मान्य आहे पण...


तुझं निघून जाण मान्य आहे. प्रेम घेऊन प्रेम देणं मान्य आहे. तू माझं प्रेम नेऊन तुझं प्रेम मागे सोडलंस आठवणींच्या रुपात हे मी मान्य का करावं ? येते आठवण सारखी तुझी. होते आठवण आपल्यातल्या प्रेमाची. डोळ्यात पाणी साचत. छातीचे ठोके मंद होतात. आवंढा घशातला धडवर येत नाही का खाली सरकत नाही. श्वास घेतला तर सोडायच लक्षात राहत नाही. हाताचे तळवे थंड पडतात. पायाचे तळवे घामाने भिजतात. पूर्ण छाती पोट गरम पडत. मान आणि कानाची पाळी कुणी फुंकर मारावी असे थंड पडतात. डोक्यातले विचार......... ते काय असतात ? डोकं पूर्ण शांत असत. मन तुझं नाव घेत असत. किती काही केलं आठवलं तरी तू जवळ-समोर नसतेस. त्रास होत असतो. त्रास होतो. तुला मी माझं नाही म्हणतो. मन आणि आठवणी ते मान्य करत नाहीत. मनात अजून तूच आहेस. आठवणी सगळ्या तुझ्याच आहेत. मग तू माझी का नाहीस ? त्यांचं ही बरोबर आहे. बर.....मान्य केलं तू माझी आहेस अजून ही. पण मी तुझा नाही.
तुझ्या मोबाईलमधल्या साध्या मेसेजच्या यादीत पहिल्या वीस मध्ये माझं नाव देखील नाही. माझा नंबर सेव्ह होता तो आता सेव्ह नाही. तुला एकट वाटलं बोलू वाटलं तर तुझ्यासाठी उपलब्ध लोकांत माझं नाव शेवटी देखील तुला सुचत नाही. दिवस रात्र माझा तू आहेस. तू मात्र सूर्य चन्द्र घेऊन डोक्यावर पहाट, सकाळ,दुपार,संध्याकाळ,रात्र जगतेस. इतका परका झालोय मी तुझ्यासाठी की, कुठे माझी फेसबुकवर पोस्ट दिसली तर तू तुझं बोट मोबाईलच्या स्क्रीन वर टेकवतेस आणि माझ्या पोस्टच्या खालची कुणाचीतरी पोस्ट तू लाईक करतेस. असो, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू माझ्यावर केलं होतंस. माझं उरलं तुझं संपल. हे ही मला मान्य आहे पण......


 गुगलवर writholic  सर्च करून रेटिंग द्या. आणि गिफ्ट्स मिळवा किंवा मिळवा 200 रुपयांपर्यंत गुगल पे कॅश..........
*T&c

0 टिप्पण्या