स मधून केक काढते. त्यात मेणबत्ती तशीच असते. ती पेटवते. आणि अभिजीतला प्लास्टिकचा सुरा देते. अभिजित केक कापतो. शिवानी, असावरी, अजिंक्य टाळ्या वाजवत असतात. शिवानी केकचा नीट तुकडा कापते. अभिजीतला भरवते. त्यातला उरलेला तुकडा ती असावरीला देते. असावरी त्याला भरवते. आणि उरलेला अजिंक्य हि भरवतो. शिवानी बाजूला ठेवलेलं तीच गिफ्ट त्याला देते. अभिजित ते कव्हर काढतो आत एक काळा उभट बॉक्स असतो. त्यावर सोनेरी रंगाने अभिजित लिहिलेलं असत. त्या बॉक्समधून एक दोरा बाहेर आलेला असतो. आणि त्याला एक लेबल असत. त्यावर किमत लिहिलेली नसते तर त्यावर लिहिलेलं असत “फॉर यु”. अभिजित बॉक्स उघडतो आत एक सोनेरी मस्त अस घड्याळ असत. तो ते बघत असतो.
शिवानी : घालून दाखव ना.
असावरी : खूप छान आहे ग. चोईस मस्त आहे तुझी.
शिवानी : हा. खूप शोधून आणलय. अभिजित तुला आवडल का ?
अभिजित : खूप.
अभिजित उजव्या हातात घड्याळ घालतो.
असावरी : तू डावरा आहेस का ?
अभिजित : नाही. पण माझी आई डावरी होती. ती घालायची उजव्या हातात घड्याळ. मी तीच बघून लहानपणापासून असच उजव्या हातात घालतो घड्याळ.
शिवानी : खूप शोभतय तुला. रोज घाल आता.
अभिजित : हो.
अजिंक्य : ती फ्रेम लाव नीट कुठतरी.
शिवानी : चहा पिणार ?
अजिंक्य : नाही नको. जायचय परत मला साताऱ्याला.
शिवानी : थोडा ? एकदम एकदम थोडा ?
असावरी : बर चालेल. पण एकदम कमी अर्धा कपच. म्हणजे मी चहा पीत नाही. मी कॉफी पिते.
शिवानी : बनवू का मग कॉफी ?
असावरी : अग नको तुला त्रास कशाला. चहा चालेल मला.
अजिंक्य : मी देऊ का बनवून कॉफी तुला ?
असावरी : नाही.. अरे चालेल चहा.
शिवानी : बर आलेच मी बसा तुम्ही.
असावरी पण आत गेली. आता बाहेर अभिजित आणि अजिंक्य होते. अजिंक्य त्याच्या मांडीवर हात ठेवतो. आणि हळू आवाजात बोलायला लागतो.
अजिंक्य : कोण आहे हि ?
अभिजित : नवीन मैत्रीण.
अजिंक्य : चांगली आहे कि. सांभाळून घेईल तुला कायम. खूप चांगली साथ देईल तुला.
अभिजित : माझ्या मनात पण तेच आलेल पण तिच्या मनात नाही ते.
अजिंक्य : तिने सांगितल का तुला तस ?
अभिजित : नाही पण मला तिच्याशी बोलताना कळत ना.
अजिंक्य : अरे मुली या बोलतात एक, असतात एक आणि डोक्यात त्यांच्या असत वेगळच. आणि हे प्रेम वैगरे तर मनात असत. मग काय कळणारे तुला ? तिच्या हालचाली तिचे हावभाव बघून मला आत्ता कळालय.
अभिजित : काय ?
अजिंक्य : तिला तू आवडतोस.
अभिजित : ओ लेखक, माहितीय तुम्हाला माणस बघून लगेच ओळखता येतात पण. नुस्त ओळखून फायदा नाही. बोलल गेल पाहिजे ना. तस आमच्यात झाल पाहिजे ना काहीतरी.
अजिंक्य : बोलल पाहिजे म्हणजे तूच पुढाकार घे.
अभिजित : तिने नकार दिला तर ? माझी मैत्री पण तुटेल.
अजिंक्य : तिचा नकार तुला येणारच नाही.
अभिजित : पण नको. जाऊदे. जरा अजून वेळ जाऊदे.. मग बघू. आत्ताच तर ओळख झालीय.
अजिंक्य : हा मग वेळ घे. जरा दोन तीन महिने एकत्र रहा. बोला, भेटा मग नंतर विचार.
अभिजित : तेच बघू. अरे पण तू साताऱ्यातून आज पुण्यात कसा काय ?
अजिंक्य : खास तुझ्यासाठी आलो. तू माझ्या वेळेस आला नाहीस. म्हंटल तुला बोलून नाही दाखवायचं. तुझ्या वाढदिवसाला जायचं आणि आठवण करून द्यायची.
अभिजित : अरे जॉबला सुट्टी नाही दिली कंपनीने...म्हणून जमल नाही.
अजिंक्य : असू देत. ऐक उशीर करू नकोस पण. वेळेतच विचार तिला. प्रेम वेळ बघून नाही वेळेत व्हायला हव. आणि ती तुझी वेळ आलीय. कुणीतरी असेल अस आपल तर आयुष्य पुर्णत्वाकडे जात. एकटेपणा संपेल तुझा.
अभिजित : संपला अरे. हिच्याशी ओळख झाल्यापासून खुश आहे मी.
अजिंक्य : बास कि मग अजून काय पाहिजे. विचार तिला लवकर.
अभिजित : हि असावरी कोणे ?
अजिंक्य : कवी आहे. माझ्यासोबत असते. आम्ही एकत्र काम करतोय काही गोष्टींवर लिखाण करतोय एकत्र.
अभिजित : आणि प्रतीक्षा ?
अजिंक्य : नाही ती सोबत आता माझ्या. लग्न झाल नाही वे तीच.
अभिजित : कुणाशी ?
अजिंक्य : अमित सोबत. इथलाच आहे पुण्याचा. श्रीमंत आहे. चांगला जॉब. घर गाडी सगळ आहे. त्याच्याकडे. आणि माझ्याकडे ? फक्त घर. ना गाडी ना काय.
अभिजित : अरे पण अस कस. म्हणजे तीच एवढ प्रेम होत तुझ्यावर आणि तुझ तर विचारायलाच नको. तुझ्यासारखा मला अजून एक पण माणूस दिसला नाही जो इतक प्रेम करत असेल.
अजिंक्य : चालायचं तेवढ. खर प्रेम याचसाठी होत कि ते कुणाला मिळत नाही म्हणून. जाऊदे. ती खुश आहे यातच मी इकड खुश आहे.
अभिजित : मग पुढ काय विचार केला का तू तुझा ?
अजिंक्य : एकटेपणात जगायचं. कुणी नको आता मला. फक्त काम करायच. आणि तिच्यावर मी इतक प्रेम केलय ना अभि, कि तिच्या नवऱ्यान तिला लव्ह यु म्हंटल तरी तिला माझीच आठवण येईल तिला. त्याच्यासोबत बेडवर असताना पण तिला माझा स्पर्श आठवेल. प्रेमच अस दिलय तिला कि, ती सगळ विसरेल पण मला नाही. आणि जरी कधी विसरली ती मला तरी मी कुठ विसरणारे तिला. तू फक्त उशीर करू नको. माझ्याकडून उशीर झाला. संपलो बघ मी.
अभिजित : होईल सगळ ठीक. भेटेल तुला कुणी ना कुणी.
अजिंक्य : बघू.. चहा होतोय का नाही आज ?
असावरी : घ्या चला चहा.
चौघ बसून चहा प्यायला लागले.


11 
अजिंक्य : निघायचं असावरी.
असावरी : हो.
अभिजित : तू तरी थांब अजिंक्य.
अजिंक्य : अरे मला साताऱ्याला जायचय.
असावरी : मला घरी जाव लागेल लवकर घरी आवडत नाही बाबांना मी जास्त वेळ बाहेर थांबलेलं.
अजिंक्य : आणि मला सोडाव लागेल ना वेळेत. चल येऊ का ?
असावरी आणि अजिंक्य उठले. लागलीच अभिजित, शिवानी उठले. अजिंक्य असावरी निघाले. असावरी जाऊन तिच्या गाडीवर जाऊन बसते. अजिंक्यचा हातात हात घेऊन अभिजित त्याला पुन्हा ये अस सांगतो.
अजिंक्य तिथून निघून जातो असावरी अजिंक्य नाहीसे झाले. आता घरात अभिजित शिवानी राहिलेले. अभिजित दार  लावून मागे बघतो तोच शिवानी त्याच्या जवळ येते.
अभिजित : चाललीस ?
शिवानी : हो. निघते.
अभिजित : थांबली असती तर ?
शिवानी : अरे. उद्या जॉबपण आहे ना. इथ लेट झाला तर उद्या उशीर होईल. आधीच हल्ली डोक दुखत माझ.
अभिजित : ठीके.
शिवानी : बर मग आता काय करणारेस ?
अभिजित : झोपेन.
शिवानी : झोपेन मीन्स ? खाणार नाही का काय ?
अभिजित : इच्छा नाही.
शिवानी : अस कस. आज तरी उपाशी राहू नको. वाढदिवस आहे तुझा. अस नसत उपाशी झोपायचं.
अभिजित : नाही ठीके. तू निघ लवकर परत उशीर होईल तुला. मी येऊ का सोडायला ?
शिवानी : नाही रे. आता मला जाऊ वाटत नाहीये तुला सोडून.
अभिजित : का ?  
शिवानी : मग काय तू जेवायचा नाहीस. थांब आपण जायचं का बाहेर खायला ?
अभिजित : चालेल.
शिवानी : कर चेंज आपण जाता. मग मी जाईन.
अभिजित : का हे चांगले नाहीत का ?
शिवानी : तो लाल शर्ट घाल ना ओफिशीयल. खूप छान दिसतो तुला.
अभिजित : बर झाल..नशीब.
शिवानी : काय झाल ? एकट्याशीच काय बडबडतो ?
अभिजित : कालच त्याला धुवून आणलेला सकाळी इस्त्री करून आणली. म्हणून म्हंटल नशीब आहे तुझा आवडता शर्ट रेडी.
शिवानी : हा नशीब. जा लवकर आहे मी बाहेर खाली. रिक्षा बघते तो पर्यंत.
अभिजित आत गेला शर्ट बदलून खाली आला. शिवानी रिक्षात बसलेली अभिजितची वाट बघत. आणि दोघ निघून गेले. सन एंड सैंड हॉटेलला. दारात तिथ रिक्षा थांबली. ज्या हॉटेलच्या बाहेर मर्सिडीज, बी.एम.डब्लू गाड्या थांबलेल्या तिथच ह्यांची हि रिक्षा थांबली.
अभिजित : इतक्या मोठ्या हॉटेलमध्यें ?
शिवानी : का काय झाल ? पैसे देणारे मी. आणि हॉटेल मोठ असल तरी किंमत सगळ्यांसारखीच आहे. थोडफार जास्त असेल. मी आलेली एकदा इथ. म्हणून आणल तुला.
अभिजित : पण मला चायनीज पण चालल असत.
शिवानी : बर्थ-डे ला कोण चायनीज खात का ? चल आत
दोघ आत जायला निघाले. त्या महागड्या गाड्या बघत अभिजित चालत होता.
अभिजित : हे बघ हि गाडी मला आवडती. फोर्चुयुनर. टोयोटोची.
शिवानी : मस्त आहे ती.
अभिजित : मला घ्यायचीय ती विकत.
शिवानी : घेशील नक्की.
अभिजित : विकत नाही घेतली तरी चालवायचीय एकदा मला.
शिवानी : चालवशील रे. बघ तू माझ बोलन खोट ठरत नाही.
अभिजित : हो का ? काय तांत्रिक मांत्रिक आहेस का ?
शिवानी : नाही रे. पण असच मी बोलते ते खर होत अस. तू नक्की चालवशील तीच गाडी.
अभिजित : अस असेल तर त्या गाडीत तूला पण घेऊन जाईन मी.
शिवानी : हो मी पण येईन लगेच.
दोघ दारापाशी गेले. एक माणूस त्यांना नमस्कार करतो आणि दरवाजा उघडून देतो. आत काही लोक बसलेले असतात. सगळीकडे पिवळसर रंगाची लाईट असते. मोठाले पेंटिंगस काचेचे टेबल नाजूक नक्षीच्या खुर्च्या. उंची किमतीची झुंबर आणि काय बोलाव. अस ते हॉटेल. सगळ चमकत होत तिथ. म्हणजे वर लावलेल्या मोठ्या झुंबरापासून टेबलावरच्या ग्लास आणि चमच्या पर्यंत सगळच चकचकत होत. शिवानी अभिजित सोबत एका टेबला समोरच्या खुर्चीवर बसते. तिच्या समोर अभिजित बसतो.
शिवानी : काय खाणार ?
अभिजित : काहीपण.
शिवानी : काही पण .. काहीपण... अरे मेनूकार्ड कार्ड मध्ये हा पदार्थ नाहीरे. दुसरीकडे जाता का चल..
अभिजित : कायपन काय ?
शिवानी : मग तुला कळायला हव ते. असल काय मिळत नाही इथ. बोल काय खाणार ? चिकन, मटन, अंडी, मासे ?
अभिजित : चिकन.
शिवानी ऑर्डर देते. आणि शांत अभिजितकडे बघत बसते. तो काहीतरी बोलेल या अपेक्षेने पण तो शांतच  असतो. तेवढ्यात ती त्याला विचारते,
शिवानी : आठवेल का तुला आजचा दिवस ?
अभिजित : विषय आहे का. खूप मेमोरेबल झाला वाढदिवस माझा. फक्त तुझ्यामुळे. माझ्या कायम लक्षात राहील आजचा दिवस आणि तू पण...
12  
अभिजित शांतच बसून होता. शिवानी त्याच्याकडे अधून मधून बघत होती.
शिवानी : गप्प-गप्प का आहेस ?
अभिजित : काही नाही असच.
शिवानी : असच कस ? गप्प झालायस मघापासून बघतीय मी. काय झाल ?
अभिजित : अग खरच. खर सांगू का ?
शिवानी : हो खरच सांग.
अभिजित : मला खूप भूक लागलीय म्हणून मी गप्प आहे. बोलत बसलो तर भूक लागेल ना अजून म्हणून बाकी काय कारण नाही.
शिवानी : हाहाहा..काय तू अभिजित तू पण ना कधी कधी कसा बोलतोस अगदी लहान मुलासारख.
अभिजित : लहानच आहे मी मोठा कुठ झालोय. बघ मला मोठ्या मुलांसारखी गर्लफ्रेंड नाही. माझ लग्न झाल नाही. मला बायको मुल कुणीच नाही. म्हणजे मी लहानच आहे.
शिवानी : अजून काय ? पण मला नाही विश्वास बसत तुझ्यावर.
अभिजित : कसला विश्वास ?
शिवानी : तुला आत्ता गर्लफ्रेंड नाही पण आधी असेलच ना. खर खर सांग. अस लपवून ठेवू नये नाहीतर पाप लागत बर का.
अभिजित : नाही. खरच कोण नाही. शाळेत आवडायची. पण शाळेतल प्रेम हे फक्त आठवण बनून राहत आयुष्यभर. बाकी मी कुणाला प्रपोज केलय. डेट केलय. कुणाला कीस केलाय किंवा..
शिवानी : बस बस... कळाल पुढच. बोलायची गरज नाही.
अभिजित : तर हा. अस काही झाल नाहीये माझ्या बाबतीत. तुझ काय ?
शिवानी : माझ काय ? विषय तुझा चालला आहे ना.
अभिजित : असुदे कि, विषय माझा चालला असला तरी आत्ता सोबत तूपण आहेस माझ्या. मग सांगू शकतेस तू मला. तुझा कुणी बॉयफ्रेंड आहे किंवा होता का ?
शिवानी : नाहीये कोण आत्ता.
अभिजित : बरर.. आत्ता नाही आधी असेल ना ?
शिवानी : नाही. म्हणजे एक मित्र होता. आम्ही खूप क्लोज फ्रेंड होतो. त्याने एक दिवस मला प्रपोज केल. मी खर तर त्याला होकार द्यायला हवा होता कारण त्याच्या इतक मला कुणीच ओळखू शकत नव्हत. मला हि त्याच्याशिवाय करमायचं नाही. तो कधी कधीच भेटायचा. आमच बोलन पण रोज किंवा सारख व्हायचं नाही. आठवड्यातून एकदा वैगरे आमच बोलन व्हायचं. आणि बोलन नाही झाल तर तो मला भेटायला यायचा. पण त्याने मला प्रोपोज केल आणि मी होकार देणार पण मला अस वाटल कि मैत्रीतून प्रेम होण साहजिक आहे. खूप लोकांच्या बाबतीत अस घडत. पण प्रेम झाल्यानंतर मैत्री कोण टिकवून ठेवत ? कुणीच नाही. आणि म्हणून मी त्याला नकार दिला. मला वाटल तो ते सगळ इग्नोर करेल. पण त्याने ते मनाला लावून घेतल आणि माझ्याशी बोलन भेटन सगळ हळू हळू बंद केल.
अभिजित : तू नाही का पुन्हा बोलायचा प्रयत्न केला ?
शिवानी : केला. कित्येकदा. पण नाही. तो मग गेला दिल्लीला. आता तो तिकडेच असतो. आत्ता मागच्या आठवड्यात त्याचा अचानक मेसेज आला मला.
अभिजित : काय म्हणून ?
शिवानी : मी पुण्यात येणार आहे. काम आहे तीन दिवस. आणि पुण्यात तो चार दिवस असणार आहे तर एक दिवस जो मोकळा आहे त्यात तू मला भेटशील का ?
अभिजित : मग तू काय बोललीस ?
शिवानी : होकार दिला.
अभिजित : ( तोंड पाडून निराश होऊन ) हा. बर केल तुमच्यातल ते भांडण म्हणता येणार नाही पण गैरसमज आहे तो दूर होईल एकत्र वेळ घालवला तुम्ही तर. आणि अस हि ‘हि लव्हज यु एंड यु अल्सो’.
शिवानी : हो. मला त्याच्याशी खूप बोलायचं आहे. त्याला तर मी खूप बोलणारे. कारण इतकी चांगली मैत्री त्याने तोडली.
अभिजित : हो आणि इतकी चांगली मैत्रीण पण सोडली... त्याने.
शिवानी : बघू आता भेटल्यावर काय बोलन होत आमच्यात आणि तो कसा वागतो ते.
अभिजितला कस तरी वाटत होत. जिच्यात तो त्याच प्रेम शोधत होता. ती तर दुसऱ्याच्याच प्रेमात होती. अभिजितच लक्ष बाजूला जात. दारातून एक मुलगा आणि मुलगी येताना दिसतात. मुलगा तीचा हातात हात धरून चालत येत असतो. अभिजितच्या बाजूला टेबलाजवळ दोघे पोचतात. तो मुलगा घाईत खुर्ची मागे ओढतो. ती मुलगी खुर्चीवर बसते. तो तिच्या केसांवरून हात फिरवतो आणि हलकासा हसतो. मग स्वतः तिच्यासमोरच्या खुर्चीवर जाऊन बसतो. त्याला काय हव काय नको काही नाही. तो फक्त तिला काय हव इतकच विचारात घेऊन सगळ ऑर्डर करतो. आणि नंतर ऑर्डर देऊन झाल्यावर पण तो तिचा टेबलावर हात असतो त्या हातावर हात ठेवून तिच्याशी बोलत असतो.
शिवानी अभिजितकडे बघते आणि त्याच्या नजेरेवरून नजर फिरवत बाजूला बघते.
शिवानी : किती मस्त आहे ना कपल ते. किती केअर करतोय तो मुलगा तिची. आय थिंक त्याचं लग्न नाही झाल.
अभिजित : हा.
शिवानी : असाच हवा लाईफ पार्टनर केअर करणारा प्रेम करणारा.. तो तसाच आहे.
अभिजित : कधी भेटणारे मग तुम्ही ?
तो आलाय परवा पुण्यात पण त्याच काम उद्या झाल तर परवा भेटणार नाही तर आज. मला म्हणाला मी काम उरकतो आणि दोन दिवस तुला भेटतो वेळ काढून.
अभिजित : हा भेट त्याला. नीट सगळ विचार त्याला. आणि बघ त्याला वाटत असेल तर दे त्याला होकार. कारण तुझ्या मनात हि त्याच्याब्द्द्ल आहेच भावना आणि त्याच्या हि असेल म्हणूनच तो तुला भेटणार आहे ना.
शिवानी : हो बघते ना.
जेवण येत. दोघ जेवण करत असतात. जेवण होत आणि ती बिल देते. दोघ हॉटेलच्या बाहेर येतात. आणि तेवढ्यात मोबाईल वाजतो तिचा. ती बघते. त्याचा मेसेज आलेला असतो. उद्या शार्प  एक वाजता मी खराडी बायपासला येऊन थांबतोय. कंपनीची कार आहे सोबत सो. तू कुठे येणार मला सांग मी तिथे येईन.
अभिजित : थांबलीस का ?
शिवानी : त्याचा मेसेज आलाय. उद्या भेटतोय आम्ही.. किती दिवसांनी.
अभिजित : जाणार आहेस ना मग ?
शिवानी  : हो.
अभिजित : ( हलक्या मृदू आवाजात ) म्हणजे तू उद्या येणार नाहीस ना जॉबला ?
शिवानी : नाही बहुतेक परवा पण नाही. चल जाता. मी ड्रेस वैगरे बघते घरी जाऊन. कोणता घालायचा काय.

दोघ रिक्षा बघत रस्त्याने जात असतात.....


13
अभिजित : मग उद्या काय बोलणार त्याच्याशी ठरवल ?
शिवानी : आत्ता तर मेसेज आला ना त्याचा. ठरवल अस नाही पण मला माहित आहे. तो खूप बोलतो माझ्याशी आणि मला त्याच ऐकायला खूप आवडत. आख्खा दिवस जरी मी फक्त त्याच ऐकत बसले तरी मला बोर नाही होत. फक्त हैप्पी वाटत. खूप क्युट आहे तो.
अभिजित : आता भेटणार आहे तर मग त्याला बोलून टाक तुझ्या मनात.
शिवानी : हो. पण त्याने विषय काढला तरच मी बोलणार.
अभिजित : हा पण उशीर करू नकोस.
शिवानी : नाही. आधीच खूप उशीर झालाय.
अभिजित : हो. तुला पण मला पण.
शिवानी : काय ?
अभिजित : नाही म्हणजे घरी जायला उशीर.
शिवानी : हा.
अभिजित : झालाय ना. म्हणून म्हंटल.
एक रिक्षा समोरून येत होती. अभिजितने हात दाखवला आणि रिक्षा जवळ येऊन थांबली. दोघे आत बसले.
शिवानी : तुझा मूड ठीक व्हावा म्हणून मी तुला इथ घेऊन आले पण तू अजून नाराज आहेस. काय झाल ?
अभिजित : काही नाही. ऐक कि.
शिवानी : काय ?
अभिजित : पहिल तुला सोडतो आणि मग मी जातो.
शिवानी : अरे आधी तुझी रूम येते ना. रोडवर आहे मला आत गल्लीत जाव लागत. तू जा पहिला मग मी जाईन. असुदे रे. मी जाईन.
अभिजित : नको उशीर झालाय लोक चांगली नसतात. मी सोडतो म्हंटल ना.
रिक्षावाला : अहो सोडतो व्यवस्थित दारापर्यंत त्यांना.
शिवानी : बघ हे आहेत कि चांगले. सोडतील मला जा तू पहिला.
अभिजित : सगळेच चांगले असतात. माहितीय मला. पण माझ्या डोळ्यादेखत गेलीस तर बर वाटेल.
शिवानी : ऐकत नाहीस जरा सुध्दा.
शिवानीच्या दारात रिक्षा थांबली. शिवानी मागून अभिजित पण उतरला आणि त्याने रिक्षावाल्याला पैसे दिले.
शिवानी : हे काय इथ का सोडली रिक्षा. काका एक मिनिट थांबा.
अभिजित : येतो कि सोडायला वर.
शिवानी : का ? माहितीय माझी मला रूम. जाते मी. तू जा अभिजित.
अभिजित : काका तुम्ही जा. मी जातो जवळच आहे घर.
रिक्षा निघून गेली.
शिवानी : जाऊ ?
अभिजित : हो.
शिवानी : नीट जा. पोचला कि कॉल कर.
अभिजित : हो करतो.
शिवानी मागे फिरली आणि चालत निघाली पाच सहा पावल चालली आणि माग वळून बघितल. अभिजित तिला बघतच होता. शिवानी पुन्हा माघारी वळून अभिजित जवळ आली.
शिवानी : काय झाल ?
अभिजित : काहीच नाही.
शिवानी : जाऊ वाटत नाहीये का ?
अभिजित : हो.
शिवानी : वर बोलावल असत तुला पण रुममेट असते. तिला नाही आवडणार.
अभिजित : असू दे तू जा. नीट. काळजी घे.
शिवानी : मी जाईन पण तू इथ कितीवेळ थांबणारेस ?
अभिजित : तू आत पोचेपर्यंत.
शिवानी : बर. जाते मी. बाय.
अभिजित : बाय.
शिवानी त्याला हातात हात देते. आणि अभिजितचा हात गरम लागतो. शिवानी हात सोडवून निघून जाते. तिची रूम खालच्याच मजल्यावर असते. त्यामुळे अभिजितला ती जाताना दिसत असते. शिवानी दाराजवळ जाऊन मागे वळून बघते. आणि अभिजितला इशाऱ्यानेच खुणावते. बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम आला असेल या विचारात अभिजित तिच्या जवळ गेला.
अभिजित : काय झाल ? मैत्रीण बाहेर गेली का ?
शिवानी : हो.
अभिजित : मग आता चावी ?
शिवानी : आहे कि.
अभिजित : मग काय झाल ?
शिवानी : काही नाही आज थांबशील सोबत ?
अभिजित : तुला चालेल का ?
शिवानी : हो.
तिने दरवाजा उघडला. आत दोघ गेले. ती आत जाऊन कपडे बदलून बाहेर येते. अभिजित खिडकीतून बाहेर बघत असतो. शिवानी हळूच त्याच्या जवळ उभी राहते आणि,
शिवानी : अभिजित..
अभिजित खूप जोरात दचकतो.
शिवानी : अरे काय झाल ? नुस्त तुझ नाव घेतल मी.
अभिजित : नाही. जरा ते विचारात होतो आणि एकदम आवाज आला.

शिवानी त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत असते. आणि काहीतरी जादू व्हावी तशी तिची नजर त्याच्या नजरेत नजर कैद झाली. दोघांतल अंतर कमी झाल. अभिजित तिच्या पाठीवर दोन्ही हात ठेवून तिला जवळ ओढतो. शिवानी इतर मुलींसारखच लाजेने डोळे मिटते. अभिजित तिला जवळ ओढतो. आणि तिचे श्वास जड होतात. त्याचे जोरात वाढतात. सगळी ताकद त्याच्या खांद्यात उतरलेली. आणि त्याच ताकदीने त्याने तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर कीस केला. एकोणवीस-वीस सेकंद ते सुरु होत. आणि शिवानीला जाग आली. ती मागे सरकली. आणि आत निघून गेली. बेडवर जाऊन पालथी झोपली. तिने काही ठरवल नव्हत पण तिला रडायला यायला लागल. ती रडत होती. अभिजित तिथे आला. तिने घातलेल्या त्या वरच्या कपड्यातून तिची कंबर आणि थोड पोट दिसत होत. अभिजित तिच्या बेडजवळ गेला. आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला. शिवानीने डोळे मिटले. आणि अभिजित जमिनीवर गुडघे टेकवून तिच्या कंबरेवर हाताने घट्ट पकडतो. आणि तिथे कीस करायला लागतो. शिवानी त्याच्या डोक्याला हाताने बाजूला ढकलत आणि केसांना ओढत होती पण अभिजित बाजूला सरत नव्हता. आणि शिवानीला सुध्दा राहवत नव्हत. पालथी झोपलेली शिवानी आता कशीतरी बाजूला होऊन तिने वर तोंड केल आणि अभिजितला स्वतःजवळ ओढून घेतल. 


14
अभिजित : एक विचारायचं होत.
शिवानी : काय ?
अभिजित : तुला तो मुलगा आवडतो का ?
शिवानी : हो खूप.
अभिजित तिच्यावरून बाजूला झाला. शिवानीसुध्दा उठून बसली.
शिवानी : काय झाल ?
अभिजित : मी चुकीच केल.
शिवानी : काय ?
अभिजित : अग आत्ता जे झाल ते म्हणजे करतोय ते.
शिवानी : अरे अस काही नाही.
अभिजित : मला तू आवडतीस. म्हणजे ते प्रेम आहे का काय माहित नाही मला पण इतक्या दिवसात मला तुझी खूप सवय लागलीय. आणि मला नाही राहवत आता तुझ्याशिवाय. आणि आत्ता राहवल नाही म्हणून मी तुझ्याजवळ आलो. पण... तुझ्यावर माझा हक्क नाही. त्याचा आहे.
शिवानी : अभिजित..
अभिजित : शिवानी..
शिवानी : काय ?
अभिजित : सॉरी. परत नाही मी भेटणार तुला आणि नाही तुमच्यामध्ये येणार.
शिवानी : अरे ऐक कि.
अभिजित उठून बाहेर गेला. दार उघडल आणि निघून गेला. शिवानी मागून लगेच ड्रेस नीट करून दारापर्यंत गेली. अभिजित नव्हता. तिने त्याला कॉल लावला तो उचलत नव्हता. त्याचा राग शांत होऊदे उद्या त्याला समजवता या विचारात शिवानी आत आली.
दुसऱ्या दिवशी...
शिवानी त्या मुलाला भेटली. त्यांच्यात बोलन झाल. भांडण झाल. कारण त्याने एका मुलीशी रिलेशन ठेवल होत. दोघ दीड वर्ष एकत्र होते. पण त्यात ती प्रेग्नेंट राहिली. आणि तिने त्याला लग्नाला मागणी घातली आणि नाईलाजाने त्याने तिच्याशी लग्न केल. आणि तेच त्याने तिला सांगितल. हे ऐकून शिवानी आतून तुटली. रडली आणि तिने त्याच्यासोबत भांडणसुध्दा केल. आणि ती तिथून निघून ऑफिसवर आली. सुटायची वेळ झाली होती. शिवानी रोजच्या चहाच्या गाड्यापाशी थांबली अभिजितची वाट बघत. अर्धातास झाला पण अभिजित आला नाही. तिने त्याला कॉल लावला. मोबाईल बंद लागत होता.
तिला काय कराव समजत नव्हत. ती त्याच्या रूमकडे निघाली. दाराला कुलूप होत. आता अभिजितला कुठ शोधायचं म्हणून ती तिच्या घरी गेली. संध्याकाळी बहुतेक आठ वाजले असतील. त्या मुलाच ऐकून सगळ शिवानी आधीच दुःखात होती. आणि तिला मेसेज आला.
अभिजित : मी खूप चुकीच वागलो. तुला त्रास झाला असेल माझा. उद्यापासून नाही मी बोलणार तुझ्याशी. आणि चहा पण नाही घेणार सोबत. हा पण एक सांगू ?
शिवानी : काय ?
अभिजित : तुला माझी मैत्री आवडेल का ?
शिवानी : हो का नाही ? पण अस का बोलतोयस तू ?
अभिजित : बाय.
दुसऱ्यादिवशी..
ती त्याला भेटते. त्याच्यासोबत चहा पण पिते. पण रोजच्यासारखा तो वाटत नव्हता.
चहा पिताना.
शिवानी : माझ्या सोबत असण्याने तू खुश असायचा आता नाही ठीक वाटत मी नाही भेटणार तुला आता. भेटेन ते आता फक्त तुझ्या बर्थ-डे ला.
अभिजित : जातो. काम राहीलय.
त्या वेळापासून दोघांच्यात जास्त बोलन झालच नाही. आणि नंतर तर अभिजितने दुसरीकडे लांब घर घेतल. राज गोव्याला गेला. आणि आता टू- बी.एच.के. मध्ये तो एकटाच राहायला लागला.
त्यानंतर नशिबाचे पण खेळ बघा ना दोघांची कामाची वेळ बदलली. तिला सकाळीच आणि त्याला संध्याकाळीची वेळ मिळाली.

दोन महिने असच सगळ चालू असताना दोघांच्यात बोलन हे नव्हतच. आणि अचानक आज शिवनीचा त्याला कॉल आला. 


समाप्त....

इथून पुढचे भाग वाचायला कुणीतरी हि कथा वाचा.
( कथा पूर्णतः काल्पनिक आहे. तसेच यातील प्रसंग, संवाद, किंवा पूर्ण कथा लेखकाच्या मालकीची आहे. तरी लेखकच्या मर्जीविना काहीही शेअर करू नये तो कायद्याने गुन्हा ठरेल )
     
  

9 टिप्पण्या