नवीन लहर.


 
( image by google )
सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात रोज एकेक लहरी जन्मास येत आहेत. त्यातलीच एक नवीन लहर आहे, ती म्हणजे “मॉर्निंग वॉक”. त्यातल्या त्यात स्त्रियांच्यात वाढत चाललेल्या या लहरीची एक वेगळीच गोष्ट आहे. पोट सुटल. आता कुणाच सुटत नाही. कॉलेज शिकणाऱ्या मुलींपासून वृद्धांपर्यंत सगळ्याचं सुटलेलं असत. आणि ते पोट आहे. बांधून ठेवायचं साधन नाही ना. आहे मोकळ तर सुटणारच. पण म्हणून रस्त्याने चालणाऱ्या मुलीकडे बघून तीन मुलाच्या आईने म्हणायचं माझ पोट सुटल आहे बाई. कमी केल पाहिजे हे बोलन कितपत ठीक आहे ? शारीरिकदृष्ट्या फिट असण गैर नाही पण आपली कुणाशी किंवा कुणाची आपल्याशी तुलना करण किती बरोबर आहे ?
पुरुषांच्या मानाने खूप जास्त हि सकाळी फिरायला जायची लहर स्त्रियांच्यात आहे. आता या फिरण्याच्या लहरीत पण खूप लहरी आहेत. फिरायला जायचं. ते ही सकाळी. रस्त्यावरून. बागेत नको तिथ खूप लोक असतात. रस्त्याने जायचं का तर तिथ कमी लोक असतात. आणि  जास्त लांब नाही घराच्या आसपासच फिरायला जायचं का तर कुणी ओळखीच्याने बघाव म्हणून ( बहुतेक ). आता उठल्यावर केस विंचरून तोंडावर पाणी मारून घेतल तरी चेहरा नीटच दिसतो. आणि मला तरी वाटत कि माणूस अंघोळ झाल्यावर कित्त्येक क्रीम तोंडावर थापून जितका चांगला दिसतो त्यापेक्षा तो उठल्या उठल्या चांगला दिसतो. हा नियम स्त्रियांसाठी हि आहे. पण नाही. केस विंचरून त्याची एक एक बट विंचरून त्यांना निट बांधून ठेवायचं का तर लोकांनी म्हणायला नको झोपेतून उठून आलीय का हि. आता सकाळी अंघोळ करून कोण फिरायला जात ?
बर दुसरी लहर हि कि आधी पहाटे फिरणाऱ्या बायका गाऊन वर हि फिरायला जात. नंतर गाऊन आणि त्यावर ओढणी घेऊन चालायची पद्धत सुरु झाली आणि आता ? खूप जास्त बायका लवकर उठतात आणि आपल्यासाठी नाही पण दुसरीसाठी मुद्दामून नवर्याच्या मग लागून खास मॉर्निंग वॉकचे कपडे घेऊन घालतात. ज्या बायका सकाळी पाणी भरायला उठायच्या नाहीत सहाला त्या आता पाचला उताहत हा बदल हि लक्षणीय वाटतो मला. इतर वेळी समारंभाला मध्यम उंचीची हिल्सची चप्पल घालून गेल तर घरी आल्यावर “ आई...ग” म्हणत कंबरेला धरून ओरडणाऱ्या बायका. चारी बाजूने बंदिस्त आणि उंच हिल्सच्या बुटांना घालतात. आणि वर भरीस भर छोटे घोट्याएवढे सॉक्स हि घालतात. लहर हि सुद्धा आहे कि चालताना नुस्त चालायचं नाही तर कानात हेडफोन घालून मोबाईल मधली गाणी ऐकायची.
एरवी घरात काम करत असताना साधा रेडीओ ऐकणाऱ्या याच बायका कधी कधी “दृष्ट लागण्या जोगे सारे” “ दिस जातील दिस येतील” आणि आत्ताच “सैराट झाल जी” अशी गाणी ऐकताना आता फिरायला जाताना कळत नसताना “शेप ऑफ यु” “देस्पसितो” अशी इंग्लिश, स्पानिश गाणी आवडीने ऐकतात ? म्हणजे फक्त संगीत शब्द कळत नाहीत त्यातले.  तर अशी हि एक लहर असते कि खाली खिसा दिला असताना हि तो मोबाईल हातात पकडूनच पळत किंवा चालत राहायचं. कुणी वाटेत भेटल तर बोलत बसायचं. अगदीच गाण्याचा कंटाळा आला तर कुणालातरी कॉल लाऊन चालत राहायचं. आणि सगळ फिरून झाल कि घरी येऊन ग्रीन टी प्यायची आणि न जाने काय काय प्यायचं-खायचं. आणि अशा बायकांना साडीत पंजाबी ड्रेस मध्ये बघणारे आजूबाजूचे पुरुष आणि विशेषतः शाळेतले कॉलेज मधली मुल सकाळी उठवत नसताना हि फिरायला बाहेर पडतात आणि टी-शर्ट मधल्या त्या स्त्रीला न्याहाळत बसतात. हि लहर चुकीची नाही. पण ती लहर आत्मसात करून वावरण्याची आणि कृतीची पद्धत मला चुकीची वाटते. पण बघून दुर्लक्ष करण इतकच जमत मला. आणि अस हि हल्ली मी ही सकाळचा फिरायला जात आहे. “तिच्यासोबत”. आणि रस्त्याने जाताना जे मला दिसत ते जरा विचित्र वाटत. बस इतकच.लेखक : अजिंक्य अरुण भोसले.

0 टिप्पण्या