विचार स्वतःचा.
एकटा असतो असा कधी तेव्हा जाणीव होते मी जिवंत असण्याची. खरच. म्हणजे रोजच्या या धकाधकीच्या आणि सोशल झालेल्या आयुष्यात आपण विसरूनच जातो कि आपण जिवंत आहोत का मृत. ना आपल्या श्वासांकडे आपल लक्ष असत ना आपल्या शरीरात होणाऱ्या बदलाकडे आपल लक्ष असत. वर वरच्या म्हणजे ज्या भागांना आपले कपडे झाकू शकत नाही म्हणजे मान हात गळा चेहरा यांकडे आपण लक्ष देतो. म्हणजे चेहरा पिंपल फ्री असावा. गोरा असावा. हाताला टॅनिंग नसाव. केसांना एक वेगळा आकार असावा. त्याला चमकता सोनेरी पिवळा लाल रंग चुकून सांडल्यासारखा किंवा सबंध एक बटच रंगीत करायचं एवढ्यातच माणूस लक्ष देतो. पण शरीर आपल हे उघड राहणार मान,गळा,हात,चेहरा एवढ्याच अवयवाच नाही. आणि कपड्या आत लपलेल्या शरीरासोबत शरीराच्या आतल्या मनाच काय ? त्याच्याकड कोण देत का लक्ष ?
माणूस भले आजकाल म्हणो, मी माझ्या मनाच ऐकतो. मन माझ कुणी तोडल, कुणाच मी मन जपलं नुसत्या या बाता आहेत. पण हे जग आणि या जगातली सर्व लोकं हि मनाच ऐकून नाही तर मेंदूच्या निर्देशान कार्यरत असतात. मग यात मनाचा हिस्सा तो काय ? काय माहित ? जग हे नालायक आहे. सगळे मलाच फसवतात. माझ्या आयुष्यात येऊन माझ्या मनात त्यांच्याबद्दल चांगुलपणा भिणवून अशी काही मनात बसतात , कि आधी अनुभव आलेला असताना हि माझ मन त्यांच्यावर विश्वास ठेवत आणि नंतर काय करतात ती लोक तर काम झाल कि , स्वार्थ साधून झाला कि निघुन जातात. पुन्हा ओळख हि देत नाही. मान्य आहे जग नालायक आहे. आणि हे हि माहित आहे कि त्या जगाचा मीही एक नालायक हिस्सा आहे.
मी हि दिलाच असेल ना कळत-नकळत कुणाला त्रास. बघितला असेलच ना मी हि कधी तरी स्वार्थ ? हे विसरून जातो कसा मी ? बर मग जगात माणुसकी नावाची चीज नाहीच का ? लोक चांगली नाहीच का ? असे प्रश्न हि पडतात मला. पण उत्तर सरळ आहे. माणुसकी पोसली जाते विश्वासावर ,विश्वासावर आज एक रुपया दिलेला भिकाऱ्याला दान ते देवाला दिलेल्या दानपेटीत दहा रुपायांपासून ते अगदी लाखो करोडोंची व्यावसायिक करार होतात. कशाच्या जोरावर ? विश्वास असतो म्हणून. आणि विश्वास ठेवण आणि दाखवण हि माणूस असण्याची चिन्ह आहेत. आणि जर का इतक सगळ विश्वासावर होत असेल तर मग माणुसकी संपेल कशी ? आणि माणुसकी संपली असेल तर पाचशे करोड लोकसंख्येची पृथ्वी आत्ता साडे सातशे करोड लोकसंख्येची झालीच कशी ? हा पण विचार करण्याचा भाग आहे न ? मग मी माझ्या मनाला सावरून पुन्हा वर्तमानात येतो आणि अस वाटत. नाही आयुष्य आपण आपल जगायचं कुणाचा विचार न करता. कुणाच बोलण मनावर नाही घ्यायचं. कुणी आपल्याला गोड बोलून फसवल तर आपण मात्र त्याला नाही फसवायचं. देव आहे तो घेईल बघून. कलियुग आहे सगळ्यांना इथच फेडून जाव लागत. कुणी नाही सुटत यातून. असा वेडा समज करून घेतो मी. आणि कामाला लागतो माझ्या आणि भेटतात रोजच्यासारखी कोणी न कोणी नालायक लोक त्रास देणारी. आणि पुन्हा मी त्यांच्या नावाने खडे फोडतो. आणि एका माणसाच्या बदल्यात त्या साडे सातशे करोड लोकांना दोष देतो आणि म्हणतो जगच नालायक आहे हे. पण हे वाक्य मी बोलतो पण ते ऐकायला कुणाला जात नाही पहिलं मलाच ऐकू येत म्हणजे काय तर त्या नालायक जगाचा पहिला नालायक मीच असावा. बरोबर न ?


लेखक : अजिंक्य अरुण भोसले.

1 टिप्पण्या