बायकोसाठी पत्र01

प्रिय
****
तुझ्याकडच्या प्रत्येक गोष्टीना मी माझ मानून जगून घेऊन हा असा इथे उभा आहे. तू नसशील तर मी कघीच नाही. आणि तू आहेस तर माझ्यासारखा कुणीच नशीबवानया जगात इतका नशीबवान नाही. तुझ्यावर प्रेम करून मी हा असा झालोय कि बघणारे मला ओळखत नाहीत. इतका हा बदल तुझ्यामुइळे घडला. तू आयुष्यात आलीस आणि मला स्वप्न दिलीस. उमेद दिलीस. अपेक्षा, इच्छा सगळ सगळ दिलस. मला मिठीत घेऊन तुझ अगदी सहज होऊ दिलस. तुझ्या ओठांची चव मी माझ्या चवीच्या बुद्धीत अगदी बाजूलाच डोक्यात जपून ठेवलीय. तुझ्या प्रत्येक अंगाच्या आकाराला मी माझ्या बोटांनी मोजून अस काही ठेवल आहे कि जरा हि त्या मापात कधीच गफलत होणार नाही. प्रत्येक वेळ मिनिट, तास, सेकंद असा काही जगलोय कि या तेवीस वर्षात मी एक मिनिट हि असा जगलो नव्हतो. या चोवीस वर्षाचं सगळ सगळ जीण मी तेव्हा तुझ्यासोबत जगून घेतल.
तुझ्या नजरेतला मी, मी असा पहिल्यांदाच पहिला होता. जस तू मला बघतेस तसाच मी आहे. याची खात्री वाटली आणि तूच फक्त मला समजू शकतेस हि माझी खात्री पटली. खात्री पटणार होणारच होती तो पर्यंत ती पक्की झाली. जेव्हा तू माझ्या समोर सिंदूर घेऊन आलीस. म्हणायला तो पोर खेळ. म्हणायला तो धर्म. आणि वाटल तर नात्याची सुरुवात एक नव्या. तुझ्या भांगेत सिंदूर भरून मी तुझा नवरा झालो. तू माझी बायको.
स्वतः मधला माझ्या स्व, संपला. आता जे काही तुझ्यासाठी. असा तसा विचार करून मी तुझा होत गेलो. तू माझी होत गेलीस. उरल काय ? काहीच नाही. झाल ते फक्त प्रेम, जे तुझ्या माझ्या शिवाय कुणाला माहित नाही. चंद्राने आता त्याच येण-जाण सोडून द्याव. सूर्याने लवकर उठायचे कष्ट घेऊ नयेत. बस जाणारा हा वेळ कुठेतरी या दिवस आणि रात्रीच्या प्रवासात थांबावा. आणि मी ? तुझ्या आठवणीत इथे रमून जाव. इतकच वाटत मला. बाकी तू मला आवडतेस. जगातली सर्वात सुंदर बायको आहेस माझी तू. पत्र वाचल कि एक मला मेसेज कर. वाट बघतोय.
तुझाच.
*****

02
प्रिय
बायको,

तुझ्याबद्दल काही लिहावं म्हंटल तर उगीच तो प्रेमाचा दिखावा वाटायचा. पण कस आहे ना जे आहे ते आहे. बोलून मोकळं झालं की कस मनाला बर वाटत. तुझ्या सौंदर्याची तारीफ मी अशी ना तशी सतत रोज करतच असतो. तू मेकअप करु नकोस मी नुसतं तुझी तारीफ करू दे बघ तुझा चेहरा असा काही खुलतो की बस.... बघत बसावंस वाटत. बंद खोलीतला प्रकाश ही कमी पुसट आहे इतकी तू गोरीपान आहेस. चंद्र काय ग देतो प्रकाश पृथ्वीला पण ते त्याला रोज रोज जमत का ? जातोच ना अमावस्येच करण देऊन . आणि असतो तेव्हा तरी काय दिवा लावतो तो ? तोंडभर खड्डे त्याच्या आणि तुझ्या चेहऱ्यावर एक पिंपलसुद्धा नाही. इतकी तू सुंदर आहेस.गवताने नाजूक असून उपयोग काय कोरड्या बोटांनी पकडल त्यांना तर गवताची पात खरखरते बोटाला. पण तुझ्या गालावरून हात फिरवताना बोट गालावरून कधी छातीपर्यंत घसरत येतात समजत नाही मला. बोटांनी बोटांचा स्पर्श केलाय का कधी कुणी ? नसेलच माहिती आहे मला. अगदी असाच नाजूक बोटांसारखा स्पर्श मला तुझ्या इवल्याश्या नाकावर बोट फिरवताना होतो. गुलाब काय ते दुकानात दहाला विकत मिळत. निम्मं सुकलेला निम्मं चकमक टाकून भिजवलेला. तरी त्याचा तजेला जरा ही दिसत नाही. तुझे ओठ अगदी गुंडाळलेल्या गुलाब पाकळ्या त्यांना लिपस्टिकची पण गरज नाही. तू खूप सुंदर आहेस बायको, इतकी की, त्या मोठ्या ओढ्यापाशी म्हातारीच्या केसांचं एक झाड येत. मोठी शेंग असते त्यात शेकडो एक बी ला चिटकलेली काल्पनिक पांढरी म्हातारीची केस
असतात. त्यांना हातात काय चिमटीत पकडली तरी बी पासून मोकळी होतात ते काल्पनिक केस. इतका नाजूकपणा त्यांचा पण तरी तुझे केस मला त्याहुन नाजूक वाटतात. करण मी त्या केसांत हात फिरवला की ते कधी त्या केसातून मोकळे होतात समजतच नाही. इतकी मऊ इतके मुलायम. आरश्याने प्रतिबिंब दाखवावं आणि तेही अगदी खोट दाखवावं. काय असत त्याच्यात इतकं ? आहे तस दाखवण यात कसली आली खुबी ? त्यापेक्षा तुझे डोळे बघ क्षणात मनातलं सगळं सांगून टाकतात. जमत का आरशाला मनातलं दाखवायला ? या अशा कित्येक गोष्टी वस्तूंचा दाखला दिला तरी तुझ रूप कमी होणार नाही. किती मुली माझ्या आसपास आल्या तरी मी त्यांना भुलणार नाही. तुझ्या वरच माझं प्रेम ही कधी कमी होणार नाही. एवढंच सांगेन तुझ्या सारख या जगात कुणीच नाही. असेल तर ती मला माहित नाही.
तुझाच
****

0 टिप्पण्या