काय सांगू तुला ?

breakup ladki girl love sex porn hurt broke heart touching
( image by google )


भावनिक मी होतो. साहजिक आहे. प्रेम एकदाच होत. खर खर. बाकीची नंतरची प्रेम काय असतात आणि त्याला काय म्हणतात मला कळत नाही. छक्के पंजे मला समजत नाहीत. मुलीच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन माझा इतरांसारखा नाही. मी तुला बघायचो तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरून नजर खाली कधी छातीकडे न्यायचो नाही. तुझे केस, तुझ कपाळ तिथून खालचे दोन काळेभोर डोळे आणि आणि गुलाबी फिकट ओठांच्या खाली बघण्यात मला काही रस वाटला नाही. तुझी छाती किती मोठी आणि नसेल मोठी तर छोटी का असले विचार करण्यात मी माझा वेळ घालवला नाही. प्रेम खर अस असत किंवा असाव अस मला तरी वाटत.
तुझा माझा सहवास. तुझ्या अंगाला आणि ड्रेसला येणारा त्या पावडरचा वास. दर शनिवारी नाहीतर रविवारी आणि कधी पिरेड आला कि त्याच्या पाचव्यादिवशी केस धुवायाचीस त्या शाम्पूचा वास. खूप आवडायचा मला. आणि आवडतो मला. कधी लिपबाम लावला तर ओठांना येणारा वास. आपण कुठे भेटायचो-बसायचो तिथ येणारा त्या तिखट, आंबट गोड ओल्या भेळेचा वास. मधूनच येणारा गाड्यांच्या धुराचा वास. आणि या वासात पण तुझा असणारा आणि मला आवडणारा तुझा सहवास अचानक संपेल अस वाटल नव्हत मला.

प्रत्येक भेटीला नवा उत्साह यायचा मला. आणि तू जाताना वाट बघायचो दुसऱ्या भेटीची. या भेटीत आणि नंतरच्या वाट बघण्यात कधी एक वर्ष उलटून गेल कळालच नाही. ती पाणीपुरी, ती ओळी भेळ, कधी अधीमधी मी तुला तु मला दिलेली कॅडबरी. गाडी असून पण चालत फिरलेलो ते सगळे रस्ते आज ओसाड वाटतात मला. सगळ आठवत मला.
कारण तो रस्ता रोजच तिथ असतो. रोज तिथून बरीच लोक जातात पण जो-तो आपल्या नादात असतो आणि त्या रस्त्याला लवकर संपवण्याचा प्रयत्न करत असतो. आपणच दोघ वेडे होतो कि, घरी लवकर जायचं नाही म्हणून हळू हळू मुंगी सारख त्यावरून चालत राहायचो. आठवण त्या रस्त्याला असेल आपली नक्की अजून. कधी गाडीत पेट्रोल नाही म्हणून तुला मी रिक्षाने घरापाशी सोडल. तेव्हा रिक्षाच्या पुढच्या आरशात बघायचो, रिक्षावाल्याच लक्ष नाही ना आणि पटकन तुझ्या गालाला कीस करायचो आणि लाजून जवळ येण्याऐवजी तू लांब व्हायचीस.

त्या गणपतीच्या देवळातल्या ब्राम्हणाला पण आपण माहित होतो. आणि माहित आहे. चुकून तिकड कधी जाऊ नकोस गेलीस जर का आणि त्यांनी विचारल कुठ गेला तुझा तो हिरो तर सांग हिरो आहे कामाला लागलाय. गणपतीच्या पेटीत टाकलेली तू दिलेली मला दहा रुपयाची नोट मी त्यावर आठवण म्हणून तुझ नाव लिहिलेलं. आठवतय न तुला ?
तुझा साखरपुडा झाला आणि मी हारून गेलो. आणि तू भेटू शकत नव्हतीस. मग एकच माझ्याकडे धडपड करण्याचा मार्ग होता. तो म्हणजे देवाकडे प्रार्थना कारायची मी ठरवल. गणपतीला त्या लाच द्यायला खिशात पैसे पण नव्हते. शेवटची ती पाकिटात तुझ नाव लिहिलेली नोट. जी तू मला दिलेली मी ती दानपेटीत टाकली. वाटल, त्या नोटेने गणपती पावेल मला. पण पावलाच नाही. नवस केला तो पूर्ण झाला नाही. इच्छा धरली मी मनात, अस म्हणतात आपण चांगला विचार केला तर तो नक्की अमलात येतो. मीही विचार सुरु केला उठता-बसता कि तुझ लग्न झाल नाही. आणि........
चांगलच झाल. माझ नाही तुझ. तुझ लग्न झाल माझ्यापेक्षा चांगल्या कमावणाऱ्या मुलाशी. त्याच्या गाडीत पेट्रोल असत कायम. त्याला रिक्षाची गरज नाही तुला घरी सोड्याला त्याचाकडे चारचाकी आहे. आणि ? आणि काय बोलू खूप आहे मनात पण ऐकायला पण तू नाहीस. मग बोलून मी करू काय ? आणि जरी कधी भेटलीस तरी हे मनातल प्रेम तुझ्यापुढ व्यक्त करू का खोट खोट हसून दाखवू आणि सांगू मी ठीक आहे ?


लेखक  :  अजिंक्य अरुण भोसले, 

3 टिप्पण्या