WARNING..!

ब्लॉगवरील कोणतेही लेख कॉपी पेस्ट करून स्वतःच्या नावाने शेअर करू नये तसेच कोणतीही कथा किंवा त्यातले प्रसंग वा संवाद कोणत्याहि वेब मालिकेत, फिल्ममध्ये विनापरवाना वापरू नये तसे आढळल्यास 5,000,00 रुपयापर्यंतचा दंड कायदेशीररित्या भरावा लागेल,आणि/किंवा तीन वर्ष कैद होऊ शकते.

शेवटाची सुरुवात. 


जशी समज येते, समज म्हणजे जशी भाषा बोलयला आणि समजायला लागते तेव्हा पासून मी कित्येक गोष्टीना हक्काने आईला-बाबांना-शेजारपाजाऱ्याना मागत आलोय. आणि त्या गोष्टी मला पुरवल्या हि गेल्या. आधी लहान वय मग मी जरासा मोठा झालो. चॉकलेट वरून आता खेळणी वस्तू मागायला लागलो. मिळालेल्या वस्तुत मला सुख आनंद मिळायचा पण त्याहून जास्त काहीतरी मिळाव हि एक आस लागून राहायची. ती मिळेल तेव्हा मिळेल पण हातातल्या वस्तूवर मन भागवण मला जमत होत. मग शाळेशी संबंध आला माझा. मग सगळ्या जाती धर्मातल्या उच्च नीच श्रीमंत वर्गातल्या मुलांशी माझी मैत्री झाली आणि माझ्याकडे असलेल्या कंपास पेटी, वही, पेन याची तुलना मी श्रीमंत मुलाच्या वस्तूंशी करू लागलो. त्याच्याशी चढाओढ करण मला जमलच नाही. पण मला कधी दिसलच नाही कि माझ्याहून खालच्या परीस्थितीतल्या मुलाला हि माझ्याशी कधी चढाओढ करता आली नाही.
मग प्राथमिक मधून माध्यमिक शाळेत गेलो. हाफ पेज वहीतून आता फुल स्केप वहीवर आलो. पेनासोबत आता पेन्सिल, पट्टी, शार्पनर, करकटक, त्रिकोणी पट्टी आणि काय काय म्हणून गोष्टींचा माझ्याशी संबंध आला. तिथ हि तसच. माझ्याकडे चांगल असाव अश्यात मी माझीच माझ्याशी चढाओढ ठेवली. पण त्यात कायम मी हारलो.
मग तिथून उच्च माध्यमिक – कॉलेजला गेल्यावर जवळ पैसे जास्त नसताना वन बाय टू करून मित्राला चहा पाजून त्याला माझा मित्र बनवल. आणि मी मित्र झालो अशा मुलाचा ज्याच्या खिशात खूप पैसा असा चुरगाळून ठुसलेला होता. तिथून पुढ शिक्षण झाल नोकरी मग प्रेम आणि काही काही गोष्टी अशा घडत गेल्या कि मला कळालच नाही कि मी जातोय कुठे आणि मी आहे कुठे ? बस तुलना करत जगताना माझ मन कधी स्थिर नव्हत. मिळालेल्या गोष्टीत मला आनंद किंवा त्या गोष्टीच मला अप्रूप कधी वाटलच नाही. वाटत राहिला तो फक्त पुढच्या व्यक्तीचा हेवा. आणि मिळाल काय मला तस वागून ? काहीच नाही शून्य.
मग लग्न करून पण माझी बायको मित्राच्या बायको समोर फिकी वाटली. मित्राची कार,बंगला बघून माझ घर मला कमी वाटल. त्या घरात बसून रात्रीच झोपेत मला माझच घर मला खायला उठायचं. मग मुल झाली. हुशार होती पण दुसर्यांची मुल किती हुशार कलाकार असतात आणि माझ गाबड नुस्त खायच्या कामच आहे अस म्हणून त्याला न्यूनगंड निर्माण झाला आणि त्याच्या या वागण्याची दूषण मी त्याच्या आईला दिली माझीच चूक असून. मुल मोठी झाली. आणि माझी बायको तोवर कधीच माझी साथ सोडून गेली. तिला त्यातल्या त्यात काटकसरीने जगायला जमायचं मला नाही. ती जगली माझ्या धाकात पण निदान जगली तरी.
पण मी लहान पणापासून ह्या ना त्या गोष्टींचा, वस्तूंचा हेवा धरत जगत आलो. जे हव ते मिळवत आलो. हा मला हव होत तितक कधीच काही मी मिळवल नाही , किंवा माझी वाढत चाललेली भूक आणि असमाधानी वृत्ती बघून देवानेच मला जास्त काही दिल नाही पण मिळाल सगळ. सगळ मिळवता मिळवता मी जगायचं विसरूनच गेलो. वय थकल माझ आता. पण या सगळ्या मिळवलेल्या गोष्टी आता नव्यान जर का बघायच्या म्हंटल्या तर माझ्याकडे आता पुरेस वेळ उरला नाहीये.....
जगाचा दिखावा, मोठेपणा बघण्यात मी माझ हे छोटस आयुष्य पणाला लावलं आणि मिळाल काय बदल्यात ? अतृप्तपणाच. म्हणतात ते खरच आहे. माणूस कधी समाधानी नाही होऊ शकत. आणि असमाधानी बनून तो कधीच मनासारखं आयुष्य नाही जगू शकत.0 Comments