![]() |
( Image by Google ) |
सकाळची वेळ माझी. काल ठरवून झोपलो होतो आज काय काय करायचं. कारण विश्वास होता मला काल रात्री झोपलो तरी आज मी उठणार कायमचा झोपणार नाही. मग मी माझ आवरून मस्त बायकोने बनवलेला नाष्टा खाल्ला. काय बनवलेलं बर ? हा....माझ्या आवडता उपमा. तो खाऊन मी अंघोळ करायला गेलो. तर नेमका माझा साबण संपलेला. बायकोला हाक मारली तिने येऊन साबण हातात दिला. आता अंघोळ केली तर टॉवेल तो ही विसरलेला. परत बायकोला हाक मारली ती आली. तिने टॉवेल आणून दिला. मग बाहेर येऊन माझे कपडे घालताना मला माझा पांढरा शर्ट सापडला नाही. बाहेर जायचं एवढ्या उन्हातानाच म्हणाल्यावर सुती शर्ट घातल कि जरा बर वाटत. परत मी माझ्या बायकोला हाक मारली. ती तोंड वेड वाकड करून आली. आणि शर्ट हुडकून दिला माझ्या हातात. मग मी आवरून निघालो. चप्पल घातली माझी कोल्हापुरी. आणि सुनेणी मला हातात बॅंकेच पासबुक आणून दिल , लाईट बिल त्याचे पैसे आणि सोबत नातेची क्लास फी दिली. मी गेलो. हळू हळू आणि पहिलं जवळच्या पतसंस्थेत लाईट बिल भरल. मग बँकेत जायला शेअर रिक्षा पकडली जीवच घुसमटला माझा पण स्पेशल रिक्षा पकडली तर ऐंशी घेतात आणि शेअर ने फक्त दहा. परवडत. मग त्यातून जाऊन बँक गाठली तर तिथ भली मोठी रांग लागलेली. साडे अकराच्या सुमारास पोचलेलो मी माझा नंबर साडे बाराला आला. मग तिथून नातीच्या क्लासला शेअर रिक्षा करून गेलो तिथ त्यांचा क्लास सुरु होता. मला वाट बघत बसायला सांगितल. त्या बाई येई पर्यंत एव्हाना एक वाजला होता. मग त्यांना पैसे देऊन रिसीट घेतली आणि खिशात भरलेल्या लाईट बिलाची रिसीट आहे का एकदा तपासलं. ती हि होती. मग निघालो मी घराकडे. घरी आलो. तोंड धूतल आणि बायकोने विचारलं सरबत पिणार का ? आता पोटात कावळे ओरडत होते सरबताने काय होणार होत ? म्हणटल जेवायलाच वाढ . बर काय बनवल आहेस ? तिने सांगितल भरल वांग भात. माझा आवडता मेनू. मग पोटाला झेपल इतक खाऊन मी जरा पेपर वाचला आणि झोपलो.
आज ना माझ्या वाढदिवसाठी मुलाने सुनेणे नातीने बायकोने काय काय केल होत. पण मी रेड्यासारखा झोपलेलो. मुलगा आज लवकर येणार होता कामावरून. सुनेने हि सुट्टी काढलेली कारण तिला अर्धी सुट्टी मिळत नाही.
आणि मी ही जागा होतो. सगळ्यांच्या मला सगळ्या हालचाली माहित होत्या पण मुद्दाम पडून होतो. आणि नंतर मला नात उठवायला आली आणि ????
मी उठलोच नाही. मी झोपण्याचा बहाणा करत होतो आणि बघत होतो कोण काय प्रतिक्रिया देतय. बायको आली माझी. तिने हि मला खांद्याला धरून हलवलं. हलवलं म्हणजे अगदी खांदा गदागदा हलवला. पण मला त्रासच होत नव्हता. काही स्पर्शाची जाणीव ती काय होत नव्हती. जाणवत होत बाजूला सून नात बायको मुलगा होते. पण उठायचं मला काही होईना.
रात्री झोपताना मी ठरवलेला उद्या माझा दिवस कसा असेल. आणि उठल्यापासून दुपारी झोपेपर्यंत सगळ माझ आणि माझ्याबाबतीत घडत होत किंवा मी करत होतो. आत्ता हि माझाच म्हणजे आज माझा वाढदिवस होता साठावा. पण माझ सगळ संपल. एरवी जिवंत असून हि सेकंदा सेकंदाला श्वास घ्यायचो पण मला कळायचं नाही कारण मी लक्षच दिल नाही त्याकडे कधी. चेहऱ्यावर पावडर लावताना , केसांचा भांग पडताना मी नाकातून श्वास घेतो हे मात्र विसरून जायचो पण आत्ता मला त्या श्वासाची गरज आहे. प्रत्येक श्वासाचा हिशोब मला लावायचा आहे पण आता ते माझ्या हातात नाही. कारण मी ,
मेलो आहे.
काय राहील मी माझ मला म्हणून ? क्षणात संपल.
JOIN ME ON SOCIALLY