भाग ०१
प्रतीक्षाच्या डोळ्यात पाणी आल. तिने त्याला बघितल. रुबाबात कायम हातात सिगरेट नाहीतर मोबाईल घेऊन बसणारा कायम स्वतः हसणारा आणि सोबत जो कुणी असेल त्याला हसवणारा. आत्ता शांत पडून होता. हाताला लावलेलं सलाईन. छातीतला बांधलेल्या पट्ट्या त्यावर पडलेले रक्ताचे ओलसर डाग. चेहऱ्यावरच तेज सगळ निघून गेलेल त्याच्या. त्याला गरज होती पण प्रतीक्षा आत्ता काहीच करू शकत नव्हती.
एकदा भेटायचं ठरलेलं, हि गोष्ट कॉलेजला असतानाची होती. जेव्हा दोघांच भेटायचं ठरल होत, तेव्हा अजिंक्य तासभर आधीच प्रतीक्षाच्या घरासमोरच्या वडाच्या झाडाच्या पारावर मागच्या बाजूला येऊन बसलेला. तिथ अंधार असायचा. आणि तिथ कुणी फिरकायचं नाही. त्यामुळे कायम अजिंक्य आणि प्रतीक्षा तिथ भेटायचे. आणि कधी मिठी मारावीशी वाटलीच एकमेकांना तर वर पारावर चढून झाडाच्या खोडाला टेकून मिठी मारायचे. मग अगदी तिथून कुणी गेल तरी कुणाला हे दोघ दिसायचे नाहीत. आणि असाच भेटायचा बेत दोघांनी केलेला, आणि नेमका हिवाळ्यात पाऊस पडला. तस सकाळपासून आभाळलेल. पण दुपार नंतर गारवा वाढला. कुठ तरी पाऊस पडतोय म्हणून इकडे पडणार नाही अस ठरवून दोघांनी भेटायचं ठरवल होत, पण सगळ फिस्कटल.
पाऊस आला आणि प्रतीक्षाला आईने बाहेर सोडल नाही. हातात तिने छत्री घेतलेली तरी. अजिंक्य केव्हाच तिथ पारावर येऊन बसलेला. छत्री घेऊन आलेला तो. बराच तास तो बसून होता. पण तो घरी गेला नाही. प्रतीक्षा त्याला दुपारी सांगून गेलेली कि मला उशीर झाला तरी मी येईन. मला तुला भेटायचं आहे. आणि त्या एका शब्दावर तो तिथ बसलेला. अजिंक्य तिथ बसलेला पहाटे सव्वा पाचपर्यंत. तेही जाग राहून. जेव्हा सकाळी नळातून बाहेर हवेचा आवाज यायला लागला. तेव्हा प्रतीक्षा दार उघडून झोपेत बाहेर आली. नळ बंद केला आणि तिथच डोळे चोळत उभी राहिली. तीच लक्ष गेल समोर तर झोपाळलेल्या डोळ्यांनी तिला अजिंक्य समोर दिसला पाठमोरा. क्षणात तिची झोप गेली. तिने आवाज न करता दाराला बाहेरून कडी लावली. आणि ती अजिंक्यजवळ गेली. अजिंक्य तिला बघून खुश झाला. जागेवरून उठला. आणि तिने केस एका बाजूला केले आणि ते गुंडाळून वर बांधले. दोघ एकमेकांना बघत राहिले. अंधारात.....अजिंक्यने दोन्ही हात बाजूला करून आळस दिला आणि तेवढ्यात प्रतीक्षाने त्याला इतक घट्ट जवळ घेतल कि, त्याचा आळस मधल्यामधी अडकला. पण रात्रभर थंडीत बसून तिच्या मिठीत जी गर्मी मिळाली. त्याने त्याला बर वाटायला लागल. प्रतीक्षाने अजिंक्यला बघितल. त्या तेव्हाच्या अजिंक्यला आत्ता अस झोपलेलं बघून तिच्या डोळ्यातून पाणी आणखी यायला लागल. जेव्हा अमित गेला तेव्हा अजिंक्य आणि प्रतीक्षा भेटले. आणि मग त्याच तिच्यावरच प्रेम बघून प्रतीक्षा सगळ सोडून जेव्हा त्याच्या दारात आली. त्याने कोणता हि एक प्रश्न न विचारता तिला आणि साराला घरात घेतल होत. तो खंबीर अजिंक्य आत्ता बेजीव होऊन पडलेला. तिने डोळे पुसले. डॉक्टर नव्हते. बहुतेक ते केव्हाच गेलेले. ती अजिंक्य जवळ जाऊन बसली. त्याच्या केसातून हात फिरवत ती त्याला एकटक बघत बसली.
भाग ०२
प्रतीक्षा अजिंक्य जवळ दोन दिवस सलग बसून होती. अजिंक्य शुध्दीत आला नव्हता. प्रतीक्षाची नुसती धावपळ होत होती. बाळाला बघून दुध पाजून, साराच खायचं प्यायचं बघून अजिंक्यजवळ पण बसायचं. यात तीच तिच्याकडे लक्षच काही नव्हत. बाळाला गरज होती तिची पण ती दवाखान्यात त्याला आणू शकत नव्हती. बाळ दिवसभर रडत होत. जेव्हा प्रतीक्षा संध्याकाळी जायची घरी अजिंक्यला डबा आणायला तेव्हाच बाळ तिला बघून शांत व्हायचं. तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी डॉक्टर आले. त्यांनी अजिंक्यला बघितल. त्याला एक इंजेक्शन मांडीत दिल. आणि प्रतीक्षाला काही गोळ्या लिहून दिल्या.
डॉक्टर : मला नर्सकडून कळाल हे मोठे लेखक आहेत.
प्रतीक्षा : हो.
डॉक्टर : मी पहिल्यांदा ऐकल यांच नाव. मला इथून वेळ मिळत नाही. आणि वाचन तर अजिबात आवडत नाही. त्यामुळे याचं मी काही वाचल नाही.
प्रतीक्षा : बर.
डॉक्टर : बर, हि औषध आणून ठेवा. दुपारी डोस द्यावा लागेल. आणि हे इंजेक्शन उद्यासाठी लागेल ते हि आणून ठेवा संध्याकाळीपर्यंत.
प्रतीक्षा : रोज येतात ते आले डॉक्टर नाहीत का ?
डॉक्टर : हा ते मुंबईला गेलेत मोठ एक ऑपरेशन आहे. त्यामुळे या पेशंटला मला बघायला सांगितल आहे.
प्रतीक्षा : ठीक आहे मी आणून ठेवते औषध.
डॉक्टर निघून गेले. आणि हळू हसण्याचा आवाज आला. प्रतीक्षा मागे वळून बघते. अजिंक्य निम्मे डोळे उघडून हसतो. प्रतीक्षा पटकन त्याच्या शेजारी जावून बसते. त्याच्या केसातून हात फिरवत विचारते,
प्रतीक्षा : कस वाटतय अजिंक्य ?
अजिंक्य : आजपर्यंत मला न ओळखणार कधी कुणी भेटल नाही. आणि माझा इलाज होतोय अशाकडून ज्याला मी कोण आहे हे माहितच नाही. आणि हे मला समजल्यावर मला कस वाटत असेल काय वाटत तुला ?
प्रतीक्षा : तू नको ना विचार करू या कशाचा.
अजिंक्य : मी जिवंत आहे फक्त तुझ्यासाठी. तुझ्यासाठी मनात जगायची एक इच्छा आहे म्हणून आत्ता पुन्हा डोळे उघडलेत वाटत माझे. प्रतीक्षा एक सांगू का ?
प्रतीक्षा : काय अजिंक्य ?
अजिंक्य : माझ तुझ्या खूप प्रेम आहे. जगात कुणी कुणावर करत नाही इतक प्रेम आहे तुझ्यावर. मला तुझी साथ हवीय कोणत्या हि गैरसमजा शिवाय. मी चुकलो पण माझ्यापासून लांब होऊ नको. मी जे जगलो ते माझ्या मुलांना नको आयुष्य. बिनबापाच आयुष्य मला माझ्या बाळाला आणि साराला नाही द्यायचं.
प्रतीक्षा : शs.. तू शांत पडून रहा मी आहे. कायम तुझ्यासोबत आणि तुझीच आहे म्हणून आपण वेगळे होऊन पण पुन्हा अमित गेल्यानंतर पण एकत्र आलो. हेच आपल नशीब आहे. तू माझ्या आयुष्यात आहेस. आपल आयुष्य एक आहे. तू शांत राहा. नको कसले विचार करू. झोप मी आहे. अजिंक्यने तिला जवळ घेतल. आणि प्रतीक्षाने त्याचा ओठांना आपल्या ओठात घेतल. आणि अजिंक्याच्या डोळ्यातून पाणी आल. ते बघून प्रतीक्षा हि ओल्या डोळ्यांना घेऊन खिडकीपाशी गेली. आणि बाहेर बघायला लागली अजिंक्यकडे पाठ करून.
भाग ०३
अजिंक्य तिच्याकडे बघतो. प्रतीक्षा पाठमोरी डोळे पुसत उभी असते. तो स्वतःच्या हातातली सलाईनची सुई काढायला जातो पण तेवढि ताकद नसते त्याच्यात. तो प्रयत्न करतो पण नाही जमत.
अजिंक्य : प्रतीक्षा...
प्रतीक्षा मागे वळून बघते, आणि त्याच्या जवळ जाते.
प्रतीक्षा : काय ?
अजिंक्य : मी आहे ठीक, तू घरी जाऊन ये.
प्रतीक्षा : नको. इथ आत्ता कोण नाहीये तुझ्याजवळ. आणि नेहमीचे डॉक्टरपण नाहीयेत इथ.
अजिंक्य : हो, पण बाळाला भूक लागली असेल. वरच दुध पिऊन त्याच पोट नाही भरणार. आणि भरल तरी अंगाला नाही लागणार. तू जा. माझ्यापेक्षा त्याला गरज आहे तुझी. आणि साराला पण करमत नसेल. तिला पण थोड खायला घाल आणि मग ये ना. मी आहे. काळजी करू नको.
प्रतीक्षा : घरी आई आहे अजिंक्य. इथ कुणी नाहीये.
अजिंक्य : मी आहे. तू जा. हव तर जास्त वेळ नको थांबू पण घरी जाऊन ये.
प्रतीक्षा : नक्की जाऊ ?
अजिंक्य : हो.
प्रतीक्षा निघाली. अजिंक्यच्या चेहऱ्यावरून एकदा हात फिरवला आणि निघाली.
अजिंक्यने डोळे मिटून घेतले. तो झोपून गेला. प्रतीक्षा घरी आली. तिने बाळाला तीच दुध पाजल. साराला खायला देऊन बाळाला झोपवून ती आईला मदत करून तिने चहा आणि बिस्कीट खाल्ल फक्त. आणि अजिंक्यसाठी जेवणाचा डबा भरून ठेवला. आतल्या खोलीत जाऊन तिने कपाट उघडल. त्यातले काही बॉक्स उघडून पुन्हा कपाट बंद केल आणि तिने एक कॉल केला.
प्रतीक्षा : हेल्लो, आनंद जोशी बोलतायत का ?
आनंद : हो, आपण ?
प्रतीक्षा : प्रतीक्षा अजिंक्य भोसले.
आनंद : म्हणजे रायटरच्या मिसेस का ?
प्रतीक्षा : हो.
आनंद : बोला ?
प्रतीक्षा : तुम्हाला नवीन मालिकेसाठी स्टोरी पाहिजे का ?
आनंद : पाहिजे तर आहे. पण अजिंक्यची नको.
प्रतीक्षा : का ? त्याच्या मालिका तुम्हाला हि माहित आहेत किती फेमस होतात.
आनंद : हो माहित आहे. पण त्याची स्टोरी घेतली तर माझ्या बाकीच्या दोन मालिका बंद करून टाकतील इंडस्ट्रीतली माणस. आणि एका स्टोरीसाठी दोन मालिकांचा तोटा नाही सहन करून चालणार मला.
प्रतीक्षा : बर मग मी पैसे लावते, तुम्ही फक्त मालिका बनवा आणि प्रसिद्ध करा.
आनंद : अहो, पैसे तुम्ही लावला तरी मालिकेच्या स्टोरीला अजिंक्य सरांच नाव लागेलच ना. दुसऱ्या कुणाच्या नावावर मालिका सुरु करायची असेल तर सांगा लगेच करू काम सुरु. पैसे पण मी लावतो. स्टोरी तुमची नाव फक्त दुसऱ्याच.
प्रतीक्षा : नको, सॉरी. नाव लागल तर अजिंक्यचच लागायला हव.
आनंद : मग माझ्याकडून काहीही मदत होऊ शकत नाही.
प्रतीक्षा : बर.
कॉल कट झाला. त्यानंतर तिने दोन आणखी नंबर शोधले तीन-चार वेळा कॉल लावून बघितला पण लागला नाही. तिने काही बॉक्स घेतले आणि ती एका ज्वेलर्समध्ये गेली.
भाग ०६
प्रतीक्षा अजिंक्य
जवळ बसली. अजिंक्य झोपलेला. अजिंक्यची एक डायरी जी तिला हवी होती. ती तिला सापडत
नव्हती. अजिंक्य झोपेतून उठल्यावर त्याला विचारायचं म्हणून ती त्याची वाट बघत
होती. बराच वेळ अजिंक्य शांत पडून होता. प्रतीक्षा पूर्ण विचारात हरवलेली.
संध्याकाळची वेळ. प्रतीक्षा भेटणार होती सात वाजता आणि आली नऊ वाजता. घरी काहीतरी
काम लागल आणि मग ते केल्याशिवाय तिची सुटका होणार नव्हती. बर काम झाल तरी कित्येक
प्रश्न आणि त्यांची उत्तर देऊन तिथून निघताना घरातल्यांच्या नजरेत येणार नाही अस
तरी आणि अजिंक्यला आवडेल अस आवरून मग निघेपर्यंत वेळ झाला. आणि अजिंक्य हि तिथच
थांबलेला. तिला येताना बघून तो त्याचे डोळे मिटून बसला. शांत. प्रतीक्षा आली तिने त्या
हाक मारली. मग त्याला हात लावला. मग त्याला चिमटा काढला तरी तो गप्पच. मग तिने
त्याला पोटाला गुदगुल्या केल्या तरी तो गप्पच. मग मात्र प्रतीक्षाच काळीज थंड पडल.
तिने त्याला जवळ घेतल. ते जिथ भेटलेले त्या बागेत तिथल्या जागेवर बरेचसे जोडपी
प्रत्येक एक झाड बघून त्या खाली असलेल्या बाकड्यावर बसायचे. तिथ जास्त प्रकाश हि
नव्हता. तिने त्याला जवळ घेतल. आणि तिची ती धडधड वाढलेली ऐकून अजिंक्यने जिथ तीच हृद्य
धडधड करत होत तिथे त्याने स्वतःचे ओठ टेकवले. आणि प्रतीक्षाच्या डोळ्यातून पाणी
आल. जे त्याला नाही दिसल. पण त्याला ते जाणवल. तिने मग त्याला जवळ घेतल. आणि परत
अस कधीच करू नकोस मला कधीच हे सहन नाही होणार. तू माझा श्वास आहेस. आणि मला श्वास
नसेल तर माझ काय होईल म्हणून त्याला ओरडली. या विचारातून बाहेर ती आली आणि तिने
अजिंक्यला बघितल. त्याचे श्वास मघापेक्षा कमी झालेले तिला जाणवले. ती अजून
त्याच्या जवळ सरकली. तिने त्याचा हात हातात घेतला. आणि त्याचे श्वास ऐकले.
खूप कमी होते. ती
पटकन बाहेर गेली. दोन नर्स घेऊन ती आत पुन्हा आली. नर्सने एक इंजेक्शन दिल. आणि
त्यातली एक नर्स तिथेच थांबली. प्रतीक्षा भरलेल्या डोळ्याने शांत बसून होती.
थोड्यावेळाने अजिंक्यचे श्वास पुन्हा ठीक झाले. प्रतीक्षाला आता चक्कर आल्यासारखं
होत होत. तिला जेवायचं होत पण अजिंक्यला सोडून कुठ जाऊ वाटत नव्हत तिला.
इकडे, अजिंक्यच्या एका
पुस्तकाला वाचून एकीने एक नव आयुष्य जगलेल. जे तिला हव होत पण कधी मिळालच नव्हत.
अजिंक्यला एकदा भेटाव म्हणून ती काहीही करायला तयार होती. आणि तिने मग एक कॉल
लावला पुस्तकाच्या पब्लिशर्सना. त्यांच्याकडून अजिंक्यचा नंबर मिळवला. पण कॉल
लागला नाही. सोशल मिडीयावर खूप शोधलं तरी काहीच पत्ता नाही. आणि मग तिने ठरवल
काहीही करून भेटायचंच अजिंक्यला. आणि त्यासाठी तिने तिच्या नवऱ्याला अजिंक्यच्या
पुस्तकांची नाव सांगून ती विकत आणायला लावली आणि तिच्या मावस बहिणीला अजिंक्य
कुठला आहे हे शोधायला सांगितल.
तिकडे, प्रतीक्षा
तशीच बसून राहिली. बराच वेळ बसल्यावर तिचा डोळा लागला. नर्स पण मग अजिंक्यला एकदा
तपासून निघून गेली. अजिंक्यला जाग आली. त्याने बघितल प्रतीक्षा त्याच्या पायाशी
बसून होती. आणि बसल्या बसल्याच झोपून गेलेली.
9 Comments