पिया-प्रेम करत असताना,

बरच काही होत असत. प्रेम काहीच न बघता, काहीच न ठरवता होतं. प्रेमात जसे पुढे पुढे दिवस सरत असतात तसे सुरुवातीला सारख्या वाटणाऱ्या आवडी निवडीतला फरक हि मग स्पष्ट दिसू लागतो. जाणवू लागतो. तेव्हाच खरे आपण एकमेकांना ओळखू लागतो. प्रेमात असताना प्रत्येक क्षण सोबत असण्याचा विचार मनाला सुख देत असतो. पण तरी स्वतःच्या रोजच्या कामात जमत नाही भेटण, मेसेजवर जास्त-जास्त बोलन, व्हिडीओ कॉल करून समोर बघण, पण तरी जेव्हा-केव्हा पण उसंत मिळते तो एक क्षण आराम करण्याऐवजी चेहरा एकदा स्वतःचा माझ्या नजरेने बघून ती मला कॉल करते. ती जवळ येण्याची, सोबत राहण्याची ओढ सतत मनात असली तरी एकसलग कॉल मेसेज करून पुरी होऊ शकत नाही. पण कामातून वेळ मिळेल तसा एक एक मिनिट सोबत राहण्याची धडपड तिची कायम असते. आणि मला ती दिसते.

प्रेम म्हणजे फक्त आय लव्ह यु म्हणन नसत. तर एकमेकांना समजून घेऊन एकमेकांसाठी जगण असत. एकमेकांच्या आठवणीत झुरणं, एकमेकांना चिडवण, एकमेकांना तारीफ करून फुलवण, एकमेकांना आठवत राहून आठवणी सांगून रडवण. प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहण. आणि कित्येक स्वप्न अलग आहेत म्हणून दोघांच्या मनाशी मिळती-जुळती स्वप्न आधी पूर करणं म्हणजे पण प्रेमच आहे ना?

सुरुवातीला तिच्या आवडी निवडी सांगताना तिच्या आवाजात जितका जोर असतो तितकीच शांतता माझ्या आवडी ऐकताना तिच्यात असते. प्रत्येक माझी गोष्ट ऐकून ती सगळ काही लक्षात ठेवते. एक वेळेस गुगल असिस्टंट माफी मागून पुन्हा मला माझ्याबद्दलच्या गोष्टी विचारेल पण ती,,,ती एक हि गोष्ट विसरत नाही. इतक सगळ लक्षात ठेवून ती वावरत असते सगळ विसरल्यासारखी. आणि जेव्हा जेव्हा वेळ येते मला ती आठवण करून देत असते. आणि मग स्वतःची आवड बाजूला करून मला काय आवडत याचा विचार मनात करून नेमक तस वागत राहण्याची सवय ती तिला लावून घेते. कित्येक गोष्टीना ती सहज डोळ्यांआड करते. सहज कित्येक गोष्टींसाठी कष्ट घेऊन ती मला आनंद देत असते. कित्येक सारे विचार ती विसरून फक्त माझा विचार करत असते. कित्येक गोष्टींचा त्याग करून ती मला कोणत्याच गोष्टीसाठी त्याग करावा लागणार नाही याची काळजी घेत असते. खूप प्रेम करून पण मनात तसच साठवून ठेवते. खूप काही बोलायचं असून देखील माझ फक्त ऐकत असते.

प्रत्येक मुलगी हि, बहुदा अशीच असते. जिला प्रेम हव असत मनासारखं पण प्रेमात पडल्यावर ती त्याला हव तसच प्रेम करत असते. त्याच्या आवडी जपत असते. त्याचे कौतुक करत असते. त्याला प्रेम देत असते. आणि त्याला आवडेल अस वागून स्वतःत बदल करत असते. स्वार्थसाठी बदलणाऱ्या लोकांच्या दुनियेत ती फक्त माझ्यासाठी इतक्या वर्षांच्या असलेल्या सवयी ती बदलते. खर प्रेम म्हणजे काय असा विचार केला तर मग जाणवत कि खर प्रेम म्हणजे, जे ती माझ्यावर करते.  

 copyrighted@2021अकरा वाजलेले. पुढच्या पाच मिनिटांनी तिच्या खोलीतली लाईट बंद होणार होती. आणि पूर्ण घरातलीच. झोपायची वेळ झालेली. त्याचे मेसेज सुरूच होते. तिचे उत्तर देन सुरूच होत. त्या दोघांसाठी पुढचे पाच मिनिट पण पाच तासासारखे झालेले. तो उतावीळ झालेला. ती श्वास ताब्यात ठेवून होती. हातांची थरकाप मेसेजमधले शब्द अर्थवट शैलीत पाठवत होते. आई खोलीत आली तिच्या आणि लाईट घालवून गेली. जाताना दाराऐवजी असलेला मधला पडदा ओढून निघून गेली. तसे मेसेज थांबले. सरळ झोपलेली ती एका कुशीवर झाली. त्याने तिला व्हिडीओ कॉल केला. कॉल तसा साधाच होता सुरुवतीला तरी. तो लख्ख प्रकशात होता. आणि हि पूर्ण अंधारात. हिने स्क्रीनचा ब्राईटनेस पूर्ण वाढवून त्याच्या प्रकाशाला स्वतःवर पाडून घेत होती.

भारी दिसतेयस तू म्हणत तिच्या गालाला स्वतःचे ओठ टेकवून मग गालापासून अगदी कमरेच्या खालपर्यंत दोघ एकमेकांना ओठांनी स्पर्श करण्याचा अनुभव घेत होते. एक ते डोळे सोडून दोघ दोघांच सगळ शरीर त्या अर्धवट अंधारात बघत होते. प्रेम शरीरावर नाही टिकत. स्पर्शाच प्रेम स्पर्श झाल्या नंतर पुढच्या काहीच सेकंदात तिथून हरवून जात. पण नजरेत उतरलेलं प्रेम कुठच जात नाही. अगदी डोळ्यातून अश्रू आले तरी. पण ते त्यांना समजत नव्हत. किंवा तेवढी त्यांची समज नव्हती. तिचा ड्रेस गळ्यापासून कमरेपर्यंत उतरलेला. नजर एकदा मोबाईलकडे एकदा पडद्याकडे होत होती तिची. तो मात्र त्याची एक नजर फक्त तिच्या शरीरावर खिळवून होता. 

किमान अर्धातास हे एकमेकांना अस बघून तो बोलेल तिला तिथे ती स्वतःला हात लावून घेत त्याला अनुभवत होती. ती म्हणेल तस तो करून घेत तिला समोर बघून अनुभवत होता. अनुभव....म्हणजे समजली तर कल्पना आणि केलीली कृतीचा मोबदला म्हणजे अनुभव. हे दोन अनुभव म्हणजे एका धाग्याचे दोन्ही टोके. आत्ता कृती सुरु होती पण कल्पना करून. आणि तीही शरीर सुखाची. 

जिथे दोन्ही शरीरं अलग होती. सुख होत पण ज्याच्या त्याच्या कल्पनेनुसार अनुभवल जात होत. काही वेळात पुढच्या त्याला आता कसस होऊ लागल. त्याला तिच्याशी न बोलता झोपावं वाटू लागल. पण पण तिला टाळून ऑफलाईन जाता येत नव्हत. त्याने तिला मेसेजवर ये म्हणून सांगितल. आणि आता कुठ तिच्या सुखाची सुरुवात झालेली. ती त्याला थांबवत होती. त्याने तिला काय झाल सांगितल आणि तिने मग सस्वतःला आवरत घेतल. पुढे मग दोघ मेसेजवर बोलयला लागले. जे केल ज्यातून जो आनंद मिळाला. जो अनुभव आला. जे सुख मिळाल त्याबद्दलच दोघ बोलयला लागले. आणि एकमेकांना जास्त आणि कमी अशा दोन्ही गोष्टी सांगून पुढच्या वेळी काय करायला हव आणि काय नको याबद्दल दोघ ठरवून घेतात. आणि मग नेहेमीसारख तिने त्याला आय लव्ह यु बोलल्यावर. त्याने हि प्रतिक्रिया देऊन मग दोघ झोपले. तर हि गोष्ट होती त्याची आणि तिची. अनेक पुरुष जातीची आणि अनेक महिलेची. हर एक वयात आलेल्या आणि वयातून गेलेल्या वयातल्या पुरुष-महिलेची. जगाच वातावरण बिघडत असताना, निसर्गाचा होत चाललेला रऱ्हास आणि त्यात भर ती वाढती लोकसंख्या. यात निसर्गाचा गदा सु-व्यवस्थित करण्यसाठी माणसाचा निष्फळ प्रयत्न सुरु आहे. तसाच तो लोक्स्नाख्या नियंत्रण करण्यासाठी पण सुरु आहे. पण ते हि निष्फळ. इंटरनेटमुळे सगळ जग प्रत्येक व्यक्ती त्याचा सहवास अनुभव हे सगळ एका छोट्या स्क्रीनवर दिसू लागल्यामुळे. काही काळाने शरीरसुख हि फक्त एक कल्पनाच राहण्याची दाट शक्यता आहे. जे सुख शरीराला अनुभवून घेऊन करायची गोष्ट आहे ती गोष्ट ऑनलाईन केल्यामुळे प्रत्यक्षात कितपत कुणाला जमणार आहे ?

लाज,शरम,अनोळखीपणा,आपलेपणा,सुख,दुखण, या भावना जर ऑनलाइनच अनुभवल्या गेल्या तर प्रत्यक्षात त्याचा अनुभव का येईल ? तरबेज अशा गोष्टीचा अनुभव प्रत्यक्षात घेताना त्यात मजा काय येणार ? आणि मग ऑनलाईन शरीर सुखाची आवड असणारे मग प्रत्यक्षात का जास्त जवळ येतील ? आणि निसर्गनियमानुसार शरीराने जवळ नाही आले तर लोक आणि त्यांची संख्या कशी वाढेल. एक मोठा प्रश्न इन्टरनेटमुळे सुटत असला तरी माणसाच्या आयुष्यातला प्रणय हा एक मोठा विषय कुठेतरी दुर्मिळ होत जाणार आहे यात माणसाचा तोटा आहे. हे मात्र कुणी समजून घेणार नाही. आणि कुणाला कळणार हि नाही. कारण त्या क्षणाला मोबाईलची स्क्रीन सोडून माणसाला स्वतःचे वाढलेले श्वास पण धीमे करता येत नाही तो बाकीचा विचार काय करेल ???       

copyrighted@2021

 

Line

रोज सकाळी ११:३९ दारा  समोरून जायची. या तिच्या परफेक्ट टायमिंगला दाद द्यायला हवी. ती केव्हा पासुन इथून जातेय मला माहित नव्हत. पण एकदा बाहेर जाताना मी गाडी सुरु केली आणि ती शेजारून गेली. माहित नाही काय झाल पण शेजारून ती पुढे गेली आणि तिच्या अभासाने छातीत थोडस धडधडल्यासारख झाल. मी तिला मागूनच बघितल त्यादिवशी. काळा पंजाबी ड्रेस आणि त्यावर सोनेरी ओढणी. कानात हेडफोन आणि हातात मोबाईल. नजर खाली पायाकडे आणि सगळ जग हरवून चालत जाणारी ती कोणत गाण ऐकत असेल तिलाच माहित. मी गाडी सुरु केली तिच्या शेजारून गेलो. तिच्याकडे बघितल नाही. त्या नंतर चार एक दिवसांनी मी बाहेर जाताना आमची वेळ जुळून आली. आज अलीकडे उभा होतो गाडीच्या आणि ती समोरून येत होती. तिला मी ओळखल. लांबूनच जरा. चेहऱ्यावरून नाही पण ड्रेसवरून. खूप सुंदर दिसत होती ती. एक मुलगी कशी असते ? ह्या विषयावर आजवर ज्या लेखकांनी, कवींनी लिहील आहे ती कल्पना माझ्याकडे येत होती तेव्हा. गोरीपान होती ती. पिवळसर घारे डोळे होते तिचे, त्यात ऊन लख्ख पडलेलं त्या प्रकाशात तर आणखीनच ते घारेपण उठून दिसत होत. ओठ नाजूक एकदम आणि वर गुलाबी लालसर. आजकाल ट्रेंड आहे तशीच होती ती स्लिम. एकदम झीरो फिगर. तेव्हासारखाच हातात मोबाईल आणि कानाला हेडफोन लावून ती चालत येत होती. माझ्याकडे तिने बघितल चुकून आणि मी तिला बघत होतो रोखून.

ती त्यावेळेस हि तशीच शेजारुन निघून गेली. मी तिच्याकडे बघत राहिलो. त्यानंतर पुढे एक महिना मी तिच्या वेळेत काही काम नसताना घराबाहेर येऊन थांबायला लागलो. रोज ती मला बघायची आणि निघून जायची. खुपदा वाटायचं तीच्यामागे जाव तिचा नंबर घ्यावा. पण तिला बघण्यातच इतक सुख मिळत होत कि नंबर घेऊन दुसर अस काय सुख मिळवणार होतो मी ? उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस अलीकडे नवीन नाही. पाउस येत होता. मी जर्किंग घालून उभा होतो. ती आली पूर्णपणे भिजलेली. ओल्या केसांमधून पाणी तिच्या चेहऱ्यावर येत होत. एकसलग अगदी. मेकअपची तिला गरज नव्हती इतकी सुंदर होती ती. पण भिजलेल्या त्या अवस्थेतहि ती चालत होती. मला कसतरी वाटायला लागल. एकक्षण मीच मला भिजलेल बघत होतो. मी तिच्या मागे गेलो. जर्किंगची टोपी मीही डोक्यावर घेतली नाही. गेलो तसाच तिच्यामागे. बरीच पावल अंतर मागे ठेवून तिच्यापासून लांब असा मी चालत होतो.

ती एका पतसंस्थेत गेली. आणि खुर्चीवर जाऊन बसली. आणि काम करायला लागली. मी तिथ बाहेर दहा मिनिट थांबलो. नंतर आतली लोक मला बघायला लागलें तेव्हा मी निघून आलो घरी. वाईट वाटत होत. जी आवडते मला जिच्याशी माझ काहीही एक शब्द बोलन झालेलं नाही तिच्यासाठी जीव तुटत होता आणि मला ती आवडत असली तरी तिच्यासाठी मी काही करू शकत नव्हतो. घरी येऊन मी डोक पुसलं. जर्किंग काढून ठेवल. अस म्हणतात भिजलेल्या अवस्थेतली स्त्री-मुलगी खूप सुंदर दिसते. मला हि तिला तस बघायला आवडल असत पण त्या वेळेस तिचा तो नाराज भिजलेला चेहरा बघून चेहऱ्याच्या पुढे खाली मला काही बघायलाच जमल नाही. संध्याकाळी जेहा मी बाहेर म्हणून गेलो तिचाच विचार येत होता. तिची सकाळची वेळ मला माहित होती पण संध्याकाळी ती कधी घरी जाते हे माहित नव्हत. मी गेलो त्या पतसंस्थेपाशी. सात वाजले असतील तेव्हा. ती कुलूप लावून निघाली दुसऱ्या रस्त्याने घरी. अरे, हा म्हणूनच संध्याकाळी ती कधी मला घरासमोर जाताना दिसली नाही.

मी तिला बघितल. तिचे केस एकदम सिल्की झालेले. सकाळी भिजलेले ना म्हणून. आणि कपडे. चुरगाळलेले. दिवसभर काम करून अंगावरच कपडे तिने वाळवलेले. डोळ्यात पाणी आल. भावना ताब्यात ठेवून मी तिच्यामागे गेलो. हाच एक मनात विचार करून कि मी हिच्याशी लग्न करून हिचा त्रास मी लांब करेन आणि खूप प्रेम देईन. मी या प्रेमाच्या विचारात हरवून कधी माझा चालण्याचा वेग वाढवून बसलो समजल नाही. तिच्यात माझ्यात अंतर बरच कमी होत. एक रस्ता आला जिथे ती रस्ता पार करणार होती. माझ्या लक्षात आल नाही. मी तिच्याकडेच चालत राहीलो. तिला समजल. तिने घाईत रस्ता पार केला आणि भर भर चालायला लागली. मी हि तिच्या मागे चालायला लागलो. समोरून जे.सी.बी. एक आला. त्याचा एवढा प्रकश पडला कि त्या अंधाऱ्या रस्त्यात पूर्ण प्रकाश पसरला. आणि माझ लक्ष तिच्या हाताकडे गेल. हातावर तिच्या शहारा आलेला. मी मागे जात होतो त्या भीतीने किंवा दिवसभर भिजलेल्या अंगाच्या थंडीने. मी थांबलो. जे.सी.बी. गेला. तीही गेली. तिने मागे बघितल वळून एकदा. मी लांब आहे बघून तिने तिचा वेग कमी केला. आणि मी......माघारी फिरलो. पुन्हा ती घरासमोरून कधी गेलीच नाही.          

COPYRIGHTED@2021

सहज विसरता येत असेल ते प्रेम कसल ? पण लक्षात ठेवण्यासारख तरी काय इतक असत ? ज्या व्यक्तीची इतकी सवय झालेली असते त्याच व्यक्तीपासून जास्तीत जास्त लांब राहण्यासाठी जी धडपड केली जाते अजब आहे. प्रेम करण्यापेक्षा प्रेम विसरण्यात कसरत बरी करावी लागते. ज्या विचारांनी माणूस खुश होण्याचा प्रयत्न फक्त प्रयत्न करत राहतो त्या आनंदाच्या बदल्यात मिळालेल्या दुःखाला लपवण्यात किती कसरत होत असते माणसाची. काय बोलाव त्याबद्दल ?

मनात नसताना पण हसायचं. विचार केला नसताना पण डोळ्यात पाणी आणायचं. बधीर कानात तीच नाव ऐकू आणायचं आणि विसरलेले नाव ओठात आणायला पण किती धाडस लागत काय म्हणून सांगू ? प्रेम करण्यापेक्षा विसरण्यासाठी जी मेहनत माणूस घेतो कबिल-ए-तारीफ असते. अशा या कबिल-ए-तारीफ प्रेमाला धुडकावणाऱ्या माणसाला खर प्रेम समजलेलच नस्त हे नक्की. प्रेम मिळाव म्हणून माणूस काय आणि काय करत असतो. देवापासून रस्त्यावरच्या दगडापर्यंत, तथाकथित झाडापासून काल्पनिक खांबाची पूजाअर्चा करून प्रेम व्यक्त करण्याआधी ते मिळवण्याची मागणी करणारा माणूस प्रेम मिळाल कि हव तस वाट्टेल तस वागून, वागवून माणूस प्रेमाचा शेवट करून टाकतो. ज्या प्रेमाच्या स्वप्नात तो जगत असतो ते सत्यात मिळाल कि त्याला वाट्टेल तस वागून प्रेमाला त्रास देऊन मग शेवटी स्वतःला त्रास करून घेऊन मग अखेर प्रेमाला नाव ठेवून एकटा राहण्याचा विचार तो करत असतो. एकटेपणा वाईट. खूप वाईट.

आणि अशा एकटेपणात जगत असताना होत असलेला आतून त्रास तो बाहेर चेहऱ्यावर लपवताना जो प्रयत्न करत असतो तो कुणाही पासून लपत नाही. आणि मग तो त्रास लपवण्याचा प्रयत्न निष्फळ होत आहे जाणवायला लागल कि आणखी त्रास मनाला व्हायला लागतो. ई जेव्हा त्रास वाढतो त्या त्रासातून मार्ग काढायला माणसाला दुसरा माणूस लागतो. नुसता माणूस किंवा त्याची सोबत नाही तर त्याच प्रेम हि हव लागत. आणि मग एका प्रेमाच्या त्रासातून वाट काढून पुढे आलेला माणूस त्या प्रेमाच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी पुन्हा प्रेमाचाच आधार घेतो. आणि असे अनुभवी लोक किती आहेत जगात माहित आहेत का ?

अगदी सगळेच. कुणी मान्य करो अगर ना करो. पण हेच खर आहे.          

copyrighted@2021


 

 
तीच ते प्रेम बघून माझ जगन पूर्ण बदलून गेल. काय शक्य होत ? काहीच नाही पण ‘काळजी करू नकोस’ या तिच्या वाक्यान सगळ शक्य होऊन गेल. मनातले सगळे विचार तिच्याशी बोलताना इतके हरवून गेले कि बोलन झाल्यानंतर एकांतात मी काय विचार करत होतो हे हि आठवत नाही. तीच प्रेम खूप आहे. जे आहे फक्त माझ्यासाठी आहे. स्वप्नं कधी पडली नाहीत मला. कारण तशी शांत झोप लागली नाही. पण तिच्या सोबतीने जागेपणी तिच्यासोबतची अनेक स्वप्न रंगवली मी. जी पूर्ण होतील न होतील हे माहित नसताना पण ती मी रंगवली. काय दिवस काय रात्र. असेच्या असे दिवस तिच्याशी बोलताना निघून जातात. दिवस जात राहतात. दोघांमधल अनेक किलोमीटरच अंतर या लॉकडाऊनमध्ये पण फक्त बोलून कमी केल जाऊ शकत. याचा अनुभव हि आला. काय असत अवघड ? काहीच नाही तिच्यामुळे आयुष्य सगळ सोप्प आहे याचा अनुभव आला. या आधी आयुष्य खडतर, बेकार, आहे एवढच माहित होत. पण तो माझा भ्रम होता आणि आत्ता जो आहे तो अनुभव आहे.

तिच्यावर प्रेम करून मला हि प्रेमच मिळत आहे. जे मला होत, जे माझ आहे. तिच्या प्रत्येक वाक्याला शब्दाला मी माझ प्रेम देऊन मी कित्येक अशा गोष्टी करायच्या तयारीत आहे. कारण प्रेमात सगळच सोप्प वाटत. जरी तस नसल तरीही. एक सुंदर जग इथल. त्यातली सुंदर एक ती. तो प्रत्येक सुंदर क्षण आणि त्याहून सुंदर दिसणारी ती. सगळ जगच माझ ती आणि माझ आयुष्यच आता सुंदर झाल आहे. तिच्यासोबत घेतलेल्या वचनांना पूर्ण करण्यासाठी काहीही करायची तयारी असलेलो मी तिला वाटल तर तिच्यापर्यंत जाऊ शकत नाही. तिला हव असताना पण जवळ घेऊ शकत नाही. तिच्या प्रश्नांना उत्तर द्यायला जमतात मला पण तिच्या उत्तरातले प्रश्न मला सोडवले जात नाही. ‘आय लव्ह यु’ म्हणून प्रेम व्यक्त करताना ती जवळ नसल्याचा त्रास होतो. तिचा आवाज ऐकू येतो पण ती समोर नसते याचा हि त्रास होतो. तीच इतक सार प्रेम आहे माझ्यावर हे मला जाणवत असत पण त्याचा हि त्रास होतो कि ते फील करायला समोर मी नाहीये. आणि मी.....तिला फक्त तुझाच आहे म्हणतो पण तिच्याजवळ नाही. याचा हि मला फक्त त्रासच होतो. हे बस अस हे सगळ प्रेम करताना सुख कुठच नाहीये. एक धडपड, एक आस, काही अपेक्षा आणि खूप सारा त्रास हे इतक सगळ असल तरी माझ तिच्यावर प्रेम आहे. तीच माझ्यावर प्रेम आहे.

एक फक्त ती बाकी कुणीच नाही. एक जग सुंदर त्यात तिच्याहून सुंदर कुणीच नाही. जे आहे ते तीच सगळ माझ आहे. आणि मी ? तिच्याशिवाय मी कुणाचाच नाही. हे असे सगळे बालिश विचार पण एकमेकांना प्रेमात पडण्यासाठी पुरेसे असतात. “प्रेमाने माणूस बालिश होतो. प्रेमात लग्न झाल तर माणूस समजूतदार होतो. आणि समजून घेण्याची कला त्या माणसात जेव्हा आत्मसात होते तो माणूस मग जबाबदार होतो.” हीच ती पायरी मला जगण्याची संधी मिळाली आहे. “प्रेम करण्यापेक्षा ते व्यक्त असाव. आणि व्यक्त प्रेम कृतीतून सिद्ध करायचं असत.” इतक सहज सोप्प प्रेम असत जे प्रत्येकाला जमत नाही. पण आमच जमलय....बस मी तिला मिस करतोय. आणि ती मला.......

COPYRIGHTED@2021

 


वेळ तसा खूप होता माझ्याकडे, मला जगण्यासाठी. कुणाला द्यायला किंवा कुणासाठी माझा वेळ काढायला तस कारण काहीच नव्हत. तू माझ्या आयुष्यात आलीस. सुरुवातीला ओळख होती. मैत्री कधी झाली काय माहित पण प्रेम झाल तेव्हा हळू हळू कळायला लागल होत. मलातरी. तू सांगत नव्हतीस. अखेर दीड महिन्यानंतर मी तुला कबुली दिली. त्या नंतर होकार द्यायला तू आणखी एक महिना लावलास. तुझा हि होकार आला आणि मग सगळच माझ आयुष्य बदलल. सकाळी उठल्यावर फेसबुकवर व्हिडीओ बघायचो. मग चहा वैगरे प्यायचो. माझ्या स्टोरी किती जणांनी वाचल्या काल, ते बघायचो. मग आवरून ऑफिसला जायचो.

पण आता डोळे उघडले कि तुझा मेसेज आलेला बघून तुला रिप्लाय द्यायचो. मेसेज तुला करून मागे येतो न येतो तोच तुझा मेसेज यायचा. आणि मग तुझ्याशीच बोलत चहा व्हायचा. अंघोळ करताना पण मोबाईल बाथरूममध्ये असायचा. ओल्या हाताने मेसेज करताना कित्येकदा स्पेलिंग चुकायचे. पण चुकलेल्या शब्दातले भाव मात्र तू नेमके हेरायचीस. तिथून मग ऑफिसला जाताना पण सफर तुझ्याशी बोलत व्हायची. एरवी ऑफिसला लवकर जायचो. पण तुझ्याशी बोलता जास्त याव म्हणून लांबच्या रस्त्याने जायला लागलो. ऑफिसमध्ये परवानगी नव्हती मोबाईल वापरायची म्हणून जी-मेल वरून तुला मेल करायचो. जास्त तुझी आठवण आली तर माझ्या वेबसाईटवरून तुला डायरेक्ट मेसेज करून फक्त तुझ्याशीच बोलायचो. पण बोलायचो. कामाचा वेळ, ऑफिसचा वेळ, माझा वेळ फक्त तुलाच द्यायचो.

जेवताना दुपारी पण एक एक घास मोजून खायचो. तू सांगायची. समजवायची इतकी कि वाटायचं तूच भरवत आहेस मला. खर सांगू त्या सहा महिन्यात माझ वजन वाढल होत. मनापासून जेवलो होतो मी. जेवण झाल कि पुन्हा काम करत तुझ्याशी बोलत संध्याकाळ कधी झालीय समजायचं नाही. लख्ख प्रकाशाच्या ए.सी. ऑफिसमधून जेव्हा बाहेर यायचो गरम वाफा अंगावर आणि डोळ्यासमोर रस्त्यावरचा पिवळसर अंधार यायचा तेव्हा कळायचं कि बाबा संध्याकाळ झाली आहे. इतका मी तुझ्यात हरवलेलो असायचो. बर बाहेर येऊन पण मी मला सापडायचो कुठ ? गाडीला चावी लावली आणि गाडी सुरु केली कि तुझा कॉल यायचा. तिथून बोलयला सुरुवात केली कि गाडी पुन्हा लांबच्या रस्त्याने घराकडे जायची. उशिराने घरी आल्यावर थोड आवरल कि मग तुझ्याशी बोलून मग काहीतरी नवीन वेबसाईटवर लिहायला बसलो कि सगळ मन मोकळ असायचं. तुझ्या नादात सहा महिने ते मी काहीही लिहील नव्हत. सगळ सगळ मन मोकळ होत माझ. रोज लिहायचा प्रयत्न करायचो आणि रोज तसाच लिहायचा प्लान सोडून तुला कॉल करून तुझ्याशी बोलून मग जेवण करून मग रात्री पुन्हा झोप येई पर्यंत तुझ्याशीच बोलायचो. झोप लागली माझी कि तू कॉल करून मला उठवायचीस आणि मला पुन्हा बोलायाला लावायचिस. मग खूप वेळ बोलून जेव्हा रात्रीचे एक दोन वाजायचे आणि मला झोप सहन व्हायची नाही तेव्हा दोघ हि बोलन थांबवून झोपायचो. आणि रात्र ती थोडीशी लगेच सकाळ होऊन जायची आणि तुझा मला मेसेज यायचा.

काय बोलायचो आपण ? माहित नाही. मी कमी पण तू जास्त बोलायचीस हे हि विसरता येत नाही. तुझा पहिला हाय मेसेज ते शेवटचा बाय अजून जसाच्या तसा लक्षात आहे. कोण म्हणत खर प्रेम फक्त मुलीच करतात ? मुल हि प्रेम करतात मुलींपेक्षा जास्तच. बस व्यक्त करताना कुठेतरी मुल कमी पडतात. प्रेम मिळवण्याचा हट्ट जास्त करतात. त्यात कुठे चुकतात. प्रेमाला मुकतात. पण प्रेम जराही कमी होऊ देत नाहीत. विसरू देत नाहीत. मीही नाही विसरलो. पण गेले दोन वर्ष मी विसरलो तुला. मुद्दामहून. कारण लिहायला सुचत नव्हत. जो पर्यंत माझ्या लक्षात होतीस. आता तुला विसरलो तर बघ लिहायला खूप सुचतय. माहित आहे मला तू मला वाचत नाहीस. पण म्हणून मी लिहायचं सोडत नाही. तू आठवतेस कधी कधी. पण तुझा राग येत नाही. प्रेम ? ते हि येत नाही पण हा गेलेला वेळ तुझ्यासोबतचा तो गेलाच. माणूस मरून जावा तसा. कधी न परत येण्यासारखा. त्याच दुःख आहे. त्याचा त्रास होतो. त्याच मी आता काय करू ????    

copyrighted@2021

 


माझ्यावर प्रेम कोण करणार ? मी हा असा लेखक. स्वतःच्या विश्वात हरवलेला. व्यसन नाही कसल. पण लिखाण केल काहीजरी मग नशा केल्याचा फील यायचा. खायला भूक लागते. नुस्त समोर जेवण ठेवल तर ते जात नाही. आणि खाल्ल जरी ते सरत नाही. त्रास होतो. लिखाणाच पण तसच आहे. त्रास नाहीतर प्रेम लागत लेखकाला त्याच्या आयुष्यात. पण माझे विचार. एकट राहण्याची आवड यात कोणी कधी जवळ आलच नाही. किंबहुना मी गेलो नाही. लिखाण करत होतो. लिखाण करत गेलो. एक दिवस असा आला कि लिहायचं होत पण लिहायला सुचत नव्हत. पाच दहा मिनिट झाले पण विचार काही येईनात. आत अस हृदयात काहीतरी टोचत होत. श्वास जड-जड झालेले. डोक जड झाल. श्वास नाकातून आत बाहेर करत होता पण काहीतरी अस जे जाणवत होत पण कळत नव्हत अस एक आतून बाहेर न पडल्याच दुःख होत होत.

मोबाईल बघत बसलो असताना एक जुना मेसेज दिसला. लिखाणाला माझ्या आलेली एक सुंदर प्रतिक्रिया एका सुंदर मुलीची. प्रतिक्रियेला उत्तर दिल मी आणि पुढे ओळख झाली. जी ओळख झाली ती वाढली आणि ओळखीच प्रेम व्हयला वेळ कुठे का लागतो ? आवडली ती मला. आवड झाली प्रेम झाल. विषय संपला. पुढे मग बरच बोलन व्हायला लागल आमच. सुरूवातीच ते गोड गोड बोलन होत असताना प्रेम अव्यक्त होत. ती मैत्री नक्कीच नव्हती पण प्रेम आहे हे हि दोघांनी मान्य केलेलं नव्हत. त्या काळात बरच मी लिखाण केल. जे लिखाण करून मी खुश होत होतो. आणि कुठे तो सुकून कमी पडला तर ती होतीच.

पुढे एकदा तिनेच प्रेम व्यक्त केल. कारण तिच्यामते मी जास्त वेळ घालवत होतो. तिला नकार देणारा मुलगा कोणी वेडाच असावा. आणि मी वेडा नाही. पुढे आम्ही एक सुंदर नात्यात एकबंध झालो. पुढे मग बोलण्यावर भागेना मग भेटीची ओढ वाढली. एक अशाच सुंदर दिवशी रविवार होता. रविवार तसा नेहमीचाच आळसाने भरलेला होता पण तेव्हा आमची भेट झाली त्यामुळे तेव्हापासून मला रविवार आवडायला लागला. त्या भेटीनंतर मन पुरेपूर भरून गेल माझ. लिहायचं विसरून गेलो. जग विसरून गेलो. मला काय करायचं आहे. मी आधी काय करत होतो. मला काय व्हायचं आहे आणि मी काय करतोय काहीच लक्षात नव्हत राहील. घरच्यांचे मोबाईल नंबर घराचा पत्ता ऑफिसचा पत्ता काही दोनचार इथले रस्ते. बस बाकी सगळ विसरलेलो. प्रेम काय असत. तो फील घेतला. त्या सहा महिन्यात इतक प्रेम केल तिच्यावर कि या जगात आणि पुन्हा नव्या जन्मात तिला कोणी इतक करू शकत नाही. पण का जाणे ती लांब झाली माझ्यापासून. विनाकारण. म्हणा एकत्र यायला हि कारण नव्हत. नकळत घडल होत सगळ.

त्या सहा महिन्यात मी फक्त एक प्रेम पत्र लिहील. बस. इतकच जे तिच्याचसाठी लिहिले. ती गेली आणि इतका त्रास झाला कि. मग भानावर आलो. विसरलेल सगळ कस आठवायला लागल. आणि मी लेखक आहे हे आठवल्यावर पुन्हा लिखाण सुरु केल. ती गेल्या नंतर पुढच्या तीस दिवसात १२०० पेक्षा जास्त उर्दू हिंदी शायरी लिहिल्या. शंभर पेक्षा जास्त लेख लिहिले. शोधत होतो तिला माझ्या शब्दात. मी सोडून सगळ्यांना ती सापडत होती. पण त्यांना तीच नाव माहित नव्हत. आणि मला माहित असून पण ती मिळत नव्हती.

शेवटी लिखाण करता करता मनातल्या भावना इतक्या कागदांवर उतरवल्या कि त्या हि संपल्या. प्रेमावरचा विश्वास उठायला लागला. या सगळ्याला दीड वर्ष लागल. पुन्हा आधीसारखा होऊन जगत असताना एकदा लिखाण करत असताना तिचा मेसेज आला. “कसा आहेस ?” मी खोटच बोललो “एकदम मस्त आणि तू?” आणि तिचा कॉल आला. बराच वेळ बोलत होती माझ्याशी. बरच काही घडलेलं तिच्यासोबत. कोणा एकासाठी मला सोडून ती त्याच्यासोबत जगत होती. त्याने तिचा वापर केला. तिचा एक हि शब्द पडून न देता ते मुल पाडे पर्यंतचा प्रवास त्याने या दीड वर्षात केलेला. तरीही ती त्याच्याच मागे फिदा होती. मग त्याने दुसरी बघितली आणि मग हि एकटी पडली आणि तिला माझी आठवण झाली.

आणि मग तो हा आमचा कॉल झाला. पुन्हा तिला सहानभूती देता देता माझ्यातल तिच्यासाठीच प्रेम जाग झाल. पुन्हा कॉल मेसेज आणि भेट हे सगळ सुरु झाल सहा महिने. आणि पुन्हा ती लांब गेली. याही वेळेस कारण काहीच नव्हत. आणि या हि वेळेस तिला दुसरा कोणी भेटला. त्याने तिच्यावर रेप केला. तिला मारहाण केली. तिचा मानसिक शारीरिक छळ केला. हे सगळ मला समजल कस ? तिनेच तिच्या तोंडाने कॉल करून सांगितल आणि माझ्याकडे प्रेमाची भिक मागायला लागली. भिक द्यायला मी श्रीमंत नाही. मी सहानभूती दिली. बस. त्यावर तीच भागल नाही आणि तिचा आणि एका मुलाचा सोबतचा एक फोटो मला त्यानंतर फेसबुकवर दिसला. Passion साठी माणूस काहीही करू शकतो. हे मात्र नक्की. आणि मी अजून हि तिची आठवण काढतो हि माझ्या प्रेमातली passion आहे. बाकी आठवण येते तिची पण आता ती माझी वाटत नाही.....   

copyrighted@2021

 

मला तू आवडायचीस. तुला मी आवडायचो. आवड मग सवय झाली. सवयी कधी सुटतात का लवकर ? तेच झालं. सुरुवातीला थोडं थोडक चॅटिंग नंतर कॉल आणि कित्येक सारे तुझे माझे फोटो एकमेकांना शेअर करून जेव्हा मोबाईलची मेमरी भरली तेव्हा मी माझे स्वतःचे फोटो डिलिट करून तुझे तसेच ठेवले. माझ्याशी कमी बोलणं झालं तर तुझ्यासाठी तो दिवस बेकार असायचा. हे सगळं प्रेम आहे  हे तुला माहित होत आणि हे मला हि कळत होत. पण बोलून काय होणार होत ? व्यक्त व्हावं माणसाने मान्य पण ज्या गोष्टीला व्यक्त करून फक्त कल्पनेतच जगावं लागणार असेल तर अव्यक्त राहिलेलंच बर म्हणून तू हि कधी बोलली नाहीस आणि मी हि तुला विचारलं नाही. मी लांब आणि माझ्यापेक्षा तू अजून लांब होतीस. त्यामुळे आपली भेट रोज व्हाट्सअप, कॉल आणि व्हिडिओ कॉल एवढ्यावरच असायची. प्रत्यक्ष भेटण्याची स्वप्न फक्त बाकी सत्यात मात्र तू तुझ्या आणि मी माझ्या घरी. तुला जवळ घेऊन तुला मिठी मारावीशी कित्येकदा मला वाटलं असेल. माझ्यासमोर बसून बोलावं अस तुला कितीतरी वेळा वाटलं असेल. पण कल्पनेत जगताना सत्यातल एक ऑनलाइन नात आपण बनवत चाललेलो. ज्या नात्याला अर्थ तसा बराच होता पण ते अर्थ हि फक्त ऑनलाइन पुरते मर्यादित होते. या समाजात आणि खऱ्या आयुष्यात त्याला काहीही महत्व नव्हतं. 
तू आणि मी दिवस दिवस एकत्र घालवत होतो. तू माझ्यात मी तुझ्यात हरवत होतो. सकाळी डोळे उघडल्यावर तुझा पहिला मेसेज मला माझ्या मोबाईलवर आलेला दिसायचा. आणि तू सकाळच काम करून फ्री झालीस कि माझा फोटो बघून खुश व्हायचीस. किती तरी खोलवर एकमेकांबद्दल वाटणार प्रेम कुठेतरी आता प्रत्यक्षात व्यक्त व्हायला अतुरलेल. आपली भेट झाली. आपण भेटलो. भेटल्यावर बोलणं कमी आणि कित्येक स्पर्शांनी आपण संवाद साधला. जगासाठी हे चुकीचं असेल पण स्पर्श म्हणजे पण प्रेमच असत ना ? आणि प्रेम हे एक तर करतात किंवा ते समजत. बाकीचे जे शब्द प्रयोग मराठी व्याकरणात आहेत ते प्रेमासाठी लागूच नाहीत. तुझ्या गोड ओठांची चव घेऊन मग तुझ्यापासून लांब झालो. पुन्हा तू लांब मी लांब. मग ऑनलाइन नात एकदाच सत्यात हि जुळलं याचा आनंद होता.
कितीही आपण जवळ आलो तरी रोज रोज भेटणं बोलणं अस स्पर्श करून तुझा अनुभव घेणं रोज जमणार नव्हतं. पण केव्हा का होईना जेव्हा भेट होईल तेव्हा ते थकलेले, राहिलेले स्पर्श तुला करण्यासाठी ओढ कायम असायची. मला नव्हतं कोणतंच बंधन. मला नव्हती कसलीच जबाबदारी. मला नव्हती आवड दुसऱ्या कुणाची. माझ्यावर नव्हता दबाव कुणाचा. मला होता खूप सारा वेळ. आणि माझं फक्त तुझ्यावरच प्रेम होत. तुला होती कित्येक बंधन. नवऱ्याची, सासू सासरे, दीर नंदेचे. तुला वेळ मिळायचा थोडाच कधी तोही तू माझ्याशी बोलून संपवायचीस. तुझं हि होत प्रेम माझ्यावर. पण फक्त माझ्यावर नाही. तुझं प्रेम वाटलं गेलेलं तुझ्या नवऱ्याला, मुलाला, मुलीला आणि मग उरलेलं मला. पण तेही मला आवडत होत. ऑनलाइन प्रेम खऱ्या आयुष्यात अनुभवताना कुठेतरी कल्पनेत बरच काही जागून घेतलं. आणि तो अनुभव तुला हि देण्यासाठी जेव्हा तुला मी तुझी साथ मागितली, माझ्यासाठी काहीही करू शकणारी तू, तेव्हा मात्र तुझ्या संसारात अडकलीस. आणि मी मोकळा असून हि तुझ्याकडे येऊ शकलो नाही. 
आणि जेव्हा हे सत्य आपल्या दोघांना हि पटलं तू तुझ्या संसारात रमून गेलीस आणि मी तुझ्या विचारात हरवून गेलो. बाकी...? तुझी आठवण काढतो अधून मधून. आणि बघतो तुझे ते सगळे फोटो. आणि पुन्हा कल्पना करतो तुझा पुन्हा मेसेज आला तर ?

Copyrighted©2020
प्रत्येकाला जवळ मिठीत घेऊन त्यास शाबासकी देणे म्हणजे आपले नाते त्या मिठी प्रमाणे घट्ट करणे होय. माणूस कसा ही असो, कुणी ही असो पण शाबासकी दिल्याने परका ही आपला होऊन जातो. मिठी ही जितकी घट्ट तितका विश्वास जास्त बसला जातो. आपला माणूस आपल्याचसाठी लढणार हे जरी खरे असले तरी  आपली शाबासकी कमी पडली तर दुसऱ्याची त्या व्यक्तीवर मर्जी राहते. परकीय अशाच माणसाच्या शोधत असतात. एक एक फळ मोजून तराजूत त्याच वजन मोजल जात. एक जरी फळ कमी पडल तर पारड भरत नाही.
 आपल्या सैन्यात ही एक एक माणूस धरून हे स्वराज्य तयार होत आहे. यात एकेका माणसाला किंमत आहे. आणि यातला एक जरी त्यातून गाळला तर एकाच्या बदल्यात हजार सैन्याशी लढायला तयार व्हावं लागेल. म्हणून तोंडी कौतुकासोबत वस्तू भेट आणि सोबत मिठीची शाबासकी देणं एका राजाला शोभून दिसते. आपण बघता, आम्ही राजे आहोत. तुम्ही होते राजे आहात. 
आपलं नशीब काहीही असो, आपण आपल्या कर्तबगारी आणि हुशारीने आपलं हे स्वराज्य टिकवायच आहे. सोबत आपल्या आपलं सैन्य आहे जे या स्वराज्याला सांभाळून आहे. 
मेंढपाळाच्या मेंढ्यांना जंगलात जस कोल्ह्याचं भय असत तस इरादा ठरवून आलेला कोल्हा मेंढ्या तर हाणतोच पण पुढचा विचार करून मेंढपाळाला ही ठार करतो. राज्य आणि राजा यांचं ही असच असत. पर शत्रू फक्त मावळ्यांना मारून गप्प बसू शकत नाही तो एक तर मावळ्यांना तरी मारेल किंवा मावळ्यांच्या मानेला धाकाच्या सुऱ्याने धरून राजाला ही मारून टाकेल. 
अशात आपण जाणून असावे की कुणास मिठीत घ्यावे नी कुणास दूर खडे करावे. तुम्ही बघत असाल आम्ही जो तो येतो जातो त्यातल्या खास लोकांना जवळ उभे करतो, त्यांना गरज पडली तर पाठीवर शाबासकी देऊन धीर देतो, कोणती जीत मारली तर मिठीत घेतो, काही भेट वस्तू देताना अगदी अर्धा हात जवळ पुढे उभे राहण्यास परवानगी देतो. म्हणजे आम्ही त्यांवर विश्वास ठेवून त्यांच्या पुढे असतो. तर असे काही नाही. पुढुन येणाऱ्या व्यक्तीच्या कमरेखालचे कापड त्याचा पोत, त्याचा रंग त्या रंगानुसार पडणारी सावली, आजूबाजूच्या व्यक्ती गोष्टी यांवरून त्या कापडावर होणार रंगाचा खेळ तो समोरून येताना आम्ही तपासतो. रंग फिरते झाले तर तो कोऱ्या अंगाने आला असे समजतो. जर का काही शस्त्र आत लपवीले असेल तर तो प्रकाश आणि रंगाची सावली त्या शास्त्राला लपवण्यात इतकी रंग बदलतात की आम्ही त्यास दुरून हात करतो. ही समज लगेच नाही येत. त्यासाठी हवी बारकाई. पाठीला काय शस्त्र लावले असेल किंवा माकड हाडाशी लपवलेलं छुप काही शस्त्र असेल तर माणसाच्या चालीतली लय बदलते. जी सहज समजत नाही पण बारकाईने बघितली तर टाचा उचलून चालताना ती व्यक्ती दिसते. त्याच्या खांद्याला आणि कमरेला घाम फुटतो. खांद्याला खाज सुटते जेणे त्याचे खांदे अलगद उडले जातात. पण ती खाज लपवण्यात तो माहीर माणूस, गळ्याला आलेला घाम पुसू शकत नाही. बाकी शरीर उघडे ठेवून तो आपल्याला दिलासा देऊ शकतो पण त्याच्या उघड्या शरीरावर आपण विश्वास ठेवून त्याचे जवळ जाणे नाही. कायम सोबत काही लोक उभे करणे. मागे तीन एक उजवीकडे, एक डावीकडे आणि एक बरोबर पाठीच्या मणक्याच्या रेषेत. दोन बाजूला उजव्या आणि डाव्या हाताला. आणि दोन दहा हात पुढे. पुढून येणाऱ्याला हे दोघे पहिले डोळ्यांनी तपासतील. त्यांच्या नजरेने तो माणूस निम्मा घाबरून जाईल आणि त्याचा निश्चय तिथेच अर्धा मरून जाईल. असेलच कुणी हापापलेला पैशासाठी तो हाती घेतलेल्या कामापोटी त्या दोघांना सोडून अजून आपल्या पुढे येईल. मग आपल्या शेजारचे दोन सोबती त्यांची तपासणी करतील. आणि मग आपण त्यांच्या जवळ जाण्यासाठी पावले उचलावीत. त्याच पावलाला साथ देत मागील तिघे ही आपली पावले उचलतील. आणि अशावेळेस एकूण सहा जणांची बारा पावले एकदम जमिनीला टेकताच पुढच्या माणसाची सगळी ताकदच गळून जाईल. आणि तो आपला माणूस असेल तर तो शस्त्रविना लांबूनच आपल्याशी बोलून चालता होईल. तेव्हा अशास जवळ बोलावून शाबासकी देणे, त्याची विचारपूस करणे भविष्यात आपल्या कामी त्यास आणण्यासाठी योग्य ठरते. हे बघा संभाजी, तुम्ही ही कुणास लवकर जवळ करू नये. केल्यास त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवणे. लक्षात ठेवा एक नजरचूक खूप मोठी चूक ठरू शकते. बाकी तुम्ही तर आमच्याहून हुशार आहात. तरी कोणाजवळ लगेच जाणे नाही, कोणास लगेच जवळ घेणे नाही. कारण आपल्यातलेच कायम फुटत आलेले आहेत. आणि आपण आपल्यांना जवळ घेताना आपल्यानेच आपला अंत व्हावा इतकं दुर्दैव आपण आपल्यावर ओढवून घेण्याची वेळ आणूच नये. काय म्हणता ?
संभाजी महाराज : अगदी खरे आहे, महाराज. 
शिवाजी महाराज : महाराज ? आज आबासाहेब म्हणाला नाहीत ?
संभाजी महाराज : अस काही शिकताना तुम्ही आमचे गुरू असता, स्वराज्याचे महाराज असतात आणि आम्ही तुमचे मावळे असतो. म्हणून महाराज.
शिवाजी महाराज : बरे, चला एक फेरी मारून येऊ उन्हातून.
संभाजी महाराज : उन्हात ?
शिवाजी महाराज : सावल्या आणि उजेडात मित्ररंग आणि शत्रू सावली दाखवतो तुम्हास.
दोघे महालातून बाहेर गेले.

 

भकास आणि गडद अंधार. आजूबाजूला शुकशुकाट. डोक्यावर चंद्राचा प्रकाश तो हि खाली अंधारापर्यंत येताना काळोख बनलेला. जमिनीवरचे पाय असे काही हरवलेले कि पाय आहेत हि फक्त जाणीव मनाला. बाकी ते दिसणे अशक्यच. हातात मोबाईल असून उपयोग काय ? त्याला चार्जिंग जरा हि नाही. एक बारीकसा केशरी प्रकाश ओठांशी. एक फिकट पांढरा धूर नाकातून बाहेर. हृदयाची धडधड वाढत चाललेली. धाप लागत आणि वाढत चाललेली. सोबतचा कुत्रा पुढचा माग काढत पुढे पळत होता. मागून हा पुढे जात होता. लांब कुठेतरी मिणमिणते दिवे दिसत होते. एक कालवा आला. त्या कालव्याच्या बाजूला एक लोखंडी बोर्ड लावलेला. त्या बोर्डपासून तेरा पावल एक दगडाचा कठडा होता. त्या कठड्याच्या उजव्या बाजूला लागून एक फुटभर झाड उगवलेल. जे आत्ता दिसत नव्हत पण ते त्याला माहित होत. तो अंदाजानेच कठड्यावर बसला. सोबतचा कुत्रा उजवीकडे जायला लागला तसा त्याने त्याचा पट्टा हाताने ओढून त्याला डावीकडे वळवल.

तोंडाजवळचा केशरी रंग संपला. कोरडे ओठ तापायला लागले. तोंडातली सिगरेट बाजूला फेकून खिशातून दुसरी काढून ती पेटवताना काडीतून जी ज्वाळा पेटली त्यात कठड्यावरचे दोन छोटेसे दगड दिसले. सिगरेट पेटवून तोंडातून तसे धूर पुन्हा सुरु झाले. काडी बाजूला पायाशी टाकून उजव्या हातात बाजूचे ते दोन छोटे दगड उचलून त्याने पुढच्या कालव्याच्या पाण्यात टाकले. जड थंडीच्या वातावरणात पाण्यात पडलेले ते दोन दगड हि आवाज करून गेले. तिला पहिल्यांदा इथे आणलेलं. तेव्हा पौर्णिमा होती. त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला त्याने तिला इथे आणलेलं. त्या चंद्राच्या प्रकाशात अंधारलेल काळ पाणी जेव्हा पाण्यात लावलेल्या लाईटसारख दिसायचं त्या पाण्यात दगड टाकून अंगावर उडणाऱ्या पाण्याला बघून हसणारी ती आणि तिला तस खुश बघून मिठीत ओढून घ्यायला उतावीळ होणारा तो. आणि त्या दोघांच्या प्रेमाचा साक्षीदार तो पौर्णिमेचा चंद्र.

तो एकदा या दोघांना बघून पुढे कित्येक दिवस आकाशात यायचाच नाही. आणि यायचा तेव्हाच, जेव्हा हे दोघ भेटायचं ठरवायचे. आज तो आला खरा पुन्हा तिथेच पण आज पौर्णिमा नाही. तो आहे पण ती नाही. म्हणूनच तो चंद्र देखील पूर्ण आला नाही. ती असेल आज कुणासोबत चंद्रप्रकाशात चंद्र बघत. टेरेसवरून. हा होता मात्र अंधारलेल्या वातावरणात तिच्या आवडत्या ठिकाणावर येऊन. हि देखील सिगरेट संपली. कुत्र शांत बसून होत पण तोंडातून जीभ बाहेर काढून धापा टाकत त्याचा आवाज सुरु होता. तिसरी सिगरेट काढली ती पेटवली. आणि तो उभा राहिला. वर बघून त्याने ठरवल आता इथ पुन्हा कधीच नाही यायचं. कोणत्याच कालव्याजवळून जायचं नाही. तिचे सगळे मेसेज डिलीट करून तचे व्हिडीओ, एमएमएस, फोटो सगळ डिलीट करायचे. तिने दिलेलं गिफ्टस फेकून द्यायची. त्याच एक प्रेम ती वाढवू शकली नाही आयुष्यभर मग त्या दोघांनी लावलेलं एक रोप जे त्या दगडाच्या कठड्यापाशी लावलेलं.

ते त्याने धरून उपटण्याचा प्रयत्न केला. पण ते निघाल नाही. दोनदा प्रयत्न झाला पण व्यर्थ. तिने लावलेलं इतक नाजूक रोप जर निघू शकत नव्हत तर मग तिने केलेलं प्रेम सहज कस हृदयातून वेगळ झाल ? या विचारात त्याच्या डोक्यातून कळ आली. तिची आठवण आणि तिचा विचार नकोच म्हणून त्याने कुत्र्याला जायला सांगितल. त्याने तोंडातली सिगरेट ओठातून दातात धरली. खिशातली काडेपेटी काढून त्याने काडी पेटवली. झाडाजवळ जाऊन त्याने त्या प्रकाशात त्या झाडाची नाजूक पान बघितली. तिच्यासारखीच ती नाजूक पान पण अरे हट्ट, नाजुकपणा फक्त बघायचा असतो असा विचार करून त्याने ते रोपट पेटवून टाकल.

कुत्र पुढे थांबलेलं. तिथ जाऊन तो पुन्हा दोघ घराकडे निघाली. उजेडाच्या रस्त्यावर जेव्हा तो आला. त्याने एक रोपट विकत घेतल. आणि घराच्या कुंडीत लावलं.        

copyrighted@2020