प्रेमाची शप्पथ आहे तुला : पर्व ३ रे


भाग १
आज व्हॅलेंटाइन डे. हे डे-दिवस लग्नाआधी गुलाबी-गुलाबी वाटतात आणि लग्नानंतर गुलाबीचे तपकिरी कधी होतात समजतच नाही. अजिंक्य बेडवर झोपलेला आहे. प्रतीक्षा तिच  स्वतःच आवरत आहे. अजिंक्यच्या हातावर डोकं ठेवून आणि त्याच्या छातीशी गुडघे रोवून सारा झोपलीय. घरात शांतता आहे. आणि मोबाईल व्हाइब्रेट झाला. अजिंक्यच्या बरोबर कानाखालीच मोबाईल होता. कानाला कसंतरी झालं. रात्री ठेवलेला उशाखालून मोबाईल वर कधी कानाखाली आला कुणास ठाऊक. त्याने मोबाईल कानाखालून काढून हातात पकडला आणि बारीक डोळे करून बघितलं काय आलय ते. नाव होत "प्रियांका". अजिंक्यने मोबाईलची स्क्रीन बंद केली आणि आपले डोळे पण मिटले. साराच्या गालावर ओठ टेकवून तिला जवळ घेतलं. आणि पटकन त्याने डोळे उघडले. मोबाईल पुन्हा हातात घेतला आणि प्रियांकाचा मेसेज वाचला तो हि झोपेत. झोपेत होता तो आत्ता मगाशी पण आता नाही. आता त्याची झोप मोडली. उडाली. तो मांडी घालूनच बसला बेडवर. तो मेसेज वाचयला लागला.
" अजिंक्य , आपलं प्रेम होत एकमेकांवर अव्यक्त. व्यक्त झालेलं पण कायमस्वरूपी अस नाही. तू गुंतलास प्रतिक्षात आणि मीही दुसऱ्यात. पण तरीही कधी कधी तुझी आठवण येते मला. त्यात आज व्हॅलेंटाइन डे. तू मला एका दुकानात घेऊन गेला होता व्हॅलेंटाइनला. आणि चिनी लव्ह डॉल्स मला घेऊन दिल्यास आपल्या प्रेमाच प्रतीक म्हणून. तुझं माझं प्रेम किती टिकेल अस विचारल होत मी तुला. तू म्हणालास , जोवर तुला माझ्यावर खर प्रेम होत नाही. मला तुझ्यावर प्रेम व्हायला सुरुवात झालेली आणि तुझ्या आयुष्यात असावरी आणि अंजली दोघी आल्या. असावरी सोबतच तुझं मला काहीच माहित नाही पण अंजलीने तुमच्या मधलं सगळं मला सांगितलं. परवा अंजली भेटली मला. तू तिच्यावर अजून प्रेम करतोस. तिला प्रेम देतोयस. मग प्रतिक्षाच काय ?  अंजली, असावरी, मी, प्रतीक्षा किती जणींसोबत तू अस प्रेम केलंस आणि करतोस ? आणि मला सांग का करतोस ? आणि अजून एक सांग मला अजिंक्य, तू माझ्यावर अजूनहि प्रेम करतोस ??"

प्रेमाची शप्पथ आहे तुला मराठी गाणे | ऐकण्यासाठी क्लिक करा

मेसेज संपला. मेसेजला उत्तर काय पाठवाव अजिंक्यला काहीच कळत नव्हतं. त्याने मोकळाच मेसेज पाठवला. परत तिचा मेसेज आला, "सांग ना"... अजिंक्यने पाठवल "माहित नाही".... अजिंक्य साराच्या अंगावर पांघरून टाकत असतो. पुन्हा प्रियांकाचा मेसेज येतो. "तीस जूनच्या दिवशी संध्याकाळी साडेनऊ वाजता तुझ्या पहिल्या घराच्या टेरेसवर ढगातून अर्धवट दिसणाऱ्या चंद्राकडे बघत मी तुला जवळ घेतलं माझ्यावर. तू आणि मी होतो फक्त तिथं प्रेम मात्र नव्हतं. माझं तरी. पण तुझं जाणवत होत. त्या रात्री झालेल्या आपल्यातल्या त्या गोष्टीने नंतर मला हि तुझ्याबद्दल माझ्या मनात प्रेम जाणवायला लागलं."
अजिंक्यने मेसेज वाचून लगेच मेसेज लिहायला सुरुवात केली, " मी नीट आहे. मला प्रतीक्षा मिळाली आहे. आमचं लग्न झालंय. आणि आता भूतकाळ उगाळून काय निष्पन्न होणारे त्यातून ? तू कुठे आहेस सध्या मला माहित नाही पण मी आहे तिथे आहे. राहिला विषय असावरीचा तो विषय केव्हाच संपला. आणि अंजली......त्याबद्दल बोलायला नको. प्रतीक्षा आणि मी सुखात आहे . मला काय बोलायचंय तुला कळत असेल. हॅप्पी व्हॅलेंटाइन डे पिया". मेसेज पाठवला गेला तिकडे आणि इकडे प्रतीक्षा आत आली. पूर्ण ओली केस एकबाजूला करून टॉवेलने पुसत ती उभी राहिलेली. अजिंक्य उठून तिच्या जवळ गेला. दोघ एकमेकांना एकटक बघतायत. दोघांच्या डोळ्यांपुढे अंधार यायला लागला. दोघांचे डोळे मिटलेले आणि ओठ हि एकमेकांत मिटले गेले. अजिंक्य तिच्या त्या ओल्या केसांत हात फिरवत तिच्या केसांचा वास घेतो आणि आत आवरायला बाथरूम मध्ये जातो.
इकडे मोबाईलवर  मेसेज आला. "अजिंक्य.... अय लव्ह यु". प्रतीक्षाने तो मेसेज वाचला. परत एक मेसेज आला. "मी तुझ्या या उत्तराची वाट बघतीय." प्रतिक्षने एकदा मागे वळून बघितलं अजिंक्य नव्हता तिने ते दोन्ही मेसेज डिलिट केले. आणि मोबाईल बंद करून पुन्हा बेडवर ठेवला. आणि साराला झोपेतून उठवलं. साराला हातात छोटासा ब्रश आणि लाल पेस्ट लावून दिली. प्रतीक्षा पोहे बनवत होती. अजिंक्यच आवरून झालं. तो पोह्यांच्या वासाने किचनमध्ये जाऊन पोचला. खुर्चीवर बसून तो पाठमोऱ्या प्रतिक्षाला बघत होता. प्रतीक्षा पोह्यांची डिश घेऊन आली. अजिंक्यपुढे टेबलावर ती डिश ठेवत असताना प्रतिक्षाने त्याच्याकडे बघितलं नाही. अजिंक्यला ते जाणवलं पण भूक लागली म्हणून त्याने एक घास  चमच्याने उचलून तोंडात ठेवला.
प्रतीक्षा : प्रेम कुणावर आहे तुझं माझ्यावर का प्रियांकावर ?
भाग २
अजिंक्य प्रतिक्षाकडेच बघत असतो आणि प्रतीक्षा आता मागे वळून त्याच्यासमोर येऊन बसते.
प्रतीक्षा : तुला मी हवी होते. मिळाले. आणि आता माझ्या पोटात बाळ वाढतय आपलं. प्रेम आहे ते आपल्या दोघांचं. आणि मला वाटत तू देत असलेल्या प्रेमात मला दुसऱ्या कुणाचाच हिस्सा नकोय. प्रियांकाच नाव मी या आधी पण तुझ्या चॉकलेटी रंगाच्या डायरीतल्या कवितेत वाचलं होत. पण मी विसरून गेले. कारण त्यातल्या एक हजार सातशे तीस कविता माझ्यासाठी लिहिलेल्या होत्या. आणि एकच फक्त तिच्यानावे. कवितेपुरती चालेल मला ती पण खऱ्या आयुष्यात नको. अजिंक्य..... मी खुप प्रेम करते तुझ्यावर. आणि मला हि तुझं तितकंच नाही त्याहून जास्त तुझं प्रेम हवंय. मी जगतीय ते तुझ्यामुळ. तू मला आधार दिलास प्रेम दिलंस रहायला घर आणि हक्कच नात बनवलस. आता या सगळ्यात तू मला एकट वाटेल अस वागू नकोस. सहन नाही होणार मला. आणि ते आत्ताच्या या नऊ महिन्यात चांगलं नाही माझ्यासाठी तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी पण.....
अजिंक्य : तू सोडून गेलीस तेव्हा तिने मला साथ दिली. तेव्हा लिहिलेली ती कविता होती.
प्रतीक्षा : झालं तीच लग्न. तुझं सुद्धा. मग ते प्रेम आत्ता आठवण्यामागच कारण काय आहे.
अजिंक्य : मी तिचा झालो आहे.

प्रेमाची शप्पथ आहे तुला पर्व १ | वाचण्यासाठी क्लिक करा

प्रतीक्षा : ती आठवण झाली. शारीरिक प्रेम करेपर्यंतच प्रेम असत नंतर फक्त आठवण बनून राहत. आणि आठवण काढायची असते त्यात रमायच असत. त्या आठवणीला अस पुन्हा जिवंत करायचं नसत ना.
अजिंक्य : तीच माझ्यावर प्रेम आहे. माझं तुझ्यावर आहे.
प्रतीक्षा : अजिंक्य , भूतकाळ जेव्हा वर्तमानात डोकावतो तेव्हा वर्तमान तर बिथरतोच आपला पण भविष्यकाळाची हि वाट लाऊन जातो. मला वाटत तू तिच्याशी बोलू नकोस.
अजिंक्य : पण तस काही नाहीये.
प्रतीक्षा : तुझ्यासाठी मी सगळं काही आहे. आणि सगळं काही म्हंटल कि त्यात या अशा प्रियंका वैगरे कोण येत नाही. मी म्हणजे मी फक्त. तिच्यासारखं तिच्या वाटयाचं प्रेम काळजी मी देईन घेईन तुझी.
अजिंक्य : तुझा माझ्यावर विश्वास आहे ?
प्रतीक्षा : खूप आहे. आणि या विश्वासला तडा जाईल अस तू वागू नयेस इतकंच मला वाटत. अजिंक्य, मान्य आहे मी तुला गरज असताना चुकले तुझ्यावरच प्रेम मी दुसऱ्या कुणाला देत बसले. पण तू हा विचार कर, तेव्हा तुझ्या आजूबाजूला सगळे होते. ती स्थिती आणि आपली परिस्थिती अशी वेगळी होती. पण आत्ता अस नाहीये. आत्ता आपण नवरा बायको आहे. कॉलेज मधले दोन प्रेमी युगुल नाही. तेव्हा सुटलेली आपली साथ आपल्याला वाटलं आता नाही काहीच होणार. पण आत्ता......?  आत्ता आपण लग्न केलय  हि साथ आपली अशीच कायम राहणार आहे. आणि कुणाच्या आयुष्यात कुणी येण्याने आपली हि साथ कुठे ढिली पडायला नको.
अजिंक्य : मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. पण...
प्रतीक्षा : पण च्या पुढे मला काहीच ऐकायचं नाही. तू माझ्यावर प्रेम करतोस इतकंच बस मला. तुझ्यावर प्रेम करणारे खूप असतील माहित आहे मला. अजिंक्य मी जी जगतीय. हासतीय. तुझ्यामुळे. अमित माझ्या लक्षात आहे पण तो आता आठवत पण नाही जास्त. इतकं तू मला तुझं प्रेम दिलयस इतकं मला तू जपलंयस. आणि हि तुझी अशीच साथ मला कायम हवीय रे.
अजिंक्य : हे बघ प्रतीक्षा मी जो आहे तो तुझ्यामुळे आहे. तुझ्यासाठी आहे. प्रतीक्षा म्हंटल कि अजिंक्य आलाच. प्रतीक्षा शिवाय अजिंक्य..... या जन्मात तरी शक्य नाही.
प्रतीक्षा अजिंक्यचा टेबलावर असलेला डावा हात आपल्या उजव्या हातात पकडून त्याच्याकडे बघते.
प्रतीक्षा : आय लव्ह यु अजिंक्य....
अजिंक्य : माझं शेवटचं प्रेम तू आहेस प्रतीक्षा . पुन्हा होणार नाही आता कुणावर. मी आवरतो जरा बाहेर जायचय.
अजिंक्य उठून आतल्या खोलीत गेला. इकडे सारा प्रतिक्षाकडे अली. प्रतीक्षा पोह्यांच्या अर्धवट डीश उचलून कट्ट्यावर ठेवते. आणि सारासाठी गरम पाणी काढते. अजिंक्य शर्ट बदलून भांग पाडत असताना मोबाईल वाजला. त्याने मोबाईल हातात घेतला आणि त्यावर त्याला मेसेज दिसला. तो मेसेज होता अंजलीचा...

भाग ३
"आज व्हॅलेंटाइन डे. माझा व्हॅलेंटाइन तू आहेस अजिंक्य. तूला गरज असताना मी फार काही देऊ शकले नाही पण तू मात्र मला आयुष्यभरासाठीच सुख दिलंस. आज तुला बघायची इच्छा आहे खूप. काही नको बस एकदा तुझ्या मिठीत शांत व्हायचं आहे. तुला जमणार नाही पुण्याला यायला मला माहित आहे. पण तरी आपली भेट व्हावी इतकीच इच्छा. हॅप्पी व्हॅलेंटाइन डे अजिंक्य. लव्ह यु... खूप खूप सार."  अंजलीचा हा मेसेज वाचून अजिंक्यला पुन्हा तोच मगाशी पडला तो प्रश्न पडला उत्तर काय द्यावं ? त्याने "सेम टू यु" असा मेसेज पाठवला. आणि मोबाईल खिशात ठेवून तो बाहेरच्या खोलीत आला. प्रतिक्षाला जातो म्हणाला आणि सारा त्याच्या मागे आली. मला पण यायचंय बाहेर म्हणून हट्ट केला. प्रतिक्षाने तिला गोड बोलून जवळ घेतलं पण ती ऐकेना मग अजिंक्य तिला घेऊन बाहेर आला. अजिंक्यने बुलेट सुरु केली. आपल्या पुढ्यात साराला बसवलं. आणि तो निघून गेला.  प्रतिक्षाने दार लावल. प्रतीक्षा आता घरात एकटी होती. एरवी सुद्धा असायची. म्हणजे अगदी एकेक आठवडा पण ती एकटी असायची जेव्हा अजिंक्य मुंबईला शूटिंगमध्ये असायचा. पण आज तिला ते घर ती शांतता तो एकटपणा खात होता. तिला फिरून फिरून  प्रियांकाचा विचार येत होता. जरी अजिंक्यच आपल्यावरच प्रेम असलं तरी शेवटी त्याला तीच आकर्षण वाटलं आणि त्याने त्या नादात आपल्यावरच सारावरच प्रेम कमी केलं तर ? बायको म्हणून मी कुठेतरी कमी पडले असच सिद्ध होईल. अजिंक्य माझ्या आयुष्यातून गेला तर मग माझं कोण राहील ? प्रतिक्षाला काहीच कळत नव्हतं. एवढंच कळत होत. कि प्रियांकापासून अजिंक्यला लांब ठेवायचं. बस....
प्रेमाची शप्पथ आहे तुला पर्व 2 | वाचण्यासाठी क्लिक करा
तिने पटकन उठून आत जाऊन अजिंक्यची ती चॉकलेटी डायरी घेतली आणि त्यात काहीतरी शोधायला लागली. आणि त्यात तिला प्रियांकाचा नंबर सापडला. तिने तो नंबर घेऊन कॉल लावला. 'तुम्ही लावलेला क्रमांक पुन्हा नीट तपासून बघा' पुढून आवाज आला. अर्थातच तो जुना नंबर होता. प्रतीक्षा पुन्हा डायरी ठेवून बाहेर येऊन सोफ्यावर बसली. तिला तहान लागली पण या विचारांनी तिला उठून आत जाऊन पाणी प्यावं हे सुद्धा सुचेना. ती तशीच बसली. पोटाला हात लावून. आणि तेवढ्यात दार वाजलं. इकडे अजिंक्य आणि सारा एका आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम खात बसले. साराला आईस्क्रीमच चित्र दिसलं तिने गाडी थांबवायला सांगितली. अजिंक्यने बुलेट थांबवली. साराला आईस्क्रीम भरवताना त्याला कॉल आला. त्याने मोबाईल खिशाततून  काढला. पण कॉल कट झाला त्याच्याकडूनच. खिशाचा किनारा स्क्रीनवर टच झाला म्हणून कॉल कट झाला.सारा त्याला तेवढ्यात पुढचा घास मागते म्हणून अजिंक्य तसाच मोबाईल खिशात ठेवता आणि तिला घास भरवतो. तेवढ्यात एक माणूस येतो आणि अजिंक्य समोर खुर्चीवर बसतो. अजिंक्य साराला मांडीवर बसवतो. अजिंक्य आणि तो माणूस दोघ एका फिल्मबद्दल बोलत बसले. कॉल आला. पण त्याने उचलला नाही.
इकडे प्रतीक्षा जाऊन दार उघडते. दारात अंजली. प्रतीक्षा तिला बघून काय बोलावं या विचारात तशीच उभी होती.
अंजली : आत येऊ ?
प्रतीक्षा : ये ना. तू इकडे कशी ?
अंजली : इकडे साताऱ्याला आले होते म्हंटल अजिंक्यला भेटून जावं.
प्रतीक्षा : बस. काय घेणार चहा कॉफी का जेवणार ?
अंजली : थोडं पाणी दे.
प्रतीक्षा जाऊन पाणी आणते आणि तिला देते. पाणी पिऊन मोकळा ग्लास अंजली शेजारी टेबलावर ठेवते. आणि सहज अस नवीन घरात आल्यावर माणूस जस इकडं तिकडं बघत राहतो वर खाली तस बघत बसते. तिची ती नजर तोडत प्रतीक्षा बोलायला लागते.
प्रतीक्षा : नवरा कसा आहे.
अंजली : ठीक.
अंजली : अजिंक्य कसा आहे ?
प्रतीक्षा : आहे कि छान.
अंजली : छानच आहे तो.
प्रतीक्षा : तू इकडे ? म्हणजे साताऱ्यात कशी काय. मला बोलला होता अजिंक्य तू पुण्यात असतेस.
अंजली : अजिंक्यला भेटायला आले खास.
प्रतीक्षा : का ?
अंजली : भेटू वाटलं.
प्रतीक्षा : कोणत्या नात्याने भेटू वाटलं ?
अंजली : म्हणजे ?
प्रतीक्षा : भेटण्यामागच कारण काय ?
अंजली : त्याच्याशी बोलायचं होत.
प्रतीक्षा : नंबर असेल न त्याचा ?
अंजली : आहे. कॉल पण केलेला पण त्याने उचलला नाही म्हणून घरी आले.
प्रतीक्षा : ठीके. तो बाहेर गेलाय मीटिंगला दुपारी येईल.
अंजली : सारा कुठय ?
प्रतीक्षा : त्याच्यासोबतच आहे.
अंजली : खूप चांगली काळजी घेतोय कि तो तुझी आणि तिची. खूप लकी आहेस.
प्रतीक्षा  तीच ऐकत असतानाच कॉल लावते. आणि बोलू लागते.
प्रतीक्षा : कुठंयस ?
अजिंक्य : निघतोय एक पाच मिनिटात इकडून.
प्रतीक्षा : बर. नीट ये. अंजली आलीय.
अजिंक्य : कुठं ?
प्रतीक्षा : घरी.
कॉल कट केला प्रतिक्षाने.
अंजली : कधी येतोय ?
प्रतीक्षा दहा पंधरा मिनिटांनी येईल. दोघी टीव्ही बघायला लागल्या. प्रतिक्षाला राग येत होता अंजलीचा आणि अंजलीला प्रतीक्षाशी बोलायचं नव्हतं. त्यामुळे दोघी टीव्ही बघायला लागल्या.

भाग ४
प्रतीक्षा : एक विचारायचं आहे तुला.
अंजली : विचार ना.
प्रतीक्षा : पण जे सांगशील ते एकदम खर आणि जे काय ते आपल्या दोघीतच राहील. चालेल ?
अंजली : अस काय विचारणार आहेस ?
प्रतीक्षा : मी नसताना अजिंक्य सोबत किती मुली होत्या ?
अंजली : प्रियांका. असावरी.
प्रतीक्षा : आणि तू ?
अंजली : हा मीपण.
प्रतीक्षा : तू आणि अजिंक्य.... म्हणजे तुमच्या दोघांच्यात काही तसलं झालय का ?
अंजली शांतपणे प्रतीक्षाकडे बघते.
प्रतीक्षा : असेल तर हो बोल नसेल तर राहील.
अंजली : हो.
प्रतीक्षा : किती वेळा ???
अंजली : अजिंक्य तेव्हा खूप सिगरेट ओढायचा. कधी कधी प्यायचा पण तुझी आठवण यायची म्ह्णून. त्यातून बाहेर काढायला मी त्याच्याशी मैत्री केली. मैत्रीत कधी आमच्यात ते झाल एका रात्री कळाल नाही. आणि नंतर बर्याच वेळा.
प्रतीक्षा : होऊ न देता कस बर होईल.
अंजली : म्हणजे ?
प्रतीक्षा : तू करू दिलस म्हणूनच तर त्याने केल ना ?
अंजली : हो.
प्रतीक्षा : तुझ अजिंक्यवर प्रेम होत ?
अंजली : आहे.
प्रतीक्षा : असू देत पण आता उपयोग नाही काहीच.
अंजली : का ?
प्रतीक्षा : आता तो माझा आहे. अजिंक्य जगतो माझ्यासाठी. प्रेम करतो माझ्यावर. आणि अजिंक्य, अजिंक्य भोसले आहे माझ्यामुळेच.
अंजली : प्रेम म्हणजे नक्की काय देतेस तू त्याला ?
प्रतीक्षा : काय म्हणजे जे त्याला हव असत ते सगळ.
अंजली : एक बोलू ? राग येणार नसेल तर ?
प्रतीक्षा : हो बोल.
अंजली : तस बघायला गेल तर सगळ काही त्यानेच तुला दिलय. प्रेम, काळजी, साथ, नवीन आयुष्य, समाजाच्या विरुध्द जाऊन या घरात आसरा दिला तूला, साराला मुलगी मानतो, आणि तुमची हौसमौज करतो. लाड पुरवतो. यात तुझ अस प्रेम मला कुठ जाणवत नाही. सॉरी. तुला राग येईल माझा पण जे मला वाटल ते स्पष्ट बोलले. कारण तू त्याची बायको असलीस तरी कधीतरी तो माझा पण होता. मी ओळखते चांगल त्याला.
प्रतीक्षा : त्याने मला सगळ दिल मी नाही म्हणतच नाही.
अंजली : पण तू सोडून पण त्याने अजून बर्याच जणींना काही दिल असेल. किंवा जणांना सुध्दा.
प्रतीक्षा : म्हणजे ? असावरी प्रियांका सोडून आणि तू पण सोडून कुणी असेल का अजिंक्यच माझ्यापेक्षा जास्त जवळच ?
अंजली : नाही.
प्रतीक्षा : मग ?
अंजली : तुझ्या इतकच प्रेम तो अजून कुणावर करतो बघ एकदा. तू बरबाद केलस अजिंक्यला. कलाकार आहे तो. आणि तू त्याला वेडा करून टाकलस.
प्रतीक्षा : तुम्ही होता ना तेव्हा सोबत मग तुम्ही का सावरल नाही त्याला ?
अंजली : कोण ? प्रियांकाला अजिंक्य हवाच होता. तिने जीव पण द्यायचा प्रयत्न केलेला त्याच्यासाठी पण त्याने तिला समजावून लग्न करायला लावल.
प्रतीक्षा : आणि तुझ काय ?
अंजली : मी अजून प्रेमातच आहे त्याच्या.
प्रतीक्षा : एकतर्फी ?
अंजली : माहित नाही.
प्रतीक्षा : माहित नाही म्हणजे ?

दार वाजलं. प्रतीक्षा जाऊन दार उघडते. अंजली सुध्दा मागे वळून बघते दाराकडे. दारात अजिंक्य आणि सारा उभे असतात. 
भाग ५
अजिंक्य साराला घेऊन आत आला. प्रतीक्षाने दार लावून घेतल. प्रतीक्षा अजिंक्य शेजारी येऊन बसली. अंजली अजिंक्यकडे बघते. अजिंक्य ही तिलाच बघत असतो. दोघांची ती नजरानजर तशीच खिळून राहिली. पिक्चरमध्ये एखादा प्रसंग जसा स्लो मोशन व्हावा तस घडत होत आत्ता. सारा शांतपणे जाऊन प्रतीक्षाच्या मांडीवर जाऊन बसली. अंजली आणि अजिंक्यची नजर अजून एकमेकांच्या डोळ्यातच खिळलेली आहे. आणि या दोघांना प्रतीक्षा एकटक बघत आहे. अजिंक्य आता सोफ्यावर बसतोय आणि त्याच्यासोबतीने अंजलीची नजर हि अलगद खाली खाली सरकत चालली आहे. आणि तिला जाणवल कि तिच्या आणि अजिंक्यच्या नजरेत अजून एक नजर तिला रोखून बघत आहे ती नजर होती प्रतीक्षाची.
अंजलीने सावरत घेतल अगदी आपल्याच नजरेन. तिने साराकडे बघितल. प्रतीक्षाकडे बघायची हिम्मत होईना तिची. तिने साराला जवळ बोलावल पण ती अंजलीजवळ गेली नाही. मग अजिंक्य साराला बोलतो,
अजिंक्य : मावशी आहे ती. जा कि. ओळखल नाही का तू तिला ?
सारा : मी नाही जाणार. मम्मी म्हणाली जायचं नाही.
अजिंक्य : होका... मी सांगतोय ना जा बर. मावशीकडे.
सारा उठायला लागली पण प्रतीक्षाने तिचे दोन्ही खांदे घट्ट पकडले. आणि सारा प्रतीक्षाकडे वर तोंड करून बघायला लागली.
अजिंक्य खिशातून मोबाईल काढून काहीतरी बघत बसतो. अंजली हि इकडे-तिकडे बघायाला लागते. प्रतीक्षा उठते.
प्रतीक्षा : मी जेवण बनवते. तुम्ही बसा बोलत.
अजिंक्य : हम, मीपण आलो मदतीला. थांब शर्ट बदलतो.
प्रतीक्षा : आज नको तुझी मदत मला. अंजली आलीय ना बोल तिच्याशी उद्या कर मला मदत.
प्रतीक्षा साराला आत घेऊन निघून गेली. अजिंक्य तिथेच बसतो सोफ्यावर. अंजली त्याच्याजवळ सरकली. अजिंक्य ते तीच आपल्या बाजूंला सरकन बघून बाजूंला सरकला.
अंजली : काय झाल ?
अजिंक्य : घरी आहोत आपण माझ्या.
अंजली : हा मग.. तुझ्या घरी आहे ना मी. तिच्या नाही.
अजिंक्य : ती माझी बायको आहे आणि हे घर हि तीचच आहे.
अंजली : आणि मी कोणे मग तुझी ?
अजिंक्य : कोणे ? नात नाही आपल्यात कोणतच.
अंजली : संबंध तर आहे ना पण.
अजिंक्य : लग्नाआधी पर्यंत होता.
अंजली : ( पोटाला हात लावून ) आणि आत्ता काहीच नाही का ?
अजिंक्य : हा विषय इथे नको.
अंजली : अजिंक्य.
अजिंक्य : काय ?
अंजली त्याच्या डोळ्यात एकटक बघत असते.
अंजली : काही नाही.
अजिंक्य : बर
अंजली : अजिंक्य.
अजिंक्य : पुढे बोल ना.
अंजली : मला गरज आहे तुझी. तुझ्या चार प्रेमळ शब्दांची. तुझ्या मिठीची. तुझ्या काळजीची.
अजिंक्य : मी येईन ना पुण्यात.
अंजली : का इथे नाही का होऊ शकत हे सगळ ? का तुला इथे फक्त प्रतीक्षाच दिसते. मला विसरलास का ? माझ्यावरच, माझ्यासोबतच प्रेम गेल का सगळ कुठे तरी लांब ?
अजिंक्य : मी काही बोलू शकत नाही यावर. जे झाल त्याचा मला त्रास होतोय. त्यातून सावरत असताना तू इकडे आलीस. मी मराव असच वाटत का तुला ?
अंजली : हे असल काय बोलतोयस.. मला तू हवायस.
अजिंक्य : मग हा विषय इथे परत काढून नको. तुझ्याकडे येईन तेव्हा बोल. तेव्हा मी तूझा असतो. इथ मी. मी...इथच काय घरात नाही साताऱ्यात जोपर्यंत असतो मी... मी फक्त प्रतीक्षाचा आहे.
अंजली : आय लव्ह यु अजिंक्य.
प्रतीक्षाचा आतून आवाज आला.
प्रतीक्षा : अजिंक्य दोन मिनिट येरे इकड... अजिंक्य निघून गेला. मोबाईल तिथच विसरून आणि अंजलीने त्याचा मोबाईल घेतला. 
भाग ६
अर्थातच मोबाईलचा पासवर्ड माहित असायची गरज नव्हती. तिने ‘प्रतीक्षा’ अस नाव टाकल आणि पासवर्ड उघडला गेला. तिने कॉल लॉग बघितला. त्यात तिचा स्वतःचा एक, अंबरीश आणि प्रतीक्षा असे सलग तिने लोकांचे नंबर दिसले. तिने मग मेसेज जाऊन बघितले आणि त्यात पहिला मेसेज दिसत होता ‘प्रियांकाचा’. पटकन प्रियांका नावावर क्लिक करून तिने मेसेज वाचायला सुरुवात केली. पण शेवटच्या दोन मेसेजचा तिला काही संबंध लागेना. ती विचार करायला लागली. बहुतेक हे दोन मेसेज अजिंक्यने डिलीट केले वाटत असा विचार करून तिने मोबाईलची स्क्रीन बंद केली. आणि मोबाईल बाजूला ठेवून दिला.
अजिंक्य आला आणि त्याने तिला आत जेवायला बोलावल. अंजलीने तिचा मोबाईल हातात घेतला आणि आत निघाली. अजिंक्य ती बसलेली त्या सोफ्याजवळ आला आणि त्याचा मोबाईल उचलून तो हि आत गेला. प्रतीक्षा ताट वाढत होती. पहिलं ताट नेहमीप्रमाणे अजिंक्य पुढे ठेवल. मग अंजलीला दिला. मग स्वतः जाऊन बसली. अजिंक्यने साराला मांडीवर बसवलं आणि तिला पहिला घास चारला. मग दुसरा घास घेतला नि प्रतीक्षापुढे हात केला. अंजली बघायला लागली. प्रतीक्षाला कस तरी वाटायला लागल. ती बोलली “खां तुझ तू”. पण अजिंक्य तसाच हात पुढ धरून राहिला. मग नाईलाजाने प्रतीक्षाने ‘आ’ केला आणि अजिंक्यने तिला घास भरवला. मग तो स्वतः जेवायला लागला. अंजली त्याच्याकडे बघत होती. अजिंक्य मात्र जमेल तितक तिच्याशी नजरा-नजर होण्यापासून वाचवत होता स्वतःला. जेवण सुरु होत. शांततेत. कोण कुणाशी बोलेना. त्या चार लोकांच्यात आवाज फक्त साराचाच येत होता. ‘मला हे पाहिजे’. ‘मला ते पाहिजे’. आणि तिला अगदी लहान होऊन समजवताना येणारा अधून-मधून अजिंक्यचा आवाज. नाहीतर बाकी अशी शांतताच होती.
प्रतीक्षाचा मोबाईल वाजला. तिने कॉल उचलला आणि ती बोलायला लागली. तिच्या बोलण्याचा अर्थ कुणाला लागत नव्हता. प्रतीक्षाच थोड्यावेळाने जेवण झाल. आणि ती अजिंक्यच्या खुर्चीशेजारी त्याच्या पाठीवर हात ठेवत बोलायला लागते.
प्रतीक्षा : अजिंक्य मी जरा बाहेर जाऊन येते.
अजिंक्य : कुठ ?
प्रतीक्षा : आले. गोळ्या घेऊन क्लिनिक मधून.
अजिंक्य : पण गोळ्या आहेत.
प्रतीक्षा : व्हिटामिनच्या आणायच्या आहेत नवीन.
अजिंक्य : मी आणतो कि. तू बस. माझ झाल कि मी गोळ्या देतो दुपारच्या. त्या खा आणि जरा झोप. आणि मी जातो आणायला त्या गोळ्या.
प्रतीक्षा : मला चेकअप पण करायच आहे.
अजिंक्य : आठवडा पण नाही झाला. चेक करून बाळ.
प्रतीक्षा : येते म्हंटल ना.
अजिंक्य : बर ऐक सोडायला तरी येऊ का ?
प्रतीक्षा : नको. जाते मी. सारा चल. झाल का तुझ.
सारा : हो.
प्रतीक्षा आणि सारा आत गेल्या दोघींनी कपडे बदलले. आणि दोघी बाहेरच्या खोलीत आल्या. अजिंक्य अर्धवट जेवण सोडून हात धुवून बाहेर आला.
प्रतीक्षा : जा ना जेव. अर्धवट कशाला जेवलास.
अजिंक्य : झाल माझ. बर ऐक.
प्रतीक्षा : बर ऐक.
दोघ एकच वाक्य एकदम बोलले. अंजली आत जेवत होती. नवीन घरी अस जेवण जास्त जात नाही आणि ताटात असलेल जेवण पटपट सरत पण नाही. तरी तिच जेवण संपतच आलेल.
प्रतीक्षा : ती कधी जाणार आहे ?
अजिंक्य : माहित नाही.
प्रतीक्षा : माझ काही नाही. राहणार असेल तर राहू दे तिला.
अजिंक्य : नको कशाला.
प्रतीक्षा : असु दे...
अजिंक्य : तिने सामान नाही आणल.
प्रतीक्षा : बर. बघ काय म्हणते. एकदा बघ बोलून थांब म्हणाव तिला. आणि ऐक मी येते. दोन तास वैगरे लागतील.
अजिंक्य : इतका वेळ ?
प्रतीक्षा : हो. काळजी घे.
अजिंक्य : तू पण. पिल्लूला निट ने. गाडी हळू चालव. सारा आईला त्रास नाही द्यायचा. आईसक्रीम दिलय मगाशी. काय...?
सारा : हो.

प्रतीक्षा आणि सारा बाहेर गेले. प्रतीक्षाने गाडी सुरु केली. सारा पुढे धरून उभी राहिली. आणि प्रतीक्षा निघाली. अजिंक्यने ती दिसेनाशी झाल्यावर दार लावल. आणि तो मागे फिरला आणि जागेवरच स्तब्ध झाला. अंजली त्याच्या अगदी पावलाला पाऊल चिटकवून त्याच्यासमोर उभी होती. गरम श्वासांनी त्याला बघत. त्याच्या डोळ्यात डोळे हरवून. आणि....    
भाग ७
अंजली : काय झाल ?
अजिंक्य : काही नाही.
अंजली : प्रतीक्षा गेली ना ?
अजिंक्य : हो.
अंजली : मग आता ?
अजिंक्य : मग काय ? काहीच नाही.
अंजली : ती नाही तर जवळ घे कि मला.
अजिंक्य : मला...हे नको काहीच.
अंजली : तुला नको असेल. मला पाहिजे अजिंक्य.
अजिंक्य : अंजली. तू बोललीस म्हणून आणि आपल्यात कधी प्रेम झालय म्हणून मी तेव्हा तुझा झालो. तू प्रेग्नंट आहेस. आता अजून काय कराव मी अस तुला वाटत ? तू, तुझ बाळ झाल कि राहशील नीट. तिकड. पण मला इथच रहायचं आहे. मी आत्ता प्रतीक्षाच्या नजरेत पडलो तर हरवून बसेन तिला कायमच....
अंजली : तू आत्ता माझ्यासोबत काय करणार आहेस ते कोण बघणारे ? आणि कोण सांगणारे तिला ?
अजिंक्य : कुणी बघायला, सांगायला नसल तरी माझ मला माहित आहे ना. आणि मी माझ्या मनाला अजून किती फसवू ? आणि खरच ग माझ प्रतीक्षावर खूप खूप प्रेम आहे. इतक कि मी अजून कुणावर कधीच केल नाही.
अंजली : असुदे. पण माझ हि तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. आणि मी म्हणतेय का माझ्यासोबत रहा. मी म्हणतेय बस मला जवळ घे. रोज तर असते का मी तुझ्याजवळ ? आणि हि माझी गरज नाही. बाळाची आहे. बाळाला बाबांचा स्पर्श हवाय.
अजिंक्य : मी बाबा असलो तरी नाव तुझ्या नवऱ्याच लागणार आहे बाळाला.
अंजली : ते जगासाठी. पण एक आई म्हणून मला माहित आहे ना बाळाचा बाबा कोण आहे ते.  
अजिंक्य : आणि ऐक कि अंजली.
अंजली पटकन अजिंक्यला घट्ट मिठी मारते.
अंजली : काय ?
अजिंक्य : तुझ्या बाळाचा बाबा मी आहे हे फक्त आपल्या दोघातच राहील पाहिजे.
अंजली : हो. तुला मला आणि नवऱ्याच माहित आहे.
अजिंक्य : हो. पण मला वचन दे.
अंजली : हम.हो.
अंजली त्याच्याच मिठीत असते. अजिंक्य तिला ताकद लावून बाजूला करतो. अंजली त्याच्याकडे बघते. अजिंक्य हि तिला बघतो. अजिंक्यचे श्वास जड व्हायला लागले. आणि अंजलीचे श्वास गरम व्हायला लागला. अजिंक्य आता जागचा हलणार तोच अंजलीने त्याच्या हनुवटीला उजव्या हाताने धरून डाव्या हाताने मागून त्याच्या केसात हात घालून ओठांना त्याच्या आपल्या ओठात घट्ट पकडल. अजिंक्य ढम्मसा उभा. मग अजिंक्यला हि रहावत नाही. पण प्रतीक्षा त्याच्या डोळ्यासमोर येत होती. अस अचानक दार वाजेल आणि दारात प्रतीक्षा असेल अस अजिंक्यला भीती वाटत होती. अंजली त्याला कीस करतच होती. पण अजिंक्य तिला कीस करायला तयार होईना. अंजलीने डाव्या हाताने त्याचे केस घट्ट पकडून ओढले. आणि उजवा हात हळू-हळू अजिंक्यच्या छातीवरून पोटावरून हळू-हळू खाली-खाली नेत होती आणि त्या-सरशी अजिंक्याची छातीची धडधड वाढायला लागली. अजिंक्यने तिचा उजवा हात मनगटालाच पकडला आणि तिला जवळ ओढून कीस करायला लागला. आणि अंजलीने त्याच क्षणाला अजिंक्यला बाजूला केल. अजिंक्यला रहावत नव्हत. अंजली सोफ्याकडे जायला निघाली. अजिंक्य तिच्यामागे गेला. आणि तिला मागून पकडल. तिच्या पोटाला डाव्या हाताने अलगद पकडल पण उजव्या हाताने तिच्या भरल्या छातीवर हाताने घट्ट धरून तिच्या मानेवर कीस केला. अंजली त्याही मिठीतून सुटली. आणि अजिंक्यकडे बघितल.
अजिंक्य : काय झाल ?
अंजली : काय झाल ?
अजिंक्य : तुला काय झाल ?
अंजली : प्रेम नाही माझ्यावर मग हे काय आहे ?
अजिंक्य : सुरुवात तू केली.
अंजली : शेवट मी करणार. तू माझ प्रेम आहेस. मी नाही तुला कुणाच होऊ देणार. मी येते.
अजिंक्य : थांब कि.
अंजली : नको.
तिने त्याला आणलेलं एक गिफ्ट दिल आणि ती तिथून चालती झाली. अर्धवट उघड दार बघत अजिंक्य सोफ्यावरच बसला.....
भाग ८
इकडे प्रतीक्षा शंकराच्या देवळात आलेली आहे. साराला जवळ बसवून पिंडीसमोर हात जोडून प्रतीक्षा मनातूनच देवाशी बोलायला लागली.
प्रतीक्षा : ( मनात ) महादेवा... या आधी पण मला जेव्हा जेव्हा त्रास झाला किंवा मनात काही कलुषित करणारे विचार आले कि मी तुमच्या देवळात आले. तेव्हा अमित असायचा सोबत. अमितच्या आधी अजिंक्य असायचा. अमित आता नाही. आणि अजिंक्य असून हि सोबत नाही. तुमच्यापासून काय लपलेलं आहे का ? अजिंक्य माझा आहे. माझ्यावरच प्रेम करतो असा माझा समज होता. समज म्हणता नाही येणार. अशी खात्री होती माझी. सगळ नीट सुरु होत. आणि प्रियांका नावाची कोणीतरी माझ्यासमोर आली. एक कविता बनून. माझ्यासाठी लिहिलेल्या इतक्या साऱ्या कवितेत तिच्यासाठी एक कविता होती मी समजून घेतल. पण आज तिचा मेसेज आला. आणि मन अस्वस्थ झाल. कवितेतली प्रियांका ह्कीकत मध्ये हि अजिंक्यच्या जवळ येऊ पाहते. याचा मला त्रास होतोय. त्यातून सावरत नाही तोवर अंजली आली. अजिंक्य आणि अंजली कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात होते. पण ते झाल गेल सगळ विसरून अजिंक्य माझ्यासोबत जगत असताना अंजली मात्र अजून त्याच्यातच गुंतलेली आहे. आणि हे तिने स्वतःच्या तोंडाने कबुल केल. मी त्या दोघांच्यात तिथ थांबण मला नाही बरोबर वाटल. म्हणून मी इथ आले. पण इथ हि मला स्वस्थ वाटेना ? त्या दोघांच्यात काही होईल का आत्ता ? नको. असल काही नको. त्या दोघांच्यात बोलण होऊदे. आणि अजिंक्यपासून अंजली कायमची लांब जाऊदे. हव तर हा नवस समज महादेवा. तू इच्छा माझी पूर्ण केलीस तर मी हि तुझा नवस पूर्ण करेन. बदल्यात तुझा अभिषेक घालेन सोबत अजिंक्यलासुध्दा आणेन.
प्रतीक्षा जागची उठली आणि तिने नमस्कार केला. आत्ता तर अर्धातासच झालेला. आपण अजिंक्यला बोललेलो दोन तास वैगरे लागतील. त्या हिशोबाने त्याचं बोलन सुरु असेल. आणि मी लवकर गेले तर ते चुकीच वाटेल. ती तिथच देवळात बसली साराला जवळ घेऊन. थंड त्या यवतेश्वरच्या देवळात. आजूबाजूला सगळी शांतात होती. आणि माणसाला गोंधळात विचार कमी येतील पण शांततेत ???? विचारांचा गोंधळ उडतो. तीच अवस्था होती प्रतीक्षाची. अंजली पुण्याला निघाली. तिला बस मिळाली होती. घरात अजिंक्य शांत बसून होता. आणि त्याने आता गिफ्ट उघडून बघितल. त्यात दोन छोटेसे बाळाचे बूट होते. आणि एक चिठ्ठी होती ज्यावर लिहिलेलं ‘अजिंक्य’.  अजिंक्यला काही कळाल नाही. त्याने ती चिठ्ठी खिशात ठेवली. आणि बूट आत कपाटात ठेवले. बाहेर मोबाईल वाजायला लागला. अजिंक्य बाहेर येऊन सोफ्यावरचा मोबाईल उचलून कानाला लावतो.
अजिंक्य : हेल्लो..!
असावरी : हेल्लो.
अजिंक्य : कोण बोलतय ?
असावरी : ज्याला लावायचा त्याला मी कॉल लावला आहे. बस मला सांग तू कसा आहेस ?
अजिंक्य : पण कोण बोलतय ?
असावरी : माणस माणसाला विसरतात ठीक आहे.. पण त्या आवाजाला कसे काय विसरतात जो आवाज कधी काळी आपल्याला आवडत असतो.
अजिंक्य : अ...असावरी ?
असावरी : तीच आहे समज. आणि नसेल ओळख पटत तर नाही मी ती.
अजिंक्य : फिक्स.. असावरीच.
असावरी : कसा आहेस..?
अजिंक्य : खूप मस्त.
असावरी : आणि प्रतीक्षा ?
अजिंक्य : ती पण.
असावरी : मला तुला भेटायचं आहे .
अजिंक्य : पण तू असतेस कुठ ?
असावरी : १३५ किलोमीटर. तुझ्या घरापासून.
अजिंक्य : होका. मला सध्या वेळ नाही. काम सुरु आहेत ना.
असावरी : काम तुझ्यासाठी आणि जगासाठी. माझ्यासाठी माझा अजिंक्य फक्त माझा आहे. तेव्हा त्याला काम-धाम नसत. हो ना ?
अजिंक्य : अस नाही. पण. ऐक ना.
असावरी : अजिंक्य ... आय लव्ह यु..
अजिंक्य : हम.
असावरी : ‘प्रतीक्षा’ आणि मी आय लव्ह यु म्हंटल कि तुझ हे ‘हम’. म्हणन मला दोन्ही हि गोष्टी आवडत नाहीत. अजिंक्य.
अजिंक्य : बर.
असावरी : मला भेटायला ये उद्या. नाही म्हणायचं नाही तुला माझी शप्पथ आहे.
अजिंक्य : जम..
असावरी : तुला विचारल नाही सांगितल आहे. माफ कर मला पण तू खूप आहारी गेलायस प्रतीक्षाच्या आणि मला नाही ते आवडत. भेटणार ना मग मला उद्या ?
अजिंक्य : बर. सांगतो संध्याकाळी.
असावरी : कॉल करेन मी.
अजिंक्य : नको मेसेज करीन मी.
असावरी : बर. बाय बेबी... लव्ह यु. मुआहहह...

 भाग ९
अजिंक्यला मुंबईहुन कॉल आला. 'तुझं माझं जमलं तर ?' या मालिकेचे प्रोड्युसर आनंद देशमुख बोलत होते. परवा त्यांना पहिले सात भाग हवे होते. त्याबद्दच बोलणं करायला त्यांनी कॉल लावलेला. अजिंक्य सांगत होता सातवा भाग आज रात्री लिहून पूर्ण होईल आणि उद्या सकाळी बारा- एक पर्यंत सगळे सात भाग मेल केले जातील. दोघांचं बोलणं झालं. अजिंक्यने मोबाईल आता बाजूला ठेवला आणि टीव्ही लावला. टीव्हीवर चॅनेल लावत असताना त्याला तो लिहित असलेल्या मालिकेचा टिझर व्हिडिओ लागलेला दिसला त्याने चॅनेल बदलायचं थांबवलं आणि ती व्हिडीओ बघितली. काही का असेना पण त्याला आंनद झाला. व्हिडिओ संपली. त्याने मग गाण्याचं चॅनेल लावलं. गाणी बघत आणि सोबतच ऐकत असताना दार वाजलं. अजिंक्य गाणं गुणगुणत दाराजवळ गेला. दार उघडलं. दारात सारा प्रतीक्षा. दोघी उभ्या.
अजिंक्य : ये.
दोघी आत आल्या. त्याने दार लावून घेतलं. प्रतीक्षा सोफ्यावर बसली. सारा अजिंक्यच्या कडेवर बसलेली.  अजिंक्य प्रतीक्षाजवळ बसला.
प्रतीक्षा : अंजली ? कुठय ?
अजिंक्य : गेली.
प्रतीक्षा : कुठं ?
अजिंक्य : पुण्याला परत.
प्रतीक्षा : कधी ?
अजिंक्य : तू गेलीस आणि दुसऱ्या मिनिटाला ती पण गेली.
प्रतीक्षा : बर. तुला काय झालं ?
अजिंक्य : काही नाही का ग ?
प्रतीक्षा : खुश दिसतोयस..
अजिंक्य : हा . अग ती सिरियल लिहितोय ना नवीन त्याचा टीझर व्हिडिओ मगाशी टीव्हीवर बघितला. भारी वाटलं जरा.
प्रतीक्षा : वाह. मस्तच कि. याच किती काम असणार आहे ?
अजिंक्य : दीड वर्ष आहे काम. म्हणजे दीड वर्ष सुरु ठेवणार आहे सिरियल.
प्रतीक्षा : मागच्या वेळेसारखं जायचं नाहीये ना तुला मुंबईला ?
अजिंक्य : नाही. रोजचे पार्ट मेल करीन सांगितलंय. तिकडं यायला जमणार नाही बोललो. बायको प्रेग्नेंट आहे सो. सांगितलं त्यांना. आणि बॉन्ड केला त्यात पण लिहून दिलय मी मुंबईला जमणार नाही यायला.
प्रतीक्षा : हा. जाऊ नकोस मला सोडून.
अजिंक्य : नाही.
प्रतीक्षा अजिंक्यजवळ सरकली. त्याच्या दंडाला धरत तिने आपलं डोकं अजिंक्यच्या खांद्यावर टेकवल. सारा त्याच्या मांडीवर बसलेली. आणि अजिंक्यने साराच्या डोळ्यावर हात ठेवला आणि प्रतीक्षाच्या ओठांना आपल्या ओठात पकडून पटकन सोडवल सुद्धा.. आणि साराच्या डोळ्यांवरचा हात काढला.
प्रतीक्षा : अजिंक्य , आय लव्ह यु.
अजिंक्य : लव्ह यु.
अजिंक्य प्रतीक्षा सारा तिघे हि टीव्ही बघायला लागले.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अजिंक्यने पाणी भरलं. प्रतीक्षासाठी कॉफी बनवली. चहा तिला आवडत असला तरी डॉक्टरने चहा कमी प्यायला सांगितलं होता. अजिंक्य कॉफी घेऊन खोलीत आला. प्रतिक्षाला उठवून दोघ कॉफी पित होते.
प्रतीक्षा : आज कुठे जाणार आहेस का?
अजिंक्य : नाही.
प्रतीक्षा : बर.
अजिंक्य : काल कुठं गेलेलीस तू ?
प्रतीक्षा : क्लिनिकमध्ये.
अजिंक्य : गोळ्या आणायला.. व्हिटॅमिनच्या होना ?
प्रतीक्षा : हो.
अजिंक्य : कुठयत गोळ्या ?
प्रतीक्षा : नाही मिळाल्या.
अजिंक्य : कशा मिळतील.. गुरुवारी क्लिनिक बंद असत. सांग कुठं गेलेलीस ?
प्रतीक्षा : देवळात.
अजिंक्य : कशाला ?
प्रतीक्षा : अजिंक्य मला काही देणंघेणं नाही कोण तुझ्यावर प्रेम करत.. पडतो फरक याने कि तू कुणावर आणि कुणा-कुणावर प्रेम करतोस ?
अजिंक्य : अस का विचारलं ?
प्रतीक्षा : तू सांग ना उत्तर माझ्या प्रश्नाच.
अजिंक्य : माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. एकदम खर आणि खूप सार. बाकी कुणावर नाही. आणि शेवट्पर्यंत माझ्या नाही तुझ्या माझं तुझ्यावरच फक्त प्रेम असणार आहे.
प्रतीक्षा : नक्की ना ?
अजिंक्य : हो.
प्रतीक्षा : अंजली तुझ्यावर प्रेम करते. प्रियांका आणि असावरीसुद्धा.
अजिंक्य : असुदे. माझं तुझ्यावर आहे. प्रतीक्षा हातातला अर्धवट कप घट्ट धरून अजिंक्यच्या मिठीत शिरली. त्याने हि हातातला कप बाजूला ठेवून तिला जवळ घेतलं आणि तिच्या केसात हात फिरवला.

भाग १०
अजिंक्य : असावरी ब्लॉकड, प्रियांका ब्लॉकड...
हातातला मोबाईल बंद करून बाजूला ठेवत अजिंक्य प्रतीक्षाला सांगत असतो.
प्रतीक्षा : आणि अंजली ?
अजिंक्य : तिला मी वचन दिलय शेवटपर्यंत मैत्री निभावेन म्हणून. आणि म्हणून तिला ब्लॉक केल नाही. आणि अस हि ब्लॉक केल, नाही केल तरी तिच माझ बोलण अस होतच नाही.
प्रतीक्षा : अंजली तुझी मैत्रीण आहे ना ?
अजिंक्य : हो. माझी मैत्रीण आहे.
प्रतीक्षा : फक्त मैत्रीण ?
अजिंक्य : हो.
प्रतीक्षा : पण ती तुला मित्र मानत नाही. का बर अस ?
अजिंक्य : माहित नाही मला. प्रतीक्षा.... माहित नाही का पण मला आत्ता आठवण झाली त्या भेटीची.
प्रतीक्षा : कुणाच्या तुझ्या आणि अंजलीच्या ?
अजिंक्य : तिची कशाला ? तुझी आणि माझी. भर पावसात. त्या अंधारात. त्या बंद वडापावच्या गाड्यापाशी. ती भेट झाली नसती तर ?
प्रतीक्षा : मला एक प्रश्न पडला होता तेव्हा. आणि अजून हि तो प्रश्न पडलेलाच आहे. उठून सावरलेला नाही माझ्यासाठी. त्याच उत्तर मिळालंच नाहीये मला अजून.
अजिंक्य : कसल ?
प्रतीक्षा : वेड्यासारखा तू कित्येकदा माझ्यासोबत असताना भिजला आहेस पावसात. आपण एकमेकांना ओळखत नव्हतो किंवा रिलेशनमध्ये नव्हतो तेव्हा हि तू भर पावसात भिजत फिरायचास रस्त्यावर.
अजिंक्य : हो. मग ?
प्रतीक्षा : थंडीत स्वेटर आणि पावसाळ्यात जर्किंग घातलेलं तुला मी कधी बघितलेलं नाहीये. मग अस असताना हि तू त्या रात्री आडोश्यात का उभा होतास ?
अजिंक्य : माहित नाही. मी चाललेलो घरीच. पाउस पडायला लागला. मनात विचार नव्हते कसलेच. त्यामुळ खूप अशा शायरी रस्त्याने चालत मी बनवत होतो पण मला आवडेल अशी बनतच नव्हती. तुला आठवत होतो तुझ-माझ प्रेम आठवत होतो पण छे...! जमत नव्हत. नवरा बायको जसे तसच असत या शायर, कवीच नात पावसासोबत. जमत नाही दोघांच एकमेकांशिवाय. मग आता पावसात भिजत गेलो तर डोक जड होईल. म्हणून जरा बाजूला थांबलो आडोशाला. विचारात गुंतून हरवून कधी मी त्या पावसातून विचारांच्या वाळवंटात आणि रात्र-अंधारातून कधी लख्ख सकाळच्या सूर्य-उन्हात रमलो समजल नाही. भानावर आलो तर एक स्त्री माझ्या पुढ्यात उभी दिसली. अगदी शारीरिक ठेवण उत्तम असलेली ती स्त्री तू आहेस हे पहिल्यांदा समजल नाही. पण मग आठवण झाली त्या केसांची ज्या केसांना हातात घेऊन अगदी पाच-पाच, दहा-दहा मिनिट मी वेड्यासारखा वास घ्यायचो. ते खांदे. त्या खांद्यांवरून माझे हात फिरवत कधी ड्रेस बाजूला करत माझे कोरडे ओठ ओले करून फिरवत एखादा पर्वत एकाच चढाईत उतरावा तसा मी मानेपासून कीस करत खांद्याच्या कोपऱ्यापर्यंत घसरत यायचो. ती पाठ. ज्या पाठीवरून मणक्याच्या आकारात खाली मी हात फिरवत बसायचो. अजून खाली जात नाही. तर अशी हि शरीराची आणि त्यातल्या अवयवांची ओळख जुनी जाणवली. त्या पाठमोरऱ्या त्या स्त्रीत कुठेही अनोळखीपणा नव्हता. मी जवळ आलो. आधीच तुझे भिजलेल केस. थोडेसे पाणावलेले खांदे. किच्च भिजलेली छाती. जेव्हा तुला मिठीत मागून घेतल मी तेव्हा मला जाणवली. आणि अशा या प्रतीक्षासाठी. माझ्या प्रतीक्षासाठीच मला तिथ थांबायची अक्कल झाली. पण काही का असेना आज तू अशी माझ्या जवळ आहेस. प्रतीक्षा मी कसा हि असेन पण तुझा आहे. मला काहीही आवडत असेल. पण तुझ्या इतक काहीच नाही. मला काही गोष्टी आवडत नसतील. पण तुझ्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी माझ्या आवडत्या आहेत. आणि मी जन्म घेतलाय मागून देवाकडून फक्त तुझ्यासोबत जगण्यासाठी. कारण जेव्हा देवाने मला आयुष्य दिल असेल काहीच नसेल त्या आयुष्यात तेव्हा त्याने मला तुझ लालूच दाखवल असेल आणि म्हणूनच मी त्याला जन्माला यायला होकार दिला असावा.
प्रतीक्षा : ( खळखळून हसत ) काहीही हां... तुला बर आठवतय जन्माला यायच्या आधीच तुझ आणि देवाच बोलण ?
अजिंक्य : हे अस तू हसणार असशील तर सात जन्माआधीच पण आठवेल मला. मला काय बस तू अशी आनंदी हवीस. बाकी माझ्याकडे सगळ आहे. त्या व्यतिरिक्त मी तुला काय द्याव तर बस हे हसण.. इतकच वाटत.
प्रतीक्षा : कसा रे असा तू अजिंक्य. ये इकड जवळ. आय लव्ह यु.
अजिंक्य : आय लव्ह यु खूप सार. जगात कोण कुणावर करत नाही इतक मी तुझ्यावर प्रेम करतो.
आणि अजिंक्य प्रतीक्षाच्या छातीशी डोक टेकवून घट्ट मिठी मारतो. तीही त्याला जवळ घेते.
भाग : ११
प्रतीक्षा बेडवर बसलेली आहे. होणारी आई आपल्या नवऱ्याची बायको राहण्यासाठी हि धडपड करत असतेच. कारण जितक सुख आई होण्यात असत तितक सुख किंवा त्याहून जास्त सुख हे बायको बनून राहण्यात हि असत. आई बनून बाळाची काळजी तर घेतेच ती पण आपली हि कुणी काळजी घ्याव आणि हा विचार करावा तिने. मग फक्त विचाराला त्या अजिंक्यने तिची काळजी घेऊन, तिला प्रेम देऊन साकार कराव. स्वप्नच म्हणाव ते. पण सत्यातल. प्रतीक्षा बेडवर आत्तापर्यंत बसलेली. पण कधी तिचा अचानक डोळा लागला काय माहित ? ती तशीच उशीला पाठ लावून बसल्या-बसल्या झोपून गेली. अजिंक्य स्क्रिप्ट लिहित बसलेला. सहज म्हणून प्रतीक्षाची आठवण आली. म्हणून आतल्या खोलीत येऊन बघतो तर हि झोपलेली. तिला अस निरागसपणे झोपलेलं बघून त्याला अस तिला घट्ट मिठीत घ्याव अस वाटत होत. पण तब्येत तिची नाजूक होती. मिठी मारावी तर पोटावर तिच्या दाब पडणार. तिला त्रास होणार. श्वास गुदमरणार. नकोच. त्याच्या आणि तिच्या बाजूने विचार करून त्याने मिठी मारायचं टाळल. कधीचे नऊ महिने संपतात अस त्याला झालेलं. तो तिच्या जवळ चोराच्या पावलाने गेला. प्रतीक्षाची केस क्लिपच्या कडकडीत मिठीतून सुटून तिच्या खांद्यावर विसावलेली. बहुतेक अजिंक्यचीच वाट बघत. त्याने याव. आपल्याला हातात घ्याव. वास नाकाने अगदी धुंद होऊन घ्यावा आणि केसांना.........कानांच्या मागे सरकून ठेवाव. हि अपेक्षा केसांची असावी आणि तसच झाल. कानामागे केस सरकवताना प्रतीक्षाला झोपेत का होईना तो अजिंक्याच्या बोटांचा स्पर्श झाला.
तिने कूस बदलली आणि तिचे पाय खाली गेले. पाठीमागची उशी आता डोक्याखाली आली. डावा हात पोटाखाली गेला. अजिंक्याने तो अलगद काढून बाजूला केला. त्या क्षणाला तिने झोपेतच का होईना पण अजिंक्याचा हात आपल्या हातात धरला. ती शांत होती. झोपलेली होती. अजिंक्य हि शांत होता इतका शांत कि गरज असून सुध्दा तो आपले श्वास हळू-हळू नेहमीच्या गतीपेक्षा कमी आत घेत होता, बाहेर सोडत होता. कारण त्या श्वासाने सुध्दा जवळ कुणीतरी आहे याची तिला जाणीव झाली असती. तिची झोप मोडली असती आणि पोटातल बाळ हि जागल असत. आणि प्रतीक्षाला उगीच पोटाला लाथा मारून त्रास देत बसल असत. तो तसाच तिच्या हातात अडकलेला आपला हात विसावून तिच्याकडे बघत बसला. अर्धा तास.
साराच कार्टून बघून झाल टीव्हीवर. ती आत आली. लहान ती तिला काय कळतय ? तिच्या आवाजाने प्रतीक्षा जागी झाली. तिने डोळे उघडले. समोर अजिंक्य तिला बघत आहे. ती गालातच लाजून हसली. तीच लक्ष हाताकडे गेल. त्याचा आपल्या हातात हात बघून अजूनच तिला लाज आली. गोऱ्या गालांवर फिकट गुलाबी रंग जमला. सारा प्रतीक्षाच्या पायाशी काहीतरी खेळण घेऊन खेळत बसली. अजिंक्य प्रतीक्षाला बघतोय. ती तरी कुणाला बघणार ? ती हि अजिंक्यला बघतीय. अजिंक्यचा हातातला हात तसाच धरून आपल्या पोटावरून ती फिरवते. तिला बर वाटतय. अजिंक्यला हि पण या दोघांच्या प्रेमाने बाळाला अस वाटतय कि या दोघांच एकमेकांवरच इतक प्रेम आहे तर माझ्यावर करायला उरेल का काही ? आणि म्हणून याच हे प्रेम थांबव आणि बाळासाठी उराव म्हणून ते बाळ प्रतीक्षाला पोटाला लाथ मारूत. त्या लाथेने तिला त्रास झाला पण क्षणात तिच्या चेहऱ्यावर हसू आल. आई म्हणजे काय असते ? जी दुःखाला हि आनंदात बदलते. पण हि एवढी ताकद तिच्यात येते कुठून ? जेव्हा तिला साथ देणारा नवरा अजिंक्यसारखा असेल. अजिंक्य उठला. त्याला बघून सारा हातातल खेळण घेऊन बाहेर निघून गेली. त्याच संधीच सोन त्यान केल. प्रतीक्षाच्या कपाळावरून हात फिरवून तिच्या कपाळावर कीस केला. तिने त्याच्या हनुवटीला धरून खाली आपल्या ओठापाशी ओढलं. आणि एकमेकांत आपले ओठ गुंतवून दोघ सगळ विसरत गेले. अजिंक्य बाजूला झाला. प्रतीक्षा लाजली.
अजिंक्य : काय झाल ?
प्रतीक्षा : तुझ्यासारखा कुणीच नाही.
अजिंक्य : होका ? का बर अस ?
प्रतीक्षा : असच. प्रत्येकाला उत्तर नसत. बस जे असत ते फक्त असत.
अजिंक्य : जाऊ का ? स्क्रिप्ट लिहितोय. तुझी आठवण आली म्हणून आलेलो आत.
प्रतीक्षा : असा किती लांब बसला आहेस रे तू माझ्या पासून ?
अजिंक्य : खूप लांब.
प्रतीक्षा : हो का ? कुठ रे ?
अजिंक्य : हे आपली... बाहेरची खोली.
दोघ हसायला लागले.
प्रतीक्षा : वेड माझ बाळ.
अजिंक्य : सारा आणि येणार आपल बाळ दोघांपेक्षा हे मोठ बाळ आगावू आहे बर का.
प्रतीक्षा : असुदे. तेच बाळ मला जास्त आवडत.
आणि अजिंक्य तिच्या गालावरून एकदा हात फिरवून बाहेर निघून जातो. प्रतीक्षा डोळे मिटून पडून राहते. 
भाग : १२
प्रतीक्षा डोळे मिटून नुसती झोपलेली आहे. सारा तिच्याजवळ येऊन तिच्या हाताला धरते आणि उठायचा हट्ट करते.
सारा : मम्मी मला भूक लागलीय.
प्रतीक्षा : हो बाळा काय बनवू सांग बर तुला ?
सारा : वरण, भात, तूप आणि लोणच.
प्रतीक्षा : बर जा पप्पांना बोलावून आण.
सारा निघून गेली बाहेरच्या खोलीत. प्रतीक्षा उठून केस बांधायला लागते. आत अजिंक्य आला. त्याच्या कडेवर सारा होती.
अजिंक्य : कशाला उठलीस ? भूक लागलीय का तुला ?
प्रतीक्षा : साराला लागलीय आणि मला पण लागलीय.
अजिंक्य : बर मग मी बनवतो ना.
प्रतीक्षा : नको तू कशाला आणि आत्ता बघ ना आत्ताशिक सात वाजलेत. जेवले आत्ता तर परत नऊ, साडेनऊला भूक लागेल.
अजिंक्य : बर काय खाऊ वाटतय माझ्या बायकोला ?
प्रतीक्षा : माहित नाही पण मला आणि बाळाला दोघांना काहीतरी तिखट, चमचमीत खाऊ वाटतय.
अजिंक्य : चमचमीत पण काय ?
प्रतीक्षा : पाणीपुरी. ( ओली जिभ ओठांवरून फिरवत )
अजिंक्य : बर चल आवर जाता आपण खायला.
प्रतीक्षा : खर ?
अजिंक्य : हो चल. आल्यावर करेन मी माझ काम. आवर तू. आलोच मी.
सारा : पप्पा मला पण हवीय पाणीपुरी.
अजिंक्य : हो. चल आधी आपण कपडे बदलू.
सारा : मम्मी घालेल ना मला.
अजिंक्य : आई आजारी आहे ना मग असा त्रास नाही द्यायचा तिला सांगितल ना तुला. ऐकणार ना माझ बाळ ?
सारा : हो....
अजिंक्य : चला.. आपण जायचं आता पाणीपुरी खायला. येय.....
अजिंक्य साराला घेऊन बाहेरच्या खोलीत गेला. थोड्यावेळाने प्रतीक्षा बाहेरच्या खोलीत आवरून आली. अजिंक्य आणि सारा हि तयार होऊन बसलेले.
अजिंक्य : फोर व्हीलरने जाऊ.
प्रतीक्षा : कशाला. नको. राजवाडा काय लांब आहे का ? चालत जाऊया ना.
अजिंक्य : परत पाय दुखतो तुझा झोपताना. परवा बघितल ना कसा पायाला गोळा आला. मी चोळत बसलो म्हणून कमी आली सूज तुझी. ऐकत जा माझ जरा.
प्रतीक्षा : अह... आजूडी चल ना चालत. दिवसभर घरात बसून कंटाळा येतो मला.
अजिंक्य : बर. चल.
प्रतीक्षा, अजिंक्य, सारा तीघ रस्त्याने निघाले. राजवाड्यावर येऊन पोचले.
पाणीपुरीवाला : बोला साहेब किती करू ?
अजिंक्य : तीन प्लेट.
प्रतीक्षा : भैया दोन तिखट करा आणि एक गोड.
अजिंक्य : तिखट कुणाला ?
प्रतीक्षा : मला.
तीन वजा एक | नक्की वाचा.
अजिंक्य : बर.
सारा : मम्मी मला कुल्फी.
प्रतीक्षा : चल, मी आलेच एक मिनिट. दोघी तिकड कुल्फी आणायला गेल्या.
अजिंक्य : ऐक, एक पूर्ण तिखट बनव आणि दुसऱ्यात थोड गोड पाणी मिक्स कर पण कळायला नको अस कर.
प्रतीक्षा आणि सारा आली. अजिंक्य साराला पाणीपुरी भरवत असतो. ती एक पाणीपुरी खाते आणि थोडावेळ कुल्फी चोकते. अजिंक्य तो पर्यंत स्वतःची खायला लागतो. प्रतीक्षा एक पाणीपुरी खाते.
प्रतीक्षा : भैया, तिखट नाहीये पाणीपुरी.
पाणीपुरीवाला : तिखट हि तो है.
अजिंक्य प्रतीक्षकडे बघतो आणि तीच लक्ष नाही बघून पाणीपुरीवाल्याला डोळा मारत बोलतो,
अजिंक्य : आधी तिखट असायची पाणीपुरी, आज काय झाल ?
पाणीपुरीवाला : ये आज मी नाही बनवली. माझ्या छोट्या भावाची गाडी मी चालवतोय. तो गावाला गेला आहे बिहारला.
अजिंक्य : हम. तरीच म्हंटल चव मिडीयम झालीय.
प्रतीक्षा : अजिंक्य,
अजिंक्य : काय ?
प्रतीक्षा : बघू मला तुझ्यातली एक पुरी.
अजिंक्य : सेमच आहे कि आपली.
प्रतीक्षा : असुदे, तू माझी घे, मला तुझी दे.
अजिंक्य : अग नको. खा लवकर. आपल्याला घरी जायचय.
प्रतीक्षा : नाही दे ना. बघू लवकर.
तिने त्याच्या प्लेटमधली एक पाणीपुरी उचललीच आणि पटकन अख्खी तोंडात भरली. आणि डोळ्यात तिच्या पाणी जमा झाल.
अजिंक्य तिला खिशातून रुमाल काढून देतो. ती डोळे पुसते.
अजिंक्य : म्हणून मी त्यांना थोडस अगदी गोड पाणी मिक्स करायला सांगितल. तुला त्रास आणि आपल्या बाळाला पण त्रास होईल म्हणून तस केल.
प्रतीक्षा त्याला बघत असते.
अजिंक्य : अजून खाणार ?
प्रतीक्षा : हो.
अजिंक्य : सारा तू खाणार का ?
सारा : नक-को..
अजिंक्य अजून दोन प्लेट बनवायला सांगतो. साराला नको असते. तिची पाणीपुरी खाऊन कुल्फी पण उरलेली असते. तीच ते खात असते. अजिंक्य त्या माणसाला पुन्हा खुणावतो. तो माणूस प्लेट मध्ये पुऱ्या ठेवून त्यात रगडा आणि वाटणा भरतो. गोड पाण्याला आणि तिखट पाण्याला एकच पळी तो वापरत होता. त्याचा फायदा घेत त्याने गोड पाण्यातून काढलेली पळी त्यात अर्धी पळी गोड पाणी असत आणि त्याच अर्ध्या पळीत तिखट पाणी घेऊन तो पुऱ्या भरतो. आणि ती प्लेट प्रतीक्षा पुढे करतो. दुसरी एक पूर्ण तिखट प्लेट बनवून ती तो अजिंक्यला देतो. त्याचं खाऊन होत. तिघ माघारी घरी यायला लागले. अजिंक्यला एकावर एक कॉल यायला लागेल. पण तो काही कॉल उचलेना.
प्रतीक्षा : कोण आहे ? उचल ना कॉल.
अजिंक्य : प्रोड्युसर आहे.
प्रतीक्षा : मग ?
अजिंक्य : स्क्रिप्ट झाली नाहीये. घरी जाऊन पूर्ण करतो त्यांना मेल करतो मग कॉल लावतो.
प्रतीक्षा : सॉरी...अजिंक्य.
अजिंक्य : का ?
प्रतीक्षा : माझ्यामुळे तू बाहेर आला आणि रोजच तुझ कामाकड दुर्लक्ष होत माझ्यामुळे.
अजिंक्य : तुझ्यामुळे कामाकडे दुर्लक्ष झाल माझ तर मी ते पूर्ण करेन ग नंतर पण माझ्या कामामुळे तुझ्याकडे माझ दुर्लक्ष झाल तर त्याचा त्रास भरून न निघण्यासारखा आहे. त्यामुळे आहे ते आत्ता ठीक आहे.
ते दारात आले. अजिंक्य साराला कडेवरून खाली उतरवतो. कुलूप उघडत असताना प्रतीक्षाचा मोबाईल वाजतो. आणि ती बघते आणि ‘अजिंक्य’ अस नाव घेते.
अजिंक्य : काय झाल ?
प्रतीक्षाच्या डोळ्यात पाणी जमलेलं असत. आणि आता ते वाहणारच होत. त्या आधी ती जडपणे बोलते,
प्रतीक्षा : बाबांचा कॉल.......
भाग १३
प्रतीक्षा : हेल्लो, बाबा.
आई : बाबा नाही मी बोलतीय.
प्रतीक्षा : आ..आं..आई. कशी आहेस तू ?
आई : त्याच्याकड गेलीस आणि विसरलीस ना आम्हाला ?
प्रतीक्षा : नाही ग. सगळ अस घडत गेल आणि तुम्ही माझे कॉल उचलायचे बंद केले. ते जाऊ दे आई मला तुला भेटायचय ग.
आई : दिवस गेलेत न तुला ?
प्रतीक्षा : हो.
आई : मला समजल म्हणून विचारायला फोन केला.
प्रतीक्षा : आई बाबा कठा आहेत ?
आई : आहेत इथच शेजारी.
प्रतीक्षा : दे ना त्यांच्याकडे मोबाईल.
आई : त्यांना नाही बोलायचं तुझ्याशी. मलाच बातमी कळाल्यावर रहावल नाही म्हणून कॉल केला.
प्रतीक्षा : पूजा ? तीच कस चाललय कॉलेज ?
आई : लग्न झाल तीच. मागच्या महिन्यात.
प्रतीक्षा : मला नाही बोलवल ?
आई : आपल्यात काही नात आहे का ?
प्रतीक्षा : का मुलगी नाही का मी तुमची ?
आई : तू त्याच्याशी लग्न केल नसत तर चालल असत मला, बाबांना.
प्रतीक्षा : पूजा तर मला साधा मेसेज काय कॉल पण करत नाही.
आई : सांगितल ना तुला, अजिंक्य आम्हाला कधीच पसंत नव्हता आणि नाही.
प्रतीक्षा : तुमचा गैरसमज आहे त्याच्याबद्दल. पण तो आता तसा नाही. जितकी मी घरी नव्हते जितकी अमित सोबत नव्हते तितकी खुश आहे मी आत्ता. त्याच्यासोबत. तोंडातून काही शब्द काढायचा अवकाश कि सगळ पुढ्यात येत माझ्या ? साराला तर काय सांगू किती जपतो तो.
आई : अजून किती दिवस ? होऊ दे कि त्याच स्वतःच. मग कोण सारा न कोण काय ?
प्रतीक्षा : हेच. चुकत तुमच. सगळ तुमच तुम्हीच समजून जाता त्याच्याबाबतीत. पण तो तसा नाहीच. खूप चांगला आहे ग तो आई. एकदा भेट त्याला. प्लीज. मला पण भेटायचं आहे तुला.
आई : हे म्हणतायत उद्या ये म्हणून घरी.
प्रतीक्षा : खर ?
आई : हो. उद्या ये जेवायला.
प्रतीक्षा : येते मी.
आई : कुठे असता तुम्ही दोघ ?
प्रतीक्षा : म्हणजे ?
आई : रहायला  ?
प्रतीक्षा : सातारा.
आई : अजून तिथच मरतोय का तो ? तुला घेऊन. घर दार काय घेतल का त्याने ?
प्रतीक्षा : हो. साताऱ्यात त्याचच घर आहे. पुण्यात पण आहे. शिवाय बुलेट आहे स्विफ्ट आहे. घरात वॉशिंग मशीन पासून सगळ आहे.
आई : काम धंदा काय करतो ?
प्रतीक्षा : अग टीव्हीवर त्याच्या दोन मालिका सुरु आहेत. त्याने लिहिलेल्या. फिल्म पण येईल लवकरच त्याने लिहिलेली.
आई : बर. या उद्या.
अजिंक्य पाणी घेऊन येतो आणि प्रतीक्षाच्या समोर ग्लास धरतो.
प्रतीक्षा : अजिंक्य आलाय बघ. देऊ का त्याच्याकडे.
अजिंक्य प्रतीक्षाक्षकडे बघतो.
आई : नको. उद्या बोलेन. ठेवते.
कॉल कट होतो. प्रतीक्षा पाणी पिते आणि सांगते उद्या त्यांना पुण्याला तिच्या घरी जायचं आहे. अजिंक्य तयार होतो. अजिंक्य जाऊन वरण भात बनवतो. प्रतीक्षा सारा टीव्ही बघत असतात. अजिंक्य त्यांना जेवण वाढून.. नंतर रात्री स्क्रिप्ट लिहित बसतो. पहाटे चारला झोपतो आणि लगेच सहाला स्वतः उठून प्रतीक्षाला’ उठवून आवरून वैगरे हे तीघ आठ वाजता स्विफ्टमधून पुण्याला निघाले.        
भाग १४
गाडी प्रतीक्षाच्या माहेरी दारात थांबली. प्रतीक्षा गाडीतून उतरली. गाडीच दार लावल आणि घराच्या दारात जाऊन तिने बेल वाजवली. माहेरी आल्याच्या ओढीने ती साराला सोबत घ्यायचं पण विसरली. अजिंक्य गाडी पार्क करून साराला घेऊन प्रतीक्षाच्या मागे उभा राहिला. तीन चार वेळा बेल वाजवली पण दार उघडल गेल नाही. प्रतीक्षा एकदा मागे अजिंक्यकडे वळून बघते. तेवढ्यात दार उघडल्याचा आवाज येतो. ती पुढे बघते. दारात आई आणि बाबा. प्रतीक्षा जाऊन आईला घट्ट मिठी मारते. अजिंक्यकडे तिची आई आणि बाबा बघतात. अजिंक्य त्यांच्याकडे बघून स्मितहास्य देतो. पण बदल्यात ते काहीच चेहऱ्यावर भाव दाखवत नाही. साध खोट खोट हासण्याचा आव पण आणत नाहीत. अजिंक्यला ते समजल. तो साराला घेऊन तसाच माघारी निघाला. आई आणि प्रतीक्षाची मिठी सुटते..
प्रतीक्षा : कुठ चाललास ?
अजिंक्य : हिला कॅडबरी हवीय. इथ कुठ मिळती का बघतो.
प्रतीक्षा : नको. नंतर आणू. ये ना आत.
अजिंक्य : बर.
सगळे आत गेले. अजिंक्यला आत जाऊ वाटत नव्हत. पण गेला. आत गेल्यावर सोफ्यावर अजिंक्य शेजारी प्रतीक्षा आणि अजिंक्याच्या मांडीवर सारा बसली. अजिंक्याशिवाय पान हालत नव्हत साराच. ते सतत दोघांना बघून जाणवत होत. समोरच्या बाजूला सोफ्याच्या दोन खुर्चीवर आई आणि बाबा बसले.
आई : कस चाललय तुझ मनु ?
प्रतीक्षा : खूप भारी... म्हणजे विचार केला नव्हत मी इतक भारी.
बाबा : घर वैगरे झाल तुझ अस हि बोलली मला.
प्रतीक्षा : हो. बाबा. दोन घर झाली.
आई : तूला एकदा पण वाटल नाही का याव आमच्याकडे. बहिण आहे तुझी. म्हणजे होती इथ. तिला भेटाव. रोज आठवण काढायची ती तुझी.
प्रतीक्षा : मग कॉल का केला नाही तिने ?
आई : माहित नाही.
प्रतीक्षा : तुम्ही पण कुठ केला ?
बाबा : कारण माहित आहे तुला. तेच तेच बोलायला मला नाही आवडत.
प्रतीक्षा : बाबा. आधी सारख आता काहीच नाहीये.
बाबा : काही का असेना. रंकाचा राजा झाला म्हणून त्याच ऐश्वर्य, राहणीमान, आयुष्य, भविष्य बदलत, ती व्यक्ती बदलत नाही.   
आई : होना.
प्रतीक्षा : पण तुम्ही समजून का घेत नाहीये मला ?
आई : काय समजून घेऊ ?
बाबा : अमितच अस झाल सांगायचं तरी जावई होता आमचा शेवटच तरी बघितल असत.
प्रतीक्षा : अहो बाबा, तेव्हाची परिस्थिती काय सांगू तुम्हाला. आई, अमित दोघांचे धक्के एकामागे एक सहन कसे केले मी एकाच दिवशी माझ मला माहित.
बाबा : हो, पण सांगण कर्तव्य होत ना तुझ ? तो कोण लांबचा होता का ?
प्रतीक्षा : आता अजिंक्य आहे ना तुमचा जावई...
बाबा : आपल्या मराठी माणसात जावई आणि सून हि एकदाच असते. बाहेरची संस्कृती आपल्यात अमान्य आहे.
प्रतीक्षा : मग मी विधवा म्हणून रहायचं होत का आई-बाबा ?
आई : मुळीच नाही. मला माझी मुलगी मोकळ्या कपाळाची आवड्लीच नसती.
बाबा : आणि मुळात अस हे मुलीला घेऊन घरात ठेवलच नसत. चांगल स्थळ बघून लावल असत तुझ लग्न.
प्रतीक्षा : हो ना बाबा. मग माझ मी केल लग्न. माझ्या मर्जीने आवडीने आणि मुळात ओळखीच्या मुलाशी. ज्याने मला इतक प्रेम दिल. इतक समजून घेतल मला. आणि मुख्य म्हणजे मी विधवा असून मला स्वीकारलं. आणि माझ विधवापण विजवून टाकल. अशा मुलासोबत, अजिंक्य सोबत मी सुखात आनंदात आहे. हे कमी नाही का ?
बाबा : तुला पटतय ना सगळ. मग आमचा त्यात काही विचार करू नकोस. असो. खायला बनवल आहे नाष्टा खाऊन घे चल.
आई, बाबा, प्रतीक्षा उठले. प्रतीक्षा अजिंक्याकडे बघते. आई बाबा आत गेले.
प्रतीक्षा : चल ना.
अजिंक्य : तुला एकटीला बोलावल आहे. साराला घेऊन जा आहे मी इथच.
प्रतीक्षा : नाही रे माझ पण आहेच कि हे घर. चल तू पण.
अजिंक्य तिला जायला सांगतो. प्रतीक्षा आत जाते. तर आत आई बाबा तिची वाट बघत थांबलेले असतात. तीन मोठ्या ताटात पोहे असतात आणि साराला छोट्याश्या ताटात पोहे असतात. प्रतीक्षा हे बघते आणि तिला आतून रडल्यासारख होत.
प्रतीक्षा : आणि त्याला ?
बाबा : त्याला घरात घेतल हेच खूप आहे.
प्रतीक्षा : आई, मी येते.
बाबा : कुठ ?
प्रतीक्षा : साताऱ्याला. जिथ माझ्या नवऱ्याचा अपमान होतो तिथ मी का निर्लज्जासारख थांबू. माझ्यावर कमी प्रेम करणारा माझा नवरा असता. मी त्याच्यासोबत सुखी नसते असा तो जर का नवरा असता तर मी इथ आरामात खात बसले असते पण हा माझा अजिंक्य आहे. आणि त्याच्याबाबतीत कोणतीच चुकीची गोष्ट मला पटत नाही. आणि हा त्याचा अपमान आहेच पण मी त्याची बायको आहे आणि तो माझा हि अपमान आहे. इतक्या महिन्यांनी घरी आले. वाटल होत सगळ नीट असेल पण...
आई : ती दिसतीय ना तुला मोकळी ताटली. भरायची आहे अजून मला. जा त्याला बोलाव.
प्रतीक्षा बाहेर गेली अजिंक्यला बोलवायला.
आई : ( हळू आवाजात ) अहो, दिवस गेलेत तिला. तुम्हालाच हव होत ना बाळ तीच खेळवायला. मग नीट वागा ना नसेल आवडत तो तरी बोला खोट खोट गोड त्याच्याशी. म्हणजे तो पण तिला इथ राहू देईल प्रेग्नन्सी होईपर्यंत. कळतय का तुम्हाला ?
बाबा : हो. बर बाई. पण त्याला जाऊ दे आज. रहायला थांबवू नकोस. बोलू पण नकोस. आपल्या मनुला थांबव.
आई : तेच डोक्यात आहे माझ्या.
प्रतीक्षा आणि अजिंक्य आत आले. आई-बाबा दोघे हि शांत झाले.
भाग १५
बाबा : अजिंक्य, ये बस माझ्या शेजारी.
अजिंक्य : आ ? हा. आहे प्रतीक्षा शेजारी..
बाबा : पहिल्यांदा आलायस. बस इथे ये.
प्रतीक्षा : ( दबक्या आवजात ) जा ना बाबा बोलवतायत तर.
अजिंक्य त्यांच्याशेजारी जाऊन बसला. त्याच्यापुढे बाबांनी पोह्याच ताट केल. सगळे शांतपणे खात होते. खाऊन झाल. अजिंक्य उठला आणि साराला हात धुवायला घेऊन गेला. त्याने पण हात धुतला आणि दोघ बाहेर सोफ्यावर येऊन बसले. त्याच संधीचा फायदा घेत आई आता विषय काढणार होती पण त्यांनी आधी प्रतीक्षाच्या बाबांना डोळ्यानेच खुणावल. बाबा लागलीच पटपट घास घश्यात ढकलत उठले. घशात पोहे अडकले त्याला ग्लासभर पाणी पिऊन गिळून टाकल आणि ते बाहेर गेले.
अजिंक्य आणि सारा बसलेले. सारा अजिंक्याच्या मोबाईलमध्ये कार्टून बघत बसलेली. अजिंक्य हि तेच बघत बसलेला. बाबांना बघून तो सावरता झाला. बाबा त्याच्या शेजारी जाऊन बसतात.
बाबा : अजिंक्य, कशा चालल्यात मालिका तुझ्या ?
अजिंक्य : चालल्यात छान. तुम्ही कसे आहात ?
बाबा : मी ठीक. उत्तम आणि हो बाबा म्हणालास तरी चालेल मला. डायरेक्ट बोलण सुरु करायची गरज नाही.
अजिंक्य : चालेल. तुम्हाला कसला त्रास वैगरे नाही ना बाबा ?
बाबा : आहे कि, शुगर आहे. डोळ्याचा नंबर आहे.
अजिंक्य : मग औषध सुरु आहेत का ?
बाबा : सगळ आहे सुरु. वय वाढल कि किती काही केल तरी तात्पुरता फरक आणि मनाला दिलासा. शेवटी मरायचच असतय.
अजिंक्य : अहो अस का बोलताय ?
इकडे आई आणि प्रतीक्षाच बोलन सुरु आहे.
आई : मनु, खूप इच्छा आहे ग आमची दोघांची तुझ्या आणि पूजाच्या बाळांना अंगाखांद्यावर खेळवायचं. साराच्या वेळी तू पुण्याला होती. पण आता आहेस तू. पूजाला अजून वेळ आहे. तिचा नवरा म्हणत होता ते दोन वर्ष काही चान्स घेणार नाही. दोन वर्ष अजून आणि बाळाला अजून पुढे एक वर्ष. पुढच आम्हाला आमच काय ग माहित, आज आहे उद्या नाही.
प्रतीक्षा : अग आई अस का बोलतीस ?
आई : मुलबाळ वयात आल कि समजून जायचं असत आपण संपत चाललोय.
प्रतीक्षा : अस काही नाही. गप. अजून खूप जगणार आहे तुम्ही. अस बोलत जाऊ नकोस मला नाही आवडत.
आई : हो ना. मग मला जास्त जगायला आनंद हवाय.
प्रतीक्षा : मग आहे ना मी. आता बोलतोय ना आपण. मला टेन्शन होत बाबांना आवडेल न आवडेल. पण ते पण अजिंक्यशी बोलायला लागलेत. आता आम्ही येत जाऊ अधून-मधून.
आई : मी काय म्हणते.
प्रतीक्षा : काय ?
आई : त्याला येउ दे अधून-मधून. तू थांब कि इथेच ?
प्रतीक्षा : का ग ?
आई : बाळंतपणासाठी. बाळ आपल्याच घरात होऊ दे.
प्रतीक्षा : मला पण आवडल असत. पण अजिंक्यची काम सुरु आहेत. रात्रभर तो जागा असतो. स्टोरी लिहित. सकाळचा झोपून असतो. त्याच खाण पिण मला बघाव लागत दुसर कोण आहे त्याला ?
आई : तू काम करतेस ? या अशा अवस्थेत.
प्रतीक्षा : अग काहीच करत नाही. सगळ तोच करतो बस त्याला रात्री जेवायचा हट्ट मला करावा लागतो. बाकी सगळ तो करतो. सकाळची कॉफी ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ तोच करतो.
आई : हो. अग पण लेकीच केल तर मला पण तेवढच बर वाटेल. आणि घरात इन मीन दोन माणस आम्हाला पण घर भरल्यासारख वाटेल. हव तर मी बोलते अजिंक्यशी.
प्रतीक्षा : ऐक आम्ही आज जातो. घरी जाऊन मी त्याच्याशी बोलते. आणि मग दोन तीन दिवसांनी परत येते. चालेल ?
आई : पण नक्की येणार का ?
प्रतीक्षा : हो.
इकडे बाहेर.
अजिंक्य : अहो बाबा आम्ही आहोत ना तुमचे. तुम्ही बोला ते करू. बस तुम्ही आनंदी रहा. मी तुम्हाला त्रास दिलाय आधी पण ती कसर मी भरून काढली प्रतीक्षा सोबत लग्न करून. फक्त माफ करा आता मला.
बाबा : एका अटीवर करेन.
अजिंक्य : कोणत्या ?
भाग १६
अजिंक्य बाबांकडे बघत आहे.
बाबा : तू प्रतीक्षाला इथ सोडून जा.
अजिंक्य : सोडून जा म्हणजे ?
बाबा : अरे कायमच नाही. बाळंतपणासाठी.
अजिंक्य : मी करतोय तीच सगळ नीट. काळजी घेतो मी तिची.
बाबा : हो मान्य आहे मला तुझ बोलण पण कस रे गर्भसंस्कार वैगरे कस हे बायकांना कळत. तिची आई घेईल ना तिची काळजी नीट. तू ठेवतोस तसच तिला ठेवणार आम्ही एखाद्या राणीसारख. म्हणजे कस तिला तिची आई सगळ शिकवेल. साराच्या वेळी तिच्या सासूने काहीच तिला करू दिल नाही आणि सांगितल पण नाही. त्यामुळे तिला इतक काही माहित नाही. आत्ता शिकेल म्हणजे कस पुन्हा कधी अजून झाल एखाद मुल तर तुम्हालाच सोप्प जाईल. आणि हि मुल मोठी झाली कि सारा तुमच्याकडेच येईल बाळंतपणाला तेव्हा माहित असायला हव प्रतीक्षाला काय म्हणतोस ?
अजिंक्य : पटतय मला पण.
बाबा : पण काय
अजिंक्य : तिच्याशिवाय रहायची सवय नाही मला.
बाबा : होईल...होईल. अमित सोबत लग्न झालेलं तीच तेव्हा राहिलाच होतास ना तिच्याशिवाय ?
अजिंक्य : हो पण ती वेळ वेगळी होती. आमच नात वेगळ होत. पण आत्ता तस काही नाही ना बाबा.
बाबा : होईल सवय. आणि तुझ्यासाठी दार उघडी आहेतच हि. केव्हा हि.
अजिंक्य : केव्हा हि ?
बाबा : हो केव्हाही. आली आठवण कि येत जा.
अजिंक्य : बर मग मी तिला विचारतो आणि सांगतो.
बाबा : सांगायचं काय त्यात ? तिला ठेवून जा इथच. कपडे आणून दे तिचे उद्या. हा. जमेल ना तुला ?
अजिंक्य : बर चालेल.
तेवढ्यात आई आणि प्रतीक्षा बाहेर आल्या. अजिंक्याच्या डोळ्यात पाणी तरळत होत. कुणाला समजल नाही पण प्रतीक्षा नेमक ते हेरते. प्रतीक्षाची आई बाबांना आत बोलावते. प्रतीक्षा अजिंक्य जवळ जात त्याचा हात धरते.
प्रतीक्षा : काय झाल ?
अजिंक्य : काही नाही.
प्रतीक्षा : अजिंक्य.
अजिंक्य : काय झाल ?
प्रतीक्षा : काही नाही.
अजिंक्य : अस कस ? काही नाही. अशी का रडवेली झालीयस ?
प्रतीक्षा : तूपण झालायस कि, पण सांगतोयस का ?
अजिंक्य : तुझे बाबा म्हणत होते कि,
प्रतीक्षा : कि प्रतीक्षाला इथ राहूदे.
अजिंक्य : हो. तुला कस माहित ?
प्रतीक्षा : आई आणि बाबांनी ठरवून आपल्याला इथ बोलावलं आहे.
अजिंक्य : मग काय करायचं ?
प्रतीक्षा : मी बोलले आईला अजिंक्यला विचारून सांगते. मला इथ राहायचं आहे पण तुझ तिकड कोण बघणार ? मी बोलले आईला पण ती ऐकायला तयार नाही.
अजिंक्य : ठीके मी जातो. आणि तुझे कपडे आणून देतो. तू रहा इथ. मी बघतो मेस वैगरे लावतो. आणि आठवड्यातून येत जाईन मी.
प्रतीक्षा : आपणच आई-बाबांना घेऊन गेलो तर साताऱ्याला ?
अजिंक्य : मला नाही वाटत येतील ते.
आई हे ऐकते आणि पुढे येते. मागून बाबा हि त्यांच्या शेजारी थांबतात.
आई : बाळंतपण माहेरी व्हाव अस शास्त्र असत. आपण कशाला उगीच खो घालायचा त्यात. आणि पुणे सातारा काय लांब आहे का ? बसने आल तर दोन तास गाडीवरून दीड तास. दुपारची डुलकी लागली तर ती पण दोन चार तासाची लागते. हा प्रवासाचा वेग तर त्या मानाने कमीच आहे. हो ना ? अजिंक्य ?
अजिंक्य : आ ? हो.
प्रतीक्षा : बर. अजिंक्य. राहते मी इथ. आता नाही मला दुखवायचं अजून आई-बाबांना माझ्या.
अजिंक्य : हो. चालेल. मी उद्या आणून देतो कपडे. निघू का मी ? आई बाबा निघतो मी.
आई : जेवून जा कि आलायस तर ?
बाबा : हो. मी काय म्हणतो संध्याकाळी जा. चार पाचला आणि उद्या ये सकाळी.
अजिंक्य : काम उरल आहे. एपिसोड द्यायचेत मालिकेचे. जाऊन कराव लागेल. अचानक इकड आल त्यामुळे काम उरलय. मी येतो उद्या.
प्रतीक्षा : नक्की ?
अजिंक्य : हो.
सारा : मी येऊ ?
अजिंक्य : नको बाळ. आता तू इथ राहा. हा ? आईजवळ. मी उद्या येतो...

अजिंक्य तिथून निघाला. आणि साताऱ्यात आला. इकडे प्रतीक्षा आणि साराचा पाहुणचार अगदी जोरात सुरु होता.
शेवटचा भाग
अजिंक्य घरी आला. दार उघडल आणि तिथून जी शांतता त्याला जी जाणवली ती आजवर त्याला जाणवली नव्हती. भकास झालेलं घर. कित्येक दिवस कोण या घरात राहतच नसेल अस काहीस वातावरण घरातल झालेलं. अजिंक्य आत जाऊन प्रतीक्षाचे कपडे घेतो. साराचे घेतो. आता थोड्या उशिराने निघावं म्हणून तो तिथच बेडरूममध्ये तिरका झोपून राहतो. शांत घरात अजिंक्यच्या मनात डोक उठेल इतक्या गोंधळाचे विचार त्याला यायला लागले. प्रत्येक गोष्ट डोक्यात त्याच क्षणी मनात आणि काही त्या विचाराशी मिळते जुळते क्षण डोळ्यासमोर अगदी स्पष्ट दिसत होते. प्रतीक्षा जी अजिंक्यला आवडत होती. पण तिच्याशी त्याच लग्नच झाल नाही. साधी मैत्री हि नाही. तिची मात्र जास्त आठवण यायला लागली का कुणाला माहित ?
खर प्रेम खोट प्रेम काही नसत हे असल. प्रत्येक वेळीस होणाऱ्या प्रेमात त्यावेळेची, त्यामागची भावना हि खरी असते. फक्त खर. प्रेम म्हंटल कि त्याच्यापुढे किंवा माग त्याला खोट हे नाव-आडनाव लावायची गरज नसते. माणूस फसवा असतो प्रेम नाही. पण नेमक खर प्रेम ओळखताना माणूस फसतो. दिखाऊ प्रेमाला खर समजून पश्चताप करत बसतो. आणि मग प्रेमाला खोट ठरवून जगभर दवंडी पिटवत बसतो. त्या शाळेतल्या प्रतीक्षाने पण असच केलेलं. अजिंक्य रोज तिला बघायचा ती दिसेल तिथे. तिला ते माहित होत. उन्हात तर उन्हात तिला उभा राहून बघायचा. चक्क दाट पावसात हात खिशात घालून भिजत तिला बघत बसलाय. थंडीचा पातळ शर्ट अंगावर असून पण तिच्यामागे मागे ती जाईल तिथे फिरलाय. त्याने कधी तिला त्रास दिला नाही. कधी तिला अडवल नाही. काही प्रेमाची कधी कबुली दिली नाही. सगळ कस त्याच्या बाजूने होत. शांत होत पण खर होत. आणि तिला ते खोट, वरवरच वाटत होत. आणि तिच्या वर्गाच्या शेजारचा वर्ग म्हणजे ‘ब’ तुकडीतला मुलगा वरद त्याच्याशी तिची मैत्री झाली. ‘अ’ आणि ‘ब’ तुकडीची मुल हुशार असतात अगदी ती कोणत्या हि शाळेत असो. पण प्रत्येक शाळेत तसच असत किंवा तसा समज असतो.
 तीही त्याच विचाराने आणि त्याच्या मार्क्सना बघून त्याच दिसण बघून त्याच्याशी बोलायला लागली. त्याच्या वह्या वैगरे घरी अभ्यासाला नेण सुरु झाल तीच. अजिंक्यला हे माहित असायचं आणि त्याच वाईट हि वाटायचं. वहीतल्या स्वाध्यायची जागा कधी प्रेमाच्या शब्दांनी घेतली तिला कळाल नाही. त्यान ते मुद्दाम केल असाव.
आणि हे अजिंक्यला माहित होत. अजिंक्यला काय माहित नव्हत ? तिची आवड-निवड, तीच कुठ येण-जाण सगळ त्याला माहित होत. अगदी तिचे क्षणा-क्षणाला श्वास घेण हि त्याला माहित होत. इतक त्याच प्रतीक्षावर प्रेम होत. आणि ती वरद वर फिदा झाली. दुपारचे अडीच वाजलेले. अजिंक्य शाळेच्या वरच्या पटांगणावर गेला होता एका मित्रासोबत तेव्हा त्याला वरद एका मुलासोबत सिगरेट ओढताना दिसला. तो वरद होता. पण हे सांगितल्यावर प्रतीक्षाला विश्वास बसणार होता का ? अर्थातच नाही. पण तिला त्याच्यापासून तोडाव कारण तो मुलगा चांगला नाही या विचाराने अजिंक्य तयारीला लागला. माझ्या नशिबात नाहीतर निदान तिच्या नशिबात असला मुलगा तरी नको अस त्याच मत होत.
पण तो करणार काय होता ? त्याला मारलं तर तो प्रतीक्षापुढे अजिंक्यच नाव घेईलच आणि प्रतीक्षाच्या नजरेत पडण अजिंक्यला मंजूर नव्हत. कराव काय ? मित्राला सांगाव तर त्यांचा हि भरवसा नाही. शेवटी मनाला अजिंक्येने आवर घातला आणि दुपारची सुट्टी सुरु असतानाच त्याने फुटका तलाव गणपतीच मंदिर गाठलं. देवापुढ हात जोडून त्याने एकच मागितल. ‘देवा तिला माझ्या नशिबात लिहून ठेव कारण तिला जपेन नीट मी असा इतरांसारखा नाही हे तुलासुध्दा माहित आहे.’ देवाने त्याच ऐकल. पण निम्मच. वरद आणि प्रतीक्षाची मैत्री तुटली. पण अजिंक्यच्या नशिबात ती आलीच नाही. का याच उत्तर लिहायला माझ्याकडे पण नाही.
प्रतीक्षा आणि वरद पुन्हा नववीत मित्र झाले. अजिंक्य गुरुवार बागेत एकदा गेला होता. वेळ होती सव्वा आठची. बाग आता बंद होणार होती. हळू हळू लाईट बंद व्हायला लागल्या. माणस घरी जायला लागली. छोट्या मुलांची अंधारात रडा-रड सुरु झाली. आणि अशात अजिंक्य हि बाहेर यायला निघाला असताना पायरीवर बसलेल्या जोडप्याकडे त्याच लक्ष गेल. अंधार आणि त्या अंधारात चेहरा काय अंगावरच्या ड्रेसचा रंग हि दिसण मुश्कील. पण त्यात हि सावलीवरून अजिंक्यने ओळखल कि ती प्रतीक्षा होती. आणि तो वरद. त्याने तिला खांद्याला धरून तिच्या ओठांना आपल्या ओठात धरून काहीतरी प्रेमाचा चाळा सुरु होता. अजिंक्यच्या छातीच्या धडधड होण्याला काही सुमारच नाही. डोळ्यात पाणी साठल. धरण तुडुंब भरून जाव फक्त दरवाजे खोलले जावेत आणि ज्यादाच पाणी वाहून जाव असच होण बाकी होत.
आणि धरणाप्रमाणे डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप झाली. पाणी गालावरून वाहून जायला लागल. अजिंक्य तिथून निघून गेला आणि त्या नंतर त्याने कधी प्रतीक्षाकडे बघितलच नाही. विचार हा सुरु होता आणि कॉल आला.
अजिंक्यने कॉल उचलला.
अजिंक्य : बोल.
अंजली : उद्या वाढदिवस आहे ना तुझा ?
अजिंक्य : हो.            
     
    
  

 *समाप्त*


या कथेचे पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा             

( या कथेला समजून घेण्यासाठी प्रेमाची शप्पथ आहे तुला , प्रेमाची शप्पथ आहे तुला पर्व २रे , खोट्या प्रेमाची शप्पथ आहे तुला , कुणीतरी आणि कुणीतरी २ या कथा वाचाव्यात )


सावधान....! या कथेला ऑनलाइन रजिस्टर केले आहे. त्यामुळे या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.            


12 टिप्पण्या

  1. पुन्हा एकदा तुमची आवडती कथा घेऊन सादर होत आहे... आपलं प्रेम आशीर्वाद असच राहूदे...

    उत्तर द्याहटवा
  2. या कथेच्या शेवटी रुसवा कथेची लिंक टाकली आहे क्लिकरा

    उत्तर द्याहटवा