मिठीतला दिवस...


चुकलेल प्रेम चुकीच्या माणसासोबत झालं कि सगळं जग सारख अस चुकीचं वाटत. चूक कुणाची यापेक्षा त्यात चूक काय झाली याचा विचार करायला हवा. पण करत कोण ?  चूक, हा एकच शब्द त्या दोघांत ती दोघ एकमेकांना दोष देताना लादत राहतात. चूक केली त्याने किंवा तिने यापेक्षा हि चूक आहे का कोण तपासून बघत का ? तिने त्याच्यासोबत आपलं सगळं देऊन टाकावं ह्याने ते अगदी बिनधास्तपणे लुटाव. लुटलेल तीच ते अंग त्याच्या विचारांच्या कुठे तरी माग आणि दहा- पंधरा दिवस न धुतलेल्या बेडवरच्या बेडशीटवर अस धूळ खात राहत.त्याला बेडवरच्या बेडशीटवर बसून तात्पुरत आठवत राहत सगळं पण बेडशीट ते धुवायला गेलं आणि त्या जागी नवीन बेडशीट आलं कि विसरलं.... अगदी सगळंच.
तसच तिच्या जागी नवीन कोण आयुष्यात आलं कि त्याला नवीन अस प्रेम व्हायला होत. प्रेम एकदा होत अस म्हणतात. चूक. एकदम चूक. प्रेम खुपदा होत. कुणाशीहि होत, कितीही वेळा होत आणि विसरलं हि जात काही वेळा. त्यासाठी झालेलं सगळं प्रेम असत हि आणि नसत हि. पण तिच्यासाठी प्रेम हे प्रेमच असत. दुसर अस काहीच नसत. पुढची स्वप्न बघत बघत बेडवर त्याच्यासोबत जगत कधी या दोघांच्यात हा दुरावा येईल कोणती मुलगी असा विचार  करेल का  बर ? पण होत. झालं. होणारच असत. जुन आला कि पाऊस येतोच अस नाही. वातावरणातल्या बदलाने जून मध्ये हि ऊन असत पण जुलैत मात्र पाऊस येतोच. तसच खर प्रेम करून तिला त्याच तिच्या प्रेमापासून दूर व्हायचं असत ना. पण ती वहावत जाते. त्याच्यात त्याचाच जीव बनून. पण तिला कळत का नाही हे जग जिवंत असलं तरी त्यातल्या प्रत्येकाच मन आता भावनांनी बघता बेजीव झालंय. आणि अशा या बेजीव जीवावर खर प्रेम करून आयुष्य आणि भविष्य यांच्या सोबत  मिठी मारून त्याच्यासोबत प्रेम करत जगताना ती मिठी कुठेतरी सैल होते मग घट्ट पुन्हा सैल होते आणि मग ती मिठी सुटते. जेव्हा जीव घाबराघुबरा  होतो.प्रेमाच हि तसच होत ना....?

0 टिप्पण्या