कल्पना, जी कधी आपल्या कल्पनेत हि येत नाही अशी कल्पना सत्यात बघण म्हणजे एक वेगळाच अनुभव म्हणायला हवा. उगीचच कोणता हि कलाकार इतका मोठा होत नाही. उगीचच त्याची कलाकृती अजरामर होत नाही. त्याने केली कलाकृती माणसांनी डोक्यावर घेतली कि नंतर ती हृदयापर्यंत जायचा प्रवास तसा खडतरच. आणि अशीच एक कलाकृती म्हणजे विल्यम शेकस्पिअरच एक अजरामर नाटक “हँम्लेट”. खरतर मी या आधी ऐकून होतो या नावाबद्दल. इंग्लिश आणि माझा लांब-लांबचा संबंध नाही. मी एक मराठी लेखक म्हणून कायम मराठी शब्दात वाक्यात वावरत, जगत असतो. त्याच माझ्या मराठी भाषेत सातासमुद्रापारहून आलेले आणि ते हि चारशे वर्ष जून म्हातारं म्हणता न येणार पण तितक तरण हि बोलता न येणार हे नाटक बघण्याचा मला योग आला.
अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती पुणे इथ मी हे तीन तसाच तीन अंकी नाटक बघितल ज्यात पंचवीस कलाकार होते. जो तो उत्तोमोत्तम नाट्याभिनय करून तिथ बसलेल्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांचं मन जिंकत होता. नाटकाला सुरुवात झाली. आणि राजा राणी आले. आणि सोबतच आला हँम्लेट, अर्थातच सुमित राघवन. त्यांनी जेव्हा बैठक मांडली तीही पायरीवर. आणि अशा विचारांच्या विश्वात रमून जाण्याची जी अभिनय क्रिया केली. माझ लक्ष मागचे सुरक्षारक्षक ते राजा राणी त्यांचा लुडबुड्या सेनापती कुणा-कुणाकड लक्ष गेल नाही. लक्ष खिळून राहील सुमित राघवन यांच्याकडे. कथा काय होती हे मी सांगणार नाही. तो हक्क हि मला नाही आणि मी सांगून पण तो बघण्यात जी मजा आहे ती वाचण्यात नाही.
दोन हजार अठरा मधून मी पुढच्या दहा मिनिटांनी सोळाव्या शतकात पोचलो. किल्ल्यावर पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांसोबत मी पण नकळत पहार देत होतो. राजा राणी यांच्या बोलण्यात मीही गुंतून गेलो. आणि “हँम्लेट” त्याने जे जगल, भोगल, सोसल, त्याच्या सोबतीन मीही जगल, सोसल, आणि भोगल. तो जेव्हा विचारात होता तेव्हा मी हि विचारत गढलो. तो जेव्हा रडला तेव्हा मी हि नकळत रडलो. त्याच्या मित्राशी तो बोलताना अस वाटत होत माझ्याशी पण त्यान बोलाव. लावलेल्या लाईटच्या प्रकाशासोबत कधी डोळ्यापुढ अंधारी यायची कळत नव्हत. जाणकार, नवखे अशा सगळ्या स्तरातले लोक हे नाटक बघायला आलेले. त्यातल्या त्यात तरूण मुल-मुली म्हणजे एकवीस ते तीस वयाची अशी सर्वात जास्त संख्येन तिथ होती. तीथ अंकाच्या सुरुवातीला सूचना देत होते शांतात राखा मोबाईल बंद ठेवा. पण कुर कुर असा वेफर्स खाण्याचा आवाज. कडकड बिसलेरी बाटल्यांचा आवाज. उगाचच मोठेपणा दाखवण्यासाठी लिनोव्हो, रेडमीला ठेवलेली आयफोनची रिंगटोन अधून मधून वाजतच होती. त्या कलाकारांना काय फरक पडत नव्हता. ते त्या नाटकात हरवून गेलेले. पण बघणारे मात्र अशा आवाजांनी क्षणभर त्या स्टेजवरून पुन्हा खुर्चीवर निघून येत होते. या उपर टीबी झाल्यासारखा एक सारखा चारी कोपऱ्यातून खोकण्याचा आवाज येत होता. अगदी मोठ्यान. देवाने दिलेले दोन हात फक्त एका हातात वडापाव, वेफर्स आणि दुसऱ्या हातात बिसलेरी धरायला दिलेत का ? ते हात खोकताना तोंडावर न ठेवता तो तेलकट वडापाव खाण्यात आणि दुसर्यांची मग्नता भंग करण्यात त्या लोकांना बर वाटत असाव. पण तरी त्याकडे दुर्लक्ष करत मी आणि माझ्यासारखे बाकीचे नाटक बघणारे नाटक लक्ष देऊन वाचत, बघत, ऐकत, आणि जगत होतो. आणि अशा सगळ्या हँम्लेटमय विश्वात माझ मन कधी माझ्या खुर्चीवरून स्टेजवर पोचल कळालच नाही. आणि जेव्हा कळाल तेव्हा पडदा पडला होता.
लेखक : अजिंक्य अरुण भोसले.
2 टिप्पण्या
Nice ..very wonderful
उत्तर द्याहटवाDhanywad
उत्तर द्याहटवा