रहस्य बेमतलब मृत्यूच | शिवाजी महाराज.

( image by google )

साडे सहा फुटाची राणी, काळीकुट आणि मऊ तलमासारखी…. पिळदार शरीर यष्टीची, दणकट आणि मालकासाठी हरदम तैयार म्हणजे झोप आराम विसरून कित्त्येक मैलांचं अंतर दिवस म्हणू नका आठवडे म्हणू नका कापत राहणारी. इतका आपल्या मालकाशी एकनिष्ठ असा हा घोडा माफ करा घोडी. आणि या बदल्यात राजशाही खाद्य. राज घोड्याची उपमा. आणि श्री.श्री.छ.शिवाजी महाराज साहेब याचं तिच्यावर असलेल निस्सीम प्रेम. अशा विना शब्दांच्या प्रेमात वाद कधी नसायचा. आणि त्या घोडीला बोलता येत नसल तरी या राजाचा तिला त्रास नसायचा. म्हणजे जेव्हा महाराजांनी हातात तलवार धरली त्याही आधी एक कुतुहूल म्हणून घोड्याची मारलेली रपेट तेही दादोजी कोंडदेव यांच्यासोबत आणि तिथून नंतर स्वतः घोडेबाजी शिकल्यापासून अखेरीच्या दक्षिण मोहिमे पर्यंत महाराजांचा घोडा काही सुटला नाही. अस म्हणतात जिथ प्रेम असेल तिथ दगडाचा ही देव होतो. आणि दगडात ही देव घडतो. मग इथ तर दोन जिवांच प्रेम होत. घोडी आणि महाराज. मग तिचा त्रास होईल का महाराज साहेबांना? हा झाला भावनिक प्रश्न पण विज्ञानाच्या दृष्टिन बघायला गेल तर घोड्यावर बसून युध्द करणारे सोळाव्या शतकाआधीपासून ते हजाराव्या शतका पर्यंत हर एक राजा घोड्यावरूनच प्रदेश फिरायचा शिकार करायचा आणि युध्द हि करायचा पण प्रत्येक राजाचा मृत्यू हा युद्धात, कोणाचा घातपाताने. जखमी अवस्थेमुळे, अतिरिक्त दारू-व्यसनामुळे आणि विषबाधा मुळे झालाय. शिवाजी महाराज मृत्यू रहस्य  पण गुडघादुखी या काल्पनिक आजारान कोणताच राजा काय पण साधा माणूसही मेला नाही. गुडग्याची वाटी जागची सरकेल, फुटेल, कालांतरान रद्द (कॅन्सर) ही होईल. पण गुडघादुखी हा रोग कसला आहे? आणि तीनशे वर्षापूर्वी शास्त्र प्रगत नसताना हा शोध लावला कुणी? याचाच अर्थ पुन्हा एकदा खोटा इतिहास आपण चघळत बसतोय. छत्रपती शिवाजी महाराज ३ एप्रिल १६८० ला निधन पावले. आणि इतिहास सांगतो. खूप काळ घोड्यावरून प्रवास केल्याने त्यांचे गुडगे निकामी झाले आणि गुडगेदुखी हा रोग झाला. त्याचे निदान हकीमाना न झाल्यामुळे महाराज निधन पावले. तर मग मला प्रश्न पडला की जर गुडगेदुखी हा रोग जर महाराजांना झालेला आणि तो हकीमाना बुवांना निदान नाही झाला. तर मग महाराज गेल्यावर काही बखरीत पत्रात गुडगेदुखी या दीर्घ आजाराने महाराज गेले अस का लिहील गेले? कोण इतका शहाणा होता ज्याला शोध लागला तोही महाराज गेल्यावर? शिवाजी महाराज मृत्यू षडयंत्र अख्या जगात फक्त महाराजांनाच कसा हा झाला रोग? हे षडयंत्र होत, अन त्यात ते सफल झाले, करणारे.  शिवाजी महाराज समाधी रायगड याच खर उत्तर आहे. महाराजांवर विषप्रयोग झाल्याचा अंदाज आहे. बर्याच इतिहासकारांना याचे मिळते जुळते पुरावे मिळाले असतील,आहे. पण सत्य बाहेर काढल तर लोकांना पटणार नाही. आणि पुन्हा उठेल जातीय वाद. यात काही जवळच्या म्हणजे अष्टप्रधान मंडळातील काही दोन तीन व्यक्तींनी मिळून हे षडयंत्र केले असणार. कारण नंतर च्या काळात संभाजी राजेंनी अष्टप्रधान मंडळात चाललेली हुल्लडबाजी उधळून लावली आहेत. पण पक्का पुरावा अजून नाही. कारण जो राजा आपल्या घरात राजाराम महाराजांचे लग्न थाटात लाऊन त्यांचा संसार सुरळीत करून देऊ शकतो. त्यानंतर दोन आठवडे काय तीन आठवडे राज्य कारभार बघत असताना. तो अचानक सकाळी मरण पावतो आणि दुपारपर्यंत स्वराज्यात बातमी पोचते कि राजे गेले…….. हे पटतय का तुम्हाला? एक विचार आणि शंका होती हि माझी.

0 टिप्पण्या