सुखाचा शोध कुणाला नाही ? सुख कुणाला नको आहे ? असे पर्ष्ण आपण कुणाला विचारले तर उत्तर कुणाकडून मिळणार तर नाहीच उलट हसतील आपल्यावर. हा जन्मच झालाय आपला सुख मिळवायला. वस्तूचा मोह, शरीर सुखाची ओढ, पैशाची चटक या आणि अशा कित्येक गोशित्न्चा असलेला हव्यास आणि त्या मिळवून कमवून त्यातून मिळणार सुख या व्यतिरिक्त कुठ असत सुख ?
![]() |
( bhangarwala image by google ) |
मी लक्ष दिल नाही त्याच्याकडे आणि पुढ निघालो. समोरून त्याच्याच वयाचा एक मुलगा दुचाकी घेऊन उतराने जोरात गेला. काय झाल काहीच नाही. माझ लक्ष गेल त्या भंगारवाल्या मुलाकडे. तो गाडीवरच्या मुलाला बघतो. त्याच्या डोळ्यात एक स्वप्न चमकताना दिसल. कारण स्वप्न बघणाऱ्यातला मीही एक आहे. त्यामुळे ज्याच जळत त्यालाच काळात तस. आपल्याला जे हव असत पण मिळत नाही त्याचा त्रास ज्याला होतो त्यालाच पुढच्याची इच्छा आणि त्यामागचा त्रास समजू शकतो दिसू शकतो. मला दिसल त्याच स्वप्न अगदी स्पष्ट चमकताना. पण ते चमकणार स्वप्न डोळ्यातल पाणी होण्या आधी त्यान ते डोळ्यातच लपवलं आणि वडिलांना हाक मारली. तो भंगारवाला हात झाडत त्याच्या जवळ गेला.
त्या गाडीवरून गेलेल्या मुलाची स्थिती आणि परिस्थिती चांगली होती. तो चालवत असलेली गाडी त्याला त्याच्या बाबांनी दिलेली. आणि त्यात तो सुखी दिसत होता. आणि आत्ता या मुलाची परिस्थिती नव्हती, आपल्या बाबाची गाडी नाही गाडा आहे याच त्याला वाईट वाटल असेल क्षणभर.
तो मुलगा बाबाने दिलेली आयती गाडी रस्त्याने सुसाट उताराने चालवत गेला. आणि स्वतच दुख विसरून जवळ येणाऱ्या बाबाला त्या मुलाने सांगितल मी चालतो बाबा गाडा आणि त्याने चाकाटली काठी काढली. आणि जोर लाऊन गदा ढकलला. त्य मुलाने उताराने गाडी जोरात पळवली. आणि या मुलाने पूर्ण ताकद लाऊन वर गाडा ढकलला. हे असत सुख आहे त्यात सुख बघण. सुख दोन्ही मुलांकड होत. एक सुख आई बापाने उपर दिलेलं. आणि एकाने आपल्या बुद्धीने ते कमावल होत. आहे त्यात सुख शोधणाऱ्याच सुख माहितीय कधी संपत नाही आणि आयात मिळालेल्यांच सुख कधीच त्यांना पुरत नाही...
लेखक : अजिंक्य अरुण भोसले.
0 टिप्पण्या