नियम : तळ्यात नाही टपात.
चला एकदाच गणपती विसर्जन झाल. लोकांच्या पापांच, झालेल्या प्रदूषणाच, दहा दिवस केलेल्या सजावटीच सगळ्या-सगळ्याच विसर्जन झाल फक्त एकाला सोडून. ते म्हणजे सरकारने लागू केलेले गणपती उत्सवातले नियम. त्याचं विसर्जन कधी होणार नाही. पुण्याच्या दगडूशेठ किंवा तुळशीबागेतल्या गणपतीसारख वर्षानुवर्षे आत आणि गणपतीत बाहेर येत राहणारे हे कायदे-नियम आहेत.
दरवर्षी काहीना काही नियम लागू करून मिळत काय या सरकारला ? रस्त्याला खड्डे पडतात म्हणून मांडव लाकडी कळकांचे नकोत. जसे कि वर्षभर रस्ते अगदी विमानाची धावपट्टी असते तसेच असतात. ते नाही बघणार कोण. लोकांना त्रास होतो म्हणून मोठाल्या स्पीकरवर दहा दिवस गाणी नकोत. गणपतीची उंची पंधराफुटापेक्षा मोठी नको. विसर्जनाला डी.जे.सिस्टीम नको. हे नको ते नको हाच सरकारचा कायदा. मग दुसर काय हव तर त्याचं त्यांनाच माहित नाही.
दरवर्षी मी गणपती मिरवणुकीला बाहेर पडत असतो. कालही गेलो. बोटावर मोजण्याइतकेच गणपती मोठे होते. बाकीचे सगळे दहा फुटाच्या आतले होते. काही गणपती मुर्त्यातर कायमस्वरूपी फायबरच्या बनवलेल्या होत्या. सरकारने कायदा काढला नवीन आणि तो पळत बसली हि जनता. साताऱ्यासारख्या राजधानी शहरात छोट्या रस्त्यांवर बसलेले मोठ्या मोठ्या आकाराचे गणपती काल लहान वाटले. असच वर्षानुवर्ष मुर्त्यांचे आकार लहान होत गेले तर सार्वजनिक गणपती निश्चितच एक दिवस तळ्यात मग हौदात आणि मग टपात विसर्जन करता येईल इतक्या कमी उंचीचे होतील आणि या उपर एक गोष्ट म्हणजे सार्वजनिक गणपती इतका छोटा झाल्यावर पण हे सरकार शांत बसणार नाही तर घरातले गणपती बसवायची रीत पण हाणून पाडतील आणि घरातल्या गणपतीसाठीचे नवीन कायदे-नियम काढतील.
गणपती उत्सव सगळ्यांसाठी आहे. त्यात ढोल-तशा, डी.जे., बेंजो असला म्हणून काही फरक पडत नाही. कारण तेच बघायला लोक एकत्र जमतात. टिळकांचा जमाना वेगळा होता. तेव्हा डी.जे. नव्हता. पण भारत स्वतंत्र हि नव्हता. इंग्रजांना घाबरवायला लोकांना एकत्र करण हा त्यामागचा हेतू होता. पण आता तर सगळ बदललं आहे. मग डी.जे. आणि बेंजोला बंदी का ? जितकी कमाई व्यापारांची महिन्याभरात होत नाही तितकी कमाई या दहा दिवसात आणि त्याहून जास्त शेवटच्या म्हणजे अनंतचतुर्थी दिवशी होते. मग अशा या सणात बंधन घालणार हे सरकार कोण ?
गणपतीला जिथे काही हरकत नाही तिथे सरकारच्या कायदे आणि नियमांचा मज्जाव का ? आणि एवढेच कायदे नियम नाचवायची आवड असेल तर मग बाकीचे सण आणि बाकीच्या धर्मातल्या-जातीतल्या सणांत हे कायदे नियम आपल शेपूट कुठ #$%* घालून बसतात ?
इतकच वाटत आजवर जपलेल्या या श्रद्धेला सणाला अस नियमबद्ध करत असताना त्याचा मूळ हेतू नष्ट होऊ नये. बाकी गणेशोत्सव खर तर आजवर आणि इथून पुढे हि जगत राहील तो म्हणजे मंडळांचे तरुण लहान वयस्कर कार्यकर्ते आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यामुळे. बाकी सगळे मानत जरी असले कायदे नियम तरी शिस्तीत मला काल मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलीस दिसले आणि बेशिस्त-धुंदीत सरकारचे कायदे दिसले. असो. पार तरी पडला हा सण.
बघू आता पुढच्या वर्षी कोणता नियम येतो.0 टिप्पण्या