विचारेन म्हणते पण.....( A WOMEN image by google )

कस असत ना. प्रेम म्हंटल कि डोळ्यासमोर चित्र येत एक जोडप. त्याला प्रेमी युगुल पण म्हणू शकतो. प्रेम करतो मुलगा मुलीवर सर्वात जास्त. काटकसर करतो तो जास्त मुलीसाठी स्वताच्या आयुष्यात. स्वतःची ऐपत असताना-नसताना तो हव ते देण्याचा प्रयत्न करतो आपल्या प्रियसिला. मोठमोठाली तिने कधी न बघितलेली स्वप्न तोच दाखवतो पहिल्यांदा तिला. जग विसरायला भाग पडतो तोच तिला. स्वतःच वीर्य हि देतो तिला. शरीराला स्वतःच्या त्रास देऊन. मग प्रेम कधी असू शकत नाही का मुलीच जास्त मुलावर ? ती नाही का देऊ शकत त्याला साथ त्याला हवी तशी ? प्रत्येक स्पर्श त्याला हवा असतो तो मुलीचाच असतो ना ? पुरुषाला थोडीच पुरुषाचा स्पर्श आवडणार आहे. ती नाही का सगळ सोडून येत स्वतच घरदार त्याच्यासाठी. निट चांगल्या घरात राहणारी ती भाड्याच्या घरात राहणाऱ्या मुलाकडे हि तितक्याच प्रेमाने येते आणि राहते आणि दोघांचा संसार थाटते कि जर तीच मोठ्या घरात लग्न झाल असत तर तिथ आरामात राहून तिने हेच केल असत पण करते न ती तडजोड. पुरुष फक्त फक्त वीर्य देतो ती काहीच नाही का देत ? तीही वागवते ना जीव एक पोटात जो नंतर हि तीच सांभाळते आणि जन्माआधी हि. तरीपण मुलाचं प्रेम खर आणि खूप जास्त असत अस प्रत्येकाला वाटत. प्रियसीच लग्न झाल तर मरायला होत मुलाला. मग विचार हा पण करावा ना कि मुलीने काय कराव जिने त्याच्या सोबत स्वप्न रंगवून त्याच्या सोबत काही दिवसाला रात्र बनवून खाटेवर वाटून घेतल्या आहेत. स्त्री शेवटी म्हणतात तशी उपरीच. आज ह्याची उद्या त्याची. प्रेम तिने कुणाशीही करो लग्न तर दुसऱ्याशीच कराव लागत. मग विचार का करत नाही कोण जिने स्वतच आयुष्य ज्याच्या भारोशी सजवायला सुरुवात केलेली त्या सजवलेल्या आयुष्याला कोणी दुसराच प्रत्येक रात्री लुटणार आहे काय होत असेल तिला आघात तिच्या मनावर ? प्रेम फक्त हरवत पुरुषाचाच ? स्त्रीच काय असत मग ?
तिने पहिलं प्रेम विसरून लग्न केल दुसऱ्याशी म्हणून गावभर तिला बदनाम करणारा तिचा प्रियकर , कुठ जात त्याच प्रेम ? जेव्हा तो प्रेमात असताना तिला वचन देतो मी तुझ रक्षण करेन , तुझी बदनामी होऊ आणि कुणाला करू देणार नाही, तुला जपेन तुझी काळजी करेन मग तिने लग्न केल दुसऱ्याशी ( दबावाखाली ) तर वचन तुटत का ? इतक स्वस्त आहे का वचन ? आणि इतक स्वस्त वचन असेल तर मग या प्रेमाची किंमत किती ? आणि किंमत केली तर सरसकट करणार का ? कि मुलीच प्रेम म्हणून कवडीमोल आणि मुलाच प्रेम हिऱ्या इतक मौलिक असा दुजाभाव करणार ?
मान्य आहे प्रेमात विरह हा असतोच. त्याचा त्रास जितका पुरुषाला होतो त्याहून जास्त स्त्रीला होतोच. बाकी माझ प्रेम खर आहे , खूप आहे असे म्हणणारेच कितीदा मी दुसरी सोबत प्रेमाचे चाळे करताना बघितले आहेत. आणि त्या स्त्रीला केलेल्या नवरऱ्याने स्पर्श ती अगदी जबरदस्ती समजून झेलताना मी बघितले आहेत. कोणी कमी जास्त नाही या प्रेमात फक्त म्हणन माझ आहे कि स्त्रीला जिथे तिथे कमीपणा दाखवून पुरुष मोठा होऊ शकत नाही. आणि आपण तिला हिणवल म्हणून तिची स्थिती कमी दर्जाची होऊ शकत नाही.
आणि प्रेमाच तर बोलूच नका. जितक खर खूप निस्सीम प्रेम कोण करत असेल या जगात तर ती फक्त स्त्रीच आहे. आणि हे प्रेम माया करायला शिकवणारी कोण आहे या पुरुष वर्गाला ?  आई म्हणजेच एक पवित्र स्त्री...

Copyrighted@2020

0 टिप्पण्या

सर्वात जुने