लेखकलाख शब्दांचा विचार करून शेकडो शब्द वाक्यरूपी कागदावर उतरवून जेव्हा नट पडद्यावर एखाद वाक्य तोंडातून फेकतो. ते बघून लाखो लोक क्षणभर लाखो शब्द बनून टाळ्या वाजवत असतात. पण ते त्या नटासाठी तिथे तो लेखक कुणालाच माहित नसतो. उपऱ्यासारख दुसऱ्याची वाक्य स्वतःच्या नावावर खपवणारे हे नट, काय समजतील आपल जीव चोरीला गेल्याची व्यथा. लेखकाच ते लेखन त्यातले शब्द चोरीला जातात. अभिनय काय हा नाही तर दुसरा जसाच्या तसा उतरवतो. पण लेखकाची शैली त्यातले शब्द कोण उतरवून दाखवेल ? तरी देखील लेखकाचे शब्द हे कायम वाक्याचे भुकेलेल असतात. जो कुणी बोलायला तयार होतो त्याचे ते होऊन बसतात. स्वतःच्या मालकाला म्हणजे लेखकाला फसवून. आणि अशा वेळी शब्दांचा किंवा शब्दांनी लागत नसेल पण लेखकाचा शाप लागतो त्याच्या लिहिलेल्या शब्दांना आणि त्या शब्दांच्या वाक्यांना बोलणाऱ्या मालकाला.
तरी देखील हि शब्दांची चोरी होतेच. कारण चोरीला जाणारी गोष्ट लेखकाच्या मालकीची असते अस कुणाला वाटतच नाही. म्हणजे शब्द ह्याला मालकी नाहीच. कुणाचीच नाही मग हेच चोरलेले शब्द चोरून बढाले चित्रपट बनवताना त्या दिग्दर्शकाचे हे शब्द चक्क चाकर होऊन जातात आणि तो दिग्दर्शक त्यांचा मालक अस कस काय ?
चार मांदेल्या लोकांना आणून उगीच लेखकाला धाक दाखवायचा. एवढ्या किमतीची कथा एवढ्या तेवढ्यावारी विकत घेऊन आपल्या नावाने प्रसिध्द करायची. काय मिळत यातून त्यांना ? एक लेखक म्हणून मग मला अस म्हणाव वाटत कि, तुम्हाला घ्यायचीच आहे ना कथा तर घेऊन जा. ते हि फुकट. या शब्दांना मी हि माझ्या डायरीत इतके दिवस सांभाळूनच ठेवलेलं ते हि फुकट. त्या शब्दांना पैशाची भूक नाही. तुम्ही त्या शब्दांना एवढ्याश्या पैशाने भुलवलत आता त्यांना माझ्यापासून घेऊन जा. आणि तुम्ही हि चालते व्हा. कलेचा स्वस्तसा सौदा होण्याचे हे घर म्हणजे रंडी कोठा नाही. कि घासाघीस करून किंमत कमी होईल.
कुणीतरी १ | नक्की वाचा
लेखक म्हणून जगताना.. काय कराव लागत नाही ? एक पान लिहायला पण तितकाच विचार करावा लागतो आणि तितकाच वेळ चित्रपट लिहिताना लागतो. त्यात कित्येक शब्द कित्येक वाक्य असतात. पण ते सोडून समाज मोजणी करतो ते पानांच्या संख्येवरून.. मग शब्द आणि वाक्य त्याचं काय ? एखादा खलनायक लिहिताना लेखक आपल्या विचारात कित्येक चांगल्या वाक्यांच्या कत्तली करत फीरतो. नायक लिहिण्यासाठी तो किती शब्दंना, वाक्यांवर जीवापाड प्रेम करतो. नायिका लिहिताना पुरूषधर्म असलेला लेखक स्त्रीतत्व अगदी हळुवार पणे लिहितो. आपल्या शब्दांत आणि वाक्यात अदा, लकब आणून. कित्येक तास घालवतो विचारात लेखक. किती दुखः आनंद त्याच्या त्या शब्दात लपवून ठेवतो आणि तरी त्या कथेची किंमत पानांच्या संखेवरून करता ?
अरे खरतर कुठलाच नायक दिग्दर्शकामुळे मोठा होत नाही. आधी दिग्दर्शकाला मोठ व्हायला वाचन हव. आणि म्हणून मला असा वाटत लेखकाची कथा असते म्हणूनच दिग्दर्शक आणि तो नायक असतो आणि त्यांच्यावर प्रेम करणारे हे लोक असतात. देव काय नि लेखक काय दोघे सारखेच. देव असतो पण तो कुणालाच दिसत नाही. देव नसून पण तो जग चालवत असतो त्याचा आभास आजूबाजूला आपल्या असतो. आणि चित्रपटात लेखक कुठे दिसत नसला तरी त्याच्याच लेखणीने तो चालत असतो. बाकी माझ्यामुळे झाल म्हणणारे “बहुत देखे है..!”
या सगळ्या दुखःनंतर हि एक सल मनात असतेच. माणसाला ना कधी कधी काहीच बोलू वाटत नाही. कसला विचार करू वाटत नाही. ते तस वागू शकतात पण लेखकाच काय ? सतत कुठल्यातरी विचारात त्या विचारांच्या वाक्यात नि शब्दात बांधील असलेला लेखक त्याच काय होत असेल जेव्हा त्याच्या हि आयुष्यात असाच एक क्षण येत असेल. जेव्हा त्याला कसला विचार करू वाटत नसेल काही बोलू वाटत नसेल. कोण करत का विचार ?
इतर लोक काही काळासाठी शब्दांपासून लांब राहू शकतात पण लेखकाच तस नाही. माणसाला माणूस आपण असच म्हणत नाही. त्याच्याकडे प्राण्यापेक्षा काहीतरी वेगळ आहे. म्हणून आपण माणूस अस म्हणतो. लेखक हि असाच नसतो हो. त्याच्याकडचे ते शब्द नि वाक्य कुणाकडे नसतात म्हणून त्यांना लेखक अस बोलतात. पण मला आता वाटतय लेखकाला दिलेली “लेखक” हि पदवी नसून “हिणवलेला” शब्द असावा.
कुणीतरी ०२ | नक्की वाचा
देवाने प्रत्येकाच आयुष्य लिहील. प्रत्येकाच्या तस आयुष्यात सारखच घडत फक्त त्यातले टप्पे कमी-जास्त असतात. घटना वेगवेगळ्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी घडतात. प्रत्येकजण जन्माला येतो आणि मरतो सुध्दा. सगळ कस सारखच फक्त पद्धत वेगळी. जे देवाला सुध्दा लिहायला जमल नाही अस अफाट अचाट लेखक लिहून दाखवतो.. लेखक म्हणून जगताना असे बरेच प्रश्न पडतात मला. आणि त्याची उत्तर मला गप्प तोंडांकडून मिळतात. कारण इतक सगळ काय असेल लेखकाच्या मनात तर बोलणाऱ्याची वाचाच बसते. आणि मी बोललो तस, शब्द वाक्यांचे भुकेलेले असतात. माणूस आणि लेखक यांच्यात बोलणी रंगली तर शब्द अर्थातच लेखकाचे होऊन बसतात आणि माणूस निःशब्द होऊन जातो...


Copyrighted.
        


0 टिप्पण्या