कुणाची तरी मला गरज आहे.

love. phylosophy pexels.com blogger.com writholic.com facebook post ajinkya arun bhosale.

माणूस जेव्हा स्वतःतून मरायला लागतो, तो प्रेम करायला लागतो. एकटेपणा त्याला भीतीदायक वाटत. आणि मग लागते गरज कुणातरी सोबतीची. जो सोबत राहील. काळजी घेईल. समजून घेईल. आणि जगण्याला काहीतरी कारण देईल म्हणून माणूस प्रेम करतो. त्या प्रेमाला पहिलं भावनिक स्वरूप असत आणि नंतर भावना मरून त्याजागी येते वासना. ज्या प्रेमात वासना नाही ते प्रेम खर नाही. अस समजणारे आणि असा समज करून घेणारे कोणत्या खोट्या जगात वावरत असतात त्या जगाचा मला शोध अजून लागलेला नाही. प्रेमाला आपलस करत त्याला चितारत मग प्रेमाची स्वप्न रंगवून त्याला कित्येक दिवस त्यात जगणारा माणूस कधीतरी विरहाच्या हि जगात जगून जातो. जिथे त्याला कुणाशिवाय हि जगता येत. 
click | रावण : हा ताज घालायच्या लायक आहे
माणूस तसा खोटारडाच त्याला सगळ काही जमत असत. पण तरी हि अंग गळाटून बसून प्रेमाचे किस्से सांगत किंवा मग आठवणीत रडून दिवस तो जगत असतो. त्यात कुणी येतो कुणी जातो. सोबत कुणी असत कुणी नसत. काही काही त्याला समजत नसत. अस काही, नाही. समजत-दिसत-सगळ असत पण कुठल्यातरी नाटकाच्या व्यक्तीरेखेत तो असा काही हरवून जातो. आणि विसरून जातो कि आयुष्य जगायचं त्याच राहून जात आहे. नाटक करून काय मिळत ? आनंद ? पण त्याने आनंद मिळून नुसता आयुष्य जगता येत नाही ना. पण तरी प्रत्येकजण हे नाटक करत राहतो. गरज म्हणून प्रेम करताना नंतर प्रेमाला इच्छा म्हणू लागतो. इच्छा आवड बनते. आणि आवड हि कधी तरी संपून जाते. हा निसर्ग नियम आहे. आणि प्रत्येक माणूस हेच करतो. मला काही नको बस सोबत हवी अस म्हणून प्रेम करायला लागतो. मग सहवास मिळत गेला कि शरीरसुखाच्या मोहात पडतो. ते एकदा मिळाल कि मग मोह अनावर करून टाकतो. मग सतत सतत त्या शरीरसुखाने प्रेमाची आवड कमी कमी व्हायला लागतो. मग संपत जातो संवाद आणि पहिली मनात असलेली गरज. उरत काहीच नाही. मग त्रास होतो आणि त्रास कुणाला हवा असतो ? आणि म्हणून मग एकमेकांच्या अगदी जवळ येणाच्या प्रयत्नातले हे माणूस एकमेकांपासून लांब व्हायची कारण शोधायला लागतात. आणि अखेर लांब होतात. काय मिळत लांब होऊन ? एकटेपणा. बस इतकच. आणि एकटेपणा माणसाला पुन्हा मनात भीती निर्माण करते. त्या भीतीला मिटवायला पुन्हा कुणाची तरी गरज लागते. आणि.....  

0 टिप्पण्या