दप्तर.

( image by google )


 
 संध्याकाळचे पावणे सात वाजले आहेत. सगळे आपापल्या घरी जाण्याच्या घाईत आहेत. रस्त्यांवर गाड्यांची एकमाग रीघ आणि बाजूला फुटपाथवर लोकांची वाट काढून चालण्याची लगबग. सूर्य कधीचाच विझला आहे. चंद्र येईल असही वाटत नाही. कारण पाणी शिंपडाव कुणीतरी इतका हलका पाऊस पडतोय. पण कुणाच्या डोक्यावर उघडलेली छत्री दिसत नाहीये. रस्ता भिजलाय. आणि रोज कोरडा रस्ता आज अरशासारखा चमकतोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानांतल्या प्रकाशाचे प्रतिबिंब त्यात उमटलेल दिसतय. गारवा तर सगळीकडेच पसरला आहे. पण या सगळ्या घाई-गडबडीत जीव घाबरा-घुबरा होतोय. ज्याच त्याच लक्ष कुणाशी बोलण्यात, कुणाशी मोबाईलवर बोलण्यात. कुठ दुकानाच्या बाहेर लावलेल्या साडी-ड्रेसला बघण्यात. कुणा मुलीच दुसऱ्या मुलीच्या ड्रेस आणि सिल्की केसांकडे लक्ष आहे. लक्ष तर मुलाचं हि आहे कुणा मुलीकडे. आणि मुलीही कमी नाहीत त्याही बघत आहेत त्यांच्या तोलामोलाच्या मुलांकडे. आणि मी ? 
मी बघत होतो फुटपाथवर तारेने बांधलेल्या प्लास्टिकच्या पिवळ्या कागदखाली बसून दप्तर विकणाऱ्या दोन मुलांना. साहजिकच दुकानात हजार, बाराशेला मिळणारी दप्तर इथे चारशे, पाचशे आणि सहाशेला मिळत होती. आणि म्हणून लोकांची इथ गर्दी उडालेली. विविध रंगी दप्तरातून आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणत दप्तर शोभेल या विचारातून जो तो आपल्या ऐपतीनुसार दप्तर निवडत होता. शाळा आता सुरु झालीय. काहींची व्हायचीय. पण सगळ्या शालोपयोगी वस्तूंच्या दुकानात लोकांनी कल्ला माजवला आहे.

मी बघितल जाऊन दप्तर चांगली होती. किमतीच्या मानाने जाड कापडाची होती. एवढे केवढे पैसे मोजून सुद्धा लोक खात्री करत होती आणि विचारत होती कि दप्तर टिकेल कि नाही ? ती मुल हि निरागसपणे सांगत होती कि, “काही होणार नाही काय झाल तर परत आणा, बदलून देऊ”. दप्तर काय लगेच फाटणार थोडीच आहे ? आणि फाटलं तरी ती दोघ तिथ थोडीच वर्षभर विकत बसणार आहेत ? जास्तिक जास्त अजून दोन दिवस बसतील माल संपला कि निघून जातील. हा विचार त्या लोकांना हि येत असेल आणि हे त्या मुलांना हि माहित असेल. पण तरी व्यवहारात खात्री देण महत्तम समजून दोघांच काम सुरु होत. घेणारे घेत होते. आणि ती दोघ खात्री देत होते.
पण ज्या दप्तराला विकत घेऊन वर्षभर त्यात वह्या, पुस्तक, कंपासपेटी, पाण्याची बाटली, डबा ( डबा पण कारण डब्याची पिशवी घ्यायची पद्धत आता गेलीय. कारण लाज वाटते आता मुलांना. आणि मुळात डबा नेणारी मुल कमी आहेत. बाहेरचे पुडे खाऊन हि मुले पुढे जात आहेत. आयांना त्यांच्या वेळ नसतो ना डबा बनवायला म्हणून ) तर इतक सगळ दोन तीन किलोच वजन ज्या दप्तरात घेऊन हि मुल शिकणार होती. ती दप्तर विकणारी दोन मुल दोघांसाठी एक एक दप्तर विकत घ्यायला हि इतकी दप्तर विकत होती. काय बोलाव समजत नाही.


लेखक : अजिंक्य अरुण भोसले. 

0 टिप्पण्या