In a relationship with RADHIKA. | इंट्रो

( image by google )


अजिंक्य : हाय
राधिका : बोल.
अजिंक्य : काय करतेस ?
राधिका : काही नाही. बसलेय.
अजिंक्य : बर. कशी आहेस ?
राधिका : मी मस्त आणि तू ?
अजिंक्य : मी कायम मस्त असतो.
राधिका : चांगल आहे. तू काय करतोस ?
अजिंक्य : काही नाही. मी कवी आहे.
राधिका : ओह. मस्तच.
अजिंक्य : हम. तुला आवडते का ?
राधिका : काय ?
अजिंक्य : कविता ?
राधिका : हो. पण माझ्यासाठी कुणीच बनवली नाही.
अजिंक्य : का ? बॉयफ्रेंड नाही का तुला ?
राधिका : नाही.
अजिंक्य : काहीही हा. तुझ्या सारख्या सुंदर मुलीला बॉयफ्रेंड नाही शक्य नाही.
राधिका : नाहीये.
अजिंक्य : बर. एक मिनिट हा.
राधिका : काय झाल ?
अजिंक्य : ........
राधिका : ओये ? काय झाल ?
अजिंक्य : हा बोल.
राधिका : अजिंक्य , काय झाल ?
अजिंक्य : काही नाही. तुझ प्रोफाईल चेक केल.
राधिका : होका ? मग मला रिक़्वेस्ट का पाठवलीस.
अजिंक्य : का म्हणजे असच.
राधिका : असच म्हणजे ? म्हणजे नुसता माझा फोटो बघून का ?
अजिंक्य : हो.
राधिका : तू पण तसलाच आहेस.
अजिंक्य : तसलाच म्हणजे ?
राधिका : मुल फोटो बघूनच रिक़्वेस्ट पाठवतात मुलींना. तू पण तसलाच.
अजिंक्य : ए मी तसला नाही. आणि मी तुला बघितल आहे या आधी पण.
राधिका : खर ? कुठ बघितलस ?
अजिंक्य : अंमम.... आठवत नाही पण मी तुला बघितल आहे हे फिक्स आहे.
राधिका : कुठ बघितल आहेस पण ते तरी सांग.
अजिंक्य : नाही न आठवत. पण बघीतल आहे मी तुला.
राधिका : बर तुला आठवल कि सांग.
अजिंक्य : काय सांगू ?
राधिका : मला कुठ बघितल आहेस ते. पण मी तुला बघितल नाही.
अजिंक्य : होका बर झाला.
राधिका : का बर झाल ?
अजिंक्य : असच.
राधिका : आआआ... सांग न.
अजिंक्य : आग खरच काही नाही. मला सांग न तुला खरच बॉयफ्रेंड नाही ?
राधिका : नाहीये रे.
अजिंक्य : मग तुझ स्टेट्स “इन अ रिलेशन” अस का आहे ?
राधिका : असच.
अजिंक्य : असच कस ?
राधिका : अरे तुझ्यासारखे असतात न फोटो बघून रिक़्वेस्ट पाठवणारे म्हणून ठेवलंय ते स्टेट्स.
अजिंक्य : बर. पण मी इतरांसारखा नाही.
राधिका : होका बर. मग कसा आहेस.
अजिंक्य : कळेल मी खूप चांगला आहे.
राधिका : होका. बघू पुढे.
अजिंक्य : पुढे का आत्ता एवढ्या बोलण्यात काही चुकीच बोललो आहे का मी ?
राधिका : नाही. अजून तरी.
अजिंक्य : हा मग ?
राधिका : मग काय ?
अजिंक्य : वाटतोय का मी तुला चुकीचा ?
राधिका : नाही. म्हणून तर तुझ्याशी बोलतेय न मी इतका वेळ
अजिंक्य : हा... बोल मग.
राधिका : काय.
अजिंक्य : काहीही.
दोघांच बोलन चालू असत. दोघांच पहिलच फेसबुकवरच बोलण काही वेळा पुरत होणार होत. पण का कुणास ठाऊक बोलन चालूच राहील. खूप वेळ. आणि पहिल्या दिवशी तीन तासाच्या बोलण्यानंतर दुसर्या दिवसापासून दोघ एकमेकांना वेळ देऊ लागले. अख्खा दिवस. काय होईल पुढे दोघांच्यात जाणून घ्यायचं आहे ? लवकरच नवीन कथा ब्लॉगवर सुरु.......


लेखक : अजिंक्य अरुण भोसले.

0 टिप्पण्या