ऐकतेस का ?


मी प्रेम शोधत होतो आणि मला तू मिळालीस. किती त्या स्वप्नांचा खच पडला माझ्या मनात त्या पहिल्या दिवसापासून. मग विचार सुरु झाले माझे, तू अशी असशील तर ? तू तशी असशील तर ? तू काय घातलस तर सुंदर दिसशील ? तू काय घातलस तर हॉट दिसशील ? कशाने तू खुश होशील ? कशाने तू रागावशील ? कसा वागलो मी तर आवडेल तुला ? कसा वागलो मी तर तू माझ्यावर शक घेशील ? खूप विचार केला तुझा.
खरतर तुला जाणून घेण इतक सह्जसोप्प नाही. तरी मनानेच ठरवल माझ्या तू कशी असशील. मग मी विचार केला आणि मला जाणवल ,
तू.... तू खूप सुंदर दिसतेस. तसच तुझ मन हि असेल. म्हणजे मन मिळाऊ, समजूतदार, प्रेमळ पण ते तस नाहीये. मला वाटल तू फेसबुकवर बोलतेस तसच प्रत्यक्ष पण गोड बोलत असशील . प्रत्यक्ष हि बोललीस पण काही काळच. नंतर वाद आणि वादच झाला आपल्यात तो हि तुझ्यामुळे. आणि का तर तुझा असलेला संशयी स्वभाव. त्यात हि मी विचार केला कि, तू खूप समजूतदार आहेस. मला वेळ नसला, अचानक काम आल तर तू किती वेळ वाट बघत बसायचीस फेसबुक मेसेंजर वर. कधी मला कॉल करायला जमल नाही तर तू हि करायची नाहीस. किती समजून घेतलस न मला ? तरी म्हंटल जाऊ दे ठेवावा विश्वास तुझ्यावर सगळ्यात जास्त. माझ्या आईपेक्षा किंवा स्वतः पेक्षा जास्त मी तुझ्यावर विश्वास ठेवला. पण तू काय केल ? विश्वास घात.
अजिंक्य म्हंटल कि भोसले आडनाव हवच, नाहीतर नुसत अजिंक्य म्हणून काय कळणार आहे कि कोणता अजिंक्य ? तसच साजेस तू काम केले. विश्वास ठेवला मी पण तो किती काळ जपायचा, पोसायचा म्हणून तू त्यात घात मिळवलास. तरी बर यातून मी तुझ्यावर प्रेम केल आणि मला काय मिळाल बदल्यात ? एकटेपणा.
आता आठवल तरी हसायला येत कि , मी काय समजलो तुला आणि काय होतीस तू. आणि तरीही कोणत अर्जित सिंगच रडक गाण ऐकू आल मला तर कोण आणि काही आठवत नाही माझ्या डोळ्यासमोर येतेस फक्त तू. का ते अजून मात्र माहित नाही ?
दुसऱ्याच्या बाबतीत जो विचार केला त्या उलट तुझ्याबाबतीत मी विचार केला. पण केलस काय तू ? तुही तसच वागलीस दुसऱ्यांसारखी. का ?


लेखक : अजिंक्य अरुण भोसले.

Post a Comment

0 Comments

close