किल्ले रायगड.

किल्ले रायगड ( भाग २ )

तर माझा डोंगर सर करण सुरु होत. आणि ८०/९० पायऱ्या झाल्या कि पायरीच्या बाजूला कुठ सरबत ताक पाणी विकल जात होत. पण एका टप्प्यावर पोचलो तिथ मोठाला दगड होता मोठा म्हणजे खूपच मोठा होता आणि त्यच्या खाली पोखरल होत. तिथ हि एकान दुकान थाटल होत पण आत्ता तिथ मोकळ होत सगळ फक्त चार खांब अन कापड दिसत होत. तर तस लांब लांब पर्यंत कोण नव्हत वर गेलेली वरच फिरत होते १/२ तास आणि त्यामुळे खाली उतरणारे क्वचित येत. आणि खालून वर येणारे हि तसे तुरळकच. आणि माझ्या सोबत हि कोण नव्हत म्हणून मी शांत थकून उन्हाच पायऱ्या चढत होतो. आणि मी त्या दगडापाशी आलो आणि डोक सुन्न झाल. एक मुलगा आणि एक मुलगी त्याबंद दुकानाच्या आडोशात झोपले होते ( एकमेकांच्या अंगावर ) आणि माझी चाहूल लागताच उठून जस काय झालच नाही अस उठून बाजूला झाले. आणि लाज शरम मलाच वाटली त्यांना नाही. मी तिथ थांबून उपयोग नाही म्हणून पुढ  निघालो. आणि ती दोघ पुढ गेलेली पुन्हा माघारी येऊन चाळे करू लागले.आणि तीन तिचा कुर्ता काढला. आणि त्यान त्याचा शर्ट.पवित्र रायगडला निसर्गातल भव्य लॉज बनवलं होत ( मानल ) त्यांनी .मग जरा पुढ गेलो आणि पायवाटेवर दोन दगडावर बसून चुंबन करत असलेल जोडप दिसल.एक मुलगा एका मोठ्या दगडावर आपल आणि त्या मुलीच नाव लिहित बसला. मला बघताच दोघ उठून निघून गेली. पण मला राग आला. डोक सुन्न झाल. आणि वाईट हि वाटल. जिथ एवढा अवाढव्य किल्ला बांधून आदरणीय.हिरोजींनी फक्त आपल नाव लिहील छोट्या पायरीवर तिथ आज हि पोर प्रेमाची निशाणी बनवतात. जिथ राजेंनी राज्य केल. जिथ त्यांना अग्नी दिली अशा अति पवित्र स्थळावर हि आजची मुल प्रणय क्रिया करतात काय म्हणायचं याला.? चुक करतोय आपण अस  नाही का वाटत अशा देशद्रोह्यांना  सांगा तुम्हीच मला ...........काय शिक्षा द्यावी अशांना ?सांगा.

किल्ले रायगड ( भाग ३ )

काल सांगितल तस तिथला पायरीवरचा प्रणय आणि प्रेमाचे अश्लील चाळे बघून मी अखेरीस वर गडावर पोचलो. रायगडाच्या महाद्वारापाशी जाऊन तिकीट काढल आणि आत गेलो. मग पुढेच काही वेळात मला दोन तोफांची तोंड जमिनीवर दिसली. मी लागलीच त्यांचे फोटो काढले. आणि मग त्या तोफ तोंडानं जवळून हात लाऊन बघितल, आणि खाली वाकून त्या तोंडात बघितल तर एका तोंडात दिसली बिसलेरीची गुंडाळून आत ठुसलेली बाटली आणि दुसर्या तोंडात हिरा ( गुटखा ) ची दोन तीन कागद होती.( ती काढली मी ) मी वर  गेलो मग पुढे. वर जाताना मला काही मुल दिसली. शाळेतली. सहल आलेली त्यांची औरंगाबाद मधून वेरूळ गावातून. ती वयान लहान म्हणजे ९ वीत होती. अंगात रग पायात ताकद आणि एकसारखी " शिवाजी महाराज कि जय " अशी आरोळी होती. मझ्या पुढे ती मुल कधीच निघून गेली. आणि मागून त्यांचे येणारे दोन शिक्षक दिसले त्यांच्याशी ओळख काढून मी त्यांच्यासोबत वर चालत राहिलो त्यांना बराच रायगडचा इतिहास माहित आहे अस मला त्यांच्याशी बोलून जाणवलं. आणि साहजिकच शिक्षक म्हणाल्यावर माहिती तर असणारच न ?
आणि मग मी पाहिलं महाराज साहेबांच्या समाधीकड जान पसंत केल. कारण ते माझ आराध्य देवतेच मंदिर होत. मी दर्शन घेऊन मग दरबाराकड वळलो. आणि ती मुल आणि शिक्षक माझ्या आधीच दरबारात गेले होते.
मी दरबारात प्रवेश केला. आणि तिथली लोकांची गर्दी बघून क्षणभर हरवलो. मी राजेंच्या राज्याभिषेकाला हजार झलोय अस मला वाटल. आणि मी माझ्या नकळत राजेना शोधू लागलो. पण माझ इतक नशीब नाही. मला राजे जिवंत भेटले नाहीत . हा पण मला त्यांचा अप्रतिम पुतळा दिसला. मी माझ्या चालण्याचा वेग वाढवून पुढ गेलो. पण तिथ वर जाता येत नव्हत. लाकडी बांबू टाकून रस्ता बंद केला होता. पण मी दर्शन घेतल. तिथ एक रखवालदार बसलेला. ( लक्ष ठेवायला ) पण मी तिथ २० एक मिनिट होतो पण बाबान एक क्षण हि वर तोंड केल नाही. एक सारखा टक लाऊन हिंदी चित्रपट तो बघत होता. बर. मी माघारी निघणार तर मला दिसल सिंहासनाच्या मागे जायला रस्ता होता . मी माग गेलो आणि कोपर्यावर जाऊन आकाशात सूर्य सांडावा तसा सूर्य फिस्कटला होता सहा वाजायला आलेले म्हणून. थंडीच लवकर मावळत. मग मी माघारी त्या वाळलेल्या पांढऱ्या पिवळ्या गवतातून वाट काढत चालू लागलो आणि पुन्हा मला एक खूप मोठा धक्का मिळाला. ज्या सिंहासनावर राजे बसलेले राज्याभिषेकाला त्याच्या मागे एक भिंत होती. आणि त्याच भिंतीच्या मागच्या बाजूला या शाळेतून आलेली  शाळेची मुल एका ओळीत १५/२० जन त्या पवित्र भिंतीवर लघवी करत होते. मी पुढ बोललो त्यांना ओरडलो तेव्हा ते निघून गेली. तेवढ्यात ते दोन जाणकार शिक्षक तिथ आले . मला वाटल तेही बोलतील त्यांना , पण त्यांनी मझ्याकड बघितल आणि पाठ फिरवून ते सुद्धा लघवी करू लागले. मी त्यांना म्हणटल तिकड जावा सर. तर मलाच रागाने बोलले. का शिवाजीला नव्हती का लागत ते पण करतच असतील कि कुठ तरी इथ आणि मनात इतका राग आला असा वाटल कापून टाकाव त्यांना पण मनाला अवर घालून पुढ आलो आणि राजेंच्या पुतळ्याकड निराशेने बघून नमस्कार केला आणि मी माघारी निघालो.....ज्या भिंतीवर कधी काळी राजेंच्या अंगावर पडलेल सात नद्यांच पाणी सांडल असेल त्याच भिंतीच्या माग  लघवीचे पिवळसर डाग पडलेले आहेत.. किती ते दुर्दैव ......
मी काही करू शकलो नाही मी एकटा होता राजे मला माफ करा ( जमल तर )

आता यापुढे नाही लिहू शकत. किल्ले रायगड लेख इथेच संपवतो.

0 टिप्पण्या