in a relationship with 'MAYA'

( image by unplash.com )

विश्वास आणि निमित दोघ आठवड्याभाराने संभाजी पार्कमध्ये भेटलेले. दोघांच बोलन सुरु होत. त्यांच्यासमोर आजूबाजूला आणि मागच्या बाजूला हि जिकडे-तिकडे हिरवळ आणि बसलेली जोडपी, एवढच दिसत होत. सात वाजायला दोन मिनिट उरलेले. पावसाच्या दिवसांमुळे अंधार लवकर पडलेला. आरोह हि तिथेच त्या दोघांपासून अंतर सोडून मोबाईलमध्ये फेसबुक उघडून दुसऱ्यांचे फोटो बघत बसलेला. त्याला या दोघांच बोलन अगदी स्पष्ट ऐकू येत होत.
विश्वास : भावा पार्टी पाहिजे पण.
निमित : कसली ?
विश्वास : जी.एफ. पटवली आणि कसली विचारतो वे. कधी देतोय बोल. आत्ता देतोयस का ?
निमित : अरे देतो रे. त्यात काय एवढ. पण आत्ता नको.
विश्वास : का ?
निमित : अरे ती येणारे आत्ता.
विश्वास : चला म्हणजे मला इथून हलायला हव.
निमित : हो हाल तू इथून पाच मिनिटात.
विश्वास : जातो पण मला सांग कस पटवल तू तिला ?
निमित त्याला मोबाईलमधला एका मुलीचा फोटो दाखवत बोलायला लागतो,
निमित : पोरींशी खोट बोलल न कि त्यांना ते खर वाटत. त्यांच्यासाठी इवढूस केल आणि मोठी गोष्ट बनवून सांगितल कि पोरगी फिदा....टोटल फिदा होते. मी हिच्यासाठी काही केल नाही पण खूप काही करेन अस नुस्त बोलून तिला येड केल माझ्यासाठी. मग काय भावा झाली माझी जी.एफ. पहिल्या भेटीत कीस केला राव तिने मला. फोटो पेक्षा रिअल हॉट दिसते. वाटल नव्हत एवढी बावळट असेल पण झाली सोय माझी आता दोन चार महिने तरी आता कुणाच्या मागे लागायचा त्रास वाचला.
विश्वास : पार्टी तर आता हार्ड पाहिजे. विषय लय हार्ड आहे वहिनींचा. मी पण जातो माझ्या आयटम कड. तुला उद्या भेटतो. आणि तुझी पार्टी उद्याच दे. McD ला भेटू. दोघ जागचे उठले. निमित मोबाईल खिशात ठेवून विश्वासला मिठी मारतो. विश्वास निघून जातो. निमित उभाच असतो. त्याच गेटकडे लक्ष जात त्याच. विश्वास जाताना दिसत होता आणि एक मुलगी येताना दिसत होती. तिला बघून निमित गालात खुष होतो. लांबून विश्वास हात वर करून निमित इशारा करतो.
निमित पुढच्या खिशातला मोबाईल मागच्या खिशात ठेवतो. गाडीची चावी पण मागच्या खिशात ठेवतो. आणि अंधाराच्या बाजूने चालत जाऊन थांबतो. ती मुलगी निमित जवळ जाऊन उभी राहते. निमित तिला अंधारात मिठीत ओढून घेतो आणि त्या हालचालीला आरोह बघत असतो. एकटा असा बसलेला मुलगा आजूबाजूला फक्त जोडपी. आणि आत्ता डोळ्यांसमोर एक मुलगी एका मुलासोबत अंधारात गेली. साहजिकच त्याच्या डोक्यात पुरुषी विचार सुरु झाले. काय करत असतील दोघ ? त्याचा उतावळेपणा कसा असेल ? विचारा-विचारात त्याच्या डोक्यात एक विचार आला “माया”. डोळ्यांसमोर ती पुसट दिसायला लागली. ओठ उघडे झाले. तीच मूक नाव ओठातून बाहेर पडायला. त्याने मोबाईलची स्क्रीन उघडून फोटो जास्त न शोधता एक फोटो उघडून तो बघायला लागला. गालात हास्य आल. निस्वार्थी. 
तिला whatsapp वर जाऊन मेसेज केला. पण तिचा dp दिसत नव्हता. मेसेज गेला पण मेसेज डिलिव्हर झाला नाही. नेट सुरु होत. रेंज 4G ची होती पण व्यर्थ. whatsapp मधून बाहेर आरोह सहज पडला. पण तिच्या विचारातून जमलच नाही. विचार असून हि तो शांत होता. गार वार होत. वर अंधार असला तरी ढग करडे दिसत होते. पार्कमध्ये तर काय पूर्ण प्रकाश पार्कमधल्या जोडप्यांसारखा बसलेल्या जोडप्यांवर पसरलेला. उरली सुरली सावली ती झाडा-झुडुपांच्या पलीकडे पसरलेली. आणि त्या पसरलेल्या अंधाऱ्या सावलीत काही जोडपी प्रेमाचे चाळे नवखे होऊन करत होते. आणि पाउस सुरु झाला. त्याच वेळी संपूर्ण पार्क मधली लाईट गेली. अस वाटून सगळी जोडपी आपल्या जोडीच्या ओठांचा ताबा घ्यायला सज्ज झाले. पण लाईट गेली नव्हती घालवली होती. साडे सात वाजलेले. आणि पार्क आता बंद होणार होत. शिट्ट्यांचा मोठमोठ्याने आवाज यायला लागला. आणि एका खांबावरची लाईट पेटली. त्यात पावसाचा जोर दिसत होता आणि खाली गेटबाहेर निघाणारी जोडपी दिसत होती. आरोह मोबाईलची लाईट जमिनीकडे दाखवून तो चालत गेट मधून बाहेर गेला.                 

 ०२
रात्रीचे अकरा वाजायला आलेले. फेसबुकवर असेच काही फोटो बघत असताना खाली काही फोटो दिसत होते. त्या खाली लिहिलेलं “Add Friend”. असावरी. माया. विशाखा. वैष्णवी. अशा चार नावांच्या मुलींचे फोटो दिसत होते. जास्त काही न बघता ना वाचता आरोह त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो. आणि झोपून जातो. डोळे मिटलेले पण मन पूर्ण जाग होत. पाच एक मिनिटांनी त्याला आतून काहीतरी ओढ लागून जाते. तो झोप येत नाही हे कारण मनाशी धरून मोबाईल तोंडासमोर करून इंटरनेट सुरु करतो. आणि त्याला दिसल कुणीतरी त्याने पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट मान्य केलेली असते. तो पटकन क्लिक करून बघतो. त्याला नाव दिसत ‘माया.’
ती हि फेसबुकवर ऑनलाईनच होती. त्याने तिला मेसेज केला ‘हाय’ आणि अर्ध्या तासाने तिचा मेसेज आला. अर्धा तास तो तीची वाट बघत बसलेला आणि तिचा मेसेज आला कि पटकन तिला रिप्लाय देऊन मोकळा होतो. दोघांच बोलन अस सुरु होत,
आरोह : हाय.
माया : हेय.
आरोह : कशी आहेस ?
माया : मी मस्त.
आरोह : मी पण मस्त.
माया : पण मी तुला विचारलच नाही.
आरोह : सॉरी.
माया : इट्स ओके. बाय जी.एन. झोपते.
आरोह : इतक्यात ?
माया : एक वाजायला आलाय.
आरोह : हो पण आपण आत्ता बोलायला सुरुवात केली ना.
माया : उद्या बोलू.
आरोह : तू कधी फ्री असतेस ?
माया : फिक्स टायमिंग नाही. पण संध्याकाळी सात नंतर होते मी फ्री.
आरोह : देवा सगळा दिवस लवकर संपू दे आणि सात लवकर वाजू दे.
माया : का ?
आरोह : तुझ्याशी बोलायला.
माया : बोलले नाही तोवर फ्लर्ट सुरु. ब्लॉक व्हायचंय वाटत लवकर.
आरोह : मज्जा केली ग.
माया : मला नाही आवडत मज्जा.
आरोह  : सॉरी.
माया : आणि सॉरी पण आवडत नाही.
आरोह : मग काय म्हणू ?
माया : काही नको. झोप तू. मी पण झोपते.
आरोह : फ्रेंड्स ?
माया : झालो कि.
आरोह : सोशल साईटवरची मैत्री आणि खऱ्या आयुष्यातली मैत्री खूप फरक आहे.
माया : अस काही नसत. उलट खऱ्या आयुष्यातल्या मित्रांपेक्षा असे न बघितलेले, अनोळखी मित्र कधीही चांगले.
आरोह : होका. चालेल मला मग तुझा चांगला मित्र व्हायला.
माया : मी झोपू का ?
आरोह : बर. झोप शांत काळजी घे.
माया : बाय.
माया बोलायची बंद झाली. आरोह तिचे फेसबुकवरचे फोटो बघत बसतो. निवडक फोटोंना लाईक करतो. आणि नंतर झोपून जातो. सकाळी उठून सगळ आवरून कॉलेजला जाताना तो इंटरनेट सुरु करतो. आणि मोबाईल वाजतो. तो फेसबुक सुरु करतो. तीन मेसेज आलेले असतात. त्यात मायाचा हि असतो.
माया : जी.एम.
हा लगेच घाईत तोच मेसेज तिला पाठवतो. आणि मोबाईलची स्क्रीन बंद करून खिशात मोबाईल ठेवणार तोच मोबाईल व्हाईब्रेट झाला. त्याने बघतील तर मायाचा मेसेज.
माया : काय करतो ?
आरोह : कॉलेजला चाललो. तू काय करतेस ?
माया : झोपलेय अजून.
आरोह : ओह. उठणार कधी ?
माया : अरे आज कॉलेजला गेलेच नाही. कंटाळा आलाय खूप. तुझ्यामुळे उशिरा झोपले. मग झोप नाही झाली म्हणून गेलेच नाही.
आरोह : सॉरी. आज नाही जागवणार तुला.
माया : मज्जा केली रे. चिल. बर नाही मला सो गेले नाही.
आरोह : का काय झाल ? वातावरण पण खराब आहे. पाऊस येतोय-जातोय. मधेच ऊन येत. त्यात थंडी दिवसभर असते. काळजी घे. डॉक्टरकडे जाऊन आलीस का ? काय बोलले ते ?
माया : अरे हो-हो. एवढ काही झाल नाहीये मला. ओके आहे मी.
आरोह : मग काय होतय नक्की ?
माया : काही नाही. पोटात दुखतय. बस बाकी काही नाही.
आरोह : ओह. काय बाहेरच खाल्ल का ?
माया : नाही. तू काय खाल्ल का ?
आरोह : हो उपीट खाऊन निघालो. मुलींचा प्रोब्लेम आहे का ?
माया : हम.
आरोह : काय ?
माया : हो. पोटात खूप दुखतय.
आरोह : ओह. झोपून राहा.
०३
माया : हो. आता लेटच आवरणार. मम्मी म्हणतेय लवकर उठ. 
आरोह : नको. नको अजिबात नको उठू. झोपून राहा तासभर तरी.
माया : हा. सांगितल तिला. तसच.
आरोह : काय बोलली मग मम्मी ?
माया : झोप बोलली.
आरोह : बर झाल काळजी घे. 
माया : तू पोचला का कॉलेजला ?
आरोह : हो. तुझ्याशी बोलतोय म्हणून बाहेरच थांबलोय. जवळच आहे कॉलेज. 
माया : मग जा ना आत. मी काय आहे इथेच. मला बर वाटत नाहीये यार. तू जा.
आरोह : खूप त्रास होतोय का ?
माया : हो ना. कुणीतरी जवळ असाव वाटतय.
आरोह : कुणीतरी म्हणजे ?
माया : कुणीतरी म्हणजे कुणीतरी. असत ते मुलांना नाही समजणार. अस त्रास होत असताना ना मुलींना कुणीतरी हव असत बोलणार, काळजी घेणार. 
आरोह : मी आहे कि. बोलतोय ना. 
माया : ओ हेल्लो, आपण जस्ट फेसबुक फ्रेंड आहोत. 
आरोह : बर. होका ? मी मग उगीच बोलत बसलो माझ कॉलेज सोडून. घे काळजी मी जातो बाय. 
माया : ए अरे रागावलास का ? मला तुला दुखवायचं नव्हत. 
आरोह : असुदे. 
माया : सॉरी. 
आरोह : हम. 
माया : अस करणार का तू आता ? आजारी आहे ना मी. मला माफ पण नाही का करणार.
आरोह : मी चिडलोच नाहीये. हम बोललो मी फक्त.
माया : हम नाही. केल माफ अस म्हणाव.
आरोह : केल माफ. ओके ?
माया : ओके. 
आरोह : काय करतेस ?
माया : सांगितल ना, झोपलेय. किती वेळा सांगू. 
आरोह : हो. अग आता तू चिडणार का माझ्यावर ?
माया : नाही. 
आरोह : मला काय समजेना.
माया : आता तुला काय झाल ?
आरोह : झाल काही नाही. तू आजारी आहेस, मी कॉलेजला गेलो तर तुझ्याशी कोण बोलणार ? म्हणून विचार सुरु आहे माझा कि, जाव का नको. 
माया : ओय, मला आहेत बरेच फ्रेंड्स फेसबुकवर. तू जा. सुटला कि मेसेज कर. नो प्रोब्लेम. 
आरोह : होका. मला पण आहेत. खूप फ्रेंड. पण मी प्रत्येकाशी बोलत नाही. 
माया : सेम. बट तू जा. 
आरोह : चालेल. जातो. नाहीच बोलायचं तुला तर. ठीके.
माया : अस नाही रे काही. तू सतत गैरसमज का करून घेतोस रे. वेडायस का ?
आरोह  : बर. काळजी घे. झोपून राहा. जड काय उचलू नको. आणि थंड पाण्याने अंघोळ करू नको. जास्त विचार करू नको. 
माया : ओ डॉक्टर करेन हा असच. जावा तुम्ही. 
आरोह : हो जातो मी. काळजी घे, बाय.
माया : बाय.
आरोह निघून गेला. माया दुसऱ्या फ्रेंडसोबत बोलायला लागली. थोड्यावेळाने झोपून पण गेली. 
एक वाजता आरोह कॉलेज वरून सुटला. फेसबुक सुरु केल तर माया ऑनलाईन नव्हती. आरोहने तिला मेसेज केला ‘हाय’.
आणि त्याच वेळेला माया नुकतीच अंघोळ करून आवरून, वरण भात खायला घेऊन बेडवर येऊन बसली. आणि तिने फेसबुक सुरु केल, तर आरोहचा मेसेज. 
माया : हाय, सुटला का ?
आरोह : हो. 
माया : आता काय करणार ?
आरोह : तुझ्याशी बोलणार आणि घरी जाणार. 
माया : ओह, होका. बर-बर. बोल मग. काय म्हणतोस ?
आरोह  : बोललीस का, फ्रेंड्स सोबत ?
माया : हो खूप. पण, काळजी घे कोण म्हणाल नाही. 
आरोह : ओह म्हणजे पहिला काळजी घेणारा मीच आहे वाटत.
माया : हट, मम्मी, पप्पा आहेत कि. दोन भाऊ पण आहेत. 
आरोह : बर तरी, ते चार आणि मी पाचवा. 
माया : हा तू पाचवा. 
आरोह : काय करतीस ?
माया : जेवतेय. 
आरोह : काय मेनू ?
माया : वरण, तूप, भात.
आरोह : मला ?
माया : ये कि तू पण.
आरोह : येऊ शकत नाही पण पिक पाठव.
माया : पिक ? कसला ?
आरोह : तुझा विथ वरण, भात, तूप.
माया : नो सॉरी. 

०४
आरोह : का ?
माया : अजून आपली ओळख झाली नाहीये. आणि मला कळत नाही तुम्हा मुलांना कोणत्या मुलीने मेसेजला रिप्लाय दिला तर लगेच whatsapp नंबर का लागतो ? ते नाही तर फोटो लागतो. काय करता काय त्याच ? नंबरच समजू शकते पण फोटो काय करणारे बघून ?
आरोह : काहीच नाही. नुसता बघेन.
माया : आणि ?
आरोह : काहीच नाही.
माया : मग कशाला हवाय ?
आरोह : असच. मी बोलतो ती मुलगी कशी दिसते ते बघायचय.
माया : मी कशी दिसते हे बघायचंय कि मी नक्की मुलगीच आहे हे बघायचं आहे ?
आरोह : नाही. नाही. बोलण्यावरून वाटतय कि तू मुलगीच आहे. पण तरी अस वाटतय कि तू कशी दिसत असशील. सो म्हणून मागितला.
माया : सॉरी बट नाही देऊ शकत. इव्हन कुणालाच देत नाही मी. तूच अस नाही. आणि मी जास्त फोटो काढत पण नाही. बट एक सांगू ?
आरोह : काय ?
माया : माझे पप्पा मला परी बोलतात. मला म्हणतात परी असेल ना कुठली ती सेम तुझ्यासारखी असेल. सो मी सुंदर आहे. पण प्लीज परत फोटो मागू नकोस. उगीच मी देणार नाही तुला माझा राग येईल. तू बोलन बंद करशील. आणि जर का तुला असच करायचं असेल तर बाय. उगीच पुढे बोलत राहण्यात काही अर्थ नाही.
आरोह : नाही. नाही.
माया : काय नाही ?
आरोह : अग नको फोटो मला. बाय म्हणू नको.
माया : हा. फोटो आणि नंबर मला मागू नको. इथे बोलू न आपण. काही हरकत नाही. मी तुला दिला ना रिप्लाय तुझा मेसेज आला कि. तसाच नंतर हि देईन. चालेल ना ?
आरोह : काय ?
माया : इथे बोललो तर ?
आरोह : बर.
माया : फक्त बर ?
आरोह : मग काय बोलू ?
माया : नीट हो म्हण कि, असा मनाविरुद्ध बोलल्यासारख का नुस्त बर म्हणतोयस.
आरोह : चालेल तू म्हणशील तस.
माया : तू पोचलास का ?
आरोह : हो. तुझ झाल खाऊन ?
माया : नाही अजून खातेय. गरम गरम आहे न भात सो. हळू हळू फुकून खातीय एक एक घास.
आरोह : उद्या जाणार कॉलेजला ?  
माया : हो. उद्या जाईन. आधी आणि पहिल्या दिवशी जरा होतो त्रास परत नाही होत.
आरोह : मला तर खूप वाईट वाटत. आणि कधी कधी राग पण येतो.
माया : कसला रे ?
आरोह : हेच कि सगळ लेडीज लोकांनाच का सहन कराव लागत ?
माया : हा ना. मुलांना पाहिजे होता पिरेड.
आरोह : हो ना. बाळाला जन्म द्यायचा. हा महिन्यातून सारखा त्रास. परत बाहेर फिरताना लोकांच्या वाईट नजरा आणि बरच काही असत.
माया : असू दे रे. असच असत लाईफ मुलींचं.
आरोह : मला नाही आवडत हे असे जगातले नियम. माणूस म्हणताना त्यात स्त्री आणि पुरुष असे दोघ असतात. मग हुकुम फक्त पुरुषांचाच का चालतो. मला नाही आवडत यार.
माया : तू हा विचार करतोस हेच खूप आहे. तुझ्यासारखी बुध्दी सगळ्यांना हवी होती.
आरोह : मी समजू शकतो ग एका स्त्रीच दुःख. सो म्हणून बोलतोय मी.
माया : ओह, कस काय ?
आरोह : असच अग समाजात बघतो ना आपण. कोण कुणाच्या मागे लागत. कोण कुणावर रेप करत. कोण कुणाचा खून करत. पण अस कधी दिसत का ? मुलीने रेप केला मुलावर. मुलीने मुलाचा खून केला. मग हे पुरुष सगळे असे का वागतात. मला नाही आवडत अजिबात.
माया : वेट, आलेच मी हात धुवून.
आरोह : हो ये. आहे मी.
थोड्यावेळात,
माया : हा, बोल. काय करतोस ?
आरोह : वाट बघतो तुझी.
माया : का ?
आरोह : असच.
माया : बर. मला तर हे सगळ बघून भीतीच वाटते. प्रेम बीम करायची.
आरोह : का ? ०५
माया : आहे त्याला एक कारण.
आरोह : सांग कि मग मला.
माया : नाही नको. बोल दुसर.
आरोह : अग सांगू शकतेस. काही वाईट झालय का ?
माया : हो.
आरोह :  काय ?
माया : माझी एक बेस्ट फ्रेंड आहे ऋतुजा. आम्ही न दोघी पाचवीत पहिल्यांदा एकमेकींना भेटलो. आमची मैत्री झाली. मग आम्ही शेजारी शेजारी बसायचो. दहावी पर्यंत. कॉलेजला पण एकत्र होतो. मग आम्ही कॉलेजला आलो. ती वेगळ्या कॉलेजला गेली. बट आमच कॉलवर बोलन रोज असायचं. अगदी दिवसभराच आम्ही एकमेकींना सांगायचो. पण मागच्या रंगपंचमीला तिचा मला कॉल आला. ती घाईत म्हणाली ‘घरून कॉल आला तर सांग मी तुझ्यासोबत आहे. माझा कल लागणार नाही मे-बी. मी तासात येते तुझ्याकडे.’ मी काही विचारायच्या आधी तिने कॉल कट केला. नंतर थोड्याच वेळात तिच्या घरून मला कॉल आला. मी सांगितल त्यांना ती आहे माझ्यासोबत. तिचे बाबा म्हणाले ओके. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास. मग मी ते विसरून गेले. आणि बाहेर फ्रेंडस सोबत गेले रंग खेळायला.
आरोह : मग पुढ काय झाल ?
माया : तासाभराने खरोखर मला ती येऊन भेटली. सोबत तिच्या एक मुलगा होता. प्रशांत.
आरोह : तो कोण होता ? मित्र ?
माया : बॉयफ्रेंड. मला धक्काच बसला. सगळ सांगणारी मला ऋतुजा बॉयफ्रेंड बद्दल कधीच काही बोलली नाही. त्या दिवशी ती माझ्याकडे येते सांगून त्याच्या सोबत मुळशीला गेली धरणाकडे. फिरायला.
जेव्हा नंतर काही दिवसांनी तिने त्याला सांगितल ती प्रेग्नेंट आहे. त्याने ब्रेकअप केल. त्याच दुसरीसोबत सुरु आहे अस त्याने सांगून टाकल तिला. हिने हात कापून घेतला त्यातून वाचली म्हणून फिनाईल पिल. त्यातून पण ती वाचली. पण पोटात विष झाल त्यामुळे पोटातल साडे तीन महीन्याच बाळ मेल. ते अर्धवट बाळ पोटातून काढताना डॉक्टरची त्या चूक झाली आणि तिला आता कधीच बाळ होणार नाहीये. तिने तरी त्या प्रशांतला हे सगळ सांगितल. त्याने कसे तरी मित्रांकडून पैसे उसने घेऊन तिला आठ हजार दिले. आई बाबांनी तिच्याशी बोलायचं सोडून दिल. हे सगळ झाल. दोन महिन्यांनी प्रशांत परत तिला पैसे दिलेले आठ हजार मागायला लागला. हिच्याकडे नव्हते म्हणून त्याने पुन्हा प्रेमाच नाटक केल. तिच्याशी गोड गोड बोलायला लागला. परत सारखे सारखे कॉल करायला लागला. हिला आपल बर वाटल. सगळ पुन्हा नीट होतय म्हणून हि पण पुन्हा प्रेमात हरवली. तिने त्यात त्याला सांगितल ती कधीच आई होणार नाही.
आरोह : मग ?
माया : मग काय. हा रोज रोज तिच्यासोबत काहीही घाण करायला लागला. ती प्रेम समजून ते सगळ करत होती त्याच्यासोबत. आणि जेव्हा त्याला कंटाळा आला तिचा. गेला निघून. आत्ता ती एम.आय.डी.सी. त औषधांच्या बाटल्या बनवण्याच्या कंपनीत काम करते. तिला बघितल असत ना तू आधी तर एकदम मॉडेल होती. आणि आता झोपडपट्टीतल्या मुली पण बऱ्या दिसतात तिच्यापुढे. अशी हालत झालीय तिची. म्हणून मला खूप भीती वाटते प्रेमाची.
आरोह : अस काही नसत. सगळेच वाईट नसतात. काही असतात न चांगले.
माया : हो माहितीय. पण चांगलेच आपल्या वाट्याला येतील अस नाही न. आपण कुणावर तरी इतका विश्वास ठेवतो. इतका जीव लावतो पण त्या नालायका सारखा कोणी निघाला तर काय करायचं ? म्हणून मी नाही बोलत कुणाशी. जेवढे खास आणि ओळखीचे आहेत तेवढेच. नाहीतर मी हाय ला हेल्लो पण करत नाही कुणाच्या.
आरोह : मग मला का रिप्लाय दिला ?
माया : असाच नाही दिला. तुझ प्रोफाईल बघितल. चांगला वाटलास. म्हणून दिला रिप्लाय. आत्ता मगाशी बोलून कळाल कि खरच चांगला आहेस तू. चांगले आहेत विचार तुझे. खास करून मुलींबद्दल वाटत तुला ते विचार आवडले मला.
आरोह : खर जे वाटत मला ते मी बोललो.
माया : मी बोलेन तुझ्याशी. आवडेल मला तुझ्याशी बोलायला.
आरोह : मला पण खूप आवडेल. आणि मी नाही मागणार तुला परत कधी नंबर आणि फोटो.
माया : मोबाईल अपलोडस मध्ये माझा एक पिक आहे. बघू शकतोस तू.
आरोह : नाही नको.
माया : का ?
आरोह : असच. तुला वाटत न मी तुला बघू नये तर मग नकोच. तुला जेव्हा वाटेल न मनापासून तेव्हा पाठव तुझा फोटो मला.
माया न सांगताच ऑफलाईन गेली. आरोह तिची वाट बघत बसला.
खूप वेळ गेल्या नंतर त्याने कंटाळून फेसबुक लॉगओऊट कराव या विचाराने तसा प्रयत्न केला आणि एक मेसेज आला.
त्याने बघितल. तो मायाचा मेसेज होता. पण वाचण्यासारखा नव्हत. तो मेसेज असला तरी शाब्दिक नव्हता. एक फोटो होता.
त्याने बघितल एक गोड, बालिश आणि सुंदर मुलगी होती.
माया : बघ हि मी आहे. कशी दिसतेय ?
आरोह : खूपपपप.. सुंदर. यार. पप्पा बोलतात ते खर आहे. मी पण आज एका खऱ्या परीला बघितल.
माया : चल काहीही नको सांगू. नीट बघ माझे गाल कसे आहेत गुब्बू.
आरोह  : शोभतात तुला. खूप मस्त आहेस.
माया : खर  ?
आरोह : एकदम खर. शंभर टक्के खर. खोट का मी बोलेन.
माया : हा. thanku... खुश का ?
आरोह : खूप खुश. पण तू कसा काय पाठवला मला फोटो ?     

०६
माया : असच.
आरोह : असच कस ? सांग कि.
माया : विश्वास बसला तुझ्यावर. बट हा शेवटचा फोटो. परत मागायचा नाहीस. आणि हो विश्वास ठेवला आहे. सो तोडू नकोस कधी.
आरोह : नाही तोडणार.
माया : काय करतोस ?
आरोह : काही नाही बसलोय बोलत एकीशी.
माया : कोण रे ?
आरोह : आहे एक मुलगी.
माया : होका ? मग बोल कि तिच्याशी ती वाट बघत असेल तुझ्या मेसेजची. माझ्यामुळे तिला रिप्लाय लेट जाईल.
आरोह : जाऊ का ?
माया : हो जा ना. पण मला फक्त एवढ सांग कोण आहे ती मुलगी ?
आरोह : आहे एक. नाही सांगू शकत.
माया : होका ? नसेल सांगायचं तर नको सांगू. बाय. बोलू नंतर. तू बोल तिच्यासोबत.
आरोह : तू बाय केल तर मी कस बोलणार ?
माया : का ?
आरोह : ती मुलगी तर तू आहेस ना.
माया : माहितेय मला.
आरोह : हम. तुझी हॉबी काय आहे ग ?
माया : पुस्तक वाचायला आवडतात मला खूप. आणि तुझी ?
आरोह : मला गाणी ऐकायला आवडतात. नवीन नाही जुनी. किशोर कुमार, अशा भोसले त्यांची.
माया : सेम. मला पण जुनी गाणी ऐकायला आवडतात खूप. किशोर कुमार, आशा भोसले. आर.डी. बर्मन, मोहम्मद रफी.
आरोह : वाह.. हे पण सेम झाल आपल. नवीन गाणी असतात चांगली पण पण त्यात नुस्त म्युझिक असत. पण जुन्या गाण्यात फिलिंग असत. बोर नाही होत गाणी.
माया : हो ना. आजकाल कस नुसत्या म्युझिकवर जोर असतो. लिरिक्स काहीच नसतात.
आरोह : हो ना. काय करतेस ?
माया : बसलेय पुस्तक वाचत आणि तुझ्याशी बोलत.
आरोह : कोणत पुस्तक वाचतेयस ?
माया : ‘प्रेमाची शप्पथ आहे तुला’.
आरोह : कुणाच आहे ?
माया : अजिंक्य भोसले म्हणून आहेत. त्यांच आहे. खूप भारी लव्ह स्टोरी आहे त्यात.
आरोह : तुला आवडल का ते पुस्तक ?
माया : हो. अल्मोस्ट माझ संपत आलय. पाचशे एकविसाव पान चाललय.
आरोह : ओह. इतके ?
माया : हो. तुला पण आवडेल खूप.
आरोह : तुला आवडल म्हणजे चांगलच असेल. ऐक ना मला रोज इथे पुस्तकाच्या चार पानांचा फोटो पाठवशील ?
माया : हो वेट,
तिने चार पानांचा त्याला लागलीच फोटो पाठवला. आणि त्याला वाचायला सांगितल. पंधरा मिनिटांनी. आरोह ऑनलाईन आला पण माया ऑफलाईन होती.
तिला ऑनलाईन बोलवायला काही पर्याय नव्हता. तो थोडा वेळ वाट बघतो आणि फेसबुकच प्रोफाईल उघडतो. आणि त्यावरचा प्रोफाईल पिक्चर बदलून चांगला एक स्वतःचाच फोटो ठेवतो. उरलेली थोडीशी माहिती पण भरून टाकतो. त्यात एक जागा असते. मोबाईल नंबरसाठी. आणि त्यात आरोह त्याचा नंबर लिहितो. आणि ऑफलाईन जातो. आईसोबत मंडईत जातो. तिथून महिन्याचा किराणा माल आणून दोघे बाहेरूनच जेवण करून येतात. रात्रीचे दहा वाजायला आलेले. घरी येऊन थकून आई किराणा माल ज्या-त्या डब्यात भरायला घेते पण आईला थकलेल बघून आरोह तिला बसायला सांगतो आणि स्वतः भरायला लागतो. आई जाऊन बसली. ती बसली असली तरी शांत नव्हती. कशात काय भरायचं, कुठला डबा कुठ ठेवायचा सगळ सांगत होती. आरोह तसच सगळ करत होता. सगळ भरून झाल्यावर, आणलेली भाजी भरायला सुरुवात केली. कोणती भाजी शेजारी कोणती भाजी ठेवायची ? कडधान्य कुठे ठेवायची पालेभाज्यांची देठ खुडून पिशवीत ठेवायची कशी वैगरे अस सगळ आई आरोहला सांगत होती. त्याला हे सगळ पाठ होत. पण सगळ जिथल्या तिथ हव असणाऱ्या आईला स्वस्थ बसवत नव्हत. मधे-मधे उठून  ती जायची त्याला मदत करायला पण तोच तिला परत पाठवायचा. सगळ सामान भरून झाल. सगळी भाजी भरून झाली. आता केर काढून आरोह टी.व्ही. बघत बसला.
( image by unplash.com )
भाग ०७
इकडे माया फेसबुक सुरु करून बसली. आरोह दिसत नव्हता. तिने त्याला मेसेज केला. पण त्याच इंटरनेट बंद होत. तिने आरोहचा प्रोफाईल बघितल आणि तिला बदललेला फोटो दिसला. त्याला लाईक करून तिने त्याला नाईस पिक म्हणून मेसेज केला. आरोह टीव्ही बघत बघत झोपून गेला. सकाळी आवरून कॉलेजला पण गेला. दुपारी कॉलेजमधून घरी जाताना त्याने मोबाईलवर फेसबुक सुरु केल. त्याला मेसेज दिसले. मायाला पटकन मेसेज त्याने सुरु केले.
आरोह : हाय.
आरोह : एवढा पण नाही चांगला फोटो.
आरोह : अग रात्री झोपून गेलो लवकर. सकाळी चार्गिंग केलच नाही मोबाईलला. रोज रात्री झोपताना लावून झोपतो मोबाईल पण काल राहून गेल. पण आत्ता थोड आहे चार्गिंग वीस टक्के. घर पण जवळ आलय. सो फेसबुक सुरु केल. सॉरी. मी मेसेज केला नाही तुला.
एवढे धड-धड मेसेज मिळाल्यावर माया लागलीच ऑनलाइन आली.
माया : अरे सॉरी काय ? मी काय जी.एफ आहे का तुझी कारण देतोय ते मला. असुदे. आत्ता केलास ना मेसेज. ठीक आहे. कुठ पोचलास ?
आरोह : घर जवळ आल आहे. म्हणजे अजून लागेल पाच मिनिट वैगरे. तू कुठ आहेस ?
माया : घरी.
आरोह : गेली नाहीस कोलेजला ?
माया : नाही गेले.
आरोह : काय करतेस ?
माया : बोलतेय तुझ्याशी. अरे घरी कोणी नाही. एकटीच आहे. टीव्ही बघत होते. पिच्चर लागलय एक तो बघतेय.
आरोह : कोणता ?
माया : लागलाय इंग्लिश एक. हिंदीत. बघतेय तो.
आरोह : मला पण आवडतात इंग्लिश फिल्म्स.
माया : मी पण बघत असते. मराठी फिल्म्स असतात चांगल्या पण तेच तेच असत सारख. गावातल सगळ. बोर होत खूप.
आरोह : हो ना. आपण शहरात राहतो आणि गावातल बघताना चांगल वाटत पण तेच तेच बघून कंटाळा येतो.
माया : हो बरोबर. आणि हिंदी तर काय जसेच्या तसे तमिळची कॉपी करतात. टीव्हीला तसले पिच्चर तमिळ हिंदीत डब केलेले लागत असतातच सो मला इंग्लिश आवडतात.
आरोह : जुळतय कि आपल हे पण.
माया : हो न.. भारी ना ?
आरोह : हो.
माया : तुझ सीम कोणत्या कंपनीच आहे ?
आरोह : आयडिया, का ग ?
माया : मेसेज स्लो येतोय तुझा.
आरोह : अग चार्जिंग कमी असल कि नेट चालत नाही नीट. तुझ कोणत आहे सीम ?
माया : आयडियाच.
आरोह : हे पण सेम यार.
माया : हो पण नंबर विचारू नकोस. कारण तो सेम नसणारे आपला.
आरोह : हाहा. माहितीय मला.
माया : हम. तुझा नंबर दिसला मला फेसबुकवर.
आरोह : हो काल टाकला मी.
माया : आपला नंबर सेम नसला तरी आपली सुरुवात नंबरची सेम आहे.
आरोह : होका ?
माया : हो. ९६५७* वरून माझा पण नंबर आहे.
आरोह : यार. कस काय इतक आपल सेम सेम होतय सगळ ?
माया : गॉड नोझ.....
आरोह : पोचलो मी घरी.
माया : बर आवरून घे. काहीतरी खाऊन घे नंतर बोलू.
आरोह : अग अस काही नाही. बोलू शकतेस तू. अजून एक सेम झालय.
माया : काय ?
आरोह : आई घरी नाहीये. मी पण एकटाच आहे आता घरी.
माया : हम मग ?
आरोह : तुझ्याशी बोलू शकतो का मी ?
माया : बोलतोय कि आपण आत्ता ?
आरोह : कॉल वर ?
माया : नको ना प्लीझ.
आरोह : काय ग प्लीझ ना.
माया : हे बघ सगळी मुल अशीच करतात म्हणून मी कुणाशी बोलत नाही. तुझ्याशी बोलले. विश्वास ठेवून तर तू तसच वागणारेस का ?
आरोह : नाही ग मी असच सहज बोललो. सॉरी.

माया : नको सॉरी. असुदे. पण परत नको बोलू. कॉल करू का म्हणून. नाहीतर मी नाही बोलणार परत तुझ्याशी.

भाग  08
आरोह : बर ठिके. बोल.
माया : तू बोल. खाणार कधी ?
आरोह : खाईन आता. जरा वेळ बोलेन तुझ्याशी. आणि मग नंतर.
माया : का ? आधी खा मग बोल.
आरोह : असुदे ग. इतकी ही भूक नाही लागली.
माया : तरी पण खाऊन घे जा.
आरोह : बर.
आरोह जाऊन जेवयाल लागला. चार्जिंग संपत आल म्हणून त्याने मोबाईल चार्जिंगला लावला. इकडे माया त्याला मेसेज करते. थोडावेळ त्याची वाट बघते. आरोह टीव्ही बघत जेवतो आणि झोपून जातो. त्याची झोप लागते. तेवढ्यात मोबाईल वाजतो. आईचा कॉल असतो.
आई : कुठे आहेस ?
आरोह : झोपलोय.
आई : जेवून घेतलस का ?
आरोह : हो. तुला ठेवल्यात  दोन चपात्या.
आई : ऐक मामाच्या घरी ये लवकर.
आरोह : का ?
आई : मामीला बाळ झालय. ये बघायला. आणि अरे  इथ काय लागल तर कोण नाहीये हाताखाली. तू ये लगेच. आरोह : आलोच.
आरोह आवरून मामाच्या घरी गेला. तिथून आईसोबत तो दवाखान्यात गेला. रात्री उशीर जल दवाखान्यात च म्हणून मामाने आरोह आणि आईला घरी राहायला सांगितल आजच्या दिवस. दोघ राहिले. आरोहच चार्जिंग झालच नव्हत.
दुसऱ्यादिवशी सकाळी,
आरोहने मामाच्या चार्जरने मोबाईल चार्ज करून घेतला. दवाखान्यात जावून असच फेसबुक उघडल. मायाचे मेसेज आलेले.
माया : घेतल का जेवण ? झाल का जेवण ? कुठ आहेस ? कामात आहेस का ? अरे कुठ हरवलास ? सांगून जायच ना. हाय. कसं आहेस ? गुडनाईट.
आरोह मेसेज बघतो. तिला मेसेज लिहायला सुरुवात करतो. आणि तिथ मामा येतो.
मामा : आरोह चल. घरी जायच आहे. सामान आणायच आहे. आणि काही कपडे पण आणू बाळासाठी मामीच्या माहेरून.
दोघ निघून गेले. मेसेज तसाच राहून गेला. दोन तास मामा आणि आरोह बाहेरच होते. सामान हातात धरून गाडीवर आरोह बसलेला मामा गाडी चालवत होता. मोबाईल व्हाईबरेट व्हायला लागला. पण चालू गाडीवर कसा घेणार कॉल म्हणून आरोह दुर्लक्ष करतो. दोन कॉल येऊन गेले. मग मामाचा मोबाईल वाजला. त्याने हेडफोन लावलेले. तू बोलायला लागला. बोलण झाल.
मामा : कॉल आलेला तुला कळाल नाही का ?
आरोह : उचलणार कस.
मामा : हा. दीदी करत होती कॉल.
आरोह : हा. काय म्हणाली आई ?
मामा : किती वेळ लागणारे तुम्हाला. पोहे बनवतीय.
आरोह : भूक लागलीय.
मामा : मला पण.
दोघ घरी येऊन पोहे खाऊन दवाखान्यात जातात. आरोह बाळाला बघून मग बाहेर येऊन बसतो. मामा मामीजवळ आत बसतो.
आरोहला कॉल आलेला असतो एक आईचा. आणि दूसरा अननोन. आरोह त्यावर कॉल लावतो. पण कोणी तिकडे कॉल उचलत नाही.
आरोह ऑनलाईन जातो.
माया : माझा  नंबर आहे तो. कुठ आहेस गायब ?
आरोह : अग काय सांगू खूप धावपळ नुसती सुरु आहे.
माया : मम्मी ठीक आहे ना ?
आरोह : हो. अग मामीला बाळ झाल. त्यामुळे आईसोबत माझी धावपळ.
माया : वाह.. काय झाल मुलगा की मुलगी ?
आरोह : मुलगा.
माया : हा मला फोटो पाठव. मला लहान बाळ.
आरोह तिला फोटो पाठवतो बाळाचा.
माया : वॉव.. कित्ती कयूट आहे. गोंडस एकदम. आणि किती गोर आहे.
आरोह : मामी खूप गोरी आहे. मामा पेक्षा.
माया : मस्तच.
आरोह : पण तू मला कॉल का केलेला ?
माया : असच.
आरोह : असच ?
माया : न सांगता जेवण घ्यायला गेल्यास ते दोन दिवस गायब म्हणून. केला बघायला तू कुठ आहेस ते.
आरोह : होका ? मग मी लावला मगाशी तर उचलला का नाहीस ?
माया : मला जेव्हा वाटेल तेव्हा बोलेन. अजून ओळख होऊ दे आपली. मग बोलेन. आणि नंबर सेव्ह करू शकतोस.
आरोह : चालेल.
माया : बोल.
आरोह : बाळ उठलय आवाज ऐकायचा आहे का ?
माया : हो.
आरोह : कॉल उचल.
माया : हो.
आरोह तिला कॉल लावतो.
आरोह : हॅलो.                                         


Copyrighted@2019

6 टिप्पण्या