गणपती : आणि त्यातले कायदे.

  ( image by google )


दरवर्षी लिहावास वाटत. पण मग अस वाटत कि जातीवाचक वाटेल हा लेख. खरतर जातीचा मी कोणत्या? कोणत्याच नाही. कलाकार माझी जात. कलाकाराला जात नसते असतो तो फक्त धर्म तो म्हणजे त्याची कला. आणि कलाधर्म करण एवढच या कलाकाराच काम.
वर्षभर केल्या जाणाऱ्या घोटाळ्यांना लपवल जात गणपतीत. पेट्रोल वाढो. दंगली होवोत. पाण्याचे प्रश्न असो किंवा भ्रष्टाचार-पाच-सहा असो. भ्रष्टाचारात होते आर्थिक हानी. सभा-संमेलनात होत ध्वनी प्रदूषण. निवडणुकी आधीचे रस्ते निवडणुकी नंतर अजून जास्त धसतात बहुदा नेत्यांच्या धास्तीने. निवडणुकी वेळी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात रात्ररात्र होणाऱ्या पार्ट्या आणि सोहळे तेव्हा वेळेच भान ठेवल जात नाही. प्रचार करताना, अजान-नमाजी पढताना होणारा सकाळ-दुपार-संध्याकाळचा आवाज तेव्हा गोड वाटतो. तर मग गणपती बसवताना त्याची उंची, स्पीकरचा आवाज, मंडपाची मांडणी, रस्त्यांना पडणारे खड्डे आणि देखाव्यांसाठी वेळेच बंधन कशाला ?
संपवायचेत ना मराठी लोक ? तर लोकांना संपवा त्यांच्यातली हि श्रद्धा तरी नको. हे जग विश्वासावर चालल आहे. आणि विश्वास येतो तो श्रद्धेपोटी. म्हणजे शरीर ठेवायचं तसच आणि मनाला मारून टाकायचं. अस काहीस सुरु आहे. सगळे लिखित कायदे गणपतीलाच कोर्टाला आठवतात. आणि हे सगळे कायदे आणि कलम फक्त गणपतीलाच पेपरमध्ये छापून येतात. इतर वेळी कुठ जातात हे कायदे आणि कलम ? गाडी चालवताना रोज लायसन आणि गाडीची कागदपत्र सोबत आणि लक्षात ठेवायची असतात. हा नियम आहे. आपण ठेवतो ही. आणि नाही ठेवल तर दंड पडतो. मग असेच हे कायदे पण वर्षभर लागू करा आणि हो सगळ्या जातीतल्या लोकांसाठी. शिव जयंती आली कि मिरवणुकीवर बंदी. नाहीतर त्याचे मार्ग कमी करायचे. स्पीकरला आवाजाच बंधन. का ? तोच जर डॉ. आंबेडकर किंवा अन्नभाऊ साठे यांची जयंती असली कि पार रस्ते जाम होईतोपर्यंत कार्यक्रम चालू करू द्यायचे. रमजान असली कि त्याचे भोंगे सुरु ठेवायचे. म्हणजे करायचं काय आहे ? हिंदू सण एकतर मानू द्या नाहीतर सरळ कॅलेंडर मधून काढून द्या. आधी गणपती म्हंटल कि महिनाभर आधीपासून घर साफसफाई चालायची. घरातल ते पवित्र वातावरण. प्रत्येक घरी गणपती असताना सुद्धा बाहेरचे मंडळांचे मोठाले गणपती बघण्याची उत्छुकता आता कुठ गेलीय सापडत नाही मला.
गणपती आणताना ढोल-ताशा-कच्छी वाजवत आणला जायचा आता त्याची जागा डॉल्बीने घेतली. पण म्हणून त्यांच्यावर बंदी ? उद्या ढोल ताशाला बंदी येईल. कमी कमी फुट-दर-फुट करत मंडळांचे गणपती फुटभर होतील. आणि घरातले तर दुर्मिळच होतील. साह्जीक आहे ना मंडळांचा मोठा हवा गणपती तुलनेने घरातला छोटा. किती कायदे ते. म्हणजे हे वकील म्हणा हे नेते म्हणा. वर्षभर जो काय अभ्यास करतात तो फक्त गणपतीसाठीच असतो कि काय अस मला कधी कधी वाटत. काय मिळत काय करून अस सगळ ? मराठी सोडून दुसऱ्या जातीच्या लोकांची मत ? पण त्या जातीचे लोक पण गणपतीत हिरीरीने भाग घेतात. कळेल का या सरकारला ? कालच वाचल मी. मुंबईचा प्रसिद्ध गणपती मंडळ “चिंचपोकळीचा चिंतामणी” त्याचं हे ९९ वे वर्ष आहे. आणि त्या गणपती मूर्तीच्या आगमनाला गर्दी झाली. आणि ती पोलिसांना आटोक्यात आणण अशक्य झाल. म्हणून मंडळाने ठरवल पुढच्या वर्षी गणपती मंडपातच बनवायचा. मी म्हणतो मग बनवायचाच कशाला आणि बनवला तर विसर्जनपण तिथच करा. उगीच पोलिसांना पण त्रास नको. आणि हे मराठी सण जास्तीचे जगायला हि नको. बाकी हा गणपती मनाविरुद्ध येऊन भेटतो आपल्याला हे तितकच खर आहे. आणि अजून जास्त काय त्याचा येण्याचा आणि आपल्याला भेटण्याचा पाढा काही जास्त वर्ष टिकणार नाहीये. आणि हे लोक टिकू देणार नाहीयेत.
मराठी सण संपवूनच हे लोक थांबतील. बाकी आपण आपल चालू द्यायचं. पोलीस दिसले साडे दहाला आसपास कि स्पीकर आणि देखावे बंद करायचे. तलाव छोटी म्हणून एक मूर्तीला पाच पाच वर्ष तसच पडून ठेवायचं. माणसाने काम करून कस तरी रात्रीच देखावे बघायला जायचं. दोन देखावे बघून होत नाही तोच देखाव्याची वेळ संपते. मग दहा दिवसात मोजके देखावे बघून बाकीचे फेसबुकवर लाईव्ह आलेत त्याचं बघत बसायचं नाहीतर नंतर फेसबुक इंस्टाग्रामवर पडलेल्या पोस्ट बघत बसायचं. गणपती आला याचा आनंद असतानाच त्याला निरोप द्यायचा आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे अस वेड्यासारखं मानून त्याला निरोप द्यायचा. जिथे श्रद्धा नाही अंधश्रद्धा आहे तिथे घरातला असो वा मंडळातला बाप्पा तो त्या मूर्तीत असेलच कसा ? माणसाने माणसासोबत आता मुर्त्यांवर हि कायदे लावले. माणस पाळत नाहीत कायदे पण त्या निर्जीव मुर्त्या मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो तसा हा कायदा पाळत राहतात. असो गणपती बाप्पा मोरया. जमल तर पृथ्वीची चक्र सुरु आहेत तोवर लवकर लवकर या.
  

0 टिप्पण्या