मी प्रेम शोधत होतो आणि मला तू मिळालीस. तुला बघितल त्या पहिल्या दिवसापासून किती स्वप्नांचा खच पडला माझ्या मनात. तू अशी असशील तर. तू तशी असशील तर. तू काय घातल तर सुंदर दिसशील ? कशाने तू खुश होशील ? कशाने तू माझ्यावर हक्काने रागावशील ? कस वागलो मी तर आवडेल तुला ? कस वागलो तर तू माझ्यावर शक घेशील. खूप-खूप विचार केला तुझा. खरतर तुला जाणून घेण इतक सहज सोप्प नाही. तरी माझ्या मनाने स्वतःच्याच मनाशी ठरवल कि तू कशी आहेस ते.
मग कशी आहेस तू ?
तू....तू खूप सुंदर दिसतेस. तसच तुझ मन असेल. म्हणजे मनमिळावू, समजूतदार, प्रेमळ. पण तस ते नाही. मला वाटल होत फेसबुकवर बोलतेस तसच प्रत्यक्ष पण गोड बोलत असशील. प्रत्यक्षात हि बोललीस पण काही काळच. नंतर फक्त वाद आणि वादच झाला आपल्यात. तो हि तुझ्यामुळे. आणि का तर सुंदर चेहऱ्यामागे तुझा असलेला संशयी स्वभाव. त्यात हि मी विचार केला. कि तू खूप समजूतदार आहेस. मला वेळ नसला अचानक काम काही आल तर तू किती वेळ माझी वाट बघत बसायचीस फेसबुकवर ऑनलाईन. कधी मला कॉल करन जमल नाही तर तू हि करायची नाहीस मला कॉल. किती समजून घेतलस तू मला. होना ? तरी म्हंटल जाऊदे विश्वास ठेवावा तुझ्यावर जास्त. किती जास्त ? माहित नाही. पण माझ्यापेक्षा आणि माझ्या आईपेक्षा पण जास्त ठेवला मी तुझ्यावर. पण तू काय केल ? विश्वास घात ? अजिंक्य म्हंटल कि भोसले आडनाव हवच नाहीतर नुस्त अजिंक्य म्हणून काय कळणार आहे कुणाला ? तसच साजेस काम केलस तू. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तो किती वेळ जपायचा, पोसायचा म्हणून त्याचा तू घात केला. तरी बर यातून हि मी तुझ्यावर प्रेम केल आणि मला काय मिळाल एकटेपणा ?
आता आठवल तरी हसायला येत मला. म्हणजे काय समजलो होतो मी तुला आणि तू काय निघालीस. तरी कधी कोणत रडक गाण ऐकू आल कुठून तर मला सगळ विसरायला होत आणि डोळ्यांसमोर तू येतेस. विचारात तू येतेस. मनात तुझ नाव येत. इतक माझ तुझ्यावर अजून हि प्रेम आहे. ते असुदे पण मला एक कळत नाही. मी लोकांना नाव ठेवायचो कि, लोक फसवतात-प्रेम नीट करत नाहीत. मी तर तुला माझ मानत होतो आणि तू त्या लोकांसारख का वागलीस ? असो. झाल ते झाल. मी तुला पूर्ण विसरलो. ( होतो )
पण काल गणपती बघायला बाहेर निघालो होतो. फुलाच्या गाड्यावरून दहा रुपयाची फुल घेतली. आणि हातात पिशवी घेऊन निघालो आल्या रस्त्याने. आणि समोरून तू हातात हात घेऊन कुणाचा माझ्याशेजारून गेलीस. ओळख आपली काही नसल्यासारखी दाखवून. आणि विसरलेलो तुला मी पुन्हा आता आठवायला लागलीयस. त्या आठवणींना उद्या गौरी गणपती सोबत विसर्जन करेन म्हणतो कुठे तरी विचारांच्या खोल नदीत. बघू जमत का मला.
0 Comments