समाधान...

मनातून व्यक्त झालो कि मन रितं होत पण काहीच क्षण. कारण ऐकून घेणारा हा समदुःखी असतोच अस नाही. आणि असला तरी त्याच दुःख वेगळ. आपल ते आपल. बाकी दुसऱ्याच परक दुःख कायम आपल्याला आपल्यापेक्षा कमीच वाटत. जग खूप मोठ आहे आणि.....? आणिक काही नाही. जग खूप मोठ आहे आणि त्याहून मोठ अस दुःख आहे. कोण सुखी आहे ? जो दुःख भोगून बसलाय. दुःखी मग कोण आहे ? अर्थातच जो ते दुःख भोगायला भीत आहे. आणि म्हणूनच तो त्या दुःखातून पुढे सुखात पडू शकत नाहीये. पाण्याचा नितळपणा भावता असला तरी खोलपणाची मनात भीती असते. पाण्याच्या खोलीत शिरून वरच याव लागत नाही तर जीव जातो. त्या खोलीतून वर आल कि सगळ जग सुंदरच. खाली काय दगड-गोटे, मोठे-छोटे मासे, बिनकामी विषारी झुडूपांची दलदल. आणि वर सुंदर आकाश, वार-हवा, पशुपक्षी, आपल्यासारखीच दुःखातून तरून आलेली सुखी लोक दिसतात. दुःखातले लोक काय सुखाच्या जड स्वप्नांनी दुःखाच्या नितळ पाण्यात बुडून मरतच चाललेले आहेत. त्यातलाच मी एक.
समदुःखी मी. समसुखी का नाही ?
( परवानगी शिवाय आपल्या नावाने शेअर करू नये कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies