WARNING..!

ब्लॉगवरील कोणतेही लेख कॉपी पेस्ट करून स्वतःच्या नावाने शेअर करू नये तसेच कोणतीही कथा किंवा त्यातले प्रसंग वा संवाद कोणत्याहि वेब मालिकेत, फिल्ममध्ये विनापरवाना वापरू नये तसे आढळल्यास 5,000,00 रुपयापर्यंतचा दंड कायदेशीररित्या भरावा लागेल,आणि/किंवा तीन वर्ष कैद होऊ शकते.

किती केविलवाणा मी.
अंजली आणि अमेय किमान ३ दिवसांनी भेटले होते. जागा ठरलेली खरतर कॅफेत भेटायचं पण तीन साफ नकार दिला. मग ते दोघ मुळशी धरणापाशी भेटले. दोघांच्या घरापासून असेल अंतर अगदी ३०/४० मिनिटाच पण एकत्र न येत तो त्याच्या पल्सर वरून आणि ती पी.एम.पी.एम.एल. ने आली.
वाऱ्यान विस्कटलेली अमेयची केस आणि त्यावर घातलेला भडक नीळा गोगल . ती पंजाबी ड्रेस घालून आलेली नीळा. बोलायला विषय मिळेना.म्हणून तीनच त्याच्या केसात हात फिरवून भांग पाडला. कसा रे तू एकदा आरशात तरी बघत जा .. अस म्हणाली.
" कुणाला दाखवायचय का ? तुलाच तर भेटायला आलोय न तुला आता मी कोण कसा काय आहे सगळच माहितीय मग कशाला.? त्यान तिला उत्तर दिल. मग खुश होऊन ती अजून जवळ सरकते. तो तिला बाजूला करतो. ती त्याच्याकडे बघते तो तिला कॅडबरी देते.
दोघांच बोलन सुरु होत. ३ ला भर उन्हाच आलेले दोघ त्यांच्या मागून किती तरी जोडपी निघून गेली पण हि दोघ ६ पर्यंत तिथच. जरा बोलता बोलता त्याच्या लक्षात आल अंधार पडत चाललाय. तो तिला निघूया म्हणतो कारण तिला बस न जायचं होत जायला उशीर नको म्हणून तो उठतो. ती हात वर करते तो हात तिचा पकडून उठवतो. खिशातून गाडीची  चावी काढताना त्याला चोकलेट सापडत तो तिला देतो. ती अमेयच्या जवळ जाऊन अर्ध चोकलेट दातान फोडून खाते. आणि अर्ध उष्ट त्याला देते. तोही खातो.
दोघ चालू लागतात.
ती : ऐक न मला सोड न घराच्या अलीकड.
तो ; खर???
ती : हो प्लीज खूप इच्छा होतीय तुज्या मग बसायची पुण्यातले रस्ते बस च्या खिडकीतून न बघता तुज्या सोबत तुज्याशी बोलत तुझ्या बाईक वरून बघायची. तो आनंदान पुढ पावलं टाकत जातो. आणि गाडी घेऊन फास्ट तिच्या जवळ येऊन  कचकन ब्रेक दाबतो. ती बसते. दोघ जातात.
घराजवळ पोचल्यावर ती उतरते.
ती त्याला बाय म्हणते तो तिला लव्ह यु म्हणतो ती हसते. ती माघारी फिरते. आणि तो विचारतो तुला काम होती मग आज ३ दिवसांनी तू मला का भेटलीस. न भेटायचं कारण हि तू सांगितल नाहीस.
ती : माझ लग्न ठरलय. परवा साखरपुडा आहे. आणि त्याच्यापासून नजर चोरून घराकड निघून जाते.
त्याच हृदय थंड पडत  आणि गाडीच इंजिन हि.
 तो किक मारतो स्टार्टर मारतो पण गाडी सुरु होत नाही.
तो तिथच  गाडी लावतो आणि सिगरेट काढून पेटवतो आणि एक कश मारतो.  आणि तो आठवू लागतो आजचा दिवस आणि ती पण सगळ धूसर होत काही आठवत नाही त्याला. फक्त एकच आठवत.
#लग्न_ठरलंय_माझ.


लेखक : अजिंक्य अरुण भोसले.

0 Comments