आहे तो तरी.प्रिय,
मला सोडून गेलेला तो.

आहे तो तरी हि घालमेल का मनाला. विचारांच्या या गर्दीत मी हरवते स्वतःला. तो दिसतो-भासतो-असतो तरी का दूर वाटतो जरासा. मी म्हणते-जरा कण्हते तरी का शोधत नाही माझ्या मनाला ? शंका येतात दुरावण्याच्या खूप तरी दुरावा भासत नाही. कधी चादरीत असते गुडूप मी त्या उबित तू मात्र असत नाही. मग डोक्याची ऊशी छातीशी येते. डावीकडची कुशी उजवीकडे होते. या आणि कित्येक रात्री मी उगीच जागत असते. तू नसतो सोबत म्हणून उगीच एकट्यासारखी पडत-धडपडत वावरत असते. मग कधी रडत असते. कधी तुला आठवून हसत बसते. मग येतो आवाज मनातून... तू कुठे इथेच आहेस. मनात विचारात आहेच सोबत आठवणीत सुद्धा आहेस.
जेवण जात नाही. अंगी लागत नाही. पाणी प्यावं वाटत. पण ते जाऊन घ्याव वाटत नाही. केसांना मोकळ सोडू वाटत नाही. पण अस वाटत मी तुझ्यात गुंतले तर केसांना मोकळच सोडलेलं बर. कपड्याची निवड नाही. कशाची आवड नाही. मी जगते आता पण पुन्हा हे आयुष्य नको काही. मिळालेच तर मिळावे तुझे काही. पुन्हा मला दुरावा नाही. असाच विचार करत बसणे आता इतकेच उरले आहे.
आहे तो तरी.. मी माझ्या घरी. त्याच्या आठवणीत रमणे, दुसरे काही नाही. जग दुनिया सोडत नाही. बघणे बदलत नाही. तो असेल सोबत माझ्या तर भीती कसली नाही. मग पुन्हा येते पाणी. डोळ्यात जागा नाही. मी हसते माझी मलाच कारण, तो कुठे गेला नाही. मग येतो वारा पाऊस. प्रेम त्यात मिळत नाही. मग दार वाजते जोरात. सोबत विजा काही कमी नाही. मी एकटी असते घरात पण घाबरत सुद्धा नाही. दारात अंधार असला जरी. तुझ्याशिवाय तिथे कोण नाही.
(तू साधा नोकरीला जातो मी तुझ्या विरहात रोज अर्ध मेली होते. नोकरी सोडून दे तू माझ्यावर प्रेम कर. रोज रोज आणि फक्त माझ्यावर. तुझ्याशिवाय मला एकक्षण राहवत नाही. )

तुझीच
बायको. 😍

😘

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies