मी आणि माझ मत

( myself image by google )आपल्या वेगळेपणाची जाणीव करून देण हि जगाची रीत आहे. आणि या जगाची रीत आपण शिकायला गेलो तर पदरी येते निराशा. जगाच्या आवडी नुसार आपण जगायचं मात्र आपल्या मर्जी विरुध्द कुणी वागल आणि ती चूक किंवा एक समज म्हणा किंवा सल्ला म्हणून आपण सांगायला गेल तरी पुढची व्यक्ती आपल्यापासून दुरावते.आपल्याला चुकीच समजते. का ? कशासाठी ? माहित नाही. आणि या जगाच्या रितीत अशा किती अगण्य गोष्टींचा साठ आहे आपण विचार हि करू शकत नाही. मग अशात आपण करायचं काय ? दुसर्यांना समजवायचं कि आपण बदलायचं स्वतःला ? कि द्यायचा विचार सोडून या जगाच्या रहाट गाडग्याचा.
कित्येक भिन्न चेहऱ्याचे लोक इथ वावरतात. एकवेळेस चेहरे सारखे दिसतील पण त्यांचे स्वभाव आणि विचार एकसारखे असण-मिळण अशक्य. अ-श-क्य-च. कुणाला कुणाचे विचार पटत असतील हि किंवा पटल्याचा आव आणत असतील हि. पण काय मिळत यातून ? अर्धवट अपुऱ्या इच्छा मागण्यांची पूर्तता. माणूस म्हणून जगताना एका विचाराची माणस मिळण महाकठीण. मग ती व्यक्ती कोणत्याही नात्यातली असू.
आता बघा एक पात्र आहे मी. मी या लेखात ठाम आहेच पुढची पात्र फक्त बदलून बघू.
मी आणि आई.
मी बोलेल त्याला होकार. मी चुकेन तिथे तिचा नकार कायम असतोच. मी मागेल त्या गोष्टीत मोडता पाय शक्यतो कमी घालणारी फक्त आईच असते. अस म्हणतात सगळ्यात जास्त आपल्याला समजणारी आईच असते. पण तरी हि काही काही गोष्टी बरोबर असून पण त्या आईला मान्य नसतात किंवा आपल मत चुकीच असून आपण त्याला खर बरोबर मानतो आणि म्हणून आई आपल्याला विरोध करते हे आपल्याला समजून घेता येत नाही. पण काही का असेना आपल्याला आपली आई आणि तिचे विचार पटत नाहीत. कधी कधी.
मी आणि वडील.
जगातलं सगळ ज्ञान वडिलांना असत. मग ते वडील शिकलेले असो वा अशिक्षित. पण असते माहिती त्यांना सगळी. अगदी मी सिगरेट ओढून आलो आणि वर तोंडाचा वास घालवायला चिंगम खाऊन आलो तरी वडील शेजारी आले तरी त्यांना हाताच्या वासावरून समजत कि मी सिगरेट ओढलीय. घरी कोण नसताना गर्लफ्रेंडला घरी आणल तरी आईआधी वडिलांनाच कळत जर त्यांनी कधी बेडवरच बेडशीट बदलल तर.  अशा संशयी वडिलांचं अस संशयी वागण आणि सतत मला धाक दाखवण मला आवडत नाही.
मी आणि माझी पहिली गर्लफ्रेंड.
तिला काळा रंग आवडतो आणि मला निळा पण जाऊदे लांबून दोन्ही सारखेच दिसतात अस मानून मी तिला माझा आवडता रंग काळाच आहे सांगून तीच मन जिंकतो. अशा कित्येक थापा मारून मी तीच मन जिंकतो.
पण कधी तिने प्रश्न विचारले , माझ्यावर बंधन घातली तर नाही आवडत मला ती आणि तिचे विचार.
मी आणि माझी दुसरी गर्लफ्रेंड.
पहिल्या गर्लफ्रेंड वरून सतत टोमणे मारून तिला मी भेटतो का ? तिच्याशी बोलतो का ? हे बघण्यासाठी दे एक सेल्फी काढते तुझ्या मोबाईलचा कॅमेरा चांगला आहे म्हणून माझा मोबाईल ताब्यात घेते आणि कॉल लॉग चेक करते. इनबॉक्स चेक करते . मला नाही आवडत हा तिचा स्वभाव. आणि ती सुद्धा. पण गरज आहे माझी. मानसिक आणि शारीरिक.
मी आणि माझी बायको.
सतत माझ्या आयुष्यात या ना त्या कारणाने ढवळा-ढवळ करत असते. मला उपदेश, आदेश देत असते. मी बरोबर किती या पेक्षा मी चुकतो किती यावर तीच लक्ष असत. आणि बायको म्हणून तिने मला समजून घ्याव हि अपेक्षा असते. पण तीच हि काही चूक नाही कारण तीही माझ्यासारखीच या चक्रातून फिरून आलेली असते. तरी सुद्धा कधी आमच भांडण झालच तर मला तिचा स्वभाव, बोलण आवडत नाही. आणि कधी कधी ती सुद्धा.
मी आणि मी.
मी स्वतःला समजावत नाही. मी स्वतःला बदलवत नाही. कारण मला कायम वाटत मी ठीक आहे. पण अस मुळीच नाही. जग मला त्याच्या मर्जीने बदलत असत आणि मी नाही बदललो त्यांच्या मर्जीने वागलो तर मला ते सोडून जातात धोका देतात हा माझा समज आहे. पण प्रत्यक्षात जगाचा सोडाच मी माझ्या घरातच जगाची हि रीत पाळत असतो अगदी काटेकोरपणे......

लेखक : अजिंक्य अरुण भोसले. 

0 टिप्पण्या