WARNING..!

ब्लॉगवरील कोणतेही लेख कॉपी पेस्ट करून स्वतःच्या नावाने शेअर करू नये तसेच कोणतीही कथा किंवा त्यातले प्रसंग वा संवाद कोणत्याहि वेब मालिकेत, फिल्ममध्ये विनापरवाना वापरू नये तसे आढळल्यास 5,000,00 रुपयापर्यंतचा दंड कायदेशीररित्या भरावा लागेल,आणि/किंवा तीन वर्ष कैद होऊ शकते.

रावण : हा ताज घालायच्या लायक आहे

ram ramayan sita  rawanभाग ०१
 :  काय वाटलं वाचून हे .. हे रामायण.
 : खूप भारी होत. काहीतरी वेगळं अस. साऊथच्या फिल्मसारखा ड्रॅमा. हॉलिवूडसारखा थ्रिल. आणि त्याला पूर्णपणे इंडियन टच. खूप मस्त वाटलं.
: राम कसा वाटला...? 
: देव म्हणून माहीत होता पण त्याला देव का मानतात हे माहीत नव्हतं. पण रामायण वाचून समजलं त्याला देव का मानतात ते. तो त्या लायक आहे. 
: सीता कशी वाटली?
: आउटस्टँडिंग... म्हणजे टिपिकल भारतीय नारी. पतिव्रता स्त्री म्हणजे काय हे तिला वाचताना समजलं. 
: आणि रावण कसा वाटला ?
: प्रत्येक गोष्टीत व्हिलन असतो तसा रावण ही मला एक व्हिलन वाटला. सीता पळवून त्याने रामाला ललकारल. त्यातून युद्ध आणि मधेमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. त्याचा अंत त्याला माहित असून देखील त्याने सीतेला पळवल. का अस केलं हे मात्र मला समजत नाहीये. विष पिल्यावर माणूस मरणारच. हे माहीत असून देखील विष पाण्याऐवजी कोल्ड्रिंक किंवा दारूत ओतून प्यायलं तर माणूस मरण्याचे चान्स कमी होत नाहीत. मरायचंच असेल तर विष सरळ कच्च पिऊन मरावं. त्याला पाणी आणि दारूचे बहाणे कशाला ? मरायचंच होत तर रावणाने हे सीता पळवायच कांड करायचंच कशाला ? आणि पळवून आणून केलं काय त्याने. द्रोपदीसारखी तिची साडी फेडली नाही. तिला जवळ घेतलं नाही. मग या सगळ्याचा उपयोग काय ?
: लोक यालाच देवाची करणी म्हणतात. त्याच मरण असच होत म्हणून रामायण घडल.
: म्हणजे त्याच्या एका मरणासाठी एवढ रामायण घडल का... हे पटत नाही मला.
: हे तुझं म्हणणं आहे बरोबर ? मग मला सांग तू म्हणते रावणाने काही केलं नाही म्हणून तू रामायणाला बिनकामच समजते. त्याने सीतेसोबत काही केलं नाही हे तुला रामायण वाचून समजलं. आणि हे बाकीच्यांना ही समजलं तरी रावणाला लोक शिव्या घालतात अस का बरं असेल ?
: सीतेला पळवल म्हणून.
: मग रावणापासून सीतेला आणल्यावर रामाने ही तिच्या चारित्र्यावर संशय घेतलाच होता. त्यासाठी तिने अग्नीत उडी ही घेतली होती. स्वतःला प्रुफ करायला. मग त्या संशयी रामावर का कुणी बोट धरत नाही?
: पण राम देव आहे.
: रावण जिवंत राहिला असता तर तो ही श्रीलंकेत देवच असता.
: जाऊदे ना हा विषय आपला नाही.
: हो अस ही रामायण वाचण्यासारखी पिढी आत्ता उरली नाही.
: हो.. 
: रामायण आजकाल वाचायला ते बोल्ड असेल तर वाचतील लोक. त्यात सीता पतिव्रता असावी पण तिचे अफेअर ही असावेत. राम जसा शांत आहे तसा तो मुळीच नसावा. 
: आणि रावण ?
( मोबाईलमध्ये एक कथा सुरु करून तो तिच्याकडे बघतो )
: माझ्याकडे एक खरी घडलेली गोष्ट आहे. ते पण लिहिलेली. त्यावर एक स्क्रिप्ट पण लिहिलिय मी. त्याच काम अजून सुरू आहे. बघू असा कुणी प्रोड्युसर भेटतो का ज्याला यातला राम नाही रावण पटेल.
: स्टोरी बोल्ड आहे ?
: नव्हती पण केलीय. त्याशिवाय कोण बघणार.
: मला कधी देतोयस स्क्रिप्ट वाचायला ?
: तू कशाला कष्ट घेतेस. मी दाखवतो की वाचून..
: नको. मागची तुझी प्रेमाची शप्पथ आहे तुला .... ऐकवताना तू जे सिन केलेत ना माझ्यासोबत, अजून लक्षात आहेत. स्टोरी वाचून माणूस त्यात हरवतो मान्य आहे पण तू स्टोरी वाचत स्टोरी सारखा वागत ते माझ्यासोबत करत होतास. 
: बर बाबा कॅफेमध्ये बसू एका. ठीक आहे ? अस ही ती स्क्रिप्ट पूर्ण रेडी नाही. बघू सांगता सांगता काही सुचल तर.. आणि स्क्रिप्ट रेडी नसताना काही चाळे करणार नाही मी. यु डोन्ट वरी.
: चालेल. चल मग कॅफेत बसू आणि बोलू. नको नाहीतर आपण घरीच जाऊ तुझ्या. शांततेत मला विचार करायला ही वाव मिळेल.
: चालेल. चल.
writholic best marathi story treanding marathi


भाग : ०२
( रस्त्याने चालत असताना )
: रामायण बाहेर कुठे घडलं असत तर ते इथल्या प्रत्येक घरात पडून असत. "वर्ल्ड वाईड बेस्ट सेलिंग नोवेल" या लेबला सकट.
: हो ना. 
: पण ते इथं घडलं यात इथल्यानं अप्रूप वाटत आणि मला त्याच दुःख होत. इथलं असून इथलं मी जास्त जाणत नाही. रावणाला दहा तोंड आणि एक हजार हात होते. यात विशेष काही वाटत नाही. कारण प्रत्येक देवाला इथं बेसिकली चार हात तर असतातच असतात. पण मार्व्हलचा हल्क जी काही करामत करतो त्याच मात्र कौतुक या तोंडचं त्या तोंडी करून थकत नाही कुणी इथ.
: यात चुकी कुणाची....?
: कुणाचीच नाही. रामायण हा अभ्यासाचा विषय आहे. तो ज्याने त्याने आपल्या मर्जीने करावा. तो लादून चालणार नाही. आणि आपल्या इथे लादल्या शिवाय कुणी करत नाही. असो. थांब कुलूप उघडतो.
: आज पण घरी कुणी नाही का ?
: साताऱ्याला गेलेत सगळे. परवा येतील. तोवर या घरातला रावण मीच..... आणि ही माझी सिमेंट प्लास्टरची लंका......त्यात तुला मी पळवून आणलेली तू सीता... आता तुझं काही खर नाही. कारण इथं कुणी राम येणार नाही. हनुमान वरून यायला वर अजून तीन मजले आहेत. जिथे देशमुख, भोसले, पवार राहतात. आणि समोरून सेतू पूल बांधून यायला पुढे तर मेन रोड आहे त्यामुळे सगळीकडून नुसती हार... आता तुझं काही खर नाही.
: बस झाली मजा आता स्क्रिप्ट आण आणि वाचून दाखव.
त्याने तिला जवळ घेतलं. तिच्या ओठांना किस करून जिभेच्या टोकाने तिच्या जिभेला टेकवत तिची जीभ आपल्या ओठात घेत.. मग तिच्या ओठांना घट्ट आवळत तिला मिठीत घेतल. मिठी सुटली आणि तो आत गेला.......
आतून एक डायरी आणली. ती उघडून तो सोफ्यावर बसला. ती त्याच्या डाव्या बाजूला बसली. सकाळ असल्यामुळे उजेड होता. पण मोठ्या खिडक्यांवर पडदे झाकलेले. त्यामुळे अंधारल्यासारख झालेलं. भिंतीवर एक चित्र लटकवलेल. त्यावर एक प्रकाश टाकणारा बल्ब होता. त्याचा चंदेरी प्रकाश त्या खोलीत पसरलेला.
तिने हातातला मोबाईल बाजूला ठेवला. त्याने मोबाईल त्याचा बंद केला मग डायरी उघडली.
: स्क्रिप्ट मी लिहिलीय पण अजून मला हिरो हिरोईनच नाव सुचल नाहीये. सो तू, तो आणि ती असच समज. आणि त्यातला विलन त्याला रावण समज.
: बर चालेल.
: तर.. सुरु करतो...तिला तो मिळाला.. तो देवाच खूप करायचा. आणि हिला हि खूप देवांच वेड. पहिल्यापासून एका रामाच्या देवळात हि दर रविवारी जायची.

येता रविवार या महिन्याचा शेवटचा रविवार होता. महिना होता जून. तारीख होती तीस. घरातून ती जायला निघाली. मागून आवाज आला “ कुठ चाललीस ?” ‘रामाच्या देवळात चाललीय.’ “का ? घरात देव नाहीत का ? त्या देव्हाऱ्यात बाजार भरलाय ते पुजायचे सोडून तिकड जायची थेर कशाला ? का दुसरा कुणी राम बघितलय त्या देवळात ?” ‘काही काय बोलता तुम्ही. मी देवाला जाते. आणि माझ लग्न झाल आहे तुमच्याशी. मी का कुणाचा आणखी विचार करू ?’ “करू पण नकोस...जीव घेईन तुझा. आणि असा तसा नाही असा कापीन ना कि, तडफड पण करता यायची नाही. माझा सोडून कुणाचा विचार करायचा सुध्दा नाहीस. नाही तर मेलीच समज तू” ‘मी देवाला जाऊ कि नको. इतके वर्ष मी जातेय. कुणासाठी ? आपल्याचसाठी ना. तुम्हाला अजून आयुष्य मिळो मुलीला आपल्या भविष्यात चांगल घरदार मिळो. आपला संसार टिकवा म्हणूनच जाते ना. तरी तुम्हाला संशय का येतो. ? का मी सुंदर दिसते म्हणून का ? पण मी काय तरूण मुलगी आहे का ? अडतीस वय आहे माझ. तुमच बेचाळीस. काय राहीलय आपल ? दहा बारा वर्ष. मग काय उरणार आहे ?’ “वय बघून फक्त लग्न होतात.... प्रेम आणि सेक्स नाही.” ‘म्हणजे तुम्हाला वाटत मी आवरून बाहेर जाते म्हणजे कुणी माझ्यासोबत, काही करेल आणि मी करू देईन.....शी... इतका वाईट विचार कोणता नवरा करतो आपल्या बायकोबद्दल...?’ “सगळेच करतात. जेव्हा त्याची बायको त्याच्यासमोर आवरून निघून जाते त्याला सोबत न घेऊन जाता” ‘हो पण बायकोला तीच अस आयुष्य नाहीच का काही...संसार करतेच ना ती. मग घराबाहेर पडायला इतकी तिला बंधन का ? आणि आवरून जाणारी प्रत्येक स्त्री प्रेमाच्या शोधात आणि सेक्सच्या नादात असते अस कुठे असत का ?
भाग ०३
मी देवळात जात होते. त्यात हि तुम्हाला अडचण असेल तर ते हि बंद करते. मुलीला शाळा नसते म्हणून मी थोडी मोकळी असते. म्हंटल निदान एखाद दिवस तरी विरंगुळा आणि भक्ती करावी. पण तो हि आनंद तुम्ही काढून घ्या. बस एवढ सांगा त्या देवळाच्या वेळेऐवजी मी काय करू घरी ?’ “काय करू म्हणजे ? मी काय मेलोय का ? का माझा उठत नाही ? प्रेम कर माझ्यावर. दुसर अजून काय राहिलंय. किती तोंड रंगवल तरी बाहेरचा तुझ्याजवळ फक्त झोपायलाच येणार आहे. प्रेम बीम... विसर..... तू माझी बायको आहेस. तुझ माझ्यावर प्रेम आहे.” ‘आणि तुमच माझ्यावर प्रेम नाही का ?’ “नसत तर तुला इथ राहू दिल असत का ?” ‘मग आहे तर ते व्यक्त करा. मला साथ द्या. हा संशय. घाणेरडे माझ्याबद्दलचे विचार का मनात आणता ?’ “दुसऱ्यांनी करण्यापेक्षा मी केलेला बरा” ‘मला याचा त्रास होतो. किती होतो नाही कळत तुम्हाला. स्त्रीच मन कधी कळणार नाही कोणत्याच पुरुषाला.’ “काय समजून घ्यायचंय ? दोन वेळेच खायला आहे. कपडे आहेत. गाडी दिलीय तुला. वर अधून मधून आपण बाहेर जातो. आठवड्यातून तू म्हणतेस म्हणून तीन चारदा सेक्स करतो. अजून या पेक्षा वेगळ काय हवय ?” ‘सगळ आहे पण यात प्रेम कुठ आहे ? आत्ता जी यादी वाचलीत यात तू म्हंटलीस म्हणून सगळ माझ्या नावावर खपवलत तुम्ही पण यात एक तरी वाक्य म्हणालात का कि हे मी केल मला वाटत म्हणून ? नाही....यात तुमच प्रेम कुठच नाही.’ “तोंड बंद कर. तमाशा करायला लावू नकोस. मी शांत आहे तोवर शांत आहे.” ‘ठीक आहे. मी जात नाही देवळात.’
: ती आतल्या खोलीत जायला निघाली. आणि.. थांब पान पलटतो. हा, आणि तो बोलला, “तू जा देवळात.” ‘नको. मी बसते घरात. तुम्हाला तेच हव आहे ना ?’ “मी बोललो ना जा. मग आता जायचंच.” ती दारात गेली. तिने छत्री घेतली. “ती इथच ठेव आणि जा” ‘पाऊस पडेल बहुतेक.’ “पडू दे. पावसाळा आहे. तो पडणारच. तू छत्री ठेवून जा.” ‘अहो पण,’ “जा लवकर चल. मला दार लावू दे. मला झोप आलीय.” ती छत्री ठेवून निघून गेली. पाऊस पडायला लागला. ती एका आडोशाला थांबली. पण कमी होत नव्हता. आणि आडोशाला अस किती वेळ थांबणार ? इथे वेळ झाला तर देवळात जाऊन यायला उशीर होईल आणि घरी जाऊन पुन्हा संशयाचे प्रश्न. त्यापेक्षा जाव भिजतच. ती निघाली. देवळात जाऊन दर्शन घेऊन ती बाहेर पडली. भिजलेली ती. आत लोक कोरडे होते. त्या सर्वांच लक्ष तिच्याकडे जात होत. अंग चोरून घेत ती बाहेर आली. आणि घराकडे निघाली. घरी जाऊन साडी बदलावी तर त्याने दार उघडल. तिला आत जाऊ न देता जेवण बनवायला सांगितल. त्याच ओल्या अंगाने तिने जेवण बनवल. मुलीला जेवायला सांगून तो तिला कपडे बदलायला सांगतो. तिची साडी बदलून झाली. केस पुसायला गेली. तो तिच्या मागे उभा राहतो. तिला सॉरी म्हणतो आणि मागून मिठी मारतो. शेवटी ती स्त्री...च. पुरुषाच्या स्पर्शाने पिघळणारच. तिने हातातला टोवेल खाली सोडला आणि त्याच्या मिठीत शिरली. त्याच्या प्रत्येक स्पर्शात ती प्रेम शोधत आणि स्पर्शाला प्रेम मानत त्याची होत गेली.
खांद्यावरचा पदर सुटून केव्हाचा कमरेला मिळाला. खोलीच दार बंद झाल. मुलीच जेवण सुरु होत.
तिच्या तोंडून आ...ह... चा आवाज सुरु होता. मुलीला तो ऐकू जावू नये म्हणून ओठांनी ओठ चावत आवाज कमी करत होती ती. आणि त्याने तिला त्याच क्षणाला विचारल......”नवीन नाही न कुणी अजून मिळाल ?”
‘नाही हो.. तुमचाच स्पर्श आहे मला फक्त.’
आणि पुढे प्रेम सुरु राहील.
थोड्यावेळाने तो तिच्यावरून बाजूला झाला. आणि दार उघडून बाहेर आला. जेवण जेवायला सोफ्यावर बसला. टीव्ही लावला. ती उठली आणि तिने त्याला ताट भरून आणल. आणि त्याला दिल. ती आत जावून मुलीसोबत बोलत बसली. 
marathi blogger top blogger ajinkya arun bhosale w r i t h i l o l i c a b c d r e z

भाग ०४
: म्हणजे त्याने तीच प्रेम घेतल. ओरबाडून. तिच्या मनाविरुद्ध.
: नवऱ्याचा तो हक्कच असतो.
: म्हणजे तू पण असच करणार का माझ्यासोबत ?
: नाही ग. मी या स्टोरीबद्दल म्हणतोय. त्यातला तो आहे त्याचा स्वभाव सांगतोय. त्याने तिच्यासोबत कधी हि कराव. काहीही कराव. काहीही करायला सांगाव आणि तिने ते कराव. आणि करावच. बायको आहे त्याची ती. आणि अस हि ती त्याच्यात आणि त्यांच्या मुलीत अडकलेली आहेच. त्यामुळे हे अडकवण कधी न सुटणार आहे.
: मग आता ?  पुढे.....

: दिवस चाललेत असेच. एकदा रविवारी त्याला सुट्टी होती. तिला सकाळी सकाळी त्याने सांगितल कि, कुठलीतरी फिल्म बघायला जाऊ. तिथून हॉटेल. मग पुढे एखाद म्युझियम आणि पुन्हा रात्री हॉटेल करून घरी यायचं. सगळा दिवस बाहेर घालवायचा. सगळ तसच झाल. दिवस संपत आला. ती खूप खुश होती. नवरा मुलगी आणि ती स्वतः. 
अस जास्त कधी त्याचं फिरण व्हायचं नाही अस नाही. तो कधीतरीच तिरसटपणे वागायचा. पण बाकी वेळीस एकदम चांगला. आणि म्हणूनच तिचा त्याच्यावर खूप जीव होता. तिच पहिल प्रेम, किस, सेक्स आणि तीच पहिलं बाळ हे सगळ त्याच्याकडूनच मिळालेलं तिला. तो नसेल तर ती नाही असाच समज तिने तिचा करून घेतलेला. संध्याकाळी जेवून आल्यावर मुलगी झोपून गेली. हे दोघ दुसऱ्या खोलीत बसलेले. ती कपडे बदलत होती. तो हि तेच करत होता. ती बोलायला लागली, ‘मी आज देवळात नाही गेली. प्लीज जाऊन येऊ का दहा मिनिटात ?’ “आत्ता ? नऊ वाजून गेलेत.” ‘सवय आहे ती मोडली तर अशीच मोडून जाईल.’ “मला मूड झाला. म्हणून मी निम्मे कपडे पण घालयचे राहू दिलेत. म्हंटल दिवसभर खुश आहेस. कंटाळली आहेस तर जरा मोकळ होऊ.” ‘बर. नाही जात.’ “ये जाऊन.” ‘नको जाईन नंतर.’ “ये तू जाऊन. मी थांबतो झोपायचा. फक्त लवकर ये.” ‘तुम्हीपण चला ना.’ “नको. मी तो पर्यंत काम करतो माझ उरलेलं. फक्त लवकर ये” ती निघाली. देवळात गेली. दर्शन घेतल. बाहेर पाऊस सुरु झालेला. छत्री विसरली. पुन्हा भिजत घरी जायचं होत तिला. ती आडोशाला थांबली देवळाच्या दारात. पण तिनेच विचार केला, अस हि घरी जाऊन नवऱ्याच्या मिठीतच झोपायचं आहे तर भिजले तर अजून खूप छान वाटेल. ती निघाली. आठ दहा पावलं चालली असेल ती. पुढे एकजण डोक्यावरची छत्री कुठे तिरकी धरून चारचाकी गाडीखाली काहीतरी करत होता. ती अजून पुढे गेली. तर तिथे एक कुत्रा आणि एक कुत्री हि भिजत उभे होते. पावसामुळे काही वर्दळ नव्हती. थोडासा अंधारा रस्ता होता. खांबावरची लाईट होती पिवळसर पण पावसामुळे त्याचा हि प्रकाश मोठा नव्हता. तिला बघून तो उठला. ;एक मदत हवीय तुमची कराल का ? ‘काय ?’ ;इथे गाडीखाली कुत्र्याच पिल्लू अडकल आहे. म्हणजे गाडीखाली गटार आहे छोटस आणि त्यात पिल्लू अडकल आहे. गाडी कुणाची आहे काय माहित. मला आवाज आला म्हणून मी मोबाईलची लाईट लावून बघितली तर एक पिल्लू तिथ अडकलय त्या गटारात आणि त्याला वर चढता येईना छोटस आहे पिल्लू. तिने मान डोलवली. त्याने तिला छत्री दिली. तिने स्वतःच्या डोक्यावर धरली. आणि जराशी खाली वाकून मोबाईलचा प्रकाश गाडीखाली पाडला. त्याने त्या प्रकाशात खाली अगदी रस्त्याला लागून वाकून हात खाली नेऊन त्या पिल्लाला बाहेर काढल. आणि त्या कुत्रा कुत्री जवळ सोडल. तो उठून पावसाच्या पाण्यात हात भिजवायला लागला. कुत्रा कुत्री आणि पिल्लू पळत एका दुकानाच्या आडोशाला गेले. आणि कुत्री पिल्लाला चाटून स्वच्छ करायला लागली. त्यांना बघत हे दोघ खुश झाले. नकळत तो तिच्या छत्रीत शिरून डावा खांदा भिजवत चालत होता.
भाग ०५
पावसाचा फक्त आवाज होता. बाकीचे आवाज जणू ते काही नसतातच. अस सगळ शांत होत. ;आभारी आहे तुमचा खूप. मी प्रयत्न करत होतो पण मला धड दिसत नव्हत अंधारात. आणि मोबाईल तरी पावसात कसा धरणार ? पण तुमच्यामुळे ते पिल्लू निघाल. आणि ते कुत्रा कुत्री किती खुश झाले. ‘हो. पण अस काही नाही. बाहेर तर तुम्हीच काढलत. आणि कोण इतका विचार करत. माणस माणसांचा विचार करत नाही तुम्ही एका पिल्लाचा केलात. हीच गोष्ट खूप मोठी आहे. ;मनातल प्रेम मनातच उरत तेव्हा ते कृतीतून उतरत. ते सांगाव लागत नाही. दाखवाव लागत नाही. ती समज उमजते अगदी सहजपणे. आणि मुख्य म्हणजे ते प्रेम सर्वांसाठी सारख असत. तो मग माणूस असो प्राणी असू किंवा एखादी वस्तू. ‘हो.  ;तुम्हाला वेळ तर नाही ना होत ? ‘हो. जायचं आहे मला. हे वाट बघत बसले आहेत घरी. ;कुठे आहे तुमच घर. म्हणजे... तिथपर्यंत सोडल असत तुम्हाला. उगीच भिजत कशाला जाता. ‘ओह....सॉरी माझ्या लक्षातून गेल हि छत्री...हि...छत्री तुमची आहे. आणि मघापासून मी माझ्या हातात धरलीय. ;अहो काही हरकत नाही तुम्हाला गरज आहे. तुम्ही मागच्या वेळीस हि भिजत निघाला होतात घरी. ‘तुम्हाला कस माहित ? ;मी हि या देवळात येतो दर रविवारी. आज जरा काम होत त्यामुळे उशीर झाला. पण म्हंटल सवय आहे तर मोडायला नको. घरी जाण्याआधी देवळात जाऊन याव. म्हणून आलेलो. निघताना कुत्र्यांचा आवाज आला म्हणून थांबलो. ‘बर बर. माझ घर इथून पुढे आहे जरा मी येते तुम्ही या उगीच तुम्हाला उशीर व्हायचा. ;रात्र होत आलीय. आणि रात्रीत उशीर नसतो. उजडेला उशीराच भय असत रात्रीला नाही. कारण उशीर हाच एक मोठा अंधार असतो. ‘बर. ;चला तुम्ही घराच्या अलीकडे जिथवर तुम्हाला योग्य वाटेल तिथपर्यंत तुम्हाला सोडायला येतो. ;ठीक आहे. पेठेच्या अलीकडे थोड सांगेन मग तुम्ही या. ;हो.
;एक विचारू का ? म्हणजे अस आपण अनोळखी आहे आणि हे असे प्रश्न विचारण चूक आहे पण विचारू वाटतय. ‘काय ?’ ;तुम्ही या देवळात येताय खुप दिवस मी बघतोय तुम्हाला. तिने तिची चाल हलकीच धिमी केली. त्याला जाणवल आणि त्याने वाक्यात सुधारणा केली. ;बघतो म्हणजे दिसलात तुम्ही. खुप दिवस झाले. माणूस असाच देवाधर्माच्या नादाला लागत नाही. काहीतरी हव असत किंवा हव असलेल मिळालेलं असत त्याची परतफेड म्हणून देव-माणूस भेट पुन्हा पुन्हा होत असते. तुमच काय कारण आहे ? ‘अस काही नाही. मला पहिल्यापासून सवय आहे. ;नाही म्हणजे माझी आई मारता मरता वाचली. तेव्हा अगदी माझी सगळी ताकद माझ सगळ प्रेम पैसा पणाला लावला पण सगळ व्यर्थ जात चाललेलं. तेव्हा असच एकदा इथे देवळासमोरून जाताना का कुणास ठाऊक एक मन म्हणाला आत जाऊन याव. मी जाऊन आलो आत. नकळत रामाला बोलून गेलो. आई वाचू दे. मी रोज येईन. मी जिवंत असे पर्यंत आणि... नशिबाचा भाग म्हणा किंवा श्रध्दा म्हणा आई वाचली. तेव्हपासून मी इथे येतो. ‘मला लहानपणापासून लग्न हि गोष्ट आवडते. आणि माझा नवरा रामासारखा असावा अस माझ स्वप्न होत आणि माझ्या आयुष्यातला राम शोधायला मी रामाच्या देवळात यायचे. आणि याच देवळात मला माझा राम मिळाला. ;म्हणजे तुमचा नवरा ? बरोबर ? ‘हो.
पुन्हा शांतात आणि पुन्हा पावसाचा आवाज सुरु झाला. दोघ चालत होते. एका मोठ्या झाडापाशी तिने नजर टाकली आणि तो तिच्या पावलांसोबत त्याच्या पावलांना टाकत राहिला. तिने छत्री त्याला दिली. ‘येते. तुम्ही या आता. इथवर आला त्याबद्दल आभारी आहे. आता तुम्ही कस जाणार आहात ? चालतच जाणार आहात का ? ;हो. म्हणजे माघारी तर चालतच जाणार आहे. ‘बर. पण तुम्ही लांब राहता का ? ;हो. इथून चार किलोमीटर आहे माझ घर. ‘अहो मग आता इतक्या रात्री रिक्षा मिळणार का तुम्हाला ?
‘नाही. ‘माफ करा मला तुम्हाला इतक लांब याव लागल त्यात उशीर झाला आणि आता रिक्षा. ;अहो. अस काही नाही. रिक्षाची गरज नाही. माझी कार आहे. कार ने आलो आहे मी. ‘कुठे आहे ? ;ती गाडी होती न ज्या खाली पिल्लू अडकलेल. त्याच्या मागे जी होती ती माझी होती. ‘अहो मग तुम्ही इथवर का आलात ? ;माहित नाही. पण तुम्ही मदत केली. त्याचे उपकार समजा. या तुम्ही नवरा वाट बघतोय ना. ‘हो येते. ती मागे वळली. आणि तो सुध्दा. दोघ दोन वेगळ्या दिशेकडे निघाले. ती भिजत होती आणि त्याने हातातली छत्री बंद केली होती. 
 भाग ०६
ती घरी गेली. त्याने तिला जवळ घेतल. आणि केसांना मोकळ केल. पाठीवरून हात खांद्यावर आणला. “पाऊस पडतोय बाहेर. हम ? ‘हो पडतोय.’ “देवळात जाऊन आलीस ? ‘हो.
त्याने तिला जवळ घेतल ओठांना ओठात धरून पुन्हा मिठीत ओढत, “मग अंग ओल नाही इतक. जेवढ असायला हव होत. ‘मी आडोशाने आले. “खर का ? ‘हो.
आडोसा असला तरी अधेमध्ये मोकळ असतच. त्या मधल्या मोकळ्या जागेचा पाऊस पण तुझ्या अंगावर दिसेना. छत्री घरात आहे कोरडी. मग ? ‘अहो, खरच.
“ठीके.
: ह्याला काही कामधंदा नाही का ?
: का ग ?
: सारखा तिला आत घेऊन बसतो. तुझ्यासारखाच आहे. तू तुलाच नाही न लिहिला. मला तर शक येतोय.
: नाही ग. कल्पना आहे हि.
: बर. पुढे काय झाल ? हे दोघ आत आहेत. त्यांनी काय केल नको सांगू पुढच सांग. तो कुठ गेला ?
: हा, तो गेला गाडीजवळ. पूर्ण भिजत. गाडीत बसला. गाडी सुरु केली आणि घराकडे निघाला. घरी जाऊन आईला सांगितल काय झाल ते. दोघ सोबत जेवले. झोपताना आईच्या टाचेला क्रीम लावून दिली. नंतर तो जाऊन झोपला.
: त्याला ती आठवली नाही ?
: छे...  कॉमन फिल्मी स्टोरी नाही हि. कि हिरो हिरोईनला पहिल्यांदा कुठे तरी बघतो आणि सारख त्याला ती डोळ्यासमोर दिसते. असल काही नाही.
: फर्स्ट लुकच प्रेम नाही का त्याचं ?
: नाही. हे प्रेम जरा वेगळ आहे.
: सगळ्याचं सारखच असत.
: पण पद्धत वेगवेगळी असते.
: हा ते पण आहे. मग पुढे ?
: पुढच्या रविवारी ती देवळात गेली.
: तो असेलच तिथे ?
: हो होता कि.
: त्याने तिला बघितल आत देवळात येताना. म्हणजे त्याला ती दिसली. तीच लक्ष नव्हत. आणि त्याने हि काही हरकत न करता तो निघाला. ती देवाच दर्शन घेत होती. तो निघून गेला. ती हि थोडावेळ देवळात बसून निघून गेली.
: याचं प्रेम कधी मग ?
: सहवास असला कि आवड तयार होते. आवड बनली कि त्याच प्रेम होत. प्रेम झाल कि सहवास हवाच असतो. आणि सहवास मिळाला कि प्रेम कमी होत. अस माझ लॉजिक आहे. म्हणून यात मी हिरो हिरोईन जास्त भेटलेत किंवा जास्त जवळ आलेत अस काही लिहिलेलं नाही.
: एका रविवारी ती देवळाकडे निघाली असताना, समोरून एक कार येते. आणि तिच्या समोरच ती थांबते. ती बाजूने जायला बघते पण पुढून गाड्या येत असतात म्हणून ती थांबते. दुसऱ्या बाजूने आपला हिरो उतरतो. तो तिच्याकडे बघतो. ती त्याच्याकडे बघते. तो हसतो. आणि ती अनोळख्यासारख त्याला इग्नोर करते. आणि निघून जाते. तो गाडीच दार लावून पटकन तिच्या मागे चालायला लागतो. ती देवळात जाते. तो हि निघाला. दर्शन झाल आणि तो जाऊन एका बाकावर बसला. ती हि एक बाक सोडून बसली. असच तीच लक्ष बाजूला गेल आणि तिला तो दिसला. ती हसली. आणि त्याला आता बर वाटल. तो उठला आणि तिच्या शेजारच्या बाकावर जाऊन बसला.
‘तुम्ही कधी आलात ? ;मगाशी जेव्हा तुम्ही आलात. मी हसलो हि तुमच्याकडे बघून पण तुम्ही काही प्रतिक्रिया दिली नाहीत. म्हणून मग मला वाटल लक्षातून गेलो असेन मी तुमच्या. ‘अस कस. पण माफ करा, जरा विचारात होते. ;चालायचं. काही टेन्शन आहे का ? ‘करेल त्याचा विचार येतो. एक अस काही असत का ? ;हो आणि स्त्रिया काय एक विचार असतो का त्यांना. ‘हो ना. करावा लागतो आणि नाही केला तर कोण करणार या विचाराने करावाच लागतो हा विचार.  ;काळजी करू नका होईल सगळ ठीक. ‘या वाक्याने फक्त बर वाटत पण बर काहीच होत नाही. आहे ते बदलू शकत नाही. आणि आहे ते सगळ सोडून शांत जगू शकत नाही. कुणाजवळ काही बोलू शकत नाही आणि काय कराव हे हि समजत नाही. सगळे मार्ग बंद झाले कि हा देवाचा मार्ग दिसतो. ;हो. आपण आपल्या जगात संसारात इतके बुडून जातो कि देवाला तस बघायला गेल तर आपण विसरूनच जातो. मग तो अस काही पुन्हा करतो कि त्याच्याकडे यावच लागत. ‘हम. संसार सगळ्यात वाईट. आयुष्य एकाजागी स्थिर होऊ बसत सगळ. ‘अस काही नाही. संसार मांडला तर तो जगता येतो हवा तसा आणि तो थाटला तर बाजारासारखा आयुष्यासोबत थोडा थोडा विकला जातो आपल्याच सुखाच्या बदल्यात दुःख विकत घेऊन. मांडलेला संसार थोडा थोडका अगदी साधा असतो. थाटलेला नुसता दिखावा. जगाला दाखवायला सुखी घराचा थाट करावा लागतो. चेहऱ्यावर आनंद घेऊन थाट मिरवावा लागतो. पण त्यात सुख कधीच नसत. असल तरी सगळ कुटुंब त्यात नाही सुखी जगू शकत. जस एका ताटात चार लोक नाही जेवू शकत तस एका सुखात अख्ख कुटुंब कस जगेल ? ‘मन मारत राहायचं असेल तर मग त्या आयुष्याला अर्थ काय ? ;मन मारायचं कशाला हव ते करायचं आपण. अगदी रीत भात सोडून नाही. जमेल तस जमेल तिथ जमेल तेव्हा. ‘ते कस ?   
 भाग ०७
;कस ते ज्याने त्याने ठरवायचं. पण म्हणजे मला वाटत, माझ मत सांगतो तुम्हाला. कि, जगताना स्वातंत्र्य हव. भारत स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झाले पण नावापुरता. इथला माणूस समाजाच्या, नात्यागोत्यांच्या, रूढीपरंपरा आणि प्रेमात पार तंत्र सोडून पारतंत्र्यात जगत वावरत आहे. अगदी सगळेच. इथले सगळे लोक तुम्ही आणि मी सुध्दा. यातून काही सुख मिळवायच म्हंटल तर लोक नाव ठेवतात. आणि नीट जगू देत नाहीत. मग अशा वेळीस आपल्याला हवा असलेला आनंद एकदम मिळवण्याची स्वप्न न बघता ती थोड थोड मिळेल तस, होतील तशी पूर्ण करत गेलो तर काय बिघडेल ?
‘बरोबर बोलताय तुम्ही. पण संसार मागे लागला कि, घरदार अधिक नात बरोबर संसार आणि संसार म्हणजेच सुख हि अशी मानसिकता असते प्रत्येकाची.
;मानसिकता हि एक अशी नसते. प्रत्येकाची वेगवेगळी असते. भाषा जशी काही कोस अंतराने बदलत जाते मानसिकता प्रत्येक माणसामागे बदलत जाते. आणि थोडी थोडकी नाही तर अगदी खूपच वेगळ्या पद्धतीने. माणसाचा एक गुण आहे कि त्याला जे हव असत ते जेव्हा त्याला मिळत नाही. तो सहज आपल्याला न मिळालेल्या गोष्टींचा सूड कुठल्यातरी रूढी परंपरा या नावांखाली दुसऱ्यावर काढत राहतो. मला नाही मिळाल तर तू हि नाही मिळवायचं या सुडामुळे या जगात सुखी अस कुणीच नाही. सुख मिळवण्याच्या प्रयत्नांत हरएक आहे. पण ते आयत सुख मिळवून देणारे कोण असतात ?
‘अनुभव खूप काही शिकवत असतात आपल्याला. मी हि गेली कित्येक वर्ष लग्न झाल्यापासून सगळ बघत अनुभवत आलेय. माझे हि विचार काहीसे असेच आहेत. आणि आपल्या विचाराशी मिळते जुळते विचार मिळाले कि किती बर वाटत. खूप बर वाटत.
;माणूस आहे म्हंटल कि प्रत्येकालासारखे विचार यायचेच. पण ते जुळवून घ्यायला प्रत्येकाला जमतच अस नाही. बाकी अनुभव म्हणाल तर काहीच नाही मला.
‘खूप बर वाटल बोलून मला. पण मला निघावं लागेल आता.
;निघाला ?
‘जाव लागेल. नवरा घरी आहे. जास्त वेळ बाहेर थांबता येत नाही मला. बाहेर पडायचं कारण देव आहे म्हणून मी घराबाहेर आहे. नाहीतर सहसा नाही जमत.
;का ? ‘घरात काम काय कमी असतात का ?अख्खा दिवस त्यातच जातो. आणि रात्र विचारात.
;आणि झोप कधी ? ‘लागतो डोळा कधी दोन तीन वाजता. सकाळी पुन्हा पाच साडेपाचला जागी होते. शेवटी काय पर्याय नाही. आहे ते कराव लागत. आणि जगण्याला पर्याय नसतोच. आहे नशिबात जितके दिवस. तेवढे बघावे लागतात. जगावे लागतात.
दोघ देवळाच्या बाहेर पर्यंत चालत आले. त्याची चारचाकी देवळाच्या दारातच उभी होती. त्याने चावीच बटण दाबल. गाडीची लाईट लागली. दोघ गाडीजवळ उभे होते.
;एक विचारू का ? ‘हो.
;अनोळखी पण तरी तुम्ही मनमोकळेपणाने बोलला अस नाही पण पहिल्या बोलण्यात इतक बोललात हे हि कमी नाही माझ्यासाठी. पण एक जाणवल मला. राग येऊन देऊ नका. पण विचारव वाटत म्हणून विचारतोय. ‘बोला.
;खूप त्रासात आहात का तुम्ही ? ;अस काही नाही. त्रास कुणाला नसतो. मुलीच शिक्षण तीच नंतर लग्न आणि बरेच विचार आहेत मला. बाकी काही नाही.
;मुलीच्या विचारात असता तर तुम्ही माझ्या जवळ काही सांगत बसला नसता. इतका वेळ बोलत बसला नसता. विचार तुमचे आहेत न ? तुमच्या बद्दलचे. काही घरी अडचण आहे का ? ‘अजिबात नाही. सगळ ठीक आहे.
;अजून एक विचारू ? ‘हम ?
;तुमच लग्न ठरवून केल आहे का ? ‘का अस विचारल ?
;प्रेमाची कमतरता तुमच्या उदास बोलण्यातून जाणवतेय. ;छे...! आमचा प्रेमविवाह झाला आहे. नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. खूप जपतो मला.

भाग ०८
;बर. राग आला असेल तर माफ करा. ‘नाही त्यात राग येण्यासारखं काय आहे. हि तुमची गाडी आहे का ?
‘हो. ‘मर्सिडीज आहे न ? ;हो. ‘महाग असते न म्हणजे लाखो रुपयाला असते ना ?
;हो. बर निघता का ? म्हणजे तुम्हाला हरकत नसेल तर तुम्हाला सोडून मी जाईन.
‘अं.. नाही नको मी जाईन. जवळच आहे घर. तुम्ही या. तुम्ही सोबत थांबलात बोललात इतक तेच खूप आहे.
;सोडल असत. काही हरकत नाही मला. उगीच तुम्हाला चालत जायला वेळ लागेल.
‘नाही जाते मी. तुम्ही या. ;बर. तुमच्याकडे मोबाईल असेलच. तर..
;आहे पण नवरा रोज बघतो. त्यामुळे नंबर नाही देऊ शकत. कधी झाली पुन्हा भेट तर बोलू. येते मी उशीर झालाय.
;नीट या. आणि काळजी घ्या. (तिने त्याच्या नजरेत नजर सोडून बघितल ) ‘हो. तुम्ही हि घ्या.
ती मागे वळली. आणि चालायला लागली. तो हि गाडीत बसला आणि निघून गेला. हि घरी पोचली. घरी जाऊन तिने जेवण बनवून वैगरे नेहमीसारख मुलीला अभ्यास करायला सांगितला. नवरा नेहमी प्रमाणे त्याच प्रेम तिची साडी उतरवून दाखवायला तयार होऊन बसलेला. तिने हि तयारी दाखवत त्याच्या मिठीत ती विरून गेली. समागमात तिला त्याचे शब्द आठवले. “मन मारायचं कशाला हव ते करायचं आपण. अगदी रीत भात सोडून नाही. जमेल तस जमेल तिथ जमेल तेव्हा.” तिने डोळे गच्च मिटले. नवऱ्याला घट्ट जवळ ओढलं. आणि त्याच्या स्पर्शात आनंद मिळवायला लागली. पण आनंद सहज मिळतो का ? तिला हि मिळाला नाही. काही वेळाने नवरा थकून झोपून गेला. हि जागीच होती. त्याच्याशी बोलून बर वाटल होत. त्याच्यासोबत मैत्री करू वाटत नव्हती. कि मनात अशी धडधड वैगरे किंवा प्रेमाचा एखादा संकेत वैगरे अस काहीच तिला जाणवत नव्हत. पण त्याच्याशी अजून बोलायला आवडल असत इतक तिला वाटत होत. पुन्हा तो भेटला तर बोलाव का ? या विचारात तिला तिच्या स्वार्थी मनाने हो अस खुणावल. तिने ठरवल रविवारी त्याच वेळेला देवळात जायचं. पण त्यासाठी मधले सहा दिवस संपण गरजेच होत. आणि त्या विचाराने मन नाराज झाल. विचार मनातले सगळे थांबले आणि शेवटी काय कराव हा प्रश्न पडला. “काहीच नाही” अस मनानेच ठरवल तेव्हा दोन वाजले होते रात्रीचे आणि ती झोपून गेली.

सकाळी नवऱ्याचा डबा वैगरे करून देऊन तो गेला कि लगेच हि मुलीला सोडायला शाळेत गेली. तिला सोडून ती माघारी घरी निघाली असताना तिला रस्त्याच्या एका बाजूला तो दिसला. तिला थांबाव वाटल. आणि तिने गाडीचा वेग कमी केला. पण मागून येणारी चारचाकी एकसलग होर्न वाजवायला लागली. आणि तिने गाडी पुढे घेतली. जरा पुढे गेल्यावर तिने गाडी बाजूला थांबवली आणि तिने मागे बघतील. तो चालत निघाला होता. अजून हि तिला समजत नव्हत. त्याच्याकडे जाव कि नको. त्या विचारात तिचे दोन तीन मिनिट गेली. आणि त्या वेळात तो कुठल्या कुठे पुढे निघून गेला होता. पुढे तो जसा डावीकडे आत वळला. तो दिसायचा बंद झाला आणि ती हि जास्त काही विचार न करता घरी निघून आली. पण मनात येत होत सारख कि, आपण त्याला भेटलो नाही. समोर जरी ‘तुम्ही’ अशी हाक असली तरी मनात आज ‘तू’ असा एकेरी शब्द रुळला होता. हे तिला समजल नाही. पण चालल होत तीच काही न काही डोक्यात, विचारात. सगळ काम आवरून झाल तिने टीव्ही लावला. तिच्या आवडत्या अजिंक्यची मालिका टीव्हीवर लावली. संध्याकळी लागणारी मालिका जेवण वैगरे करण्यात तिला बघायला मिळायची नाही म्हणून ती दुपारी ज्यादाचा भाग लागायचा तेव्हा बघून घ्यायची. प्रेमाची शप्पथ आहे तुला त्यात असलेल प्रेम वैगरे बघून तिला तीच नवं ताज ताज प्रेम आठवायचं आणि म्हणून तिला ती मालिका आवडायची. ती मालिका बघत होती. आजचा भाग खास होता. 
women hd images youtube facebook whatsapp stetus marathi stetus ajinkya arun bhosale writholic.com
भाग ०९
अजिंक्यच हि लग्न झालेलं आणि तरीही त्याच्या आयुष्यात असावरी असते. दोघांच्यात प्रेम हि असत. आनंद काय तो हाच. आनंद कुठे हि कसा हि कुणासोबत हि मिळवता येतो. बस सोबत असलेली दुःख विसरून गेलो आपण तरच आनंद आपल्याला दिसून येतो. त्या मालिकेत फक्त प्रेम होत. त्रास, दुःख असल तरी एखादा भाग बाकी आठवडाभर नुस्त प्रेम. तिला आणि बऱ्याच लोकांना ती मालिका आवडायची. मालिका बघून तिने तिची एक डायरी घेतली आणि तिला त्या मालिकेतले आवडलेले संवाद लिहून ठेवले. या आधी हि तिने बरीच वाक्य अशी लिहून ठेवलेली. असावरी आणि अजिंक्य त्याच्या घरी भेटतात. आणि दोघ समागमाच्या सुरुवातीला संवाद करतात तो तिला संवाद आवडला होता. ती लिहायला लागते.
अजिंक्य : प्रेम किती हि वेळा होत. आणि ते व्हाव. कारण प्रेम हिच एक भावना आहे जी आनंद देते. बाकी सगळ्या गोष्टी फक्त त्रासदायक असतात. त्रास कुणाला नाही या जगात ? पण आनंदी असणारे फार कमी आहेत. त्या फार कमी लोकांत आपण हि जगलो तर त्यात गैर काय ? लोकांना काय जे त्यांना मिळत नाही ते दुसऱ्याच्या नशिबी बघून स्वतःला कोसणारे आणि दुसऱ्याला नाव ठेवणारे हे लोक त्रासाशिवाय काहीही कमवू शकत नाहीत आपल्या आयुष्यात. प्रेम, संवाद, सेक्स ह्या आपल्या गरजा आहेत. आणि त्या प्रत्येकाला असतात. आणि असाव्यात. आपल्या गरजा पूर्ण करण्याला कुणी स्वार्थी म्हंटल तरी चालेल पण म्हणून त्या भागवल्या नाहीत याचा नंतर विचार करून रडणाऱ्याला माझ्या लेखी शून्य किंमत आहे. तू आणि मी आत्ता असे एकमेकांजवळ आहे. तुझा स्पर्श मला आवडतोय. माझ तुला जवळ घेण तुला आवडत आहे. सगळ कस तुला मला आवडणार. आनंद देणार. सुख देणार. मग यात चूक काय ?
एवढ लिहून पुढे तिला अचानक त्याच बोलण आठवल. आणि तिने त्याची वाक्य लिहिली. “मन मारायचं नाही. मिळेल तिथे मिळेल तसा कुठे हि कुणासोबत हि आनंद मिळवायचा.” आणि तिला वाटल खरच आहे. मी हि माझा आनंद मिळवला तर त्यात गैर काय आहे ? आणि मी काय नवऱ्याला सोडून जाणार आहे कि ?  चुकीच काही करणार आहे. बस त्याच्याशी बोलून बर वाटत. बोलण या पलीकडे काही नात नाही आणि नेणार नाही. अस स्वतःशी ठरवून तिने डायरी बंद केली. ती बेडवर झोपून विचार करत होती. पहिल्यापासूनचा. खरतर माणूस हा विचारांनी घाणेरडा असतो. एकांतात तो शरीरसुख या शिवाय दुसरा काही विचार करत नाही. केला तर तो माणूस नाही अस मला वाटत. कारण माणसाला आजकालच्या जगात एकांत हा नसतोच. आणि मिळालाच असा एकांत आणि त्यात हि त्याने जर का जगाचा विचार केला तर मग त्याची शरीरसुखातली इच्छा तरी मेलेली असते किंवा हव तेवढ त्याला प्रेम मिळालेलं नसते हि एक त्याची खूण असते. शरीरसुख प्रत्येकवेळीस घेण्यापेक्षा कधीतरी विचार केलेला हि चांगलाच. ती हि बेडवर झोपून त्यांचा विचार करत होती. तिचा पहिला कीस. याच बेडवर केलेला पहिला सेक्स. आणि बरच काही. त्या काही वेळांच्या सुखानंतर सुख म्हणजे काय हे तिला आठवत नव्हत. तिचा नवरा चांगला असला. दोघांचा प्रेमविवाह झाला असला तरी त्याचा तिरसटपणा तिला त्रासदायक होता. ती प्रत्येकवेळेस दुर्लक्ष करत असली तरी शेवटी तो त्रास विसरता येत नव्हता. तिला तिच्या आईचे शब्द आठवायचे सतत. तिची आई सतत म्हणायची ह्या मुलाशी लग्न करू नको. तुला चांगला बघते मी. तुझ चांगल नाही दिसत मला याच्यासोबत. तो कितीही आज चांगला वागत असला तरी त्याच वागण मला धडभल वाटत नाही. पण तरी आई बाबांना मनवून तिने त्याच्याशी लग्न केल. दीड वर्ष चांगल चालल होत. पण नंतर जे काही बिघडल ते तिला कुणाला सांगता हि आल नाही. मध्यंतरी तिचे बाबा गेले. त्या नंतर तिची आई हृद्यविकाराच्या झटक्याने गेली. भाऊ होता तो दिल्लीला होता. त्याच लग्न वैगरे झालेलं. त्याच चांगल झाल कि तो बहिणीला विसरून जगायला लागला. त्यामुळे तीच अस कोण उरलच नव्हत.
घरातल्या कामात आणि संसारात तिला मित्र-मैत्रिणी अस कुणी बनवायला जमलच नाही. नवऱ्याचा मूड ठीक असला कि तिला अगदी खूप भारी वाटायचं. पण इतर वेळी कायम तिला तिच्या आईची आठवण यायची. आईच ऐकल असत तर बर झाल असत एवढच तिला वाटायचं. पण त्याचा उपयोग आत्ता नव्हता.
ती विचारात तशीच झोपून गेली. शांत. मन विचार आणि ती स्वतः.
पाच वाजले तरी तिला जाग आली नाही. तिला कॉल आला. अनोळखी नंबर होता. तिला जाग आली. तिने कॉल उचलला.
‘हेल्लो कोण बोलतय ?
भाग १०
: मम्मी आग मी बोलतेय. शाळा सुटली माझी कधी येणारेस तू ?
‘किती वाजलेत ? (मोबाईल बघून) अरे देवा आले मी थांब हा बाळा तिथ आलेच.
: हो ये मी आहे इथच.
पटकन उठून आरशात बघून केसांना नीट करून दाराला कुलूप लावून ती गाडीवरून शाळेत गेली.
मुलीला सोबत घेऊन घराकडे निघाली. घरी येऊन तिने जेवण वैगरे बनवण सुरु केल. इकडे त्याला आज काम नव्हत म्हणून तो लवकर घरी आला. आईसोबत एका कार्यक्रमात गेला. आईच्या ओळखीच कोणीतरी होत ज्यांच्या मुलाच लग्न होत. आईने बरीच माणस जोडून ठेवलेली. त्यामुळे त्यांना बघून बरेच जण त्यांना भेटत होते. थोड्यावेळाने एक राजेशिर्के आले. त्यांच्यासोबत त्यांची धाकटी मुलगी होती. बोलण सुरु असताना याच लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होत. बोलन असच सहज साध सुरु होत आणि ते बदल बदल त्या मुलीच्या आणि याच्या लग्नावर आल. आणि घरून ठरवून आल्यासारख अगदी सहज तिथे दोन्हीकडून होकार मिळाला. याला हि ती आवडली. तिला हि याचा रुबाब आवडला. याची आई तिच्या आईवडिलांशी बोलत असताना हे दोघ इकडे तिकडे नजर फिरवत एक क्षण एकमेकांवर फिरवायचे. आणि पुन्हा नजर ताब्यात घेऊन दुसरीकडे टाकायचे. लग्नात भेट घेऊन-देऊन जेवण करून तो आणि आई घरी जायला निघाले. राजेशिर्के राजस्थानला पाहुण्यांच्या लग्नाला जाणार होते. निवांत असा वेळ म्हणून ते पंधरा दिवसांनी याच्या घरी लग्नाची बोलणी पक्की करायला भेटायचं ठरवतात. आणि ते निघतात.
इकडे ‘काय झाल ? जेवला का नाहीत तुम्ही ? तुम्हाला भरल वांग आवडत म्हणून बनवल मी. “रोज तुझ्याच हातच खायचा असा काही नियम आहे का ? कंटाळा आलाय मला रोज रोज चांगल खाऊन. ‘माझा पण आलाय का कंटाळा ? “अस बोललो नाहीये मी. विषय खायचा चालला आहे. तू तुझ्यावर ओढून घाय्यची काही गरज नाही. आणि आत्ता माझा भांडायचा मूड नाहीये. एक काम कर आत चल जरा. ‘का ? “चल.
दोघ आत गेले त्याने जोरात दर लावल. त्या आवाजाने मुलीने टीव्हीचा आवाज वाढवला. आणि ती टीव्ही बघायला लागली. आता भांडण होईल या भीतीने तीच लक्ष टीव्हीकडे नव्हतच. पण आतून काही आवाज येत नव्हता.
“लग्नाआधी मी खुप चांगला होतो. तू बरबाद केला मला. माझ्यापेक्षा पण माझ्याशी चांगल वागून. माहित नाही मला का अस होत पण मला आता उबग यायला लागलीय या परिस्थितीची या प्रेमाची किळस यायला लागलीय. मी तुला सुखात ठेवतोय कि नाही माहित नाही मला पण मला आता शांतता हवीय. काही दिवस.
‘मग काय करू मी तुमच्यासाठी ? “प्रेम कमी कर. मला जेव्हा वाटेल कि बस आता अंतर आपल्यात तेव्हा मग आधीसारख वाग. ‘बर. पण म्हणजे काय करू मी ? “काही नाही. जाऊदे. मला समजत नाहीये मला काय होतय.  दोघांच बोलण सुरु होत.
इकडे, तुला आवडली का ती मुलगी ? ;हो. सुंदर आहे. मला शोभेल. पण ऐक ना आई, मला वाटत मी लगेच लग्न कराव या वर्षी. तुला काय वाटत ? तुझी काळजी घेईल ग ती.
अरे माझ्यासाठी तू लग्न कर म्हणत नाही मी, मी तुझ्यासाठी म्हणतेय. तू आता लग्न करायला हवस. तुझ्या मित्राला, कोण तो अमित, त्याला तीन वर्षाची मुलगी आहे. तुझ्याच एवढा आहे तो. ;आई त्याने लवकर लग्न केलय. पण मी करेन या वर्षी. आणि चांगला संसार करेन.
तीच अपेक्षा आहे. तुला आवडली न ती मुलगी हे महत्वाच आहे. मला हि ती आवडली. नुसती दिसायला नाही तर बाकीच हि सगळ जमत तिला. आणि नोकरी पण करते. आता तीच लग्न झाल तुझ्यासाठी तर तिला काय गरज असणारे लग्न करायची. पण तरी तिला घरी नको बसवू माझ्याजवळ. तू हव तर तिला तुझ्या ऑफिसमध्ये नेत जा. चं जागा. मला तर खूप आवडली जोडी तुमची, आणि तुला हवी न, तू बोलतो कायम तशी आहे ती. तुझ्याहून मोठी आहे ती. तीन वर्षाने. बस दिसून येत नाही. पण मोठी आहे. घेईल ती तुझी काळजी. ;मी तयार आहे. उद्याच जाऊन येतो मी देवळात.
हो ये जाऊन. एक काम कर तिकडून जाऊन आलास कि तिला भेट. बघ तिला वेळ असेल तर. एकत्र वेळ घालवला तर कस तुम्हालाच चांगल आहे ते.
;ते उद्या जाणारेत न संध्याकाळी राजस्थानकडे.
अरे हो लक्षातूनच गेल कि माझ्या. बर तू जाऊन ये. आणि हार ने जाताना. पेढे पण घे. आणि सांग देवाला सगळ नीट होऊदे जोडीने येतो म्हणाव.
;हो. आई पड आता बेडवर तू. मी क्रीम लावतो टाचेला मग बसतो जरा काम करतो. म्हणजे उद्या लवकर निघेन. देवळात जायला.
भाग ११
हो.तेवढी कपाटातून क्रीम घे. जुनी संपली. नवीनच काढ,
;त्यात होत ना थोड ?
नाही दुपारी लावली मी माझी मला, होती तेवढी सगळी.
त्याने कपाटातून नवीन क्रीमची डबी घेऊन आईच्या पायाला लावायला सुरुवात केली.
इकडे, ‘मला काही वाटत नाही. तुमच्यासोबत मी सुखात आहे. आणि राहिला तुमचा स्वभाव मला काही वाटत नाही त्याच सवय झालीय मला. मला बाळ हव होत. मुलगी आपल्याला उशिरा झाली. पण झाली. रक्तगट सारखा होता आपला. तरी मुलगी नॉर्मल झाली. तो आनंद किती मोठा होता तुमच्या जागी कुणी दुसर असत तर नसती झाली मुलगी नीट. हे तुमच प्रेम आहे म्हणूनच झाल. काय कमी आहे आपल्याकडे, टीव्ही आहे, फ्रीज आहे ओव्हन आहे. कुलर आहे, दोन वेळा एक-से-एक भाज्या बनवून खातोय. महिन्यातून दोन तीनदा फिरायला बाहेर जातो. अजून काय हव. आणि हे सुख दुःख लग्न झाल्यावर इतक्या वर्षाने करायची गोष्ट आहे का हि. आपली साथ आपण अशीच कायम कशी टिकवायची, आपल्यातला संवाद कसा वाढवायचा. आपल्यातल प्रेम अजून कस तेजलदार करायचं हे बघायला हव ना. तुम्ही नका जास्त विचार करू. आपण सुखात आहोत. आणि असच राहायच आहे आपल्याला. तुम्ही फक्त हे सगळे विचार सोडून द्या. तुम्ही जेवून घ्या जरास. उपाशी झोपू नका.
“मी दारू आणलीय प्यायला. मला इथच आण जेवण. ‘मी सांगितलेलं न पिऊ नका. मग कशाला आणलीत ? “दारू पिऊन मला सात का आठ महिने झालेत. तेपण तेव्हा थोडीच पिली होती. ‘कमी असू किंवा जास्त दारू दारूच असते ना. नका ना पिऊ. जेवा ना. “आणलीय तर प्यावी लागेल. ऐक जेवण इथेच आण मी जेवून झोपतो इथच. तू तिच्यासोबत त्या खोलीत झोप मी इथ एकटा झोपतो.
ती उठली. आणि जेवण आणायला गेली. जेवनाच ताट एक ग्लास आणि थंड पाण्याची बाटली सगळ त्याला आणून दिल.
“ऐक दर ओढून घे. आणि ऐक पंखा लाव पाचच्या स्पीडने.
 तिने पंखा लावला आणि ती मुलीसोबत झोपली.  हा दारू पिऊन तीन पैकी अर्धीच चपाती खातो. आणि हात न धुताच तसाच झोपून जातो. हि रात्री दीडला जग येते तर उठून आतल्या खोलीत जाते. पंखा कमी करून त्याच्या अंगावर पांघरून टाकून टेबलावरच्या रुमालाने त्याचा कोरडा हात पुरून पांघरुणात सरकवून ताट उचलून नेऊन कट्ट्यावर ठेवते. मग पुन्हा मुलीजवळ जाऊन झोपते.
सकाळी,
नवऱ्याला डबा देवून ती मुलीला शाळेत सोड्याला जाते. तिथून घरी येऊन नेहमीच काम करून मालिका बघत बसते.

इकडे, दिवसभर काम करून सहा वाजता हा देवळात जायला निघतो. देवळात जाऊन दारातून रामाला हार पेढे आणि उदबत्ती घेऊन तो आत गेला. पुजार्याच्या ताब्यात सगळ देऊन नमस्कार करून तो प्रसाद म्हणून त्याने दिलेल्या पेढ्यातले दोन पेढे पुजाऱ्याच्या हातून घेऊन तो तिथल्या एका बाकावर बसून लोकांना बघत होता. आज अर्धातास बसला तो देवळात. पण मन शांत नव्हत. बहुतेक लग्नाच्या विचाराने त्याला अस्वस्थ वाटत होत. पण यातून सगळेच जातात. त्यामुळे हा अस्वस्थपणा साहजिकच होता. तो बाहेर निघाला. आणि त्याचा मोबाईल वाजला. राजेशिर्केंच्या मुलीचा कॉल होता. तिला त्याला भेटायचं होत. म्हणजे तस तिच्या वडिलांनी तिला भेटायला सांगितल होत. दोघ एका कॅफेत भेटायचं ठरवतात. जाताना तिथे तो तिला हि सोबत तिच्या घराजवळून घेऊन जातो. दोघ कॅफेत बसलेले. तशी तिथ दहा बारा जणच होते पण त्यांचा गोंधळ खूप होता. तरी त्या सगळ्यांना दुर्लक्ष करत दोघ शांत बसून होते. कॉल्ड कॉफी आल्यावर दोघ थोडी पिऊन बोलायला लागतात. बोलण्या बोलण्यात दोघांची आवड सारखी असल्याच जाणवत होत. एकमेकांच एकमेकांना बोलण पटत आवडत होत. दीड तास तिथ बसून झाल. कॅफेचा वेटर येऊन सांगतो कि एक तसा नंतर प्रत्येक तासाला पन्नास रुपये ज्यादा लागतात. तर त्याच्या हातात पाचशेची नोट टेकवत त्याने सांगितल आम्ही निघालो कि मग सांग किती होतात. आणि दोघांच पुन्हा बोलन सुरु झाल. विषय एकमेकांबद्दल नव्हता. पण असा वायफळ हि नव्हता. सव्वा आठ वाजले आणि तिला कॉल आला. त्यांना राजस्थानसाठी दहाला निघायचं होत. ते निघाले. गाडीतहि दोघांच बोलण सुरु होत. तिला घरी सोडून घरी तिच्या आई वडिलांना आणि तिच्या मोठ्या बहिणीला तिचं नवऱ्याला भेटून तो घरी निघाला. घरी येऊन त्याने आईला सगळ सांगितल. लग्न होत नाही तोपर्यन बरीच मुल आपल्याच आईला आपल सर्वस्व मानत असतात. आपल सगळ फक्त आईच ऐकू शकते अस त्यांना वाटत असत. आणि ते चुकीच नाही खरच असत. आई झोपली आणि तो हि झोपायच्या तयारीत होता. आणि तिचा मेसेज आला.
 भाग १२
/ तुला भेटून खूप छान वाटल. मी तशी घरी शांत असते. पण मित्रांच्यात एकदम फ्री असते. मला अस अवघडून जगायला नाही आवडत. पण तुझ्यासोबत काय झाल मला काय माहित मी तुझ्यासारखं बोलायला लागले. अगदी कमी नेमक. मच्युअर वाटले मी मला.
;निघाली का बस ?
/ हो. मला तुझ्याशी बोलायचं होत जरा. बोलू ? सॉरी हे कॉलवर बोलायचं बोलण आहे पण आत्ता कॉल नाही जमणार. म्हणजे करता येईल पण हे बोलता नाही येणार.
;बोल ?
/ मला बॉयफ्रेंड होता.
; होता ?
/ हो आता नाही तो माझ्या आयुष्यात.
; अस तू म्हणतेस त्याच मत काय आहे ?
/ मला नाही माहित. आमच नात संपल आहे. आणि म्हणून मी लग्नासाठी होकार दिला. तुला बघितल तेव्हा मला काही वाटल नाही. माझ्या डोक्यात नकारच होता. पण तुझ्यासोबत थोडासाच वेळ घालवला पण माहित नाही का पण तू मला आवडायला लागलायस.
; ऊन जास्त झाल कि पाऊस आठवतो. आणि जून महिन्यात उन्हाची तारीफ होते.
/ अस नाही. खरच तू आवडायला लागलायस मला. तो माझ्या आयुष्यात नाही म्हणून तू हवा अस खरच मी विचार केला नाही.
;मला हि तू आवडलीस पण तू वेळ घे. मी हि घेतो. अस हि वेळ आहे आपल्याकडे बराच. तुझ्या भावना मला किमती आहेत, पण त्या लगेच समजून घ्याव्यात मी अस तुझ म्हणन असेल तर प्लीज, जबरदस्ती नको.
/ नाही. जबरदस्ती नाहीच. पण मला जे वाटल ते मी सांगितल. आणि खरच मला आवडेल तुझी सोबत आयुष्यभर. तू जेवलास का ?
;हो. आता झोपायचा विचार आहे. उद्या शाळेत जायचं आहे लवकर. मिटिंग आहे. सो, लवकर उठून आवरून जायचय ऑफिसला आणि तिथून मिटिंगला.
/ शाळेत कोण आहे ?
;बहिणीची मुलगी.
/ ओह, तुला बहिण पण आहे का ?
;हो. मानलेली आहे पण खूप जवळची आहे.
/बर मग तुला मी अजून जागवत नाही. तू झोप.
;हो चालेल. तू हि आराम कर. झोप घे पूर्ण कारण वेळ लागेल तिकडे पोचायला.
/ हो.
;काळजी घे. जी.एन.
/जी.एन. तू हि काळजी घे. जमल तर सकाळी एक कॉल कर.
;हो.
 भाग १३
दोघांच बोलन थांबल. ती त्याच्या विचारात रमली. आणि हा इकडे निवांत झोपला. सकाळी....
त्याने तिला ऑफिसला जाताना कॉल लावला. दोघ अर्धा तास बोलत होते. ऑफिसच्या पार्किंगमध्ये आल्यावर त्याने कॉल ठेवायच ठरवल. आणि त्याच्या बायला तिने “आय लव्ह यु” चा प्रतिसाद दिला. त्याने त्याच काम उरकून पुन्हा तो तासाभराने खाली आला. गाडी सुरु केली. शांत गाणी गाडीत लावून, गाडी शाळेकडे निघाली. शाळेत गेल्यावर मिटिंग रुममध्ये खूप गर्दी होती. पण गोंधळ नव्हता. पुढे एक शिक्षक माईकसमोर उभ राहून माहिती देत होते. प्रत्येक जण आपापल्या पाल्यासोबत बसलेले. त्याने एकवार नजर फिरवली. एक खुर्ची मोकळी होती. त्याच्याशेजारी त्याची भाच्ची होती. तो आत शांतपणे जाऊन बसला. मिटिंग पुढे तासभर सुरूच राहिली. मिटिंग झाली तशी शाळा हि सुटली. आज शाळा सकाळची होती. त्यामुळे मिटिंगनंतर ती लगेच सोडली. भाच्चीला घेऊन तो गाडीकडे जायला निघाला. आज मिटिंग असल्यामुळे पालकांच्या गाड्या शाळेच्या मैदानात लावायला जागा केलेली. त्याने लांबूनच गाडीच्या चावीच बटण दाबल. दरवाजे अनलॉक झाल. ती आत जाऊन बसली. तो हि बसला. बाजूने एक चारचाकी शाळेबाहेर बाहेर पडत होती. त्या गाडी पुढे काही दुचाकी आणि दोन चारचाकी होत्या. मैदानाची सगळी माती हवेत उडत होती. एकदाच होर्न वाजवला आणि तो शांत बसून राहिला. भाच्ची तीच आवडत एक गाण लावते. गाण प्रेमाच होत. त्यावर सूर धरत ती हळू आवाजात अगदी त्या सुरु गाण्यासोबत गाण म्हणत होती. पुढची चारचाकी पुढे गेली जराशी याने हि गाडी पुढे घेतली. मागून होर्नचे आवाज येत होते. काच बंद होती तरी. बाजूने दुचाकी जातच होत्या. छोट्या त्या गेट मधून दुचाकी, चारचाकी, लहान मुल, पालक सगळेच बाहेर जात होते त्यामुळे गर्दी जमलेली. गाडी एकाजागी स्थिर असताना त्याला “आय लव्ह यु” चा विचार आला. काय उत्तर द्याव या विचारात त्याला कालची त्याची आणि तिची आठवण व्हायला लागली. क्षण सुंदर होते. तीच बोलण चांगल होत. तिचा अधून मधून कॅफेत पायांचा पायाला स्पर्श होत होता तो हि मनाला चवताळून टाकणारा होता. आणि तिला तिच्या घराच्या अलीकडे सोडताना दोघांच्यात झालेला किस, तो हि त्याला आवडलेला. आणि त्याच आवडीच उत्तर तीच “आय लव्ह यु” होत. तिची आणि याची आवड याच सारख्या गोष्टीना धरून होती. त्यामुळे याचा हि होकार असायला हवा होता. अस त्याला वाटत होत. त्याने मोबाईल हातात घेतला. तिला मेसेज लिहायला घेणार तोच पुढची चारचाकी अजून पुढे गेली. त्याने मोबाईल पुढे ठेवला (बाजूला). आणि त्याची नजर बाजूला गेली. त्याच्या गाडी शेजारी एक्टीव्हावर मुलीसोबत त्याला ती दिसली. राम मंदिरमधली. त्याला पावसात भिजण आठवल. तीच त्याच्याकडे मन मोकळ करण आठवल. काय सुंदर होत....? कालचा कीस कि हिच्यासोबतचे क्षण. आणि त्याने उत्तर न शोधता काच खाली केली. साहजिक तीच लक्ष गाडीत गेल. आणि तिचे ओठ बाजूला झाले. सपाट गाल वर भरून आले. ती हसली. हलकीच. पण मनात खूप आनंद झालेला तिला. ती काही बोलणार तोच मागून गाड्यांचा होर्न वाजायला लागला. आणि सहाजिकच तिला पुढे जाव लागल. ती पुढे गेली आणि शाळेच्या बाहेर एका बाजूला थांबली. थोड्यावेळाने त्याची हि गाडी बाहेर आली. आणि त्याने तिच्या गाडीशेजारी थांबवली. ती काही बोलणार त्या आधी तोच गाडीतून उतरला. पण त्या दोघांआधी त्या दोघी म्हणजे तिची मुलगी त्याची भाच्ची बोलायला लागले. त्याचं बोलण झाल कि त्या दोघींची नजर त्या दोघांकडे गेली. तेव्हा हे दोघे अनोळखी झाले. आणि मग तिच्या मुलीने तिची आणि त्याची ओळख करून दिली. जुनी ओळख पुन्हा नवीन झाली. आणि मुलीने तिला हे हि सांगितल कि परवा मी जो कॉल लावला तुला संध्याकाळी मला न्यायला ये म्हणून तो ह्यांनीच लावून दिला होता. याच्यांच मोबाईल वरून लावलेला. आणि हे ऐकल्यावर तिने पहिला तिचा मोबाईल बघितला. आणि त्याने त्याचा मोबाईल बघितला. दोघांना हे अनोळखी आकडे अगदी पाठ असल्यासारखे वाटले. तरी त्याने हिम्मत करून तो बोलला.
;हा नंबर तुमचा आहे का ?
‘हो.
दोघे डोळ्यातून आनंद व्यक्त करत होते.
‘येतो
म्हणून ती तिथून निघून गेली. तो हि निघून गेला. रात्री जेवण झाल. त्याला कालच्या मुलीचा मेसेज आला. जेवलास का काय करतोस आणि बरच काही. आणि मग बोलता बोलता तिने त्याला “आय लव्ह यु” च उत्तर विचारल. तो पुन्हा विचार करत बसला. तेवढ्यात एक मेसेज आला.
“हाय”  
 भाग १४
;बोला.
‘माझा डीपी दिसतोय का तुम्हाला ?
;नाही.
‘मग तुम्ही ओळखलत कस ?
;एक अंदाज.
‘अंदाज चुकू हि शकतात.
;हो. पण काही वेळेस ते नेमके बरोबर असतात.
‘जसे कि ?
;जशी कि आत्ताची वेळ. मला माहित आहे तुम्ही कोण आहात. आणि तुम्हाला हि माहित आहे तुम्ही कोणाला मेसेज करत आहात.
‘सॉरी, तुम्हाला आवडल नसेल तर. पण मला रहावलं नाही म्हणून मेसेज केला. काही हरकत नाही न तुमची.
;अजिबात नाही. उलट तुमच्याशी बोलायला मला आवडत.
‘मला हि. म्हणजे मी बोलले होते ना तुम्हाला कि मी जास्त कुणाशी बाहेर संबंध ठेवत नाही. नवऱ्याला आवडत नाही आणि मला हि घरातलच करण्यात वेळ मिळत नाही. पण तुमच्याशी बोलले. मला खूप बर वाटल.
;हम. काही हरकत नाही माझी. उलट मला रोज बोलायला आवडेल मला तुमच्याशी.
‘रोज नाही जमणार मला. पण मिळेल तसा वेळ मी बोलेन. सॉरी हा.
;त्यात सॉरी काय. अडचणी असणारच. लग्न झालंय तुमच. त्यामुळे ठीक आहे. घेतो समजून. तुम्ही स्वतःहून मेसेज केलात आत्ता हेच खूप आहे.
‘तुम्हाला नाही का बायकोचा धाक ?
;नाही.
‘का, तिला चालत का अस कुणाशी हि बोललेलं ?
;एक सांगू का ?
‘हो बोला न.
;मला अहो जाहो करू नका. मी लहान आहे तुमच्यापेक्षा.
‘हो माहित आहे मला.
;मग तरी का आदर ?
‘लग्न झालंय आपण दोन संसारी लोक. आदर हवा ना. आणि अशी ओळख झाल्या झाल्या एकेरी नाव घेण नाही मला पटत.
;अहो माझ लग्न झाल नाहीये.
‘का ?
;अहो मी तीस पण पार केल नाही अजून. अठ्ठावीस आहे वय माझ.
‘तुमची तब्येत बघून आणि तुमच इतक शांत विचारी बोलण बघून वाटल तुमच लग्न झाल असेल. नाही म्हणजे तुमची काही वाक्य मी माझ्या डायरीत लिहून ठेवली आहेत. खूप सहज बोललेली आहेत तुम्ही ती, पण त्यात खूप विचार आहे. त्यामुळे मला वाटल इतका अनुभव लग्न झालेल्या माणसातच असतो. म्हणून.
;नाही. लग्न करायचंय. मुली बघायचं चालल आहे.
‘वाह. लवकर करा. म्हणजे तुम्हाला हि बर वाटेल. संसार माणसाच आयुष्याला स्थिर करतो. तुम्ही हि स्थिर व्हाल.
;करायचं बघू. शेवटी नशिबातल्या गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा वेळ असते. मग आपण कितीही डोक फोडलं तरी होत नाही. त्यामुळे चालू चालल आहे तस आयुष्य. एक मुलगी आहे आई ने बघितली आहे. बघू आता. त्यांना मी पसंद आहे. माझ्या आईला ती पसंद आहे.
‘काय करत आहात ?
;तुमच्याशी बोलतो आहे. खूप बर वाटल तुमच्याशी बोलून. पण आपण अजून काहीच बोललो नाही. बर अजून एक सांगायचं होत.
‘काय ?
;तुम्ही माझ्याशी किती हि आणि काहीही बोलू शकता. त्याने तुम्हाला बर वाटेल. तुमच मन मोकळ होईल. मनाची शांतता शांत बसून नाही जास्त बोलून मिळते. आयुष्यात जस प्रेम हव त्याहून जास्त संवाद महत्वाचा आहे.
‘खर का ?
;हो. त्यामुळे तुम्ही हक्काने मेसेज करा. मला जितका जमेल तितका तुम्हाला वेळ देण्याचा प्रयत्न करेन.
‘मला अस बोलता नाही येत कुणाशी हि. पण प्रयत्न करेन.
;रविवारी तुम्ही येणार आहात का देवळात ?
‘हो. उद्या हि येणार आहे. तिकडच्या भागात. तर मग देवळात हि जाईन.
;बर.
‘काय झाल ?
;काही नाही. माझ ऑफिस तिथून जवळ आहे तीन किलोमीटर फक्त.
‘मग येताय उद्या तुम्ही पण देवळात ?
;चालेल का तुम्हाला ?
‘हो.
;चालेल मला तुम्ही सांगा आलात कि, मी पण मग येईन.
‘हो. चला मी झोपते आता.
;झोपणार कि विचार करणार ?
‘माहित नाही. प्रयत्न आपल्या हातात असतात बाकी झोप कधी येते हे त्या डोळ्यांनाच माहिती. झोपते.
;शांत झोपा. काळजी घ्या.
‘हो तुम्ही हि.
;अहो जाहो नको न प्लीज.
;बर. अम्म्म्मम.. तु ही काळजी घ्या. सॉरी घे.
;हा. मी हि झोपतो. बाय.
‘बाय.
भाग १५
सकाळी, काम सुरु होत. एक मिटिंग झाली आणि त्याच्या लक्षात आल त्याला तर देवळात जायचं होत. पण त्याला अजून तिचा कॉल आला नव्हता. त्याने मोबाईल बघितला. मिसकॉल हि नव्हता. मेसेज बघितला तर कालचा बाय होता. कॉल करावा कि नको या विचारात तो खिडकीजवळ येऊन उभा राहिला. तिच्या जवळ तिचा नवरा असेल आणि त्याने बघितला कॉल आलेला तर उगीच तिला त्रास म्हणून तो ठरवतो नको करायला कॉल. मोबाईल खिशात ठेवतो. तोच मोबाईल वाजायला लागतो. पटकन मोबाईल बाहेर काढून बघतो. तिचा कॉल असतो. छातीची धडधड झाली. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्याने कॉल उचलला.
‘मी आलेय इथे देवळाजवळ. तुम्ही येणार आहात का ? ;हो लागेच निघतो. ‘चालेल या.
तो निघाला. थोड्यावेळाने दोघ देवळात होते. देवच दर्शन झाल. थोडावेळ तिथ बसून झाल. पण दोघांच्यात एकमेकांना बघून हलक हसण्याव्यतिरिक्त काहीही झाल नव्हत.
;काम झाल का ? ‘आ ..कसल ? ;काहीतरी काम होत ना तुमच इथे जवळ. ‘आ, हो ते झाल ना काम. तुम्हाला काम होत का ? नाही म्हणजे मी विचारल नाही तुम्हाला. इथे आली आणि लगेच कॉल केला तुम्हाला. पण विचारायचं विसरून गेले कि कामात आहात कि नाही.
;कालच सांगितल ना प्लीज अहो जाहो नको. ‘मग मला हि तू म्हण. मगच मी हि म्हणेन तुला तू. त्याशिवाय मला नाही जमणार. अवघडल्यासारख होत बोलताना. ;मान्य आहे पण. बर ठीके मी हि प्रयत्न करतो. बोलण्यातला अवघडलेपणा कमी झाल तरच नात्यातला अनोळखीपणा कमी होईल. सो, मग आता तू कुठे जाणार इथून ?
‘घरी. आता काही काम नाही. दोन तीन दिवस घरातल सगळ आवरून ठेवल त्यामुळे आज निवांत आहे. तुला काम आहे एक खूप ? तू कुठ कामाला आहे ?
;माझ स्वतःच ऑफिस आहे. त्यामुळे मला काही एवढ काम नसत. फक्त टेन्शन असत. ‘खूप भारी ना स्वतःच ऑफिस वैगरे. ;अस काही नाही. ग नोकरी असो किंवा स्वतःच ऑफिस टेन्शन आणि रुटीन असतच. बस पुढच्याच बघताना आपल्याला त्याचा हेवा वाटतो. ‘हो ना बरोबर. मला पण खूप काही करायचं होत. खरतर मला लिखाणाची खूप आवड आहे. मी खूप कविता लिहिल्या आहेत. काही गोष्टी लिहिल्या आहेत. माझी इच्छा होती कि नवऱ्याच माझ्या एखाद ऑफिस असाव. आणि मी घरी बसून गोष्टी लिहाव्यात. घरच काम करायला बायका लावायच्या. आणि मी मालिका सिनेमासाठी गोष्टी लिहाव्यात. गोष्टी लिहिता लिहिता कधी प्रेमाच्या गोष्टी घडल्या माझ लग्न झाल मग मुलगी झाली आणि कधी संसारात सगळ विसरून गेले लक्षात आलच नाही. आणि कुणी आणून हि दिल नाही. पण कधी तरी आठवल कि वाईट वाटत, कि माझी काय स्वप्न होती आणि आत्ता या घडीला मी काय आहे. खरच वाईट वाटत. पण आता काय आहे ते बदलू शकत नाही. आणि इतक्या उशिरा सुरुवात करून मला हव ते मिळणार नाही. त्यामुळे इत्क्मी आतल्या आत कोंडत गेले स्वतःला कि आता मला मनमोकळ अस जगात येत नाही. कधीतरी लिहावस वाटत पण लिहायला काही पेन कागद घेईपर्यंत सगळ डोक रिकाम. भावना अशा काही उरल्याच नाहीत. स्वप्न खरी होण्याची अशा नाही. पण तरी मी खुश आहे. कारण जगातल्या लोकांना त्यांच्या संसाराना बघितल कि अस वाटत आपण लाख पटीने खुश आहोत. माझा नवरा पण खूप चांगला आहे. खूप प्रेम करतो माझ्यावर. खूप जीव लावतो माझ्यावर. मला हव ते सगळ देतो. मुलीवर पण खूप प्रेम करतो. म्हणजे आजकाल कस मुलावर जास्त जीव असतो. पण एक मुलगी झाली आणि ते बोलले कि मुलाची काही गरज नाही. आणि मला त्यांचा निर्णय आवडला. खूप छान वाटत. खूप छान जगते मी.
;चांगली गोष्ट आहे. इतक प्रेम करणारा आपल्या आयुष्यात असेल तर फक्त काळजी प्रेम द्यायला हरकत काय आहे. नशीबवान आहे तुमचा नवरा.
‘हो पण. काही गोष्टी उरल्यात माझ्या करायच्या त्या करायची इच्छा उमेद आहे पण कार्याला काही मार्ग नाही.
;होईल ना. मी मदत करू का ? ‘नाही काहीच उपयोग नाही. बस मित्र म्हणून रहा. हे नात हि मला खूप सारा आनंद देऊन जाईल. ;काळजी करू नकोस. हि मैत्री जपेन मी. बस तू नाराज होऊ नको. काळ सांगितल तस कधी काही वाटल बोलू नक्की बोल. हक्काने बोल. तुला तेवढा हक्क देतो मी. ‘असा हक्क देता येतो ? ;हो का नाही ? हक्क आणि प्रेम दिला तर तो नंतर वाढत जातो. पण स्वतःहून घेतलेला हक्क लवकर मिटत जातो. ‘मग मी हि हक्काने बोलेन तुझ्याशी चालेल ? ;हो. मग या आपल्या मैत्रीत झालेली हि पहिली ऑफिशियल भेट. साजरी करायची ? ‘कशी ? पण मला...

;माहित आहे काम आहे आणि बरच काही. पण थोडा वेळ काढ. माझ्यासाठी नाही म्हणत. तुझा, तुला, तुझ्यासाठी. अगदी अर्धातास हि चालेल. ‘पण मला अस बाहेर नाही जाता येणार. उगीच कुणी बघतील आणि नवऱ्याला सांगितल तर. म्हणजे आपल्यात तस काही नाह. हे आपल्याला माहित आहेत. पण एक स्त्री पुरुष एकत्र दिसतात तेव्हा हे जग स्वतःच्या विचारता दोघांना बेडवर बघत असतात. खूप घाण आहे मानसिकता लोकांची. ;बर मग गाडीतून कुठतरी फिरून येऊ. कुठे उतरायचं नाही. बस गाडीतून आवडेल ना ? ‘हो खूप आवडत मला फिरायला. ;निघायचं का मग ? ‘हो, पण जास्त वेळ नाही जमणार. दोघ पुन्हा एकदा देवाला नमस्कार करून देवाला बाहेर आले. आणि दोघ गाडीत बसले. ती त्याच्या शेजारी होती. गाडी सुरु झाली आणि निघाली. 
 भाग १६
गाडीत शांतता होती.
;गाणी लावू ? म्हणजे तुला आवडणार असतील तर ? ‘अस काही नाही. ;हा अनोळखीपणा बऱ्याच गोष्टीना होण्यापासून रोखत असतो. ‘म्हणजे नक्की कोणत्या गोष्टी ? ;पहिली म्हणजे ओळख. दुसर म्हणजे मोकळेपणा. ‘आत्ता आहेच कि आपल्यात मोकळेपणा. ;एक विचारू ? ‘हो. पण इथून पुढे परवानगी नको घेऊ.
;इकडच नाव काय आहे तुझ ? ‘सायली. ;बदलल नाहीस ? ‘नाही. पण तुला कस माहित माझ माहेरच नाव पण सायलीच आहे. ;असच. ‘असच कस ? तू माझी माहिती काढून ठेवलीस का ? का माझा पाठलाग करतोयस तू ? ;एक मिनिट अस काही मनात आणू नकोस. उगीच तुझ्या मनात मी वाईट होऊन जाईन. ‘नाही, करत, पण तुला माझी माहिती कशी काय ? ;प्राची. कुठे असते सध्या ? ‘ती मुंबईला. ती कशी माहित तुला ? ;ती पाचवीत असताना माझ्यासोबत भांडीकुंडी खेळायची. ‘म्हणजे ?
;साया नावाच्या घरात तू आई आणि तुझी दोन मुल एक मी आणि एक प्राची. तो शेजारी अभी राहायचा तो बाबा आणि फिझा शाजारीन. असा आपला भांडीकुंडीचा खेळ असायचा. आठवल ? ‘म्हणजे तू अभिज्ञ ? ;हो. ‘अरे कुठे होतास तू इतके वर्ष. आणि कसा होतास आणि कसा झालायस. अगदी बारीक होतास तेव्हा. ;हो. एक वर्ष आपण सोबत खेळलो. नंतर आमच भाड्याच घर आम्ही सोडून दुसरीकडे गेलो. पण कायम तू मला तू आठवायचीस. तुझी सवय झालेली मला. ‘अरे पण तू तर लहान आहेस माझ्यापेक्षा. ;माहित आहे आपल्यात दहा एक वर्षाच अंतर आहे पण, तरी आई नंतर माझ्याशी इतक प्रेमळ तूच वागली. तुझाय्व्र नकळत मी प्रेम केल. ते बालिश होत प्रेम पण वयासोबत ते तरूण होत गेल. तुझ नाव सा.य.ली. इतक मला आवडायला लागल कि, मला कुणी विचारल तुझ आवडत नाव काय तर मी कायम सायली सांगायचो. आणि आता हि सांगतो. तुला मी महिन्यातून दोनदा तरी निदान फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शोधायचो. अस वाटल होत तुझ नाव नवऱ्याने बदलल असेल पण आत्ता खात्री पटली. ‘मला आत्ता इतका आनंद झालाय ना कि नाही सांगू शकत. खूप दिवसांनी बघून तुला खूप भारी वाटल. मला आईंना भेटायचंय तुझ्या. त्या पण माझ किती कौतुक करायच्या. मी अस आवरून वैगरे शाळेत निघाले ना दर गुरुवारी कि तुझ्या आई खूप कौतुक करायच्या माझ्या. मला त्यांना भेटायला नेशील का ? ;हो नक्की. एक सांगायचं होत.
त्याने गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली.
;मला तू अजून हि आवडतेस. ‘अरे, अभिज्ञ. तू लहान आहेस. ;मी लहान होतो. आता नाही ना. ‘अरे पण तू मोठा झाला असला तरी अजून हि मीच मोठी आहे तुझ्यापेक्षा आणि माझ लग्न झालंय. मुलगी आहे मला. आणि आता मी चाळीशीला पोचतेय.
;प्रेमाला वय लागत का ? ‘लागत नसल तरी बघायचं असत. आता झाल गेल सगळ. आणि मी समजू शकते, तुला मी आवडत असेन. ;आवडतेस अजून पण. ‘अरे पण मी त्या नजरेने तुला कधी बघितल नाही. आणि कुणीच बघितल नसत मी शाळेत जात असताना मोठ्या गटातला मुलगा कुणाला आवडेल ? मला कधी अस मनात नव्हत. आणि तू हि विसरून जा. नाहीतर मग,
;नाहीतर काय ? ‘आत्ता या संसारात पहिल्यांदा इतक्या वर्षाने मला अस माझ कुणी तरी भेटल होत. ज्याच्याशी बोलून मला वर वाटत. पण जर का तू हा असा प्रेमाचा तकादा लावून मला त्रास देणार असशील तर मग मला नाही जमणार. परत भेटायला तुला. ;अस का बोलतेस ? ‘हो. मला त्रास आहे किंवा काय आहे अस काही नाही मी सुखी आहे माझ्या संसारात बस मला जरासा मोकळेपणा हवा होता. आणि तो पण जर का तू नेणार असशील माझ्यापासून तर मला इच्छा नाही होणार पुन्हा कुणाशी मैत्री करायची.
त्याने तिचा हात हातात धरला. ;तूला जबरदस्ती नाही करत पण निदान प्रेमाचा स्वीकार तरी कर. मी म्हणत नाही तू कर माझ्यावर प्रेम. बस, माझ समजून घे. आणि या बोलण्याचा आपल्या मैत्रीत सहभाग नको. तिचे डोळे पाणावले. आणि तिने डोळे मिटले. त्याने तिचा हात घट्ट धरलेला सैल सोडला. आणि तिनेच त्याचा हात घट्ट पकडला. त्याने तिला हातानेच जवळ ओढल. आणि तिने डोळे घट्ट मिटून घेतले. डोळ्यातल पाणी गालावरून ओघळल. त्याने तिच्या गालावर ओठ टेकवले. आणि तिने त्याचा गालाला बाजूंला करून ओठ त्याच्या ओठांजवळ नेले.        
भाग १७
‘अममम....बास.. आणखी नको. म्हणत ती बाजूला झाली. पण त्याच्या हातात अजून हि तिचा हात राहिलेलाच. त्याच हाताला धरून त्याने तिला पुन्हा जवळ ओढलं. नकार डोक्यात असताना हि मानाने तिच्या कच खाल्ली. तिने पुन्हा एकवार डोळे मिटले. पुन्हा उघडले आणि त्याच्याकडे बघत ती त्याच्या ओठांजवळ गेली. मनाची घालमेल. श्वासांची गती. हृदयाची धडधड. सगळ अस होत होत. पण यात प्रेम कुठे होत ? त्याला ती आवडत होती हा भूतकाळ होता. तिला तो तर आवडतच नव्हता. तरी दोघांच्यात आता अंतर अस काही नव्हत. जेव्हा श्वास घेण अशक्य झाल तेव्हा दोघे एकमेकांपासून लांब झाले. दोन मिनिटांनी...
‘पुन्हा भेटू कि नाही आपण मला नाही माहित आता. ;का ? हे आत्ता झाल ते आपल प्रेम आपण व्यक्त केल. ‘माझ तुझ्यावर प्रेम नाही. ;माझ तर आहे. कोणतीही गोष्ट एकाने करून म्हणून नाही चालत. हे जे झाल ते चुकीच झाल एवढच मला कळत. आणि कोणत हि नात शरीराने सुरु होत असेल तर ते फक्त शरीरापुरतच राहत. त्यात मन नसत........ कधीच नसत. आणि आपली हि सुरुवात अशीच झालीय. ;मी या तुझ्या विचारांना बदलून टाकेन. तुला साथ देईन. तुझ्यावर खूप प्रेम करेन. तुझी काळजी घेईन. तुझ सगळ सगळ ऐकून घेईन. तू खूप खूप बोल माझ्याशी तुला हव तेवढ. मी न थकता ऐकेने. तू मनाने मोकळी हो. मी तुझा मित्र बनून राहीन. कोणता हि हक्क अधिकार मी नाही दाखवणार तुझ्यावर. तूला नको न या शारीरिक गोष्टी. मी तुझ्या अंगाला हात हि लावणार नाही. जो पर्यंत तू सांगत नाहीस. मला तू बस प्रेम दे. मानसिक. शारीरिक नाही. इतके वर्ष मी तुझ्या आठवणीत विचारात घालवली. बदल्यात तू मला भेटलीस. देवाच्या मनात नक्की काय आहे माहित नाही मला. पण एक सांगू ? माझ प्रेम खर आहे म्हणूनच आपली भेट पुन्हा घडली. नाहीतर का झाली असती आपली भेट ? का आपण अनोळखी असताना पण तू माझ्याशी बोललीस. का आत्ता आपण इथ या गाडीत आहोत. आत्ता दोन मिनिटापूर्वी आपल्यात किस झाला दोनदा. सगळ होतय ते न ठरवलेलं पण एकदम खर खर घडतय. याला तू किती हि खोट म्हणालीस तरी ते बदलणार नाही. मला तू आवडायचीस अजून पण आवडतेस. मी आख्ख जग तुझ्या पायाशी आणून ठेवेन. या जगाची सगळी सुख तुला भेट म्हणून देईन. माझा पैसा, मला त्याची मिजास नाही. तू म्हणशील तर तुझ्यासारखा मी साधा राहायला शिकेन. तू म्हणशील तर आख्खा स्वर्ग मी एका खोलीत आणून सजवेन. तुला शेवट पर्यंत साथ देईन. तुझ्यासाठी वाट्टेल ते करेन. आणि हे सगळ करेन बस तू खुश रहाव म्हणून. तेव्हा आपण भांडी कुंडी खेळताना जी ख़ुशी तुझ्या चेहऱ्यावर असायची ती कुठेतरी मला आठवतेय. जी आत्ता तुझ्या चेहऱ्यावर कमी दिसतेय. एक विचारू ?
‘काय ?
;माझ्याशी लग्न करशील ?
‘माझ लग्न झालंय. मला मुलगी आहे. तुला माहित आहे ना.
;तुझ्या मुलीला माझ नाव देतो. जे सुख आत्ता तुला नाही ते मी तुला आणि तिला देतो. आणि हो शपथ घेतो तुझ्यावरच्या प्रेमाची कि तुला कधीच मी जवळ घेणार नाही. शारिरीक नको निदान मानसिक सोबत तुझी मिळू दे मला. माझ्याशी लग्न करशील ?
‘नाही जमणार तुला ते. तू का मला मजबूर करतोयस. मला तुझा आता राग येतोय. आणि मला नाही वाटत तुझ्याशी मी हि मैत्री ठेवावी. मी मनाला समजावतेय तर तू अजून माझ्या मनाला दुखवू नकोस. हा विषय इथेच थांबव. जे झाल ते विसर. मी जाते. पुन्हा भेटायला नको आपण.
;विसरता येईल ? तुला आपला हा किस ?
‘नाही. पण वेळेसोबत पडेल विसर.
;हि झालेली गोष्ट आपल्यात आत्ताची आठवण केव्हाच बनलीय. आठवण विसरता येत नाही. विसरली जात नाही. ती बनते आणि पुन्हा पुन्हा परत येते. त्याचा त्रास होतो. आणि तुझ्या आयुष्यात कोणताच त्रास मला मान्य नाही. निदान त्या त्रासाला टाळण्यासाठी तरी मला होकार दे.

तिने गाडीच्या बाहेर काचेतून बघायला सुरुवात केली. त्याने तिचा हात धरला. तिने तो झिडकारला. तिच्या डोळ्यातून पाणी येत होत. तो हि रडत होता. तिला तीच सगळ आयुष्य काही मिनिटात अगदी स्पष्ट डोळ्यासमोर येत होत. इतक्या वेगात तीच आयुष्य पुढ गेलेलं कि तिला त्याचा अंदाज नव्हता पण आज या निमित्ताने तिला समजल कि ती तिच्या आयुष्यात खूप पुढे निघून आलीय. ती गाडीतून उतरली आणि तिने रिक्षा थांबली. ती निघून गेली. तो रिक्षाकडे बघत रडत होता.  
भाग १८
घराजवळ तिने रिक्षा थांबवली. पैसे दिले आणि ती दारात उभी राहिली. डोळे पाण्याने भरलेलेच होते. त्यामुळे पुढच आजुबाजूच सगळच अंधुक दिसत होत. तिने पर्समधून अंदाजानेच चावी काढून दाराला लावली. पण कुलूप लागेना. म्हणून तिने डोळे पुसून बघितल. दाराला कुलूप नव्हत. तिने कडी वाजवली. दार मुलीने उघडल.
 ‘तू कधी आलीस ? ,अग मम्मी मी आत्ताच आले दहा मिनिट झाले. आमचे शालाप्रमुख आहे ना मिस,शिंदे त्या एक्स्पायर झाल्या. म्हणून शाळा सोडली. मी तुला कॉल लावणार होते पण तू म्हणाली होतीस ना मी बाहेर जाणारे म्हणून मग नाही लावला. ‘लावायचा. मी कुठे हि गेले तरी तुझ्यासाठी असतो मला वेळ. परत अशी एकटी येऊ नकोस. बर तुला काय खायला देऊ का ? ,मी खाल्ला डबा आता नको मला काय. तुला काय झाल ? ‘काही नाही असच. ,सांग ना मम्मी काय झाल ?
ती आत निघून गेली. तोंडावर पाणी मारून तोंड पुसून ती बाहेरच्या खोलीत येऊन बसली. मुलगी लगेच तिच्या शेजारी येऊन बसली. आईचा हात धरून तिने तिच्याकडे बघितल. ,मम्मी सांग ना तू का रडतेस ? तू मला सगळ सांगतेस ना ? मग आता लपवणार का माझ्यापासून ?
‘एकजण लहान असताना मी त्याच्या सोबत खेळायचे. तो माझ्याहून खूप लहान आहे. तो मला गेले काही दिवस माझ्यासोबत बोलतोय. पण आज कलाल मला कि तो आणि मी एकमेकांना ओळखतो. नाहीतरी अनोळखी म्हणूनच आम्ही बोलत होतो. ,नाव काय आहे त्याच ? ‘अभिज्ञ. तू ज्याच्या मोबाईल वरून मला मागच्या आठवड्यात कॉल केलेलास तो. ,ओह ते, ते तर खूप चांगले आहेत स्वभावाने.
‘माहितीय मला. खरच खूप चांगला आहे तो. पण,
,पण काय झाल ? ‘त्याने मला लग्नाची मागणी घातलीय. ,तुणकर दिलास न मम्मी.. तुझ लग्न झालय म्हणून. ‘हो. कस शक्य आहे. आणि तो माझ्यावर इतके वर्ष प्रेम करतोय. मला तर तो आठवला पण नाही इतक्या वर्षात. आणि माझ्या लग्नाच्या इतक्या वर्षांनी तो माझ्या आयुष्यात अचानक येऊन म्हणतो माझ्याशी लग्न करशील का ? तुल सुख देतो. हे देतो ते देतो. काय काय सांगत होता. शेवटी तो विषय तिथेच थांबवा म्हणून मी निघून आले घरी. लग्न झाला आणि मी कधी तुझे पप्पा सोडले तर कुणाशी मैत्री केली नाही. कुणाला काही मनातल सांगितल नाही. सगळ मनात ठेवत गेले. तू झालीस. तू जरा मोठी झालीस. मी सगळ तुझ्यासोबत गेले. माझ सगळ आयुष्य तुला एकटीला माहित आहे. माझ पाहील प्रेम तुझे पप्पा आहेत. आणि पप्पाच तुझ्या वागण बदल गेल. आणि त्यांच्या या विक्षिप्तपणामुळे मला किती त्रास होतो तू बघतेस. एक दिवस त्याची माझी ओळख झाली आणि माहित नाही का पण मला त्याच्याशी सतत बोलायची इच्छा व्हायला लागली. कोणीतरी मला समजून घेणार माझ ऐकून घेणार भेटल म्हणून मी खुश झाले. मैत्रीच नाव देऊन त्या नात्याला मी त्याच्यासोबत बोलायला लागले. आज पहिल्यांदा आम्ही फिरायला म्हणून गेलो. तर त्याने मला हे सगळ सांगितल. आता मला सांग इतक्या चांगल्या नात्याला मी माझ मानून खुश झाले तर ते हि माझ्या नशिबात नाही. संपली मैत्री काय उपयोग नाही. माणसावर विश्वास ठेवला तर हे असच काहीतरी होत. तुझ्या पप्पांवर मी विश्वास ठेवला त्यांच्याशी लग्न केल. वाटल आता आयुष्यभर असच माझ्यावर प्रेम करतील मला समजून घेतील माझी काळजी करतील. यातल काय काय होत माझ्यासोबत तू बघतेस. खरच मला सहन होत नाहीये त्रास.
,मग तू का नकार दिलास त्याला ? ‘त्याला संसार नाही. त्याचा अनुभव नाही. समाजाची त्याला काही फिकीर नाही. पण मला हे सगळ खूप महत्वाच आहे. आणि अस कुणी सांगितल आहे का कि एक स्त्री आणि एक पुरुष जेव्हा एकत्र येतात त्यांनी लग्न करूनच त्या नात्याला जगजाहीर कराव ? मैत्री हे नात पण सुंदर असतच कि. आणि त्या नात्याला जग मान्यता देतच कि. त्याला कशाला लग्न करायला हव ? आणि अस हि त्याला एक मुलगी मिळाली आहे. लग्नासाठी. तिच्याशी त्याच लग्न हि होईल पुढच्या पाच सहा महिन्यात. जर मी नसतेच त्याला भेटले तर त्याने केलच असत न तिच्याशी लग्न.
,पण त्याने तास केल नाही ना मम्मी. त्याने तुला लग्नाआधी सांगितल न सगळ. बर मग तू आता काय करणार मम्मी ?
‘झाल कि, संपल सगळ आता कशाला विचार करायचा.
,त्याने संपवलं का ?
‘नसल तरी जाईल तो पण विसरून. त्याला जावच लागेल मला विसरून. कारण मी काय त्याला त्रास दिला नाहीये किंवा आधी कधी प्रेम केल नाहीये. किंवा आमच्यात काही झाल नाहीये. त्यामुळे होईल सगळ नीट. पण मी नाही आता त्याला भेटणार.

दोघी शांत झाल्या. आणि तिचा मोबाईल वाजला.
 भाग १९
त्याचा कॉल आला होता.
: एवढच सुचल मला अजून पुढे लिहायची राहिलीये स्टोरी.
: खूप भारी वाटतेय स्क्रिप्ट. पुढे काही लिहील नाहीस का ?
: डायरेक्ट एंड लिहिलाय.
: काय ?
: त्या दोघांच बोलन होत कि नाही किंवा झाल तर काय होत हे सुचल नाही अजून, पण मग अस सुचल मला कि ऐक,
संध्याकाळी.....
नवरा दारू पिऊन घरी आलेला असतो. घरी येऊन तो तिला तिच्यासोबत भांडण करतो. खूप भांडण होत आणि तो तिला आणि मुलीला घर बाहेर काढतो. तासाभरात घरात घेईल अस तिला वाटल. म्हणून दोघी घर बाहेर अंधारात बसल्या. पहाट झाली तरी त्याने दोघींना घरी घेतल नाही. सकाळ पूर्ण झाली. त्याची ऑफिसची वेळ झाली. तो बाहेर आला. कुलूप लावल आणि निघून गेला. तिने त्याला अडवायचा प्रयत्न केला पण तो निघून गेला. तिला रडायला यायला लागल. ती रडायला लागली. मुलीने तिला जवळ घेतल आणि जवळची चावी दाखवली. तिने दार उघडल. दोघी आत जणू अंघोळ वैगरे सगळ आवरतात. मुलगी मोबाईल चार्जिंगला लावते आणि तिला त्याचे बावीस मिस्कॉल आणि खूप मेसेज आलेले दिसतात. ती आईला न विचारता कॉल लावते पण तो कॉल उचलत नाही. आई आवरून बाहेरच्या खोलीत येते. तिला मुलगी कपडे भरलेले घेऊन उभी दिसते. तिने काही विचारायच्या आधी ती मोबाईल आईच्या हातात देऊन दाखवते मेसेज आणि मिसकॉल. आणि सांगते बस आता तू तुझ सुख बघ. माझी तूला साथ आहे. मला चालतील ते  माझे वडील म्हणून. तू नको इथे राहू. तुझी किंमत नाही. बराच वेळ दोघींच्यात बोलण होत. मग तीच विचार करण खूप रडण वैगरे झाल्यावर ती बाजूचा मोबाईल हातात घेऊन त्याला कॉल करते आणि सांगते ती तयार आहे लग्नाला. तो ऑफिसमधून घरी जातो. आईला त्याच्या सगळ माहित असत. तो आईला भेटून सांगतो आणि रामाच्या देवळापाशी गाडी घेऊन तिची वाट बघत असतो. दोघी येतात. गाडीत बसतात. गाडी आळंदीकडे निघाली. आळंदी जवळ आलेली. काही मिनिटांवर इकडे तिचा नवरा घरी आलेला असतो. घरात काहीसे बदल झालेले असतात. मुलीने एक चिठी ठेवलेली असते त्यात लिहिलेलं असत. तुमच आमच्यावर प्रेम नाही हे हजारद तुम्ही आम्हाला पटवून दिलत. पण प्रेम असल्याच एकदा हि जाणवू दिल नाहीत. ती चिठी वाचून त्याने कॉल सुरु केल. ती कॉल एकमाग एक कट करायला लागली. आळंदी आली. ड्रायव्हरने गाडी थांबवली. कॉल येण सुरूच होत. तिने मोबाईल मुलीला दिला. ती गाडीतच बसून होती. दोघे देवळात गेले. पैसे भरले. तिथे एका जोडप्याच लग्न होणार होत. पण तिने विनवणी करून लग्न स्वतःच करून घेतल. लग्न झाल आणि दोघे महाबळेश्वरला गेले. तिथे ते एक महिना होते. दोन वेळा त्यांच्या पर्यंत पोलीस पोचले पण त्याने पैसे देऊन त्यांना मघारी पाठवल. महिन्याभराने ते तिघे पुन्हा घरी आले. एक दिवस त्याच्यासोबत ती बाहेर गेली असताना वाटेत तिला नवरा दिसला. नवऱ्याने तिला बघितल आणि नजर दुसरीकडे फिरवली.
: एवढ अस सुचल आहे मला.
: शेवट मस्त आहे.
: हो. रावण भिक्षुक बनून दारात आला. आणि सतीला घेऊन गेला. तो राक्षस असला तरी त्याने त्याच वागण तस ठेवल नाही. एवढ करून हि सिता रामाकडे गेल्यावर तिच्यावर चारित्र्य संशय घेतला गेला. हि गोष्ट मला खटकली. एवढ सगळ होऊन हि रामाचा जयजयकर आणि रावणाला शिव्या हि गोष्ट मला पटली नाही. आणि त्यावरून मला हि स्क्रिप्ट सुचली कि. राम आणि सीतेच्या संसारात एक रावण जेव्हा चांगल्या माणसाच रूप घेऊन येतो आणि खरेपणाने तिच्याशी चांगल वागतो. तिचं प्रेमाची, तिच्या प्रामाणिकता, एकनिष्ठता, भूतकाळ अस काही न बघता तिचा स्वीकार करतो. आणि असा जो कोणी रावण असतो तेव्हा तो ‘रावण ताज घालायच्या लायक असतो’.  

*समाप्त         

           
           
सावधान....! या कथेला किंवा यातील कोणताही संवाद, प्रसंग लेखकच्या परवानगीशिवाय कुठेही प्रसिद्ध करणे किंवा दाखवणे कायदेशीर गुन्हेगारी ठरेल. असे केल्यास आपल्याला ५०लाख रुपयेपर्यंतचा आर्थिक दंड किंवा दोन वर्ष कैद होऊ शकते. त्यामुळे या कथेला लेखक अजिंक्य अरुण भोसले यांच्याकडून परवानगी काढूनच याला प्रसिध्दी द्या.            


0 Comments