सपना का सपणा. 
( image by google )


सपना का सपणा.

विचार करण्याची गोष्ट आहे , पण तुम्ही विचार नका करु. कारण विचार करून काय फरक पडतो असा ? आज जस झाल तसच आणि तेच उद्या हि होईल. आणि परवा हि होईल. आणि मग परवा सगळे विसरून जातील आज आणि उद्या झालेलं.
“आई त्ये बग आगाशात इमान उडतय. बग ना आई... आई बग क्की.” सपना.
“मला आदि काम उरकू दे मग बगेन इमान तुज” आई.
“आग पर त्ये जात ना लगीच” सपना.
“कुट ?” आई.
“जातंय बग ते डाव्या बाजून येतय आणि पूर्वेकड जातंय.” सपना.
“व्ह्य का ?” आई.
“व्हय” सपना.
“कुट जात असल ग ?” आई.
“बाबांनी सांगितलेलं तिकड पूर्वेला मुंबई लागती आपल्या. म्हंजी ते मुंबईला ह्रात असल.” सपना.
दोघींचं विमान पुराण सुरु होत. आई हातातल काम टाकून विमान बघायला जाऊ शकत नाही म्हणून ती उगीच काहीबाही सपनाला विचारत होती. आणि जो विचार तीन कधी केला नव्हता अशी उत्तर सपना देत होती. कुणी विचारल सपनाला,
“बेटा तू मोठे पणी काय व्हणार ?”
“मी आगाशात इमान चालविण इतक मोठ होणार”
“का ?”
“माज्या बाबाच्या पायाची चप्पल बनलेली आई कधी मान वर करून पण जगू शकली नाही. जेव्हा बाबा मेला तेव्हा जगाने तिला घराबाहेर वर तोंड काढायची हिम्मत दिली न्हाई. जितक खालची जागा दाखवता यील, तितक माज्या आईला सगळ्यांनी त्रास दिलाय. एकट बघून कधी तिच्या माग माग चाल्लेत. मी सोबत असले तर मी लहान बघून आईला त्रास दिलाय. कितीदा तर आईला माज्या आईवरून शिव्या दिल्यात नि चिडवलंय. आईला आई म्हणायचं हे मला माज्या आईन शिकवलं पर जगाने मला शिकवलं आईला आणि कधी भविष्यात होणाऱ्या आईला आईघाले म्हणायच. मला नाहीत मी लहान आहे पण माज्या आईला आहे मोटी छाती. पण ती तिची तब्बेत आहे. पण लोकांना त्याच नवल वाटत कि हिचा नवरा नसताना हिची छाती एवढी मोठी कशी ? कोणाचा अजून हात लागतो का तिला. आणि लागतो तर अमी कुणाच घोड मारलाय ? आम्हीपण ट्राय मारणार अस करत रात्रीची दुपारची दार वाजवलीत आमच्या घराची. समद ध्यानात आहे माज्या. भांडी घासायला बसली आई तर साडी गुढग्या पाऊतर घेतली तर लोक छातीवरून मांडीवर अशी नजर फिरवतात कि वाटत प्रत्यक्षात ती आईला माज्या हात लाऊन अनुभव घेत्यात. कुणी कुणी येत दाराशी. तुझ मोकळ कपाळ नाही चांगल दिसत मी भरतो कुंकू माज्या नावच तुज्या पोरीला माज मानून करतो तुज्याशी लग्न अस म्हणत्यात पण त्याना साथ नसती द्यायची. आई म्हणते त्यांना आईच भरलेल बेवारशी शरीर हव तर असत रांड बनवायला, आन सोबत मी हि हवी असते. त्ये बोकडाच छोट्या पिल्लाच मटन खातात लोक खायला मजा येती म्हणून तस शरीराची मजा मारायला तरण शरीर भेटल तर एका रात्रीत फडशा पडतात अशी लोक अस आई म्हणत होती.म्हणून मला आईची मान वर करून जगात तीच नाव मोठ करायचंय.” सपना.
“लयच कळत ग तुला यातल,वय कितीय तुज? आणि येवड्या बडा बडा बाता करती तू मालूम हे क्या तुझे बलात्कार ? म्हणजी काय असत ?”
“मी आहे कि आता तेरा वर्षाची. मानली तर मुलगी आणि उपाशी लोकांसाठी मी बाई. ज्याला स्वताचा पुरुशपणा दाखवता येत नाही न चारचौघात ते दाखवतात घरी पलंगावर. आणि बायको नि बी साथ न्हाई दिली तर अशा माझ्यासारख्या मुलीना जंगलात घेऊन करतात बलात्कार.आणि मग स्वताची हौस फिटली कि टाकतात मारून बिचार्यांना.”
“खूप मोटी व्हशील तू सपने. लय मोटे इचार हायत तुझे. लिहून ठेव एक दिस तूच आईला इमानात घालून नेशील फिरायला.तेव्हा आठवल तुला कि या फराण काकांनी तुला आशीर्वाद दिलेला”
“काका, वर आगाशात जायला आदि जमिनीला तर सोडाव लागत. आणि जमिनीपासून वर जायला चार लोकांनी आधार द्यावा लागतोय. इथ आहे का मानसिकता लोकांची. इथ हर एक जण टपून बसलेला असतोय हात लावायला अंगाला. आणि ती काय मला वर धरणार. आणि मी जरी वर जायचा प्रयत्न केला तर मांडीत हात घालून मला जखमी करून नाही मला सोडणार ते वर. इमान पण येतंय ते कुटून डावीकडन पूर्वेकड. ते थोडीच माज्या दारात थांबणार हाय ? आणि लोक माज्या आईला जस बगतात तस मला मला बी बगतात त्याच काय ? माज्या इचारांच तुमाला कौतीक वाटल पण बाकीच्यांना माझी सुटणारी छाती मांडीचा आकार खुब्याचा घेर आणि मासिक पाळीच्या दिवसाची खबर असतीय. मी न्हाई उडू शकणार वर कारण माझ्या मांड्यांच्या मदी पुरुशासारख लिंग नाही. छाती माझी चपटी नाही. मी न्हाई उडू शकणार,काका.” सपना.
“अस काही नाही बेटा सगळे असे नसतात”
“सगळे असे नसतात ठ्यीके पण म्हणून अस नाही कि सगळीच चांगली बी असतात. फक्त काही पावलं उचलतात वाईट वागायला आणि काही ती आग पेटवत ठेवतात आपल्या मनात.” सपना.
“हे अगदी बराबर बोल्ली तू सपना मेरी मान शरम से नीचे जारी हे कित्ति बोलती तू अच्छा”
“शरीरानी ठ्यिक असून बी अधू आहे आमी. कारण पुरुशाची ताकद हातात असली तरी तो बाईच्या मांडीत घुसला कि बाईची ताकद समदी संपती. मी जाते आत. मी कदी वर न्हाई उडू शकत. काका तुमचा आशीर्वाद तुमालाच घ्या कि परत.”
“ऐसा नाही लेते वापीस आशीर्वाद”
“मग आशीर्वाद द्या सगळ्यांना तुमी कि बाईच्या वर आणि त्यांच्या खाली बाईला न झोपवता तिच्या पाठीशी राहा म्हणाव. छाती न योनी काय धा मिनिटा साठी लागती या जगाला.पण धा मिनिटा नंतर ????” सपना.

काल्पनिक लेख .
लेखक : अजिंक्य अरुण भोसले.

1 टिप्पण्या