प्रेमाची शप्पथ आहे तुला २


भाग ०१
अजिंक्य : आता काय आणायचं राहीलय ?
प्रतीक्षा : झालंय सगळच फक्त अळूची वडी बनवायची राहिलीय.
अजिंक्य : चालेल मग मी आलोच जरा बाहेरून.
प्रतीक्षा : आता कुठे बाहेर चाललास ? थांब ना ते नैवेद्य दाखव आणि वर घास पण ठेवायचाय.
अजिंक्य : हो. कॅडबरी आणायला जातोय.
सारा तिकडून कॅडबरी इतकाच शब्द ऐकून पटकन अजिंक्यच्या मांड्याना कवटाळून वर बघते.
सारा : मला पण पाहिजे.
अजिंक्य : तो बाप्पाचा नैवैद्य आहे. मी तुला नंतर आणतो हा संध्याकाळी.
सारा : आ..... मला पण पाहिजे.
अजिंक्य : बर चल आईला काम करू दे आपण पटकन कॅडबरी घेऊन येऊ. एक तुला आणि एक.... चला बब्बू.
अजिंक्य प्रतीक्षाकडे बघतो. ती नजर चुकवते आणि किचनमध्ये जाते. अजिंक्य साराला कडेवर घेतो आणि दाराला बाहेरून कडी लावून मेडिकलमध्ये जाऊन पर्कच्या दोन कॅडबरी घेतो आणि साराला देतो. आणि एक डेरीमिल्क सिल्क मोठी कॅडबरी घेऊन ती शर्टच्या वरच्या खिशात ठेवतो. मग साराचा हात धरून चालायला लागतो. तिला कॅडबरी खायची असते. मग तो तिला उजव्या बाजूला कडेवर उचलून घेतो. कारण डावीकडच्या खिशात कॅडबरी असते. इतका वेळ घरातच असल्यामुळे त्याला काही वाटत नव्हत. पण आता बाहेरून अचानक घरात आल्यावर अनोळखी घरात आल्यासारखं वाटल अजिंक्यला. वेगवेगळ्या पदार्थांचा वास घरभर पसरलेला. आणि त्या वासात धुपाचा वास पण येत होता. आतल्या पदार्थांचा वास बाहेर धुपाचा, फुलांचा वास आणि त्यात भर पडली अळूच्या वडीची. अजिंक्य साराला कडेवरून खाली सोडतो आणि आतून दार लावून घेतो. सारा सोफ्यावर बसून कॅडबरी खात बसते. अजिंक्य आत किचनमध्ये जातो. बेसिनपाशी जाऊन हात धुतो. मग एक मोठी थाळी घेतो. त्याला पुसतो.
प्रतीक्षा एकेक नाव घेते तस अजिंक्य त्या थाळीत तो पदार्थ ठेवत राहतो. मिश्रभाज्या, काकडीची थंड कोशिंबीर, गाजराची चटणी, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी, अळूची वडी, ढेसे, चपाती, मीठ, लिंबू, बासुंदी, श्रीखंड हे सगळ भरून झाल. मग बाजूला कुरडई आणि जरा तळलेल पापड सोबत कांदा भजी ठेवल्या. मग एका वाटीत आमटी ठेवली. एक मोकळी वाटी प्रतीक्षाने अजिंक्यच्या हातात दिली.
अजिंक्याने त्यात जरास पाणी भरल आणि ओतून दिल. वाटी आतून ओली झाली. मग त्यात भातवाडीने भात काठोकाठ भरला. आणि वाटी थाळीत पलटी केली. बरोबर गोल भाताची मुद झाली. प्रतीक्षा लागलीच गरम-गरम वरण जरास पळीतून घेऊन आली आणि तिने त्या भाताच्या मुदेवर वरण ओतल. मग अजिंक्यने कट्ट्यावरचा तुपाचा डबा उघडून बघतील तूप जरा घट्ट होत. मग तेलाची कढई चालू होती. कढई शेजारी डबा ठेवला. दोनच मिनिटात तूप आळल. पातळ झाल. मग चमचा त्यात बुडवून एक चमचा तूप त्या वरण-भाताच्या मुदेवर सोडल. मग प्रतीक्षाने अळूच्या वड्या तळायच्या थांबवल्या. ती हात धुवून तांब्या भांड भरून घेऊन बाहेर आली. अजिंक्य थाळी घेऊन बाहेर बसलेलाला. एका टेबलावर थाळी ठेवली. प्रतीक्षाने शेजारी तांब्या भांड ठेवल.
अजिंक्य : सारा जा आतून वाटीत थोडस पाणी आण. पिंपातल.
साराची कॅडबरी एव्हाना खाऊन झालेली. तिने कागद तसाच तिथे सोफ्यावर ठेवला. आणि आत गेली. प्रतीक्षा तो पर्यंत दिव्याची वात जरा पुढे ओढून विजलेला दिवा पेटवते. आणि वरून थोड तेल दिव्यात घालते. सारा अजिंक्यला वाटी देते. अजिंक्य त्यात उजव्या हाताच दुसर आणि तिसर वाटीतल्या पाण्यात बोट बुडवून थाळी भोवती तीन वेळा हात फिरवतो. आणि पुढे ठेवलेल्या दोन फोटोंना नमस्कार करतो. सारापण लगेच अजिंक्य जवळ बसून नमस्कार करते. अजिंक्य उठतो. प्रतीक्षा खाली गुढग्यावर बसून फोटोंना नमस्कार करते. अजिंक्यच्या लक्षात येत. थाळी शेजारी उजवीकडे पाण्याची वाटी असते आणि डावीकडे भरलेल तांब्या भांड. अजिंक्य लगेच ती वाटी उचलून साराला देतो आत ठेवायला. सारा वाटी घेऊन जाते. आणि अजिंक्य खिशातून कॅडबरी काढून दुसऱ्या नंबरच्या फोटो पुढे ठेवतो. अजिंक्याच्या डोळ्यात पाणी येत. प्रतीक्षाची हि त्याच स्थिती होती.
प्रतीक्षा : घास वर ठेवून ये. मी बनवते. आत.
अजिंक्य : हा झाल कि हाक मार. मी जरा इथल आवरून घेतो. मग जेवू सावकाश. साराला दे आत्ता. खायला.
प्रतीक्षा : हा तिला भरव तु. मी तोवर घास बनवते.
प्रतीक्षा आत गेली. अजिंक्य त्या दोन फोटोकडे पाहतो. अजिंक्य सजीव असून निराश उदास दिसत असतो आणि फोटोमधले शिवानी आणि अभिजित स्मितहास्य करत असतात. ‘किती हा (आ)भास आहे माणसाचा. जिवंतपणी जो तो अगदी प्रत्येक माणूस दुखःत असतो. निराश, उदास चेहरा करून वावरत असतो. खर तर हसायची रडायची, स्वतःच्या मर्जीने मुभा असते पण जो तो रडण्यात आणि उदास होण्यातच आयुष्य घालवतो. मग अशात आजूबाजूला हसणारे चेहरेच खरे फसवे वाटतात. आणि इथून निघून गेल्यावर कशाची मुभा नाही. माग उरलेल्यांनी फक्त रडायचं. आणि निघून जाणारा निष्ठुरासारखा फोटोतून हासत राहतो. काय अर्थ आहे का त्याला.’
प्रतीक्षाचा आतून आवाज आला, “साराला घेऊन जा रे अजिंक्य... बघ काय काय मागतिय”.
अजिंक्यची विचारांची तंद्री तुटली. तो फोटोकडे बघून हळू आवाजात बोलला “खूप लवकर गेलात, पण काळजी घ्या. घाईत जाताना खूप काही माग राहिलंय तुमच, पण माघारी पण येता येणार नाहीये तुम्हाला. आत्ता नाही तर पुढल्या जन्मी एकत्र भेटू, काळजी घे शिना. डेरीमिल्कची जाहिरात बघितली तरी तुझी आठवण येती. काळजी घे.अभिजित तू सुद्धा”
डोळ्यातून एक थेंब टपकला. अजिंक्य अंगठ्याने ते पाणी पुसून आत निघून गेला.


भाग ०२
साराला भरवून झाल. आता अजिंक्यने तिला टीव्ही लाऊन दिला. मग प्रतीक्षा आणि अजिंक्य आत जेवायला बसले. दोघांच शांत जेवण सुरु होत.
प्रतीक्षा : झालंय का रे चांगल जेवण ?
अजिंक्य : विषयच नाही. तुझ्या हातची चव कुणाला नाही. तुझ्या हातची चव, तुझे हात आणि.. अंमम... तू स्वतः. तुझ्यासारखी जगात कोण नाही प्रतीक्षा.
प्रतीक्षा : गप. काहीही काय. मी विचारलं काय तू सांगतो काय ? आणि लग्न झाल कि आपल आता कसल प्रेम करतोस ?
अजिंक्य : आता हा नियम कुणी काढला कि लग्न झाल कि प्रेम करायचं नसत.
प्रतीक्षा : नियम काढला कुणीच नाही पण लग्न झाल्यावर प्रेम करायचं नसत निभवायचं असत.
अजिंक्य : ते तर सुरु आहेच. पण कस आहे प्रेम करून ते निभावून नेण मान्य आहे पण ते टिकवून ठेवायला हव का नको ? त्यासाठी तारीफ़ तर हवीच. बायकोने कधी नवऱ्याची तारीफ केली आणि त्याच नवऱ्याने बायकोची रोज अख्ख्या एक दिवसात तारीफ केली तर प्रेम टिकून राहील अस मला तरी वाटत. म्हणजे बघ हा तू आता.... तुला आपल्यातल प्रेम टिकवायच आहे का नुस्तच निभवायचं आहे ?
प्रतीक्षा : हम. चपाती घे.
अजिंक्य : नको बस झाल.
प्रतीक्षा : नको काय घे एक खा.
अजिंक्य : नको खाल्ल्या असत्या अजून दोन पण माहितीय ना मला हे महाळाच जेवण आवडत नाही.
प्रतीक्षा : अस करू नको. अर्धी तरी खा. हे घे.
ती त्याच्या ताटात तीन चतकोर चपात्या ठेवते. आणि इतक्यात मोबाईलची रिंग वाजते. अजिंक्य कॉल उचलतो.
अजिंक्य : हा बोला ?
अग्रवाल : हा अजिंक्य बोलताय ना ?
अजिंक्य : हा मीच बोलतोय. अजिंक्य.
अग्रवाल : हा ते घराला भाडेकरू आलेल, तर ते समान कधी नेताय ?
अजिंक्य : दोन दिवस देता का ? जरा काम सुरुय माझ. सिरीयची स्क्रिप्ट सुरुय. परवा आलो मुंबईहून कि नेतो. थोडच राहिलंय समान.
अग्रवाल : हो पण ते भाडेकरु परवा येणारेत राहायला. पुण्यातून इकड सेटल होणारेत. मग जरा बघा.
अजिंक्य : खरच वेळ नाही मला.
अग्रवाल : चावी पण तुमच्याकडे आहे एक ज्यादाची. आजच न्या जमल तर.
अजिंक्य : एक मिनिट हा.
अजिंक्य प्रतीक्षाकडे बघतो. मोबाईल मांडीवर उपडा ठेवतो. जेणे करून त्या दोघांचा आवाज पलीकडे जाऊ नये.
अजिंक्य : अभिजितच्या रूम मधल सामान न्या म्हणतायत अग्रवाल. ते पण आजच. परवा भाडेकरू येतायत तिथ नवीन. काय करायचं.
प्रतीक्षा  : मी करते जस्ट डायलला कॉल आपण बघू समान नेणाऱ्या एजन्सीला लावू कामाला. आपण कुठ काय नेणार आणि तूच एकटा आहेस. ते दोन कपाट आणि तो बेड. एक सोफा. नाही जमणार आपल्याला. आणि ते कुठ न्यायचंय ?
अजिंक्य : इथ आणायचं आहे. शिनाच्या घरचे येणारेत न्यायला शनिवारी. मग त्याचं त्यांना द्यायचं. फक्त आणून इथ ठेवायचंय.
प्रतीक्षा : मग चालेल. सांग त्यांना नेतो आज म्हणाव तासाभरात बघतो कोण तरी गडी आणि गाडी. आणि मग घेऊन जाऊ.
अजिंक्य : हम.. ( कानाला मोबाईल लावून ) हा. हेल्लो.
अग्रवाल : हा बोला,
अजिंक्य : मला दोन तास द्या वेळ मी येऊन घेऊन जातो.
अग्रवाल : चालेल.चालेल. चावी आहेच तुमच्याकडे जाताना फक्त चावी देऊन जावा. मिसेसकडे. आणि तेवढ भाड पण द्या तीन महिन्याचं.
अजिंक्य : ( प्रतीक्षाकडे बघत ) भाड ? कसल भाड ?
अग्रवाल : समान होत ना अभिजितच. जागा नाही का माझी अडून राहिली. त्यात त्या गाडीमुळे त्याच्या माझी गाडी मला दुसरीकडे लावायला लागली. तुम्ही काय लक्ष दिल नाहीतच परत.
अजिंक्य : पण तो तर गेला ना. म्हणजे भाड द्यायाला ना नाही माझी पण जरा समजून घेतलत तर...
अग्रवाल : मला वेळ नाही जरा कामात आहे. आपण नंतर बोलू यावर सविस्तर. तुम्ही ते समान घेऊन जा. चावी घरी द्या आणि भाड हि द्या. डीपॉजीट पंधरा कट करून द्या.
अजिंक्य : बर बर. चालेल.
अजिंक्य कॉल कट करून मोबाईल टेबलावर ठेवतो. आणि प्रतीक्षाला सगळ सांगतो.
प्रतीक्षा : कसली माणस आहेत. माणूस गेलय त्याच काहीच नाही पैसा महत्वाचा आहे.
अजिंक्य : जाऊदे. त्यांना पैसा महत्वाचा आहे आपल्याला आपल्या माणसाच राहिलेलं माग सामान आहे. ती गाडी पण आणायचीय अभिजितची आणि बाकीच पण समान आहे. पैशाच काही नाही आत्ता तरी. करतो मी काहीतरी. जेव चल मग कामाला लागू.

दोघ पटपट घास खात जेवून घेतात. मग अजिंक्य तिकडे रिक्षाने जातो. सगळ समान एका ट्रक मधून घेऊन स्वतःच्या घरी उतरवतो. तीन गडी लावलेले कामाला त्यांना प्रत्येकी दोनशे आणि ट्रकचे चारशे देऊन टाकतो. येताना अभिजितची आणलेली लाल स्विफ्ट अजिंक्य पार्किंग मध्ये लावतो. आणि मग स्वतःची पांढरी बुलेट काढून सरळ अग्रवालच्या घरी जातो. त्यांना तीन महिन्याचं भाड आणि चावी देतो. आणि माघारी येतो. एवढ्यात दोन तास होऊन जातात. संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेले. सारा झोपून उठलेली प्रतीक्षाशेजारी. अजिंक्य बाहेर सोफ्यावर झोपून टीव्ही बघत बसलेला असतो बारीक आवाज करून. प्रतीक्षा जागी होते आणि मग अजिंक्यला चहा बनवून आणते आणि देते. दोघ चहा पित बसतात. 


भाग ०३
आज दिवस कसा गेला कळालाच नाही. काल महाळाच्या कामाने सगळा दिवस त्यात गेला दोघांचा. त्यात ते सामान आणायचं होत. परत ते निट व्यवस्थित ठेवायचं होत. सगळा क्षीण भरून काढायचा म्हणून अजिंक्य प्रतीक्षा दोघ लवकर झोपले आणि उशिरा उठले. त्या नादात तिकड सिरीयलला पाठवायची स्क्रिप्ट एक दिवस पुढ ढकलली गेली. आता आज काहीही करून लिहाव लागणार होत अजिंक्यला. उद्या सकाळी त्या भागाच शुटींग होत. त्याचे खांदे, हात कामातून गेलेले. तरीपण दुपारपासून त्याच लिखाण सुरु होत. रात्री जेवून पण परत सुरूच होत लिखाण. सारा आणि प्रतीक्षा झोपलेले. बाजूला टेबलावर अजिंक्य टाईप करत बसलेला.
बाहेर रस्त्यावर बोलण सुरु असत.
समीर : हे बघ आत्ता दोनच पर्याय आहेत. एकतर माझ्यासोबत आत्ता चल सगळ्यांना सोडून नाहीतर मला विसर. पण ऐक काही होत नाही. आपल बाळ झाल ना बघ तू तुझे बाबा नक्की आपल्याला घरी बोलवतील. पण आत्ता त्यांचा विचार केला तर ते तुला माझ्या घरी काय माझ्या जवळ पण येऊन देणार नाहीत. चालणारे का तुला ?
फिझा : नाही. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण कस काय करू समजतच नाहीये.
समीर : विचार काय करायचा आहे ? तुला मी हवाय ना ? माझ्यावर प्रेम असेल तुझ तर तू येशील सोबत माझ्या.
फिझा : हो पण.
समीर : बर चल अरमान येतोय मी निघतो. उगीच काय तरी बोलेल. ऐक रात्री एकला पक्की ये बिस्मिल्ला दर्ग्यापाशी. पुढून नको मागून ये. मी एक्टीव्हा आणतो. गुपचूप जाऊ. काय काय लागणारे आण तुझ-तुझ सामान. आपण जाऊ सांगलीला. कारण आधी मधी थांबता येणार नाही आपल्याला.
फिझा : बर पण काय होणार नाही ना ?
समीर : मी आहे न ? काय होत नाही बघ. अल्लाह रेहमान आहे सोबत. आपल प्रेम पाक आहे. मग कशाला तो काय करेल.
फिझा : बर येते मी.
दोघ दोन्ही दिशेला जातात. रात्रीची शांतात. काळोख आणि त्यात त्या दर्ग्याच्या मागे फिझा येऊन थांबली सगळ सामान सोबत घेऊन. इतक्यात लाईट दिसली. नक्कीच समीर असणार म्हणून तिने चेहऱ्यावरची ओढणी काढली. तिच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला. गाडी जवळ आली. फिझा गालात हसत होती. गाडी चालवणारा तिला गाडीवर बस म्हणाला. गाडी सांगितली एक आणली एक. तरी दोघ गप्पच होते. एके ठिकाणी गाडी थांबली. ती उतरली. तो गाडी लाऊन उतरला. आणि एका बाजूला बाथरूमसाठी गेला इतक्यात अरमान आला मग त्याने तिच्या चेहऱ्याला आपल्या जाड दोन्ही हातांनी दाबल आणि तिला जबरदस्ती एका गाडीत बसवलं. तिचा आवाज काहीच झाला नाही. गाडीचा फक्त आवाज झाला. त्या आवाजाने समीर बाहेर आला झाडीतून. फिझा नव्हती. तो गाडी घेऊन पाठलाग करत गेला. आणि फिझाला घरात आणून सोडल अरमानने.
समीरला मोहल्ल्यातल्या दबा धरून बसलेल्या मुलांनी खूप मारल. अर्धमेलं करून त्याला त्याच्या घरी एकाने सोडल. घरी म्हणजे त्याच्या दारात झोपवल. रक्ताने माखलेला तो तिथच पडून होता रात्रभर. रक्त तर रात्रभर गेल वाहून त्यातच तो मेला. आणि इकडे फिझाला खोलीत बंद केलेलं. ते हि मोकळ्या खोलीत जिथ साधा कागदाचा कपटा हि नव्हता. तिने रडून रडून अगदी सगळ आतलं पाणी आटवल होत. मग तिला काचेची खिडकी दिसली. हाताने बुक्क्या मारून चार पाच बुक्क्या नंतर ती खिडकी फुटली. आणि नेमक्या सगळ्या काचा बाहेर पडल्या. एक टोक फक्त खिडकीला चिटकून होत. तिने त्याच टोकावर जोरात हात दाबून धरला. आणि दुसऱ्या हातने त्यावर बुक्क्या मारून ते काचेच टोक हाताच्या आरपार काढल.
सकाळपर्यंत हि बेशुद्ध होती. सकाळी तिच्या वडिलांना कळाल त्यांनी तिला दवाखान्यात नेल. ती वाचली. दोन दिवस शुद्धीत आलीच नव्हती पण नंतर आली. तिने समीरला बघायची इच्छा सांगितली. पण समीर तर गेलेला. अरमानने तिला हे सांगितल. अरमान समीरचा मित्र होता आणि त्याच फिझावर प्रेम होत. त्याला आपल्या वाटेतून समीरला बाजूला काढायचं होत म्हणून त्याने हे सगळ घडवून आणल होत. आणि हे पळून जायची वैगरे कल्पना अरमानचीच होती. आता फिझाला काय कराव सुचत नव्हत. त्या धक्क्यानेच तिचे श्वास बंद झाले. आणि अरमान तिच्या आठवणीत आज पण फिरत असतो कुठूपण वेड्यासारखा.
मागून प्रतीक्षा आली. सव्वा दोन झालेले. अजिंक्यच्या मागून तिने खांद्यावरून छातीपाशी हात सोडून त्याच्या मानेला कीस केल.
प्रतीक्षा : चल कि. बस झाल.
अजिंक्य : झाल झाल. सेव्ह करतो.
प्रतीक्षा : हम. झाल का ?
अजिंक्य : सेव्ह टू डेस्कटोप. ओके. झाल.
प्रतीक्षा : मला थंडी वाजतीय.
अजिंक्य : मग ?
प्रतीक्षा : तुझ्या मिठीत झोपायचय.
अजिंक्य : आलोच बंद करून सगळ.
प्रतीक्षा : ना. चल. मग कर बंद.
तो तसच सगळ सुरु ठेवून गेला. त्या अंधारात कॉम्प्युटरच्या स्क्रीनचा प्रकाश पडत होता. सारा गाढ झोपलेली. आणि अजिंक्य प्रतीक्षाला मिठीत घेतो. तिच्या केसांची क्लिप काढतो. तिचे मोकळे केस. उफ्फ...! त्याला खूप आवडतात ते. त्या केसांचा तो वास. खूप मस्त. तो त्या केसात हात फिरवतो. प्रतीक्षा आपल अंधारात पण लाजून डोळे मिटून घेते. तो तिच्या केसात हात घालून हळू हळू बोट फिरवत कसकन केस ओढतो ती आह..ह ओरडते आणि तो त्याच क्षणाला तिच्या उघड्या ओठांना आपल्या ओठात पकडतो.


भाग ०४
तसाच तिला जवळ मिठीत घेऊन तो बेडवर झोपला. प्रेमाच्या नादात अजिंक्यचा कोपरा साराला लागला. तिने झोपेतच कूस पलटली. तसा अजिंक्य बाजूला झाला. प्रतीक्षा त्याला जवळ ओढते आणि अजिंक्य जवळ जातो तिच्या. एवढा वेळ सुरु असलेली कॉम्प्यूटरची स्क्रीन बंद झाली. आणि आता अंधार झाला. अजिंक्य तिच्या डाव्या खांद्यावरून हात अगदी दाबतच खाली तिच्या हाताच्या पंज्यापर्यंत आणतो. ती तिच्या उजव्या हाताने त्याच्या डाव्या खांद्यावर हाताची नख रोवून असते. काही वेळ गेला. दोघ गाढ झोपले. एकमेकांच्या अंगावर हात टाकून. सकाळी अजिंक्य पहिला उठला. त्याने सगळ आवरल. त्यानंतर चहा बनवायला लागला. त्या चहाच्या वासाने प्रतीक्षा पण जागी झाली. ती उठून बसली. काल अजिंक्यने सोडलेली केसं वर बांधत बसली. तेवढ्यात अजिंक्य दोन कप चहा घेऊन आला. तिला ग्लासभर पाणी दिल. मग तिने जरास पाणी प्यायल. नंतर चहाचा कप हातात घेतला.
खरतर प्रतीक्षाला अस हे काही न आवरता चहा प्यायचं आवडत नव्हत. म्हणजे ती अमित असताना पण त्याला पिऊ द्यायची नाही. पण अजिंक्यशी लग्न झाल्यापासून प्रतीक्षाच्या सवयीच काय ती पण पूर्ण बदलून गेलेली. आणि अजिंक्य ? जसा होता तसाच होता. म्हणूनच तो आणि त्याच प्रेम अगदी तसच आणि तेवढच उरल होत. लोकांच कस आहे प्रेम असत पण वेळेसोबत प्रेम आणि स्वतः माणूसपण बदलून जातो. आणि त्या बदलाच कारण तो अस सांगतो कि, पुढची व्यक्ती बदलली. पण हे कारण मला तरी बरोबर वाटत नाही. पुढची व्यक्ती खरी असो वा खोटी. ती बदलली म्हणून आपण बदलायचं याला काय अर्थ आहे ? आणि व्यक्तीतला बदल पण ठीक आहे पण प्रेम कस बदलत ? आज एकावर उद्या दुसऱ्यावर. नक्की प्रेम ते असत कि वासना. काही मला समजतच नाही. बर....
अशा जगात पण अजिंक्य प्रेम करत राहिला प्रतीक्षावर. तीच लग्न झाल. तो धक्का सहन केला. एकटेपणा अनुभवला. पण कधी दुसरीचा विचार नाही केला. मग अशात त्याच्यावर प्रेम करणाऱ्या काही मुली त्याच्या आयुष्यात आल्या. अंजली, प्रियांका, उत्कर्षा आणिक दोन तीन. पण त्यांच्या प्रेमाला झुगारून तो मात्र प्रतीक्षाची वाट बघत राहिला. अर्थातच त्याला त्याच प्रेम मिळाल. खर तर खर प्रेम हे कधी मिळत नाही. पण त्याला मिळाल. कस नशीब आहे ना. म्हणजे तीच अमितशी लग्न होत. सारा होते. मग अजिंक्याशी केलेल्या ब्रेकअप नंतर कुठे भर पावसात अजिंक्यला प्रतीक्षा भेटते. मग दोघांच भेटन पुन्हा सुरु होत. आणि प्रतीक्षाचा नवरा अपघातात मरतो. आणि मग प्रतीक्षा अजिंक्यसोबत रहायचा मोठा निर्णय घेते. समाजाला असल काही मान्य नसत. समाजाला तस बघायला गेल तर काहीच मान्य नसत. अमान्य समाजात प्रेम मान्य कस असू शकेल ? पण तरी हे प्रेम निभावल अजिंक्यने. आणि ते प्रेम स्वीकारून मान्य केल ते प्रतीक्षाने. अशा सगळ्यात अजिंक्य तिला आपला कप देतो. ती एक घोट चहा पिते. आणि स्वतःचा प्यायला लागते. अजिंक्य तिने एक घोट पिलेला उष्टा चहा बाकीचा पिऊन टाकतो. तिचा मोकळा कप घेतो आणि आत जाऊन किचनमध्ये धुवून टाकतो. आणि कपडे बदलतो.
प्रतीक्षा आत येते. आणि बाथरूममध्ये गरम पाणी बादलीत सोडते. तीच लक्ष अजिंक्येकडे जात.

हि कथा समजण्यासाठी आधी नक्की वाचा | "कुणीतरी"

प्रतीक्षा : कुठ चालला आवरून ?
अजिंक्य : मुंबई.
प्रतीक्षा : काय ? मला का सांगितल नाही. मी बनवून दिल असत ना पोहे. का सांगितल नाहीस ?
अजिंक्य : रात्री तेच स्क्रिप्टच काम करत होतो. तुला रात्री सांगणार होतो पण काय झाल माहितीय ना आपल्यात ? त्यात नंतर झोपलो ते राहील सांगायचं.
प्रतीक्षा : थकला का तू ? कालच्यामुळे. सॉरी मला माहित असत तर नसता फोर्स केला.
अजिंक्य : असुदे. अस काही नाही. बस मध्ये काय काम आहे मला ? झोपणार निवांत.
प्रतीक्षा : का बुलेट नाही का नेणार ?
अजिंक्य : नाही चालवणार. म्हणून बसने जातो. शिवशाही आहे. आत्ता अकरा दहाची. मग जाईन. तिकीट बुक केलय.
प्रतीक्षा : कधी येणार ?
अजिंक्य : उद्या दुपारी.
प्रतीक्षा : काय अरे. चुकल माझच. उपाशी चालालस. मी करू का ? सांग अजून एक तास आहे.
अजिंक्य : होईल ग माझ खाण. तुम्ही खावा. साराला दे काहीतरी बनवून. आणि मी येतो उद्या. कॉल करेन संध्याकाळी. मला नाही जमला तर एक अंदाजे बाराला वैगरे कॉल कर मला. चल मी निघू का ? दार लावून घे आतून आणि आवरत बस मग.
अजिंक्य निघून गेला. प्रतीक्षा दार लावून घेते. अंघोळ करते. इकडे अजिंक्य मुंबईला जातो. दुपारी एकच्या दरम्यान दार वाजत. प्रतीक्षा दार उघडते. तर एक माणूस उभा असतो.
प्रतीक्षा : या कि.
वडील : अजिंक्य इथे राहतो का ?
प्रतीक्षा : हो. अस काय विचारता बाबा. या ना आत.
वडील : हा.
ते बूट काढून आत येतात. आणि सोफ्यावर बसतात. प्रतीक्षा आतून पाणी घेऊन येते.
ते पाणी पितात आणि ग्लास ठेवतात. प्रतीक्षा त्यांच्या समोर बसते.
प्रतीक्षा : अजिंक्य गेला मुंबईला. मला म्हणाला होता तुम्ही येणार आहात आज.
वडील : हा का ? काय सांगतेस मी पण मुंबईत उतरलो. विमानाने आलो हैद्राबादवरून. आणि मुंबईतून इकड आलो. इतक्या दिवसात वेळ मिळाला नाही बघ ते सामान न्यायला.
प्रतीक्षा : हैद्राबादला ?
वडील : अग म्हणजे  तिकड तीन महिन्यांसाठी गेलेलो. कामाची ऑर्डर घ्यायला. शिनाच्या नावाने नवीन कपड्याच दुकान काढल मी. मग माल आणाला. आणि काही ऑर्डर पण घेतल्या.
प्रतीक्षा : वाह. फक्त साडीच का कपडे पण आहेत ?
वडील : दोन्ही आहे. येऊन जा कधी मुंबईत आलीस तर.
प्रतीक्षा : हो का ? नक्की. येणार ना. पुणे का सोडल पण तुम्ही ?
वडील : शिवानी नाही अभिजित नाही काय करणार आम्ही. उगीच आठवण येत राहते. मग तिकड आम्ही मुंबईत गेलो.
प्रतीक्षा : अहो पण बाबा मी आहेच ना तुम्हाला मुली सारखी सांगा बर ? तुम्ही काय संबंध ठेवला नाही. मला कॉल केला नाही परत. केला तो सामान आणायचं होत ते सांगायला. बाकी काही बोलनच नाही.
वडील : काय सांगू शिवानीची आई आजारी असते.
प्रतीक्षा : का काय झाल ?
वडील : मुलीच अस बघून तिला इतक टेन्शन आल. डायबेटीस झालाय तिला. त्यात मागच्या महिन्यात तिला काय हाताच्या अंगठ्याला विळी कापली ते जखम झालीय. ती बरी होईना. डॉक्टर बोललेत अजून पंधरा दिवसात नाही भरली जखम तर अंगठा कापावा लागेल. असो. तुझ बोल कस चाललय तुझ ? आणि संसार कसा चाललाय ?
प्रतीक्षा : चालल आहे ठीक. आम्ही येतो आईंना बघायला.
वडील : नक्की या. रहायलाच या. बर वाटेल ग तिला. घर खायला उठत तिला. शिवानी असताना यायची ती आता कोण नाही. बघ.
प्रतीक्षा : हो नक्की येणार.
वडील : बर ट्रक बाहेर आहे. सामान कुठ आहे ? मला निघायचं आहे परत. लगेच.
प्रतीक्षा : जेवून तरी जा.
वडील : नको, तू येणार म्हणतेस न ? तेव्हा बनवून घाल आम्हाला चालेल ?
प्रतीक्षा : हो नक्की.


भाग ०५
शिवानीचे वडील, शिवानी-अभिजितच उरलेलं समान आणि स्विफ्ट घेऊन गेले. घर पुन्हा सुन-सुन झाल. प्रतीक्षा दिवसभर कामात व्यस्त झाली. अजिंक्यही शुटींगमध्ये व्यस्त होता. संध्याकाळी प्रतीक्षाची मैत्रीण प्रज्ञा तिचा कॉल आला. दोघींनी भेटायचं ठरवल. मग दोघी लहान मुलांच्या बागेत भेटल्या. प्रज्ञाला एक छोटासा मुलगा होता तीन वर्षाचा. सारा आणि तो मुलगा म्हणजे वरद दोघ खेळत बसले त्या बागेतल्या गवतावर. प्रज्ञा आणि प्रतीक्षा बोलत बसल्या. 
प्रज्ञा : काय तू आहेस कुठे ? कॉल नाही काही नाही. आधी तर स्वतःहून आठवण काढायचीस आता काय झाल ? अजिंक्यमधून वेळ नाही वाटत मिळत. काय जादू केलीय नवऱ्याने कळू दे मला पण..
प्रतीक्षा : नाही अग दिवसभर साराच बघायचं. अजिंक्यच काय काम असत ते बघायचं मग घरातल वैगरे बघाव लागत मला.
प्रज्ञा : का अजिंक्य मदत नाही का करत काय ?
प्रतीक्षा : काय करत नाही ? उलट काय करत नाहीत विचार. सगळ करतो. अगदी सकाळी चहा बनवण्यापासून केर-बीर, अगदी भांडी पण घासतो. परवा तर मला ताप आलेला मागच्या आठवड्यात तर त्याने कपडे धुतले वाळत टाकले आणि परत संध्याकाळी आणून घडी घालून कपाटात पण ठेवले.
प्रज्ञा : लकी आहेस ग. माझा ऋषी अजिबात कामाला हात लावत नाही. चहा पाण्यापासून सगळ हातात द्याव लागत त्याला. अजिंक्यसारखा पाहिजे होता मला नवरा अस प्रेम केल असत ना त्याच्यावर बस.
प्रतीक्षा : नको. कशाला माझा अजिंक्य एकटा आहे असा जगात भारी. आणि तो फक्त माझा आहे. त्याला तसच एकट सिंगल पीस राहू दे माझ्याजवळ.
प्रज्ञा : पण खरच तू खूप लकी आहेस. म्हणजे अमित गेल्यावर त्याने तुला स्वीकारलं मुळात साराला त्याने स्वीकारलं खूप मोठी गोष्ट आहे ती.
प्रतीक्षा : हो. खूप प्रेम करतो तो माझ्यावर. माझच चुकल मी त्याच्यावर कॉलेजमध्ये चिडले. तेव्हा त्याच प्रेम समजून घेतल असत तर इतक सगळ फेस करायला लागल नसत मला. किती मानसिक आघात झालेत माझ्यावर. आत्ता हि अशी आहे ते फक्त अजिंक्यमूळ. त्याने इतक सावरलय ना मला. खरच त्याच्या जागी कोण दुसर असत ना तर बायकोचा संबंध बेडवर फक्त अशा मेंटेलीटीने वागला असता. पण अजिंक्यने बेडवर सोडून सगळीकडे मला जबरदस्ती करून मला नव्याने जगायला शिकवलं. सगळ्यातून बाहेर पडायला भाग पाडल.
प्रज्ञा : मग गुड निऊज कधी देतीयस ?
प्रतीक्षा : कसली ? सगळ तर गुड गुड चाललंय.
प्रज्ञा : अग ती वाली गुड निऊज.
प्रतीक्षा : नाही ग. एकावरच थांबायचं माझ ठरलेलं आणि अजिंक्यला पण त्याच नकोय कोण. मला बोलतो मला तू आणि सारा बास झालात. तुम्ही दोघी माझ प्रेम आहात आणि मी दोघींना समान माझ प्रेम देऊ शकतो त्यात आता तिसरा कोणी नको. मग नाही आम्ही विचार केला आणि करत पण नाही.
प्रज्ञा : ओह.. अस आहे का. मग फिजिकली तरी एकत्र आलायत का ?
प्रतीक्षा : खर सांगू ?
प्रज्ञा : हो सांग कि.

प्रज्ञा : काय ? खर सांगतीस कि काय ?
प्रतीक्षा : हो. वर वर झालंय आमच्यात पण फिजिकली नाही. इव्हन लग्न झाल तरी त्याने मला फोर्स केला नाही. मला म्हणतो तो कायम, मी प्रेम तुझ्यावर केल तुझ्या शरीरावर नाही. आणि त्याने कॉलेजला असताना माझ्यासाठी देवीचे उपवास धरलेत. नऊ-नऊ दिवस आणि ते पण नऊ दिवस फक्त चहा आणि पाणी पिऊन. काय सांगू तुला.
प्रज्ञा : बापरे..... काय सांगतीस. पण उपवासाचा आणि त्याचा काय संबंध.
प्रतीक्षा : मला म्हणाला होता एकदा अजिंक्य कि, त्याने देवीला नवस बोलला होता कि , प्रतीक्षाशी माझ लग्न झाल तर मी तिला कधी हात पण लावणार नाही त्या गोष्टी साठी फक्त मला प्रतीक्षाचा सहवास मिळू दे.
प्रज्ञा : झाल की मग हे तर खर. देव पावला. पण त्याच इतक प्रेम आहे तुझ्यावर तर.
प्रतीक्षा : तर काय ?
प्रज्ञा : तुला नाही का वाटत साराला एखादा भाऊ असावा छोटासा. शेवटी ते मुल पण अजिंक्यचच असेल ना. ठीके साराला तो मुलीसारख मानतो. पण शेवटी त्याच्या प्रेमाची निशाणी तुझ्याकडे नको का ? म्हणजे त्याने इतक प्रेम करून उपयोग काय मग त्याचा ?
प्रतीक्षा : हो. बरोबर बोलतेस. पण अजिंक्यला नाही पटणार.
प्रज्ञा : विचारायचं एकदा. वेळ बघ जरा कधी निवांत असला कि तो.
प्रतीक्षा : आणि ?
प्रज्ञा : आणि नाही म्हणाला तर मुलगी आहेस ना तू ? मुल मेणबत्ती असतात आणि मुली काडेपेटी. जरास पेटवल कि झाल मुल पाघळलीच समजायचं.
प्रतीक्षा : पण मग सारावरच त्याच पुढ प्रेम कमी झाल तर. शेवटी हे बघ त्याला पुढे विचार येईलच ना कि सारा अमितची आहे. त्यात तो आत्ता जिवंत नाही. मग त्याच्या मुलाच म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल माहित नाही पण काय त्याचे विचार बदलले तर ? मला नको तसा तो. मला आत्ताचा आहे तोच हवाय कायम अजिंक्य.
प्रज्ञा : नाही ग. हे बघ हि गोष्ट मला तुला सांगावी लागतीय म्हणजे विचार कर हे विचार तुम्हाला यायला हवे होते. पण मला सांगाव लागतय. आता काय बोलू.
प्रतीक्षा : मी बोलून बघते अजिंक्यशी. रात्री.
प्रज्ञा : बघ आणि मला सांग काय म्हणतो ते.
प्रतीक्षा : चालेल.
प्रज्ञा : पाणीपुरी खायची का ?
प्रतीक्षा : हो चल.

दोघी उठून सारा आणि वरदला सोबत घेतात आणि बागेच्या बाहेर जातात आणि पाणीपुरी खाऊ लागतात.   


भाग ०६
अजिंक्यचा मोबाईल वाजतो. त्याच लक्षच नव्हत शुटींगच्या नादात कि पावणे एक वाजला आहे ते. त्याने मोबाईल खिशातून काढला. त्यावर नाव बघितल “मनु”. कॉल रिसीव्ह करून त्याने कानाला मोबाईल लावला.
अजिंक्य : झोपली नाहीस ?
प्रतीक्षा : कॉल कर म्हणाला होतास ना. तू केला नाहीस. मी वाट बघून केला मग आत्ता.
अजिंक्य : हा अग शुटींग सुरु झाल उशिरा. त्यात स्क्रिप्टमध्ये प्रोड्युसरने चुका काढल्या. म्हणजे जरा सीन चेंज करायचे होते. मग ते केले. आणि अजून एक स्क्रिप्ट लिहून दिली.
प्रतीक्षा : मग येणार कधी इकड ?
अजिंक्य : का ग काय झाल ? परवा येईन बहुतेक.
प्रतीक्षा : करमत नाहीये मला. आणि तू तिकड आहेस तर. ये ना लवकर.
अजिंक्य : मज्जा केली ग. येणारे उद्या. एक दीड पर्यंत दुपारी.
प्रतीक्षा : हा मी वाट बघतीय लक्षात ठेव. लवकर ये...
अजिंक्य : हो मनु. बर बाळ काय करतय माझ ?
प्रतीक्षा : बाळ झोपलंय.
अजिंक्य : ओह आणि माझ मोठ बाळ काय करतय ?
प्रतीक्षा : आठवण काढून बसलय रुसून.
अजिंक्य : कुणाची ?
प्रतीक्षा : आहे त्या मोठ्या बाळाच अजून एक बाळ.
अजिंक्य : अरेरे. मग आता ?
प्रतीक्षा : आता काही नाही. हे मोठ बाळ रडणार आहे.
अजिंक्य : का मी आहे ना सोबत अस नाही रडायच. बर मग काय केल आज ?
प्रतीक्षा : काही नाही सकाळी तू गेल्यावर सगळ आवरल. दळण केल. मग जेवण बनवल. साराला भरवल. मग जरा आवराव म्हंटल तो पर्यंत शिवानीचे बाबा आले.
अजिंक्य : नेल का सामान त्यांनी सगळ ?
प्रतीक्षा : हो.
अजिंक्य : आणि स्विफ्ट ?
प्रतीक्षा : हो.
अजिंक्य : बर. मग ते कसे आलेले इकड ?
प्रतीक्षा : अरे त्यांनी कपड्याच दुकान सुरु केलय नवीन मुंबईला. मग त्याच सामान आणायला ते गेलेले बाहेर. तिकडून विमानाने मुंबईत आले. आणि मुंबईतून बसने साताऱ्याला. जाताना गेले स्विफ्ट मधून आणि ट्रक आणलेला सामान न्यायला.
अजिंक्य : चला म्हणजे त्याचं त्यांना सामान मिळाल. आता काय टेन्शन नाही.
प्रतीक्षा : हा मग मी जेवले. ते गेल्यावर. मग प्रज्ञाचा कॉल आलेला. भेटले तिला बागेत. गप्पा मारल्या आणि मग आले घरी. मग निवांतच होते.
अजिंक्य : हा आजची रात्र काढ उद्या आहेच मग जवळ तुझ्या. तू नाही घेतल तरी येणार जवळ. आत्ता झोप.
प्रतीक्षा : तू कधी झोपणार ?
अजिंक्य : झाल एका तासात होईल शुटींग मग झोपेन.
प्रतीक्षा : हा. काळजी घे. अन झोपून जा. जेवलास का तू ?
अजिंक्य : हो.
प्रतीक्षा : प्रज्ञाचा मुलगा खूप छान आहे अरे. साराशी खेळत होता. सारा पण खूप खुश होती.
अजिंक्य : वाह. तिला म्हणाव येत जा घेऊन त्याला अधूनमधून. नाव काय मुलाच ?
प्रतीक्षा: वरद.
अजिंक्य : चांगल आहे.
प्रतीक्षा : सारा रमली त्याच्यासोबत. नंतर घरी पण येत नव्हती. प्रज्ञाला मी बोलावल घरी पण अशी किती वेळा येणार ना ती.
अजिंक्य : म्हणजे ?
प्रतीक्षा : आपल्या साराला तिचा भाऊ असेल तर कस घरातल्या घरात होऊन जाईल ठीक. कुणाला कुठ बोलवायचं टेन्शन नाही.
अजिंक्य : आपल ठरलंय माहितीय ना.
प्रतीक्षा : हो पण हा विचार करायला काय हरकत आहे ?
अजिंक्य : नको. एक आहे ती खूप आहे. लोकांना मुली होत नाही. मला आहे तर कशाला मुलगा बिलगा पाहिजे. पोर नालायक असतात. मुलीला कस प्रेम असत आईबाबा बद्दल. पोर काय अशीच असतात. नकोच. ते.
प्रतीक्षा : माझी इच्छा असेल तर ?
अजिंक्य : नको ना प्लीज.
प्रतीक्षा : प्लीज... ना आजू...
अजिंक्य : प्रज्ञाने डोक्यात घातल ना तुझ्या ?
प्रतीक्षा : नाहीरे.
अजिंक्य : मग इतके दिवस काय डोक्यात नव्हत तुझ्या आज कस आल ?
प्रतीक्षा : असच आल.... सांग ना ?
अजिंक्य : उद्या बोलू मी आलो कि.
प्रतीक्षा : नक्की ना ?
अजिंक्य : हो.
प्रतीक्षा : बर मी झोपते तू कर काम.
अजिंक्य : हो. बाय. लव्ह यु.
प्रतीक्षा : मिस यु. बाय.
अजिंक्य : लव्ह यु कुठ गेल ?
प्रतीक्षा : तुझ असेल लव्ह माझ्यावर तर मला नकार देणार नाहीस.
अजिंक्य : काय अग तू.
प्रतीक्षा : हो असच आहे. बाय.
अजिंक्य : बर बाळासाठी काय आणू उद्या ?
प्रतीक्षा : काही नको. झोपते मी.
तिने कॉल कट केला. अजिंक्यने परत कॉल लावला पण मोबाईल बंद होता. प्रतीक्षा मोबाईल स्वीच ऑफ करून झोपली सारा जवळ. अजिंक्यच शुटींग झाल तो बेडवर झोपला. आता त्याला झोप आलीच होती. कधी हि त्याचे डोळे मिटणार होते. तितक्यात त्याला मेसेज आला. त्याने मोबाईल बघितला. त्यावर मेसेज नाही दिसला पण मेसेज पाठवणाऱ्याच नाव दिसल. आणि अजिंक्य पटकन बेडवर उठून बसला.

ते नाव होत “अंजली”...     


भाग ०७
पुन्हा मोबाईल वाजला. अजिंक्य मेसेज फक्त वाचत राहिला.
जागा आहेस का ? असशील तर रिप्लाय दे. खूप महत्वाच बोलायचं आहे.
काय असेल हीच काम ते पण इतक्या रात्री ? अजिंक्यला काहीच समजेत नव्हत. पण रिप्लाय दिल्याशिवाय आणि तिचा मेसेज आल्याशिवाय काहीच समजणार नव्हत. अजिंक्यने तिला मेसेज केला आणि दोघांच बोलन सुरु झाल. ते अस,
अजिंक्य : काय झाल ?
अंजली : कुठ आहेस ?
अजिंक्य : आहे मुंबईत.
अंजली : पुण्यात येणारेस का ?
अजिंक्य : नाही इतक्यात तरी. इकड काम सुरु आहे. काम काय आहे बोल तरी जमल तर करेन ना.
अंजली : काम अस नाहीये. पण मी प्रॉब्लेममध्ये आहे एका.
अजिंक्य : का काय झाल ?
अंजली : प्रतीक्षा आहे का सोबत ?
अजिंक्य : नाही ग ती साताऱ्याला आहे.
अंजली : कॉल करू का ?
अजिंक्य : आत्ता ?
अंजली : हो ?
अजिंक्य : थांब लावतो मी.


अजिंक्य तिला कॉल लावतो. अजिंक्यच्या हेल्लोला पुढून काही प्रतिक्रिया येत नाही. मग काही वेळात हुंदक्यांचा आवाज येतो.
अजिंक्य : काय झाल ? रडतीयस का तू अंजली ?
अंजली : हो. मला खूप त्रास होतोय अजिंक्य.
अजिंक्य : कसला ते तरी सांग म्हणजे मला तरी समजेल.  
अंजली : तुला बाळ झाल ?
अजिंक्य : नाही. का ग ?
अंजली : झाल नाही म्हणजे ?
अजिंक्य : आम्ही चान्सच घेतला नाही. तुला सांगितल होत ना मी साराला सांभाळणार आहे. मला माझ बाळ नकोय.
अंजली : अजिंक्य, तुला तुझ नाही पण प्रतीक्षाची तरी मुलगी आहे. इतकी क्युट.
अजिंक्य : हो ती तर आहेच. प्रिन्सेस आहे माझी ती. पण तुला काय झाल रडायला ? सांग कि.
अंजली : आम्ही चान्स घेतला होता. म्हणजे मी आणि नवऱ्याने.
अजिंक्य : हा मग ? मुलगी झाली का मुलगा ?
अंजली : नाहीरे. ( पुन्हा रडायला लागली ).
अजिंक्य : अग सांगितल नाहीस तर मला कस कळेल ? अंजू. एक तर इतक्या दिवसांनी कॉल करतीयस. तुझा अतापता नाही मला. आणि आता बोलतीयस ते पण अस कोड्यात आणि रडून कस समजेल बर मला मग ? सांग ना काय झाल आणि रडू नकोस तुला माहितीय ना मला मुलींनी रडलेल आवडत नाही.
अंजली : लग्नानंतर आम्ही पाच वेळा चान्स घेतला पण फेल गेला अजिंक्य.
अजिंक्य : म्हणजे समजल नाही काय मला.
अंजली : आम्हाला पण काही समजल नाही. सासूला वाटल माझ्यात प्रॉब्लेम आहे. म्हणून सतत खूप मला बोलायच्या. मग आम्ही टेस्ट केल्या. पण तो डॉक्टर पण नालायक फक्त पैसे घेतले आणि नीट काही बघितलच नाही आणि आम्हाला नीट सांगितल पण नाही. चान्स घ्या बोलला आम्ही त्यावर तीन वेळा चान्स घेतला. पण काय झाल नाही म्हणून परत त्याला दाखवल तर म्हणाला पोटाच्या पिशवीची कुवत नाहीये बाळाला सांभाळायची. तरी चान्स घ्या करू आपण काय तरी. तेव्हा पण पैसे खाल्ले त्याने.
अजिंक्य : मग काय केल ?
अंजली : मग ह्यांच्या ओळखीचा एक माणूस आहे त्यांना पण होत नव्हत मुल आठ वर्ष. मग त्यांना कुणीतरी एका महाराजांचं नाव सांगितल. नाशिकचे ते बाबा होते. आम्ही मग गेलो तिकड.
अजिंक्य : अग असल काही नसत ग फेक असतात ते बाबा-बिबा.
अंजली : हो कळत होत आम्हाला पण काय करणार मन जायला भाग पाडत होत. आम्ही मग एक दिवस सुट्टी काढून दोघ गेलो. तिथ खूप गर्दी होती. मग त्यांनी एक नारळ काहीतरी मंत्रून जाळला. मग एक वस्तू देवाजवळ ठेवायला दिली. आणि सांगितल कुणीतरी ह्यांच्या घरातल्या व्यक्तीने करणी केली म्हणून बाळ होत नाहीये.
अजिंक्य : हाहा. हे काय आता मधीच ?
अंजली : आम्ही चान्स घेतला त्यांच्या सांगण्यावरून. पण तो पण प्रयोग फेल गेला.
मग आम्ही पेपरमध्ये बघून पुण्यातल्याच एका टेस्टट्यूबच्या हॉस्पिटलमध्ये चेकअप केल.   
अजिंक्य : मग तिथ काय झाल का नाही ?
अंजली : तिथ समजल माझ्यात नाही ह्यांच्यात प्रॉब्लेम आहे. म्हणजे जेवढे जिवंत शुक्राणू लागतात त्याहून वीस-पंचवीस हजार इतके कमी आहेत. त्यामुळे होत नाहीये.
अजिंक्य : मग आता ? त्यांच्यावर काय ट्रीटमेंट सुरुय का ?
अंजली : होती. पण सासूच्या त्या रोज रोजच्या कालव्याने, त्यांनी दारू सुरु केली. आणि आहे नाही तेवढी स्वतःची वाट लावून घेतली. त्या गोळ्या त्यांच्यावर काम करायच्या बंद झाल्या. मग मी पुण्यातच जॉब करायला लागले. आम्ही भाड्याने दोन बी.एच.के. घर घेतल. आम्ही दोघ एकत्र वेगळ राहतो. तिकड सासू, दीर, जाऊ राहतात. पण माझी इच्छा आहे रे अजिंक्य मला पण बाळ हवय. 
अजिंक्य : होईल ना. निराश का होतीस. आणि रडून काय होणारे ? दुसरा ऑप्शन नाही का काय ?
अंजली : होती टेस्टट्यूब. पण ती पण फेल गेली.
अजिंक्य : मग आता ?
अंजली : मला तर नाही वाटत आता काही माझ चांगल होईल. मी म्हणत होते माझ्याशी लग्न कर का केल नाहीस. मला तूच हवा होतास अजिंक्य. तू असतास तर मी आत्ता अशी नसते रे.
अजिंक्य : अस नाही ग. तुला पण माहितीय माझ प्रतीक्षा वर प्रेम आहे खूप. मग कस मी करणार होतो तुझ्यासोबत लग्न. आणि तिच्या बाबतीत काय झाल माहितीय ना ? मग तिला तेव्हा कस मी एकट सोडणार होतो.
अंजली : हो पण, ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर त्याच्यावर नाही तर जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम कराव माणसाने.
अजिंक्य : मान्य आहे पण मी तिच्यावर ती माझ्यावर दोन्हीकडून प्रेम होत आमच्यात.
अंजली : माझ पण होतच कि तुझ्यावर प्रेम अजिंक्य.


भाग ०८
अजिंक्य : झाल ते झाल ना अंजली आता. तुझ लग्न झाल माझ लग्न झाल.
अंजली : हो पण त्याचा फायदा कुणाला झाला फक्त तुला ना ? मला काय मिळाल त्यातून ? ना सुख ना माझ मला प्रेम. इतका बदलशील अस वाटल नव्हत मला. गरज होती तेव्हा माझ्या जवळ आलास आणि गरज मिटली, प्रतीक्षा तुझ्या आयुष्यात आली कि लग्न केलस तिच्याशी.
अजिंक्य : हे बघ मी जवळ कसा आलो ते माहितीय तुला. मी अंधारात ठेवल नव्हत तुला. आणि तेव्हा तुझ माझ्यावर प्रेम नव्हत. आपल्यात जे काय दोनदा झाल ते तुझ्या मर्जीने झाल. पण पुढे कधी केल नाही मी. आणि ते जुन आठवून काय मिळणारे ? आणि बघ अस हि आत्ता या क्षणाला आपण खूप पुढ आलोय. म्हणजे मैत्री, प्रेम याच्यापण पुढे. तेव्हा असच काहीतरी घडलेल आपल्यात पण आता नाही घडू शकत. जरी आत्ता काय मनात एकमेकांबद्दल वाटल तरी त्याला आपण प्रेम नाही म्हणू शकत. समजतय का तुला ?
अंजली : नाही समजत मला. तेव्हा माझी मी एकटी ठीक होते ना. तुझ आणि त्या प्रतीक्षाच तुटल तू माझ्याशी जास्त बोलायला लागलास. माझ्यासोबत अभ्यासाला बसायला लागलास. त्यात कधी तुझा स्पर्श झाला मला. कधी तू जवळ घेतल मला.
अजिंक्य : मुद्दामून ते केल नव्हत. तुही केलच होतस.
अंजली : काहीका असेना. पण केलस ना ?
अजिंक्य : मग दोष मला का ? दोघांना पण सेमच हवा.
अंजली : पण त्यामुळे मनात नसताना पण मला तुझ्याबद्दल प्रेम तयार झाल ना माझ्या मनात. तुला तुझ प्रेम कळाल. कुठ होती ती तुझी प्रतीक्षा जेव्हा तुला एकट्याला सोडून गेली. त्रासात होतास तेव्हा सोबत तुझ्या कोण होत ? मीच होते ना ? गरज होती तुला तेव्हा मी होते अजिंक्य विसरू नकोस. आणि तिला गरज लागली कि तू आठवलास का तिला ? म्हणजे काय स्वार्थ बघितला ना तिने. आणि मी काय केल तुझ्या एका शब्दावर मी दुसऱ्याशी लग्न केल. आणि काय झाल बघितल ना ? तुझ्यामुळेच माझ वाटोळ झालंय.
अजिंक्य : अस का बोलतीस ? काय हव तुला बोल. हे बघ मी म्हंटल आहे का काय चुकीच तुला ? मला माहितीय मला तू खूप संभाळलस तेव्हा. माझ्यावर प्रेम केलस. मला प्रेम दिलस. पण आत्ता नाही ना होऊ शकत पुन्हा ते. बाकी दुसर काहीही माग. मी नक्की देणार. आणि आपली मैत्री तर कधी मी तोडणार नाही. वचन दिलंय मी तुला. मी आहे ना सोबत अंजू तुझ्या. तू नाराज नको ना होऊ अशी. तू अशी चिडलीस कि मला कस तरी वाटत. प्लीज ना.
अंजली : मला तुला भेटायचं आहे.
अजिंक्य : भेटू ना. लवकरच.
अंजली : उद्याच. लवकर–बिवकर नाही.
अजिंक्य : अग उद्या कस ? उद्या देवी बसणारे. आणि मला जायचंय साताऱ्याला.
अंजली : मला माहित नाही. मला तू उद्या पुण्यात पाहिजेस.
अजिंक्य : नवरा ?
अंजली : माहितीय त्यांना.
अजिंक्य : काय ?
अंजली : तूच एक ऑप्शन आहेस. प्लीज तू तरी नाकारू नकोस.
अजिंक्य : म्हणजे ?
अंजली : लग्न झाल्यापासून ह्यांचा भाऊ माझ्यामागे लागलाय. ह्यांना सांगितल दोघांची भांडण झालीत केव्हाची अजून बोलत नाहीत. नाहीतर त्याचं मुल माझ्यात वाढवायचं अस हे बोलत होते.
अजिंक्य : मग ?
अंजली : आता नाही होऊ शकत ते आणि खात्रीचा आणि जवळचा मला तू आहेस म्हणून सगळ मी तुला सांगितल.
अजिंक्य : हो तू पण आहेस माझी सगळ्यात जवळची.
अंजली : मग येणार ना उद्या ?
अजिंक्य : हो भेटू पण काय काम आहे ?
अंजली : कळत नाही का जाणून-बुजून अस बोलतोयस ?
अजिंक्य : काय झाल अग, खरच नाही समजल काही मला.
अंजली : माझ्या पोटात मला बाळ वाढवायचय........ तुझ. मला पण आई व्हायचंय.
अजिंक्य : काय ? अग हे काय बोलतीस ? मला हे असल मनात पण नाही. आणि मी नाही हे करू शकत. एकतर उद्या माझा उपवास आहे. त्यात प्रतीक्षाने एक टेन्शन दिलंय.
अंजली : काय केल तिने ?
अजिंक्य : तू जे मागतीयस तेच तिला पण पाहिजे.
अंजली : काय ?
अजिंक्य : साराला भाऊ हवा छोटा म्हणून हट्ट करतीय आणि त्यासाठी तिन मला लवकर घरी बोलावल आहे. ती तिकड तयार झालीय आणि इकड तूपण तेच मागतीयस.
अंजली : तिला आहे ना सारा गरज मला आहे रे अजिंक्य. समजून घे मला. एकदा प्लीज परत नाही काय मागणार तुला मी. हव तर तुझ्याशी कधी बोलणार नाही मी. तुझ्या आयुष्यात परत येणार पण नाही.
अजिंक्य : अग अस का बोलतीस. अस नको बोलू पण. मलाच कळेना मी काय करू.
अंजली : प्लीज अजिंक्य. ( अंजली रडायला लागली )

कॉल कट होतो. अजिंक्य उशीवर डोक टेकवून झोपतो. इकड अंजली डोळे पुसते आणि मोबाईल नीट बघून कॉल लावते मोबाईल बंद लागतो. अजिंक्यच्या मोबाईलच चार्जिंग संपलेल असत. अजिंक्य मोबाईलला चार्जर जोडून मोबाईल सुरु करतो. आणि अंजलीला कॉल लावतो. ती उचलत नाही. अंजली पाणी प्यायला गेलेली असते. अंजली येऊन झोपते. मोबाईलला हात लावणार तोच तिचा नवरा तिला जवळ घेतो. ती मोबाईल बघायचं सोडून झोपते. इकड अजिंक्य एक मेसेज तिला पाठवून ठेवतो आणि झोपून जातो. 


भाग ०९
सकाळ झाली. इकडे प्रतीक्षा सकाळी आवरून साराला घेऊन सगळ घरातल आवरायला लागली. घट बसले. अजिंक्यला यायला वेळ लागणार होता. मग तिने सगळ आवरून ठेवल. साराला खायला बनवून दिल. मग ती साराला घेऊन बाहेर गेली. इकडे अजिंक्य उठून कधीच बसमध्ये बसला. बस रस्त्याने सुसाट धावत होती. आणि अजिंक्यच मन अगदी धिम्या पावलाने साताऱ्याला चालल होत. अंजलीने सकाळी सगळ आवरल होत. तिने मोबाईल चार्जिंगला लाऊन ठेवला. अजिंक्यने अंजलीला अजून एक मेसेज केला. “काळजी घे.”
तिकडून मेसेज आला “हो. तूपण घे. निट प्रवास कर. पोचलास कि सांग” आणि ती कामाला लागली. वेळ जात राहिला. प्रतीक्षा एक परफ्युमच्या दुकानात आली. तिने एक परफ्युम घेतल. वाह..! काय वास होता. असा कि ते जाहिरातीत दाखवतात ना कि मुलाने परफ्युम मारला कि मुलगी त्याच्याकडे आकर्षित होते. ते खोट असत माहितीय मला पण ह्या परफ्युमचा येणारा वास आणि प्रतीक्षाने धुतलेल्या केसांचा वास घेऊन मला तर वाटत अजिंक्य काय संयम राखून बसला नसता. प्रतीक्षाने आवरलंच होत अस कि बस. अजिंक्य म्हणतो तशी ती दिसत होती. ‘जगातली सर्वात सुंदर मुलगी’. अडीच तास झाले. बस तशी म्हणावी तितकी जोरात चालवली जात नव्हती. म्हणून अजिंक्यला उशीर होत होत.
अंजलीचा मेसेज आला. “पोचला का” अजिंक्यने होकार पाठवला. अंजली निवांत झाली. अजिंक्य नीट पोचला. बर झाल म्हणून आतल्या खोलीत जाऊन केसांना निट वर बांधल. खांद्यावर ओढणी घेतली. आणि एकदा डोळ्यावरून हात फिरवला. डोळे थकलेले वाटत होते. इकडे प्रतीक्षाचा मोबाईल वाजला. ती घरी निघाली होती. तिने कॉल उचलला. अजिंक्यने कानाला मोबाईल लावला. बेलचा आवाज आला.
अजिंक्य : हेल्लो, प्रतीक्षा.. काम वाढल आज पण थांबावं लागतय मला.
प्रतीक्षा : काय रे हे. काल का सांगितल नाहीस. ऐन वेळेस सांगतोस तू मला नेहमी असल काहीतरी मला नाही बोलायचं तुझ्याशी तू जा. माझ्याशी नको बोलूस.
अजिंक्य : अग मला पण आत्ताच समजल आहे. मी निघालो पण होतो. प्लीज ना तू नाही घेणार तर कोण घेणार मला समजून सांग ना ?
प्रतीक्षा : मी आहे म्हणून किती मी समजून घेऊ ? तू घेणार नाहीस का मला समजून ? तू येणार म्हणून मी किती तयारी केली. जाऊदे मी आलेली बाहेर. जाते घरी.
अजिंक्य : कुठ गेलेलीस ?
प्रतीक्षा : जाऊदे... उद्या तरी येणारेस का ?
अजिंक्य : हो नक्की. तू चिडू नकोस ना.
प्रतीक्षा : चिडत नाहीरे अजिंक्य. मी तुझी वाट बघतीय ना. तुला माहितीय ना मला एकट्याला नाही राहवत. मला तू लागतोस सतत अवती भोवती.
अजिंक्य : हो. बर ऐक बाळ. मी येतो रात्री पर्यंत. चालेल ?
प्रतीक्षा : नको उशिरा प्रवास करू.
अजिंक्य : नाही दुपारी निघेन ना काम लवकर उरकून. शूट लवकर करतो कम्प्लीट. आठ पर्यंत येतो.
प्रतीक्षा : वाट बघतीय. मी ये लवकर. आय लव्ह यु.
अंजली दार उघडते. ती अजिंक्यला बघते आणि त्याच्या डाव्या हाताला धरून घरात घेते. अजिंक्य तिला डोळ्याने खुणावतो. आणि बोलतो,
अजिंक्य : लव्ह यु. प्रतीक्षा. खूप खूप खूप जास्त.
अंजली त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात पाणी येत. अजिंक्य कॉल कट करतो मोबाईल खिशात ठेवतो. आणि सोफ्यावर जाऊन बसतो. अंजली दार लावते आणि आत जाऊन फ्रीज मधून पाण्याची बाटली आणते. तो पाणी पितो. आणि बाटली टेबलावर पुढे ठेवतो.
अंजली त्याच्या जवळ बसते थोडस अंतर ठेवून.
अंजली : कसा झाला प्रवास ?
अजिंक्य : ठीक. कशीयस ?
अंजली ; कशी वाटतेय ?
अजिंक्य : ठीक नाही.
अंजली : मग कर मला ठीक.
अजिंक्य : पण, कस तरी वाटतय मला अंजली.
अंजली : मला पण. पण अजिंक्य....
अजिंक्य : काय ?
अंजली  त्याच्या जवळ सरकली आणि त्याला मिठी मारून त्याच्या कानाशी बोलली,
अंजली : अजिंक्य...
अजिंक्य : हम...?
अंजली : आय लव्ह यु खूप सार.
अजिंक्यला काय कराव आणि काय बोलाव सुचत नव्हत. तिने त्याला मिठी मारली असली तरी त्याने अजून तिला हात लावला नव्हता. तिने त्याच्या पाठीला हाताने घट्ट पकडल. अजिंक्याच्या मानेला आपले ओठ टेकवले. आणि त्याच क्षणी अजिंक्य तिला जवळ ओढून घेतो.
अंजली : ( मिठीत डोळे मिटून असते ) बोल ना...
अजिंक्य : काय ?
अंजली : मी काय बोलले. आय लव्ह यु खूप सार.
अजिंक्य : माझ फक्त प्रतीक्षावर प्रेम आहे.
अंजली बाजूला झाली. राग अलायासारख ती उठून आतल्या खोलीत गेली. अजिंक्य बसून होता. मग त्यालाच कस तरी वाटल. त्याने जरा बाहेरच्या खोलीकडे तिथच बसून एकदा नजर टाकून बघितल. मग उठून तो आत गेला. आत अंजली आरशासमोर बसलेली रडत. शांत. डोळ्यातून फक्त पाणी येत होत. बाकी चेहऱ्यावर काहीच हावभाव नाही. अजिंक्यला सुचेना तो गेला तिच्या मगे उभा राहिला. तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने तो झटकला. अजिंक्यने मग परत तिच्या केसांवर हात फिरवला. ती उठून बेडवर बसली.
अजिंक्य : काय झाल ?
अंजली : जाऊ दे प्रेम नाही ना माझ्यावर तुझ ? जाऊ दे ना मग.
अजिंक्य : अस काय नाही ग अस नको ना बोलू. पण तू समजून घे ना मला.
अंजली डोळ्याच पाणी पुसायला लागते. अजिंक्य जवळ जाऊन तिच्या उभा रहतो पुढे आणि तिच्या डोळ्यातल आलेल पाणी हाताने पुसतो. ति त्याच्या दोन्ही हाताना हातात पकडते. अजिंक्य डोळे मिटतो त्याला प्रतीक्षा सारा आठवते.
अजिंक्य : मला माफ कर.
अंजली : का ?
आणि अजिंक्य तिला मागे सरकवतो. अंजली पण अंग सैल सोडते. आणि मागे सरकते. डोक्याखाली उशी घेते. अजिंक्य तिच्या जवळ असतो. खूप वर्षांनी असे ते एकत्र जवळ आलेले. तिला आठवल या आधी दोनदा केलेलं. तिने त्याला जवळ मिठीत ओढलं.
प्रतीक्षा इकडे बसलेली बेडवर अजिंक्यने लिहिलेल्या तिच्यासाठीच्या कवितेची डायरी वाचत. सगळ्यावर तिचच नाव होत. आणि एका कवितेत मात्र प्रियांका नाव दिसल. आणि प्रतीक्षाला कस तरी वाटल तिने ते पान डायरीतून फाडल आणि तिच्या कपाटात साडी खाली ठेवल लपवून. आणि बसली पुढ वाचत. इकडे दोघांच प्रेम चरमसुखापर्यंत पोचलच होत. 


भाग १०
अजिंक्य बसलेला असतो. अंजली जाऊन पाणी आणते. अजिंक्य थोड पाणी पितो. ग्लास अंजलीकडे देतो. अंजली उगीच लाडात आल्यासारखं अजिंक्यजवळ बसते आणि पाणी पिते. अजिंक्य अलगद बाजूला सरतो. अंजलीला ते जाणवत.
अंजली : काय झाल आता ?
अजिंक्य : कुठ काय ? काय नाही. का ग ?
अंजली : मग अस का केलस ?
अजिंक्य : काय केल ?
अंजली : बाजूला का सरलास ? मी जवळ बसले तर ?
अजिंक्य : अस काही नाही. तुला बसायला जागा दिली.
अंजली : काहीही बर का, बेड आहे खुर्ची नाही. जागाच जागा आहे. खर सांग काय झाल ?
अजिंक्य : ( अजिंक्य अंजलीकडे पूर्ण वळून ) हे आपल्या दोघातच राहील ना ?
अंजली : हो.
अजिंक्य : मी कधी फसवल नाही प्रतीक्षाला आणि कधीच फसवायच पण नाही. पण मी नाही सांगू शकत तिला. हे बघ मी मनात नाही ठेवू शकत हे प्रतीक्षापासून लपवून. पण गत्यंतर नाही. मी सांगणार नाही तूपण सांगायचं नाही. प्रॉमिस दे.
अंजली : ( अजिंक्यच्या हातावर हात ठेवत ) प्रॉमिस.
अजिंक्य : बर मी निघू ?
अंजली : तू थांबणार होतास ना ?
अजिंक्य : हो पण प्रतीक्षा तिकड नाराज झालीय. ती कधी राहत नाही माझ्याशिवाय. पहिल्यांदा तिला मी सोडून आलोय अस एकटीला.
अंजली : खूप लकी आहे ती.
अजिंक्य : का ?
अंजली : माझ प्रेम तिला मिळाला. ते पण असच.
अजिंक्य : अंजली हा विषय नको परत. तुझा तुझा संसार सुरु झालाय. माझा माझा सुरुय. त्यात जर हे जुन प्रेम उकरून काढलंस तर दोघांचे संसार मोडायची पाळी येईल समजतय का तुला ? जरा मनावर ताबा ठेव.
अंजली : तुला ठेवता येतो का ताबा तुझ्या प्रेमावर ? प्रतीक्षाची आठवण काढतोयसच ना मी सोबत असताना पण. माझ्यासोबत ते सगळ करून पण.
अजिंक्य : हे बघ ती तुझी गरज होती. माझी नाही. दोघांची गरज असते इच्छा असते आणि तेव्हा हे प्रेम होत तेव्हा दुसर काही सुचत नाही. आत्ता इथ मी प्रतीक्षाला फसवल आहे. आणि अजून किती फसवणार आहे कुणाला माहित ? आणि जरी मी कायम हि एक गोष्ट प्रतीक्षापासून लपवून ठेवली आणि भविष्यात तू कधी समोर आलीस तुझ्या बाळाला घेऊन तर मला काय वाटेल माहित नाही.
अंजली : हे सगळे विचार सोड. तू शांत हो. उगीच सगळ्या जगाचे विचार करत बसू नकोस. तुझ लिखाण कस सुरुय ?
अजिंक्य : हे काय मधेच ?
अंजली : सांग ना ?
अजिंक्य : मस्त सुरु आहे. तीन टीव्ही सिरीयल सध्द्या लिहितोय. आणि एक मोठी फिचर फिल्म बनवतोय.
अंजली : बनवतोय म्हणजे ? लिहितोयस का ?
अजिंक्य : नाही डायरेक्शन करतोय.
अंजली : वाह.... तू तर खूप मोठा झालास रे...
अजिंक्य : व्हायचंय अजून.
अंजली : मला मध्यंतरी किती आठवण आली तुझी. तुला कॉल करावा म्हणत होते. पण केला नाही. मग तुला इंस्टा, फेसबुकवर शोधलं. पण नव्हता तू.
अजिंक्य : हम... वापरत नाही मी. वेळ नसतो मला.
अंजली : मग मला सापडलास तू गुगलवर. खरच खूप भारी वाटल मला. ऐक ना,
अजिंक्य : काय ?
अंजली : आय लव्ह यु कायम.....
अजिंक्य : हम. पण आय लव्ह प्रतीक्षा...
अंजली : खोट खोट म्हणाला असतास तरी चालल असत. तू गेल्यावर काय आता येणार नाहीस. मी पोटातल्या तुझ्या माझ्या बाळाला काय सांगू ?
अजिंक्य : मी भेटेन तुला. केलय तर निभावणार सुध्दा. काय लागल सवरल तर मला सांग.
अंजली : आणि तूच लागला तर ?
अजिंक्य : येण्याचा प्रयत्न करीन. मी निघतो.
अंजली : निघालास ? खाऊन जा ना. मी जेवण बनवलय.
अजिंक्य : चालेल.
अंजली अजिंक्य जेवले. मग अजिंक्य तिच्याशी जरास बोलला आणि चार वाजता निघाला. साताऱ्याला घरी आठला पोचला. दार वाजवल. प्रतीक्षा हसून दार उघडते. अजिंक्य आत गेला. प्रतीक्षा त्याला पाणी आणून देते आणि आत निघून जाते.
अजिंक्य पाणी पिऊन आत गेला आणि बेडवर जाऊन झोपला. सारा जाऊन त्याला उठवायला लागते. अजिंक्य थकलाय सांगतो. सारा ऐकत नाही. त्या आवाजाने प्रतीक्षा आत आली. अजिंक्य असा कधी झोपत नाही आज काय झाल म्हणून ती त्याच्या जवळ बसते आणि त्याच्या कपाळावर हात फिरवत बसते.
प्रतीक्षा : काय झाल ?
अजिंक्य : थकलोय ग मी.
प्रतीक्षा : झोपणारेस का ?
अजिंक्य : हो.
अजिंक्य झोपला. प्रतीक्षा साराला घेऊन बाहेरच्या खोलीत गेली.


भाग ११
सारा बाहुलीशी खेळत बसलेली. प्रतीक्षा सोफ्यावर बसलेली टीव्ही बघत. तस बघायला गेल तर तीची नजर फक्त टीव्हीकडे होती. विचार आणि लक्ष मात्र अजिंक्यच्यात रमल होत. अजिंक्य का नको म्हणत असेल दुसऱ्या बाळासाठी तिला काही समजत नव्हत. ते एक विचार असताना आता प्रियांका कोण हे पण तिला कळत नव्हत. एकदम जर अजिंक्यला विचारल तर चिडेल तो या विचाराने तिने प्रियांकाचा विषय बाजूला केलेला.
तरीपण मग फिरून फिरून एकच विचार डोक्यात येत होता अजिंक्यला काय झाल ? का नको म्हणतोय तो दुसर मुल ? त्याला कुणी सांगितल असेल का काय ? काहीच समजायला तिला मार्ग नव्हता. इतक्यात अजिंक्यचा आवाज आला मागून. तिने बसल्या जागीच फक्त मान मागे वळवून बघितल. अजिंक्य बारीक डोळे करून उभा होता जांभई देत.
प्रतीक्षा : झाली का झोप ?
अजिंक्य : नाही. कामामुळ झोप पण नाही झाली काल निट. त्यात तुझी आठवण येत होती रात्री. सकाळी निघावं म्हंटल लवकर तर काम आल. मग तुझ्याजवळ यायला नुसता वेळच वेळच वाढत जात होता.
प्रतीक्षा : ये इकड.
अजिंक्य तिच्या जवळ गेला. तिच्या शेजारी बसला. ती त्याच्या डोक्यावरून केसातून हात फिरवत होती आणि त्या तिच्या प्रेमाने कुरवाळण्याने त्याची क्षणात झोप उडाली. दुपारी असच काहीस जाणवत होत जेव्हा तो अंजली सोबत झोपला होता तिच्यावर. तीपण अशीच अजिंक्याच्या केसातून हात फिरवत होती. त्याने प्रतीक्षाचा हात केसातून काढला. आणि तिच्या खांद्यावर डोक टेकवून टीव्ही बघायला लागला.
प्रतीक्षा : काय झाल ? मूड ठीक दिसत नाहीये ? कोण काय बोलला का ? का सेट वर काय झाल ?
अजिंक्य : नाही ग. असच जरा आतून ठीक वाटत नाहीये.
प्रतीक्षा : नक्की ना ? मला माहितीय तू मला सगळ सांगतोस. म्हणून मी फोर्स करणार नाही. पण तरी काय असेल तर सांग.
अजिंक्य : नाही अस काही नाही. पण एक सांगायचंय तुला.
प्रतीक्षा : काय ?
अजिंक्य : तुला खरच हवय का दुसर मुल ?
प्रतीक्षा : हो आणि तो पण मुलगाच.
अजिंक्य : बर.
प्रतीक्षा : तूला का नकोय ते मला सांगतोस का आधी ?
अजिंक्य : माझ काय नाही.. पण मला वाटत आहे एक तर कशाला.
प्रतीक्षा : पण हरकत काय आहे दुसर असल तर ?
अजिंक्य : काहीच नाही.
प्रतीक्षा : माहित आहे मला तुझी जबाबदारी वाढणार आहे. पण हव तितक कमावतोयस मग काय हरकत आहे ? आणि सारा कुठवर आहे सोबत ? तीच लग्न झाल कि परत आपण एकटच. म्हातारपणी नको का कोण आपल्याला ?
अजिंक्य : मला तर मुलाची वैगरे गरज नाही.
प्रतीक्षा : मग ?
अजिंक्य : मला तू हवीस माझ्या म्हातारपणी बाकी माझी काही अपेक्षा नाही. मला अस वाटत फक्त तू असाव. सतत समोर तू दिसाव. बाकी ती मुल वैगरे मोह आहे ग. काय त्यांचा उपयोग ? लहान असतात तोवर गोड-गुटगूटीत वाटतात नंतर जशी जशी मोठी होतात नुसता डोक्याला ताप होतो. मुलगी असली तरी वयात आल्यावर कोण माग लागतय कोण कस वागतय सगळ्याच टेन्शन. मुलगा असला तरी कुठ जातोय काय करतोय. कुणाची सांगत धरतोय. कुठ जाऊन मारामारी तर करत नाही न. सगळ्या-सगळ्याच टेन्शन. यात आपण जगायचं कधी ? हे बघ एक तर मला आत्ता कुठ जगायला मिळाल आहे ते पण तू लग्न केलस माझ्याशी म्हणून नाहीतर माझी अजून सुरुवातच नसती.
तुझ्यामुळ हे मी काम वैगरे करतोय. आयुष्य जगतोय.
प्रतीक्षा : हो माहित आहे पण माझी इच्छा आहे.
अजिंक्य : ऐकायचच नाही ठरवल असशील तर ठीके. घेऊ चान्स. पण दोघांच्यात कधीही तुलना करायची नाहीस. मी हि कधी तुलना करणार नाही. दोघांचा हि आदर्श वडील बनून वागेन.
प्रतीक्षा : हो मी हि आई म्हणून कुठे कमी पडणार नाही.
अजिंक्य : वाटल नव्हत मला प्रतीक्षा...
प्रतीक्षा : काय ?
अजिंक्य : हेच कि आपण एकत्र येऊ कधी. कॉलेजला प्रेमात असताना वाटायचं आपण लग्न करू. कोण नाही हो बोलल तर पळून जाऊन करू पण त्या नुसत्या बाता होत्या प्रत्यक्षात ते जमणार पण नव्हत हे माहित होत पण उगीच हिरो सारख अंगात यायचं माझ्या तू समोर असलीस कि आणि मी काहीही तुझ्यापुढ बडबड करायचो. तू पण अगदी माझ्यावर विश्वास ठेवायचीस.
प्रतीक्षा : हो. माझ प्रेम होत तुझ्यावर पहिलं. तू म्हणशील ते मला पटायचं. आणि तुझ ऐकायला मला आवडायचं.
अजिंक्य : आज तू आत्ता अशी माझ्या जवळ बसलीयस. दुसऱ्या मुलाबद्दल आपल बोलन सुरु आहे. म्हणजे हेच का ते प्रेम ? मला काहीच समजत नाहीये. कसल भारी झालय आयुष्य. मनात येईल तेव्हा तुला बघायचं. मनात येईल तेव्हा तुला जवळ घ्यायचं. तास तासभर तुझ्या घरापाशी रस्त्यावर उभा राहायचं नाही. माझा वर्ग सोडून कॉलेजच्या गेटपाशी तुझी वाट बघत बसायचं नाही. तू माझ्याकड बघितल कि नजर चोरून घ्यायची नाही. कुणाला हि भ्यायचं नाही. सगळ कस आता बिनधास्त.
प्रतीक्षा : हो. म्हणूनच म्हणते. प्रेम करतोस तू माझ्यावर ठीक आहे. माझ तुझ्यावर प्रेम आहे पण ते दिसायला नको का ? आणि तू नाही म्हणालास आणि मी मानलं समाधान सारावर तरी मला कायम वाटत राहील ना एक स्त्री म्हणून कि तुझ हि प्रेम मला मिळाव....
अजिंक्य : हो..
प्रतीक्षा : करायचं ?
अजिंक्य : हो.
प्रतीक्षा : कधी ?
अजिंक्य : आज... आत्ता...
प्रतीक्षा : खर ?
अजिंक्य : हो... सारा झोपली कि.
प्रतीक्षा : चालेल..... तू जेवणार का ?
अजिंक्य : भरल पोट.
प्रतीक्षा : कस काय ? काय खाऊन आलेलास का ?
अजिंक्य : नाही मला बर वाटल तुला खुश बघून.
प्रतीक्षा : आहेस तू तर मी का नाराज होऊ. आणि तू कधीच मला नाराज करत नाहीस. मला माहितीय तू पुढे हि मला नाराज करणार नाहीस कधी होणा ?
अजिंक्य : हो. कधीच नाही.
प्रतीक्षा : चल जेवता. मी पण जेवायची आहे अजून.
अजिंक्य : चल.
दोघ आत गेले. प्रतीक्षाने अजिंक्यला वाढल. आणि स्वतः हि घेतल. दोघ जेवत बसले.


भाग १२
अजिंक्य प्रतीक्षाच्या शेजारी झोपलेला असतो. डोळे मिटून तो नुसता पडलेला असतो. प्रतीक्षा लाडात आल्यासारखी त्याला मागून घट्ट पकडते आणि त्याच्या अंगावर हात टाकते. अजिंक्य त्या हालचालीने तिच्याकडे कूस करून बघतो आणि तिला जवळ घेतो.
अजिंक्य : आता तरी खुश ना ?
प्रतीक्षा : हो खूप खूप.. खुश. खूप भारी वाटतय मला. आज पहिल्यांदा आपण अस जवळ आलो.
अजिंक्य : मला नाही ठीक वाटत.
प्रतीक्षा : त्रास होतोय का ?
अजिंक्य : नाही. मी प्रेम तुझ्या मनावर केल कायम. ह्या सेक्सचा कधी विचार नव्हता केला.
प्रतीक्षा : का ?
अजिंक्य : अग जग किती बिघडलय. प्रेम इथ संपत चाललय. म्हणजे खर प्रेम. ज्याला त्याला फक्त प्रेमाच्या नावाखाली सेक्स करायचा आहे. मी म्हणून ठरवलेल तुझ्यावर प्रेम करायचं पण सेक्स हि गोष्ट डोक्यातून बाहेर काढून. नेमकी तीच गोष्ट आपण केली म्हणून आता कस तरी वाटतय....
प्रतीक्षा : अरे पण आपण अजिंक्य नवरा बायको आहोत. त्यात कशाला असले विचार करतोस आणि नवरा बायको म्हंटल कि हे अस होणारच ना.
अजिंक्य : हम. पण पुन्हा नको... इतक्यात तरी. सतत सतत सेक्स करून प्रेम आणि आकर्षण खूप जास्त कमी होत. मला प्रेमाला मारायचं नाही जगवायचं आहे. त्यामुळे शारीरिक प्रेमात तरी आपण थोड अंतर राखूनच राहू.
प्रतीक्षा : हो. तू म्हणशील तस वागणार मी. मी तुझी आहे ना... आणि कधीहि तुला इच्छा झाली माझ्या जवळ येण्याची तर कायम मी तुझी आहे.
अजिंक्य : हो. आय लव्ह यु..
प्रतीक्षा : आय लव्ह यु.
दोघ झोपून गेले.
दिवस जात जात जात होते.. दीड महिना होऊन गेला. प्रतीक्षाला दिवस गेले होते. दिवाळी जवळ आलेली. प्रतीक्षाच फराळाच काम सुरु होत. अजिंक्यची घराची साफसफाई सूरु होती. प्रतीक्षाला त्रास नको म्हणून तो हि नंतर फराळ बनवायला मदतीला लागला. दोघांच्यात त्या रात्रीपासून अजूनच प्रेम वाढल होत. त्या प्रेमाला जपत-फुलवत दोघांच आयुष्य नीट सुरु होत. उद्या धनत्रयोदशी होती. आकाशकंदील लावत असताना अजिंक्यला एक मेसेज आला. त्याने पहिला आकाशकंदील लावला. मग त्याला बल्ब लावून  आकाशकंदील कसा दिसतोय दाखवायला प्रतीक्षाला त्याने हाक मारली. सारा आणि प्रतीक्षा दोघी दारात आल्या. दोघींना ते आवडल. मग अजिंक्य स्टुलावरून खाली उतरला. प्रतीक्षा साराला घेऊन आत गेली. अजिंक्य लाईट माळ घ्यायला टेबलापाशी आला. आणि परत त्याचा मोबाईल वाजला. मग त्याने हातातली माळ खाली ठेवून मेसेज वाचायला सुरुवात केली.
“देवाकडे मागून मी तुला मिळवल, त्याने माझी इच्छा पूर्ण केली आणि मी त्याला दान द्यायचं विसरूनच गेले....आणि म्हणून तू माझा कायमचा झाला नाहीस. याच दुःख होतय मला. पण त्या देवाकडे मागितलेल्या मागणीत थोडीफार का होईना माझी श्रद्धा देवाला दिसली असावी म्हणून त्याने परत तुझी माझी भेट घडवली. आणि.....”
अजिंक्यने मेसेजला रिप्लाय दिला “आणि ?”
परत मेसेज आला, “आणि तू नाही निदान तुझ प्रेम तरी माझ्या पोटात वाढतय... माझ्या या हृदयात तुझ्या नावच प्रेम वाढवायचं नशीब नाही मिळाल मला पण पोटात तरी वाढवते...”
अजिंक्यने मेसेज केला, “म्हणजे ? समजल नाही मला ? आणि आज अचानक आठवण कशी आली तुला माझी ?”
“आठवण तर रोज येतेय. पण म्हंटल आजच्या मुहूर्ताला तुला चांगली बातमी द्यावी. म्हणून तुला मेसेज केला. मी प्रेग्नेंट आहे अजिंक्य. तुझ्यापासून. खूप मिस करतेय आत्ता तुला. पोटातल बाळ नकळत माझ्या श्वाससोबत श्वास घ्यायला शिकतय. आणि नकळत माझ्या नवऱ्या ऐवजी माझ सॉरी..... आपल बाळ एक बाप म्हणून आत्तापासूनच तुझ्यावर प्रेम करायला शिकतय.  तू खुश आहेस प्रतीक्षा सोबत.. होना ? मी हि इथ खुश आहे तितकीच तुझ्या आठवणीत. कधी जमल तर एकदा भेटून जा. तुझी गरज आहे मला.”
अजिंक्य मेसेज करतो, “ इतक्यात तरी जमणार नाही पण येऊन जाईन अधीमधी....तू काळजी घे तुझी. काय लागल तर सांग नक्की. मी हि इकड कामात बिझी आहे आणि प्रतीक्षा पण प्रेग्नेंट आहे.”
“हम.. चांगल आहे. आय लव्ह यु.. खूप खूप आठवण येतीय आत्ता तुझी.”
अजिंक्य, ”इतकी नको आठवण काढू. तू तुझी काळजी घे.”
“हो..तू कॉल करत जा निदान तू नाही तर तुझ्या आवाजाने तरी मला बर वाटेल. तुझ्या आठवणींच मी काय करू ? मी विसरले तरी त्या आठवतात मला”
अजिंक्य, “नको अस करू खा पी आणि काळजी घे. मी भेटायला येईन तू नीट काळजी घेतलीस तर.”
“खरच येणार का ?”
अजिंक्य, “ हो. चल. मी आवरतोय. घर. बाय.काळजी घे”
“तू पण काळजी घे. आय लव्ह यु. अजिंक्य”
अजिंक्य,”हम..”
“माहितीय मला तुझ प्रतीक्षावर प्रेम आहे तरी एकदा आपल्या बाळासाठी म्हण ना. त्याला ऐकावस वाटतय..”
“आय लव्ह यु अंजली”...  

अजिंक्य लाईट माळ लावतो.


भाग १३
आज पाडवा आहे. नवरा बायको जे काही करतात तो उटण वैगरे लावायचा कार्यक्रम झाला. दोघांनी आणि साराने फराळ केला. विशेष म्हणजे आज अजिंक्यने प्रतीक्षाला सोन्याच गळ्यातल घेतल होत. ते तिलासुद्धा आवडलेलं. पाडवा म्हणजे काही असा विशेष दिवस नाही म्हणजे जेवढ नरक चतुर्थीला किंवा लक्ष्मी पूजनाला दिवाळीच अप्रूप वाटत तितक पाडव्याला वाटत नाही. आता वाजले असतील निदान दुपारचे एक तरी. प्रतीक्षा साराला घेऊन टीव्ही बघत बसलेली. अजिंक्य इकडे आत सिरीयलची स्क्रिप्ट लिहित होता. लिहित असताना काही सुचतच नव्हत म्हणजे नक्की पुढचा भाग कसा रंगवावा.
आशु तिच्या प्रियकराला भेटायला जात असते आणि वाटेत तिचा अपघात होतो. हे जेव्हा तिच्या प्रियकराला समजत. तो तिला बघायला दवाखान्यात जातो. बस मधले चाळीस लोक गंभीर असतात आणि तेरा मेलेले असतात. मृत लोकांना अस झाकून ठेवलेलं असत. त्या प्रियकराला आत जायची हिम्मत होत नाही. तो रडतच बाहेर रस्त्यावर येतो. कुठ जायचं-कुठ जायचं ? म्हणून तो घरी आला. त्याने आपल सामान भरल आणि घराबाहेर पडला. दाराला कुलूप लावल. घरी असहि कुणी नव्हत. त्याने आईला रिक्षात बसताना कॉल केला. सांगितल मी मित्राकडे दोन दिवस चाललोय. दोन दिवसांनी येतो. पुढच काही ऐकायच्या आधी त्याने कॉल कट केला. एके ठिकाणी त्याने रिक्षा थांबवली. चालत चालत तो सामान घेऊन पुढे झुडुपात गेला. त्याला तहान लागली. त्याने एक बाटली काढली छोटीशीच. आशुला आठवून त्याने ती बाटली तोंडाला लावली. 
जराशी हातापायाची हालचाल झाली. बाटली हातातून खाली मांडीपाशी पडली. इकडे गंभीर लोकांमधून आशु ठीक झाली. ती मेली नव्हतीच. तिला घरी सोडल. अजून जरा काही दिवसांनी ती प्रियकराला भेटायला स्वतः गेली आणि बघते तर तो घरी नव्हता. तो घरीच काय या जगातच नव्हता. जिच्यासाठी तो मेला ती तर जिवंतच होती. मग हिने सुद्धा जाऊन आत्महत्या केली. अजिंक्य त्याचाच विचार करत हि कथा लिहित असताना त्याचा मोबाईल वाजला. अजिंक्यने कॉल उचलला.
अजिंक्य : हेल्लो
ज्योती : हेल्लो, अजिंक्य बोलताय का ?
अजिंक्य : हो बोला ?
ज्योती : मी तुमची सिरीयल बघते रोज टीव्हीवर. खूप सुंदर लिहिता तुम्ही. म्हणजे अर्धातास मी त्या तुमच्या स्टोरीत हरवून जाते. खूप उत्कृष्ट लिहिता.
अजिंक्य : धन्यवाद.
ज्योती : आमच्या इथ तर साडेसात वाजले कि सगळीकडे तुमच्या सिरीयालच्या गाण्याचाच आवाज येतो. सगळे तारीफ करतात हिरो, हिरोईनच पण खर तर सगळ श्रेय तुमच आहे. लोकांना कळत कस नाही. लेखक लिहितो उत्तम म्हणून डायरेक्टर आणि हिरो, हिरोईन काम चांगल करतात. ते दिसतात म्हणून त्यांची चर्चा असते लेखकाला कोण आठवत पण नाही.
अजिंक्य : तुमच बरोबर आहे पण अशीच पद्धत आहे.
ज्योती : माझी मैत्रीण आहेना ती तुमच्या सिरीयलची हेअर ड्रेसर आहे. मी तिच्याकडून तुमचा नंबर मिळवला आणि कॉल केला. खूप दिवस इच्छा होती तुमच्याशी बोलण्याची आज मनाची तयारी करून कॉल लावला तुम्हाला.
अजिंक्य : ओह. आभारी आहे. कुठून बोलताय आपण ?
ज्योती : मुंबई.
अजिंक्य : शुटींग मुंबईतच सुरु आहे.
ज्योती : हो माहित आहे.
अजिंक्य : बर.
ज्योती : एक सांगायचं होत.
अजिंक्य : बोला ?
ज्योती : मला तुम्हाला भेटायचं होत.
अजिंक्य : मी सहसा भेटत नाही कुणाला.
ज्योती : प्लीज एकदा भेटायचं आहे.
अजिंक्य : सध्या तर मला वेळ नाही काम सुरु आहेत. आणि दिवाळीसुद्धा आहे.
ज्योती : नंतर परत कधी ?
अजिंक्य : मी सोमवारी मुंबईला येणार आहे तीन चार दिवसासाठी.
ज्योती : मग तर बर होईल इथेच भेटेन तुम्हाला.
अजिंक्य : हो चालेल.
ज्योती : सेटवर भेटायचं कि कुठे दुसरीकडे ?
अजिंक्य : सेटवर नाही भेटता येणार दुसरीकडे चालेल. मी कळवेन तस तुम्हाला.
ज्योती : मी वाट बघेन खूप इच्छा आहे तुम्हाला भेटायची.
अजिंक्य : नक्की. मी स्क्रिप्ट लिहित आहे. तर.
ज्योती : हो सॉरी मी त्रास दिला असेल तुम्हाला तर. मी सोमवारी कॉल करेन तुम्हाला.
अजिंक्य : चालेल.
ज्योती : बाय.
अजिंक्य : काळजी घ्या.
ज्योती : हो नक्की तुम्ही पण घ्या.
अजिंक्य पुन्हा स्क्रिप्ट लिहायला लागला. स्क्रिप्ट लिहून झाली. आणि दुपार पण गाढ तयार झालेली. दुपारचे अडीच वाजत आलेले. अजिंक्यला झोप आलेली तो जाऊन झोपला. रात्री त्याला जागायचं होत.
दिवाळी संपली. पुन्हा रुटीन सुरु झाल. अजिंक्य मुंबईला गेला. शुटींगचा पहिला दिवस होता. स्क्रिप्ट नुसार शूट चालू होत. या भागात अजिंक्य सुद्धा छोटा रोल करत होता. त्याच शूट झाल आणि तो चहा प्यायला बाहेर आला. तिथ चहा आणि सिगरेट ओढत असताना ज्योतीचा कॉल आला. अजिंक्याने कॉल कट केला. आणि पुन्हा कॉल आला. अजिंक्य सिगरेट विजवून एका दमात चहा पितो आणि सेटवर निघून जातो. तेवढ्यात त्याला पुन्हा एकदा ज्योतीचा कॉल येतो. 
आणि .... 


भाग १४
अजिंक्य कॉल उचलतो.
अजिंक्य : कोण ?
ज्योती : सर मी ज्योती.
अजिंक्य : हा बोला ?
ज्योती : बिझी आहात का ?
अजिंक्य : हो शुटींग मध्ये आहे.
ज्योती : फ्री कधी होणार ?
अजिंक्य : एक दहा मिनिटांनी.
ज्योती : लक्षात आल का नक्की मी कोण बोलतीय ? आपण भेटणार होतो ना.
अजिंक्य : हो आहे लक्षात. मी फ्री झालो कि कॉल करेन.
ज्योती : वाट बघतेय.
अजिंक्य : हो. चालेल.
अजिंक्य पुन्हा शुटींगमध्ये बिझी झाला. त्याच नंतर शुटींग झाल्यावर त्याने मोबाईल हातात घेतला. त्यात त्याला एक मेसेज आलेला दिसतो. एका कॅफेच त्यात नाव आणि पत्ता पाठवलेला असतो. अजिंक्य ज्योतीला कॉल लावून पत्ता खात्रीसाठी नीट विचारतो. ती तो सांगते. मग अजिंक्य तिकडे जातो. कॅफेत आत गेल्यावर तो आत नजर टाकतो. आत सगळे कपल बसलेले असतात. एकटी मुलगी कुणी दिसत नाही. बहुदा ज्योती आलीच नसेल म्हणून अजिंक्य पुन्हा कॅफे बाहेर आला आणि ज्योतीला कॉल लावायला त्याने मोबाईल मधला कॉल लॉग उघडला आणि तेवढ्यात ज्योतीचाच कॉल आला.
अजिंक्य : हा ? तुम्ही आला नाहीत का अजून ?
ज्योती : आलीय ना.
अजिंक्य : इथ आलेलो मी पण तुम्ही दिसला नाहीत. कुणासोबत आलाय का ?
ज्योती : नाही हो. एकटीच आलीय आणि मी खाली नाही. वर या ना. वरच्या मजल्यावर पण आहे जागा.
अजिंक्य : बर आलो.
अजिंक्य मोबाईल खिशात ठेवून आत गेला. तिथून वरच्या मजल्यावर गेला. एका टेबलावर खूप सुंदर मुलगी बसलेली. सुंदरसा काळ्या रंगाचा वर गळ्याला लाल-गुलाबी रंगाची नक्षी असलेला पंजाबी ड्रेस घालून. केसं तशी थोडीशी मागे बांधून नाजूक खांद्यावर सोडलेली. डोळे अगदी सुंदरच. ती जागची उठली इतक्यात अजिंक्यच तिच्या समोर जाऊन बसला. आणि मग ती हि जागेवर बसली.
अजिंक्य मोबाईलवर काहीतरी लिहित होता. ज्योती ते बघत बसली. पाच मिनिट अशीच गेली. मग अजिंक्यच पुढे लक्ष गेल.
अजिंक्य : काय झाल ? बोला कि. काहीतरी बोलायचं होत ना तुम्हाला ? काय घेणार ? चहा-कॉफी ?
ज्योती : कॉफी चालेल. तुम्हाला काय आवडत ?
अजिंक्य : काही पण चालत. खाण्यात तशी आवड नाही.
अजिंक्य मग दोन कॉफी ऑर्डर करतो. मग स्वतःचा मोबाईल टेबलावर ठेवतो आणि ज्योतीकडे बघतो आता दोघ बोलायला सुरुवात करणार होते.
अजिंक्य : आपण इथल्याच का ?
ज्योती : नाही. मी परळीची आहे. जॉबसाठी इकडे असते.
अजिंक्य : परळी कोणती ?
ज्योती : साताऱ्याची.
अजिंक्य : अरे वाह.. मग आपण एकाच गावाचे आहोत. मी प्रॉपर साताऱ्याचा आहे.
ज्योती : खर सांगताय ?
अजिंक्य : हो. खोट शक्यतो मी बोलत नाही. आवडत नाही मला ते.
ज्योती : होका ? मग काय आवडत.
अजिंक्य : म्हणजे ?
ज्योती : नाही म्हणजे मग काय आवडत तुम्हाला करायला-बघयला वैगरे खूप इच्छा आहे जाणून घ्यायची तुमच्याबद्दल.
अजिंक्य : खास अस काही नाही. सध्या तरी सिरीयलची काम सुरु आहे त्यातच दिवस जातात. वेगळ अस काही करायला बघायला वेळ मिळत नाही. मुंबई पुणे सातारा एवढच असत. तुम्ही काय करता ?
ज्योती : मी कंपनीत काम करते.
अजिंक्य : मग आज गेला नाहीत का ?
ज्योती : नाही. तुम्हाला भेटायचं मग कशी जाऊ. आलेली संधी घालवायला नको म्हणून म्हंटल आज भेटून घ्याव तुम्हाला. परत तुम्ही जाणार ना उद्या ?
अजिंक्य : नाही परवा जाणार आहे.
ज्योती : हा मग. आणि मला शनिवार-रविवारी सुट्टी असते ना. परत तुम्ही भेटाल न भेटाल म्हणून आले भेटायला. तुमच्यासारखी मोठी माणस. माझ्यासाठी वेळ काढलात तेच खूप आहे माझ्यासाठी.
अजिंक्य : अस काही नाही. मला कुणाला निराश करायला आवडत नाही आणि तुम्ही स्वतःहून कॉल केलात, भेटायचं बोललात आणि आता तर आपण साताऱ्याचे आहोत. त्यात अस काही नाही.
तेवढ्यात कॉफी आली. दोघांनी एक एक घोट घेतला.
ज्योती : खूप असतील ना मागे तुमच्या. मुली?
अजिंक्य : काय ?
ज्योती : माणस ?
अजिंक्य : हा. असतात. का हो ?
ज्योती : नाही असच. तुम्हाला एक सांगू ? मी तुमच्या दोन्ही सिरीयल न चुकता बघते. तुमच्या ब्लॉगवर पण तुमचे लेख वाचत असते. तुमच्या फेसबुकवर तुमच्या पोस्ट बघत असते. खूप आवडत मला तुमच लिखाण. अस म्हणतात लेखक जस लिहतो तो स्वतः हि तसाच असतो आणि मला तुमच लिखाण आवडत आणि..
अजिंक्य : कला आहे ती. कस सुचत माहित नाही. पण लिहितो. बाकी एवढ मला फॉलो करता. आभारी आहे.
ज्योती : का बर ? एखाद्याच्या मुळे थोडावेळ का होईना आनंद मिळत असेल तर तो का सोडायचा. तुमच्या सिरीयल आणि लेख वाचून ना मला खूप अस बर वाटत. अस वाटत दिवसात एक तर २४ तास तुमची सिरीयल तरी लागावी किंवा दिवसाचे तास २४ न होता सिरीयलचा एक तास असावा. खूप आवडतात मला सिरीयल तुमच्या. फिल्म वैगरे बनवणार आहात का ?
अजिंक्य : सुरु आहे रायटिंग. येईल लवकरच.
ज्योती : वॉव.... !
दोघांची कॉफी संपली.
अजिंक्य : अजून काही हवय का ?
ज्योती : नाही नको. तुम्ही काय घेणार का ?
अजिंक्य : जेवलो नाहीये मी सकाळ पासून. सो भूक लागलीय. तुम्ही पण खावा ना सोबत. मी एकटा अस खात नाही आणि ते मला जात पण नाही.
ज्योती : बाहेरच कशाला खाता मग घरी येत का मी बनवते ना छान ?
अजिंक्य : सॉरी पण नको. पहिलीच भेट आहे अस घरी जाण बरोबर नाही.
ज्योती : अस काही मनात नका हो आणू. बाहेरच्या खाण्याने काय पोट भरणार ? चला ना. मला पण बर वाटेल तुम्ही घरी आलात तर. इथेच राहते मी जवळ.
अजिंक्य तयार झाला. दोघ खाली गेले. अजिंक्यने पैसे दिले. तिने वेस्फा दुचाकी आणली होती. तिने अजिंक्यला चावी दिली. अजिंक्यच्या मागे बसून ती त्याला रस्ता सांगत होती अजिंक्य तसा गाडी नेत होता. 


भाग १५
अजिंक्य आणि ज्योती घरी पोचले. तिने पहिलं जाऊन फ्रीजमधल थंड पाणी अजिंक्यला दिल. मग स्वतः आत जाऊन प्यायली. मधल्या दारापाशी येऊन तिने बघितल अजिंक्य मोबईलमध्ये काहीतरी लिहित बसलेला.
ज्योती : तुम्ही बसा. मी पटकन गरम चपात्या बनवते.
अजिंक्य : हा चालेल.
ज्योती : आलेच.
ती आत गेली. अजिंक्य बसून होता. थोड्यावेळाने त्याच्यापर्यंत चपात्यांचा वास एव्हाना येऊन पोचला. अजिंक्यची भूक आता वाढत चालली होती. अजिंक्यने मोबाईल खिशात ठेवला. कारण ज्योती त्याला बोलवायला बाहेर आली होती. अजिंक्य उठून आत गेला. बेसिन पाशी जाऊन त्याने हाथ धुतला. तेवढ्यात तिथे ज्योती सुध्दा आली. तिने हात धुतला. अजिंक्य रुमालाने हात पुसत होता. ती त्याच्याच जवळ थांबून हात धुवायला लागली. अजिंक्यला कस तरी वाटल. तो निघून खुर्चीवर जाऊन बसला. तिथे टेबलावर दोन ताट मांडलेली होती. समोरासमोर. ताटात तिने चपाती, भरल वांग्याची भाजी, उडदाचा भाजलेला पापड आणि कैरीच लोणच ठेवलेलं. शेजारी पाण्याचा ग्लास.
अजिंक्य बसला होता. ज्योत हि आली आणि समोर बसली.
ज्योती : करा ना सुरु तुम्ही.
अजिंक्य : नाही तुमच्यासाठी थांबलो होतो.
ज्योती : अहो त्यात काय चला करा सुरु.
दोघांनी जेवण सुरु केल.
अजिंक्य : तुमच्या घरी कोण नसत का ?
ज्योती : नाही सध्या तरी मीच असते. मी इथ जॉबसाठी आले. तेव्हा सोबत आज्जीला घेऊन आले. आज्जी गेली दीड वर्ष झाल. आई बाबा तिकड साताऱ्यात असतात. परळीत.
अजिंक्य : मग त्यांना कधी इकड बोलावत नाही का तुम्हीं ?
ज्योती : खुपदा बोलावून झालय. पण त्यांना इकडच वातावरण सुट होत नाही. मग मी पण जास्त फोर्स करत नाही. मी मग येते दोन एक महिन्यातून आई बाबांना भेटून.
अजिंक्य : मग बाकी जॉब कसा चाललाय तुमचा. काम वैगरे असत का जास्त कि लोड असतो ?
ज्योती : कधी कधी असत कधी कधी नसत. चपाती घ्या.
अजिंक्य : एकच बस.
ज्योती : एकच काय ? तब्येत आहे एवढी चांगली आणि एवढसच खाताय ? आवडल नाही का जेवण ?
अजिंक्य : खूप सुंदर बनवल आहे. मला आवडल.
ज्योती : मग खात का नाहीये जास्त ?
अजिंक्य : बाहेर मला जास्त जात नाही.
ज्योती : बाहेर कुठ आपण घरी खातोय ना. आणि मगाशी बाहेर खात होतात. म्हणजे काय खाल्ल असत ?
अजिंक्य : तस काही नाही. खायचं तर होतच मला. पण तुम्ही प्रेमान इतक्या...
ज्योती सहज आपला पाय टेबलाखाली सरकवते. तिच्या पायाला मुंग्या आलेल्या असतात म्हणून. आणि नेमका तिच्या पायांचा स्पर्श अजिंक्यला होतो. अजिंक्य तिच्याकडे बघतो. आणि ज्योती अजिंक्यकडे.
अजिंक्य : बोलावलत बर वाटल. बाकी काय म्हणता ?
ज्योती काहीच बोलत नव्हती. ती अजिंक्यकडे बघत होती.
अजिंक्यच जेवण झाल. तो उठणार तोच.
ज्योती : भात घेतला नाहीत ?
अजिंक्य : खात नाही.
ज्योती : थोडा तरी ?
अजिंक्य : नाही नको. तुम्ही खा मी थांबतो हात धुवायचा.
ज्योती : नाही नको तुम्ही या हात धुवून.
लागलीच तिने पण जेवण सोडून दिल. आणि ती अजिंक्यपाशी गेली. अजिंक्य हात धुवून पुन्हा खिशातून रुमाल काढतो आणि हात पुसत असतो. ज्योती हात धुते. आणि टेबलापाशी जाऊन भांडी गोळा करू लागते. अजिंक्य तो पर्यंत बाहेर येऊन बसतो. डोक्यावर पंखा सुरु असतो. त्यात तो शांत बसून राहतो. थोड्यावेळाने ज्योती बाहेर आली. अजिंक्यच्या पासून जरा लांब बसली. अजिंक्यने तिच्याकडे तोंड फिरवल.
अजिंक्य : मी निघतो.
ज्योती : इतक्यात ?
अजिंक्य : हा हो. शुटींग आहे पाचला. आणि मला जरा साताऱ्याला जाव लागतय उद्या. मग आज स्क्रिप्ट पूर्ण करून देतो. म्हणजे मी जायला मोकळा.
ज्योती : परत कधी येणार ?
अजिंक्य : बघू आता. माझा या मालिकेचा करार संपला एक वर्षाचा आता दुसरा लेखक असणार. त्यामुळे आता मुंबईत कधी येईन माहित नाही.
ज्योती : खर सांगताय ? का हो अस. आज तर भेटलात पहिल्यांदा. मला वाटल आता आपली भेट होत राहील पुढे कायम पण तुम्ही तर शेवटच भेटल्यासारख वाटतय.
अजिंक्य : असेल नशिबात तर होईलच कि भेट. त्यात काय. आणि माझा नंबर दिला आहे तुम्हाला.
ज्योती : मला ज्योती म्हणा ना.
अजिंक्य : का ?
ज्योती : तुम्ही खूप मोठे आहात आणि तुम्ही अस मला अहोजाहो करताय कस तरी वाटतय.
अजिंक्य : सवय आहे.
ज्योती : माझ्यासाठी तरी नको. ज्योतीच म्हणा मला.
अजिंक्य : बर ज्योती म्हणेन. तुही अजिंक्य म्हण मग मला.
ज्योती : मला तुमच नाव खूप आवडत.
अजिंक्य : हो का ?
ज्योती : हो. खूप आवडत.
अजिंक्य : बर मी निघतो.
अजिंक्य उठला.
ज्योती : अजून बसला तर खूप बर वाटेल परत आपण भेटू न भेटू काही माहित. प्लीज.
अजिंक्य पुन्हा जागेवर बसला. ज्योती त्याच्या बाजूला जराशी सरकली.
अजिंक्य : काय झाल ?
ज्योती : काही नाही.
ज्योती अजून बाजूला सरकली आणि अजिंक्याच्या शेजारी आली.
ज्योती : तुम्हाला कधी कुणावर प्रेम झालय ? तुम्हाला काय वाटत प्रेम म्हणजे काय हो ?
अजिंक्य : प्रेम म्हणजे सेक्स अशी कल्पना असते लोकांची. पण प्रेम म्हणजे सेक्स सोडून जे काही असत ते म्हणजे प्रेम. म्हणजे कुणासाठी केलेली भावनांची जपणूक. मनाची होत असलेली घालमेल. कुणाची तरी येणारी आठवण. कुणाच्या तरी स्पर्शाने अंगावर येणारा काटा. होणारी छातीची धडधड. आणि... आणि काय दुसर. प्रेम प्रेम असत. त्याची व्याख्या जो तो वेगवेगळी मांडणार.
ज्योती : मग प्रेम खोट करतात त्या लोकांच काय ?
अजिंक्य : कोण बोलल अस प्रेम खोट असत ? छे... प्रेम हे कायम खरच असत. हा नंतर कमी होणार आकर्षण, गैरसमज किंवा येणारा वेळ यामुळे पुढची व्यक्ती आपल्यापासून लांब जाते इतकच. पण म्हणून प्रेम खोट असत अस म्हणन चुकीच आहे.
ज्योती : किती मस्त बोलता तुम्ही.. अजून एक विचारू पर्सनल ?
अजिंक्य : हा बोल ?
ज्योती : शारिरीक जे असत ते पण प्रेमच असत ना ?
अजिंक्य : अर्थातच. मनातून केलेल्या प्रेमापेक्षा शारीरिक केलेलं प्रेम हे पवित्र असत. स्वच्छ असत. हा आजकाल विचित्र पद्धतीने केल जात सगळ. पण तेसुद्धा प्रेमच आहे.
 ज्योती तिचा हात त्याच्या हातावर बोलता बोलता ठेवते.
अजिंक्य : मी निघतो. आता वेळ होतोय.
ज्योती : थांबा कि.
अजिंक्य : उद्या जायचंय मला प्रतीक्षा वाट बघतिय तिकडे.
ज्योती : प्रतीक्षा ?
अजिंक्य : हा माझी बायको.
ज्योती : लग्न झालंय तुमच ?
अजिंक्य : हा मुलगी पण आहे मला सारा नाव आहे तीच.
ज्योती अजिंक्यकडे बघत बसली. 


भाग १६
अजिंक्य : काय झाल ? अस का बघतियस ?
ज्योती : काही नाही. हव ते मिळेलच अस काही नसत. हो ना ?
अजिंक्य : म्हणजे ?
ज्योती : काही नाही. आता परत आपली भेट ?
अजिंक्य : म्हणजे ?
ज्योती : होईल कि नाही ?
अजिंक्य : मे बी होईल.
ज्योती : मे बी नाही झाली तर ?
अजिंक्य : लग्न वैगरे झाल कि कोण कुणाला आठवत नसत बघ. आणि मी काय कोण तुझा नाहीये. आपली जस्ट पहिली भेट झालीय. आणि मी लिहिलेली सिरीयल तू रोज बघतेस. मला नाही. आणि तुझ्या बोलण्यावरून मला अस वाटतय तुझ्या मनात काहीतरी आहे.
ज्योती : काय आहे ?
अजिंक्य : मी सांगू नये तू विचारू नये. तुला हि माहित आहे आणि मलासुद्धा.
ज्योती : जाऊ दे. आता उपयोग काय ?
अजिंक्य : काहीच नाही. मी निघतो.
ज्योति : खरच माणूस मोठा झाला कि खूप बदलतो अस म्हणतात. खऱय.
अजिंक्य : हे वाक्य कुणासाठी होत ?
ज्योती : तू.
अजिंक्य : का मी काय केल ? आणि आपण आज भेटतोय. न कधी मी तुला या आधी बघितलय ना मी तुला ओळखतो.
ज्योती : खरच नाही मला ओळखत ?
अजिंक्य : नाही.
ज्योती : आबासाहेब चिरमुले शाळेत होतास. पहिली ते चौथी. काळा-सावला. तब्येत एकदम बारीक. सतत आजारी असणारा मुलगा.
अजिंक्य : तुला कस माहित ?
ज्योती : आहे पुढे अजून. रेनोल्डचा पेन वापरायचा. छोट्या वहीवर मोठी मोठी चित्र काढायचास. तू ते बघ एक फुलदाणीच चित्र काढलेलं. ते वर्गात भिंतीवर लावलेलं बाईंनी.
अजिंक्य : हो त्या बावकर बाई. पण तुला कस माहित ?
ज्योती : शेजारी बेलकर बसायचा. मागे शेलार. पुढे तू अजिंक्य अरुण भोसले. आणि बाजूला एक मुलगी बसायची.
अजिंक्य : हो. ती... ती..
ज्योती : ती उत्कर्षा.
अजिंक्य : हो. आहे माझ्या लक्षात ती.
ज्योती : खर ?
अजिंक्य : हो. अर्धा वर्षच होती ती शाळेत तिसरीत. ती मुंबईहून इकडे आलेली. साताऱ्याला. तिच्या वडिलांची सारखी बदली होत. सहा महिन्यांनी त्यांची बदली पुन्हा मुंबईला झाली. ती निघून गेली. माझ लक्ष लागायचं नाही.
ज्योती : होका ?
अजिंक्य : हो. तिला शाईचा पेन आवडायचा. तेव्हा तो पंधरा रुपयाला होता. ती चाळीस रुपयाचा आणायची. मी साधा रेनोल्डचा वापरायचो. एकदा तिच्या पेनाची शाई संपली. तिने मला पेन मागितला. माझ्याकडे एकच पेन होता. शेलारने तिला न मागता शाईचा स्वतःचा पेन दिला. ती खूप खुश झाली. मला तिला बघून खूप आनंद झाला आणि शेलारकडे बघून राग आला. मी मग आज्जीकडे खूप हट्ट करून शाईचा पेन मागितला. तिने चाळीसचा नाही पण पंधरा रुपयाचा घेतला. पाच रुपयाची शाईची बाटली घेतली. दुसऱ्या दिवशी मी मुद्दाम शाईचा पेन वर वहीवर काढून ठेवला. साहजिकच मला हव तस झाल. तिने तो बघितला. आणि त्या नव्याकोऱ्या पेनाने पहिलं अक्षर तिने लिहील. ते अक्षर म्हणजे तीच नाव आणि खाली माझ नाव. परत मग तो पेन तिनेच स्वतःकडे ठेवला. आणि दुसऱ्या क्षणाला शेलारला त्याचा पेन तिने देऊन टाकला. मग आता मला शेलारवर हसू यायला लागल आणि तिच्याकडे बघून काहीतरी वेगळच वाटू लागल.
ज्योती : मग तो पेन कुठ..
अजिंक्य : ( यीच बोलन तोडत ) तो पेन तिच्याकडेच होता. त्यातली शाई संपली मी भरून देणार होतो पण माझी शाईची बाटली सांडली घरी. माझ्याकडे पैसे नव्हते. आज्जी मला पैसे देत नव्हती. मी मित्राला दोन रुपये दिलेले जेम्स खायला त्याच्या बदल्यात मी त्याच्याकडून शाईची निम्मी उरलेली बाटली घेतली. दुसऱ्या दिवशी ती शाळेत आली नाही  आणि परत कधी आलीच नाही. तिने मला काहीच दिल नाही. मी हि त्या पेनाशिवाय काहीच दिल नाही. आम्ही खूप बोलायचो. तिला मी चित्र काढून द्यायचो गपचूप. बाईंच लक्ष नसताना, आणि ती ते चित्र स्वतः तिने काढल अस सांगून दाखवायची. पण ती गेली. मुंबईला मला न सांगता. मला ते बाईंकडून कळाल. जाधव बाई आणि बावकर बाई बोलत होत्या कि वर्गातल्या पटावरून एक नाव कमी झालय. जाधव बाई विचारात होत्या कुणाच आणि बावकर बाई म्हणाल्या “उत्कर्षा”.
अजिंक्य : मला तीच आडनाव आठवत नाहीये.
ज्योती : तुला गरज नाही आडनावाची तिच्या. ती समोर असताना.
अजिंक्य : काय ? म्हणजे ती उत्कर्षा ? तू...तू आहेस ?
ज्योती : हा तस समज. मला सांग बायको सोडून अजून कुणावर प्रेम केलयस ?
अजिंक्य : नाही.
ज्योती : आणि बायको सोडून अजून किती जणी तुझ्यावर प्रेम करतात ?
अजिंक्य : माहित नाही.
ज्योती : एक सांगू का आता ?
अजिंक्य : काय ?
ज्योती : मी..... 


भाग १७
अजिंक्यचा मोबाईल वाजतो. अजिंक्य खिशातून मोबाईल काढतो. कॉल उचलून मोबाईल कानाला लावतो.
दिग्दर्शक : हेल्लो सर, कामात आहात का ?
अजिंक्य : नाही जरा बाहेर आलेलो जेवायला.
दिग्दर्शक : एकट एकट का ? आणि सांगून जायचं ना ? आम्हाला वाटल शुटींग झाल कि सातारा गाठला.
अजिंक्य : नाही नाही. बोला की काय म्हणताय ?
दिग्दर्शक : काही नाही एक डायलॉग आहे तो जरा चेंज करायचा आहे.
अजिंक्य : का ? काय झाल ?
दिग्दर्शक : ते लहान मुलीला तो शब्द बोलता येईना.
अजिंक्य : बर पाच-च मिनिट थांबा आलो सेटवर.
दिग्दर्शक : हो. या लवकर. बाय.
अजिंक्य : बाय..
मोबाईल खिशात ठेवून अजिंक्य ज्योतीकडे बघतो. ज्योती खाली मान करून बघत बसलेली असते. अजिंक्य जागचा उठतो.
अजिंक्य : ( सुस्कारा घेत ) चल ज्योती मी निघतो. मला जायचंय लवकर.
ज्योती : हो. मी सोडू का ?
अजिंक्य : बर होईल. म्हणजे इथून परत कुठे जायचं माहित नाही. म्हणजे खूप आतल्या बाजूला आलो ना आपण तुझ्या घरी.
ज्योती उठून गाडीची चावी घेते. कुलूप आणि किल्ली घेते. अजिंक्य तिच्या मागे घराबाहेर पडतो. कुलूप लावून मग ज्योती गाडीवर बसते. आणि अजिंक्य तिच्या मागे बसतो.
दोघ शांतच असतात. एवढ्यात मधेच एक गाडीवाला आपली स्वतःची गाडी इंडीकेटर न दाखवता उजवीकडे जातो. त्यामुळे ज्योती कचकन ब्रेक दाबून पुन्हा तशीच पुढे जाते. या वेळात अजिंक्य जागचा जरासा पुढे सरकतो आणि ज्योतीच्या खांद्यावर हात ठेवतो. पुन्हा नीट मागे सरकून खांद्यावरचे हात काढतो.
ज्योती : चालतील. ठेवले तर.
अजिंक्य : पण मला ते नाही ना बरोबर वाटत.
ज्योती : बरोबर चूक काही नसत हो. वेळेनुसार वागायचं असत. नाहीतर हे जग एकसारखं वाटू लागेल तुम्हाला आणि लवकरच तुमच मन हि उडेल या जगावरुन. लोकांवरून. तुमच्या खास लोकांवरून आणि बायको वरूनसुद्धा.  
अजिंक्य : जगाच माहित नाही पण बायकोवरून तर नाही. माझ जग माझी बायको आहे.
ज्योती : ते दिसलच मला.
अजिंक्य : म्हणजे ?
ज्योती : इतकी मी बोलत होते. मगाशी चुकून जवळ आले. चुकून म्हणजे तुमच्यासाठी असेल ते चुकून पण मी तर मुद्दामहून आले. कितीदा डोळ्यात डोळे घालून बघितले. पण तुमचा तोल ढळला नाही. खूप प्रेम आहे तुमच प्रतीक्षावर.
अजिंक्य : हो. मला काहीच कळाल नाही किंवा समजत नाही अस नाही. तो तुझा गैरसमज आहे.
ज्योती : गैर तर तुमच वागण वाटल मला आणि ते साहजिकच आहे. आपली पहिली भेट होती ना. आणि समज म्हणाल तर खूप काही समजल मला तुमच्या बद्दल अजिंक्य.
अजिंक्य : चांगल आहे. पण मनातले विचार काढून टाक. मी....मी आणि माझी प्रतीक्षा मुलगी सारा एकमेकांना बस आहोत. मला गरज नाही कुणाची. आणि माझ्यामुळे तुझ मन दुखावल जाव अस वाटत नाही. सो. आय होप, मी काय म्हणतोय ते तू समजून घेशील.
ज्योती : एक विचारू ?
अजिंक्य : हा. ते बघ समोर दिसतीय ना बिल्डींग तिकडे थांबव.
ज्योती : पहिलं जाऊदे पण खर प्रेम कोणत ? वयात येऊन झालेलं कि शाळेतल ?
अजिंक्य : शाळेतल आकर्षण असत ना ?वयात आल कि भावना जबाबदाऱ्या समजतात. या सगळ्यात हि ते एकमेकांबद्दलच आकर्षण टिकल तर ते प्रेम म्हणतो ना आपण.
ज्योती : बर. मग शाळेतल प्रेम आठवत इतक्या वर्षांनी आपल्याला, त्याच काय ?
आपल प्रेम असत त्याच व्यक्ती आपल्याला आठवतात ना वर्षानुवर्षे ?
अजिंक्य : तशा नकोशा व्यक्ती पण असतातच कि आपल्या लक्षात ?
ज्योती : विषय प्रेमाचा सुरु आहे अजिंक्य.
ज्योती गाडी बिल्डींगपाशी थांबवते. अजिंक्य उठतो. तिच्या समोर उभा राहतो.
अजिंक्य : म्हणन काय आहे तुझ ? लवकर सांग.
ज्योती : प्रतीक्षा तुमच प्रेम आहे म्हणता, मग उत्कर्षाच नाव निघाल्यावर डोळे का चमकले तुमचे ? आणि खरच प्रतीक्षावर प्रेम केलय तुम्ही तर, मग मला सांगा ती सोडून दुसऱ्या कोणत्याच मुलीला, बाईला तुम्ही स्पर्श नाही केलात ? खर सांगा ?
अजिंक्य : का ?
ज्योती : खर प्रेम करणारा, दुसऱ्या स्त्रीचा एकवेळ विचार करेल पण स्पर्शात प्रेम शोधणार नाही.
अजिंक्य : मी निघतो.
अजिंक्यचा मोबाईल वाजतो. दिग्दर्शकाचा कॉल आलेला असतो, तो उचलून आलोच म्हणून सांगतो.
ज्योती : प्रेम आहे म्हणन सोप्प आहे हो. पण ते एकावरच करण खूप कठीण. मला तुमच्याबद्दल काही जाणवल त्यात माझी चूक नाही. तुमच्या कथा वाचून मी तुमच्या प्रेमात पडले. कारण तुम्ही जे काही लिहायचा, अस वाटायचं मी स्वतः ते प्रत्यक्ष बघतेय. ती तुमची अजिंक्य प्रतीक्षाची कथा लिहिलेली ती खरी होती ?
अजिंक्य : नाही.
ज्योती : पण मला ती खरी वाटली. त्यातला अजिंक्य प्रतीक्षासोबत रोमांस करत होता. ते मी वाचताना त्या प्रतीक्षाच्या जागी मी स्वतःला बघत होते. फील करत होते. आणि नकळत का होईना मला तुम्ही आवडलात. यात माझा काय दोष ? दोष तुमचा आहे तुम्ही इतक चांगल लिहिता.
अजिंक्य : पण ती कथा आहे. ती हि काल्पनिक खरी नाही.
ज्योती : प्रेम पण कल्पनाच आहे एक.
अजिंक्य : मी निघतो.
ज्योती अजिंक्याच्या हाताला धरते. आणि त्याचा हात धरून स्वतःच्या गालावरून फिरवते. अजिंक्य ज्योतीकडे बघतो. ज्योती डोळे मिटते. अजिंक्य आजूबाजूला बघतो. आणि निघून जातो. ज्योतीला वाटत अजिंक्य तिला कीस करेल. पण तस होत नाही. ती डोळे उघडते आणि अजिंक्य तिथ नसतो. तिच्या डोळ्यात पाणी येत.


भाग १८
अजिंक्यच शुटींग झाल. ज्योती घरी न जाता एका बागेत जाऊन बसली. अजिंक्य एकेठिकाणी सिगरेट ओढत असताना त्याला विचार यायला लागले कि, साताऱ्याला जायचं का पुण्याला ? प्रतीक्षा जवळ तर काय असणारच आहे मी पण अंजलीला सुद्धा म्हणजे तिच्या बाळाला खऱ्या बापाची पण गरज आहे. हा लोकांना जरी खर काही माहित नसल तरी त्या आईला माहित असतच कि खरा बाप कोण आणि शेवटी ते बाळ न-कळत असल तरी समज हि असणारच त्याला. आणि ती माझी हि जबाबदारी आहे. आता केलच आहे पाप. म्हणजे तिला बाळ देऊन पुण्य केल मी पण जगासाठी, प्रतीक्षासाठी पापच आहे ते. जे काही असो पण त्याला निस्तराव लागणार तर आहेच.
मग संपत आलेली सिगरेट खाली टाकून बुटाने विझवून त्याने पैसे दिले. अजिंक्य आता पुण्याला निघाला. मनात बरेच प्रश्न होते त्याच्या. पण सर्वात महत्वाचा विचार हा होता कि, प्रतीक्षाला हे अंजलीच सांगायचं कस ? आणि ती समजून घेईल का ? आणि नाही घेतल समजून तर पुढे काय ? अंजलीला अंजलीच सगळ मिळेल, नवरा-मुल पण माझ मुल, माझी सारा, प्रतीक्षा माझ्यापासून लांब होतील त्याच काय ? त्यापेक्षा सांगायलाच नको तिला. ठरल तर मग. अंजलीला पण बाळाची शप्पथ घालतो आणि सांगतो कुणाला सांगू नको कि हे बाळ माझ आहे. यस.. असच करायला हव नाही तर इतके वर्ष जिच्यासाठी मी वाया घालवली एकटेपणा सोसला अश्या प्रतीक्षाला आणि तिच्या मिळणाऱ्या प्रेमाला मी आयुष्यभरासाठी मुकेन.
अजिंक्य झोपला. त्याची झोप मोड झाली तेव्हा त्याला स्वारगेट दिसल. तो तिथे उतरून स्पेशल रिक्षाने अंजलीच्या घरी गेला. रिक्षाला पैसे दिले. अंजलीच्या घरापाशी तो गेला आणि दाराला कुलूप होत. अजिंक्यला समजेना आता काय कराव. इतक्या लांब आलो तर खर पण तिला कॉल करून सांगायचं राहूनच गेल कि, मी पुण्यात येतोय तुला भेटायला. विचारांच्या नादात मी झोपून गेलो. आणि कॉल करायचा राहून गेला. आता काय करू ? त्याने खिशातून मोबाईल काढला आणि अंजलीला कॉल लावला. रिंग वाजली पण तिने कॉल उचलला नाही.
दोन वेळा पुन्हा प्रयत्न केला पण तिने उचलला नाही. आता करायचं काय म्हणून अजिंक्य तिच्याच दारात पायरीवर बसला. येणारी जाणारी लोक त्याला बघत होते. हा मात्र मान खाली घालून बसलेला. एक बाई तिथे आली. जराशी वयस्कर होती.
वयस्कर बाई : कुणाकडे आलाय ?
अजिंक्य : अंजलीकडे.
वयस्कर बाई : हो का ती बाहेर गेलीय. येईल. बसा तो वर... इथच.
अजिंक्य : हो.
ती बाई निघून गेली. किमान दोन तास व्हायला आले. तरी अंजलीचा कुठे पत्ता नाही. एव्हाना साताऱ्यात आनेवाडी पर्यंत पोचलो तरी असतो अस अजिंक्यला वाटत होत. खिशातला मोबाईल काढला तर तो पण स्वीच ऑफ झालेला. मग पुन्हा तो खिशात ठेवून रुमाल काढला आणि तोंडावरून फिरवला आणि समोर अंजली.
जागीचा गडबडत अजिंक्य उठला.

म्हणून मला तू नको | एक हृदयस्पर्शी कथा

अंजली : तू ?
अजिंक्य : अग होतीस कुठ तू ? किती वेळ वाट बघायची ?
अंजली : किती वेळ वाट बघितलीस ?
अजिंक्य : दोन तास होत आले आता. आल्यापासून इथच बसून आहे.
अंजली : मी बाहेर गेलेली.
अजिंक्य : हो. मी कॉल केलेला एकदा उचलायचा तरी.
अंजली : परत करायचा न मग ?
अजिंक्य खिशातला मोबाईल काढून दाखवत,
अजिंक्य : स्वीच ऑफ झालाय. कसा करू ?
अंजली कुलूप उघडून आत येते. त्याला पण बोलावते. अजिंक्य बेडवर बसतो. ती दोघांना दोन ग्लास भरून पाणी आणते. दोघ पाणी पितात.
अंजली : आज कसा काय आलास इकड ?
अजिंक्य : मुंबईतल काम झाल. सिरीयल सोबतचा करार संपला. म्हंटल घरी जाण्यापेक्षा तुला भेटून मग जाव. कशी आहेस ?
अंजली : तेच बघायला गेलेले बाहेर.
अजिंक्य : म्हणजे ?
अंजली : दवाखान्यात गेलेले चेकअपला.
अजिंक्य : काय बोलले डॉक्टर ?
अंजली : एकदम सगळ ओके आहे. बाळ छान होईल बोलले अशीच काळजी घेतलीस तर.
अजिंक्य : वाह. चांगल आहे कि. अशीच रहा खाऊन. आणि नवरा कुठय ?
अंजली : केरळला गेलेत.
अजिंक्य : कशाला ?
अंजली : ट्रीपला गेलेत.
अजिंक्य : तुला अस सोडून ?
अंजली : नाही मी कुणाला वाटत जवळची. सगळे असेच नशिबाला आलेत माझ्या. काही काळ सोबत रहायचं आणि नंतर एकट करायचं. हा तर नवरा आहे स्वतःच्या मर्जीचा मालक. काय बोलणार मग.
ती रडायला लागते. अजिंक्य तिला जवळ घेतो. तीही त्याला बिलगून रडते. रडता रडता अंजली त्याला जवळ घट्ट ओढत स्वतःवर घेते आणि त्याच्या गळ्याला कीस करू लागते. अजिंक्य ही त्या स्पर्शाने काहीसा तिच्याकडे आकर्षित होतो. तो हि मग तिच्या डोक्याखालची उशी बाजूला करून स्वतःचा उजवा हात तिच्या डोक्याखाली धरून डाव्या हाताने तिच्या गळयापासून छातीपर्यंत हात आणतो. तिला कसस होत. ती त्याचा हात छातीच्या जरासा वरच अडवून धरते. अजिंक्य त्याच वेळात आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवणार तोच त्याला आठवत ज्योतीच बोलन. ती म्हणत होती त्यात तथ्य होत.
प्रतीक्षावर माझ प्रेम आहे. तीच माझ्यावर प्रेम आहे. तरीही मी हिच्याकडे आकर्षित होतोय. तिच्या शरीरावर नुसता स्पर्श नाहीतर माझ बाळ तिच्या पोटात वाढतय. काय चालल आहे माझ ? हे फक्त चूकच आहे अस त्याला वाटल. तो भानावर आला आणि बघितल तर अंजली त्याला एकटक बघत होती. अजिंक्यने सावरत घेतल. तो  तिच्यापासून दूर झाला. अंजलीहि सावरून घेते. अजिंक्य तिला चाळीस हजाराचा चेक देतो आणि निघतो काहीच न बोलता. अंजलीला पण काही सुचत नाही कि काय बोलाव काय कराव ? ती फक्त दाराशी जाऊन अजिंक्यकडे डोळ्यात पाणी आणून बघते.
अजिंक्य : परत भेटायला येईन. खास वेळ काढून. तू तुझी काळजी घे. आत्ता थांबलो असतो पण, पुन्हा चुका घडतील. तू माझी बायको नाही किंवा प्रेम हि नाहीस. हीच वेळ आहे मला सुधारायच आहे. आणि हो, माझ्यासाठी एक करशील ?
अंजली : काय ?
अजिंक्य : तुला आपल्या बाळाची शप्पथ, हे बाळ माझ आहे कुणालाच सांगू नको. त्या बाळाला पण नको.
अजिंक्य पुढे बघून गेला. अंजलीने दार लाऊन घेतल आणि दाराला टेकूनच खाली बसली आणि रडायला लागली. 


शेवटचा भाग
कुठवर अस चालायचं ? कुणाचा तरी होण्यापेक्षा एकीचाच मी बरा. मी या आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम केल आईवर आणि मग प्रतीक्षावर. पुन्हा ? कुणीच नाही. एका आयुष्यात एकदाच प्रेम होत आपल्याला. माझी केपेसीटी संपली. आणि याच दोघी नाहीत. जो जो माझ्या आयुष्यात माझ्या जवळ आला-आली प्रत्येकाला मी मन लावल. प्रेम केल. या सगळ्यात कितीदा मी वहावत गेलो. प्रत्येकाला वेळ दिला. मला गरज असताना कुणी वेळ दिला नाही. मला गरज असताना कुणी मदत सोडा पण साधा आधार दिला नाही. आई नंतर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आली प्रतीक्षा. शाळेत असताना मला ती खूप आवडायची. पण तिला मी नाही. मी झुरत होतो आतल्या-आत तिच्यासाठी. तिच्यासाठी वाट बघत दहा वर्ष काढले मी. शाळेतल्या वयाचा आता तरूण झालो होतो. मग तिचा विचार सोडला. तेव्हा माझ्या आयुष्यात प्रियांका आली. तिने मला प्रेम दिल. माझ्यावर प्रेम केल. पण मैत्रीतल. जेव्हा तिला मी माझ्या मनातल प्रेम तिला सांगायला गेलो तिने तिच्या मनातल सांगितल. आता काय सांगितल ते समजल असेलच.
ज्या अर्थी माझी बायको आत्ता प्रतीक्षा आहे त्याअर्थी प्रियांका माझी झाली नाही. तीच दुसऱ्या एकावर प्रेम होत. मग काय मी तिचा विचार सोडला आणि तिने मला सोडल. तिने पळून जाऊन लग्न केल एकाशी. मी आतून तुटलो. खूप काही फेस केल मी आणि तेव्हा माझ्या आयुष्यात प्रतीक्षा आली. शाळेतली नाही. आत्ता माझी बायको आहे ती. तिने माझ्यावर प्रेम केल. मी तिच्या नावावर फिदा होतो आणि मग आम्ही एकत्र वेळ घालवून मी कधी तिच्यावर फिदा झालो समजल नाही. तिच सगळच चांगल होत. सौंदर्य. स्वभाव. मन. पण तिचा बालिशपणा मला आवडत नव्हता. तिच्या त्या स्वभावाचा फायदा घेत किती मित्र तिला प्रपोज करायचे. ती मला सांगायची सुद्धा. पण एकदा तिने कुणाला तरी होकार दिला. ते पण आमच नात असताना. एका कॅडबरीच्या बदल्यात. त्यावर आमच भांडण झाल. तिने माझ्याशी बोलन बंद केल. मीही रागात बरेच दिवस घालवले. जेव्हा राग निवळला. ती दिसायची बंद झाली. मी खूप शोधलं तिला ती मिळाली नाही. याच काळात कॉलेजमध्ये अंजली माझ्या आयुष्यात आली. मैत्रीण बनून. तिने मला त्या दुःखातून बाहेर काढल.  त्या मैत्रीच्या नावाखाली आणि मैत्रीतल्या प्रेमामध्ये कधी आमच्यात ते सगळ काही झाल आम्हाला समजल नाही. तिने मला प्रपोज केल. मी नकार दिला. मी प्रतीक्षाची वाट बघत बसलो. पण ती मिळाली नाही. त्याच काळात अंजलीच तिच्या मनाविरुद्ध लग्न लाऊन दिल गेल. ते हि तिच्या वयापेक्षा जास्त वयाच्या मुलासोबत. सगळ आयुष्य तीच बरबाद केल घरातल्यांनी तिच्या. प्रतीक्षापेक्षा पण सुंदर होती अंजली. पण उपयोग काय. ती सोडून गेली मला लांब माझ्यापासून पुण्याला. मी साताऱ्यातच राहिलो. मग पुन्हा अंजली आणि प्रतीक्षाच्या विरहात मला एकदा भर पावसात प्रतीक्षा मिळाली तेव्हा तिच्या मुलीसोबत म्हणजे माझ्या सारासोबत दिसली. तिने लग्न कधी केल ? कुठ केल ? कुणासोबत केल ? काही काही मला माहित नव्हत. तिला बघून सगळे दिवस आठवले मला. पण उपयोग काय. ती निघून गेली तेव्हा. जास्त काही न बोलता. परत आमची भेट झाली. मग भेटीवर भेट आणि त्यात होणार प्रेम आमच्यातल प्रेम जागवत होत पुन्हा नव्याने. नशिबान मला साथ द्यायचं ठरवल. आणि तिचा नवरा अमित आणि त्याची आई अपघातात मेले. आणि प्रतीक्षा माझ्याकडे कायमची आली. आम्ही एकत्र झालो. सारा आहे आता अजून एक बाळ होईल आमच. त्यात मध्ये अंजलीला माझ मुल होणार आहे. प्रियांका कुठ आहे माहित नाही. पण आठवणीत आहे माझ्या. शाळेतली प्रतीक्षा ती एक भूतकाळ बनून माझ्या लक्षात आहे फक्त. आणि हो उत्कर्षा राहिलीच. आणि आता ज्योती. प्रेमावर प्रेम करत राहिलो मी. पण आता भीती वाटते या सगळ्यांच्या प्रेमात मी माझी सगळी प्रेम गमावून बसलो तर ? मी पुन्हा एकटा झालो तर ?
माझ्या या प्रेमाचा. प्रत्येकीला दिलेल्या वेळेचा. केलेल्या मदतीचा शेवट असा होणार असेल तर अजिंक्य म्हणून मी काय केल आणि काय जगलो ?
न कधी एकीवर प्रेम करू शकलो. न आत्ता प्रतीक्षा सोबत असून तिच्यावर खर प्रेम करू शकलो. कुठे ना कुठे त्या सगळ्यांचा आत्मा मला लागतच असेल. त्यांना हि माझी आठवण येतच असेल. पण मग पुढे काय ? फसवणूक मी कुणाची केली नाही. जमेल तितक जपण्याचा प्रयत्न केला मी सगळ्यांना. पण उघडा पडलो कधी तर मी फसवाच वाटणार सगळ्यांना. पण तस नाहीये. मी कितीही प्रेम केल तरी प्रत्येकीवर माझ तितकच आणि एकसारख खर प्रेम होत. पण कळेल का त्यातल्या एकीला तरी ?
या सगळ्यात मीही चुकलो कधी, पण स्वतःहून नाही. परिस्थितीने मला तसा वागवून घेतल. आता ? पुढे काय ? अनुत्तरीत आहे मी. प्रश्नांचा भडीमार हा कायम माझी सोबत बनून राहणार माझ्या. न कुणाशी हे सगळ बोलू शकतो ना हे सगळ माझ्या मनात ठेवू शकतो.
एवढच कि आता मी कुणावर प्रेम नाही करू शकत. मीच माझ्या नजरेत पडायला लागलो आहे. खर तर हे चूक आहे. पण दोषी कुणीतरी व्हायलाच हव. आणि उत्कर्षा,प्रतीक्षा,अंजली,प्रियांका,प्रतीक्षा आत्ताची ज्योती. यांच्या या प्रेमाच्या बदल्यात मी दोषी झालेलंच बर. निदान देवाच्या पुढे कुठेतरी माझ हे प्रेम खर असेल तर मी या दोषातून वर मुक्त होईन.
मोबाईल वाजला. विचारातला अजिंक्य भानावर आला. आता गाड्यांचा जोरात आवाज यायला लागला. हॉर्न वाजत होते. बस मधल एक बाळ जोरजोरात रडत होत. माणसांचे आवाज येत होते. कुणीतरी मोबाईलवर गाणी लावलेली. अजिंक्य इकडे तिकडे बघतो. तो बसमध्ये असतो. अजिंक्य साताऱ्यात आलेला असतो. बस थांबली. सगळे उतरायला लागले. अजिंक्य हि उतरला. रिक्षा केली आणि घरी आला. दारात लावलेल्या बुलेटच्या पेट्रोल टाकीवरून प्रेमाने अलगद हात फिरवून तो दारात उभा राहिला. मग त्याने बेल वाजवली. दार उघडल प्रतीक्षाने आणि ती हसली. लगेचच तिने अजिंक्यला मिठीत घेतल. पण अजिंक्यचे हात तिला मिठीत घ्यायला उचलले जात नव्हते. तरी मनाची तयारी करून त्याने तिला जवळ घेतल आणि डोळे मिटले. आणि डोळ्यांसमोरून त्याच्या उत्कर्षा,प्रतीक्षा,प्रियांका,ज्योती,अंजलीचे चेहरे येऊन गेले. मिठी सुटली. प्रतीक्षा अजिंक्यकडे बघत असते. अजिंक्य तिच्याकडे बघतो. आणि प्रतीक्षा दाराला कडी लावते. प्रतीक्षा अजिंक्यचा हातात हात पकडते आणि आपल्या ओठांनी अजिंक्यचे ओठ आपल्या ओठात पकडते. आणि डोळे मिटते. मगाशी मारलेल्या शरीराच्या मिठीपेक्षा हि ओठांची मिठी जास्त घट्ट वाटत होती आत्ता.....

समाप्त( पर्व ३ रे लवकरच... तो पर्यंत बाकीच्या कथा वाचत राहा. प्रेमाची शप्पथ आहे तुला हि कथा कायम लक्षात ठेवा.... आपण प्रेम केल्याबद्दल मी अजिंक्य अरुण भोसले आपले आभार मानतो )        
 प्रेमाची शप्पथ आहे तुला पर्व 3 वाचण्यासाठी क्लिक करा      

सावधान....! या कथेला ऑनलाइन रजिस्टर केले आहे. त्यामुळे या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.            


        

12 टिप्पण्या

  1. खूप छान पण मला sequel एका मागोमाग वाचायला मिळत नाही आहेत

    उत्तर द्याहटवा