आर्टीझा 
( silent man image by google )
या जगाची वेगळीच रीत आहे. इथल्या काही गोष्टी पटणाऱ्या काही खटकणाऱ्या आहेत. इथे जग चालत ते विश्वासावर. विश्वास नाही ना बसत ? आता जग पैशावर चालत अस आपण ऐकतो ज्याच्या त्याच्या तोंडून पण नाही. जग हे पैशावर नाही विश्वासावर चालल आहे. दोन उद्योग धंदे एकमेकांच्या मालावर अवलंबून असतात. त्या धंद्यांचे मालक नोकर वर्गावर अवलंबून असतात. आणि कामगार अवलंबून असतात मिळणाऱ्या पगारावर. पण अवलंबून म्हणजे इथ प्रत्येकजणाला विश्वास आहे कि कामाच्या बदल्यात विश्वास दाखवला तर विश्वासच मिळेल आणि आपला उद्योग चालू राहील.
इथे विश्वास माणसाचा, माणसापेक्षा देवावर जास्त आहे. असा देव जो कधी कुणी बघितला नाही पण तरी तो असतो प्रत्येकाच्यात असा आपला भ्रम आहे. प्रत्येकाच्यात बर का... म्हणजे चोर असो वा बलात्कारी, गुंड असो वा सभ्य नागरिक प्रत्येकाच्यात देव असतो. स्त्रीत सोडून. कारण बघा ना आपल्याला काय हव असल, किंवा मिळाला नाही काही, तरच आपण वेळ काढून देवळात जातो पाया पडतो जवळ खूप पैसे असले तरी एक दोन रुपयाच नाण दानपेटीत टाकून देवाला दान देतो आणि बदल्यात काम होऊदे  मी हे देईन ते देईन अस बोलून त्याला फूस लावतो. म्हणजे काय तर फसवतो आपण देवाला. पुजारी देवाच्या पूजेखाली हजारोंची संपत्ती कमवतात. एका जागेवर बसून. जितका बिल गेट्स, अंबानी कष्ट करून कमवत नाही तितकी श्रीमंत हि दगडाच्या मुर्त्यांची मंदिर श्रीमंत आहे. तर मी म्हणत होतो कि आपण देवाला फसवतो. त्याच्या नावाची शप्पथा घेतो. त्याच्या नावाची अंधश्रद्धा पसरवून देवाला बदनाम करतो, का  ? तर तो दगडातून बाहेर येऊ शकत नाही. तस आहे कि जर स्त्री मध्ये देव आहे अस मानल तर तिच्यासोबत सेक्स कसा करता येईल आणि तो नाही मिळाला तर बलत्कार कसा करता येईल ? म्हणून देव आहे प्रत्येकात माणूस आणि प्राणीमात्रात अस म्हणतात पण त्यातून स्त्रीला मात्र वगळतात.
माझ दुखः मोठ मानून जगणारा इथला प्रत्येक माणूस विचारांनी किती छोटा आहे हे तो सतत दाखवून देतो. एका विशिष्ट पट्टीतल आयुष्य आखल आहे आपल निसर्गाने. प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार प्रमाणात सारख्याच गोष्टी घडतात पण जो तो इतरांच दुखः कमी समजून स्वताला अगदी सिकंदरच समजतो ज्याने जगाला जिंकल तस आपण आपल्या दुखांना पार केल्याचा आव आणतात.
मी आहे. अस म्हणतात इथून पुढचे किती क्षण आपण आहे जिवंत, कुणाला माहित आहे ? कुणालाच नाही. बऱ्याच लोकांना मी बोलताना ऐकलय , ते का ? अहो कालच तर मला भेटले होते. काहीबाही सांगत होते हे करणार ते करणार आणि काय झाल हे ? दुसऱ्याच अप्रूप वाटत मग आपण काय अमरत्वाचा पट्टा घेऊन आलोय का इथ ?
नंतरची गोष्ट म्हणजे जाती वाद. तू मराठा का ? मी महार आहे . तू ब्राम्हण आणि मी माळी आहे. मुस्लीम असशील तू आणि मी ही मग धनगर आहे. माणूस म्हणून जगायची एकाला अक्कल नाही. प्राण्यांना मारून मटन-मटन करत जनावरांसारख खाणारे आपण , साध आपल्याला माणूस म्हणून जगता येत नाही. सतत हिंसा, राग, लोभ, मत्सर, सूडबुद्धी याच्या विळख्यात अडकलेलो आपण. आणि या उपर स्त्रीच्या शरीरासाठी आसुसलेलो आपण माणूस म्हणून आपल्याला जगता येत नाही. आणि बाता करायच्या मी या जातीचा आणि मी त्या जातीचा.
आणि राहिला प्रश्न महापुरुषांचा.
ते मोठे झाले कारण त्यांनी काम तस केल आहे. आणि आपण करतो काय ? त्याचं नाव अजून मोठ करायला आपण वाटून घेतलेल्या सबंध जातीला खाली खाली पुरत नेतोय. यातून होणार काय आहे ? माहित आहे का ?
माणुसकीचा विरस आणि लवकरच जगाचा अंत.


लेखक : अजिंक्य अरुण भोसले.      

1 टिप्पण्या